मैत्रीचं रंगतदार सेलिब्रेशन ‘चिकी चिकी बुबूम बुम’...

आपल्या मित्र मैत्रिणींसोबत घालवलेला प्रत्येक दिवस खरंच कमालीचे असतात. तेव्हाचे क्षण, केलेली गंमत, मित्र-मैत्रिणींसोबत केलेली भांडणं या गोष्टी राहून राहून आठवतात. विचार करा बऱ्याच वर्षानंतर शाळेतल्या त्या सर्व मित्र-मैत्रिणींसोबत तुम्हाला धम्माल, मज्जा, मस्ती करण्याची संधी मिळाली तर? रियुनियन ची अशीच संधी साधत सेलिब्रेशनसाठी जमलेल्या मित्रांची गोष्ट सांगणारा ‘चिकी चिकी बुबूम बुम’ हा धमाल  चित्रपट २८ फेब्रुवारीला चित्रपटगृहात  मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे.     पार्टीतली गंमत आणि धमाल हे सगळं अनुभवताना येणार काही गोष्टींचं वळण या  रियुनियनच्या  सेलिब्रेशन मध्ये सहभागी  झालेल्या मित्रांच्या आनंदाची रंगत वाढवणार की त्यांची पळता भुई थोडी  होणार? हे पाहणं  प्रेक्षकांसाठी रंजक असणार आहे.  स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, प्राजक्ता माळी, प्रसाद महादेव खांडेकर, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, सचिन गोस्वामी, ओंकार राऊत, प्रियदर्शनी इंदलकर, अभिजीत चव्हाण, निखिल रत्नपारखी, प्रभाकर मोरे, चेतना भट, निखिल बने, श्याम राजपूत, ऐश्वर्या बडदे, श्लोक खांडेकर, प्रमोद बनसोडे या कलाकारांची  फौज ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटात  हास्याचे फवारे उडवत रंगत आणणार आहेत. 
   ‘इकडे आड तिकडे विहीर’ ‘आगीतून फुफाट्यात’,‘धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय’, ‘बुडत्याचा पाय खोलात’, ‘दुष्काळात तेरावा महिना’ या म्हणींतून या बॅकबेंचर्सची  मजेशीर ओळख टीझर मधून  करून देण्यात आली आहे.  या चित्रपटाचा टीझर आणि ‘बुम बुम बुम’ टायटल  सॉंग सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. यासोबत 'मित्रा' आणि 'कारभारी' या  दोन्ही गाण्यांची मजा रसिकांना  घेता येणार आहे.   
    नारकर फिल्म्स अँड एंटरटेनमेंट निर्मित, आयडियाज द एंटरटेनमेंट कंपनी प्रस्तुत आणि स्वर्ण पट कथा आणि प्रजाकार प्रोडक्शन्स यांच्या सहयोगाने येणाऱ्या ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे. चित्रपटाचे निर्माते सुनील नारकर असून सहनिर्माते सेजल दिपक पेंटर आणि प्रसाद महादेव खांडेकर आहेत. चित्रपटाचे लेखन प्रथमेश शिवलकर, प्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे.प्रशांत मडपुवार, मंदार चोळकर यांनी लिहिलेल्या गाण्यांना रोहन प्रधान, रोहित राऊत, जुईली  जोगळेकर, कविता राम यांचा स्वरसाज आहे. रोहन-रोहन जोडीचे जबरदस्त संगीत चित्रपटाला लाभले आहे. राहुल ठोंबरे, सुजित कुमार यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे. छायांकन गणेश उतेकर तर संकलन  निलेश गावंड यांचे आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वैत मसूरकर दिग्दर्शित 'छबी' चित्रपट २५ एप्रिलला.....अभिनेता समीर धर्माधिकारी, अभिनेते मकरंद देशपांडे यांची मध्यवर्ती भूमिका

"अंकुश" चित्रपटातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले यांचे सिनेनिर्मितीत पदार्पण.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...