"मन प्रेमात रंगले"... 'नेता गीता' चित्रपटातलं पहिल गाणं लाँच.
कॉलेज जीवनातील राजकारण, प्रेम यांची गोष्ट गुंफून साकारलेल्या "नेता गीता" या चित्रपटातून प्रेक्षकांना म्युझिकल ट्रीट मिळणार आहे. या चित्रपटातलं "मन प्रेमात रंगले..." हे पहिल गाणं लाँच करण्यात आलं आहे. हिंदी चित्रपटाच्या तोडीचं असलेलं हे गाणं गायक अभय जोधपूरकरनं गायलं असून, म्युझिकल ट्रीट देणारा 'नेता गीता' हा चित्रपट २३ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
सिम्बारिया फिल्म्सतर्फे "नेता गीता" या चित्रपटाची प्रस्तुती करण्यात येत आहे. सुधांशु बुडूख यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात शिवानी बावकर, सुधांशु बुडूख, रोहित कोकाटे, अनिल नगरकर, विठ्ठल काळे, अजय तपकिरे, विराज अवचिते, सुहास जोशी असे उत्तमोत्तम कलाकार या चित्रपटात आहेत. रोशन मारोडकर यांनी छायांकन, निरंजन पेडगावकर यांनी संगीत, सौमित्र धारासूरकर यांनी संकलन, तर संजीव हवालदार, धीरज भालेराव यांनी नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे.
कॉलेज जीवन म्हटल्यावर प्रेम स्वाभाविकपणे येतं. मात्र "नेता गीता" या चित्रपटात कॉलेज काळातल्या निवडणुका, त्या वेळचं प्रेम यांची कहाणी मांडण्यात आली आहे. रंजक कथानकाला श्रवणीय संगीताचीही जोड मिळाली आहे. अतिशय युथफुल असलेल्या या चित्रपटातील चार गाणी तरुणांसाठी नक्कीच मेजवानी ठरणार आहेत. उत्तम संगीत असलेली चार गाणी अभय जोधपूरकर, निरंजन पेडगावकर यांनी गायली आहे. "मन प्रेमात पडले.." या गाण्याचे शब्द, संगीत तरुणाईला आवडतील असेच आहेत. त्याशिवाय या गाण्याचं छायांकनही अतिशय नेत्रसुखद आहे. त्यामुळे 'नेता गीता' चित्रपटातील गीतांचा हा अल्बम तरुणाई आवर्जून ऐकेल यात शंका नाही.
*Song Link*
https://youtu.be/sW6dgTpPS-0?si=2fVaW1z7EiMG9HKO
Comments
Post a Comment