संस्थापक 'अमृता फडणवीस' आणि 'आयुष्मान खुराना' यांच्यासोबत दिव्याज फाऊंडेशनचा ‘सी शोर शाइन’ उपक्रम यशस्वी
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि मुंबई पोलिस यांच्या सहकार्याने, दिव्याज फाऊंडेशनचा वार्षिक ‘सी शोर शाइन’ समुद्रकिनारा स्वच्छता उपक्रम आज यशस्वीपणे पार पडला. शहरातील लोकप्रिय समुद्रकिनारा म्हणजेच वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावरील आयोजित या कार्यक्रमाचा उद्देश पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे महत्त्व वाढवणे आणि पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभागाला प्रोत्साहन देणे हा आहे.
या मोहिमेला मुंबईतील तरुणांनी अत्यंत उत्साहाने प्रतिसाद दिला. या तरुणांनी समुद्रकिनारे स्वच्छ करण्यात आणि याबाबत जनजागृती करण्यात सक्रिय सहभाग घेतला. या उपक्रमातून मुंबईचे नैसर्गिक सौंदर्य टिकवणे आणि पर्यावरणाची काळजी घेणे याचे महत्व पटवून देण्यात आले.
अमृता फडणवीस यांनी लोकसहभागाच्या मुद्द्यावर भर देत सांगितले की, “जेव्हा समाज पर्यावरण संवर्धनासाठी एकत्र येतो तेव्हा काय साध्य करू शकतो याचा पुरावा म्हणजे आजचे हे यश आहे. आमचे समुद्र किनारे एक मौल्यवान संसाधन आहेत आणि ते भावी पिढ्यांसाठी संरक्षित करणे ही आमची सामूहिक जबाबदारी आहे.”
बीएमसी आयुक्त भूषण गगराणी, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, भारती लवेकर, निरंजन हिरानंदानी, सुखराज नहार, मजहर नाडियाडवाला, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थितीत होते बॉलिवूडचे सितारे आयुष्मान खुराना यांनी सहभाग दर्शवून कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढवली.
"सी शोर शाइन" हा उपक्रम मुंबईला स्वच्छ, हिरवेगार आणि अधिक टिकाऊ शहर बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. दिव्याज फाऊंडेशन असे यासाठी सतत प्रयत्नशील असून नागरिकांना पर्यावरण संवर्धनासाठी सक्रिय सहभाग घेण्यास प्रेरित करत आहे.
Comments
Post a Comment