'मि. 420' नाटक रंगभूमीवर येतंय...
रंगभूमीवर धमाल उडवण्यासाठी 'मि. 420' हे नवीन मराठी नाटक येत आहे. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग सोमवार, १७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता दादरच्या श्री शिवाजी मंदिरात होणार आहे. 'मि. 420' या नाटकाचे लेखन संतोष जगताप यांनी केले आहे. प्रदीप वेलोंडे हे या नाटकाचे दिग्दर्शक आहेत. डॉ. संदीप वंजारी, भूषण घाडी, प्रदीप वेलोंडे, निकिता सावंत, अक्षय पाटील, दक्षता जोईल हे कलावंत या नाटकात भूमिका साकारत आहेत.
'मि. 420' या नाटकात भूमिका करत असलेले कलाकार यापूर्वी मराठी मालिकांमध्ये चमकलेले आहेत. त्यामुळे त्यांना रंगभूमीवर पाहण्याची संधी या निमित्ताने प्रेक्षकांना मिळणार आहे. महेश देशमाने यांचे संगीत, राम सगरे यांचे नेपथ्य, साई शिर्सेकर यांची प्रकाशयोजना व दत्ता भाटकर यांची रंगभूषा या नाटकाला लाभली आहे. या नाटकाची निर्मिती 'श्री दत्त विजय प्रॉडक्शन' या नाट्यसंस्थेने केली आहे. डॉ. संदीप वंजारी व संजय कुमार हे या नाटकाचे निर्माते असून, अरविंद घोसाळकर हे या नाटकाचे सूत्रधार आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा