पोस्ट्स

ऑगस्ट, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

'लाईक आणि सबस्क्राईब'मधून जुई भागवतचे रुपेरी पडद्यावर पदार्पण.

इमेज
      काही दिवसांपूर्वीच सोशल मिडीयावर एका चित्रपटाचे उत्सुकता वाढवणारे पोस्टर झळकले होते. 'लाईक आणि सबस्क्राईब' असे नाव असलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अमृता खानविलकर, अमेय वाघ आणि आणखी एक चेहरा झळकला होता. काहींनी हा चेहरा ओळखला. तर काहींना हा नवीन चेहरा कोणाचा, असा प्रश्न पडला होता.  तर ही अभिनेत्री आहे, 'तुमची मुलगी काय करते?' या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या जुई भागवतचा. 'लाईक आणि सबस्क्राईब' च्या माध्यमातून जुई मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. जुई एक उत्तम नर्तिका आणि गायिकाही आहे.  आपल्या चित्रपटातील पदार्पणाबद्दल जुई भागवत म्हणते, '' माझी आई एक उत्तम अभिनेत्री आहे, सूत्रसंचालिका आहे. त्यामुळे बालपणापासूनच माझ्यावर नकळत अभिनयाचे संस्कार होत गेले. याआधीही मी एका मालिकेत बालकलाकाराचे काम केले होते,. एका शोमध्येही सहभागी झाले होते. मालिका केली. आता 'लाईक आणि सबस्क्राईब'मधून मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाले आहे. यातील माझी भूमिका खूपच वेगळी असून हा एक रहस्यमय चित्रपट आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी खूप जा...

चतुरंगाच्या पन्नाशी निमित्त ११ 'चतुरंग सुवर्णरत्न सन्मानां'ची घोषणा,२८ - २९ सप्टेंबरला मुंबईत भव्योदात्त सोहळा.

इमेज
        कोकण खेड्यातल्या आपल्या शाळांसाठी आपण काहीतरी शालोपयोगी उपक्रम करूया अशा छोट्याशा उद्देशाने १९७४ च्या अक्षय्य तृतीयेला सुरू झालेल्या चतुरंग प्रतिष्ठान या सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक संस्थेने विविधांगी असे ६१ उपक्रम अंगीकारत, हाताळत कालच्या अक्षय्य तृतीयेला आपल्या वाटचालीची पन्नास वर्षे पूर्ण केली. मुंबई पाठोपाठ डोंबिवली, पुणे, चिपळूण, रत्नागिरी, गोवा.... असा सहा केंद्रांवर आपला पसारा वाढवीत, महाराष्ट्रात सर्वदूर सुमारे २४० हून अधिक स्थळ - ठिकाणांचा वापर करीत ५० वर्षात १८०० हून अधिक कार्यक्रमांचा(इव्हेंट चा) टप्पा पार केला आहे. अर्थातच यासाठी त्यांना भरभरून सहकार्य पाठबळ पाठिंबा मिळाला तो सर्व क्षेत्रांतील असंख्य अगणित लोकप्रिय कलावंतांचा! नामवंत, गुणवंत अशा अनेक मान्यवरांचा!! चतुरंग उभी राहायला, प्रस्थापित करायला ज्या ज्या सज्जन दिग्गजांनी, त्या त्या काळात चतुरंगला आधार दिला त्यांच्या प्रति जाहीर कृतज्ञता व्यक्त करणारे आनंद सोहळे प्रतिष्ठानने मुंबई खेरीज आपल्या रत्नागिरी, चिपळूण, गोवा, डोंबिवली, पुणे या अन्य केंद्रांवर मोठ्या झोकदारपणे आणि दिमाखात साजरे केले ...

संदीप मनोहर नवरे दिग्दर्शित 'एक डाव भुताचा' ४ ऑक्टोबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात.

इमेज
मराठी चित्रपटसृष्टीत मकरंद अनासपूरे, सिद्धार्थ जाधव हे अष्टपैलू अभिनेते म्हणून सुपरिचित आहेत. "दे धक्का" सारख्या काही चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केलं आहे. आता "एक डाव भूताचा" या चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपूरे आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव एकत्र आले असून, येत्या ४ ऑक्टोबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले.   रेवा इलेक्ट्रॉनिक्स या निर्मिती संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रस्तुती अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेंटेने केली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केलं आहे. चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव यांच्यासोत नागेश भोसले,अक्षय कुलकर्णी,हर्षद नायबळ अभिनेत्री मयूरी देशमुख,अश्विनी कुलकर्णी, नंदिनी  वैद्य, वर्षा दांदळे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. डॉ. सुधीर निकम आणि संदीप मनोहर नवरे यांनी पटकथा लेखन, डॉ. सुधीर निकम यांनी संवाद लेखन, गौरव पोंक्षे यांनी छायांकन, विक्रांत हिरनाईक यांनी गीतलेखन, गौरव चाटी यांनी संगीत दिग्दर्शन, प...

'रघुवीर' चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद...लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी आयोजित केला विशेष शो...

इमेज
मन:शक्तीची ताकद पटवून देत आध्यात्मासोबत व्यायामालाही महत्त्व देणारे थोर संत समर्थ रामदास स्वामी यांच्या चरित्रावर आधारलेल्या 'रघुवीर' चित्रपटाचा सर्वत्र उदो उदो होत आहे. चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षकांसोबतच सिनेसृष्टीतील मान्यवर, तसेच दिग्गजांकडूनही 'रघुवीर'वर कौतुकाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्रभरातील सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळे 'रघुवीर'चे शो हाऊसफुल होत आहेत. 'शिवराज अष्टक' या संकल्पनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवणारे तसेच महाराष्ट्र राज्य पुरस्कार विजेते लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी 'रघुवीर'च्या विशेष शोचे आयोजन केले आहे.  दिग्पाल लांजेकर यांनी ३१ ऑगस्ट २०२४ रोजी पुण्यातील कोथरूड येथील सिटीप्राईड सिनेमागृहात 'रघुवीर'चा विशेष शो आयोजित केला आहे. या शो दरम्यान ‘रघुवीर‘ची संपूर्ण टीम व अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दर्जेदार ऐतिहासिक मराठी चित्रपट जास्तीतजास्त प्रेक्षकांपर्यंत पोहचावा यासाठी दिग्पाल लांजेकर यांनी घेतलेला हा पुढाकार अत्यंत कौतुकास्पद व अभिनंदनीय आहे.          या च...

'सूर्याची पिल्ले' नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर रॉयल ऑपेरा हाऊस येथे होणार शुभारंभाचा प्रयोग.

इमेज
सुनील बर्वे यांनी 'हर्बेरियम' उपक्रमांतर्गत काही अभिजात नाटकांचे २५ प्रयोग रंगभूमीवर सादर केले होते. त्यापैकीच एक वसंत कानेटकर लिखित 'सूर्याची पिल्ले' हे नाटक. या नाटकाच्या प्रत्येक प्रयोगाला 'हाऊसफुल्ल'ची पाटी झळकली. इतके प्रेम नाट्यरसिकांनी या नाटकावर केले.  याच प्रेमाखातर 'सूर्याची पिल्ले' हे तीन अंकी नाटक रंगभूमीवर येण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. सुबक निर्मित नवनित प्रकाशित प्रस्तुत या नाटकाचा शुभारंभ २२ सप्टेंबरपासून होणार असून याचा पहिला मुंबईतील प्रयोग रॉयल ऑपेरा हाऊस येथे होणार आहे. यानिमित्ताने सूर्य होऊ न शकलेल्या त्याच्या पिल्लांची पोटभर हसवणारी... मनभर सुखावणारी...  एक कानेटकरी क्लासिक कॉमेडी! नाट्यरसिकांना परत अनुभवायला मिळणार आहे. हलक्या फुलक्या विनोदातून विचार करण्यास भाग पाडणारे असे हे नाटक आहे.  प्रतिमा कुलकर्णी दिग्दर्शित या नाटकात आनंद इंगळे, पुष्कर श्रोत्री, अनिकेत विश्वासराव, सुहास परांजपे, शर्वरी पाटणकर, उमेश जगताप, अतिषा नाईक आणि अतुल परचुरे प्रमुख भूमिकेत आहेत. अशोक पत्की यांचे संगीत लाभलेल्या या नाटकाचे सुनिल बर...

‘वीर मुरारबाजी' चित्रपटात अभिनेते सौरभ राज जैन साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका.

इमेज
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक शूर मावळ्यांनी जीवाची बाजी लावत इतिहास घडवला. शिवकाळातील नररत्नांपैकी एक, रणझुंजार मुरारबाजी देशपांडे. पुरंदरच्या वेढ्याप्रसंगी झालेल्या धुमश्चक्रीत महान पराक्रम गाजवून शेकडों गनिमांना यमसदनी धाडणाऱ्या स्वामीनिष्ठ मुरारबाजी देशपांडे यांचा पराक्रमी इतिहास आजही प्रत्येकाला  प्रेरणा देणारा आहे. स्वराज्याच्या इतिहासात पुरंदरचे ‘काळभैरव’ म्हणून ओळख असणारे मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा १४ फेब्रुवारी २०२५ला ‘वीर मुरारबाजी...पुरंदरकी युद्धगाथा’ या चित्रपटातून रुपेरी पडदयावर  येण्यासाठी सज्ज होत आहे. हा चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.   मालिका विश्वात ‘श्रीकृष्ण’ आणि ‘महादेव’ यांची तसेच 'ओम नमो व्यंकटेशाय' या दाक्षिणात्य  चित्रपटात 'तिरुपती  बालाजी' यांची भूमिका साकारत प्रचंड लोकप्रियता मिळवणारे अभिनेते सौरभ राज जैन या चित्रपटात छत्रपती  शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. त्यांचे विलोभनीय पोस्टर प्रदर्शित करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची  तारीख  जाहीर करण्यात आली आहे. 'फत्तेश...

रत्नागिरी तालुका भंडारी समाज महाअधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय 'श्री नवीनचंद्र बांदिवडेकर' यांची नियुक्ती झाली...

इमेज
भंडारी समाजाची प्रगती, विकास आणि समाजाला दिशा देण्याचे दृष्टी त्यांच्याकडे आहे. इतर नेते साठमारीत गुंतलेले असताना त्यांच्या तोडीचे किंबहुना त्यांच्या आसपास पोहोचणारे व्यक्तिमत्व समाजात दुर्मिळ झाले आहे.साहेबांचे सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचे कर्तृत्व आणि वक्तृत्व वाखणण्याजोगे आहे.त्यांच्या पुढाकाराने शिवाजी पार्क,मुंबई येथे २००६ साली संपन्न झालेल्या अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाच्या मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता.पण नंतर त्याला दृष्ट लागली आणि भंडारी समाज बांधव पुन्हा एकदा काहीसा विस्कळीत झाला.आदरणीय बांदिंवडेकर साहेबांच्या प्रयत्नाने  भंडारी समाजाचे दैवत भागोजीशेठ कीर यांच्या स्मृतिदिनी (महाशिवरात्री दिनी) गेली १६/१७ वर्षे बेंगाल केमिकल ते भागोजीशेठ कीर स्मशानभुमी दादर (पश्चिम) या मार्गावर भव्य रॅली काढून भागोजींच्या पुतळ्याची विधियुक्त पूजा करून अभिषेक करण्यात येतो.या भव्य रॅलीचे सर्वप्रकारचे नियोजन स्वतः ते करतात.त्यासाठी महिनाभर अथक परिश्रम घेतात.भागोंजीचे उचित स्मारक शिवाजी पार्क परिसरात व्हावे तसेच शालेय पुस्तकामध्ये भागोंजी विषयी धडा असावा यासाठी...

आदिनाथ कोठारे दिग्दर्शित 'पाणी' १८ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित ..

इमेज
राजश्री एंटरटेन्मेंट आणि पर्पल पेबल पिक्चर्स, कोठारे व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पाणी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच्या बातमीने मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली होती. आता हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून येत्या १८ ऑक्टोबर रोजी 'पाणी' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आदिनाथ कोठारे दिग्दर्शनात पदार्पण करत असून राजश्री एंटरटेन्मेंटसारखा मोठा बॅनर, इंटरनॅशनल आयकॉन अशी ख्याती असणारी प्रियांका चोप्रा आणि महाराष्ट्राची शान असलेले कोठारे व्हिजन प्रा. लि.असे तिन्ही मोठे निर्माते एकत्र येत आहेत. या तिघांच्या एकत्र येण्याने मराठी सिनेसृष्टीला एक सर्वोत्कृष्ट चित्रपट अनुभवायला मिळणार आहे.   नितीन दीक्षित आणि आदिनाथ कोठारे यांची कथा असणाऱ्या 'पाणी'मध्ये आदिनाथ कोठारे, रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी, विकास पांडुरंग पाटील अशी तगडी स्टारकास्ट आहे. नेहा बडजात्या, दिवंगत रजत बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनस, डॅा. मधू चोप्रा या चित्रपटाचे निर...

महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळयात 'बापल्योक' चा डंका.

इमेज
मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मानाचा समजला जाणारा राज्य शासनाचा  ५८ आणि ५९ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा नुकताच दिमाखात संपन्न  झाला. या सोहळ्यात ‘बापल्योक’ चित्रपटाने आपली विशेष छाप पाडली.  सर्वोत्कृष्ट  चित्रपटाच्या द्वितीय पुरस्कारासह  ‘बापल्योक’ चित्रपटाने  सर्वोत्कृष्ट  दिग्दर्शक (द्वितीय), संवाद, पार्श्वसंगीत,  कथा, गीत, सहाय्य्क अभिनेता अशा तब्ब्ल ७ पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं.   आपल्या या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना विजय शिंदे,  शशांक शेंडे आणि मकरंद माने हे तिघंही सांगतात की, ‘उत्तम आशयसंपन्न कलाकृतीसाठी एकत्र येत आम्ही ‘बापल्योक’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला.वेगवेगळ्या राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चित्रपटाने यशाची मोहोर उमटवली असतानाच, मानाच्या राज्य शासनाच्या ५८ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये मिळालेले यश आम्हाला अनेक नव्या चांगल्या कलाकृतींसाठी बळ  देणारं आहे.   मराठी चित्रपट चांगल्या आशय विषयांवर चालतात हे लक्षात घेऊनवेगळे व...

देव गिल धडाकेबाज अंदाजात,चाहत्यांनी ७५ फूटी पोस्टर बनवून दिल्या ‘अहो विक्रमार्का’ चित्रपटाला शुभेच्छा.

इमेज
गेल्या अनेक दिवसांपासून देव गिल प्रॉडक्शन अंतर्गत येणाऱ्या ‘अहो विक्रमार्का’ चित्रपटाच्या चर्चा सुरु आहेत. दाक्षिणात्य सुपस्टार देव गिल ‘अहो विक्रमार्का’च्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतो आहे. या चित्रपटाच्या घोषणेनंतर  चाहत्यांमध्ये ‘अहो विक्रमार्का’ चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर त्याच्या चाहत्यांनी देव गिल याचे ७५  फूटी भव्य पोस्टर बनवले आहेत. जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. माझ्या आजवरच्या सर्व कलाकृतीला व भूमिकांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. चाहत्यांच्या या प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे. माझ्या आजवरच्या  चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. ‘अहो विक्रमार्का’ ला सुद्धा हा प्रतिसाद मिळेल असा विश्वास व्यक्त करताना हा चित्रपट प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन करेल असा विश्वास देव गिल ने व्यक्त केला.  या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून अॅक्शन,इमोशन्स आणि ड्रामा अशा सगळा मसाला असलेला हा चित्रपट प्रेक्षकांचं ‘फुल्ल ऑन’ मनोरंजन  करणार आहे. परिस्थितीशी ...

"८ दोन ७५" : फक्त इच्छाशक्ती हवी आता अ‍ॅमेझॉन प्राइमवर.

इमेज
अवयवदान हा अत्यंत गंभीर विषय अतिशय हलक्या फुलक्या पद्धतीनं ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. चित्रपटसृष्टीत उत्सुकता निर्माण केलेला हा चित्रपट १९ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. "८ दोन ७५" म्हणजे नक्की काय? हे या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल. आता हा चित्रपट तुम्ही घरबसल्या अ‍ॅमेझॉन प्राइम वर पाहु शकता.    उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे विकास हांडे, लोकेश मांगडे आणि सुधीर कोलते यांनी ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटाची निर्माती केली आहे, तर सुश्रुत भागवत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. शर्वाणी - सुश्रुत यांनी चित्रपटाच्या पटकथा लेखनाची, तर संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे. अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांच्यासह शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, राधिका हर्षे - विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी पुष्कर श्रोत्री यांच्या चित्र...

झी टॉकीजची 'टॉकीज कथायण चषक' स्पर्धा: मराठी पटकथा लेखकांसाठी एक स्वप्नपूर्तीची संधी.

इमेज
मराठी चित्रपटप्रेमींसाठी खास आनंदाची बातमी! महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय आणि नंबर १ ची  मराठी चित्रपट वाहिनी, झी टॉकीजने आपल्या 'टॉकीज कथायण चषक' स्पर्धेचा दुसरा अध्याय मोठ्या उत्साहात सुरू केला आहे.  'टॉकीज कथायण चषक'  हा  एक असा मंच आहे जिथे मराठीतील नवोदित पटकथा लेखकांना त्यांच्या कल्पनांना पंख लावण्याची अनोखी संधी मिळणार आहे. २०२१ मध्ये झालेल्या 'टॉकीज कथायण चषक' च्या पहिल्या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला होता आणि आता पुन्हा एकदा, अनेक नव्या लेखकांना आपल्या कथा मोठ्या पडद्यावर पाहण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची सुवर्णसंधी झी टॉकीज वाहिनीमुळे मिळणार आहे.    'टॉकीज कथायण चषक'  ही स्पर्धा १८ वर्षांवरील प्रत्येकासाठी खुली आहे. या स्पर्धेत  कोणत्याही शैलीतील पटकथा स्वीकारल्या जातील, त्यामुळे लेखकांनो हीच ती संधी आहे तुमच्या कथा जगासमोर आणण्याची! तुमच्या कल्पनांना रुप देण्यासाठी हीच ती योग्य वेळ आहे. तुमच्या कथा ई-मेलद्वारे  talkieskathayan@zee.com यावर पाठवा आणि स्पर्धेच्या नियम व अटींसाठी या लिंकवर क्लिक करा https://zeetalkieskath...

दिपक राणे फिल्म्स निर्मित, मराठी आणि कन्नडा सिनेमा 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' एक नवा cinematic अनुभव.

इमेज
काही महिन्यांपूर्वी 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' या मराठी सिनेमाच्या पोस्टरने चाहत्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती. या सिनेमाचा लूक पाहून मराठी प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनला होता की हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार? विशेष म्हणजे, मराठी आणि कन्नडा सिनेमाचं कोलॅबोरेशन म्हणजे 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' हा सिनेमा.  दिपक पांडुरंग राणे, विजय कुमार शेट्टी हवाराल, आणि रमेश कोठारी निर्मित 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' या बहुप्रतीक्षित सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून त्यात दाखवलेल्या सीन्सनी, कलाकारांच्या अभिनयाच्या झलकनी, थरारक ऍक्शन सिक्वेन्सेसनी आणि प्रभावी बॅकग्राऊंड म्युझिकमुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत. हा सिनेमा काहीतरी वेगळा आणि अधिक रोमांचक दिसतोय. मराठी सिनेसृष्टीने आजवर विविध विषय सखोल विचार करून हाताळले आहेत, मात्र हा सिनेमा एका नव्या दृष्टिकोनातून आणि वेगळ्या शैलीतून सादर करण्यात आलेला आहे. ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ या सिनेमाचे निर्माते दिपक पांडुरंग राणे हे विविध जॉनरमधील सिनेमांची निर्मिती करत प्रेक्षकांना खास अनुभव...

'बाहुबलीच्या 'कालकेय'ची मराठीत एंट्री.

इमेज
‘बाहुबलीः द बिगिनिंग’मध्ये मुख्य भूमिकांसोबतच या सिनेमातील खलनायकाची म्हणजे कालकेयची भूमिकाही प्रचंड गाजली. त्याच्या अभिनयासाठी चाहत्यांनी त्याचे कौतुक देखील केले. त्याने साकारलेल्या ‘कालकेय’ च्या भूमिकेमुळे त्याला  नवी ओळख मिळाली. या चित्रपटानंतर दाक्षिणात्य अभिनेता प्रभाकर याने  सिद्ध केलं की तो कोणत्याही व्यक्तिरेखा उत्तम प्रकारे साकारू शकतो. हाच ‘कालकेय’ म्हणजे अभिनेता प्रभाकर आता मराठीत दिसणार आहे. देव गिल प्रॉडक्शन अंतर्गत ‘अहो विक्रमार्का’ मराठी व्यतिरिक्त इतर ५ भाषांमध्ये मोठ्या पडद्यावर ३० ऑगस्टला  प्रदर्शित होणार आहे.  ‘अहो विक्रमार्का’ या अॅक्शनपटात अभिनेता प्रभाकर एका जबरदस्त भूमिकेत पाहायला मिळणार आहे.  ‘बेगाडा’ ही तगडी खलनायिका भूमिका तो साकारताना पहायला मिळणार आहे.  'अहो विक्रमार्का’ पहिला मराठी ब्लॉकबस्टर-पॅन इंडिया चित्रपट ३० ऑगस्टला ६ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.   दिग्दर्शक राजामौली यांच्याबरोबर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेल्या त्रिकोटी पेटा दिग्दर्शित ‘अहो विक्रमार्का’ चित्रपटात इमोशन्स, सूडनाट्य, आणि ड्रामा...

गणेशोत्सवात 'श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन' होणार प्रदर्शित.

इमेज
मराठी माणूस म्हटल की तो रिस्क घेऊन उद्योग करण्यापेक्षा नोकरी करण्यामध्ये समाधान मानणारा आहे. आपल्या सभोवताली अनेक बेरोजगार तरूण स्वतःचा छोटा, मोठा व्यावसाय सुरू करण्याचा प्रयत्न न करता नोकरी शोधण्याच्या मागे लागलेले दिसतात. अगदी हातावर मोजण्या इतक्या नोकरीच्या जागांसाठी हजारोंच्या घरात अर्ज येतात हे समाजातील भयान वास्तव आहे. त्यातच नोकरभरातीतील भ्रष्टाचार आणि पेपरफूटी प्रकरण तर नोकरीच्या शोधात असलेल्या प्रत्येक उमेदवारांच्या प्रवासातील मोठे अडथळे ठरत आहेत. याच गंभीर विषयाला वाचा फोडणारा 'श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत असून या चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर सोशल मिडियावर प्रदर्शित झाला आहे. उत्तेजना स्टूडिओज प्रा. लि.  निर्मित 'श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन' या चित्रपटात जनक सिंह आणि समीर रंधवे हे दोघे झुंजारू उद्योजक आहेत. त्यांच्या कॅफे च्या शाखा विस्तारण्यासाठी ते एका  गुंतवणूकदाराच्या शोधत असतात. जनकच्या सभ्य व्यक्तिमत्वामध्ये आणखी  एक पैलू दडलेला आहे, तो  रात्रीच्या अंधारात ए. के. नावाच्या गुन्हेगाराचा शोध घेत आ...

अमितराज आणि प्रियांका बर्वे यांची नवी इनिंग ’सुपरस्टार सिंगर’ मध्ये दिसणार परिक्षक.

इमेज
छोट्या पडद्यावरील ‘सुपरस्टार सिंगर’ हा सोनी मराठीवरील नवा कार्यक्रम  लवकरच सुरु होणार आहे. या  कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून याचे परीक्षक कोण असणार.? याची  उत्सुकता लागून राहिली होती. आपल्या सुमधुर आवाजाने मंत्रमुग्ध करणारी  प्रियांका बर्वे आणि आपल्या संगीताच्या जादूने रसिकांची मने जिंकणारे अमितराज या कार्यक्रमात परीक्षकाच्या  भूमिकेत दिसणार आहेत. याआधी चित्रपटातील गाण्यांच्या माध्यमातून आणि वेगवगेळ्या कार्यक्रमात या दोघांच्या गीतसंगीताची मेजवानी रसिकांनी अनुभवली आहे. या कार्यक्रमासाठी ऑनलाईन ऑडिशन्स सुरू झाल्या असून सोनी लिव्ह या अॅपवर जाऊन इच्छुक स्पर्धकांनी आपले ऑडिशन व्हिडीओ पाठवायचे आहेत. २४ ऑगस्ट ही ऑडिशन पाठवण्याची शेवटची तारीख असणार आहे. आता ऑडिशन प्रक्रिया सुरू झालेले असून, लवकरच निवडलेले स्पर्धक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.   स्वरांच्या दुनियातील उद्याचा आवाज  सोनी मराठी वाहिनीच्या माध्यमातून रसिकांना ऐकायला मिळणार आहे.  अमितराज आणि प्रियांका बर्वे आता महाराष्ट्रासाठी हा आवाज शोधणार  रसिकांसाठी ही उत्सुकतेची बाब आह...

स्त्रीशक्तीचा उत्सव: मोनालिसा आणि अश्विनी बागल यांची अनोख्या पध्दतीने साजरी केली रक्षाबंधनाची परंपरा.

इमेज
रक्षाबंधन हा सण परंपरेने भाऊ-बहिणीच्या प्रेम, विश्वास आणि नात्याच्या घट्ट बंधाचा प्रतीक मानला जातो. परंतु, दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठी इंडस्ट्रीमधील दोन बहिणी मोनालिसा बागल आणि अश्विनी बागल यांनी या सणाला एक नवा आयाम दिला आहे. मोनालिसा आणि अश्विनी बागल यांच्या दृष्टिकोनातून, रक्षाबंधन फक्त भाऊ-बहिणीच्या नात्यापुरता सीमित नसून, एकमेकांप्रति असलेल्या निःस्वार्थ प्रेमाचा आणि आपुलकीचा उत्सव आहे. हे नाते केवळ रक्ताच्या नात्यापुरते मर्यादित न राहता, जीवनभर एकमेकांची साथ देण्याच्या वचनाने बांधलेले आहे. या खास प्रसंगी, मोनालिसा हिने अश्विनीला राखी बांधून त्यांच्या नात्याचा सन्मान केला. त्यांनी या सणाला नवीन अर्थ देत, स्त्रीशक्ती, आत्मनिर्भरता आणि आपुलकीचा संदेश दिला आहे. "रक्षाबंधन फक्त बंधनात अडकवणारा सण नाही, तर तो एकमेकांच्या स्वातंत्र्याला, विचारांना आणि आदराला वचन देणारा उत्सव आहे. समाजातील नाती अधिक दृढ व्हावीत आणि स्त्रीशक्तीला मान्यता मिळावी," असे त्या दोघींचे मत आहे. यातून हे दिसून येते की, परंपरागत सणही काळानुसार बदलत आहेत, आणि त्यातून नवा दृष्टिकोन देत समाजात स...

शिवसेनेच्या जनता दरबार वरील माहितीपटाला मिळाले १८ आंतरराष्ट्रीय पुरस्कार .

इमेज
मुंबई : दिनांक : (प्रतिनिधी) नितीन नांदगावकर यांचा माहितीपट लवकरच ओटीटी वर झळकणार आहे,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आणि शिवसेनेतील रॉबिनहूड म्हणून ओळखले जाणारे नितीन नांदगावकर यांच्यावर जनता दरबार नावाचा एक माहितीपट निर्माण करण्यात आला.  सुप्रसिद्ध आर्टीष्ट शैलेश आचरेकर यांच्या संकलनाने आणि दिग्दर्शनाने हा 45 मिनिटाचा माहितीपट बनवण्यात आला . हर्षल मीडिया अँड एंटरटेनमेंट एल एल पी निर्मित या माहितीपटाला आजपर्यंत १८ आंतराष्ट्रीय पारितोषिक मिळाली आहेत.  शिवसेना भवन येथे दर बुधवारी भरणारा नितीन नांदगावकर यांचा जनता दरबार सर्वश्रुत आहे . सर्वसामान्य माणसाला जेव्हा कुठेच न्याय मिळत नाही तेव्हा तो जनता दरबार मध्ये येतो.  पोलीस आणि प्रशासन जिथे हतबल होते तिथे नितीन नांदगावकर यांचा जनता दरबार कामी येतो.  अडलेल्यां नडलेल्यांच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी नितीन नांदगावकर कसे काम करतात याची माहिती या 45 मिनिटांच्या माहितीपटात पाहायला मिळते. सर्वसामान्य व्यक्ती आपली समस्या कशी सुटली त्याची माहिती देतात . गेल्या अनेक वर्षांपासून नितीन नांदगावकर ही समाजसेवा करत आहेत...

दातासंबंधी चिकित्सेकरिता तणावमुक्त डॉक्टर व्हिजीटचा तुमचा मार्गडॉ. उत्कर्षा बसाखेत्रे देसाई, बीडीएस, दंतचिकीत्सक, समुपदेशन मानसशास्त्रज्ञसंचालक, बिलिंग स्माईल्ज.

इमेज
दातासंबंधी चिंता म्हणजे डेंटल एन्जायटी सतावतेय का? ही चिंता तुमच्या तोंडाच्या आरोग्यावरही परिणाम करू शकते! वेदनेची भीती, अज्ञात किंवा भूतकाळातील नकारात्मक अनुभव दंतचिकित्सेसाठी आवश्यक ती काळजी घेण्यात अडथळा निर्माण करू शकतात. पण इथे एक चांगली बातमी आहेः दंत चिंतेवर मात करणे पूर्णपणे शक्य आहे. या लेखात, डॉ. उत्कर्षा बसाखेत्रे देसाई, बीडीएस, दंतचिकीत्सक, समुपदेशन मानसशास्त्रज्ञ तुम्हाला तुमची भीती व्यवस्थापित करण्यात आणि आरामशीर डॉक्टर भेटीत मदत करण्यासाठी प्रभावी धोरणे. दातासंबंधी चिंतेचे व्यवस्थापन करण्याची पहिली पायरी म्हणजे स्वत:ला वाटत असलेली भीती लक्षात घेऊन ती समजावून घेणे. तुमच्या चिंतेचे विशिष्ट कारण ओळखणे उपयुक्त ठरू शकते. दंत उपचारातील ड्रिलचा आवाज, सुया टोचण्याची भावना की भूतकाळातील नकारात्मक अनुभव? तुमची नेमकी चिंता समजून घेतल्याने ती प्रभावीपणे हाताळण्यासाठीची साधने तुम्हाला सुसज्ज करू शकतात. तुमच्या दंतवैद्याशी खुलेपणाने संवाद साधा तुमच्या दंत चिकित्सकासोबत विश्वासाचे नाते निर्माण करणे महत्त्वाचे आहे. तुमच्या भावना आणि चिंता उघडपणे सांगण्यास अजिबात संकोच करू न...

'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपट थेट ३ जानेवारी २०२५ ला भेटीला.

इमेज
रक्षाबंधन हा भावाबहिणीतील नात्याचा बंध अधिक दृढ करण्याचा सण. आई वडीलांच्या देहत्यागानंतर मुक्ताईंनी आपल्यापेक्षा मोठ्या भावंडांना मायेची पाखर दिली. वात्सल्याने सावरले व प्रसंगी जागरूक करण्यासाठी आत्मीयतेने दटावले देखील. या निवृत्ती महाराज, सोपान, ज्ञानेश्वर आणि मुक्ताई या भावंडांचे नाते अतिशय आदर्शवत, सुंदर असेच होते.  या चारही भावंडांच्या चरित्रात पावलो पावली  बहिण भावाच्या पवित्र नात्याचा प्रत्यय देणारे प्रसंग दिसतात. प्रत्येक प्रसंगात मुक्ताई आणि तिचे तीनही भाऊ एकमेकांना सांभाळताना, जपताना  दिसतात. उदाहरणार्थ मुक्ताईच्या अपमानामुळे व्यथित न होता तुच्या शब्दाचे रक्षण करण्यासाठी ज्ञानेश्वरांनी आपल्या पाठीची लाही लाही करून घेऊन मांडे भाजले. गावात होणाऱ्या अपमानामुळे दुःखी झालेल्या ज्ञानेश्वरांना ताटी उघडायला लावून ज्ञानेश्वरी लिहायला प्रेरणा मुक्ताईने दिली. हीच कथा वेळोवेळी मुक्ताई ला अध्यात्मिक बाबतीत महत्त्व देणाऱ्या तिच्या गुरुबंधूंच्या निवृत्तीनाथांच्या बाबतीत पहायला मिळते. संत ज्ञानेश्वरांचे आणि मुक्ताईचे नाते तर कोणत्याही काळाच्या पलीकडचे, लोभसवाणे असलेले दिसते. याच...

'बाल रंगभूमी परिषद दरवर्षी हा 'जल्लोष लोककलेचा' उत्सव आयोजित करणार' - नीलम शिर्के सामंत.

इमेज
 अशा महोत्सवातून मुलांमधे लोककला संस्कृतीची,आवड निर्माण करून त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचे काम करतेय .असा विश्वास  व्यक्त करत , या जल्लोष  लोककलेचा मिळणारा मोठा प्रतिसाद पहाता बालरंगभूमी परिषद दरवर्षी हा महोत्सव महाराष्ट्रभर आयोजित करणार अशी घोषणा एड नीलमताई शिर्के सामंत, बालरंग भूमी अध्यक्षा. यांनी त्त्यांच्या भाषणात बोलून दाखविला. बालरंग भूमी परिषद,  बृहन्मुंबई शाखा आयोजित  " जल्लोष लोककलेचा २०२४" या भायखळा येथे  अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात आयोजित  पुरस्कार सोहळ्यात  कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या . त्यांनी आपल्या भाषणात महोत्सवाा सहभागी मुला मुलीशी संवाद साधत त्यांचे कौतुक केले.   या महोत्सवात  मुंबईभरातून लोककला सादरीकरणा साठी  मोठ्या संख्येने शाळा आणि संस्थानी सहभाग नोंदविला होता.  जल्लोष लोककलेचा या महोत्सवातील सन्मान पुरस्कार प्राप्त संघ  :  ●सर्वोत्कृष्ट :SVS हायस्कूल, वरळी  लोकनृत्य प्रकार : कोरकू नृत्य. ●*उत्कृष्ट*- विद्यानिधी हायस्कूल, जुहू  लोकनृत्य  प्रकार : डांग्...

'अलबत्या गलबत्या' च्या विक्रमी प्रयोगांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद.

इमेज
रंगभूमीवर धुमाकूळ घालत बच्चे कंपनीला घाबरवणारी आणि प्रसंगी हसवणारी ‘चिंची चेटकीण’ गुरुवारी १५ ऑगस्टला  श्री  शिवाजी मंदिर नाट्यगृहात तळ ठोकून होती. या चेटकिणीला भेटण्यासाठी छोट्यांसह मोठ्यांनाही तुडुंब गर्दी केली. रत्नाकर मतकरी लिखित  तुफान लोकप्रियता मिळवणाऱ्या 'अलबत्या गलबत्या' नाटकाने सलग ६ प्रयोग करत मराठी बालरंगभूमीच्या इतिहासात अनोखा जागतिक विक्रम प्रस्थापित   केला. या विक्रमाचे साक्षीदार होण्याची संधी अनेक  नाट्यरसिकांनी आवर्जून घेतली.   नाटक पाहण्याच्या उत्सुकतेमुळे रसिकांनी सकाळी सात वाजताच्या प्रयोगालाही नाट्यगृह ‘हाउसफुल्ल’ केले. काही वेळातच बालकनीही गर्दीने भरली. या नाटकाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे कलाकारांचा उत्साह द्विगुणित झाला. 'अलबत्या गलबत्या' नाटक पाहण्यासाठी नाट्य रसिकांची गुरुवारी श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह यथे झुंबड उडाली. या  नाटकाचे सलग प्रयोग प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरले. विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी आवर्जून उपस्थित होते.  निर्माते राहुल भंडारे म्हणाले की ‘आजवर या नाटकाला नाट्यप्रेमींनी...

"नवरा माझा नवसाचा 2" चित्रपटाचा धमाकेदार टीजर लाँच".

इमेज
"नवरा माझा नवसाचा 2" या चित्रपटाविषयी चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात अभिनेत्री हेमल इंगळे तर अभिनेता स्वप्नील जोशी ही जोडी सचिन-सुप्रिया यांच्या मुलगी-जावई अशा भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार टीझर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला आहे.      "नवरा माझा नवसाचा 2" या चित्रपटाची निर्मिती  सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेने केली आहे. चित्रपटाची कथा - पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले असून संवाद संतोष पवार यांचे आहेत. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले, आणि सिद्धार्थ जाधव अशी दमदार स्टारकास्ट आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या भेटीस येणार आहे. "नवरा माझा नवसाचा" हा चित्रपट आजही प्रेक्षकांना आवडतो. त्यामुळे आता "नवरा माझा नवसाचा 2" मध्ये काय धमाल अनुभवायला मिळणार याची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे. या टीजर मधून चित्रपटाच्या कथानकाविषयी थोडासा अंदाज ...

'हजारवेळा शोले पाहिलेला माणूस' २९ नोव्हेंबरपासून मोठ्या पडद्यावर......

इमेज
हिंदी चित्रपटाच्या इतिहासात 'शोले' या चित्रपटाचं स्थान अनन्यसाधारण महत्त्वाचं आहे. या चित्रपटाची आजही प्रचंड लोकप्रियता आहे. १५ ऑगस्ट १९७५ मध्ये प्रदर्शित झालेला "शोले" या चित्रपटाचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण झाले असताना 'हजारवेळा शोले पाहिलेला माणूस' हा मराठी चित्रपट अनोख्या पद्धतीने सलाम करणार आहे. नावापासूनच वेगळेपण असलेला, तगडी स्टारकास्ट आणि अनेक राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गाजलेला 'हजारवेळा शोले पाहिलेला माणूस' हा चित्रपट २९ नोव्हेंबरपासून मोठ्या पडद्यावर येत आहे. विश्चास मीडिया आणि एंटरटेन्मेंटचे राजेश डेम्पो, भक्ती डेम्पो आणि कॉंसमीडिया एंटरटेन्मेंटचे सगूण वाघ, श्रीदेवी शेट्टी वाघ यांनी "हजारवेळा शोले पाहिलेला माणूस" या चित्रपटाची निर्मिती केली आहे. शोले मीडिया अँड एंटरटेन्मेंट, कुबेरन्स टेक व्हेंचर्स चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर जीत वाघ असोसिएट प्रोड्यूसर आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन हृषिकेश गुप्ते यांनी केलं आहे. अमोल गोळे यांनी छायांकन, रोहन रोहन,स्वरुप आनंद भालवणकर, वरुण लिखाते या...

खतरनाक 'खलनायक' मराठीत.......

इमेज
                चित्रपटामध्ये नायकाप्रमाणेच  खलनायकालाही तितकेच महत्त्व आहे. खरंतर या खलनायकांमुळेच नायकाचे अस्तित्व असते असे म्हटल्यास वावगे ठरू नये. आजवर बऱ्याच कलाकारांनी खलनायकी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचं काम केलं आहे. आपल्या अनोख्या शैलीमुळे खलनायकी भूमिका साकारणारे कलाकार तर नायकांइतके लोकप्रियही झाले आहेत. आगामी ‘फौजी’ या मराठी चित्रपटात हिंदीतील शाहबाज खान आणि टिनू वर्मा या दोन सशक्त अभिनेत्यांची झलक आपल्याला खलनायकाच्या रुपात दिसणार आहे. हिंदी चित्रपटांचा पडदा गाजविल्यानंतर आता मराठी चित्रपटातही ते आपला खलनायकी अवतार दाखविण्यास सज्ज झाले आहेत. मातृपितृ फिल्म्स् प्रस्तुत घनशाम विष्णुपंत येडे निर्मित- लिखित-दिग्दर्शित ‘फौजी’ हा मराठी चित्रपट येत्या ३० ऑगस्टला चित्रपटगृहात दाखल  होत आहे.  ‘फ़ाइट मास्टर’ म्हणून टिनू वर्मा यांची हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतंत्र ओळख आहे.  शाहबाज खान यांनी  छोट्या आणि मोठ्या पडद्यावर अनेक लोकप्रिय खलनायकी भूमिका साकारल्या आहेत. ‘फौजी’ या चित्रपटात अत...

सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर संयुक्त राष्ट्रसंघाची मान्यता असलेल्या एका संस्थेच्या सहकार्याने सादर करत आहे “वर्ल्ड ऑफ स्त्री”*

इमेज
अमृतकला स्टुडिओ आणि 'अर्थ' एनजीओ प्रस्तुत 'वर्ल्ड ऑफ स्त्री' हा अनोखा नृत्याविष्कार घेऊन अमृता खानविलकर रसिकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. पहिल्यांदाच एखादी अभिनेत्री एका स्वयंसेवी संस्थेसोबत संलग्न होत, नृत्यकलेच्या माध्यमातून स्त्रीशक्तीचे अनोखे रूप सादर करणार आहे. यात शृंगार, भक्ती, शक्ती आणि स्त्री तत्त्व यांचा समावेश आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने अमृता खानविलकरने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. ती एक उत्कृष्ट नृत्यांगना आहे, हे आपल्याला माहीतच आहे. तिचा नृत्याविष्कार रसिकांनी अनेकदा पाहिला आहे. असाच एक अनोखा नृत्य नजराणा अमृता खानविलकर 'वर्ल्ड ऑफ स्त्री' च्या माध्यमातून घेऊन येत आहे. या निमित्ताने तिचे थेट प्रेक्षकांसमोर नृत्यप्रयोग सादर करण्याचे स्वप्न साकार होत आहे. या नृत्यप्रयोगाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रेक्षकांना क्लासिकल, सेमी क्लासिकल म्युझिक आणि नृत्याची अनोखी मैफल अनुभवयाला मिळणार आहे. या कलाकृतीत स्त्रीशक्ती, महिला सक्षमीकरण, शृंगार, भक्ती यांचे दर्शन घडणार आहे. यात तिच्यासोबत नृत्यदिग्दर्शक कुशल नर्तक आशिष पाटील देखील सहभागी होणार आहेत. या नृत्...

"डम डम डम डम डमरू वाजे' गाण्याचं रिक्रिएशन.....सचिन पिळगावंकर आणि आदर्श शिंदे पहिल्यांदाच गाण्यासाठी एकत्र....

इमेज
महाराष्ट्राचा लाडका गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आपल्या सर्वांना परिचित असलेल गणपती बाप्पाचं "डम डम डम डम डमरू वाजे...." हे गाजलेलं गाणं "नवरा माझा नवसाचा 2" या चित्रपटात नव्या ढंगात आपल्या भेटीला येणार असून, सचिन पिळगावंकर आणि आदर्श शिंदे यांनी हे गाणं पहिल्यांदाच एकत्रित गायलं आहे. सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती  असलेल्या "नवरा माझा नवसाचा 2" या चित्रपटाची निर्मिती,  कथा - पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले असून संवाद संतोष पवार यांचे आहेत. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव अशी दमदार स्टारकास्ट आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या भेटीस येणार आहे.     "डम डम डम डम डमरू वाजे...." या रिक्रिएट केलेल्या गाण्याचं गीतलेखन प्रवीण दवणे यांनी केले असून संगीत दिग्दर्शन रविराज कोलथरकर या नवोदित संगीत दिग्दर्शकाने केले आहे.    "देवा तुझ्या गाभाऱ्याला...." या गाण्यापास...

"बालसंस्कार घडविण्यासाठी बालरंगभूमी परिषद कटिबद्ध"ॲड. निलम शिर्के - सामंत

इमेज
मुंबई -बालरंगभूमी परिषद महाराष्ट्रातील बालकांसाठी नाट्य, नृत्य, संगीत, सिनेमा तथा चित्रकला अशा सर्वच क्षेत्रातील कलासंस्कार घडविणारे उपक्रम राबविण्यासाठी कटीबध्द आहे ‌आणि आता लोककलेची माहिती व महती बालकांपर्यंत, नव्या पिढी पर्यंत पोहचावी यासाठी लोककला महोत्सव 'जल्लोष लोककलेचा' हा उपक्रम बालरंगभूमी परिषदेने आयोजित केला आहे असे बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबईच्या अध्यक्षा ॲड. निलम शिर्के - सामंत यांनी सांगितले.  ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रातील २० जिल्ह्याच्या ठिकाणी लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ॲड. निलम शिर्के- सामंत पुढे म्हणाल्या की, बालसंस्कार घडविणारा पाहिला उपक्रम म्हणून जल्लोष लोककलेचा हा लोककला महोत्सव आयोजित केला आहे. केवळ मनोरंजनात्मक स्वरुप न ठेवता पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्याचे नियोजन सुरू आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी लोककला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले जात आहे यास उदंड असा प्रतिसाद मुलांकडून मिळाला आहे‌‌. ‌दुर्लक्षित होत चाललेल्या किंबहुना लोप पावत चाल...

'धर्मा- दि एआय स्टोरी' येणार १८ ऑक्टोबरला.

इमेज
आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर भाष्य करणाऱ्या 'धर्मा- दि एआय स्टोरी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली असून हा चित्रपट येत्या १८ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित असलेल्या या  पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर सुरेखा जोग यांनी केले असून बियु प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाच्या तेजल पिंपळे निर्मात्या आहेत. यात पुष्कर सुरेखा जोग, दीप्ती लेले आणि स्मिता गोंदकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पुष्कर जोगने मराठी सिनेसृष्टीला नेहमीच वेगळे, नवीनपूर्ण चित्रपट दिले आहेत. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाची काही खासियत असते. त्यामुळे या चित्रपटाही प्रेक्षकांना काहीतरी नवीन अनुभवायला मिळेल, हे नक्की !  नुकत्याच झळकलेल्या या पोस्टरमध्ये पुष्कर जोगच्या मागे काही कोड लँग्वेजमध्ये लिहिलेले आकडे, शब्द दिसत आहेत. त्यामुळे आता  एआय टेक्नॉलॉजीचा वापर या चित्रपटात कसा वापर होणार आहे, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  चित्रपटाबद्दल दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतात ,"  'धर्मा- दि एआय स्टोरी' प्रेक्षकांच्या भेट...

वीरांगणा तेजस्विनी 'अहो विक्रमार्का' दाक्षिणात्यपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत.

इमेज
अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने आजवर वेगवेगळ्या भूमिकांमधून आपल्या अभिनयाचे सशक्त पैलू उलगडून दाखविले आहेत, प्रत्येक भूमिकेत स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारी ही अभिनेत्री आता ‘अहो विक्रमार्का’ या दाक्षिणात्य अॅक्शनपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असून या चित्रपटात वीरांगणा 'भवानी' ही महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारत आहे. दिग्दर्शक राजामौली यांच्याबरोबर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेल्या त्रिकोटी पेटा यांच्या आगामी ‘अहो विक्रमार्का’ या चित्रपटात अनेक मराठी कलाकार झळकणार आहेत. देव गिल प्रॉडक्शन अंतर्गत ‘अहो विक्रमार्का’ मराठी व्यतिरिक्त इतर ५ भाषांमध्ये मोठ्या पडद्यावर ३० ऑगस्टला  प्रदर्शित होणार आहे.      आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना तेजस्विनी सांगते की, ‘कोणत्याही नवीन प्रोजेक्ट मध्ये काम करताना कलाकारांसाठी त्यातील आव्हान ही सुखावह असतात. त्यातही आपली मातृभाषा नसलेल्या इतर चित्रपटांमध्ये काम करताना हे आव्हान अधिक कठीण असते. ‘अहो विक्रमार्का' चित्रपटात सगळ्यात मोठं भाषेचे आव्हान होते कारण केवळ भाषा नव्हे तर त्याचं व्याकरण सुद्धा समजून घ्यावं लागतं. मला माझ्या...

"मन हळवे.." गाण्यास सुरेश वाडकर आणि श्रावणी वागळे यांचा स्वरसाज.

इमेज
सारेगमप लिटिल चॅम्प्सच पर्व नुकतेच काही महिन्यांपूर्वी संपलं. त्यात उपविजेती ठरलेली गुणी गायिका श्रावणी वागळे हीचं उत्तम गायन ऐकून स्पर्धेतील महागुरू सुरेश वाडकर यांनी तिला एक वचन दिल होत. ते वचन अस होत की मी स्वतः श्रावणी बरोबर एक नवीन गाणं रिकॉर्ड करीन. बोलल्याप्रमाणे सुरेशजी यांनी दिलेला शब्द  पाळला आणि "मन हळवे..." हे गीत रेकॉर्ड करून नुकतेच सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले   अनेकदा रिॲलिटी शोमध्ये अनेक मोठी लोक स्पर्धकांची गाणी ऐकून अशी वचनं देतात परंतु ती काही वेळा पूर्णत्वास येत नाहीत. परंतु सुरेशजीनी स्वतःहून दिलेलं वचन पूर्ण केलं आहे. सारेगमप विजेता आणि सध्या सारेगमपचा संगीत संयोजक आणि मार्गदर्शक असलेला गायक आणि संगीतकार अनिरूद्ध जोशी यानी संगीतबद्ध केलेल्या "मन हळवे.." या गाण्यास सुरेश वाडकर आणि श्रावणी वागळे यांनी आवाज दिला आहे तर गाण्याचे शब्द ऋचा मुळे यांचे आहेत.     गाण्यामध्ये अक्षय आचार्य यानी संगीत संयोजन केले असून, प्रसाद पाध्ये यांनी तबला, वरद कठापुरकर यानी बासरी तर हर्ष भावसार यानी सक्सोफोन वादन केले आहे. हे गाणं नुकतंच आजीवसा...

'आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२४’ पुरस्कार सोहळ्याची घोषणा...राज्य सरकारनंतर रोख पुरस्कार देणारा दुसरा पुरस्कार सोहळा...

इमेज
'मराठी कलांचा, गुणांचा प्रतिभा प्रशंसा सोहळा...' अशी बिरुदावली मिरवणाऱ्या 'आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२४' पुरस्कार सोहळ्याची घोषणा करण्यात आली आहे. मागच्या वर्षाप्रमाणे यंदाही हा पुरस्कार सोहळा भव्य-दिव्य स्वरूपात संपन्न होणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने मराठी नाटक-चित्रपट क्षेत्रातील अभिनेते-अभिनेत्री-तंत्रज्ञ एकत्र येणार आहेत. 'आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२४' मध्ये सहभागी होण्याकरीता नाटक-चित्रपट निर्मात्यांना प्रवेश अर्ज भरून आपल्या कलाकृतीची एन्ट्री पाठवता येईल. सध्या पुण्यातून विविध क्षेत्रात ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज्’ आपला विस्तार करीत आहे. आर्यन्स ग्रुप ऑटोमोबाईल, पेट्रोकेमिकल्स, सोलर पॉवर, गोल्ड रिफायनरी, हॉस्पिटॅलिटी, ग्रीन एनर्जी, एव्हिएशन, फार्मास्युटिकल्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, फायनान्स आणि ॲग्रिकल्चर अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहे. पुण्यामधून आर्यन्स ग्रुप लवकरच मराठी वृत्तवाहिनी, मनोरंजन वाहिनी, क्रीडा वाहिनी आणि ओटीटी प्लॅटफॉर्मद्वारे मिडीया आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात पदार्पण करीत आहे. यामुळे पुणे परिसरातील कलाकार, तंत्रज्ञ,...

अंकुश चौधरीने केली 'पुन्हा एकदा साडे माडे तीन'ची घोषणा.

इमेज
  सतरा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'साडे माडे तीन' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाच्या निमित्ताने महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरी याने दिग्दर्शनात पदार्पण केले होते. चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, कलाकार या सगळ्याच जमेच्या बाजू होत्या. त्यामुळेच प्रेक्षकांनी या चित्रपटावर भरभरून प्रेम केले. चित्रपटातील अशोक सराफ, भरत जाधव आणि मकरंद अनासपुरे ही कुरळे ब्रदर्सची तिकडी सगळयांनाच भावली. या तिकडीची धमाल प्रेक्षकांना आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अनुभवयाला मिळणार असून लवकरच दिग्दर्शक अंकुश चौधरी 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची सोशल मीडियावरून घोषणा करण्यात आली आहे. 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' मध्ये अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव हे 'साडे माडे तीन'मधील कलाकारच प्रमुख भूमिकेत दिसणार असून आणखी या चित्रपटात कोणते कलाकार झळकणार, हे मात्र अद्यापही गुपित आहे. अमेय विनोद खोपकर पिक्चर्सच्या स्वाती खोपकर, निनाद बत्तीन यांच्यासह 'उदाहरणा...

अभिनेता किरण गायकवाडचे "एफ .आय .आर. नंबर 469"द्वारे चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण.

इमेज
"देवमाणूस", "लागिरं झालं जी" अशा गाजलेल्या मालिका तर "चौक", "फकाट", "डंका हरी नामचा" अशा प्रदर्शित झालेल्या व आगामी "नाद", "आंबट शौकीन" या आगामी चित्रपटांतून अभिनेता म्हणून चमकलेला अभिनेता किरण गायकवाड आता दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. '"एफ.आय.आर. नंबर 469" असे या चित्रपटाचे नाव असून नुकतेच श्री. सिद्धिविनायक मंदिर मुंबई येथे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार यांच्या उपस्थितीत चित्रपटाचे टीजर पोस्टर लॉन्च करण्यात आले आहे.        बिग ब्रेन प्रॉडक्शन्स या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून निलेश राठी, प्राची राऊत,  सचिन अगरवाल यांनी '"एफ.आय.आर. नंबर 469" या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर अर्चना भुतडा या सहनिर्मात्या आहेत. अभिनेता प्रसाद ओक, नचिकेत पूर्णपात्रे अभिनेत्री अमृता धोंगडे या कलाकारांच्या  प्रमुख भूमिका आपल्याला या चित्रपट पहायला मिळणार आहेत. योगेश कोळी छायांकन, विजय गावंडे संगीत दिग्दर्शन, योगेश इंगळे कला दिग्दर्शक तर अजिंक्य फाळके कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहणार आहेत. य...

ख्यातनाम शिल्पकार 'कै. सदाशिव साठे' यांनी साकारलेल्या शिल्पाकृतींचे मुंबईत शिल्प प्रदर्शन,नेहरू सेंटर, वरळी येथे १४ ते १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत प्रदर्शन असणार सर्वांसाठी खुले!

इमेज
मुंबई -  कल्याणकरांच्या मांदियाळीत मानाचे स्थान स्वत:च्या अंगी असलेल्या उत्स्फूर्त कलेने व त्याला अतीव परिश्रमांची जोड देत फक्त देशात नव्हे तर जगप्रसिद्ध ख्याती मिळवलेले कल्याणचे कै. सदाशिव ऊर्फ भाऊ साठे यांनी साकारलेल्या शिल्पकलांच्या प्रदर्शनाचे आयोजन पहिल्यांदाच मुंबईतील नेहरू सेंटर, हॉल ऑफ हार्मनी, वरळी येथे १४ ऑगस्ट २०२४ ते १९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत भरविण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत असून सर्व शिल्प कलाकारांसाठी तसेच कला क्षेत्राची आवड असलेल्या सर्व वयोगटातील प्रत्येक व्यक्तीसाठी ही पर्वणीच आहे. गेट वे ऑफ इंडियाच्या समोरचा अश्वारूढ शिवाजी महाराजांचा पुतळा, ग्वाल्हेर येथील झांशीच्या राणीचा पुतळा, दिल्लीत लाल किल्ल्यासमोरच्या उद्यानात नेताजी बोस यांचे बंदूकधारी सैनिकांसह आक्रमक पवित्र्यातील समूहशिल्प, आसाम गुवाहाटी येथे गांधीचं शिल्प, चंदीगड येथे येशू ख्रिस्त, पंजाबात क्रांतिकारकांची शिल्पे, शिवस्मारके, यशवंतराव चव्हाण, जयप्रकाश नारायण, राधाकृष्णन, अटलबिहारी वाजपेयी अशा बऱ्याच महारथींची आणि अनेक प्रख्यात शिल्पे ज्यांनी साकारली...