निकिताचा मराठमोळा अंदाज...जरतारी काठ नऊवारी थाट...
मोगर गजरा. साज केसात,नजरेचा नखरा नथीचा तोरा डोळ्यांच्या डोहाला काजळ,किनारा,.अशी शब्दकळा जिच्या बाबतीत म्हटली गेलीय ती अभिनेत्री निकिता दत्ता मराठमोळ्या अंदाजात खूपच खुलून दिसतेय. आणि तिचा मराठमोळा अंदाज सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्यासाठी निमित्त आहे तिचा आगामी मराठी चित्रपट.. 'घरत गणपती'.
जरतारी काठाची जांभळया रंगाची पैठणी, केसांचा सैलसर अंबाडा त्यावर मोगऱ्याचा गजरा, कपाळी चंद्रकोर, नाकात नथ, गळ्यात पारंपरिक दागिने असा साजशृंगार करून निकिताने आपला मराठमोळा ठसका ऐटीत दाखविला आहे. . 'घरत गणपती' हा माझा पहिलाच मराठी चित्रपट. पण या निमित्ताने मराठी चित्रपटाशी, कलाकारांशी आणि इथल्या मराठमोळ्या संस्कृतीशी ओळख झाली. इथले सण समारंभ, रितीरिवाज, पोशाख पेहराव या सगळ्यांनीच मला अक्षरशः भुरळ घातली, असं निकिता सांगते.
पॅनोरमा स्टुडिओज सविनय सादर करीत आहेत नॅविअन्स स्टुडिओ यांच्या सहकार्याने मराठी चित्रपट ‘घरत गणपती’. २६ जुलैला हा चित्रपट आपल्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांचे असून कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरी यांनी ‘घरत गणपती’ चित्रपटाची निर्मिती केली आहे.
Comments
Post a Comment