हो मी आहे खलनायक ! .'महाराष्ट्राचा फेवरेट कोण ? २०२३' मंचावर आला महाराष्टाचा बॅडमॅन !
चित्रपट प्रदर्शित झाला की त्याच्या नायक नायकांची चर्चा शिगेला पोहोचते. हीरो हीरोइनच्या चाहत्यामध्ये वाढ होते . त्यांच्या स्टाईल्स फॉलो केल्या जातात. डायलॉग गाजतात. हे तर आपण नेहमीच पाहतो, पण चित्रपटाच्या नायक नायिकांचा जसा चाहता वर्ग असतो तसाच फॅन क्लब खलनायकांचा सुद्धा असतो. चित्रपटसृष्टीत खलनायकांची परंपरा अभिनयाने जपणारे अनेक दुष्ट कलाकार प्रेक्षकांची वाहवा मिळवत असतात. झी टॉकीजच्या *'महाराष्ट्राचा फेवरेट कोण ? २०२३'* या पुरस्कार नामांकन यादीतील असेच कसलेले खलनायक प्रेक्षकांच्या पसंतीतून मिळणाऱ्या *'महाराष्ट्राचा फेवरेट खलनायक'* या पुरस्काराकडे लक्ष लावून बसले होते. प्रेक्षकांनी आपल्या भरभरून मतांचा कौल देत *'महाराष्ट्राचा फेवरेट खलनायक'* हा पुरस्कार अभिनेते सयाजी शिंदे यांना दिला आहे .
*झी टॉकीज तर्फे *'महाराष्ट्राचा फेवरेट कोण ? २०२३'* हा पुरस्कार सोहळा रविवारी १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता झी टॉकीज या वाहिनीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. याच मंचावर *'महाराष्ट्राचा फेवरेट खलनायक'* हा पुरस्कार अभिनेते सयाजी शिंदे स्वीकारणार आहेत. प्रेक्षकांनी माझ्यातल्या खलनायकाला दिलेले हे प्रेम मला आनंद देणारे आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत अभिनेते सयाजी शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला . घर बंदूक बिर्याणी या चित्रपटातील खलनायक त्याच्या भूमिकेसाठी सयाजी शिंदे यांना प्रेक्षकांची पसंती *'महाराष्ट्राचा फेवरेट कोण ? २०२३'* या मंचावर मिळाली आहे. नागराज मंजुळे ,आकाश ठोसर आणि सयाजी शिंदे यांच्या अभिनयाची जुगलबंदी ठरलेल्या *'घर बंदूक बिर्याणी'* या चित्रपटाची २०२३ या वर्षाच्या सुरुवातीला चांगलीच चर्चा रंगली होती. बऱ्याच वर्षांनी सयाजी शिंदे मराठी चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार यामुळे त्यांचे चाहते देखील खुश होते .एका वेगळ्या विषयावरचा 'घर बंदूक बिर्याणी' हा चित्रपट प्रेक्षकांनाही आवडला .या चित्रपटातील सयाजी शिंदे यांनी रंगवलेले खलनायकाचे पात्र सयाजी शिंदे यांच्या अफलातून डायलॉगबाजी आणि कसलेल्या अभिनयाने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले. सयाजी शिंदे यांना थिएटर मध्ये प्रेक्षकांनी प्रतिसाद दिलाच होता त्याचबरोबर *'महाराष्ट्राचा फेवरेट कोण ? २०२३'* या पुरस्कार स्पर्धेतील फेवरेट खलनायक या विभागात सयाजी शिंदे यांचे नाव नामांकन यादीत जाहीर होताच प्रेक्षक पसंतीचा ओघ त्यांच्या नावाकडेच सुरू झाला. प्रेक्षकांनी सर्वाधिक मते सयाजी शिंदे यांना देत *'महाराष्ट्राचा फेवरेट बॅडमॅन'* बनवले. *'महाराष्ट्राचा फेवरेट खलनायक'* हा पुरस्कार घेतल्यानंतर सयाजी शिंदे यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले. *'झी टॉकीज वाहिनी आणि महाराष्ट्राचा फेवरेट कोण पुरस्कार सोहळा* हे समीकरण यंदाही दणक्यात रंगले. मराठी चित्रपट सृष्टीतील पडद्यावरचे आणि पडद्यामागील अनेक कलाकार या सोहळ्याला उपस्थित होते . रेड कार्पेटवर अवतरलेल्या सर्व कलाकारांच्या उपस्थितीत *'महाराष्ट्राचा फेवरेट कोण ? २०२३'* पुरस्कार सोहळा दिमाखात साजरा झाला. झी टॉकीज तर्फे दरवर्षी *'महाराष्ट्राचा फेवरेट कोण ? २०२३'* . हा पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो. वर्षभरात प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील पडद्यावरचे आणि पडद्यामागचे कलाकार यातून
*'महाराष्ट्राचा फेवरेट कोण ? २०२३'*. या पुरस्कारासाठी प्रेक्षक पसंतीतूनच कलाकारांची निवड केली जात असल्याने हा पुरस्कार कलाकारांसाठी ही तितकाच आपुलकीचा असतो. त्यामुळे *'महाराष्ट्राचा फेवरेट कोण ? २०२३'* हा पुरस्कार सोहळा रविवारी १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता झी टॉकीज या वाहिनीवर पहायला चुकवू नका.
Comments
Post a Comment