मल्टीस्टारर ‘थप्पा’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला....लवकरच होणार चित्रीकरण......
मराठी चित्रपटसृष्टीत ‘थप्पा’ हा एक भव्य आणि हटके मल्टीस्टारर चित्रपट आता दाखल होणार आहे. हिंदी मल्टीस्टारर चित्रपटांनाही टक्कर देईल, असा बिग बजेट, दमदार कथानक आणि ताकदीची कास्टिंग घेऊन हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार आहे. सिड विंचूरकर दिग्दर्शित या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. ‘थप्पा’चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची ड्रीम स्टारकास्ट. वैदेही परशुरामी, रिंकू राजगुरू, सिद्धार्थ बोडके, गौरव मोरे, डॅनी पंडित, सखी गोखले आणि साईंकित कामत हे लोकप्रिय आणि दमदार कलाकार एकत्र पडद्यावर झळकणार आहेत. या सर्व कलाकारांनी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर केली असून इतकी मोठी स्टारकास्ट एकत्र पाहाण्याची संधी या निमित्ताने प्रेक्षकांना मिळणार आहे. नवे चेहरे, नवे जोडीदार असल्याने यात नवीन केमिस्ट्री पाहायला मिळेल, त्यामुळ हा अनुभव खऱ्या अर्थाने ताजा, वेगळा आणि थरारक ठरणार आहे. स्टुडिओ लक्स आणि फिफ्टी टू फ्रायडे निर्मित या चित्रपटाचे मेहुल शाह आणि अमित भानुशाली निर्माते असून, निर्मितीमूल्यांच्या बाबतीतही ‘थप्पा’ हा मराठीतील...