'आरपार' चित्रपटातील ललित-ऋताचं रोमँटिक गाणं प्रदर्शित.

    अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री ऋता दुर्गुळे यांच्या रोमँटिक 'आरपार' या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु असलेली पाहायला मिळतेय. पहिल्यांदाच ही जोडी मोठा पडदा गाजवणार असल्याने दोघांच्या चाहत्यावर्गात उत्सुकता लागून राहिली आहे. अशातच प्रेक्षकांची ही उत्सुकता आता अधिक ताणली जाणार आहे. हो, कारण ललित आणि ऋताच्या 'आरपार' या चित्रपटाचे टायटल सॉंग रसिकांच्या भेटीस आलं आहे. या टायटल सॉंगमध्येही ऋता व ललित यांचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना विशेष भावतोय. 

एकमेकांना मारलेली मिठी, पाहताच गालातल्या गालात आलेलं हसू, हळवा स्पर्श या सगळ्याने स्क्रीनवर ऋता-ललित यांच्यातील जवळीक वाढताना दिसत आहे. ललित-ऋताचा रोमान्स असलेल्या गाण्याचे बोलही रसिकांना मंत्रमुग्ध करुन सोडत आहेत. 'आरपार' चित्रपटातील ललित-ऋतावर चित्रित झालेलं हे गाणं त्यांच्यातील केमिस्ट्री दाखवणारं आहे. 'आरपार' चित्रपटाच्या या टायटल सॉंगमधील ललित-ऋताचा ऑनस्क्रीन रोमान्स साऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. अल्पावधीतच या गाण्याला मिळालेला प्रतिसाद पाहता हे गाणं नक्कीच मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार करेल यांत शंका नाही.

हे टायटल सॉंग पाहिल्यानंतर आता साऱ्यांना चित्रपटाची ओढ लागून राहिली आहे. या रोमँटिक अशा गाण्याला गुलजार सिंग यांनी संगीत दिले आहे. तर जितेंद्र जोशी यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. तर हे सुंदर, बेधुंद करुन सोडणारं गाणं शंकर महादेवन यांनी स्वरबद्ध केलं आहे. 'लिऑन्स मीडिया प्रॉडक्शन एलएलपी' प्रस्तुत, निर्माते नामदेव. नि. काटकर आणि रितेश. मो. चौधरी निर्मित 'आरपार' हा सिनेमा आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद या धुरा गौरव पत्की यांनी सांभाळल्या आहेत. प्रेमाची अनोखी परिभाषा मांडणारा हा रोमँटिक सिनेमा ऋता व ललित या नव्या जोडीसह १२ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"अंकुश" चित्रपटातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले यांचे सिनेनिर्मितीत पदार्पण.

'साजनभाई'च्या भूमिकेतील मंगेश देसाईचा रावडी लूक.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...