६ जानेवारीपासून 'दहावी अ' प्रेक्षकांच्या भेटीला.
दहावीचं वर्ष सगळ्यात खास आणि लक्षात राहाणारं वर्ष असतं. पुढच्या शैक्षणिक भविष्याची पायाभरणी ठरणारे दहावीचे वर्ष मंतरलेल्या दिवसांची साठवण असते. अभ्यासाइतकीच विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील अविस्मरणीय गमती-जमतीचं चित्रण असणाऱ्या ‘मीडिया वन सोल्युशन्स’ प्रस्तुत, ‘इट्स मज्जा’ व ‘कोरी पाटी’ प्रॉडक्शनच्या "दहावी अ' ह्या नव्या -कोऱ्या सीरीजचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच साताऱ्यातील शाहू कलामंदिरमध्ये पार पडला. ‘इट्स मज्जा’चे शौरीन दत्ता, क्रिएटिव्ह हेड अंकिता लोखंडे, सीरिज दिग्दर्शक नितीन पवार व मुख्य कलाकारांच्या उपस्थितीत हा खास सोहळा पार पडला. 'आठवी अ' या सिरिजचा चाहता वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. . ''दहावी अ'’ चे निर्माते शौरीन दत्ता यांनी सांगितले की, "गेले वर्षभर आम्ही "पाऊस", "आठवी अ" मध्ये बिझी होतो. "आठवी अ" च्या २५ व्या भागानंतर पुढे काय याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली होती. तर त्याचे उत्तर आहे "दहावी अ" या नव्या सीरिजलासुद्धा प्रेक्षकांचे प्रेम लाभणार याची खात्री आहे....