'किशोरी आंबिये’ ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेत दिसतायेत वेगळ्या भूमिकेत.


कधी खाष्ट, कधी प्रेमळ, तर कधी विनोदी, कधी गंभीर अशा विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री किशोरी आंबिये लवकरच सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी  नव्याने’ या मालिकेत एका नव्या भूमिकेत दिसतायेत. कॉलेजच्या प्राध्यापिकेची भूमिका त्या यात साकारत आहेत. पद्मिनी गाडगीळ असं या व्यक्तिरेखेचं नाव आहे. आजवरच्या त्यांच्या भूमिकांपेक्षा अगदी वेगळी व्यक्तिरेखा  यात साकारत आहेत. ही मालिका  सोनी मराठी वाहिनीवर रोज रात्री ९.००वा. प्रसारित होते. मालिका विश्वात एआयवर आधारित असलेली  ‘तू भेटशी नव्याने’  ही जगभरातली पहिलीच मालिका आहे. प्रत्येकाला पुन्हा प्रेमात पाडणारी ही नवीकोरी गोष्ट दोन काळांत वेगळ्या शैलीत दिसणार आहे. मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते अजय मयेकर आहेत. सहनिर्माते  संदीप जाधव आहेत.
  
या मालिकेत किशोरी आंबिये' यांचे दोन ट्रॅक असून त्यांच्या नव्या व्यक्तिरेखेमुळे मालिकेत काय वळण येणार? हे बघणं उत्सुकतेचे ठरणार आहे. दोन काळातल्या व्यक्तिरेखा त्या यात साकारत असून प्राध्यापिकेच्या भूमिकेनंतर  नव्या ट्रॅकमध्ये त्या कोणत्या रूपात दिसणार? आणि त्यांच्या येण्याने अभिमन्यू आणि तन्वीच्या आयुष्यात काय होणार ? की त्यांच्या येण्याने या दोघांचे बंध जुळले जाणार? हे मालिकेच्या आगामी भागात पहायला  मिळणार आहे.

चांगल्या विषयामुळे आणि भूमिकेमुळे मी या मालिकेला  होकार दिला.  मैत्री आणि प्रेम या  प्रवासात वळणावळणावर घडणाऱ्या अनपेक्षित गोष्टी, याचा रंजक अनुभव देणारी ही मालिका आहे.  'तू भेटशी नव्याने' मालिकेच्या निमित्ताने दोन वेगळ्या काळांतल्या भूमिका करताना खूप मजा येत असल्याचे किशोरी आंबिये' सांगतात. 

“नातं जपण्यासाठी सोबत हवी असते फक्त निरंतर प्रेमाची..! कारण,जगायला श्वासाची नाही तर, प्रेमाची गरज असते! असा विश्वास ही मालिका  देते. ‘तू भेटशी नव्याने’ या शीर्षकाप्रमाणेच नव्या रूपात नव्या वळणार होणारी ही भेट नेमकी कशी असेल? या प्रेमकथेचे रंग कसे बहरणार? हे सर्व अनुभवण्यासाठी सोनी मराठी वाहिनीवर रोज रात्री ९.०० वा. प्रसारित होणारी ‘तू भेटशी नव्याने’ मालिका नक्की पहा.

Comments

Popular posts from this blog

विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय, ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"पीफ" मध्ये "जिप्सी" चित्रपटासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर सन्मान.