"पिंकी, पक्या आणि साहेब” – संपूर्ण कुटुंबासाठी हास्याचा धमाका, फक्त झी टॉकीजवर.

झी टॉकीज नेहमीच मराठी प्रेक्षकांसाठी काहीतरी हटके आणि मनोरंजक घेऊन येत असतात. यावेळी झी टॉकीज ओरिजिनल घेऊन येत आहे एक भन्नाट, हलकाफुलका आणि खळखळून हसवणारा कॉमेडी चित्रपट – “पिंकी, पक्या आणि साहेब”., येत्या रविवारी, १६ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, हा चित्रपट धमाल मस्ती, भन्नाट विनोद आणि संपूर्ण कुटुंबासाठी मनोरंजनाचा परिपूर्ण डोस आहे!
या चित्रपटात हेमल इंगळे, भाऊ कदम आणि सुमित पाटील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हेमल इंगळे हिचा लग्नानंतरचा हा पहिलाच चित्रपट असून, ती पहिल्यांदाच भाऊ कदमसोबत एका हटके आणि मजेशीर भूमिकेत झळकणार आहे.
   झी टॉकीजने आतापर्यंत आपल्या हजारी, गोल गोल गरागारा, अल्टुन पल्टुन, गस्त, पुनश्च हरिओम, बेनवाड आणि पोरी यांसारख्या चित्रपटांनी प्रेक्षकांचे घर बसल्या मनोरंजन केले आहे. आता या यादीत अजून एक धमाकेदार कॉमेडी चित्रपटाची भर पडणार आहे – “पिंकी, पक्या आणि साहेब”!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ‘समर्थ’च्या पोस्टरचे भव्य अनावरण.

नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते "भाटा" चित्रपटाचे पोस्टर लाँच.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...