गजेंद्र अहिरे यांच्या 'पप्याच्या पिंकीची लव्हस्टोरी' चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित....
कोणत्याही कलाकृतीचे शीर्षक ती कलाकृती जनमानसापर्यंत पोहोचविण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावते. जनप्रबोधनासोबतच मनोरंजनाचे सर्वात मोठे आणि आघाडीचे माध्यम असलेल्या चित्रपटांसाठीही शीर्षक खूप महत्त्वाचे असते. राष्ट्रीय पारितोषिक विजेते लेखक, दिग्दर्शक, गीतकार गजेंद्र अहिरे यांच्या आगामी चित्रपटाचे शीर्षकही रसिकांची उत्कंठा वाढविणारे आहे. नावीन्यपूर्ण विषय मनोरंजनाच्या सहाय्याने प्रेक्षकांसमोर मांडण्याची हातोटी असणाऱ्या गजेंद्र अहिरे यांच्या आगामी मराठी चित्रपटाचे शीर्षक 'पप्याच्या पिंकीची लव्हस्टोरी' आहे. शीर्षकावरून या चित्रपटाचवत एक प्रेमकथा पाहायला मिळणार असल्याचे अगदी सहजपणे लक्षात येते, पण या प्रेमकथेतील नाट्यमय वळणे प्रेक्षकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवतील. 'पप्याच्या पिंकीची लव्हस्टोरी'चे पहिले पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
'नीळकंठ मास्तर" या मराठी चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या अक्षर फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली निर्मात्या पायल पठारे आणि मेघमाला पठारे यांनी 'पप्याच्या पिंवvgtvyvकीची लव्हस्टोरी' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. गजेंद्र अहिरेंसारख्या सर्जनशील दिग्दर्शकाच्या हाती या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सोपविण्यात आली होती. हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. 'पप्याच्या पिंकीची लव्हस्टोर्गरी'चे पहिले पोस्टर नुकतेवच एनसीपीएमध्ये प्रदर्शित करण्यात आले. पोस्टर प्रकाशन सोहळ्याला अभिनेत्री, दिग्दर्शिका, लेखिका मृणाल कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. याखेरीज दिग्दर्शक, निर्माते व कलाकार-तंत्रज्ञांची संपूर्ण टिम उपस्थित होती.
प्रेम, मैत्री, गुन्हा आणि त्यागाची आगळीवेगळी गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळेल. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीतलेखन गजेंद्र अहिरे यांनीच केले असून, चित्रपटातील गीतांना संगीतसाजही त्यांनीच चढवला आहे. गजेंद्र अहिरे यांनी नेहमीच आपल्या चित्रपटांद्वारे नवनवीन विषय प्रेक्षकांसमोर आणले आहेत. 'पप्याच्या पिंकीची लव्हस्टोरी'च्या माध्यमातून ते एक अनोखीvvvv प्रेमकथा घेऊन आबीले आहेत. प्रेमकथेला सुमधूर गीत-संगीताची किनारही जोडली आहे. या चित्रपटाद्वारे एक नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्यांची केमिस्ट्री लक्षbjiibnñnnnb वेधणार आहे.
ऋषिकेश वांबूरकर, कश्मिरा, अमित रेखी, रिषी आणि अभिजीत दळवी यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. पं. शौनक अभिषेकी, आदर्श शिंदे आणि आनंदी vvvvजोशी यांनी 'पप्याच्या पिंकीची लव्हस्टोरी'मधील गाणी गायली आहेत. डिओपी कृष्णाvy सोरेन यांनी या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी केलीuu असून, ओमकार आर. परदेशी यांनी संकलन केले आहे. प्रशांत जठार आणि मंगेश जोंधळे या चित्रपटाचेvvvv कार्यकारी निर्माते असून, yjjलाia इन प्रोड्युसरvvv सूर्यकांत वड्डेपेल्लीi आहेतcv. दिप्ती जोशी विवूवआणि कश्मिरा यांनी नृत्य दिग्दर्शन, तर नाना मोरे आणि राजू येमूल यांनी कला दिग्दर्शन एक
केले आहे. रंगभूषा निकिता निमसे यांनी केली अk ई सून, पार्श्वसंगीत चैतन्य आडकर यांनी दिले आहे.v
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा