पोस्ट्स

डिसेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हिंदवी पाटील आणि सुरेखा कुडची गाजवणार लावणीचा फड.

इमेज
    लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान... उत्तम संगीत आणि नखरेल अदाकारीने सजलेली लावणी रसिकांना घायाळ केल्याशिवाय राहत नाही. आपल्या लावणी नृत्याने अवघ्या महाराष्ट्रावर भूरळ घालणारी लोकप्रिय लावणी नृत्यांगना हिंदवी पाटील आणि प्रसिद्ध अभिनेत्री, नृत्यांगना सुरेखा कुडची एकत्र लावणीचा फड गाजवताना दिसणार आहेत. ‘जब्राट’ या आगामी मराठी चित्रपटात या दोघींची एक फक्कड लावणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. येत्या ६ फेब्रुवारीला तारा करमणूक निर्मित प्रगती कोळगे दिग्दर्शित ‘जब्राट’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.     या लावणीची झलक नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. हिंदवी पाटील आणि अभिनेत्री सुरेखा कुडची यांच्या ठसकेबाज लावणीची  जुगलबंदी यात पाहायला मिळत आहे. ही लावणी सादर करताना आम्ही आनंद घेतला हाच आनंद रसिकांना ही  मिळेल असा  विश्वास या दोघींनी व्यक्त केला.    किती सावरू पुन्हा पुन्हा  कशा झाकू या खाणाखुणा   नाही बिचाऱ्या पदराचा या गुन्हा या डॉ.जयभीम शिंदे लिखीत शब्दांना हिंदवी पाटील आणि सुरेखा कुडची यांनी आपल्या म...

मुखवट्यामागील गडद रहस्य ‘केस नं. ७३’.

इमेज
   प्रत्येक चेहऱ्यावर एक मुखवटा असतो आणि या मुखवट्यामागे असतात सुखदुःखाच्या असंख्य मानवी भावभावना..  ज्या आपल्याला कधीच दिसत नाही, आणि सोबत मुखवट्यामागे दडलेली अनेक रहस्य..!! या मुखवट्यामागचा खरा चेहरा समोर आला  कि आपणही  चक्रावून  जातो...  अशीच  एक  चक्रावून टाकणारी कथा घेऊन येत आहे  ‘केस  नं. ७३’.   ना चेहरा, ना निमित्त,  चार खून, शून्य पुरावे....  अशा टॅगलाईनसह आलेल्या ‘केस नं. ७३’  चित्रपटाचे मोशन पोस्टर आपल्यासमोर असंख्य प्रश्न उभं करतं. लायलॅक मोशन पिक्चर्स आणि डस्क स्टुडिओज निर्मित  ‘केस नं. ७३’  हा मराठी चित्रपट नवीन वर्षात जानेवारीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांनी केले असून  चित्रपटाची निर्मिती शर्वरी सतीश वटक, डॉ. मिलिंद  मुक्तेश्वर आपटे यांनी केली आहे. सहनिर्माते प्रविण अरुण खंगार आहेत. अशोक शिंदे, राजसी भावे, शैलेश दातार, नंदिता पाटकर, पियुष आपटे अशी तगडी स्टारकास्ट चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटातील प्रत...

‘रुबाब’ चित्रपटाचा धडाकेबाज टीझर प्रदर्शित.

इमेज
नवनवीन विषय, वेगवेगळे आशय आणि प्रेक्षकांच्या बदलत्या आवडी लक्षात घेत झी स्टुडिओज सातत्याने मराठी सिनेसृष्टीत वेगळे प्रयोग सादर करत आहे. आशयघन सामाजिक कथा, कौटुंबिक भावविश्व ते मनोरंजनप्रधान चित्रपटांपर्यंतचा प्रवास करत, आता झी स्टुडिओज प्रेक्षकांसाठी एक स्टायलिश, रुबाबदार लव्हस्टोरी घेऊन येत आहे. ‘रुबाब’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, पहिलीच झलक आणि ‘तुझ्यासारखी नको… तूच पाहिजे’ ही टॅगलाईन प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.     टीझरमधून समोर येणारी कथा ही एका डॅशिंग, रुबाबदार नायकाची आणि त्याच्या ड्रीम गर्लची आहे. मात्र ही केवळ गोडगुलाबी प्रेमकहाणी नसून, एक रूबाबदार प्रेमकहाणी आहे. प्रेमासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार असलेला, स्वतःचे नियम स्वतः ठरवणाऱ्या या नायकाची प्रेमकहाणी सगळ्यांनाच जबरदस्त आवडेल हे नक्की. प्रेमकहाणीला डॅशिंग टच देत भावनांचा समतोल साधणारा हा चित्रपट तरुणाईला नक्कीच आवडेल.      दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे म्हणतात, “ ‘रुबाब’ हा चित्रपट स्वतःचा ठाम आवाज असलेल्या तरुणाईची कथा आहे. आजच्या पिढीचे प्रेम प...

प्रियदर्शिनी इंदलकर- अभिजीत आमकर यांची फ्रेश जोडी झळकणार ‘लग्नाचा शॉट’मध्ये.

इमेज
मराठी चित्रपटसृष्टीत चर्चेत असलेल्या ‘लग्नाचा शॉट’ या आगामी चित्रपटाचे नवे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून याच पोस्टरमधून चित्रपटातील प्रमुख कलाकारही समोर आले आहेत. या चित्रपटात प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिजीत आमकर यांच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. याआधी केवळ संकल्पना आणि शीर्षकामुळे उत्सुकता निर्माण करणाऱ्या या चित्रपटाने आता पोस्टरद्वारे थेट लक्ष वेधून घेतले आहे.     या पोस्टरमध्ये पारंपरिक लग्नाच्या वेशभूषेत दिसणारा नायक-नायिका जोडीने उभे असून, दोघांच्याही चेहऱ्यावर गोंधळलेले, प्रश्नार्थक भाव दिसतात. डोक्याला बंदूकसारखी बोटं लावलेली ही देहबोली पाहाता, लग्नाच्या धावपळीत काहीतरी मोठा घोळ होणार असल्याची स्पष्ट झलक पोस्टरमधून दिसतेय.पोस्टरच्या पार्श्वभूमीत रेल्वे, बस, वळणावळणाचा रस्ता आणि राशीचक्र अशा दृश्यात्मक घटकांचा वापर करण्यात आला आहे. त्यात ‘लग्नाअगोदरही लग्नानंतरही’ असे शब्दही दिसत आहेत. यामुळे प्रवास, वेळेचा गोंधळ, चुकीचे निर्णय आणि नशिबाचे फेरे यांचा कथेशी असलेला संबंध सूचकपणे समोर येतो. संपूर्ण पोस्टर रंगीबेरंगी, उत्साही आणि गंमतीशीर वातावरण निर्माण कर...

'हमाल दे धमाल' चित्रपटाच्या.....रम्य आठवणींना उजाळा.....

इमेज
 मराठी चित्रपट रसिकांच्या मनावर एकेकाळी राज्य केलेल्या `हमाल दे धमाल' चित्रपटाच्या `विशेष शो'ला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या चित्रपटाच्या चित्रीकरण व प्रदर्शनानंतरच्या अनेक रम्य आठवणींना उजाळा निघाला. या चित्रपटातील लक्ष्मीकांत बेर्डे (लक्षा) यांच्या आठवणींनी रसिक गहिवरून गेले होते.     सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाच्या वतीने प्रसिद्ध कलाकार लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघुनाट्यगृहात `हमाल दे धमाल' चित्रपटाचा रविवारी विशेष शो पार पडला. पडद्यावरील लक्षाच्या एन्ट्रीचे रसिकांनी जोरदार टाळ्या वाजवत स्वागत केले. या वेळी पुरुषोत्तम बेर्डे, विजय पाटकर, जयवंत वाडकर , समीर आठल्ये, चेतन दळवी यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी या चित्रपटातील काही आठवणी , काही किस्से प्रेक्षकांसोबत शेअर केले. तसेच प्रिया बेर्डे यांची विशेष उपस्थिती असल्याने कार्यक्रमाला रंगत आली.     दरम...

२२वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची सुरूवात ९ जानेवारीपासून.

इमेज
  महाराष्ट्रातील चित्रपट संस्कृतीचा मानदंड असणारा ‘२२वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव’ दिनांक ९ जानेवारी ते १५ जानेवारी २०२६  या कालावधीत मुंबई आणि ठाणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. सात दिवस चालणाऱ्या या महोत्सवात आशियाई तसेच भारतीय चित्रपटांचा समावेश असून, यंदा एकूण ५६ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. महोत्सवात निवडलेले हे ५६ चित्रपट प्रभादेवीतील पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतील मिनी थिएटर आणि ठाण्यातील लेक शोर मॉलमधील सिनेपोलीस चित्रपटगृहात दाखवले जाणार आहेत. बूसान चित्रपट महोत्सवात FIPRESCI ज्युरी पुरस्कार पटकावलेल्या ‘ऑन यूअर लॅप’ (पांगकू) या इंडोनेशियन चित्रपटाच्या प्रदर्शनाने महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.     ‘२२व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचे आयोजन करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो आहे."गेली बावीस वर्ष या महोत्सवाने आशियाई आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कलाकृती महाराष्ट्रातील रसिकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. यंदा माझे वडील डॉ. व्ही. शांताराम यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या अजरामर कलाकृतीं...

संभाजीनगर येथे बीबीएन ग्लोबलतर्फे व्यवसाय संवाद बैठक.

इमेज
बीबीएन ग्लोबलतर्फे संभाजीनगर येथे उद्योजकांसाठी व्यवसाय संवाद बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी दुबई येथे ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या 'महाबीझ २०२६' या आंतरराष्ट्रीय व्यवसाय परिषदेची माहिती देण्यात आली. या परिषदेमुळे महाराष्ट्र - मराठवाड्यातील उद्योजकांना निर्यात - आयात, गुंतवणूक, आंतरराष्ट्रीय भागीदारी व जागतिक नेटवर्किंगच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे जीएमबीएफ ग्लोबलच्या सदस्या प्रचिती तलाठी यांनी सांगितले.    या बैठकीस गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरमचे सदस्य दिलीप खेडेकर यांनी महाराष्ट्रातील उद्योजकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी जोडण्यासाठी अशा संवादात्मक उपक्रमांचे महत्त्व त्यांनी यावेळी अधोरेखित केले. या बैठकीला जीएमबीएफ ग्लोबलच्या सदस्या प्रचिती तलाठी यांनी संबोधित केले. त्यांनी जीएमबीएफ ग्लोबल ही दुबईस्थित, ना - नफा व्यवसाय संघटना असून ती महाराष्ट्रातील उद्योजकांना दुबई, जीसीसी, मध्यपूर्व, आफ्रिका तसेच इतर जागतिक बाजारपेठांमध्ये व्यवसाय विस्तारासाठी संधी उपलब्ध करून देत असल्याचे स्पष्ट केले.    यावेळी त्यांनी महाबीझ २०२६ या आंतरराष्ट्री...

श्रेयस तळपदे आणि ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रस्तुत “मर्दिनी” चित्रपटाचा मुहूर्त संपन्न .

इमेज
   शुभारंभाच्या मंगल क्षणी, श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आगामी मराठी चित्रपट ‘मर्दिनी’ चा मुहूर्त शॉट पार पडला. या प्रसंगाने चित्रपटाच्या निर्मिती प्रवासाला अधिकृत सुरुवात झाली असून, दमदार विषय आणि प्रभावी मांडणी घेऊन ‘मर्दिनी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज होत आहे. श्रे‌यस तळपदे आणि ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रस्तुत या चित्रपटाची कथा मनोरंजनाच्या पलीकडे, प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याची, सहनशक्तीची आणि शक्तीची गाथा उलगडते.प्रत्येक स्त्री ही मुळात मर्दिनी असते…वेळ आली की रूप दाखवते…या चित्रपटात सुंदर आणि चमकदार कलाकारांचा संगम आहे, ज्यांच्या कामगिरीमुळे कथा अधिक प्रभावी आणि आठवणींमध्ये राहणारी बनेल. प्रार्थना बेहेरे, अभिजीत खांडकेकर, जितेंद्र जोशी, राजेश भोसले यांसारख्या दमदार कलाकारांसह बालकलाकार मायरा वैकुळची सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अनुभवी कलाकारांची ताकद आणि नव्या पिढीची संवेदनशील उपस्थिती यामुळे ‘मर्दिनी’ हा चित्रपट आशय, अभिनय आणि सादरीकरणाच्या दृष्टीने एक वेगळा आणि प्रभावी सिनेमॅटिक अनुभव देईल. ...

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव “फिल्म बाजार - २०२५”साठी शासनामार्फत "मुक्काम पोस्ट देवाचे घर" चित्रपटांची निवड.

इमेज
गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील “फिल्म बाजार” विभागासाठी राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत दरवर्षी मराठी चित्रपटांची निवड करून ते पाठविण्यात येतात. यंदा “फिल्म बाजार - २०२५” करिता  "मुक्काम पोस्ट देवाचं घर" या मराठी चित्रपटांची निवड करण्यात आल्याची घोषणा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी केली आहे .       कीमाया प्रॉडक्शनचे महेश कुमार जायसवाल, किर्ती जायसवाल यांनी "मुक्काम पोस्ट देवाचं घर" या चित्रपटाची निर्मिती केली असून संकेत माने यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे." या चित्रपटात ग्रामीण भागातली गोष्ट मांडण्यात आली आहे. सैन्यात असलेले वडील देवाघरी गेले असं आईनं मुलीला सांगितल्यावर देवाचं म्हणजे काय ? आणि ते कुठे असतं? याचा शोध सुरू होतो. त्याबरोबरच तिची आई आपल्या शहीद झालेल्या पतीचं पेन्शन मिळवण्यासाठी संघर्ष करत असल्याचं ट्रेलरमधून दिसतं. त्यामुळे भावनिकतेची किनार असलेल्या या कथानकाची मांडणी अतिशय हलक्याफुलक्या, रंजक पद्धतीनं करण्यात आली आहे.      ...

सासू-सुनेची खट्याळ जुगलबंदी!...‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ शीर्षक गीत प्रदर्शित.

इमेज
   केदार शिंदे दिग्दर्शित आगामी मराठी चित्रपट ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ आपल्या हटके नावामुळे आणि धमाकेदार टीझरमुळे आधीपासूनच चर्चेत आहे. आता या चित्रपटाचे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले असून सासू-सुनेच्या नात्यातील टोमणे, नोकझोक, प्रेम आणि मस्तीची मजेशीर बाजू या गाण्यातून प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.    हे शीर्षक गीत म्हणजे सासू-सुनेच्या रोजच्या नात्यातील गंमतीदार प्रसंगांचे संगीतमय रूप आहे. घराघरांत घडणाऱ्या मिश्किल टोमण्यांपासून खट्याळ तक्रारींपर्यंत आणि त्या मागील आपुलकीपर्यंत सगळ्या भावना या गाण्यात अचूक पकडल्या आहेत. त्यामुळे हे गाणे केवळ ऐकायला नाही, तर पाहायला आणि अनुभवायला देखील मजेदार आहे. चित्रपटाचा एकूण मूड, विनोद आणि कौटुंबिक भावनांचा समतोल हे गाणे सुरुवातीलाच ठळकपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते.    या टायटल ट्रॅकला वैशाली सामंत आणि प्रियांका बर्वे यांचा दमदार आणि उत्साही आवाज लाभला असून त्यांच्या गायकीमुळे गाण्यातील नोकझोक आणि मस्ती अधिक जिवंत वाटते. कुणाल-करण यांचे संगीत हे या गाण्याचे खास आकर्षण ठरते. पारंपरिक ढंग...

एन्काऊंटरचं गूढ, अत्तराच्या सुवासाचं 'मॅजिक'.

इमेज
    अभिनेता जितेंद्र जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या मॅजिक या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला असून, एन्काऊंटरचं गूढ, अत्तराच्या सुवासाचं 'मॅजिक' काय आहे, असा प्रश्न या गुंतवून ठेवणाऱ्या ट्रेलरनं निर्माण केला आहे. नुकताच सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या हस्ते या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. सायकोलॉजिकल पद्धतीनं गोष्ट उलगडणारा 'मॅजिक' हा चित्रपट नव्या वर्षात, १ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.    तुतरी व्हेेंचर्स या निर्मिती संस्थेच्या राजू सत्यम यांनी मॅजिक या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'आई कुठे काय करते'सारख्या उत्तमोत्तम मालिकांचं दिग्दर्शन केलेल्या रवींद्र विजया करमरकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. योगेश विनायक जोशी, रवींद्र विजया करमरकर यांनी कथालेखन, तर योगेश विनायक जोशी, अभिषेक देशमुख यांनी पटकथा लेखन केलं आहे. केदार फडके यांची छायांकन, देवेंद्र भोमे, चिनार-महेश यांनी संगीत, दिनेश पुजारी, नयनेश डिंगणकर यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. चित्रपटात जितेंद्र जोशी एन्काउंटर स्पेशलिस...

‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’चे मराठी ओटीटी विश्वात लवकरच होणार पदार्पण.

इमेज
सॅन होजे ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’ अर्थात 'नाफा' (NAFA) या संस्थेची स्थापना २०२४ मध्ये अमेरिकास्थित उद्योजक, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘देऊळ’ आणि ‘भारतीय’ या चित्रपटांचे निर्माते अभिजित घोलप यांच्या संकल्पनेतून झाली आहे. नाफाने २०२४ पासून ‘मराठी चित्रपट महोत्सवा’द्वारे आणि भारतात प्रदर्शित होणाऱ्या तारखेलाच नवे चित्रपट अमेरिकेत प्रदर्शित करून मराठी चित्रपटसृष्टीच्या कक्षा रुंदावल्या आहेत. कुठल्याही प्रकारचा आर्थिक फायदा न घेणारी, स्वयंसेवकाच्या उत्साह आणि मेहनतीवर नावारुपाला आलेली ही संस्था अर्थात ‘नो प्रोफीट ओर्गनायझेशन’ येत्या नवीन वर्षात आपले मराठी ओटीटी सुरु करणार आहे.    'नाफा स्ट्रीम'(NAFA STREAM)* बद्दल बोलताना संस्थापक अध्यक्ष अभिजीत घोलप म्हणाले, *'नाफा स्ट्रीम'* हे ओटीटी प्लॅटफॉर्म स्वतंत्र आणि प्रयोगशील मराठी चित्रपट निर्मात्यांना आधार देणारे विदेशातील पहिले सामर्थ्यशाली माध्यम ठरणार आहे. प्रतिष्ठित तसेच उदयोन्मुख कलावंतांसाठी हे एक महत्त्वाचे व्यासपीठ असून, गेल्या पाच - सहा दशकांतील निवडक, अभिजात आणि दर्जेदार मराठी चित्रपट नॉर्थ अमेर...

एन.डी. स्टुडिओला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल - सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांचे प्रतिपादन,......२५ ते ३१ डिसेंबर रोजी एन.डी.स्टूडियो येथे कार्निव्हलचे आयोजन

इमेज
कलेच्या क्षेत्रामध्ये उत्तुंग अशी कर्तबगारी केली आहे. कलेच्या क्षेत्रात एका मराठी माणसाने  साम्राज्य उभं केले. त्यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी  शासनाने पुढाकार घेऊन एन.डी स्टुडिओच्या जतन आणि संवर्धनाची जबाबदारी नम्रपणे स्वीकारली आहे, या स्टुडिओला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल,असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांनी केले.    महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्गत एन. डी. आर्ट आर्ट वर्ड लिमिटेड येथे शुक्रवारी पत्रकार, टूर ऑपरेटर यांची भेट आयोजित करण्यात आली होती. त्या निमित्ताने आयोजित छोटेखानी सांस्कृतिक समारंभात डॉ. कुलकर्णी बोलत होते. दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक तथा एन.डी च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल जोगळेकर, वित्तीय सल्लागार मुख्य लेखा वित्तधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे , उप अभियंता ( स्थापत्य) विजय बापट, एन.डी.चे प्रशासकीय अधिकारी स...

'धि गोवा हिंदु असोसिएशन' नाट्य संस्थेचे "सुभेदार गेस्ट हाऊस"च्या निमित्ताने रंगभूमीवर पुनरागमन.

इमेज
   मराठी नाट्यसृष्टीला तसेच रसिक प्रेक्षकांसमोर सातत्याने दर्जेदार नाटके व संगीत नाटके सादर करणारी अग्रगण्य संस्था “धि गोवा हिंदु असोसिएशन” काही काळानंतर पुन्हा एकदा रंगभूमीची सेवा करण्यासाठी सज्ज झाली आहे. धि गोवा हिंदु असोसिएशन आणि सुकल्प चित्र यांच्या संयुक्त विद्यमाने “सुभेदार गेस्ट हाऊस” हे एक नवे कोरे मराठी नाटक येत्या २५ डिसेंबरपासून रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. धि गोवा हिंदु असोसिएशन, कल्पक सदानंद जोशी आणि अमरजा गोडबोले हे या नाटकाचे निर्माते आहेत. या नाटकाचा पुण्यातील पहिला प्रयोग २५ डिसेंबरला यशवंतराव चव्हाण, कोथरूड तर मुंबईतील पहिला प्रयोग २६ डिसेंबरला शिवाजी मंदिर येथे संपन्न होणार आहे.   “सुभेदार गेस्ट हाऊस” या नाटकाचे लेखन शिरीष देखणे यांनी केले असून दिग्दर्शनाची धुरा विजय केंकरे यांनी सांभाळली आहे. अभिनेता सौरभ गोखले, शंतनू मोघे, अंगद म्हसकर, मृण्मयी गोंधळेकर, विनिता दाते, सना कुलकर्णी, रोहित देशमुख, आनंद पाटील यांच्या महत्वपूर्ण भूमिका या नाटकात पहायला मिळणार आहेत. नाटकाचे नेपथ्य प्रदीप मुळ्ये, संगीत अजित परब, गीत वैभव जोशी, प्रकाश योज...

धमाल मनोरंजक 'गोट्या गँगस्टर'चा ट्रेलर लाँच.

इमेज
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक दिवंगत राजेश पिंजानी यांचा अखेरचा चित्रपट 'गोट्या गँगस्टर' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. मुंबईतल्या चाळीत राहणाऱ्या गोट्या नावाचा तरूण आणि त्याचे मित्र गँग तयार करण्याचा प्रयत्न करतात, त्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय धमाल होते याची रंजक गोष्ट या चित्रपटात पहायला मिळणार असून, २६ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.     अन्नपूर्णा प्रॉडक्शन्स निर्मित 'गोट्या गँगस्टर' या चित्रपटाची निर्मिती अन्नपूर्णा बिरादार, राजेश्री बिरादार, संदीप बिरादार आहेत, तर चित्रपटाची प्रस्तुती ऋतुजा पाटील व शिव लोखंडे यांनी केली आहे. राजेश पिंजानी यांनी लेखन दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात उत्तम स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. प्रवीण तरडे, प्रथमेश परब, डॉ. मोहन आगाशे, श्रीकांत यादव, अश्विनी गिरी, भूषण मंजुळे, विनोद वणवे, ऐश्वर्या शिंदे, मुकूंद वसुले यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.    मायानगरी मुंबईतील एका चाळीत राहणाऱ्या तीन मित्रांची गोष्ट गोट्या गँगस्टर या चित्रपटांतून उलगडणार आहे. आयुष्यात घडणाऱ्या काही घटनां...

'३९ व्या रविकिरण बालनाट्य स्पर्धेत' 'अडलंय ‘का’ प्रथम तर 'दिव्या खाली दौलत'ला द्वितीय आणि 'रंग जाणिवांचे' तृतीय क्रमांकाने सन्मानित.

इमेज
    दशकांहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक, कला आणि क्रीडा क्षेत्रात अवीट ठसा उमटवत आलेल्या रविकिरण संस्थेची बहुप्रतीक्षित ३९ वी बालनाट्य स्पर्धा यंदा अधिक दिमाखात, अधिक उत्साहात आणि अधिक कलात्मकतेने साजरी झाली. यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे पार पडलेल्या या दोन दिवसांच्या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट बालनाट्याच्या प्रथम पारितोषिकासह सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, उत्कृष्ट नेपथ्य, उत्कृष्ट प्रकाश योजना असे पाच पुरस्कार पटकावून कल्याण वरपच्या 'सेक्रेड हार्ट स्कुल,चे 'अडलंय 'का' हे बालनाट्य प्रथम क्रमांक पटकावत अव्वल ठरले. अत्यंत तगडे आव्हान निर्माण करणाऱ्या १९ दर्जेदार बालनाट्यांमध्ये ही रंगतदार चुरस रंगली होती. रविकिरण मंडळाची ही स्पर्धा यंदा मंडळाचे ज्येष्ठ सभासद मनोहर नगरकर आणि कोकणच्या लालमातीतील रंगकर्मी रघुनाथ कदम यांच्या स्मृतीस समर्पित करण्यात आली होती. मंडळाचे जेष्ठ सभासद अशोक परब यांचा कलाक्षेत्रातील कार्याबद्दल आणि हेमंत चव्हाण यांचा सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.   या स्पर्धेच्या निक...

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाचा दमदार टिझर.

इमेज
 छत्रपती  शिवाजी महाराजांच्या  स्वराज्य उभारणीत  त्यांच्या  तेजस्वी पराक्रमासोबत  त्यांचे  बुद्धिचातुर्य  हा त्यांच्या संपूर्ण कार्याचा केंद्रबिंदू राहिला आहे.  छत्रपती शिवाजी महाराज मुत्सद्दी योद्धे होते. असंख्य मोहिमांमधून ते अनेकदा सिद्ध झाले आहे.      महाराजांनी गनिमी कावा ही कूटनीती अत्यंत प्रभावीपणे वापरली. शत्रू सावध नसतानाच त्याच्यावर घाला घालायचा, ही पद्धत तर महाराजांनी अनेक वेळा अतिशय यशस्वीरीत्या वापरली. औरंगजेबाचं मुघल साम्राज्य सर्वात मोठं आणि मजबूत साम्राज्य मानलं जायचं. अशा या साम्राज्याला शिवाजी महाराजांनी केवळ जोरदार हादराच दिला नाही, तर मुघल सम्राट औरंगजेबाची झोपही त्यांनी उडवली. आग्य्राला जाण्याचं निश्चित करणं आणि भर दरबारात मुघल साम्राज्याला निडरपणे आव्हान देणं हा स्वराज्याच्या उभारणीतील महत्त्वाचा अध्याय आहे. यात राजांची विचारसरणी, तल्लख बुद्धीमत्ता, गनिमी कावा, प्रसंगावधान राखून आखलेली रणनीती, शत्रूला गाफील ठेवून रक्ताचा एक थेंब ही न सांडता केलेला पराभव आदी गुण दिसतात. शिवचरित्रातील हा थरारक अध...

६ फेब्रुवारीला लागणार 'लग्नाचा शॉट'.

इमेज
लग्न म्हणजे आनंद, उत्साह आणि तयारी… पण कधी कधी हाच आनंद गोंधळात बदलला तर?  अशाच एका गोंधळावर आधारित ‘लग्नाचा शॉट’ हा चित्रपट ६ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले असून त्यातून चित्रपटाचा हलकाफुलका, मजेशीर मूड स्पष्टपणे दिसून येतो.   चित्रपटाच्या नावावरूनच हा प्रकार काहीसा वेगळा आणि धमाल असणार, याची कल्पना येते. लग्नाच्या धावपळीमध्ये घडणाऱ्या अनपेक्षित गोष्टी, चुकीचे अंदाज, गैरसमज आणि त्यातून निर्माण होणारा गोंधळ  याभोवती या चित्रपटाची गोष्ट फिरते. मात्र, हा गोंधळ कोणता आहे आणि ‘लग्नाचा शॉट’ नेमका काय आहे, हे चित्रपट पाहिल्यावरच उलगडणार आहे. सध्यातरी या चित्रपटात कोणाचे चेहरे झळकणार हे गुलदस्त्यात असले तरी हा चित्रपट धमाल करणार हे नक्की !    दिग्दर्शक अक्षय गोरे म्हणतात, '' 'लग्नाचा शॉट' हा चित्रपट म्हणजे लग्नाच्या गोंधळाकडे मजेशीर पद्धतीने पाहाणारी गोष्ट आहे. कोणालाही कंटाळा न येता, संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसून पाहाता येईल, असा हा निव्वळ मनोरंजनाचा अनुभव आहे. कुठलाही संदेश देण्याचा अट्टहास ना...

गजेंद्र अहिरे यांच्या 'पप्याच्या पिंकीची लव्हस्टोरी' चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित....

इमेज
  कोणत्याही कलाकृतीचे शीर्षक ती कलाकृती जनमानसापर्यंत पोहोचविण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावते. जनप्रबोधनासोबतच मनोरंजनाचे सर्वात मोठे आणि आघाडीचे माध्यम असलेल्या चित्रपटांसाठीही शीर्षक खूप महत्त्वाचे असते. राष्ट्रीय पारितोषिक विजेते लेखक, दिग्दर्शक, गीतकार गजेंद्र अहिरे यांच्या आगामी चित्रपटाचे शीर्षकही रसिकांची उत्कंठा वाढविणारे आहे. नावीन्यपूर्ण विषय मनोरंजनाच्या सहाय्याने प्रेक्षकांसमोर मांडण्याची हातोटी असणाऱ्या गजेंद्र अहिरे यांच्या आगामी मराठी चित्रपटाचे शीर्षक 'पप्याच्या पिंकीची लव्हस्टोरी' आहे. शीर्षकावरून या चित्रपटाचवत एक प्रेमकथा पाहायला मिळणार असल्याचे अगदी सहजपणे लक्षात येते, पण या प्रेमकथेतील नाट्यमय वळणे प्रेक्षकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवतील. 'पप्याच्या पिंकीची लव्हस्टोरी'चे पहिले पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.    'नीळकंठ मास्तर" या मराठी चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या अक्षर फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली निर्मात्या पायल पठारे आणि मेघमाला पठारे यांनी 'पप्याच्या पिंवvgtvyvकीची लव्हस्टोरी' या चित्रपटाची नि...

'ह्युमन कोकेन'चा धडकी भरवणारा ट्रेलर प्रदर्शित.

इमेज
   ‘ह्युमन कोकेन’चा ट्रेलर अखेर विविध माध्यमांवर प्रदर्शित झाला असून काही क्षणांतच प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. धक्कादायक दृश्यांची मालिकाच जणू या ट्रेलरमध्ये उलगडत जाते. गुन्हेगारी, अंमली पदार्थांचा व्यापार आणि अस्तित्वासाठी सुरू असलेल्या निष्ठूर संघर्षाच्या लपलेल्या जगाचे उघड, क्रूर आणि निःसंकोच चित्रण यातून दिसते.    या ट्रेलरमध्ये पुष्कर जोग अगदी नव्याच रूपात झळकतो. तो पहिल्यांदाच हिंदी चित्रपटात झळकणार असून त्याची महत्वपूर्ण भूमिका आहे. एका भयावह जाळ्यात अडकलेला कैद्याची तो भूमिका साकारत आहे. जिथे सुटकेची किंचितही शक्यता उरलेली नाही. रोमँटिक आणि हलक्या भूमिकांसाठी ओळखली जाणारी इशिता राज प्रथमच एका काळोख्या आणि धगधगत्या व्यक्तिरेखेत दिसते. पुष्करसोबत कैद झालेली तिची भूमिका ट्रेलरला भावनिकता देते आणि प्रत्येक पडद्यावरील क्षणातील तणाव आणखी गहिरा करते.   सिद्धांत कपूर आपल्या हटके आणि धाडसी रूपात लक्ष वेधून घेतो. त्याचे रूप, त्याची उपस्थिती सर्व काही रहस्य आणि अस्वस्थता वाढवणारे आहे. तर ज्येष्ठ अभिनेते जाकीर हुसेन अंगावर क...

हेमंत ढोमे यांच्या शाळेत पार पडला ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चा संगीत अनावरण सोहळा.

इमेज
‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपटातील पहिलं गाणं ‘शाळा मराठी’ला प्रेक्षकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता दुसरं गीत ‘स्वर्गात आकाशगंगा’ हे शाळेतल्या आठवणींना उजाळा देणारं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याचा अनावरण सोहळा अगदी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने अभिनव ज्ञानमंदिर प्रशालेतील पटांगणात पार पडला. या शाळेत गाण्याचं अनावरण करण्याचं कारण म्हणजे चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचं या शाळेशी असलेलं अतूट आणि गोड नातं. त्यांच्या विद्यार्थीदशेतील अनेक आठवणी या शाळेशी जोडल्या असून हेमंत यांनी पहिल्यांदा नाटकात काम केलं ते याच शाळेच्या मंचावर. त्यामुळे त्यांच्यासाठी हा एक जिव्हाळ्याचा सोहळा असून शाळेला दिलेली एक मानवंदना आहे. यावेळी क्षिती जोग, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर, कादंबरी कदम यांच्यासह गायक रोहित राऊत, जुईली जोगळेकर, संगीतकार हर्ष- विजय उपस्थित होते.     या खास सोहळ्यात चित्रपटातील कलाकार हजारो विद्यार्थ्यांसोबत गाण्यावर थिरकले. विद्यार्थ्यांची ऊर्जा आणि मैदानात दुमदुमलेलं आनंदी वातावरण यामुळे हा गाण...

'बोलविता धनी': हृषिकेश जोशींच्या लेखणीतील नव्या नाटकासाठी क्षितीश दाते सज्ज.

इमेज
प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक हृषिकेश जोशी यांच्या आगामी 'बोलविता धनी' या नाटकाची सध्या नाट्यवर्तुळात जोरदार चर्चा आहे. प्रवीण भोसले, भरत नारायणदास ठक्कर, समृद्धी तांबे, गंधाली कुलकर्णी आणि सुनंदा काळुसकर यांची निर्मिती असलेल्या 'बोलविता धनी' या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन स्वतः हृषिकेश जोशी यांनी केले आहे. या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता क्षितीश दातेने नाटकातील आपल्या भूमिकेबद्दल आणि हृषिकेशसोबत काम करण्याच्या अनुभवाविषयी मनमोकळेपणाने संवाद साधला.   क्षितीश ने या नाटकात दोन अत्यंत वेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. तो सांगतो की, "या दोन्ही भूमिका एकमेकांपासून खूप वेगळ्या आहेत. त्यामुळे एकाच वेळी दोन वेगळी माणसं एकापाठोपाठ एक उभी करणं हे माझ्यासाठी थोडं आव्हानात्मक आहे. नाटक दोन काळांमध्ये चालत राहतं आणि नाटकाच्या नावाप्रमाणे 'बोलविता धनी' या शब्दाचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने नाटकात लागतो." क्षितीशच्या मते, ही संकल्पना कोणत्याही एका विशिष्ट क्षेत्रापुरती मर्यादित नसली तरी, "बोलविता धनी म्हणजे बोलणारा किंवा कृती करणारा ...

सायकोलॉजिकल थ्रिलर असलेल्या "मॅजिक" चित्रपटाचा रंजक टीजर सोशल मीडियावर लाँच.

इमेज
अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट  महोत्सवात गौरवला गेलेला "मॅजिक" हा चित्रपट १ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. एन्काऊंटर स्पेशलिस्ट असलेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या आयुष्यात घडणाऱ्या उलथापालथींची एक रंजक गोष्ट  "मॅजिक"  चित्रपटात दाखविण्यात आली आहे. नुकताच या   चित्रपटाचा टीजर मराठी सिनेसृष्टीचे महानायक पद्मश्री अशोक सराफ आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला.     तुतरी व्हेेंचर्स या निर्मिती संस्थेच्या राजू सत्यम यांनी याआधी बॉलीवूड, तमिळ चित्रपटांची निर्मिती केली असून "मॅजिक" या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी सिनेसृष्टीत निर्माता म्हणून पाऊल टाकले आहे.  रवींद्र विजया करमरकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. योगेश विनायक जोशी, रवींद्र विजया करमरकर यांनी कथालेखन, तर योगेश विनायक जोशी, अभिषेक देशमुख यांनी पटकथा आणि संवाद लेखन केलं आहे. केदार फडके यांनी छायांकन, देवेंद्र भोमे, चिनार-महेश यांनी संगीत, महेश कुडाळकर यांनी कला दिग्दर्शकाची जबाबदारी निभावली आहे. चित्रपटात जितेंद्र जोशी एन्काउं...

50 मराठी चित्रपटांना 14 कोटी 62 लाख रुपयांचे अर्थसहाय्य.

इमेज
 Bआपण ज्या 50 चित्रपटांना सन्मानित करतो आहोत, तेही सामाजिक आशय, कलात्मक दर्जा आणि प्रयोगशीलतेमुळे वेगळे ठरले आहेत. 50 मराठी चित्रपटांना 14 कोटी 62 लाख रुपयांचे अर्थसहाय्य आपणास वितरित करत आहोत. ही केवळ आर्थिक मदत नसून सामाजिक आशय असलेल्या नावीन्यपूर्ण तंत्राचा वापर करणाऱ्या प्रेक्षकांच्या जाणीव जागृतीला हातभार लावणाऱ्या मराठी चित्रपटांना मदत करण्यासाठी शासन नेहमीच प्रोत्साहन देत आले आहे.फिल्म सिटीचा अंतिम आराखडा मंजूर झालेला आहे असेही सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी सांगितले. महाराष्ट्र कला अकादमीच्या प्रभादेवी येथील रविंद्र नाट्यमंदिरात ,सांस्कृतिक कार्य विभागाच्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे आयोजित दर्जेदार चित्रपटांना अर्थसहाय्य योजनेचा धनादेश वितरण सोहळा, गणेशोत्सव रिल्स स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चित्रपटाचे पोस्टर अनावरण या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री  अॅड.आशिष शेलार बोलत होते.     यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महा...

‘बाई अडलीये…म्हणूनच ती नडलीये!’ टॅगलाईन जीवंत करणारा ‘आशा’चा ट्रेलर प्रदर्शित.

इमेज
  काही दिवसांपूर्वी ‘आशा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आणि चित्रपटाच्या ‘बाई अडलीये…म्हणूनच ती नडलीये’ या प्रभावी टॅगलाईनमुळे टीझरने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली. त्यात रिंकू राजगुरू साकारत असलेली आशा सेविका सायकलवर बसून गावागावांतील लोकांपर्यंत पोहोचते, अशी काही झलक दाखवण्यात आली होती. या साध्या तरीही परिणामकारक दृश्यांनीच प्रेक्षकांच्या मनात आशाच्या प्रवासाबद्दल एक वेगळं कुतूहल निर्माण केलं.    याच उत्सुकतेला आणखी उधाण आलं ते, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘चालत रहा पुढे’ या प्रेरणादायी गाण्यामुळे. आशाच्या संघर्षाला ऊर्जा देणाऱ्या या गाण्याला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी आशाच्या जिद्दीची आणि धैर्याची स्तुती केली आहे आणि आता प्रदर्शित झालेला दमदार ट्रेलर ही उत्सुकता आणखीनच वाढवणारा ठरत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा आयुष्यमान भारत – मिशन महाराष्ट्र समिती अध्यक्ष डॅा. ओमप्रकाश शेटे, ज्येष्ठ साहित्यिक आणि ९९व्या आखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील आणि लोढा फाउंडेशनच्या अध्यक्षा मंजू मंगलप्रभात लोढा...

’कैरी’ चित्रपटातील सुबोध भावेची पोलिसाची भूमिका लक्षवेधी ठरणार मोठ्या पडद्यावर.

इमेज
पोलिसांची वर्दी सांभाळणं हे अर्थात अभिमानास्पद आहे. आणि हा अभिमान अभिनेता सुबोध भावेलाही जपावा असं नेहमी वाटायचं. बऱ्याच मुलाखतींमध्ये पोलीस व्हायचं स्वप्न होतं असं ते म्हणाले आहेत. आणि त्याचं हे स्वप्न ते अभिनय क्षेत्रात अभिनयाच्या वाटे पूर्ण करत आहेत. हो. आगामी 'कैरी' या मराठी चित्रपटात सुबोध भावे पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहेत. पोलिसांच्या भूमिकेत काम करायचं स्वप्न ते या चित्रपटाद्वारे पूर्ण करत आहेत. फॉरेन पोलिसांच्या भूमिकेत ते या चित्रपटात दिसले. याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली. ट्रेलरमधील त्यांची ही करारी भूमिका चाहत्यांना चित्रपटातील त्यांच्या भूमिकेची उत्सुकता वाढवत आहे.    ‘कैरी’ सिनेमातील भूमिकेबाबत बोलताना सुबोध भावे म्हणाले की, “यंदा हिवाळ्यातच आपणा सर्वांना कैरी चाखायला मिळणार आहे. आणि ही कैरी आंबट-गोड वा नेमकी कशी असणार हे मात्र १२ नोव्हेंबरला कळेल. कारण माझा ‘कैरी’ हा आगामी सिनेमा भेटीस येतोय. आणि मी या

चित्रपटातील पिता–कन्या नाते सत्यात; प्राजक्ता गायकवाडचे कन्यादान वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर यांच्या हस्ते.

इमेज
‘येसूबाई साहेब’ या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. कला, सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीने सोहळ्याची शोभा अधिक वाढली. प्राजक्ताचा विवाह हडपसर येथील सुप्रसिद्ध उद्योजक शंभूराजे खुटवड यांच्याशी वैदिक पद्धतीने झाला. भारतातील सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ व ज्योतिषी यांच्या हस्ते तसेच निर्माते व कलाकार श्री पिंपळकर यांच्या हस्ते भावपूर्ण कन्यादान विधी पार पडला. यापूर्वी त्यांनी प्राजक्ताच्या वडिलांची भूमिका काही चित्रपटांमध्ये साकारल्याने “चित्रपटातील नाते वास्तवात उतरण्याचा आनंद अवर्णनीय आहे” असे ते भावूक स्वरात म्हणाले.विधी दरम्यान श्री व सौ. पिंपळकर यांचे डोळे पाणावले. “काही नाती रक्ताच्या पलीकडे जाऊन ईश्वराच्या अधिष्ठानाने जुळतात” असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. प्राजक्ताचे आई-वडील तसेच मामा-मामी यांनीही कन्यादान विधीत सहभाग घेतला. “प्राजक्ताच्या रूपात आम्हाला लेकरू लाभले,” असे सौ. अश्विनी पिंपळकर यांनी सांगितले.    पारंपरिक वैदिक वातावरणात दिमाखदाररीत्या पार पडले...

'जनहित आधार हेल्प फंड' आयोजित दोन अंकी कॉमेडी नाटक 'गाव गोंधळ'...

इमेज
मुंबई हि मायानगरी मानली इथे हवशे नवशे येतात आणि आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असतात. तसाच प्रयत्न आपले पंजोबा, आजोबा मग वडील जसे मुंबईत पुर्वी एकत्रीत मिळून खोली घ्यायचे आणि मग त्यात सोबत रहायचे. एकमेकांना सुख-दुःखात आधार असायचा, आता तर महागाई आणि आजारपण येवढे भरमसाठ वाढले आहेत त्याला सिमा उरलीच नाही यात आपला बांधव, सहकारी भरडला जात असेल, त्याला मुंबईत वास्तव्य करण्यासाठी रहाण्याची सोय नसेल त्याला येणाऱ्या अडीअडचणीला अपेक्षित तात्काळ आर्थिक सहाय्य उपलब्ध होत नसेल तर त्याचा उदरनिर्वाह धकाधकीच्या जीवनात चालणार कसा, हाच मुळ गाभा लक्षात घेऊन दिनांक - १२ नोव्हेंबर २०१७ या वर्षी या जनहित आधार हेल्प फंड ची स्थापना करण्यात आली.     स्वप्न पहावित पण ती पुर्ण होतीलच असे नाहीत परंतु जनहित आधार हेल्प फंड याला अपवाद ठरला. त्यांनी स्वप्न पाहिले आणि ते साकार करण्यासाठी जिद्द धरली होती ती मुंबईत स्वत:च्या मालकी हक्काची एखादी खोली असावी आणि ते स्वप्न सत्यात उतरविले. विक्रोळी सुर्यनगर येथे जनहित आधार हेल्प फंड यांनी स्वतःच्या मालकीची खोली घेऊन पाहिलेले स्वप्न पुर्ण के...