Posts

Showing posts from October, 2024

'फसक्लास दाभाडे' हे इरसाल कुटूंब येणार २४ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला...

Image
टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी यांचा आगामी चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’ २४ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘झिम्मा २’ च्या यशानंतर दिग्दर्शक हेमंत ढोमे आता 'फसक्लास दाभाडे' हा जबरदस्त चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन येण्यासाठी सज्ज झाले आहेत. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर चित्रपटाचे नवीन पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीख सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली असून अमेय वाघ, क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर यांच्यासह निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, राजसी भावे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.      पोस्टरमध्ये एक एकत्रित कुटूंब दिवाळी साजरी सादरी करताना दिसत आहे. यावरून हा चित्रपट कौटुंबिक मनोरंजनाचा धमाका असणार हे कळतेय. मुळात हेमंत ढोमे यांचे चित्रपट हलक्या-फुलक्या पद्धतीने काहीतरी संदेश देणारे असतात. त्यांची एखादा संवेदनशील विषय उत्तमरित्या हाताळण्याची प्रगल्भता कमाल आहे. त्यामुळे हा चित्रपटही काहीतरी हटके असणार, हे नक्की!      आपला आनंद व्यक्त करताना निर्माते आनंद एल राय म्हणतात, “दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आम्हाला हे जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मनोरंजनाचा डबल धमाका, बहुप्रतीक्षित 'सिंघम अगेन' सोबत झळकणार, जिओ स्टुडिओज आणि सुबोध भावेंच्या "संगीत मानापमान" चित्रपटाचा टिझर.

Image
     जिओ स्टुडिओज आणि सुबोध भावे यांचा भव्यादिव्य  चित्रपट "संगीत मानापमान" १० जानेवारी २०२५ ला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.  रुपेरी पडद्यावर पहिल्यांदाच एक अद्वितीय अनुभूती देणारा संगीतमय सिनेमा असणार आहे त्यामुळे या चित्रपटातील संगीताच्या मेजवानी ची एक छोटीशी झलक आपल्याला टिझर मध्ये बघायला मिळेल.    अभिनेते सुबोध भावे, सुमित राघवन आणि वैदेही परशुरामी ही त्रयी त्यांच्या मराठमोळ्या विलोभनीय अंदाजात मोठ्या पद्यवार प्रेक्षकांची मनं जिंकण्यास सज्ज झाली आहे. आज दिवाळी च्या शुभदिनी निर्मात्यांनी चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर पोस्ट केला आहे आणि विशेष म्हणजे हा टिझर प्रेक्षकांना रोहित शेट्टीच्या मोस्ट अवेटेड मल्टी स्टारर चित्रपटा सोबत म्हणजेच "सिंघम अगेन" सोबत १ नोव्हेंबरला सिनेमागृहात मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. रोहित शेट्टी आणि सिंघम चे बरेच चाहते आहेत त्यामुळे सिनेमाघरांमध्ये आलेल्या प्रेक्षकांसाठी हा एन्टरटेन्मेंट चा डबल डोस नक्कीच म्हणता येईल.       "संगीत मानापमान" या चित्रपटाच्या टिझरची सुरुवातच मधुर संगीताने होते. प्

'रानटी' चित्रपटाचा दमदार टिझर आला.....

Image
THE MOST POWERFUL MARATHI FILM OF THE DECADE… .अशी टॅगलाईन दिमाखाने मिरवणाऱ्या समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ या भव्य अॅक्शनपटाचा दमदार टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. आलेल्या परिस्थितीशी दोन हात करण्याची जिद्द असलेल्या विष्णूचा रौद्र अवतार दाखविणाऱ्या ‘रानटी’ चित्रपटाच्या टिझरमधून अॅक्शन, ड्रामा आणि इमोशन्स यांची जबरदस्त  गुंफण पहायला मिळते आहे. अभिनेता शरद  केळकर यांच्यासह अनेक कलाकारांचा जबरदस्त 'रानटी' अंदाज यात  दिसतोय. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ हा मराठीतला सगळ्यात मोठा अ‍ॅक्शनपट असणार आहे. आपल्या खलनायकी  अवताराने सर्वांचा थरकाप उडवणारे बॉलीवूडचे सुप्रसिद्ध ‘रानटी’ खलनायक जॅकी श्रॉफ आणि संजय दत्त यांनीसुद्धा दिग्दर्शिक समित कक्कड च्या ‘रानटी चित्रपटाच्या दमदार टिझरची झलक सोशल मीडियामध्ये शेअर केली आहे.      'अपून फूल ऑन डेंजर..  डोन्ट टेक मी लाइट' अशा दमदार डायलॉगने अवतरलेला ‘विष्णू’ हा बेरकी आणि कपटी व्हिलनला स्वतःच्या शक्ती आणि युक्तीने अद्दल घडवताना दिसणार आहे. अॅक्शनच्या जोडीला इमोशन आणि रोमान्सच्या साथीने खुलत जाण

प्रवीण तरडे यांचे दिग्दर्शन आणि आनंद दिघे यांच्या भूमिकेत प्रसाद ओक, तर एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत क्षितिश दाते यांचा दमदार अभिनय पाहायला मिळणार ‘धर्मवीर 2 – मुक्काम पोस्ट ठाणे’, केवळ ZEE5 वर*

Image
ZEE5 या एतद्देशीय व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि बहुभाषिक कथा सादर करणाऱ्या प्लॅटफॉर्मला ‘धर्मवीर 2 – मुक्काम पोस्ट ठाणे’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमाचे जागतिक डिजिटल प्रीमियर सादर करताना आनंद होत आहे. या राजकीय चरित्रपटात शिवसेना नेते आनंद दिघे यांची असामान्य गोष्ट पाहायला मिळणार आहे. ‘वारसाची मशाल हाती असलेले’ अशी त्यांची ओळख आहे. प्रसाद ओक आणि क्षितिश दाते यांनी दिघे यांची गोष्ट आपल्या दमदार अभिनयातून जिवंत केली असून क्षितिश यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत दिसतील. प्रवीण तरडे यांचे दिग्दर्शन आणि झी स्टुडिओ व साहिल मोशन आर्ट्स यांची निर्मिती असलेला हा बहुप्रतीक्षीत सिक्वेल ZEE5 वर स्ट्रीम केला जात आहे.       ‘धर्मवीर 2’ची गोष्ट पहिल्या सिनेमाच्या शेवटापासून पुढे सुरू होते. त्यामध्ये कोणत्या प्रमुख घटकांमुळे एकनाथ शिंदे 2022 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडले होते ते दाखवण्यात आलं होतं. या सिनेमात राजकीय निष्ठा आणि महत्त्वाकांक्षेची आव्हानं, दिघे यांचे वारसदार या नात्याने शिंदे यांचा प्रवास आणि राजकीय पटलावरीर आव्हानांतून मार्ग काढताना आलेली आ

"लाईफ म्हणजे गोंधळ नुसता"तारूण्यातल्या भावविश्वाची झलक दाखविणारं गाणं प्रदर्शित.

Image
प्रत्येकाच्या आयुष्यात महाविद्यालयीन जीवन हा एक खास अविस्मरणीय कोपरा असतो. आईवडिलांपासून दूर राहून एकाकी हॉस्टेलवर राहून शिक्षण घेणा-यांच्या बाबतीत तर ही जीवनाची पाठशाळा असते. एक मात्र खरं की, कॉलेजमध्ये शिकणा-या प्रत्येकाच्या आयुष्यात हा काळ एका वेगळ्याच जाणिवेनं व गोंधळाने  भारलेला असतो. याच  विश्वाची ओळख करून  देणारं ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ या  चित्रपटातील  'लाईफ म्हणजे  गोंधळ नुसता'  हे  गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यातून तारुण्यातील  ही संभ्रमावस्था नेमकी टिपण्यात आली आहे. संदीप सावंत दिग्दर्शित आणि  पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत  ‘ह्या गोष्टीला नावच नाही’  हा मराठी चित्रपट येत्या ८ नोव्हेंबरला  प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. 'लाईफ म्हणजे गोंधळ नुसता..  कन्फयुजन  कन्फयुजन..   हे करू की  ते करु..   मिळत  नाही सोल्युशन      पराग फडके यांच्या लेखणीतून उतरलेल्या या गाण्याला गायक पराग फडके आणि अन्य कलाकारांचा  स्वरसाज  लाभला आहे. या गाण्याला पराग फडके यांनी चाल दिली आहे. ऋषिकेश ठाकूरदेसाई,  चिराग कबाडे, रमण पुजारी, त्रिगुण पुजारी यांचे संगीत संयोजन आहे. या गाण

गाण्याच्या ध्वनीमुद्रणाने सामाजिक चित्रपट 'निर्धार'चा मुहूर्त संपन्न.

Image
एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला आणि ती गोष्ट साध्य करण्याचा निर्धार केला की, अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. अशाच निर्धाराची गोष्ट 'निर्धार' या आगामी सामाजिक मराठी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. नुकताच गीत ध्वनीमुद्रणाने 'निर्धार' चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला. आज समाज नव्हे, तर संपूर्ण देशाला पोखरणाऱ्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर हा चित्रपट भाष्य करतो. या चित्रपटातील तरुणांनी भ्रष्टाचाराचा समूळ नायनाट करण्याचा 'निर्धार' केला आहे. हा 'निर्धार' रुपेरी पडद्यावर सादर करण्याचे काम या चित्रपटाद्वारे निर्मात्यांनी केला आहे. देशातील ज्वलंत मुद्द्यावर भाष्य करण्याचा, किंबहुना तो कसा नष्ट होईल हे सांगण्याचा प्रयत्न 'निर्धार' या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि लेखकांनी फार सुंदररित्या केला आहे. जयलक्ष्मी क्रिएशन या निर्मिती संस्थेअंतर्गत निर्मात्या पद्मजा वालावलकर यांनी 'निर्धार' चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिलीप भोपळे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या या चित्रपटाचं लेखन दीनानाथ वालावलकर यांनी केलं आहे. जुहू येथील आजिवासन

रंगमंच कामगारांसाठीच्या आरोग्य शिबीराला उत्तम प्रतिसाद.

Image
नाट्यक्षेत्रासाठी अविरत झटणाऱ्या रंगमंच कामगारांसाठी  नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या  मोफत आरोग्य शिबीराला उत्तम  प्रतिसाद मिळाला. ‘अष्टविनायक' नाट्यसंस्थेचे श्री. दिलीप जाधव यांच्या पुढाकाराने आयोजित हे आरोग्य शिबीर यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलात आयोजित करण्यात आले  होते. यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली शिबिरामध्ये वेगवेगळ्या तपासण्या करण्यात आल्या. या शिबिराला १५०हून अधिक  रंगमंच  कामगारांनी मोफत आरोग्य तपासणी आणि सल्ला मसलतीचा लाभ घेऊन उत्तम प्रतिसाद दिला.     'गुरुकृपा हार्ट फाऊंडेशन'चे डॉ.गजानन रत्नपारखी, श्री. विशाल कडणे तसेच वैद्यकीय क्षेत्रातील  अनेक मान्यवर  यावेळी उपस्थित होते. या दोघांच्या विशेष सहकार्याने या शिबिराचे आयोजन यशस्वीपणे संपन्न झाले. यावेळी दिलीप जाधव यांनी 'गुरुकृपा हार्ट फाऊंडेशन' चे डॉ.गजानन रत्नपारखी, श्री. विशाल कडणे यांच्याकडून  मिळालेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

हर्षद अतकरीचा ‘शॉर्ट अँड स्वीट’ च्या शूटिंगचा खास अनुभव.

Image
प्रसिद्ध मराठी अभिनेता हर्षद अतकरी, ज्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं, त्याची मेहनत आणि समर्पण याचा अनोखा अनुभव ‘शॉर्ट अँड स्वीट’ या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. थिएटरमध्ये यश मिळवल्यानंतर, आता हा चित्रपट झी टॉकीजवर प्रेक्षकांसाठी घरी बसल्या पाहायला मिळणार आहे.       शूटिंगमधला एक आठवणीतला क्षण शेअर करताना हर्षदने सांगितलं, “फिल्म शूटिंगच्या काळात मी सतत मुंबई आणि बेळगावदरम्यान प्रवास करत होतो. माझा टीव्ही शो सुरू होता आणि फिल्मचं शूटिंगही चालू होतं. दोन्हीकडचं शूटिंग आणि वेळ सांभाळणं खूप ताण देणारं होतं. मी खूप थकलेलो होतो, पण कामाचं प्रेम मला ऊर्जा देत होतं.”      चित्रपटातील फुटबॉल मॅचच्या सीनमध्ये दिग्दर्शकाला हर्षदकडून बॅकफ्लिप गोल हवा होता. जखमी असतानाही बॉडी डबलने सीन योग्य वाटत नव्हता, म्हणून शेवटी हर्षदने स्वतःच स्टंट करून सीन पूर्ण केला. “तो सीन खूप आव्हानात्मक होता, माझ्या पायाला जोरदार मार लागलेला होता, पण चित्रपटासाठी तो शॉट महत्त्वाचा होता. दिग्दर्शकाने नाही म्हणत असतानाही मी तो शॉट केला,” हर्षद म्हणाला. ‘शॉर्ट अँड स्व

मुलींपासून चार हात लांब राहणाऱ्या तरुणाची "मनमौजी" गोष्ट.....

Image
    मुलगी किंवा बायका न आवडणाऱ्या तरुणाच्या  आयुष्यात एक नाही तर चक्क दोन तरुणी येतात आणि त्या तरुणाचं काय होतं याची धमाल, मनोरंजक गोष्ट 'मनमौजी' या चित्रपटातून उलगडणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च नुकताच करण्यात आला असून, आतापर्यंत पोस्टर आणि टीजरमध्ये दिसलेल्या फ्रेशनेसमुळे चित्रपटाविषयी आधीच असलेलं कुतुहल आता आणखी वाढलं आहे. उत्तम स्टारकास्ट असलेला "मनमौजी" हा चित्रपट ८ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.  .   गुलाबजाम, लॉस्ट अँड फाऊंड अशा चित्रपटांची निर्मिती केलेल्या गोल्डन गेट मोशन पिक्चर्सच्या विनोद मलगेवार यांनी "मनमौजी" चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन शीतल शेट्टी यांचे असून हृषिकेश जोशी यांनी संवाद लेखन केले आहे. प्रसाद भेंडे यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले आहे. क्षितिज पटवर्धन आणि वलय मुळगुंद यांनी गीतलेखन, अमितराज आणि पंकज पडघन यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात अभिनेता भूषण पाटील अभिनेत्री सायली संजीव, सिनेसृष्टीत प्रथमच पदार्पण करणारी रिया नलावडे, जयवंत वाडकर, अरुण नलावडे, भ

"राजाराणी" चित्रपट बंद करावा ही माझ्या कडून गैरसमजातून झालेली मागणी - वकील वाजीद खान.

Image
१८  ऑक्टोबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला आणि प्रेक्षकांन कडून भरभरून प्रतिसाद मिळत असलेला 'राजाराणी हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. ह्या चित्रपटात बिग बॉस जिंकून आलेला सुरज चव्हाण मोठ्या भूमिकेत आहे.  'राजाराणी' हा चित्रपट पहिल्या पासूनच चर्चेत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्या नंतर हा चित्रपट मुला मुलींना आत्महत्या करायला भाग पाडत आहे म्हणून हा चित्रपट बंद करावा अशी सुप्रसिद्ध वकील वाजीद खान यांनी मागणी केली होती.    यावेळी त्यांच्या  मागणीवर प्रेक्षकांनी वकील वाजीद खान यांच्या वर नाराजी व्यक्त केली होती व सुरज चव्हाण च्या चाहत्यांनी सोशल मीडिया मध्ये 'आय सपोर्ट सुरज चव्हाण आणि आय सपोर्ट राजाराणी चित्रपट' असा मोठ्या पद्धतीने पाठिंबा जाहीर केला होता. यावेळी निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी वकील वाजीद खान यांना विनंती केली की एकदा व्यवस्थित चित्रपट पहा आणि आपलं मत कळवा.  यावेळी वकील वाजीद खान यांनी चित्रपट पाहून निर्माते यांना फोन करून आपण चर्चा करून पत्रकार परिषद घेऊ अशी विनंती केली.      आज पुणे येथे वकील वाजीद खान आणि राजाराणी चित्रप

'गुलाबी'चे टायटल साँग उलगडणार मैत्रीचा रंग

Image
  बहुप्रतीक्षित ‘गुलाबी’ या चित्रपटाचे टायटल साँग नुकतेच प्रदर्शित झाले असून  गुलाबी शहरातील म्हणजेच जयपूरमधील तीन मैत्रिणींची धमाल यात अनुभवायला मिळत आहे. अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी आणि श्रुती मराठे यांच्यावर चित्रपट करण्यात आलेल्या हा उत्स्फूर्त गाण्याला साई - पियुष यांचे संगीत लाभले असून मंदार चोळकर यांच्या लेखणीतून साकारलेले हे गाणे हंसिका अय्यर यांनी गायले आहे. मैत्री, स्वप्नं आणि स्वतःचा शोध घेणाऱ्या तिघींचा प्रवास या गाण्यातून उलगडत आहे.  नुकतेच प्रदर्शित झालेले हे गाणे ऐकायला जितके एनर्जेटिक आहे तितकेच या गाण्याचे सादरीकरणही कमाल आहे. तिघींची बहरत जाणारी मैत्री यात दिसत असतानाच जयपूरचे रंगीबेरंगी सौंदर्यही यात अधिक रंगत आणत आहे. तीन मैत्रिणींच्या जीवनातील अनोख्या प्रवासाची एक झलक या गाण्यातून दिसून येत आहे.   चित्रपटाचे दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर म्हणतात, “ गुलाबी चित्रपटाचं टायटल साँग म्हणजेच या तीन स्त्रियांच्या आयुष्यातील आनंद आणि मोकळेपणाचं प्रतीक आहे. या गाण्याच्या माध्यमातून मैत्री, स्वातंत्र्य, आणि स्वप्नं यांचा एक सुसंवाद प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न आम्ह

‘सॅटरडे नाईट’च्या चित्रीकरणाचा शुभारंभ अध्यांश मोशन पिक्चर्स घेऊन येत आहेत थरारक चित्रपट.

Image
अध्यांश मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘सॅटरडे नाईट’ या चित्रपटाचा  मुहूर्त सोहळा नुकताच संपन्न झाला. विलास वाघमोडे आणि अनुप्रिता कडू - गंगावणे दिग्दर्शित या चित्रपटाचे प्रणाली उन्मेश वाघमोडे आणि उन्मेश  विलास वाघमोडे निर्माते आहेत. या थरारक चित्रपटात शशांक शेंडे, अक्षया गुरव, पुष्कराज चिरपुटकर, आस्ताद काळे, वर्षा दांदळे, कृतिका तुळसकर, सानिका बनारसवाले आणि जितेंद्र पोळ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. डॉ. सुधीर निकम यांची कथा आणि पटकथा असलेल्या या चित्रपटाचे संवाद विलास वाघमोडे आणि डॉ सुधीर निकम ह्यांचे असून रविंद्र सिद्धू गावडे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहेत. तर धनाजी यमकर क्रिएटिव्ह प्रोड्यूसर आहेत. छायाचित्रणाची धुरा निशांत भागवत याने सांभाळली असून लवकरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर होणार आहे.  ‘सॅटरडे नाईट’ हा स्त्री भ्रूण हत्येवर आधारित थ्रिलर चित्रपट असून प्रेक्षकांना एक वेगळा थरार यानिमित्ताने अनुभवायला मिळणार आहे.  ‘सॅटरडे नाईट’ विषयी बोलताना दिग्दर्शक विलास वाघमोडे म्हणतात, “हा चित्रपट फक्त गुन्हेगारी तपासावर आधारित नाही, तर मानवी स्वभावाच्या गूढ कोपऱ्यांवर प्रकाश

सहजीवनाची चटकदार ‘पाणीपुरी’ भेटीला.

Image
चित्रपटाचं लाजवाब कथानक हे त्याचं 'युएसपी' असतंच पण त्याच्या साथीला कलाकारांच्या नव्या जोड्या  हा रंगतदार चौफेर विषय. आगामी ‘पाणीपुरी’ या मराठी चित्रपटात तब्बल एक नाही तर चार नव्या जोड्या प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येणार आहेत. वेगवेगळ्या कलाकृतीच्या माध्यमातून सातत्याने नवं करू पाहणारा अभिनेता कैलास वाघमारे त्याच्या जोडीला ‘हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री शिवाली परब, आपल्या विनोदाच्या भन्नाट टायमिंगने  रसिकांना खळखळून हसवणारे अभिनेते भारत गणेशपुरे-प्राजक्ता हनमघर, बिनधास्त आणि मिश्किल स्वभावाने आपली प्रत्येक भूमिका गाजवणारे ऋषिकेश जोशी त्यांच्या जोडीला ब्युटीफुल अभिनेत्री  प्रतीक्षा जाधव  सोबत सचिन बांगर-अनुष्का पिंपूटकर हे दोन  नवे तरुण  चेहरे यात  धमाल करणार आहेत. या  जोड्यांच्या सोबतीला अभिनेता मकरंद देशपांडे, सायली संजीव, विशाखा सुभेदार हे अनुभवी कलाकार कथेत जबरदस्त रंग भरणार आहेत. एस.के प्रॉडक्शन निर्मित आणि रमेश चौधरी यांचे लेखन-दिग्दर्शन असलेला ‘पाणीपुरी’ चित्रपट येत्या १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. संजीवकुमार अग्रवाल या चित्रपटाचे निर्माते आहेत तर सहनिर्मात

'पौर्णिमेचा फेरा' भयभीत करणारी वेबसिरीज प्रदर्शित.

Image
शुभम प्रोडक्शन फिल्म्स प्रस्तुत 'पौर्णिमेचा फेरा' ही हॉरर कॉमेडी वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली असून शुभम प्रोडक्शन फिल्म्सच्या युट्युब चॅनेलवर ही वेबसिरीज झळकली आहे. शुभम प्रोडक्शन फिल्म्स प्रस्तुत 'पौर्णिमेचा फेरा' या वेबसिरीजची निर्मिती पायल गणेश कदम यांनी केली असून अजय सरतपे दिग्दर्शित या सीरिजमध्ये निखिल बने, मंदार मांडवकर, सिद्धेश नागवेकर, संजय वैद्य, प्राची केळुस्कर, संदीप रेडकर, दीपा माळकर, चंदनराज जामदाडे, स्नेहल आयरे, दर्शना पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. शुभम विलास कदम यांची कथा असलेल्या या सीरिजचे संवाद, लेखन संदेश लोकेगावकर यांनी केले आहे.      या सीरिजमध्ये तीन मित्र त्यांच्या मित्राच्या कोकणातील वडिलोपार्जित घरी भेट देतात. कोकणातला त्यांचा हा प्रवास, यादरम्यान घडलेली घटना, त्यात दडलेली रहस्ये यात पाहायला मिळणार आहेत. ही रहस्ये काय असतील?  पौर्णिमेच्या चंद्राचा आणि या घटनांचा काय संबंध असेल, असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले असतील तर या सगळ्याची उत्तरे ही वेबसिरीज पाहून मिळतील. या वेबसीरिजचे चित्रीकरण मुंबईमधील काही भागांत

आनंद पिंपळकर दिसणार 'कृष्णशास्त्री पंडित' यांच्या दमदार भूमिकेत

Image
सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ, ज्योतिर्विद आनंद पिंपळकर यांनी आजवर वेगवेगळ्या कलाकृतींच्या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन केले आहे. आता ते एका नव्या भूमिकेसह प्रेक्षकांच्या मनोरंजासाठी  सज्ज झाले आहेत. 'धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज' या आगामी मराठी चित्रपटात एक महत्त्वपूर्ण भूमिका ते साकारणार आहेत. धर्मरक्षणासाठी ज्यांनी आपली आहुती दिली त्या अनेक अनामिक व्यक्तींपैकी एक जंजिऱ्याचे हनुमान भक्त व छत्रपती संभाजी महाराजांचे पाईक कृष्णशास्त्री पंडित. या कृष्णशास्त्री पंडिताच्या दमदार भूमिकेमध्ये आपल्याला आनंद पिंपळकर दिसणार आहेत. यात अमृता खानविलकर आणि ठाकूर अनुप सिंग यांच्या समवेत अभिनयाची जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळणार आहे. उर्विता प्रॉडक्शन्स निर्मित, संदीप  रघुनाथराव  मोहिते पाटील प्रस्तुत, तुषार शेलार दिग्दर्शित  हा चित्रपट  २२ नोव्हेंबरला  प्रेक्षकांच्या  भेटीला येणार आहे.    आपल्या भूमिकेविषयी बोलताना आनंदजी सांगतात, ‘आजवर बऱ्याच भूमिका साकारण्याचे भाग्य मला लाभले. ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ चित्रपटातील कृष्णशास्त्री पंडित ही भूमिका माझ्यासाठी विशेष आ

मराठी उद्योगात नवीन क्रांती: पद्मालय टेलिफिल्म्स लिमिटेड आणि श्री. श्रेयस जाधव यांच्यातील सहयोग.

Image
पद्मालय टेलिफिल्म्स लिमिटेड, जो मुंबईच्या भांडवली बाजारात सूचीबद्ध आहे, हैदराबाद स्थित एक चित्रपट उत्पादनगृह आहे आणि त्यांनी मुंबईच्या मराठी चित्रपट उद्योगात महत्त्वाची क्रांती आणण्याची योजना तयार केली आहे. कंपनीचे कार्यकारी संचालक, जी. व्ही. नरसिंह राव, यांनी अलीकडेच प्रख्यात दिग्दर्शक आणि निर्माता श्री. श्रेयस जाधव यांच्यासोबतच्या सहयोगाची घोषणा केली आहे. गणराज स्टुडिओच्या श्री. श्रेयस जाधव यांच्यासोबत मिळून २०२५-२६ मध्ये सुमारे ६ ते ७ चित्रपट निर्मिती व प्रदर्शित करण्याची योजना आहे. याशिवाय, पद्मालय टेलिफिल्म्स लिमिटेड मुंबईतील गजानन स्टुडिओमध्ये सर्व पोस्ट प्रोडक्शन प्रक्रिया पार पाडेल. संगीत आणि मनोरंजन उद्योगात विस्तारीकरणाच्या योजनाही आहेत. "महाभारत" आणि "रामायण" सारख्या पौराणिक पॅन-इंडिया चित्रपटांच्या पोस्ट कामासाठी ते सहयोग करतील, ज्यामुळे चित्रपट उद्योगाला नवी दिशा मिळेल.     श्रेयस जाधव मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक महत्त्वाचे नाव आहे. त्यांनी "फकाट," "ऑनलाइन बिनलाइन," "मी पण सचिन," "बघतोस काय मुजरा कर,"

ॲड फिजच्या “गगन सदन तेजोमय”चे विसावे वर्ष...१९ वर्षात ५७ सामाजिक कार्यकर्ते आणि संस्थांचा गौरव!

     समाजासाठी प्रतिकुल परिस्थितीत नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या अनोळखी व्यक्ती व संस्था यांचा 'ॲड फिज'द्वारे “गगन सदन तेजोमय” या दिवाळी पहाट सोहळ्यात 'ध्यास सन्मान' देऊन गौरव करण्याची परंपरा आहे. सामाजिक बांधिलकी जपत दिवाळी सण साजरा करण्याची ही अनोखी परंपरा विनोद आणि महेंद्र पवार यांनी १९ वर्षांपूर्वी सुरु केली होती. आपल्या संस्कृतीचे पावित्र्य त्यासोबत उत्तम दर्जा हे  “गगन सदन तेजोमय” वैशिष्ट्य आहे. प्रसिध्दी पत्रकाद्वारे आज या वर्षीचे 'ध्यास सन्मान' 'ॲड फिज'ने जाहीर केले असून "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हेड अँड नेक कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया" या सेवाभावी संस्थेला तर “सेवा हेच जीवन” हे ब्रीदवाक्य समजून आयुष्यभर रुग्णांची सेवा करणाऱ्या मालवण स्थित डॉ. सुभाष दिघे(MBBS) यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. 'ॲड फिज' गेली १९ वर्ष विविध संकल्पना घेऊन “गगन सदन तेजोमय” हा दिवाळी पहाट कार्यक्रम करीत आली आहे. संस्थेचे हे २० वे वर्ष असून गेली १९ वर्ष समाजासाठी झटणाऱ्या आणि प्रतिकूल परिस्थितीत नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्ति व संस्था यांचा "

... म्हणून ‘दि एआय धर्मा स्टोरी’ पुष्कर जोगला जवळचा वाटतो .

Image
पुष्कर सुरेखा जोग दिग्दर्शित ‘दि एआय धर्मा स्टोरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. . हा एक थरारक चित्रपट असून आजच्या काळातील विदारक सत्य यात दाखवण्यात आले आहे. मराठीत हा विषय कधीच हाताळण्यात आलेला नसल्याने प्रेक्षकांना या चित्रपटाची विशेष उत्सुकता आहे. हा चित्रपट पुष्कर जोग काही कारणांनी स्वतःशी रिलेट करतो. याबाबतचा खुलासा त्याने स्वतः केला आहे.  पुष्कर जोग म्हणतो,  '' आज समाजात डीप फेकचे प्रमाण फोफावतेय. मी स्वतः एका मुलीचा वडील असल्याने माझ्याही मनात तिच्या सुरक्षेबाबतचा मुद्दा कायम असतो. माझ्यासाठी माझ्या मुलीचा जीव खूप महत्वाचा आहे. त्यामुळे या चित्रपटाची कथा मी स्वतःशी जोडू शकतो. चित्रपटात धर्माची व्यक्तिरेखा साकारताना, मी स्वतःच्या भावना त्यात ओतल्या आहेत. एक वडील आपल्या मुलीला वाचवण्यासाठी आणि तिचे रक्षण करण्यासाठी काय करू शकतो, हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चित्रपटाची कथा एक थरारक अनुभव देईल, तसेच एक वडील मुलीची भावनिक नातेही या निमित्ताने अनुभवयाला मिळेल.''  ‘दि एआय धर्मा स्टोरी’मध्ये एक वडील आपल्या मुलीच्या जीवासाठी कसे लढा दे

अनोख्या जीवन प्रवासाची गाथा सांगणारा 'जर्नी' २९ नोव्हेंबर होणार प्रदर्शित.

Image
      सचिन दाभाडे फिल्म प्रस्तुत 'जर्नी' चित्रपट येत्या २९ नोव्हेंबरला  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. आयुष्य, नाती आणि कुटुंबाशी असलेला संघर्ष असणाऱ्या या 'जर्नी'मध्ये शुभम मोरे, माही बुटाला, निखिल राठोड या बालकलाकारांची प्रमुख भूमिका असून याव्यतिरिक्त या चित्रपटात शंतनू मोघे, शर्वरी जेमेनीस, अंजली उजवणे, योगेश सोमण, ओमकार गोवर्धन, सुनील गोडबोले, मिलिंद दास्ताने,  प्रशांत तपस्वी यांच्याही मुख्य व्यक्तिरेखा आहेत. या चित्रपटाचे लेखन रवींद्र मठाधिकारी यांनी केले आहे. सचिन दाभाडे यांनी कथा, निर्माते, दिग्दर्शकाची धुरा सांभाळली असून भास्कर देवेंग्रेकर, तानाजी माने, संतोष राठोड, अनिकेत अरविंद बुटाला सहनिर्माते आहेत.   आयुष्याचा किंवा पर्यटनाचा प्रवास असो प्रत्येक अनुभव काही ना काहीतरी शिकवून जातो. या प्रवासात चढउतार येत असतात तेव्हा अनेक गोष्टींचे महत्व समजते. आयुष्याच्या प्रवासाची अनुभूती देणाऱ्या या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित असून त्यात एक लहान मुलगा आणि काळजीत असणारे दोन चेहरे दिसत आहेत. या तिघांच्या आयुष

महाराष्ट्राला हादरून टाकणाऱ्या अनेक सत्य घटनांनी प्रेरित अल्ट्रा झकासची पहिली ओरिजिनल सीरिज 'IPC'

Image
      अल्ट्रा झकास ओटीटीची पहिली मराठी ओरिजिनल वेब सिरीज ‘IPC’ २५ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘IPC’ हि वेब सिरीज अनेक सत्य घटनांपासून प्रेरित क्राइम थ्रिलर सिरीज असणार आहे. त्याचबरोबर अल्ट्रा झकास ओटीटीवर दर महिन्याला एक नवी कोरी वेब सीरिज देखील प्रदर्शित करण्यात येणार आहे.       या वेब सिरीजमध्ये किशोर कदम, देविका दफ्तरदार, राजेंद्र शिसातकर,सुरेश विश्वकर्मा व अभिनय सावंत ह्यांच्या सारख्या दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी अनुभवायला मिळेल. .     कोकणातील छोट्या गावात शिमगोत्सवाच्या दिवशी एका २० वर्षीय तरुणीवर अमानुष अत्याचार होतो आणि सुरु होते एक रहस्यमय थरारक घटनांची शृंखला जी वास्तवात घेऊन येते कल्पनेच्या पलीकडले सत्य, जे उलगडणार २५ ऑक्टोबरला.      अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते, राजेश चव्हाण या सिरीजचे दिग्दर्शक आहेत,आणि अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडचे सी.ई.ओ, श्री. सुशीलकुमार अग्रवाल यांनी या सिरीजची निर्मिती केली आहे.      अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडचे सी.ई.ओ, श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणा

कल्याणात ॲड.निलम शिर्के - सामंत यांच्या उपस्थितीत दिव्यांग बालकलाकारांनी जल्लोषात सादर केला कलामहोत्सव.

Image
     कल्याण :- बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीच्या अध्यक्षा ॲड.नीलम शिर्के - सामंत यांच्या संकल्पनेतून दिव्यांग मुलांचा कलामहोत्सव " *यहाँ के हम सिकंदर*  आचार्य अत्रे रंगमंदिर येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला.बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती आयोजित,बालरंगभूमी परिषद कल्याण शाखा संचलित  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मध्यवर्तीच्या अध्यक्षा ॲड. निलम शिर्के - सामंत,कार्याध्यक्ष राजू तुलालवार, नाट्य परिषद कल्याण शाखेचे अध्यक्ष रविंद्र सावंत, उपाध्यक्ष  अण्णा हांडूरे, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक रामदास काळे या मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या समयी कल्याण शाखेचे अध्यक्ष सतिश देसाई ,  प्रमुख कार्यवाह सुजाता कांबळे - डांगे,उपाध्यक्षा प्रिती बोरकर,कोषाध्यक्ष दिपक चिपळूणकर, सहकार्यवाह संजय गावडे व  सुनिता देसाई योगेश कल्हापुरे व्यासपीठावर उपस्थित होते. तर कार्यकारिणी सदस्य विशाल पितळे, सौरभ रमेश आरोटे, मीनल ठाकोर, सुरेखा गावंडे, मेघा शृंगारपुरे, चेतन दुर्वे, भूषण मेहेर, दिपाली पितळे, श्रीमती मेहेर कार्यक्रमास उपस्थित होते. कार्याध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी प्रास्ताविक केले व अध्यक्षा

दुसऱ्या आठवड्यातही 'येक नंबर'चा बोलबोला.

Image
गेल्या अनेक महिन्यांपासून 'येक नंबर' या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु होती. अनेकांना हा चित्रपट राज ठाकरे यांचा बायोपिक असल्याचे वाटले होते. अखेर या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांना मिळाले असून राज ठाकरे यांची विचारधारा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे. महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून पाहावा, असा हा चित्रपट आहे. सिनेमाची कथा, कलाकार, चित्रीकरण स्थळे, भव्यता या सगळ्याचे सध्या जोरदार कौतुक होत आहे. चित्रपसृष्टीतील अनेक कलाकार, मान्यवर, समीक्षकांकडून या चित्रपटाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया आल्यानंतर आता प्रेक्षकवर्ग ही या चित्रपटावर भरभरून प्रेम करत आहेत.  राजेश मापुस्कर यांनी पहिल्यांदाच अशा धाटणीचा चित्रपट बनवल्याने अनेकांनी त्यांच्या दिग्दर्शनाचे कौतुक केले आहे. अनेकांनी या चित्रपटाच्या भव्यतेचे, कधीही मराठीत न बनलेला असा हा चित्रपट, अशा अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर महेश मांजरेकर, भरत जाधव, साजिद खान, फराह खान, वंदना गुप्ते, आशुतोष गोवारीकर, संजय जाधवअशा अनेक मान्यवरांनही या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. मराठी चित्र

दाक्षिणात्य अभिनेत्री शान्वी श्रीवास्तव मराठीत.

Image
समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ या आगामी मराठी चित्रपटाची  मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटातून  दाक्षिणात्य अभिनेत्री आणि मॉडेल शान्वी श्रीवास्तव मराठी  रुपेरी  पडद्यावर  पदार्पण करते आहे.  या चित्रपटातील  तिच्या भूमिकेचं  पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं  आहे. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ हा मराठीतला सगळ्यात मोठा अ‍ॅक्शनपट २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.     शान्वी श्रीवास्तव हिने  दाक्षिणात्य चित्रपटांच्या दुनियेत चांगलंच नाव कमवलं आहे. शान्वीने २०१२  मध्ये तेलुगू चित्रपट लव्हली द्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते.‘अड्डा’,‘प्यार में पडीपोयने’,‘भले जोडी’,‘मुफ्ती’,‘चंद्रलेखा’ यासारख्या दाक्षिणात्य  चित्रपटांमध्ये  ती झळकली आहे.       ‘रानटी’ चित्रपटात मैथिली या महत्त्वाच्या भूमिकेत शान्वी दिसणार आहे. ‘रानटी' या मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल तिने आनंद व्यक्त केला. सोबतच दिग्दर्शक समित कक्कड सारख्या नावाजलेल्या दिग्दर्शकासोबत काम करण्याचा अनुभवही कमालीचा असल्याचा ती  सांगते. य

मुंबईतील दिव्यांग मुलांचा 'यहा के हम सिकंदर'महोत्सव' बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष अभिनेत्री एड नीलम शिर्के - सामंत यांच्या उपस्थितीत होणार साजरा.

Image
मुंबई - बालरंगभूमी परिषद मुंबई आयोजित व बालरंगभूमी परिषद बृहन्मुंबई शाखा नियोजित 'यहाँ के हम सिकंदर' हा दिव्यांग मुलांचा विविध कला गुणांचा महोत्सव  दिनांक १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपार २ वेळेत यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल माटुंगा या ठिकाणी  रंगणार आहे.  या महोत्सवात मुंबईतील १३ दिव्यांग शाळांमधील २०० दिव्यांग बालकलावंत आपली कला सादर करणार आहेत. तसेच दिव्यांग मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थातर्फे बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री यावेळी करण्यात येणार आहे.  या कार्यक्रमाचे आकर्षण दिव्यांग मुलांचे सांस्कृतिक कला प्रदर्शनासोबतच परिषदेच्या अध्यक्ष सिने अभिनेत्री नीलम ताई शिर्के यावेळी उपस्थित राहणार आहेत.        बालरंगभूमी परिषद तर्फे नुकताच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात शालेय विद्यार्थ्यांसाठी जल्लोष लोककलेचा कार्यक्रम मोठ्या दणक्यात झाला. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध लोककलांचे दर्शन शालेय मुलांनी घडवले.  बालरंगभूमीचे स्वरूप केवळ मनोरंजनात्मक न राहता ती लोकचळवळ व्हायला हवी हा बालरंगभूमीचा मानस असून त्याचाच एक भाग म्हणून विशेष मुलांसाठी म्हण

"नवरा माझा नवसाचा 2" पोहचला पाचव्या आठवड्यात.

Image
"नवरा माझा नवसाचा 2" चित्रपट २० सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाचा पाचवा आठवडा सुरु झाला आहे.जेव्हापासून या सिनेमाची घोषणा झालेली अगदी तेव्हापासूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली. पुढे जसजसे सिनेमाचे टीझर आणि ट्रेलर येत गेले तसतसे या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहू लागले. चित्रपटाने आतापर्यंत तब्बल २१ कोटींपेक्षाही अधिक गल्ला जमवला आहे.  सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या 'नवरा माझा नवसाचा 2' या चित्रपटाची निर्मिती,  कथा - पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केल असून संवादलेखन संतोष पवार यांचं आहे. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे यांच्यासह मोठी स्टारकास्ट आहे.  नवस फेडण्यासाठी जातानाचा रेल्वे प्रवास, त्यात होणाऱ्या गमतीजमती हा चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. सोनू निगम, जॉनी लिवर, श्रिया पिळगांवकर हे पाहुण्या कलाकराच्या भूमिकेत असून प्रेक्षकांना हे सरप्राइज पसंतीस पडले आहे.   एकोणीस वर्षानंतर पुन्हा एकदा गणपतीपुळेला निघालेला हा प

"कर्मयोगी आबासाहेब" चित्रपटाचा ट्रेलर लाँच,२५ ऑक्टोबर रोजी चित्रपट होणार प्रदर्शित.

Image
राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणारे दमदार आमदार,  राज्याचे  कॅबिनेट मंत्री राहिलेल्या स्वर्गीय मा. गणपतराव देशमुख म्हणजेच ऊर्फ आबासाहेब यांच्या जीवनकार्याचा वेध "कर्मयोगी आबासाहेब" या चित्रपटातून घेतला जाणार आहे. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाँच करण्यात आला असून, २५ ऑक्टोबर रोजी मराठीसह हिंदी भाषेतही हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे.        मायका माऊली फिल्म प्रॉडक्शन आणि मुंबई क्रिएशन एंटरटेन्मेंटच्या मारुती तुळशीराम बनकर, बाळासाहेब महादेव एरंडे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अल्ताफ दादासाहेब शेख यांनी चित्रपटाचं लेखन, गीतलेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. अवधूत गुप्ते यांनी संगीत, कुमार डोंगरे यांनी छायांकन आणि संकलनाची जबाबदारी निभावली आहे. कुणाल गांजावाला, मनीष राजगिरे यांनी गाणी गायली आहेत. चित्रपटात अनिकेत विश्वासराव, हार्दिक जोशी, देविका दफ्तरदार, पृथ्विक प्रताप, विजय पाटकर, प्रदीप वेलणकर, सुरेश विश्वकर्मा, अरबाज शेख, तानाजी गलगुंडे, घनश्याम दरोडे (छोटा पुढारी), अहमद देशमुख,  वृंदा बाळ, निकिता सुखदेव,अली शेख, अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या प्रमुख

दानशूर भागोजीशेठ कीर यांच्या नियोजित स्मारकाचा भूमिपूजन सोहळा मुंबईत समारंभपूर्वक संपन्न...!

Image
    दानशूर , समाजभूषण, महामानव भागोजीशेठ कीर यांच्या नांवे उभारण्यात येणाऱ्या नियोजित स्मारकाचे भूमिपूजन मान.  महाराष्ट्र राज्य मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२४ रोजी करण्यांत आले. छत्रपती श्री शिवाजी महाराज पार्क येथील दादर येथील कै. भागोजीशेठ कीर स्मशानभूमी समोरील एक मोकळ्या भूखंडावर उभारण्यात येणाऱ्या महामानव  कै. श्री. भागोजीशेठ कीर यांच्या नियोजित स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्यासह इतर अनेक लोकार्पण करण्यांत आलेल्या विकास कामांचे यावेळी दूरदृश्यप्रणालीद्वारे ऑनलाईन उद्घाटन जवाहर बालभवन, चर्नी रोड, पश्चिम,मुंबई येथे करण्यांत आले.      सदर कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. दीपक केसरकर, मा. खासदार श्री. राहुल शेवाळे , मा. कालिदास कोळंबकर , आ. यामिनी जाधव आदी मान्यवर मंडळी मंचकावर उपस्थित होते. सदर कार्यक्रमात महामानव भागोजीशेठ  कीर यांच्या जीवन प्रवासावर आधारित एक छोटीशी ध्वन

‘फुलवंती’ चित्रपटातील ‘भो शंभो' गाणं प्रदर्शित.

Image
नृत्यदेवता म्हणून नटराज या रूपात शिवाचे महत्त्व आहे. शिवाने प्रथम नृत्याचा प्रारंभ केला अशी भारतीय परंपरेतील धारणा आहे. नृत्यमग्न अवस्थेतल्या श्री शिवशंकरांना नटेश, नटेश्वर व नर्तेश्वर असेही म्हटले जाते.  गायन, वादन, नर्तन अशा त्रिसूत्रीतून निनादणारं ‘फुलवंती’ चित्रपटातील ‘भो शंभो' हे गाणं प्रदर्शित झालं आहे. भारतीय अभिजात संगीत आणि शास्त्रीय भरतनाट्यम् नृत्य यांचा अद्भुत संगम आपल्याला यात पहायला मिळणार आहे. शृंगार, वीर, करुण, हास्य, रौद्र, भयानक, बीभत्स, अद्भुत आणि शांत असे वेगवेगळे रस दाखविताना नृत्य आणि पखवाजाचा रंजक सामना या गाण्यातून आपल्याला पहायला मिळणार आहे. अप्रतिम अभिनय व नृत्याविष्कार असणार्‍या या चित्रपटाने नृत्य व मानवी भावना यांचा अनोखा संगम दाखवला आहे. शुद्ध स्फटिक संकाशम, त्रिनेत्रम पंच वत्रकम् ! गंगाधरम् दशभुजम, सर्वाभरण भूषितम ! नीलग्रीव शशांकांकम् , नाग यज्ञोपवितीनम ! व्याघ्र चर्मोत्तरीयंच,  वरेण्यं अभयप्रदम ।। स्मरुनी अंतःकरणी तुजला, ठेविला देह चरणी तुझिया ! मजसी सामर्थ्य द्यावे हे नटराजा ! सर्वस्वाचे हवन मांडले मज मति द्यावी जगदीशा..!   भो शंभो शिव

पुष्कर जोग म्हणतोय 'उडूदे भडका' ‘दि एआय धर्मा स्टोरी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला .

Image
आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित ‘दि एआय धर्मा स्टोरी’ येत्या २५ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या रंजक ट्रेलरने गूढ निर्माण केले असून या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत.  त्यातच आता या चित्रपटातील 'उडूदे भडका' हे पहिले गाणे सोशल मीडियावर झळकले असून यात पुष्कर जोग एका अनोख्या आणि जोशपूर्ण रूपात दिसत आहे. मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला हितेश मोडक यांचे संगीत लाभले आहे. तर हे जबरदस्त गाणे बॉलिवूडला सुपरहिट गाणे देणारे सुखविंदर सिंग आणि हितेश मोडक यांनी गायले आहे. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन राहुल शेट्ये यांनी केले असून 'उडूदे भडका' गाण्यातून नायकाच्या मनातील राग, बदल्याची आग, आक्रमकता व्यक्त होताना दिसत आहे.    दिग्दर्शक, अभिनेता पुष्कर जोग या गाण्याबद्दल म्हणतात, '' बदला घेण्यासाठी पेटून उठणाऱ्या नायकाच्या मनातील राग या गाण्यातून व्यक्त होत आहे. गाण्याचे बोल खूपच अर्थपूर्ण आहेत आणि त्याला हितेश मोडकचे सर्वोत्कृष्ट संगीत लाभल्याने हे गाणे अधिकच रंजक बनले आहे. सुप्

"पाऊस" एका निर्णायक वळणावर : सायली आणि विशालच्या नात्यात नवा ट्विस्ट.

Image
‘इट्स मज्जा’या युट्यूब वाहिनीवरून प्रसारीत होणाऱ्या "पाऊस" या वेबसिरीजला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.  या नवीन सीरिजमधून ‘इट्स मज्जा’ने प्रेक्षकांसमोर एक नवीन विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 'पाऊस’ आणि प्रेमाचं नात हे प्रत्येकाला भावणारं असते. प्रत्येकाच्या प्रेम कहाणीमध्ये कुठे ना कुठेतरी ‘पाऊस’ हा महत्वाचा असतो.   या वेबसिरीजमधून प्रेमाचं एक अल्लड नातं उलगडणाऱ्या सायली आणि विशालचे प्रेमबंध प्रेक्षकांना आवडू लागले आहेत. मुख्य  नायक आणि नायिकेच्या भूमिका आरती बिराजदार आणि अक्षय खैरे यांनी साकारल्या आहेत. सायली आणि विशालच्या नात्यात एक नवा ट्विस्ट आला आहे.  तो ट्विस्ट आहे सायलीचा आतेभाऊ. या नव्या ट्विस्टमुळे सायली आणि विशालच्या नात्याचे बंध किती घट्ट होतील, तसेच त्यांचे नाते कोणत्या निर्णायक वळणार पोहोचेल वेब सिरीजचे आगामी भाग सांगतील.  .   ‘सुंदरी’ मालिकेतील कर्तबगार व कर्तव्यनिष्ठ कलेक्टरची भूमिका साकारल्यानंतर आरती आता ‘पाऊस’च्या निमित्ताने ग्रामीण भागातील एका गावातल्या साध्या मुलीची भूमिका साकारत आहे.  या सीरिजमध्ये आरतीला अभिनेता अक्षय खैरेची सा

'बंजारा'च्या २० फूट भव्य पोस्टरचे अनावरण ...स्नेह पोंक्षेचे दिग्दर्शनात पदार्पण...

Image
 मोरया प्रॉडक्शन्स आणि वि. एस. प्रॉडक्शन्स सादर करत असलेल्या 'बंजारा' या चित्रपटाचा शानदार पोस्टर लाँच सोहळा नुकताच पार पडला. यावेळी चित्रपटाच्या २० फूट उंचीच्या भव्य पोस्टरचे अनावरण करण्यात आले. सोहळ्यात विशेष लक्षवेधी ठरली ती शरद पोंक्षे, भरत जाधव, सुनील बर्वे आणि स्नेह पोंक्षे यांची बाईकवरील ग्रँड एन्ट्री. स्नेह पोंक्षे लिखित, दिग्दर्शित 'बंजारा' या चित्रपटात प्रेक्षकांना मैत्रीचा प्रवास अनुभवयाला मिळणार आहे. 'बंजारा' चित्रपट येत्या नाताळमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  नुकत्याच झळकलेल्या पोस्टरमध्ये तीन वयस्क मित्र सिक्कीमच्या पर्वतरांगांमध्ये बाईकराईडचा आनंद लुटताना दिसत आहेत. त्यांचा हा प्रवास त्यांच्यासाठी किती आनंददायी आहे, हे त्यांच्या चेहऱ्यावरून व्यक्त होत आहे. अनेकदा कुठे जायचंय, यापेक्षा तिथपर्यंत पोहोचण्याचा अनुभव सुखकारी असावा, ही गोष्ट प्रवासात नेहमीच महत्वाची असते आणि आपण याच आनंदाला बऱ्याचदा मुकतो. याचे महत्व अधोरेखित करणारा 'बंजारा' आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने शरद पोंक्षे निर्मितीत आणि स्नेह पोंक्षे दिग्दर्शनात प

नार्वेकर ‘बॅक इन ॲक्शन’

Image
मराठी फिल्म इंडस्ट्री सोबतच बॉलीवूडमध्ये ‘देढ फुट्या’ या भूमिकेने लोकप्रिय झालेले अभिनेते संजय नार्वेकर आता ‘रानटी’ चित्रपटातून आपल्याला अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहेत. ‘सदा राणे’ नावाच्या खतरनाक खलनायकाची भूमिका ते साकारत आहेत. ‘सदा राणे’ ही अत्यंत क्रूर व्यक्तिरेखा प्रेक्षकांचा थरकाप उडवणारी आहे. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ हा मराठीतला सगळ्यात मोठा अ‍ॅक्शनपट २२ नोव्हेंबरला आपल्या भेटीला येणार आहे. .    आपल्या  भूमिकेबद्दल बोलताना संजय नार्वेकर सांगतात, ‘सदा राणे’ हा वरकरणी अतिशय शांत पण आतून कपटी असा खलनायक साकारणे माझ्यासाठी चॅलेंजिंग होते. चित्रपटाच्या कथानकाला वळण देणारी ही भूमिका प्रेक्षकांनाही धडकी भरवणारी आहे. ‘कथेच्या गरजेनुसार भूमिकेत शिरणे माझ्यासाठी नेहमीच आव्हानात्मक असते. अशा भूमिका फार कमी लिहिल्या जातात, दिग्दर्शक समित कक्कड यांच्या ‘रानटी’ चित्रपटामुळे मला ‘सदा राणे’ या खलनायकाच्या व्यक्तिरेखेत प्रवेश करण्याची जबरदस्त संधी मिळाली आणि मी माझ्या पद्धतीने ती पडद्यावर साकारली आहे. समितच्या चित्रपटात  काम  करणे  हा नेहमीच एक भन्नाट

दसर्‍याला ‘मूषक आख्यान’चे पोस्टर लाँच.

Image
अभिनेता मकरंद अनासपुरे नेहमीच काही नवे देत असतात. ‘राजकारण गेलं मिशीत’ या धमाल चित्रपटानंतर यावेळी ‘मूषक आख्यान’ या त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात त्यांनी नऊ रंगाच्या अन् ढंगाच्या नऊ वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या आहेत. मराठीत हा प्रयोग पहिल्यांदाच होतो आहे. ‘मूषक आख्यान’ हा चित्रपट ८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टर लाँच आणि टीझर रिलीजचा सोहळा श्री सिद्धिविनायक मंदिरात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर संपन्न झाला.  ‘देशमाने डिजी व्हिजन’द्वारे प्रस्तुत ‘मूषक आख्यान’ या चित्रपटाची निर्मिती सुरेश पठारे, मच्छिंद्र लंके, शिल्पा अनासपुरे, त्रिशला देशमाने यांनी केली आहे. मकरंद अनासपुरे यांच्या नऊ भूमिका अत्यंत सहजपणे कथेत गुंफल्या आहेत. चित्रपटाचे लेखक हेमंत एदलाबादकर आहेत. छाया दिग्दर्शन सुप्रसिद्ध छायाचित्र दिग्दर्शक सुरेश देशमाने यांचे आहे. हर्षदा पोरे कल्लुरकर यांनी लिहिलेल्या गीतांना अतुल दिवे यांनी संगीतबद्ध केले आहे. गायिका वैशाली सामंत यांच्या आवाजातील गाणी खूपच श्रवणीय झाली आहेत. सुप्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिची ठसकेबाज लावणी हे ‘मूषक

जीवनाचे सार सांगणारा कोकणी चित्रपट "अंत्यआरंभ"

Image
श्रीमती. किरणमयी आर कामथ निर्मित "अंत्यआरंभ" हा नवीन कोकणी  चित्रपत लवकारच प्रेक्षाकांच्य भेटीस येणार अहे. या चित्रपाटाची निर्मिती आदित्य  क्रिएशन्स बॅनरच्या अंतर्गत  करण्यात आली असून ह्याचे लेखन, दिग्दर्शन,  गीतलेखन सुप्रसिद्ध कर्नाटक कोकणी साहित्य अकादमी आणि अनेक पुरस्कारप्राप्त  डॉ. रमेश कामथ यांनीच केले आहे. एफटीआय पुणे येथून त्यांनी आपले शिक्षण घेतले असून एकूण ८ कोकणी चित्रपटातील ४ कोकणी चित्रपट हे त्यांनी स्वतः  आजवर बनविले आहेत. .   "अंत्यआरंभ" हा एक जीवनाचे सार सांगणारा चित्रपट असून  प्रत्येक शेवट ही एक नवीन सुरुवत असते असा संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे. डॉ.रमेश कामठ, दामोदर नायक, प्रतीक्षा कामथ , विठोबा भांडारकर, स्टेनी अल्वारेस, उदय  जादूगार, अनंत नायक आदी कलाकारांच्या भूमिका आपल्याला या चित्रपटात पहायला मिळणार आहेत. कॅमेरामन पीव्हीआर स्वामी,  संगीत सुप्रसिद्ध गायक शंकर शानभोगे ह्यांचे आहे.  संवाद लेखन श्री कृष्ण राव ह्यांचे आहे. कर्नाटक येथील मर्कारा येथे चित्रपटाचे चित्रीकरण झाले असून प्रेक्षकांना निसर्गाचा मनमुराद आनंद या चित्रपटातून