राजकीय क्षेत्रातील ऐतिहासिक कार्यासाठी प्रो.राम शिंदे, सभापती विधान परिषद यांचा माईमीडिया च्या 'मीडिया एक्सेलन्स अवाँर्ड' विशेष सन्मानाने गौरव.

   राजकीय क्षेत्रात संवेदनशील पणे  सामाजिक भान जपत, ऐतिहासिक वारसा जतन व संवर्धन करणारे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती, प्रो.राम शिंदे! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त चौंडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर येथे ऐतिहासिक वारसा जपणारी ‘शिल्पसृष्टी’ निर्मिती प्रस्तावित आहे. अहिल्यादेवींच्या कारकिर्दीतील न्यायनिवाडे, जलसंधारण, महेश्वर, काशीविश्वनाथ पुनरुत्थान, वृक्षसंवर्धन या सर्वांचे शिल्पात्मक दर्शन घडवणारी भव्य शिल्पसृष्टी उभारण्याचा संकल्प केला चोंडीस पर्यटन, अध्यात्म, इतिहास आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी विशेष बृहत विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया गतीमान केली. या आराखड्यात स्मारकाचे सुशोभीकरण, संग्रहालय, पर्यटकांसाठी निवास, चौंडीश्वरी मंदिर जीर्णोद्धार, रस्ते व वाहनतळ आदी सुविधा समाविष्ट आहेत.
.    अहिल्याबाई होळकर यांचे कार्य धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील योगदान व्यापकतेने अधोरेखित करुन  नारीशक्तीचा आगळा वेगळा सन्मान करणारे ,प्रो.राम शिंदे यांचा मीडिया असोसिएशन ऑफ इंडियासाठी, माई मीडिया २४ च्या वतीने ; ‘मीडिया एक्सलन्स अवाँर्ड २०२५ मधील  विशेष सन्मानाने गौरव करण्यात आला. या सोहळ्यास ते उपस्थित राहू शकले नाहीत म्हणून त्यांच्या विधानभवनातील कार्यालयात जाऊन त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
   माई च्या अध्यक्ष शीतल करदेकर, मुंबई चे अध्यक्ष चेतन काशीकर, मुंबई संघटन समन्वयक गणेश तळेकर, मुंबई कार्यकारिणी सदस्य विजय कांबळे आदीनी हा सन्मान प्रदान केला. 
    याप्रसंगी मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया च्या न्यायासाठी लढण्याच्या कार्याचे कोतुक करुन समाज हिताच्या संघटनेच्या कार्यास आपले सहकार्य असे असे आश्वासन ही दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"अंकुश" चित्रपटातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले यांचे सिनेनिर्मितीत पदार्पण.

'साजनभाई'च्या भूमिकेतील मंगेश देसाईचा रावडी लूक.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...