घरत कुटुंबाच्या बाप्पाची पहिली झलक भेटीला....



    उत्सवप्रिय कोकणात दणक्यात साजरा होणारा सण म्हणजे गणेशोत्सव. कोकणातील गणेशोत्सव कुटुंबाला बांधणारा, नाती जवळ आणणारा, उत्साहाचे, आनंदाचे वातावरण निर्माण करणारा आहे. पाहुणे, मुलांची धम्माल, जुन्या-नव्या पिढीसोबत गप्पा, नाच-गाण्यांच्या कार्यक्रमांची जागरण असा हा ऊर्जावर्धक सण आहे. याच ऊर्जावर्धक  सणाची गोष्ट घेऊन घरत कुटुंबाचा गणपती आणि घरत कुटुंब आपल्या भेटीला आलंय.  पॅनोरमा स्टुडिओज सविनय सादर करत आहेत नॅविअन्स स्टुडिओ यांच्या सहकार्याने ‘घरत गणपती’ हा भव्य मराठी चित्रपट २६ जुलैला आपल्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे  दिग्दर्शन  नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर  यांचे असून कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरी यांनी ‘घरत गणपती’ चित्रपटाची  निर्मिती केली आहे.
या घरत कुटुंबाच्या सदस्यांनी नुकतीच श्री सिद्धिविनायक मंदिराला भेट देत यंदा आपल्या घरत कुटुंबाच्या ‘घरत गणपती’ चित्रपटाचा डंका सर्वत्र जोरदार वाजू देत यासाठी मनोभावे प्रार्थना केली. या घरत कुटूंबाची ओळख  नुकतीच  एका हृद्य स्नेहभेटीच्या सोहळ्यात सर्वांना करून  देण्यात आली. उत्साह, चैतन्याने भारलेल्या वातावरणात गणपतीची विधिवत पूजा, आरती, नैवैद्य, सुग्रास जेवणाचा बेत अशा सगळ्या मंगलमय गोष्टीने  ‘घरत गणपती’ चित्रपटाच्या जोरदार प्रमोशनची सुरुवात झाली. याप्रसंगी  या  घरत कुटुंबाच्या  स्नेहाची  त्यांच्या बंधाची छोटीशी  झलक दाखविण्यात आली.

यावेळी  बोलताना चित्रपटातील कलाकारांनी सांगितलं कि , ‘आपलं प्रत्येकाचं गणपती बाप्पाशी खास असं नातं असतं.  गणपतीच्या वेळी केलेली धमाल वेगळीच असते. हीच धमाल दाखवताना गणपती बाप्पाच्या कृपेने प्रत्येकाला  नात्यांचे  सूर  कसे गवसणार ? हे पहायला  मिळणार आहे. हा चित्रपट पाहताना  निखळ आनंद तर मिळेलच पण या  चित्रपटाची  गोष्ट  प्रत्येकाला आपल्या  कुटुंबाची आणि प्रेमळ नात्यांची आठवण करून देईल हा विश्वास कलाकारांनी व्यक्त केला. हा चित्रपट प्रत्येकाला आपल्या घरातला वाटेल.  दिग्गज कलाकारांसोबत उत्तम संहितेवर काम करण्याचा योग घरत गणपतीने जुळवून आणला. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी रुपेरी पडद्यावर उत्तम कथानक व भव्यदिव्यता दिसेल असा विश्वास दिग्दर्शक नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांनी व्यक्त केला. चांगल्या कलाकृतींच्या पाठीमागे पॅनोरमा स्टुडिओज नेहमीच उभी राहिली आहे. ‘घरत गणपती’ हा कौटुंबिक चित्रपट प्रत्येकाच्या मनात नक्कीच घर करेल असा विश्वास पॅनोरमा स्टुडिओजचे मुख्य व्यवसाय अधिकारी मुरलीधर छतवानी यांनी व्यक्त केला.  

‘कुटुंब’हा तसा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. कुटुंबातल्‍या प्रत्‍येकाशी आपले काही भावनिक अनुबंध असतात. घरत कुटुंबातल्या याच अनुबंधाची हलकी-फुलकी गोष्ट  नवज्योत बांदिवडेकर दिग्दर्शित ‘घरत गणपती’ या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. नॅविअन्स स्टुडिओ निर्मित या चित्रपटाच्या वर्ल्ड वाइड वितरणाची जबाबदारी पॅनोरमा स्टुडिओजने सांभाळली आहे तसेच चित्रपटाच्या म्युझिकची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.

Comments

Popular posts from this blog

विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय, ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"पीफ" मध्ये "जिप्सी" चित्रपटासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर सन्मान.