पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चाळीस वर्षांनी 'पुरुष' पुन्हा एकदा मराठी रंगभूमीवर,१४ डिसेंबरला होणार शुभारंभाचा प्रयोग.

इमेज
   जयवंत दळवी यांच्या लेखणीतून साकारलेल्या 'पुरुष' या नाटकाने एकेकाळी मराठी रंगभूमी गाजवली. स्त्री- पुरुष संबंध, सामाजिक विषमता आणि स्त्री च्या संघर्षाची कथा यात दाखवण्यात आली होती. नाटकातील संवेदनशील आणि सामाजिक संवादामुळे त्यावेळी हे नाटक मराठी रंगभूमीवर एक मैलाचा दगड ठरले होते. मराठी रंगभूमीवरील ही महत्वपूर्ण कलाकृती सुमारे चाळीस वर्षांनंतर नाट्यप्रेमींना पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. मोरया प्रॉडक्शन्स, भूमिका थिएटर्स, अथर्व थिएटर्स निर्मित, जाई काजळ प्रस्तुत 'पुरुष' हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज झाले असून येत्या १४ डिसेंबर रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग सादर होणार आहे. राजन ताम्हाणे दिग्दर्शित, जयवंत दळवी लिखित या नाटकाचे शरद पोंक्षे, श्रीकांत तटकरे, समिता भरत काणेकर निर्माते आहेत. या नाटकात स्पृहा जोशी, अविनाश नारकर, अनुपमा ताकमोगे, निषाद भोईर, नेहा परांजपे आणि शरद पोंक्षे प्रमुख भूमिकेत दिसतील. या नाटकाला विजय गवंडे यांचे संगीत लाभले आहे.          स्त्री पुरुष समानता, स्त्रीची अस्मिता, समाजातील पुरुषप्रधान मानसिकतेवर...

'आर्यन्स सन्मान’ चित्रपट-नाटक सोहळ्याची नामांकने घोषित...पुण्यात पुरस्कारांची घोषणा; १३ लाख रुपयांचे पुरस्कार देणार.

इमेज
संध्याकाळची प्रसन्न वेळ..वातावरणात काहीसा गारवा…चित्रपट, नाटकांशी संबंधितांना ओढ नामांकने घोषित होण्याची..पावले केशवबागेकडे वळलेली..शानदार सूत्रसंचालन…मधूनच गाणी आणि नाच.. चित्रपट आणि नाटकाचे लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्रीपैकी कुणाची घोषणा होते, याकडे लक्ष लागलेले..अखेर ते क्षण येत गेले…आपल्या आवडत्या कलाकृतीला आणि आवडत्या कलाकाराची घोषणा जेव्हा होत होती, त्या वेळी केशवबाग टाळ्यांच्या गजराने दुमदुमत होती… हे दृश्य होते ‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक’ पुरस्कार सोहळ्याची नामांकने घोषित करण्याच्या वेळचे. दरवर्षी या सोहळ्याची चाहते तितक्याच उत्सुकतेने वाट पाहत असतात. राज्य सरकारनंतर रोख पुरस्कार देणारा हा दुसरा मोठा पुरस्कार सोहळा असल्याने या पुरस्कारावर नाव कोरले जावे, असे अनेकांना वाटत असते. पुण्यातील डी. पी. रोड, कर्वे नगर येथील केशव बागमध्ये ‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक’ नामांकन सोहळा मोठ्या थाटात पार पडला. ‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक’ सोहळ्याची नामांकने घोषित झाल्याने कोणकोणते कलाकार-तंत्रज्ञ पुरस्कारांवर आपले नाव कोरण्यात यशस्वी होतात, हे पाहण्याची उत्सुकता वाढली आहे.   ...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 'भीमराया तुझ्यामुळे'द्वारे अभिवादन.

इमेज
भारतीय संविधानाचे निर्माते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे सर्वसामान्यांना हक्क, अधिकार मिळाले. या अधिकार, हक्कांनी कित्येकांचे आयुष्य बदलले. ही माणूस म्हणून घडण्याची गोष्ट भीमराया तुझ्यामुळे या व्हिडिओतून अनोख्या आणि भावस्पर्शी पद्धतीने मांडण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे, या म्युझिक व्हिडिओतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाला अभिवादन करण्यात आलं आहे.     अमित बाईंग, सचिन जाधव, प्रदीप जाधव यांनी या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. अमित बाईंग यांनी दिग्दर्शनाचीही जबाबदारी निभावली आहे. श्रेयश राज अंगाणे यांनी संगीत दिग्दर्शन, गीतलेखन, पटकथा लेखन, संवाद लेखन, निखिल चंद्रकांत पाटील यांनी कथालेखन, हरेश सावंत यांनी छायांकन केलं आहे.प्रसिद्ध गायक मनीष राजगिरेच्या आवाजात हे गीत स्वरबद्ध करण्यात आले आहे.म्युझिक व्हिडिओमध्ये अभिनेत्री मेघा घाडगे यांच्यासह नितेश कांबळे, मानस तोंडवळकर, नरेंद्र केरेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.     पूर्वीच्या काळी समाजरचनेमध्ये भेदभावाची, उच्च-कनिष्ठता मानण्याची अनिष्ट प्रथा होती. मात्र, आता मोठा सर...

‘हॅशटॅग तदेव लग्नम्’मधील 'नकारघंटा' हे गंमतीशीर गाणं प्रदर्शित.

इमेज
शुभम फिल्म प्रोडक्शनच्या ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतानाच आता या चित्रपटातील एक धमाल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. क्षितिज पटवर्धन लिखित 'नकारघंटा...' असे बोल असलेलं हे गाणं सुबोध भावेवर चित्रित करण्यात आलं असून पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यात आदर्श शिंदे यांच्या दमदार आवाजानं अधिकच रंगत आणली आहे.     'हळूच मनाचं दार उघडून, रोज नवी येते आणि जाते वाजवून घंटा... नकारघंटा...' या ओळींमधूनच साधारण कल्पना प्रेक्षकांना आली असेलच. विवाहेच्छुक सुबोध भावे लग्नासाठी मुली बघताना दिसत असून अपेक्षांमध्ये न बसल्याने त्याला बहुतेक स्थळांकडून नकारच मिळत असल्याचं या गाण्यातून दिसतंय. सुबोधच्या आयुष्यातील ही नकारघंटा थांबून, तो बोहल्यावर चढणार का? हे उत्तर जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना २० डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. आनंद दिलीप गोखले लिखित, दिग्दर्शित या चित्रपटात सुबोध भावे, तेजश्री प्रधान, प्रदीप वेलणकर, मानसी मागिकर, संजय खापरे, शर्मिष्ठा राऊत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर शेखर विठ्ठल मते या चित्रपटाचे नि...

इफ्फी मध्ये ‘घरत गणपती’ चित्रपटाचा गौरव...दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पदार्पण पुरस्काराने सन्मानित.

इमेज
५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI 2024) ‘भारतीय फिचर चित्रपट पुरस्कार’ विभागात ‘घरत गणपती’ या मराठी चित्रपटासाठी दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांना पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आला. प्रमाणपत्र आणि पाच लाख रुपये रोख, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.   ‘पहिल्याच चित्रपटाला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद व पुरस्काराची पोचपावती भारावणारी असल्याची प्रतिक्रिया दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांनी व्यक्त केली. एक छान कौटुंबिक कथा व भारतीय संस्कृतीचे दर्शन ‘घरत गणपती’ चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही दाखविले, त्या चित्रपटाचं आज विविध स्तरावर खूप कौतुक होताना दिसतंय’, याचा अभिमान असल्याचंही दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर सांगतात.         गोव्यात संपन्न झालेल्या यंदाच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये (इफ्फी)भारतीय फिचर चित्रपट पुरस्काराच्या यादीत पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पण हा विभाग जाहीर करण्यात आला. या पुरस्कारासाठी सात चित्रपट स्पर्धेत होते. पुरस्काराच्या या स्पर्धेत ‘ घरत गणपती’ चित्र...

६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे कल्याण केंद्रात शानदार उद्घाटन ,

इमेज
   २७ नोव्हेंबर पासून आचार्य अत्रे रंगमंदिर येथे महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेस मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले यावेळी सुकांत जावडेकर व सुप्रिया जावडेकर यांनी सुस्वर अशी नांदी गात नटराज पूजनाचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी व्यासपीठावर आचार्य अत्रे रंगमंदिरचे माजी व्यवस्थापक व ज्येष्ठ रंगकर्मी गजानन कराळे, नाट्यपरिषद उपाध्यक्षा व ज्येष्ठ रंगकर्मी डोंबिवलीच्या भारती ताम्हणकर, अखिल भारतीय नाट्य परिषद कल्याण शाखेचे अध्यक्ष रवींद्र सावंत, कल्याण शाखेच्या बालरंगभूमी परिषद अध्यक्षा व अभिनेत्री सुजाता कांबळे, गायन क्षेत्रातील नामवंत कलाकार व सुरताल कराओके क्लबच्या संचालिका लीना घोसाळकर, दैनिक जनमतचे ज्येष्ठ पत्रकार व नाट्य समीक्षक बबलू दळवी, राज्य नाट्य स्पर्धेचे समन्वयक शिवाजी शिंदे, सांस्कृतिक कार्य संचालनाचे अधीक्षक संदीप वसावे तसेच यंदा नाट्य स्पर्धेचे परीक्षक म्हणून असलेले अमरावतीचे नाट्यदिग्दर्शक, नाटककार, नेपथ्यकार, नाट्य व्याख्याता सुरेश बारसे, सोलापूर येथील राज्य नाट...

'मिशन अयोध्या': राम मंदिर स्थापनेनंतर राम जन्मभूमीत चित्रित झालेला भारतातील पहिला चित्रपट.

इमेज
 अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या ऐतिहासिक निर्मितीनंतर प्रथमच मराठी चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर भव्य दृश्यांमधून रामलल्लाच्या मूर्तीचे दर्शन चित्रपट रसिक - भक्तांना घडणार आहे. चांदण्याच्या तेजाने झळाळणारी मूर्ती, भक्तांच्या हृदयात विश्वास जागवणारे रामलल्लाचे मोहक हास्य आणि त्यांचे करुणामय डोळे – हे सगळं प्रेक्षकांना त्यांच्या श्रद्धेच्या गाभाऱ्यात घेऊन जाणार आहे. रामलल्लाचे अनोखे दर्शन घडवणारा ‘मिशन अयोध्या’ हा भारतातला पहिला चित्रपट आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मंदिराची स्थापना झाल्यानंतर कोणत्याही चित्रपटाचे अयोध्येत चित्रीकरण झाले नाही. ही संधी दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे आणि निर्माते कृष्णा दादाराव शिंदे, सौ. योगिता कृष्णा शिंदे यांच्या 'आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.' निर्मित ‘मिशन अयोध्या’ या चित्रपटाद्वारे उपलब्ध झाली आहे. नव्या वर्षात २३ जानेवारी २०२५ रोजी राममंदिर स्थापनेच्या प्रथम वर्षपूर्तीचे औचित्य साधून ‘मिशन अयोध्या’ महाराष्ट्रातील चित्रपटगृहांतून प्रदर्शित होणार आहे.    दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे हे ‘मिशन अयोध्या’च्या अयोध्येतील चित्...

जिओ स्टुडिओज प्रस्तुत आगामी मराठी संगीतमय चित्रपट 'संगीत मानापमान' चा भव्य म्युझिक लाँच सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न.

इमेज
 मुंबईत, जिओ स्टुडिओज प्रस्तुत आगामी मॅग्नम ऑपस संगीतमय चित्रपट "संगीत मानापमान" चा ग्रँड म्यूझिक लाँच सोहळा पार पडला. १० जानेवारी २०२५ ला "संगीत मानापमान" हा सिनेमा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा म्हणजे कला, संस्कृती आणि संगीताचा एक उत्सव.     खाडिलकरांच्या ११३ वर्ष जुन्या अभिजात नाटकावरून प्रेरित, "संगीत मानापमान" हा सिनेमा कट्यार काळजात घुसली तसेच आणि…डॉ. काशिनाथ घाणेकर यांसारख्या प्रतिष्ठित चित्रपटांचा समृद्ध वारसा पुढे नेत आहे. नयनरम्य दृश्य, अस्सल संगीतमय कथाकथन आणि एका पेक्षा एक कलाकार आश्वासन देतायत की हा सिनेमा नक्कीच एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.      दिग्गज संगीतकार शंकर-एहसान-लॉय ह्यांनी या चित्रपटासाठी मंत्रमुग्ध करणारी एकूण १४ गाणी कंपोज केली आहेत, ह्या गाण्यांना १८ नामवंत गायकांनी जसे शंकर महादेवन, सोनू निगम, राहुल देशपांडे, महेश काळे, अवधूत गुप्ते, बेला शेंडे, प्रियांका बर्वे, आर्या आंबेकर, प्रतिभा सिंग बघेल, जसराज जोशी, आनंद भाटे, शौनक अभिषेकी, सावनी रवींद्र, हृषीकेश बडवे, अस्मिता चिंचाळकर, कृष्णा ...

या जीवनगौरव पुरस्काराचा आनंद वेगळाच - 'पुरुषोत्तम बेर्डे'.

इमेज
‘माझ्या कारकिर्दीच्या सुवर्णमहोत्सवी टप्प्यावर हा पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे.’ कार्यरत असताना मिळालेला हा जीवनगौरव अजून चांगले काम करायला बळ देणारा असल्याचं प्रतिपादन लेखक-दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी विठ्ठल उमप फाऊंडेशनच्या प्रतिष्ठेच्या ‘मृद‌्‌गंध पुरस्कार’ वितरण प्रसंगी केले. ‘खंडोबाचं लगीन’ या नाटकादरम्यान लोकशाहीर विठ्ठल उमप यांची ओळख झाली आणि आज त्या नाटकातील काही मंडळीच्या साक्षीने हा पुरस्कार मिळतोय हा वेगळा आनंद सुद्धा आहे. अतिशय  दृष्ट लागण्यासारखा हा सोहळा आयोजित केल्याबद्दल नंदेश उमप आणि सरिता उमप यांचे मनापासून कौतुक करत पुरुषोत्तम बेर्डे यांनी या पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.      आपली लोकसंगीताच्या अनुभवाची शिदोरी वेगवेगळ्या कार्यक्रमांतून सादर करत महाराष्ट्र शिरोमणी शाहीर विठ्ठल उमप यांनी लोककलेची परंपरा जपत समाजप्रबोधनासह जनजागृतीचा प्रयत्न सातत्याने केला. आपले अवघे आयुष्य लोककलेसाठी समर्पित करणाऱ्या संगीत नाटक अकादमी राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ...

विशाखा कशाळकर संपादित 'एकांकिका' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा...

इमेज
    नाटक ही सांघिक कला आहे. नाटक करायचे तर टीमची गरज लागते. उपजत लेखनकला एकलव्याप्रमाणे विकसित करणाऱ्या विद्यार्थिदशेतील लेखकांना त्यांच्याजवळील उपलब्ध संस्थेत, कॉलेजात बऱ्याचदा प्लॅटफॉर्म मिळत नाहीत. एकांकिका करणारी टीम अशा एकांड्या लेखन शिलेदारांना हेरणारच नसेल तर हे स्वयंभू एकांकिका लेखक स्वतःला पारखणार तरी कसे? हे झाले महाविद्यालयीन लेखकांचे. जुन्याजाणत्या एकांकिका लेखकांना भेडसावणारी समस्याही वेगळी नाही. एकांकिका लिहायची तर कुणासाठी ? सोबत टीम नाही... टीमशिवाय कुठेही सादर करू शकत नाही. मग अशा स्थितीत ही एकांडी लेखनकला तगणार कशी? लिहिण्याची प्रेरणा टिकून कशी राहाणार? या साऱ्या विचाराने, "विशाखा कशाळकर प्रतिष्ठान"च्या पुढाकाराने अभिनेत्री विशाखा कशाळकर यांनी कोणताही सुप्त व्यावसायिक हेतू न ठेवता निःस्पृह, पारदर्शी विचाराने 'लेखकांसाठी खुला एकांकिका वाचन मंच' स्पर्धा या उपक्रमाची निर्मिती केली. या उपक्रमाच्या आगळ्या वेगळ्या रूपरेषेबद्दल थोडक्यात सांगायचे तर .. या स्पर्धेत सहभागी झालेल्या एकांकिकांमधून 3 एकांकिका वाचनासाठी निवडल्या जात. प्रत्येक एकांकिका वाचनासाठी 40...

'श्री गणेशा' चित्रपटातील 'मधुबाला...' प्रेक्षकांच्या भेटीला.

इमेज
   सध्या मराठी सिनेसृष्टीमध्ये 'श्री गणेशा' या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. मराठीतील आगळा वेगळा रोड मूव्ही असलेल्या या चित्रपटाच्या मोशन पोस्टरने सुरुवातीलाच लक्ष वेधल्यानंतर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या टिझरने उत्सुकता वाढवली. आता या चित्रपटातील नवे कोरे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. फॅमिली एन्टरटेनर रोड मूव्ही असलेल्या 'श्री गणेशा'मधील 'आली मधुबाला...' हे गाणे संगीतप्रेमींचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी सादर करण्यात आले आहे. या गाण्याला नेटकऱ्यांची पसंती मिळत असल्याने अल्पावधीतच या गाण्याने हजारो व्ह्यूज मिळवले आहेत. हा चित्रपट २० डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. एमएच-१२ सिने मीडियाने आऊट ऑफ द बॅाक्स फिल्म्सच्या सहयोगाने प्रस्तुत केलेल्या 'श्री गणेशा' चित्रपटाची निर्मिती संजय माणिक भोसले आणि कांचन संजय भोसले यांनी केली आहे. आजवर नेहमीच संगीतप्रधान मनोरंजक चित्रपट बनवणाऱ्या मिलिंद कवडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. रवि माणिक भोसले आणि महेश माणिक भोसले या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. 'श्री गणेशा'च्या रूप...

'कौन बनेगा करोडपती' 16 या गेम शोमध्ये या आठवड्यात होस्ट अमिताभ बच्चन समोर असतील दिल्लीचे प्रेमस्वरूप सिंह नेगी.

इमेज
KBC16 मध्ये अमिताभ बच्चन यांनी आपल्याला टेनिस स्टार नोवाक जोकोविच आवडत असल्याचे सांगून न्यूयॉर्कमध्ये त्याच्याशी झालेल्या भेटीचा गंमतीदार किस्सा सांगितला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती 16 या गेम शोमध्ये या आठवड्यात होस्ट अमिताभ बच्चन समोर असतील दिल्लीचे प्रेमस्वरूप सिंह नेगी. प्रेमस्वरूप हे SSB चे निवृत्त जनरल अधिकारी असून KBC मध्ये येण्याचे त्यांचे पूर्वीपासूनचे स्वप्न होते. प्रेमस्वरूप स्वतः टेनिसपटू असून टेनिस त्यांचा आवडता खेळ आहे. श्री. बच्चन यांच्याशी बोलताना त्यांनी आपले टेनिस-प्रेम व्यक्त करत हे देखील सांगितले की त्यांना एकदा टेनिस टूर्नामेंटमध्ये प्रेक्षक म्हणून जाण्याची संधी मिळाली होती. त्यावर हसून श्री. अमिताभ बच्चन म्हणाले, “मला नोवाक जोकोविच फार आवडतो. त्याचा खेळ अप्रतिम आहे आणि तो इतर खेळाडूंची नक्कलही छान करतो.” संभाषणाच्या ओघात, श्री. बच्चन यांनी आपल्या न्यूयॉर्क दौऱ्याचा एक गंमतीदार पण अविस्मरणीय किस्सा सांगितला. ते न्यूयॉर्कला टेनिस टूर्नामेंट बघायला गेले होते. ते म्हणाले, “मी तिकडे काही भारतीयांसमवेत बसलो होतो. त्या लोकांनी मला ओळखले...

मोहन जोशी यांना 'रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार' प्रदान.

इमेज
    मराठी नाट्य कलाकार संघातर्फे ज्येष्ठ रंगकर्मी मोहन जोशी यांना यंदाचा 'रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार' एका शानदार सोहळ्यात प्रदान करत त्यांचा सन्मान करण्यात आला. मराठी नाट्य कलाकार संघातर्फे 'जागतिक रंगकर्मी दिवस' या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात मोहन जोशी यांना उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गौरविण्यात आले.       यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात सन्मानमूर्ती मोहन जोशी यांची प्रकट मुलाखत रंगकर्मी विघ्नेश जोशी यांनी घेतली. ज्ञानेश पेंढारकर यांचा सांगीतिक कार्यक्रमही यावेळी सादर झाला. या सोहळ्याला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, प्रमुख कार्यवाह अजित भुरे; तसेच मराठी नाट्य कलाकार संघाचे अध्यक्ष सुशांत शेलार यांच्यासह प्रमुख कार्यवाह विजय सूर्यवंशी, सहकार्यवाह शिवाजी शिंदे, कलाकार संघाचे माजी अध्यक्ष प्रदीप कबरे आदी मान्यवर उपस्थित होते. नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून २५ नोव्हेंबर हा दिवस गेली १० वर्षे मराठी नाट्य कलाकार संघातर्फे 'जागतिक रंगकर्मी दि...

सुजय डहाकेच्या 'तुझ्या आयला'चे पोस्टर इफ्फीमध्ये लाँच...

इमेज
मराठी सिनेमाच्या कक्षा सातत्याने रुंदावत आहेत आणि सुजय एस. डहाकेचा नवीन चित्रपट 'तुझ्या आयला' त्याला अपवाद नाही. 'शाळा', 'फुंतरू' आणि 'श्यामची आई' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याच्या धाडसी कथाकथनासाठी ओळखला जाणाऱ्या सुजयने शाब्दिक शिवीगाळ आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम या सशक्त विषयासह पुन्हा एकदा एक धाडसी झेप घेतली आहे. गोव्यातील प्रतिष्ठित अशा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (इफ्फी) मध्ये 'तुझ्या आयला'च्या बहुप्रतिक्षित पोस्टरचे नुकतेच अनावरण करण्यात आले, ज्यामुळे या चित्रपटाबाबतची उत्सुकता आणि उत्साह अधिक वाढला आहे. सुनील जैन, प्रकाश फिल्म्स, प्रशांत बेहेरा आणि वन स्टॉप मीडिया प्रस्तुत 'तुझ्या आयला'ची निर्मिती पुणे फिल्म कंपनी आणि कल्ट डिजिटलच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. सुनील जैन, आदित्य जोशी, सुजय डहाके, अश्विनी परांजपे या चित्रपटाचे निर्माते असून मेघना प्रामाणिक, देबाशीष प्रामाणिक, राजेश सिंग आणि अंकित चंदिरामाणी सहनिर्माते आहेत. 'शिवी नाय खेळाचं नाव हाय ते', ही टॅगलाइन चित्रपटाच्या मध्यवर्ती कल्पनेचे भाषा...

महायुतीच्या महाविजयात 'धर्मवीर २'चा मोलाचा वाटा...

इमेज
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  महाविजय मिळवला आहे. या महाविजयात "धर्मवीर २" या चित्रपटानं मोलाची भूमिका बजावली आहे असे नक्कीच सांगता येईल.    "धर्मवीर २" या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई यांनी केली होती. प्रवीण तरडे यांनी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले होते. प्रसाद ओक, क्षितीश दाते, मंगेश देसाई, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, आनंद इंगळे, अभिजित थिटे, समीर धर्माधिकारी, स्नेहल तरडे आदींनी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये चित्रपट देशभरात प्रदर्शित करण्यात आला होता. त्याचप्रमाणे ओटीटीवरही ह्या चित्रपटाला कमालीचा प्रतिसाद मिळाला असून आजही चित्रपट चांगलाच चर्चेत आहे.         "धर्मवीर २" या चित्रपटातून साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट उलगडण्यात आली होती. स्वर्गीय आनंद दिघे यांनी राजकारण आणि समाजकारणाचा सुंदर मेळ घातला होता. २०१९मध्ये भारतीय जनता पक्षासह युती तोडून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह सत्तास्थापन करण्यात आली. त्यामुळ...

शंकर महादेवन, महेश काळे आणि राहुल देशपांडे या संगीतातील तीन उस्तादांच "वंदन हो" हे संगीत 'मानापमान' चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला.

इमेज
   . संगीत नाटके हा मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ मानला जातो आणि हीच परंपरा जपत, संगीत मानापमान या अजरामर नाटकावरून प्रेरीत लवकरच प्रदर्शित होणाऱ्या "संगीत मानापमान" या सिनेमाच्या माध्यमातून मराठी प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव पडद्यावर पहायला मिळणार आहे. नुकताच या सिनेमाचा एक अप्रतिम टिझर रोहित शेट्टीच्या "सिंघम अगेन" या सिनेमासोबत रिलीज झाला होता ज्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. 'संगीत मानापमान' ह्या चित्रपटावरूनच यात संगीताची मजेशीर मेजवानी असल्याचं लक्षात येत. आणि याचीच सुरवात आज चित्रपटाच्या पहिल्या "वंदन हो गाण्याने झाली.       कट्यार काळजात घुसली नंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांना संगीत विश्वातील दिग्गज संगीतकार शंकर महादेवन, गायक महेश काळे आणि राहुल देशपांडे यांचा आवाजातील तिहेरी संगम अनुभवायला मिळणार आहे. या आधीही ही सुप्रसिद्ध तिकडी एकत्र येऊन गायली होती परंतु चित्रपटातील गाण्यासाठी एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ आहे.  हल्लीच चित्रपटातील पहिल्या गाण्यासाठी शंकर महादेवन, महेश काळे आणि राहुल देशपांडे यांनी मुंबईतील एका स्टुडिओत वंदन हो हे ...

‘जिलबी’१७ जानेवारीला भेटीला.

इमेज
गरम गरम ‘जिलबी’ ची गोड चव काही औरच असते. अशीच एक लज्जतदार ‘जिलबी’ आपल्या भेटीला येणार आहे, पण… मराठी चित्रपटरूपाने. आनंद पंडित मोशन पिक्चर्स निर्मित ही खुमासदार ‘जिलबी’ १७ जानेवारीला आपल्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. अभिनेता प्रसाद ओक, स्वप्निल जोशी, शिवानी सुर्वे या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. या तिघांच्या जोडीला पर्ण पेठे, गणेश यादव, प्रणव रावराणे, अश्विनी चावरे, प्रियांका भट्टाचार्य  या  कलाकारांनी आपल्या अभिनयाने मनोरंजनाच्या या ‘जिलबी’चा खुसखुशीतपणा वाढवला आहे. या चित्रपटाचे आकर्षक असे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.  पोस्टरमधील कलाकारांचे लूक लक्ष वेधून घेणारे आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कांबळे यांचे आहे.  आनंद पंडित मोशन पिक्चर्स यांनी कायमच वैविध्यपूर्ण चित्रपटांची निर्मिती केली आहे. ‘जिलबी’ च्या निमित्ताने रसिक प्रेक्षकांचा आनंद द्विगुणीत करायला अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेन्ट प्रा.लिमिटेड यांच्या सहयोगाने मनोरंजनाची भन्नाट मेजवानी त्यांनी आणली आहे.  एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट, उत्कृष्ट कलाकार यांन...

प्रत्येक महिलेच्या मनाचा आरसा दाखवणारी 'पिंगा गं पोरी पिंगा'.

इमेज
    रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट असतं मैत्रीचं नातं. याच मैत्रीच्या नात्यावर आधारित आजवर अनेक कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. अशातच आता महाराष्ट्राच्या लाडक्या 'कलर्स मराठी'वर पाच भिन्न स्वभावाच्या मैत्रीणींची भन्नाट गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.'पिंगा ग पोरी पिंगा' या नव्या मालिकेत पाच मैत्रीणींची, त्यांच्या स्वप्नांची अनोखी दुनिया प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ऐश्वर्या शेटे, विदिशा म्हसकर, शाश्वती पिंपळीकर, प्राजक्ता परब आणि आकांक्षा गाडे या अभिनेत्री मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. वैभव चिंचाळकर या मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. तेव्हा नक्की बघा प्रत्येक महिलेच्या मनाचा आरसा दाखवणारी नवी गोष्ट 'पिंगा गं पोरी पिंगा', 25 नोव्हेंबरपासून संध्याकाळी 7.30 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @officialjiocinema वर. 'पिंगा गं पोरी पिंगा' या मालिकेची गोष्ट आहे महाराष्ट्रातल्या त्या सगळ्या महिलांची ज्यांच्या मनात भविष्याची स्वप्न आहेत. स्वत: काहीतरी करुन दाखवायची जिद्द आहे आणि त्यासाठी घरापासून दूर बाहेरच्या ज...

हास्य-विनोदाचा कल्ला करत आला 'श्री गणेशा'चा टिझर.

इमेज
मराठी चित्रपटसृष्टीत कायम विविध विषयांवर चित्रपट बनतात. या तुलनेत रोड मूव्हींची संख्या फार कमी आहे. त्यामुळेच अशा धाटणीचा एखादा चित्रपट आला की प्रेक्षकांच्या नजरा लगेच त्याकडे वळतात. याच कारणामुळे 'श्री गणेशा' हा नातेसंबंधांतील धम्माल गंमती-जंमतीवर आधारलेला मराठी फॅमिली एन्टरटेनर रोड मूव्ही घोषणा झाल्यापासून चर्चेत आहे. या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अल्पावधीतच प्रेक्षकांनी 'श्री गणेशा'च्या टिझरला लाईक करत त्यावर कमेंट्सही केल्या आहेत. थोडक्यात काय तर हास्य-विनोदाचा कल्ला करणारा 'श्री गणेशा'चा टिझर प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. हा चित्रपट २० डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 'श्री गणेशा' धमाल रोड ट्रीपचा आणि 'श्री गणेशा' फॅमिली एंटरटेनमेंटचा' असे म्हणत एमएच-१२ सिने मीडियाने आऊट ऑफ द बॅाक्स फिल्म्सच्या सहयोगाने प्रस्तुत केलेला 'श्री गणेशा' चित्रपटाचा टिझर रिलीज केला आहे. या चित्रपटाची निर्मिती संजय माणिक भोसले आणि कांचन संजय भोसले यांनी केली असून, लाफ्टर आणि मॅडनेसचा डबल धमाका असल...

"जिप्सी'साठी शशि चंद्रकांत खंदारेना 'इफ्फी'चे नामांकन.

इमेज
गोव्यात होत असलेल्या यंदाच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये (इफ्फी) यंदापासून पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी सात चित्रपट स्पर्धेत असून पुरस्काराच्या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय चित्रपटांना शशि चंद्रकांत खंदारे यांनी दिग्दर्शित केलेला 'जिप्सी' हा चित्रपटही टक्कर देणार आहे. .  'इफ्फी' हा केंद्र सरकारचा अधिकृत चित्रपट महोत्सव आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही या महोत्सवाला विशेष प्रतिष्ठा आहे. यंदा या महोत्सवाचे ५५वे वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर, यंदापासून महोत्सवात पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यासाठी नामांकने जाहीर करण्यात आली आहेत. त्यात पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय दिग्दर्शकांचे चित्रपटांचा समावेश आहे. या विभागातील विजेत्याला मानाचा रौप्य मयूर, १० लाख रुपये रोख आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे.भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या अध्यक्षतेखाली सिंगापुरचे दिग्दर्शक आणि पटकथाकार अँथनी चेन, अमेरिकन-ब्रिट...

'निर्मिती संवाद' कार्यशाळेचे यशस्वी आयोजन.

इमेज
‘कथा हा चित्रपटाचा आधारस्तंभ असतो. तो भक्कम हवा. फक्त पैसे आहेत, म्हणून निर्माते होऊ नका. चित्रपट माध्यमाचा आणि व्यवसायाचा अभ्यास करा." असा सल्ला ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते सचिन पिळगांवकर यांनी राज्यभरातील चित्रपट निर्मात्यांना दिला. 'मेघराज राजेभोसले फाऊंडेशन' आयोजित मराठी चित्रपट निर्मात्यांसाठीच्या 'निर्मिती संवाद' या एकदिवसीय कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. .  पुण्यातील सूर्यदत्त इन्स्टिट्यूटच्या संकुलात नुकतेच पार पडलेल्या या कार्यशाळेत राज्याच्या विविध भागांतून आलेल्या ४०० हून अधिक चित्रपट निर्मात्यांचा यात सहभाग होता. चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातील नामवंत निर्माते, दिग्दर्शक, लेखक, कॅमेरामन, संकलक, वितरक, थिएटर मालक, वाहिन्यांचे कार्यकारी अधिकारी, ओटीटी तज्ञ अशा अनेक विषयतज्ञांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.     सचिन पिळगांवकर पुढे म्हणाले, ‘सिनेमा फ्लाॅप होत नाही, तुमचे बजेट फ्लाॅप झालेले असते. बजेटवर नियंत्रण ठेवायला शिकून घ्या. शासनानेही निर्मात्यांना आर्थिक साह्य देण्याबरोबर इतरही बाबींसाठी मदत कर...

मुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखवायला येणार ‘गुलकंद’ १ मे २०२५ रोजी होणार प्रदर्शित .

इमेज
एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, वेलक्लाऊड प्रॅाडक्शन्स निर्मित ‘गुलकंद’ हा मुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखवणारा चित्रपट नवीन वर्षात १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची सोशल माडियाद्वारे घोषणा करण्यात आली आहे. सचिन मोटे लिखित, सचिन गोस्वामी दिग्दर्शित या चित्रपटात फॅमिली एंटरटेनमेंट आणि कॅामेडीचे अनोखे कॅाम्बिनेशन पाहायला मिळणार आहे. यात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, शार्विल आगटे अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे. ‘गुलकंद’चे सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया निर्माते आहेत.   चित्रपटाचे नाव, भन्नाट टीम यामुळे प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.      चित्रपटाबद्दल दिग्दर्शक, निर्माते सचिन गोस्वामी म्हणतात, ‘’या सगळ्यांसोबत मी आधी काम केलं असल्याने आमच्यात एक बॅाण्डिंग आहे आणि आमची हिच केमिस्ट्री यातही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट एक फॅमिली एंटरटेनर असून प्रेक्षकांना या मुरलेल्या गुलकंदाची चव चाखायला नक्कीच आवडेल. ही एक अशी ...

ॲक्शनपॅक्ड 'राजवीर' चित्रपटात सुहास खामकरची प्रमुख भूमिका....

इमेज
पोलिस अधिकाऱ्यानं एखादं ध्येय निश्चित केलं असेल, तर ते पूर्ण करण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो.  अशाच एका ध्येयानं प्रेरित असलेल्या पोलिस अधिकाऱ्याची रंजक गोष्ट 'राजवीर' या चित्रपटातून उलगडणार आहे. अॅक्शनपॅक्ड या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे.      अर्थ स्टुडिओ यांनी सारा मोशन पिक्चर्स आणि रुचिका तोलानी प्रॉडक्शन्स,  समृद्धी मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने राजवीर चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. साकार प्रकाश राऊत, ध्वनि साकार राऊत, गौरव परदासनी, सूर्यकांत बाजी चित्रपटाचे निर्माते, तर रुचिका तोलानी सूचक सहनिर्मात्या आहेत. साकार राऊत, स्वप्नील देशमुख यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवादलेखन साकार राऊत, जेकॉब आणि पॉल कुरियन, माज खान यांनी केलं आहे. भूषण वेदपाठक यांनी छायांकन, अभिनंदन गायकवाड, होपून सैकिया यांनी संगीत दिग्दर्शन, साकार राऊत, कश्यप कुलकर्णी यांनी संकलन केलं आहे. चित्रपटात सुहास खामकरसह झाकीर हुसैन, गौरव परदासनी, प्राशी अवस्थी, धीरज सानप यांच्...

'आर्यन्स नवदुर्गा सन्मान पुरस्कार' आणि 'आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२४' नामांकन सोहळा.

इमेज
राज्य सरकारनंतर रोख पुरस्कार देणारा दुसरा पुरस्कार सोहळा असा मनोरंजन विश्वात नावलौकीक मिळवलेल्या 'आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२४' पुरस्कार सोहळ्याची नामांकने लवकरच घोषित होणार आहेत. याच सोहळ्यात 'आर्यन्स नवदुर्गा सन्मान पुरस्कार' वितरीत करण्यात येणार आहेत. 'मराठी कलांचा, गुणांचा प्रतिभा प्रशंसा सोहळा...' अशी बिरुदावली मिरवणारा 'आर्यन्स सन्मान' पुरस्कार सोहळा घोषणेपासूनच मनोरंजन विश्वात चर्चेचा विषय ठरला होता. बुधवार २७ नोव्हेंबर रोजी या पुरस्कार सोहळ्याची नामांकने घोषित केली जाणार आहेत. दुसऱ्या वर्षात पदार्पण केलेला 'आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२४' नामांकन सोहळा यंदा बुधवार २७ नोव्हेंबर रोजी केशव बाग, डी. पी. रोड, कर्वे नगर, पुणे येथे सायंकाळी ६.३० वाजता भव्य-दिव्य स्वरूपात पार पडणार आहे. 'आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२४' पुरस्कार सोहळ्यामध्ये एकूण २३ विभागांमध्ये मराठी चित्रपटांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. नाट्य विभागात १६ पुरस्कार दिले जाणार आहेत. पुरस्कारांची एकूण रक्कम १३ लाख रुपये असून ही रक्कम ओमा फाऊंडेशन कडून व...

'मतदान करा', नाटकावर ५० टक्के सूट मिळवा,‘पाहिले न मी तुला' नाटकाची खास ऑफर....२० नोव्हेंबरला रंगणार रौप्य महोत्सवी प्रयोग

इमेज
कमी कालावधीत ‘सुमुख चित्र’ आणि ‘अनामिका’ प्रस्तुत ‘पाहिले न मी तुला' या नाटकाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले असून उत्तम कथानक, दिग्दर्शन, कलाकारांचा अभिनय व उच्च तांत्रिक मूल्यांमुळे रसिक प्रेक्षकांना या नाटकाने मोहिनी घातली आहे. मतदानाचा दिवस आणि नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग असा योग जुळून आल्याने रौप्य महोत्सवी प्रयोगाच्या निमित्ताने नाट्यरसिकांसाठी एक जबरदस्त ऑफर ‘पाहिले न मी तुला' या नाटकाने आणली आहे. या नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग येत्या २० नोव्हेंबर रोजी शिवाजी मंदिर, दादर दुपारी ४.०० वा. रंगणार आहे. .   मतदान केल्याची खूण तिकीट बारीवर दाखवा आणि तिकिटावर ५०% सवलत मिळवा. तुमचंच वाटेल असं आपलं नाटक असं म्हणत नाटकातील कलाकारांनी मतदानाच्या हक्कासोबत मनोरंजनाचा हक्क ही एन्जॉय करण्याची विनंती केली आहे. ही सवलत फक्त तिकीट बारीवर उपलब्ध असणार आहे. ऑनलाइन नसणार आहे.       लेखक-दिग्दर्शक सुनिल हरिश्चंद्र यांनी नात्याच्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टीचा धमाल वेध ‘पाहिले न मी तुला' या नाटकातून घेतला आहे. रौप्य महोत्सवी नाटकाचा प्रयोग सादर करणे, ह...

सुबोध भावे - तेजश्री प्रधानची केमिस्ट्री जुळणार? ‘हॅशटॅग तदेव लग्नम’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला.

इमेज
शुभम फिल्म प्रोडक्शनच्या ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ या आगामी सिनेमाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. २० डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या सिनेमात पहिल्यांदाच सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांची जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे. नुकत्याच झळकलेल्या या जबरदस्त टीझरमधून लग्न या विषयावर आधुनिक पिढीचा वेगळा दृष्टीकोन पाहायला मिळत आहे.         सिनेमाच्या टीझरमध्ये घरच्यांच्या सांगण्यानुसार दोन मध्यमवयीन 'तरुण तरुणी' लग्नासाठी 'पाहाण्याच्या कार्यक्रमा'निमित्ताने भेटत आहेत. यावेळी ते एकमेकांच्या वयाचा अंदाज बांधताना दिसत आहेत. टीझरमधील संवाद मजेशीर असून प्रेक्षकांच्या मनात घर करणार आहेत. सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांची केमिस्ट्री या टीझरमध्ये खुलून दिसत आहे. त्यामुळे आता थोडीशी लेट पण एकदम थेट सुरू झालेली ही सफर पाहायला मजा येणार आहे. यात सुबोध भावे, तेजश्री प्रधान यांच्यासह प्रदीप वेलणकर, मानसी मागिकर, संजय खापरे, शर्मिष्ठा राऊत यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. चि...

अनपेक्षित प्रवासाची कथा उलगडणाऱ्या ‘जर्नी’ चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित.

इमेज
एका अनोख्या लढाईची कथा सांगणाऱ्या ‘जर्नी’ या चित्रपटाचा रहस्यमय ट्रेलर प्रदर्शित झाला असून, या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढवली आहे. सचिन जीवनराव दाभाडे यांची निर्मिती व दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात एक गूढ कथा अनुभवायला मिळणार आहे. ‘सचिन दाभाडे फिल्म्स’च्या बॅनर अंतर्गत या चित्रपटात शंतनु मोघे, शर्वरी जेमेनिस, शुभम मोरे, अंजली उजवणे, योगेश सोमण, ओमकार गोवर्धन, सुनील गोडबोले, मिलिंद दास्ताने, माही बुटाला, आणि निखिल राठोड हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.     चित्रपटाची कथा स्वतः सचिन दाभाडे यांनी लिहिली असून, संवाद आणि पटकथेचे लेखन रवींद्र मठाधिकारी यांनी केले आहे. चित्रपटाचे सहनिर्माते भास्कर देवेंग्रेकर, तानाजी माने, संतोष राठोड आणि अनिकेत अरविंद बुटाला आहेत. .  ट्रेलरमध्ये एक लहान मुलगा अचानक बेपत्ता होतो, ज्यामुळे त्याचे पालक चिंतेत पडतात आणि त्याला शोधण्यासाठी अथक प्रयत्न करतात. हा मुलगा कुठे आहे? त्याला कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते? आणि त्याचा प्रवास काय वळण घेईल? या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना २९ नोव्हेंबरला चित्र...

चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे.. 'मनोमंच' ते 'रंगमंच'..

इमेज
मराठी नाटक समूह या व्हॅट्सऍप समूहाच्या माध्यमातून आजवर प्रायोगिक नाट्य महोत्सव, नाट्यलेखन स्पर्धा, कोविड काळात पडद्यामागील कलावंतांना आर्थिक सहाय्य, पत्रलेखन स्पर्धां, विक्रमादित्य प्रशांत दामले गौरव सोहळा ह्यासाखे अनेक उपक्रम राबविण्यात आलेले आहेत.  चंद्रकांत कुलकर्णी या नामवंत दिग्दर्शकाच्या 'चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे' या त्यांच्या नाट्यप्रवासाच्या पुस्तकाची विक्रमी वेळेत द्वितीय आवृती प्रकाशित होत आहे. रंगभूमीवरच्या या गुणी आणि अभ्यासू दिग्दर्शकाच्या पुस्तकाच्या या दुसऱ्या आवृत्तीच्या निमिताने काही करावं ह्या उद्देशाने मराठी नाटक समूह पुढे सरसावला आणि त्याला जिगिषा आणि अष्टविनायक या संस्थांच्या निर्मात्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीच्या प्रकाशनच्या निमित्ताने चंदू सरांच्या कारकिर्दीतील काही महत्त्वाच्या नाटकांमधील सादरीकरणे आणि पुस्तकातील काही भागाचे अभिवाचन या दृष्टिने विचार करण्यात आला आणि सदर सोहळ्याची आखणी करण्यात आलेली आहे.      या सोहळ्यासाठी खास वंदना गुप्ते, नीना कुलकर्णी, रोहिणी हट्टंगडी, अखिल भारतीय मराठी ना...

'हजारवेळा शोले पाहिलेला माणूस' ठरला प्रतिष्ठेच्या 'इफ्फी'चा मानकरी...गाला प्रीमियर आणि रेड कार्पेटचा सन्मान.

इमेज
गोव्यातील पणजी येथे होणाऱ्या ५५व्या 'इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया' अर्थात 'इफ्फी'मध्ये झळकण्याचा मान बहुचर्चित 'हजारवेळा शोले पाहिलेला माणूस' या चित्रपटाला मिळाला आहे. महोत्सवात चित्रपटाला गाला प्रीमियर आणि रेड कार्पेटचा सन्मान जाहीर झाला असून २४ नोव्हेंबरला हा सोहळा रंगणार आहे.    राजेश डेम्पो, भक्ती डेम्पो, सगूण वाघ, श्रीदेवी शेट्टी वाघ यांनी 'हजारवेळा शोले पाहिलेला माणूस' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. शोले मीडिया अँड एंटरटेन्मेंट, कुबेरन्स टेक व्हेंचर्स चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर जीत वाघ असोसिएट प्रोड्यूसर आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन हृषिकेश गुप्ते यांनी केलं आहे. अमोल गोळे यांनी छायांकन, रोहन रोहन यांनी संगीत, विनोद पाठक यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. 'हजारवेळा शोले पाहिलेला माणूस' या चित्रपटाच्या नावातूनच शोले या गाजलेल्या चित्रपटाशी कथेचा काहीतरी संबंध आहे हे स्पष्ट होतं, पण चित्रपटाच्या नावामुळेच त्याच्या कथानकाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटात दिलीप प्रभावळवकर, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ ज...

'निर्धार' चित्रपटाच्या चित्रीकरणाला कोल्हापूरमध्ये सुरुवात...

इमेज
मराठी सिनेसृष्टीला सामाजिक चित्रपटांची फार मोठी परंपरा लाभली आहे. या चित्रपटांनी नेहमीच समाज प्रबोधनासोबत मनोरंजनाचंही काम केलं आहे. याच पठडीतील 'निर्धार' या आणखी एका महत्त्वपूर्ण चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. समाजातील एका महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य करणाऱ्या 'निर्धार' या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त नुकताच कोल्हापूरमध्ये करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ कलादिग्दर्शक सतीश बिडकर यांनी मुहूर्ताचा क्लॅप दिला. .   निर्मात्या पद्मजा वालावलकर या जयलक्ष्मी क्रिएशनच्या बॅनरखाली 'निर्धार' चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक दिलीप भोपळे असून, लेखन दिनानाथ वालावलकर यांनी केलं आहे. कोल्हापूर आणि आसपासच्या विविध ठिकाणी 'निर्धार'चं चित्रीकरण सध्या वेगात सुरू आहे. या चित्रपटाद्वारे भ्रष्ट समाजव्यवस्थेवर प्रहार करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यापासून सामान्य जनतेस भोगावे लागणारे दुःख, या विरोधात कोणीतरी रणशिंग फुंकण्याची गरज आहे. 'निर्धार' चित्रपटात हे काम तरुण पिढी करताना दिसणार आहे. भ्रष्टाचारा...

धमाल मनोरंजन करणारे नाटक 'बाप कुणाचा ताप कुणा...!' रंगभूमीवर...

इमेज
मराठी रंगभूमीवर सध्या धमाल मनोरंजन करत 'बाप कुणाचा ताप कुणा...!' हे नाटक सुसाट धावत आहे. अलीकडेच या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग झाला आणि येत्या विक-एन्डला हे नाटक मुलुंड आणि कल्याण येथील रसिकांना मनोरंजनाची मेजवानी देण्यास सज्ज झाले आहे.     नाटककार श्रीनिवास भणगे यांनी नाटक लिहिले आहे. नाटकाचे दिग्दर्शन कुमार सोहोनी यांनी केले आहे. कुमार सोहोनी यांचे दिग्दर्शक म्हणून हे १२० वे नाटक आहे.            विजय गोखले, संतोष पवार, धनश्री काडगावकर, प्रशांत निगडे, वरदा साळुंके, श्रुती पुराणिक व दुर्गेश आकेरकर हे आघाडीचे कलावंत या नाटकात भूमिका साकारत आहेत.      'बाप कुणाचा ताप कुणा...!' या नाटकाचे संगीत अशोक पत्की यांचे असून, नेपथ्य राजन भिसे यांनी केले आहे. कुमार सोहोनी यांची प्रकाशयोजना, पूर्णिमा ओक यांची वेशभूषा आणि किशोर पिंगळे यांची रंगभूषा या नाटकाला लाभली आहे.      निर्माते सचिन व्ही. यू. यांनी या नाटकाच्या निमित्ताने नाट्यनिर्मितीत पदार्पण केले आहे.  सी. टी. निर्मित व स्मित हरी प्रॉडक्शन्स प्रकाशित हे...

महाराष्ट्राचा महासिनेमा ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या महानायकाच्या गाथेचा भव्य ट्रेलर प्रदर्शित.

इमेज
संदीप रघुनाथ मोहिते-पाटील प्रस्तुत आणि उर्विता प्रोडक्शन निर्मित बहुचर्चित, महाराष्ट्राचा महासिनेमा ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या चित्रपटाचा भव्य ट्रेलर रसिकांच्या भेटीला आला आहे. नुकताच या चित्रपटाचा दिमाखदार ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याचा शुभारंभ चित्रपटातील 'राजं संभाजी' या गाण्याच्या नृत्याने झाला. मावळ्यांच्या या उत्स्फूर्त सादरीकरणाने एक चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. हा भव्य चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून, छत्रपती संभाजी महाराजांच्या अद्वितीय शौर्याचा आणि त्यागाचा सन्मान करणारा आहे. हा चित्रपट म्हणजे महाराष्ट्राचा महासिनेमा आहे.  .    चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांना भव्यदिव्य स्वरूपात मांडण्यात आले आहे. त्यांच्या शौर्यपूर्ण नेतृत्वाने हिंदवी स्वराज्याचे संरक्षण केले, तसेच धर्माच्या रक्षणासाठी दिलेल्या बलिदानाचे अत्यंत प्रभावी चित्रण करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराजांची ही शौर्यगाथा या चित्रपटात अनुभवयाला मिळणार आहे.   ...