'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपटाची ऑस्करवारी.


सुधीर फडके म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी. संगीत क्षेत्रातील हे एक अजरामर नाव आहे.  बाबूजींचा संगीतमय प्रवास उलगडणारा 'स्वरगंधर्व सुधीर फडके' काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला. महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात या चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. प्रेक्षकांसह श्रीधर फडके, आशा भोसले, माधुरी दीक्षित अशा अनेक दिग्गजांनी या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले. विशेष म्हणजे अमेरिकेतही या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तिथेही या चित्रपटाचे शोज हाऊसफुल्ल झाले. प्रेक्षकांचे एवढे प्रेम मिळवल्यानंतर आता हा चित्रपट ऑस्करवारीसाठी सज्ज झाला आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया यांच्याकडून २९ चित्रपट स्पर्धेसाठी विचारात घेतली गेले. त्यात योगेश देशपांडे दिग्दर्शित 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या बहुचर्चित चित्रपटाचा समावेश आहे. त्यामुळे आता मराठी सिनेसृष्टीत पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला जाण्याची शक्यता आहे.      याबाबत दिग्दर्शक योगेश देशपांडे म्हणतात, "ऑस्करसाठी भारताकडून पाठवल्या जाणाऱ्या या वर्षातील सर्वोत्तम २९ चित्रपटांच्या यादीत “स्वरगंधर्व सुधीर फडके” या चित्रपटाची निवड होणे, हे खूप अभिमानास्पद आहे. निर्माते, लेखक- दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ या सर्वांचे प्रामाणिक कष्ट यामागे असतात आणि त्यामुळे प्रत्येकाला हा क्षण आनंद देणारा ठरला. जगातील मोठा समजला जाणाऱ्या ऑस्कर पुरस्काराच्या यादीत आपल्या चित्रपटाचा शेवटच्या फेरीपर्यंत विचार केला जाणे, हे अतिशय मोठे समाधान देणारे आणि पुढील काम करण्यास अधिक ऊर्जा देणारे आहे.'' 
     सौरभ गाडगीळ प्रस्तुत रिडिफाईन प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे निर्माते आहेत. तर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन योगेश देशपांडे यांचे आहे. 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या चित्रपटात सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, शरद पोंक्षे, उदय सबनीस, चिन्मय पटवर्धन, निखिल राऊत, विभावरी देशपांडे, धीरेश जोशी, परितोष प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Comments

Popular posts from this blog

विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय, ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"पीफ" मध्ये "जिप्सी" चित्रपटासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर सन्मान.