नूतन गुळगुळे फाऊंडेशन ची खास दिव्यांग आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी ‘अरोमा थेरपी व आयुर्वेदिक मसाज’ विशेष प्रशिक्षण कार्यशाळा.

समाजातील दिव्यांग तसेच सर्वसामान्य नागरिकांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने एक विशेष सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत 'नूतन गुळगुळे फाऊंडेशन' आणि 'इंडिविश वेल्फेअर फाउंडेशन' यांच्या संयुक्त विद्यमाने “अरोमा थेरपी आणि आयुर्वेदिक मसाज” या विषयावरील तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
   ही कार्यशाळा शुक्रवार, १३ मार्च ते रविवार, १५ मार्च २०२६ या कालावधीत दररोज सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत मुंबई जवळील स्वानंद, सेवा सदन, फॅक्टरी पाडा, अर्नाळा, विरार (जि. पालघर) येथे आयोजित करण्यात येणार आहे. समाजातील दिव्यांग तसेच सर्वसामान्य स्त्री-पुरुषांसाठी ही कार्यशाळा खुली असून त्यामध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांना अरोमा थेरपी व आयुर्वेदिक मसाज या क्षेत्रातील मूलभूत तसेच व्यावहारिक प्रशिक्षण दिले जाणार आहे.या उपक्रमामागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे दिव्यांग तसेच सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यविषयक कौशल्ये शिकवून स्वावलंबी बनवणे आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे हे आहे. कार्यशाळेचे ठिकाण स्वानंद, सेवा सदन, फॅक्टरी पाडा, अर्नाळा, विरार (पश्चिम), जि. पालघर असे आहे. या प्रशिक्षण कार्यशाळेसाठी नोंदणी आवश्यक आहे.
   या विशेष प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या इच्छुकांनी अधिक माहिती व नोंदणीसाठी ९८१९१४१९०६ / ९०८२६२४४६० या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"अंकुश" चित्रपटातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले यांचे सिनेनिर्मितीत पदार्पण.

'साजनभाई'च्या भूमिकेतील मंगेश देसाईचा रावडी लूक.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...