'धर्मा- दि एआय स्टोरी' येणार १८ ऑक्टोबरला.



आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर भाष्य करणाऱ्या 'धर्मा- दि एआय स्टोरी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली असून हा चित्रपट येत्या १८ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित असलेल्या या  पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर सुरेखा जोग यांनी केले असून बियु प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाच्या तेजल पिंपळे निर्मात्या आहेत. यात पुष्कर सुरेखा जोग, दीप्ती लेले आणि स्मिता गोंदकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पुष्कर जोगने मराठी सिनेसृष्टीला नेहमीच वेगळे, नवीनपूर्ण चित्रपट दिले आहेत. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाची काही खासियत असते. त्यामुळे या चित्रपटाही प्रेक्षकांना काहीतरी नवीन अनुभवायला मिळेल, हे नक्की ! 
नुकत्याच झळकलेल्या या पोस्टरमध्ये पुष्कर जोगच्या मागे काही कोड लँग्वेजमध्ये लिहिलेले आकडे, शब्द दिसत आहेत. त्यामुळे आता  एआय टेक्नॉलॉजीचा वापर या चित्रपटात कसा वापर होणार आहे, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतात ,"  'धर्मा- दि एआय स्टोरी' प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. हा एक वेगळा विषय असून एका वडिलांची आणि मुलीची ही गोष्ट आहे. एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून वैयक्तिक सूड उगवण्याचा प्रयत्न करत एका निष्ठावंत बापाच्या मुलीचे अपहरण केले जाते. आपल्या मुलीला पुन्हा जिवंत पाहाण्यासाठी धर्म मुक्तीच्या धोकादायक प्रवासाला निघालेल्या या वडिलांची ही गोष्ट आहे. हॅालिवूडमध्ये ज्याप्रमाणे ॲक्शन सिक्वेन्स असतात, तसे या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. एक नवा प्रयत्न यातून करण्यात येत आहे.’’

Comments

Popular posts from this blog

विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय, ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"पीफ" मध्ये "जिप्सी" चित्रपटासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर सन्मान.