‘एप्रिल मे ९९’ सलग ३० दिवस चित्रपटगृहांत...मापुस्कर ब्रदर्सच्या चित्रपटाने गाठला यशाचा टप्पा.....

   मापुस्कर ब्रदर्सच्या ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटाने सलग ३० दिवस पूर्ण करत महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. प्रेक्षकांनी भरभरून दिलेल्या प्रेमामुळे हा चित्रपट आजही सगळीकडे यशस्वीपणे झळकत आहे. चित्रपटातील कलाकार श्रेयस थोरात, मंथन काणेकर, आर्यन मेंगजी व साजिरी जोशी यांच्या दमदार अभिनयासह, ९० च्या दशकातली निरागस मैत्री, उन्हाळ्याची मजा आणि शाळकरी आठवणी ‘एप्रिल मे ९९’ मध्ये सुरेख पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत. रोहन-रोहन यांचे संगीत, जबरदस्त गाणी आणि साध्या तरीही प्रभावी कथानकामुळे चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला भिडला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर केवळ प्रेक्षकांनीच नाही तर चित्रपटसृष्टीतील कलाकार व समीक्षकांनीही या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले. 
    चित्रपटाबद्दल दिग्दर्शक रोहन मापुस्कर म्हणतात, “ हे माझे पहिलेच दिग्दर्शन असून प्रेक्षकांनी हा चित्रपट मनापासून स्वीकारला, याचा खूप आनंद आहे. प्रत्येकाला उन्हाळ्याच्या सुट्टीची नोस्टालजिक सफर घडवणारा हा चित्रपट प्रेक्षकांसह चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्याही पसंतीस उतरत आहे, हे पाहून मन भरून येते. हे यश माझे एकट्याचे नसून चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे, कलाकारांचे व प्रेक्षकांचे आहे.”
    निर्माते राजेश मापुस्कर म्हणतात, “ ‘एप्रिल मे ९९’ ही  आपल्या सर्वांची गोष्ट आहे. कोकणातल्या उन्हाळ्याची आठवण प्रत्येकाच्या मनात आहे. तीच आठवण जिवंत करण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून केला व प्रेक्षकांनी तो मनापासून स्वीकारला, यासाठी प्रेक्षकांचे मनापासून आभार व्यक्त करतो.” 
   मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन विथ फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत 'एप्रिल मे ९९’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केले असून राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी , मॉरिस नून हे निर्माते आहेत तर लॉरेन्स डिसोझा सह निर्माते आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"अंकुश" चित्रपटातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले यांचे सिनेनिर्मितीत पदार्पण.

'साजनभाई'च्या भूमिकेतील मंगेश देसाईचा रावडी लूक.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...