मराठी भाषा किती महत्त्वाची आहे, हे ‘आता थांबायचं नाय’ मागची गोष्ट ऐकल्यावर समजेल ....... तुम्हाला माहिती आहे का ती गोष्ट?

मुंबईत अनेक भाषा बोलल्या जातात. पण जी भाषा हृदयातून उमटते, ती म्हणजे मराठी. ती कोणावर लादली जात नाही — ती प्रेमानं स्वीकारली जाते. आणि आजही या शहरात, महाराष्ट्रात, जेव्हा दर्जेदार कंटेंटची गोष्ट होते, तेव्हा लोक म्हणतात, “मराठी कलाकृतीला तोड नाही.”
    याचं अलीकडचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ‘आता थांबायचं नाय!’ — एक असा चित्रपट, ज्याचं नाव फक्त शीर्षक नाही, तर अनेकांची मनस्थिती आहे. हा सिनेमा फक्त मराठीत आहे, पण त्याचं स्वागत सगळ्या भाषांतील प्रेक्षकांनी केलं. विशेषतः हिंदी भाषिक प्रेक्षक, पत्रकार आणि सेलिब्रिटींनी या सिनेमाचं मनापासून कौतुक केलं — कोणी इंस्टाग्रामवर स्टोरी टाकली, कोणी फोन करून अभिनंदन केलं. अनेकांनी एक गोष्ट स्पष्टपणे कबूल केली — “आज मराठी भाषा, त्यातल्या कलाकृती पाहण्यासारख्या आहेत.”
   या सिनेमात सिद्धार्थ जाधवने साकारलेली मारुती  कदम ही व्यक्तिरेखा वेगळी आहे. एक बाप, जो परिस्थितीनं हरवलेला आहे, पण आपल्या मुलीसाठी पुन्हा उभा राहतो. त्या प्रवासात त्याला साथ देतो एक दुसरा विस्कटलेला माणूस — सखाराम मंचेकर, ज्याची भूमिका भरत  जाधव करतात . मंचेकरांची भूमिका  आहे एका आजोबाची, नातवासाठी केलेल्या त्यांच्या बदलाची. त्यांच्या झगड्याची. आणि त्या झगड्यातून उगम पावणाऱ्या एका नव्या जिद्दीची.
    त्यांच्याबरोबर अनेक उत्कृष्ट कलाकार आहेत आणि प्रत्यकाची वेगळी गोष्ट आहे .. ओम भुतकर, पर्ण पेठे, प्राजक्ता हनमघर , किरण  खोजे, श्रीकांत यादव, दीपक शिर्के — आणि छोट्या पण महत्त्वाच्या भूमिकेत रोहिणी हट्टंगडी, तर आशुतोष गोवारीकर एका विशेष भूमिकेत दिसतात  अर्थात, हे सगळेच मराठी कसलेले कलाकार . पण मराठी चित्रपट एवढ्यावर थांबत नाही — तो सर्व भाषिकांना आपल्यात सामावून घेतो.
या चित्रपटात फक्त मराठी कलाकारच नाहीत, तर तंत्रज्ञ, संगीतकार, एडिटर  — सगळ्यांचा उल्लेख करायला हवा. कारण इथे भाषेपेक्षा मराठी भावना मोठी ठरली.संगीतकार गुलराज सिंग, एडिटर  संजय संकला, छायाचित्रकार संदीप यादव — हे सर्व हिंदी चित्रपटसृष्टीतून आलेले. पण त्यांनीही आपल्या कामातून मराठी भाषेवर प्रेम व्यक्त केलं.चित्रपटाची दिग्दर्शनाची जबाबदारी घेणारा शिवराज वायचळ — अर्थात मराठमोळा. पण पहिल्याच सिनेमात इतक्या विविध पार्श्वभूमीच्या लोकांना एकत्र आणून एक सच्चा मराठी सिनेमा उभा करतो — हेच मराठीच्या आत्मविश्वासाचं दर्शन आहे.निर्मितीमध्येही हाच भाव दिसतो. झी स्टूडिओज, चॉक अँड चीज फिल्म्स , आणि फिल्म जॅझ — या वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या टीम्स. निर्माते — निधी परमार, धर्म वालिया, तूषार हिरचंदानी , उमेश बन्सल,आणि बवेश जानवलेकर यांपैकी अनेकजण हिंदी प्रोजेक्ट्समध्ये सक्रिय असले, तरी त्यांनी ही गोष्ट ठामपणे मराठीत मांडायचं ठरवलं. कारण ती गोष्ट फक्त मराठीतच खरी वाटली.
बवेश जानवलेकर , झी स्टूडिओज मराठी आणि झी टॉकीज चे प्रमुख, एका वाक्यात म्हणाले :
"ही फक्त फिल्म नव्हती — ही भावना होती. मराठी ही भाषा निवडली, कारण ती खरी वाटली. आणि तिच्यात गोष्ट माणसांपर्यंत पोहोचवण्याची ताकद होती."
आता ही गोष्ट, जी थिएटरमधून मनात उतरली, ती घराघरात पोहोचणार आहे.
‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटाचा टॉकीज प्रीमियर
२७ जुलै, रविवार, दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता, झी टॉकीज वर.
   हा चित्रपट पाहणं म्हणजे फक्त मराठी गोष्ट बघणं नाही कारण देशाने या चित्रपटावर प्रेम केलय त्यामुळे मराठी माणसाने मराठीचा सन्मान करणं आहे आणि स्वतःला आठवण करून देणं की, “आता थांबायचं नाय.”

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"अंकुश" चित्रपटातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले यांचे सिनेनिर्मितीत पदार्पण.

'साजनभाई'च्या भूमिकेतील मंगेश देसाईचा रावडी लूक.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...