शारदाश्रम विद्यामंदिर मराठी प्राथमिक शाळा दादर या संस्थेच्या विविध उपक्रमा सोबतच " शिवजयंती "निमित्ताने 'शिवप्रताप'नाटकातून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना...

    शारदाश्रम विद्या मंदिराचे मूळ उद्दिष्ट आहे आपली "माय मराठी मातृभाषा"  ही अबाधित राहावी मराठी शाळांचे भविष्य उज्वल व्हावे यासाठी विविध संस्कारक्षम उपक्रम, जयंती, पुण्यतिथीनिमित्त महापुरुषांच्या कर्तृत्वाची ओळख करुन देणे, विविध स्पर्धा  सारख्या उपक्रमातून आपला इतिहास चालत्या बोलत्या स्वरूपात आपल्या मुलांना कोणत्या प्रकारे दाखवण्याचं काम हे नाटक या माध्यमातून दाखवल्याच उदाहरणच ही आहे.
        या उपक्रमांची माहिती देण्या संदर्भातच १८ फेब्रुवारी २०२५ रोजी शारदाश्रम शाळेत पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत 
संस्थेचे पदाधिकारी श्री चंद्रकांत रसाळ सर , मुख्याध्यापिका दीप्ती इंदुलकर मॅडम , ज्येष्ठ शिक्षक कांचन खरात व राजेंद्र घाडगे , शिक्षक विकास धात्रक संतोष पाटील आणि त्याच सोबत 'शिवप्रताप' या नाटकात वीरमाता जिजाऊंची मुख्य भूमिका साकारणाऱ्या आरती राजाध्यक्ष आणि अभिनेत्री श्रुती परब -लाड उपस्थित होत्या.
   आता मराठी भाषेला "अभिजात मराठी"  चा दर्जा मिळाल्यामुळे मराठी शाळा टिकाव्यात जास्तीत जास्त मुलांनी आपली मातृभाषा मराठी भाषेकडे वळावे व पालकांनी मराठी शाळांना प्राधान्य द्यावे यासाठी शिक्षक तळमळीने आपले विचार मांडले.
     या नाटकासोबतच शाळेचे अनेक निरनिराळे उपक्रम होत असतात. सांस्कृतिक कार्यक्रमात दादरमध्ये ही शाळा नेहमी अग्रेसर असते. त्याचप्रमाणे या शाळेतून कीतीतरी मोठी व्यक्तिमत्व  इथे घडली,महान क्रिकेटपटू , क्रिकेटचा देव असणाऱ्या सचिन तेंडुलकरांसारखे व्यक्तिमत्व घडले आहे,अनेक विजय निकम , सुशांत शेलार असे अनेक अभिनेते कलाकार घडले आहेत आणि या शाळेला या सगळ्या माजी विद्यार्थ्यांचा सार्थ अभिमान आहे, असे ज्येष्ठ शिक्षिका कांचन खरात यांनी नमूद केले.
या शाळेत जास्तीत जास्त मराठी मुलांनी प्रवेश देऊन या शाळेचे भवितव्य उज्वल होण्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत असे शिक्षकांनी सांगितले.तसेच गुरुवारी २० फेब्रुवारी २०२५ रोजी  शिवाजी मंदिर येथे होणाऱा नाट्य प्रयोग हा खरोखरच पाहण्यासारखा सोहळा आहे आणि त्यात विशेष शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे ,या नाटकात तब्बल पंचेचाळीस भूमिका महिला साकारत असून या नाटकाबद्दल एक वेगळेच आकर्षण आणि विशेष कुतूहल शिक्षक आणि पालकांच्या मनात आहे.यासाठी प्रेक्षकांनी आवर्जून प्रतिसाद द्यावा असं आवाहन केलं.
        विनया एंटरटेनमेंट प्रस्तुत , प्रविण विनया विजय राणे निर्मित आणि दिग्दर्शित ऐतिहासिक " शिवप्रताप " या नाटकाचा गुरुवार दिनांक :  २० फेब्रुवारी २०२५  रोजी सकाळी ठिक ११ वाजता  श्री शिवाजी  नाटय मंदिर दादर येथे नाटय प्रयोगाचे आयोजन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वैत मसूरकर दिग्दर्शित 'छबी' चित्रपट २५ एप्रिलला.....अभिनेता समीर धर्माधिकारी, अभिनेते मकरंद देशपांडे यांची मध्यवर्ती भूमिका

"अंकुश" चित्रपटातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले यांचे सिनेनिर्मितीत पदार्पण.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...