Posts

Showing posts from April, 2023

मकरंद माने दिग्दर्शित आगामी चित्रपटाची घोषणा...

Image
महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय वातावरणात बैलगाडा शर्यतींचे महत्त्व मोठे आहे. आता याच बैलगाडा शर्यतींचा जल्लोष चित्रपटात उडताना पाहायला मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक मकरंद माने यांच्या खिल्लार या आगामी चित्रपटात बैलगाडा शर्यत आणि त्याभोवतीचे वातावरण दाखवले जाणार असून, रिंकू राजगुरू आणि ललित प्रभाकर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.  न्युक्लिअर अॅरो पिक्चर्स या निर्मिती संस्थेतर्फे 'खिल्लार' या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. नगरसेवक संतोष भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त तळेगाव मावळ इथं झालेल्या पुणे जिल्हा केसरी भव्य २०-२० बैलगाडा शर्यतीवेळी 'खिल्लार' चित्रपटाची घोषणा करण्यात आली. तसंच चित्रपटाचं पहिलं पोस्टर लाँच करण्यात आलं. येत्या काही दिवसांत चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होणार आहे. चित्रपटाची कथा, कलाकार आदी तपशील टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात येईल.  मराठी चित्रपटसृष्टीत महत्त्वाचा दिग्दर्शक म्हणून स्थान निर्माण केलेल्या मकरंद मानेनं दिग्दर्शित केलेला रिंगण हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी ठरला होता. त्यानंतर म

'बधाई दो' मधील अपेक्षा पोरवाल उर्फ कोमल हिने तिच्या टीमच केल कौतुक !

Image
नुकतेच 68 व्या फिल्मफेअर पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत हा खास सोहळा पार पडला. राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांच्या ‘बधाई दो’ ने फिल्मफेअर मध्ये  अनेक पुरस्कार पटकावले.चित्रपटातील कोमल, सुमीचे (भूमी पेडणेकर) पहिले प्रेम ही व्यक्तिरेखा साकारणारी अपेक्षा पोरवाल हिने संपूर्ण टीमचे अभिनंदन करून एक खास मेसेज शेअर केला.       अभिनेत्री म्हणते, " फिल्मफेअरमध्ये अनेक पुरस्कार मिळवल्याबद्दल टीम बधाई दोचे खूप खूप अभिनंदन. या चित्रपटाचा एक छोटासा भाग असल्याबद्दल मी खूप आभारी आहे, हा एक संदेश देऊन जाणारा चित्रपट आहे जो  LGBTQI ची एक सुंदर कथा मांडतो "      ती पुढे पुढे म्हणते, "समलिंगी विवाह विधेयकावर SC मध्ये सध्या सुरू असलेले खटले पाहता, मला आशा आहे की हा चित्रपट नक्कीच समीक्षकांना सोबत प्रेक्षकांना सुद्धा काहीतरी छान संदेश देऊन जातो.       अपेक्षा पोरवाल सध्या स्लेव्ह मार्केट या इंग्रजी-अरबी वेब सीरिजचे नेतृत्व करणारी पहिली भारतीय म्हणून परदेशात चर्चेत आहे. ती सध्या स्लेव्ह मार्केटच्या पुढच्या सीझनवर आणि इतर अनेक प

मनाचे परिवर्तन करणाऱ्या 'अनलॉक जिंदगी'चे ट्रेलर प्रदर्शित...

Image
दोन वर्षांपूर्वी साऱ्या जगावर एक मोठे संकट आले, कोरोना महामारीचे. अवघ्या काही दिवसांतच या महामारीने जगभर हाहाकार माजवला. कोरोनाच्या विळख्यात आपण असे अडकलो की, संपूर्ण जग ठप्प झाले. शाळा, कॉलेजेस, ऑफिसेस, उद्योगधंदे, मंदिरे, दळणवळणाची साधने. संपूर्ण जगच थांबले. निर्मनुष्य रस्ते पाहून जीव घाबराघुबरा व्हायचा. लोकांचे एकमेकांना भेटणे थांबले. या महामारीत कित्येकांनी आपले प्राण गमावले, अनेकांचे भावनिक, आर्थिक, अशा सगळ्याच बाजूने नुकसानही झाले. आजही हे भयाण वास्तव आठवले, की अंगावर काटा येतो. लॉकडाऊनमधील ही परिस्थिती लवकरच आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. रियल रील्स प्रस्तुत, राजेश गुप्ता निर्मित, दिग्दर्शित 'अनलॉक जिंदगी' या चित्रपटाचे नुकतेच ट्रेलर लाँच झाले असून या चित्रपटात पितोबाश त्रिपाठी, राजेश गुप्ता, देविका दफ्तरदार, शिवानी सुर्वे, इंदिरा कृष्णा, हेमल देव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'अनलॉक जिंदगी'चे लेखन आणि संवादही राजेश गुप्ता यांचेच असून गीतकार नुसरत फतेही अली खान, राजेश गुप्ता आहेत.  ट्रेलरमधील पहिलाच सीन काळजाचा ठोका चुकवणारा आहे. यात एक स्

'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटाच्या प्रदर्शना बरोबरच केदार शिंदेच्या "बाईपण भारी देवा" या आगामी चित्रपटाचा टिझर झाला रीलीज....

Image
                  'बाईपण भारी देवा' आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकीच्या विश्वाभोवती फिरणाऱ्या आई, आजी, सासू, काकी, मावशी, ताई, आत्या अशा साऱ्यांच्या भावना शेअर करणारा आहे. अर्थात चित्रपटाचं कथानक महिलांभोवती फिरणारं असलं तरी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक पुरुषालाही हा चित्रपट बरंच काही सांगून जाणार आहे. चित्रपटात सहा बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. काही कारणामुळे एकमेकींपासून विभक्त झालेल्या आणि स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात वेगवेगळ्या समस्यांना सामोऱ्या जाणाऱ्या या सहा बहिणींची कथा म्हणजे सर्वसामान्य आयुष्यातील सुपर वुमनची कथा आहे. आपल्या समाजात अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या महत्त्वपूर्ण भूमिका त्यांच्या-त्यांच्या पातळीवर बजावत असतात पण आपलंच कळत-नकळत त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. 'बाईपण भारी देवा' या चित्रपटातील अभिनेत्री समाजातील अशाच स्त्रियांचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहेत.  या चित्रपटाचा टीझर एका खास मुहूर्तावर रिलीज करण्यात आला आहे. आज २८ एप्रिल रोजी, केदार शिंदे यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'महाराष्ट्र शाहीर' महाराष्ट्रभरात रिलीज झाला असुन त्

‘चौक’ चित्रपटातील ‘जाळ जाळ’ गाणं झालं रिलीज, तर काही क्षणांत व्हायरल!

Image
सोशल मीडियावर म्हणा किंवा चौका-चौकात म्हणा... सध्या सगळीकडे फक्त ‘चौक’ चित्रपटाची जोरदार चर्चा चालू आहे. आता या चर्चेत आणखी भर पडली आहे ती म्हणजे या चित्रपटातील ‘जाळ जाळ झाला रे’ या गाण्यामुळे! हे गाणं नुकतंच रिलीज झालं आणि सगळ्यांच्या सोशल मीडियावर दिसू लागलं... त्यामुळे चौकची वाट बघणाऱ्या प्रेक्षकांमध्ये आणखी उत्सुकता निर्माण झाली आहे.   ‘जाळ जाळ झाला रे’ या गाण्याचे संगीत, शब्द आणि भन्नाट डान्स यामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसतंय. एका समारंभात सर्वजण जल्लोष करत आहेत, उत्साहाने नाचत, आनंद व्यक्त करत आहेत. प्रविण तरडे, उपेंद्र लिमये, किरण गायकवाड आणि संस्कृती बालगुडे हे कलाकार ‘जाळ जाळ झाला रे’वर थिरकताना दिसत आहेत. या गाण्याच्या संगीतामुळे विशेष लक्ष वेधलं असून, संगीतकार ओंकारस्वरूप यांनी या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे, तर डॉ. विनायक पवार यांच्या भन्नाट शब्दांनी अगदी सगळ्यांना नाचायला भाग पाडलं आहे. तसेच, नागेश मोरवेकर यांच्या हटके स्टाईल गायनामुळे हे गाणं खूप व्हायरल होतंय. या गाण्याचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे, यातील डान्स! प्रसिद्ध नृत्यदिग्दर्

'सरी'च्या कलाकारांनी दिले गरजूंना सरप्राईस...

Image
'लाईफ इज फुल्ल ऑफ सरप्राइजेस अँड मिरॅकल्स'. या ओळीचा अनुभव प्रत्येकाच्या आयुष्यात एखाद्या निमित्ताने येतोच. हे सरप्राइजेस आणि मिरॅकल्स कधी चेहऱ्यावर हसूही आणतात तर कधी आसूही. असेच एक सुखद सरप्राईज नुकतेच 'सरी' चित्रपटाच्या कलाकारांनी दिले. मुंबई परिसरातील काही गरजुंना अन्नधान्याच्या वाटपाचे सरप्राईज देऊन त्यांनी गरजूंच्या चेहऱ्यावर हसू आणले. नुकताच हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाला आहे. ज्याप्रमाणे या कलाकारांनी या गरजूंना सुखद धक्का दिला तसाच सरप्राइजेस आणि मिरॅकल्सने भरलेला अशोका के. एस. दिग्दर्शित 'सरी' हा चित्रपट येत्या ५ मे रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. कॅनरस प्रॉडक्शन्स प्रस्तुत, डॉ. सुरेश नागपाल आणि आकाश नागपाल निर्मित या चित्रपटात  अजिंक्य राऊत, रितिका श्रोत्री, पृथ्वी अंबर, मृणाल कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  चित्रपटातील कलाकारांनी फुटपाथवर राहणाऱ्या गरजूंना त्यांच्या नकळत अन्नधान्यांची भरलेली पिशवी दिली. ज्या वेळी ही गोष्ट त्यांना कळली, त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद समाधान देणारा होता. याबद्दल अभिनेता अजिंक्

अभिनेते शंतनू मोघे परतले “सफरचंद” मध्ये......

Image
सरगम + अमरदीप निर्मित ,  कल्पकला प्रकाशित ,  निर्माते भरत नारायणदास ठक्कर ,  प्रविण भोसले व अजय कासुर्डे यांच्या “सफरचंद” या नाटकाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गुजरातीतल्या प्रसिद्ध लेखिका स्नेहा देसाई यांच्या मूळ ‘सफरजन’ नाटकाचे रूपांतर मराठीत मुग्धा गोडबोले यांनी “सफरचंद” या नावाने केले असून राजेश जोशी यांनी कमालीचे दिग्दर्शन केले आहे. एक वेगळा विषय या नाटकात मांडला असून सर्वधर्म समभाव हा एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. एक भव्य दिव्य नाट्यनिर्मिती म्हणून या नाटकाने रंगभूमीवर कमाल केली आहे. हुबेहूब काश्मीर प्रत्यक्षात रंगमंचावर अवतरला असून फिरता रंगमंच ,  भव्य नेत्रसुखद नेपथ्य ,  त्या वातावरणाला साजेसं मधुर संगीत ही या नाटकाची उल्लेखनीय बाजू आहे. या नाटकातील उत्कृष्ट अभिनयामुळे अभिनेते शंतनू मोघे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असून संजय जामखंडी ,  प्रमोद शेलार ,  अमीर तडवळकर ,  रूपेश खरे ,  अक्षय वर्तक ,  राजआर्यन कासुर्डे या कलाकारांनीही चोख भूमिका साकारल्या आहेत. या नाटकाला आत्तापर्यंत म. टा. सन्मान सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना भौतेश व्यास, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत

पॉवरहाऊस परफॉर्मर राजकुमार रावने आणखी एक प्रतिष्ठित सन्मान पटकावला !

Image
राजकुमार रावने त्याचा चमकदार कामगिरीसह 2023 मध्ये अनेक पुरस्कार पटकावले आहेत. काही खास पुरस्कारांनी सन्मानित झाल्यानंतर बी-टाउनच्या शेपशिफ्टरने GQ मोस्ट इंफ्लुशियल यंग इंडियन्स अवॉर्ड पटकावला. अशा प्रतिष्ठित विजयांसह चाहत्यांनी आता अभिनेत्याला 'राजकुमार वाह' असे संबोधण्यास सुरुवात केली आहे कारण अभिनेता कोणतीही कसर सोडत नाही आणि मजबूत कथा आणि आणखी उत्तम काम करत आहे. भूमी पेडणेकर सह-अभिनेत्री अनुभव सिन्हा यांच्या भिडमधील त्यांच्या दमदार आणि प्रभावी अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले. Bheed हा 2023 चा सर्वात समीक्षकांनी प्रशंसित चित्रपट बनला आहे. राव यांनी अलीकडेच त्यांच्या बहुप्रतिक्षित Stree 2 च्या रिलीजची तारीख जिओ स्टुडिओ इव्हेंटमध्ये त्यांच्या टीमसोबत भव्य पद्धतीने जाहीर केली. 2023 मध्ये राव यांच्याकडे मिस्टर आणि मिसेस माही, गन्स आणि गुलाब आणि श्रीकांत बोल्ला यांचा बायोपिक देखील आहे; ज्याचा टीझर नुकताच रिलीज झाला. राजकुमार याचे आगामी प्रोजेक्ट्स बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

'मानाचि' संघटनेचा ८ वा वर्धापनदिन ६ मे ला....

Image
'मानाचि लेखक संघटना' आपला ८ वा वर्धापनदिन, शनिवार ६ मे २०२३ रोजी, सायं ६.०० वा. रवींद्र नाट्य मंदिर (मिनी थिएटर) येथे साजरा करीत आहे. या कार्यक्रमात २०२२ सालात विविध माध्यमात प्रशंसनीय लेखन करणाऱ्या लेखकांचा सन्मान केला जाणार आहे. तसेच, आदरणीय नाटककार व पटकथाकार श्री. गंगाराम गवाणकर यांना  'लेखन कारकीर्द सन्मान पुरस्कार’ दिला जाणार आहे. या समारंभाला वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांचे संपादक, पुस्तकांचे प्रकाशक, मालिका नाटक चित्रपटांचे निर्माते आणि दूरदर्शन वाहिन्यांचे कार्यक्रम अधिकारी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. ‘मानाचि लेखक संघटना’ मराठी भाषेतील मालिका, नाटक व चित्रपटांच्या हौशी व व्यावसायिक लेखकांची संघटना असून, २०१६ पासून रजिस्टर्ड कंपनी म्हणून सर्व माध्यमात लेखन करणाऱ्या कवी व लेखकांच्या उत्कर्ष व सन्मानासाठी कार्यशील आहे. १५० हून अधिक लेखक सभासद असलेली 'मानाचि' संघटना, परस्पर संवादातून लेखकांच्या समस्यांचे निराकरण करून, त्यांना यथोचित ‘मान’ व ‘धन’ ही मिळावे, यासाठी सदैव जागरूक व कार्यरत आहे.

प्रत्येकाला ठेका धरायला लावणार 'फकाट'मधील 'भाई भाई' ....

Image
१९ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या श्रेयश जाधव दिग्दर्शित 'फकाट' या चित्रपटातील 'भाई भाई' हे भन्नाट बोल असलेले आयटम साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले असून हे गाणे हेमंत ढोमे, सुयोग गोऱ्हे, जॅाली भाटिया आणि नितेश चव्हाण यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. हटक्या चालीवर आपोआप थिरकायला लावणारे हे गाणे हर्षवर्धन वावरे आणि आदित्य पाटेकर यांनी गायले असून या गाण्याला हर्षवर्धन वावरे, करण वावरे आणि आदित्य पाटेकर (ट्रिनिटी ब्रदर्स) यांचे बोल आणि संगीत लाभले आहे. तर या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन सुजित कुमार यांनी केले आहे.  या गाण्यात हेमंत, सुयोग आणि नितेश एकदम जल्लोषात नाचताना दिसत असून जॉली भाटियाच्या कातिल अदांनी ते घायाळ झाले आहेत. या गाण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा सुयोगचे नृत्यकौशल्य पाहायला मिळत असून हेमंत आणि नितेशनेही एकदम फकाट डान्स केला आहे. या गाण्यात दिग्दर्शक श्रेयश जाधवचीही झलक पाहायला मिळत आहे. एकंदरच हे उत्स्फूर्त गाणं प्रत्येकाला ठेका धरायला लावणारे आहे.  या गाण्याबद्दल दिग्दर्शक श्रेयश जाधव म्हणतात, " हे उत्साहाने भरलेले गाणे प्रत्येकाला नाचायला लावणार

स्टोरिटेलच्या ऑडिओ बुक्समध्ये!अविनाश नारकर यांच्या धीरगंभीर आवाजात 'झोंबी..

Image
आपल्याला पुल देशपांडेंबद्दल माहिती आहे ,  त्यांच्याविषयी प्रेम ,  आवड आणि आस्था आहे. कोट्याधीश पुल म्हणून ते प्रसिद्ध आहेत कारण त्यांच्या शाब्दिक विनोद आणि त्यांच्या अनेक कोट्या या प्रसिद्ध आहेत. साधारण एप्रिल महिना हा सुट्ट्यांचा असतो ,  मोकळा असतो आणि सांस्कृतिक वातावरणदेखील सुरु झालेले असेते. एप्रिल मे मध्ये अनेक उपक्रम होत असतात. त्यातूनच संपूर्ण महिनाभर चालेल असा उपक्रम करावा करण्याचे  ' स्टोरीटेल ' ने ठरविले. त्यानुसार  ' एप्रिल पुल '  ही संकल्पना राबवली  जात आहे. पुल देशपांडे हे अख्या विश्वातील मराठी रसिकांचे लाडके व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या साहित्याने अबालवृद्धांना वेड लावलेलं आहे. सहज सध्या प्रसंगांतून ,  व्यक्तिचित्रांतून विनोद निर्मिती करून पुलंनी सर्वांचे निखळ मनोरंजन केले आहे. त्यांच्या अनेक लोकप्रिय कथा मातब्बर नामवंत कलावंतांच्या आवाजात स्टोरिटेलवर ऐकताना रसिकांना खळखळून हास्यानंद मिळत आहे.  ' एप्रिल पुल '  या संकल्पनेला रसिकांनाच भन्नाट प्रतिसाद लाभत असून दर काही दिवसानी प्रकाशित होणारे नवे  ' ऑडिओ बुक्स '  ऐकण्यासाठी त्यांना

अमित सधने तब्येतीला प्राधान्य देत सात महिन्यांच्या शूटिंगनंतर घेतला ब्रेक....

Image
ब्रीथ फेम अभिनेता अमित सध हे अनेक दमदार भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध आहेत. Breath इनटू द शॅडोज (सीझन 1 आणि 2), इन्स्पेक्टर कबीर सावंत म्हणून, किंवा अव्रोध: द सीज विदिन, मेजर विदीप सिंगच्या भूमिकेत, अमित साधने नेहमीच अफलातून भूमिका केल्या आहेत. त्याच्यासारख्या अभिनेत्यांसाठी मानसिक आरोग्य सांभाळून काम करण तितकच महत्त्वाच आहे. मानसिक आरोग्य राखण्यासाठी ब्रेक घेणे आणि कामापासून डिस्कनेक्ट करणे आवश्यक आहे. अभिनेत्याने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितलं की, "मी सलग सात महिने सतत काम करत आहे. माणूस म्हणून, आम्हाला स्वतःशी पुन्हा कनेक्ट होण्यासाठी स्वतः साठी वेळ हवा आहे. मी रिचार्ज होऊन पुन्हा काम करण्यासाठी सज्ज होतो " मानसिक आरोग्याला प्राधान्य देणारा अभिनेता अमित सध अस म्हणतो.      ते पुढे म्हणाले, “मी झाडांना स्पर्श करून, थंड तलावांमध्ये पोहणे आणि अनोळखी लोकांकडे बघून हसून ज्यांच्यामुळे जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. मी पर्वतांना माझा देव आणि निसर्गाला माझी आई म्हणतो कारण मी कालांतराने ही पद्धत विकसित केली आहे. माझी आवडती ओळ आहे- पृथ्वी एक शिक्षक आहे.      हे लक्षात ठ

'अफवाह' च्या निर्मात्यांनी 'आज ये बसंत' हे खास गाणं रिलीज केलं.

Image
अफवाहच्या ट्रेलरचे नुकतेच अनावरण करण्यात आले आणि त्याला प्रचंड प्रेम आणि प्रशंसा मिळाली. सुधीर मिश्रा दिग्दर्शित चित्रपट मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अफवाहमध्ये भूमी पेडणेकर, नवाजुद्दीन सिद्दीकी, सुमीत व्यास आणि शरीब हाश्मी यांची पॉवरपॅक स्टारकास्ट आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर, आफ्वाहच्या निर्मात्यांनी आता 'आज ये बसंत' चित्रपटातील गाणे रिलीज केले आहे. हे गाणे शमीर टंडनने संगीतबद्ध केले आहे. सुनेत्रा बॅनर्जी यांनी गायलेले हे गाणे डॉ. सागर यांनी लिहिले आहे.     हे गाणे ट्रेलरमधून खास गोष्टी दाखवत आहे. हे गाणं 'अफवाह'च्या आफ्टर इफेक्टबद्दल बोलते ज्यामुळे संपूर्ण शहर भूमी पेडणेकर आणि नवाजुद्दीन सिद्दीकीचा पाठलाग करते. सर्व गोंधळात त्यांच्या जीवनासाठी ही एक खडतर लढाई आहे.     अफवा लोकांना जीवघेण्या परिस्थितीत कसे आणू शकतात, हाहाकार माजवू शकतात आणि वणव्यासारख्या अफवा कशा पसरू लागतात आणि तुमचा पाठलाग करणे थांबवत नाही अशा अक्राळविक्राळ गोष्टी कशा प्रकारे पसरतात हे दाखवते.     सुधीर मिश्रा दिग्दर्शित या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी, भूमी पेडणे

लॉकडाऊनच्या आठवणींना उजाळा देणारा 'अनलॉक जिंदगी'

Image
एक ड्राइव्हर, एक व्यावसायिक, दोन हतबल स्त्रिया आणि एक शव. हे चित्र आहे दोन वर्षांपूर्वीचे म्हणजेच लॉकडाऊनमधील. हीच परिस्थिती पडद्यावर पाहायला मिळणार आहे 'अनलॉक जिंदगी' या हिंदी चित्रपटातून. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक राजेश गुप्ता असून रियल रील्स प्रस्तुत या चित्रपटात पितोबाश त्रिपाठी, राजेश गुप्ता, देविका दफ्तरदार, शिवानी सुर्वे, इंदिरा कृष्णा, हेमल देव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. लेखन आणि संवादही राजेश गुप्ता यांचेच असून गीतकार नुसरत फतेही अली खान, राजेश गुप्ता आहेत.   लॅाकडाऊनच्या काळात एकमेकांशी संपर्क साधणे कठीण होते, इतकेच काय रक्ताची नातीही या काळात नकळत दुरावत होती. अंगावर काटा आणणाऱ्या या भयाण वास्तवाचे चित्रण या चित्रपटात दिसणार आहे. काही नकारात्मक बाजू दिसत असल्या तरी या काळात काही सकारात्मक बदलही माणसात घडत होते. त्यांची विचारसरणी बदलत होती. नात्यांचे महत्व उमगत होते. या जमेच्या बाजूही या चित्रपटात दिसणार आहेत. पोस्टरमध्ये एक मुलगी आईचे सांत्वन करताना दिसत असून एक ॲम्बुलन्सही दिसत आहे

‘परिनिर्वाण'मधून उलगडणार नामदेव व्हटकर यांच्या आयुष्यातील संघर्षमय प्रवास.

Image
     भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्यायमंत्री, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. दलितांचा उद्धारकर्ता अशीही त्यांची ओळख आहे. त्यांचे एकंदरीत जीवन पाहता, आयुष्य मोठे असण्यापेक्षा महान असायला हवे! ही ओळ त्यांना अतिशय अनुरूप ठरते. अशा या 'महामानवा'ने ६ डिसेंबर १९५६ रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अखेरच्या दर्शनाकरता व अंत्ययात्रेत सहभागी होण्याकरता प्रचंड प्रमाणात जनसागर उसळला होता. या मन हेलावणाऱ्या क्षणाचा एक असा साक्षीदार आहे, जो विषमतेच्या वणव्याला न जुमानता, अनेकांना प्रेरणा देत, डौलाने घट्ट उभा राहिला. अशा या महावृक्षाच्या परिनिर्वाणाची गोष्ट आपल्याला आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. कल्याणी पिक्चर्स प्रस्तुत, कल्याणी पिक्चर्स आणि अभिता फिल्म्स प्रॅाडक्शन निर्मित ‘परिनिर्वाण’ हा चित्रपट एका अशा व्यक्तिमत्वावर आधारित आहे, ज्याने आपल्या ‘नॅशनल हिरो’साठी एक असामान्य पाऊल उचलले. नामदेव व्हटकर असे या सामान्य व्यक्तिमत्वाचे नाव असून ही व्यक्तिरेखा प्रसाद ओक साकारणार आहेत. नुकत्याच एका भव्य सोहळ्यात ‘परिनिर्वाण’च्या मोशन पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

अंगावर रोमांच आणणारा 'बलोच'चा भव्यदिव्य ट्रेलर भेटीला...

Image
बलुचिस्तानात झालेल्या लढाईत मराठ्यांना पराभव स्वीकारावा लागला, गुलामगिरी पत्करावी लागली. सळसळतं रक्त मराठ्यांना शांत बसू देत नव्हतं, आपली हार सहजासहजी स्वीकारतील ते मराठे कसले? बलुचिस्तानातील गुलामगिरीवर मात करून जिद्दीने विजयाचा झेंडा अटकेपार रोवणाऱ्या मराठ्यांच्या रोमांचकारी लढाईवर आधारित 'बलोच' या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा दिमाखदार सोहळा नुकताच संपन्न झाला. या वेळी भव्य रांगोळी, तुतारी, ढोल ताशाच्या गजरात, मराठमोळ्या, राजेशाही थाटात उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.    काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या टीझरनंतर या चित्रपटातील 'खुळ्या जिवाला आस खुळी' हे पहिलं प्रेमगीत प्रदर्शित झाले होते. यावरून या चित्रपटात एका मराठ्याचे निरागस प्रेम तर दुसरीकडे बलुचिस्तानचे रोमांचकारी युद्ध अनुभवायला मिळणार आहे. ‘बलोच’चा टिझर अंगावर शहारे आणणारा आहे. चित्रपटातील दमदार संवाद मनाला भिडणारे आहेत. एका मराठी लढवय्याची आणि त्याच्या सहकाऱ्यांची ही कहाणी आहे. गुलामगिरी पत्करूनही त्यांनी हार मानली नाही. त्यांचा हा विजय म्हणजे ‘बलोच’. चित्रपटाच्या ट्रेलरवरून चित्रपटाची भव्यता कळ

सचिनचा ५० वा वाढदिवस झाला ‘स्पेशल’!'तेंडल्या' चित्रपटाच्या टीमने दिली अनोखी मानवंदना....

Image
  सचिनचा वाढदिवस म्हटलं की त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साह संचारल्याशिवाय राहत नाही. सचिनवर असलेलं आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याचे चाहते दरवर्षी आपापल्या पद्धतीने सचिनचा वाढदिवस साजरा करत असतात. यंदा सचिनचा ५० वा वाढदिवस सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या औंढी गावातल्या ग्रामस्थांनी अनोख्या पद्धतीने साजरा करत सचिनला भन्नाट मानवंदना दिली आहे. सचिनच्या वाढदिवसाचा अक्षरशः उत्सव करत या मंडळींनी सचिनवरचं आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. प्रत्येक घराच्या दारात रांगोळी, दरवाज्यावर बॅटच्या गुढी आणि विशेष म्हणजे ढोलताशांच्या गजरात सचिन तेंडुलकरचा मोठा कटआऊट तयार करून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली आणि वडापावचा नैवैद्य दाखवण्यात आला होता. ‘सचिन’ म्हटलं की काही गोष्टी समोर दिसायला लागतात. क्रिकेटवेड्या फॅन्सनं खचाखच भरलेलं स्टेडियम आणि 'सचिन... सचिन...'चा तो नारा... सचिनने प्रत्येकाला स्वप्न बघायला शिकवलं. स्वप्नांचा पाठलाग करायला शिकवलं. त्याच्या या शिकवणीने प्रेरित होऊन त्याच्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या काही चाहत्यांनी आपला स्वप्नांचा प्रवास पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे त्

२२ जूनला 'बॅक टू स्कूल'

Image
शाळा... या वास्तुशी आपले सगळ्यांचेच एक भावनिक नाते जुळलेले असते. शाळेच्या पहिल्या दिवसापासून ते शाळेच्या शेवटच्या दिवसांपर्यंतच्या असंख्य आठवणी मनात कायमच कोरलेल्या असतात मग त्या चांगल्या असो वा कटू. प्रत्येकाची नाळ ही शाळेशी जोडलेली असतेच. शाळेच्या याच अविस्मरणीय आठवणींना उजाळा देण्यासाठी सतिश महादु फुगे घेऊन आले आहेत ' बॅक टू स्कूल'. रंगसंस्कार प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले असून यात चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. येत्या २२ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात सौरभ गोखले, निशिगंधा वाड, स्नेहा चव्हाण, सुरेश विश्वकर्मा, श्वेता पगार, आधिश पायगुडे, विपीन बोराटे, चंद्रकांत कुऱ्हाडे, सोमनाथ रसाळ, नितीन बनसोडे, अमृत झांबरे, अभिजित पटणे, रुपाली पाथरे, किरण झांबरे, डॉ. परिणिता पावसकर, मोहिनी कुडेकर, श्वेता कामत, सुप्रिया मागाडे, यशा पाळणकर, भूमी दळी, ईशा अग्रवाल, प्रसाद कुलकर्णी, विराज जाधव,आयुष जगताप, तुषार गायकवाड, यश बिरे, रतनहरी फड, कैवल्य हरिश्चंद्रे, अजिंक्य गायकवाड, आर्या घारे, विशाखा अडसूळ, प्रगती पिंगळे, हिमांगी

१९ मे रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित होईल 'चौक'...

Image
सध्या सोशल मीडियावर ज्या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे अशा 'चौक' या चित्रपटाने एक विधायक पाऊल उचललं आहे. एप्रिल-मे मध्ये शाळांना सुट्या असल्याने अनेक मराठी चित्रपट या महिन्यांत प्रदर्शित होतात. ५ मे ला प्रदर्शित होणारा 'बलोच' आणि १२ मे ला प्रदर्शित होणारा 'रावरंभा' या चित्रपटांना उत्तम प्रतिसाद मिळावा आणि मराठी चित्रपटांची आपापसात स्पर्धा होऊ नये यासाठी बहुचर्चित चौक या चित्रपटाने एक कौतुकास्पद पाऊल उचललं आहे. चौक चित्रपटाने आपल्या प्रदर्शनाची १२ मे ही तारीख एक आठवडा पुढे घेतली आहे. आता हा चित्रपट १९ मे रोजी प्रदर्शित होईल.        मराठी चित्रपटांमधील स्पर्धा टळावी यासाठी या चित्रपटाने आपल्या प्रदर्शनाची तारीख पुढे घेत मराठी चित्रपटसृष्टीत एक उत्तम आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. सर्व मराठी चित्रपटांना प्रेक्षकवर्ग मिळावा यासाठी उचललं हे विधायक पाऊल आहे. दिग्दर्शक देवेंद्र अरुण गायकवाड, निर्माते दिलीप लालासाहेब पाटील आणि 'चौक'च्या सर्व टीमने आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे घेण्याचे ठरवले.        यासंदर्भात दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड म्हणा

"गेट टूगेदर' चित्रपटातील "आभास की भास" हे रोमँटिक गाणं अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर लाँच.....

Image
'आभास की भास की तुझा हा श्वास गं' असे शब्द असलेलं गेट टूगेदर या चित्रपटातलं रोमँटिंग गाणं अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर लाँच करण्यात आलं. अतिशय श्रवणीय संगीत, जावेद अली,  प्रियांका बर्वे यांचा आवाज या गाण्याला लाभला असून, उत्तम पद्धतीनं हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. येत्या १९ मे ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे  सतनाम फिल्म्स प्रस्तुत गेट टुगेदर या चित्रपटाची निर्मिती  समीर गोंजारी, संजय गोंजारी, आशिष धोत्रे यांनी केली आहे. चित्रपटाचं पटकथा लेखन आणि दिग्दर्शन सचिन धोत्रे, तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलं आहे. अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. तर एकनाथ गिते, त्रिशा कमलाकर, श्रेया पासलकर, इमरान तांबोळी, संजना काळे, मिताली कोळी, सुशांत कोळी, साकिब शेख आदींच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.  काही दिवसांपूर्वीच गेट टुगेदर या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला होता. तर आता पहिलं गाणं लाँच करण्यात आलं आहे. शालेय किंवा कॉलेज जीवनात एखाद्या मुलावर किंवा मुलीवर प्रेम असतं. पण काही ना काही कारणानं ते प्रेम यशस्वी होत न

‘मराठी बिगबॉस विजेता’ अक्षय केळकर आणि ‘नागपूर सुंदरी’ आकांक्षा साखरकर यांची ‘बोल हरी बोल’मध्ये भन्नाट केमिस्ट्री!....

Image
हिंदी, मराठीसह प्रादेशिक तसेच विदेशी मनोरंजन क्षेत्रात आपला प्रभाव निर्माण करणाऱ्या ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट’ने नुकतेच ‘अल्ट्रा झकास’ हे मराठी ओटीटी प्लॅटफोर्म सुरु करून अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली आहे. प्रत्येक आठवड्याला नवीन आणि झकास कन्टेंट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार असल्याचा शब्द पाळत, ‘अल्ट्रा झकास’ एक नवा कोरा मराठी चित्रपट रसिकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. मराठी बिगबॉस विजेता अभिनेता अक्षय केळकर, चतुरस्त्र अभिनेते रमेश वाणी आणि ‘नागपूर सुंदरी’ हा किताब मिळविणारी अभिनेत्री आकांक्षा साखरकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असणारा ‘बोल हरी बोल’ हा चित्रपट येत्या २८ एप्रिलपासून एक्स्क्लुझिवली ‘अल्ट्रा झकास’ या ओटीटी प्लॅटफोर्मवर पहायला मिळणार आहे. निर्माता सुशीलकुमार अग्रवाल यांच्या ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट’ची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाच दिग्दर्शन अमोल बिडकर यांनी केलं आहे. प्रेम, क्षमा आणि दुसऱ्या संधीची हृदयस्पर्शी कथा म्हणजे चित्रपट 'बोल हरी बोल'. स्वतःच्या सुखवाहू जीवनाची स्वप्न पाहताना, वडिलांकडून असलेल्या अपेक्

अभिनेत्री रिताभरी चक्रवर्ती हिच्या यशाची शिखरं पूर्ण करतेय !

Image
रिताभरी चक्रवर्तीचे स्टारडम वाढत आहे कारण ती धाडसी काम निवडून तिची वेगळी ओळख संपादन करतेय.        रीताभरी चक्रवर्ती मनोरंजन इंडस्ट्री मध्ये सध्या तिची अनोखी ओळख संपादन करतेय. तिच्या भूमिकांच्या धाडसी आणि अपारंपरिक निवडीमुळे ती सध्या काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करते आहे.तिने बंगाली आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे आणि प्रत्येक संस्कृती आणि भाषेतील बारकावे समजून घेण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे.       अशा प्रकारे तिला भारतातील विविध चित्रपट उद्योग आणि संस्कृतींशी जुळवून घेण्याच्या तिच्या क्षमतेचे श्रेय देणारी संपूर्ण भारतातील अभिनेत्री बनली आहे. रिताभरीने तिच्या अभिनयाच्या दृष्टीकोनात उल्लेखनीय अष्टपैलुत्व आणि अनुकूलता दर्शविली आहे, ज्यामुळे तिला देशाच्या विविध भागात स्वतःची एक ओळख निर्माण करण्यास मदत झाली आहे.       रोमँटिक थ्रिलर शेष थेके शुरू (२०१९) किंवा ब्रह्मा जानेन गोपन कोम्मोती (२०२०), जिथे ती एका महिला पुजाऱ्याची भूमिका करत आहे. प्रत्येक प्रकल्पासोबत, रिताभरीने एक अभिनेत्री म्हणून तिची बहुमुखी प्रतिभा दाखवून दिली आहे, ज्यात भावनिक खोली आणि सूक्ष्मता आवश्यक

'राम सेतू' आणि 'परमानु' च्या यशानंतर अभिषेक शर्माचा पुढचा चित्रपट अ‍ॅक्शन थ्रिलर असेल !

Image
अभिषेक शर्मा एक दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो ज्यांनी अशा प्रकल्पांवर काम केले आहे ज्यांना भारताच्या कानाकोपऱ्यातून समीक्षकांची प्रशंसा मिळाली आहे. वुहान विषाणूच्या सभोवतालच्या वादांवर प्रकाश टाकला जात असताना आणि यामुळे जागतिक महामारी कशी झाली याविषयी, आम्हाला अभिषेक शर्मा दिग्दर्शित चित्रपटाभोवती काही बातम्या आल्या आहेत. स्रोत असं सांगतात "अभिषेक शर्माने त्याच्या पुढील चित्रपटाची स्क्रिप्ट पूर्ण केली आहे जी वुहान व्हायरस जेव्हा जागतिक समस्या बनली तेव्हाच्या पार्श्वभूमीवर सेट केलेला एक थ्रिलर आहे. हा महामारीवरील चित्रपट नाही तर त्याऐवजी एक लार्जर दॅन लाइफ अॅक्शन ड्रामा आहे. कोविड विषाणूच्या मूळ कथेचा उलगडा करतो ज्याने संपूर्ण जग थांबवले. चित्रपटाबद्दल फारसे काही उघड केले गेले नाही, परंतु चित्रपट इंडस्ट्री मधल्या  लोकांच्या मते हा एक मोठ्या प्रमाणावर संपूर्ण भारतातील चित्रपट आहे जो वुहान लॅब लीक सिद्धांताची तपासणी करण्याचा मानस आहे. उत्कंठावर्धक कथा. हा बनवलेल्या सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक असणार आहे आणि आम्ही ऐकतो की महावीर जैन या चित्रपटाच्या निर्मितीसाठी सोबत आले आह

नागराज मंजुळे यांचा “सैराट” नंतरचा मराठी चित्रपट, सादर केली "खाशाबा"ची पहिली झलक !

Image
 काही दिवसांपूर्वी जिओ स्टूडियोजतर्फे त्यांच्या एकूण १०० चित्रपटांची मोठी घोषणा करण्यात आली. यात मराठीमधील अनेक दर्जेदार अश्या चित्रपट आणि वेब शोजची घोषणा करण्यात आली.  यातील महत्वाची घोषणा म्हणजे नागराज मंजुळे यांचा दिग्दर्शक म्हणून फॅंड्री, सैराट नंतरचा तिसरा मराठी चित्रपट म्हणजे खाशाबा!  भारताला सर्वप्रथम वैयक्तिक ऑलिंपिक पदक मिळवून देणारा मराठमोळा कुस्तीपटू म्हणजे 'खाशाबा दादासाहेब जाधव’ यांच्याच जीवनावर आधारीत चित्रपटाची घोषणा नागराजने आज आपल्या सोशल मिडियाच्या माध्यमातून "खाशाबा" चित्रपटाचे पोस्टर सादर करून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.  आतापर्यंत अनेक चित्रपट वेगवेगळ्या खेळांवर तसेच खेळाडूंवर बनविण्यात आले आहेत आणि ते बॉक्स ऑफिस वर यशस्वी ही होताना दिसतायत. आता मराठीतील पहिला असा भव्यदिव्य स्केलचा एका खेळाडूवर आधारित असा चित्रपट जिओ स्टुडिओज् घेऊन येत आहे.       नागराज मंजुळे म्हणतात की," सिनेमा हा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याबरोबरच त्यांना या खऱ्या, अस्सल मातीतील पण जागतिक नाव कमवणाऱ्या खेळाडूची खरी ओळख लोकांपर्यंत न्यायची आहे. प्रत्ये

'आले रे पोस्टर बॉईज २'ढोल ताशाच्या गजरात पोस्टरचे अनावरण ......

Image
  काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'पोश्टर बॉईज'ने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात एक सामाजिक विषय, त्याचे गांभीर्य न जाता विनोदी पद्धतीने चित्रपटात मांडण्यात आला. या धमाल कॉमेडी चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केल्यामुळेच चित्रपट सुपरहिट झाला. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळेच आता हे बॉईज पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अजय मयेकर दिग्दर्शित 'आले रे पोश्टर बॉईज २' या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली असून 'दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं' अशी टॅगलाईन असणाऱ्या या चित्रपटात पुन्हा एकदा दिलीप प्रभावळकर, हृषिकेश जोशी आणि अनिकेत विश्वासराव हे बॉईज पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचे भव्य पोस्टर लाँच ढोल ताशाच्या गजरात मुंबईतील दादर परिसरात करण्यात आले. यावेळी चित्रपटाच्या २५ फूट पोस्टरचे अनावरण करण्यात आले. संपूर्ण दादर परिसर यावेळी गर्दीने गजबजलेला होता.  'आले रे पोश्टर बॉईज २'चे पोस्टर पाहता यात तिघे बॉईज लंडनच्या रॉयल गार्डच्या रूपात दिसत आहेत. त्यामुळे यावेळी हे बॉईज लंडनमध्ये काह

‘ते’ खासगी क्षण झाल्यानंतर काय झालं? पाहा ‘ चिकटगुंडे २’चा दुसरा एपिसोड

Image
'भाडिपा' प्रस्तुत ‘चिकटगुंडे’चा पहिला सिझन एका अशा वळणावर येऊन थांबला जिथे प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती ती सिझन २ ची आणि अखेर ‘चिकटगुंडे २’ मागील शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. 'चिकटगुंडे २'च्या पहिल्या भागात कार्तिक (सारंग साठे) आणि आभा (श्रुती मराठे) यांच्यात फॅमिली प्लॅनिंग आणि प्रेग्नंसीवर चर्चा सुरू होती. या दरम्यान त्यांची लुटुपुटुची भांडणं, त्यांच्यातलं खट्याळ, खोडकर प्रेम पाहायला मिळाले होते. आता येत्या शुक्रवारी म्हणजेच २१ एप्रिल रोजी प्लॅनेट मराठी ओटीटीवर ‘चिकटगुंडे २’चा दुसरा एपिसोड प्रदर्शित होत असून यात सुहास (सुहास शिरसाठ) आणि गायत्री (स्नेहा माझगांवकर) दिसणार आहेत. एखाद्या कपलचे ‘ते’ खासगी क्षण जगासमोर आल्यावर सगळे जण त्याला एन्जॅाय करतात परंतु त्या कपलवर त्याचा काय परिणाम होतो, हे दुसऱ्या भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता त्यांच्या आयुष्यात आलेला दुरावा कमी होणार का आणखीन काही अडचणी त्यांचा दरवाजा ठोठवणार, हे या भागात पाहायला मिळणार आहे. दरम्यान सध्या आयपीएल फिव्हर असल्यामुळे ‘चिकटगुंडे २’च्या टीमने प्रमोशनच्या निमित्ताने आयपीएललाही

संतोष बनला 'जालिंदर'.......

Image
अभिनेता संतोष जुवेकरच्या रावडी किंवा सोज्वळ नायकाच्या भूमिकांना प्रेक्षकांनी नेहमीच पसंती दर्शवली आहे. आता प्रथमच एका ऐतिहासिक चित्रपटात वेगळ्या नकारात्मक भूमिकेत तो दिसणार आहे. आगामी ‘रावरंभा’ चित्रपटात ‘जालिंदर’ या भूमिकेत तो दिसणार आहे. संतोषने आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा अतिशय वेगळया धाटणीची ही  भूमिका आहे. कपटी स्वभावाचा जनावरांचा दलाल असलेला जालिंदर हा शत्रूंशी संधान बांधून कसे डावपेच रचतो? हे यात पहायला मिळणार आहे. निर्माते शशिकांत शीला भाऊसाहेब पवार आणि दिग्दर्शक अनुप जगदाळे ‘रावरंभा’ ही प्रेमकहाणी प्रेक्षकांसमोर आणली असून येत्या १२ मे ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.   ‘वेगवेगळ्या भूमिका करायला मिळणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्नं असतं’. ‘रावरंभा’ च्या निमित्ताने वेगळ्या धाटणीची भूमिका मला करायला मिळाली. निगेटिव्ह शेडची ही भूमिका असून मला स्वतःला ही व्यक्तिरेखा करायला खूप मजा आली. वेगवेगळ्या ऐतिहासिक कलाकृतीतून अशा व्यक्तिरेखांची ओळख होत असते. माझ्या आजवरच्या भूमिकांना रसिकांनी जे प्रेम दिलं. तेच प्रेम ‘जालिंदर’ ला मिळेल असा मला विश्वास आहे.   शशिका

‘चौक’ येतोय दणक्यात,....

Image
सध्या सगळीकडे एकाच चित्रपटाची चर्चा सुरू आहे, तो म्हणजे देवेंद्र गायकवाड दिग्दर्शित ‘चौक’! या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आणि तो रिलीज होता क्षणी सगळीकडे व्हायरल झाला आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच टीझरमुळे हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे.  टीझरची सुरूवातच भव्य गर्दीने होते. चौकाचं आणि गणेशोत्सवाचं एक वेगळंच समीकरण असतं. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने होणारी मैत्री, वाद, चर्चा हे सगळे चौकातले अविभाज्य विषय असतात. सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या चौक चित्रपटाची निर्मितीमूल्य या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमधून दिसून येतात. याशिवाय ट्रेलरमध्ये अनेक प्रसिद्ध चेहरे दिसत आहेत. प्रविण तरडे, उपेंद्र लिमये, रमेश परदेशी, किरण गायकवाड, स्नेहल तरडे, सुरेश विश्वकर्मा, संस्कृती बालगुडे, अक्षय टंकसाळे, शुभंकर एकबोटे, सुनिल अभ्यंकर, अंजली जोगळेकर असे अनेक कलाकार या चित्रपटात हटके भूमिकांमध्ये दिसतील. यामुळे मराठी प्रेक्षकांना पुन्हा एकदा मल्टिस्टारर चित्रपटाचा आनंद मिळणार हे नक्की! टीझरमध्ये लक्ष वेधून घेतलंय ते म्हणजे संवादांनी... सुरवातीला उपेंद्र लिमये यांचा ‘वाघ आहे व

प्रेमाच्या 'सरी'चा ट्रेलर प्रदर्शित ....

Image
आश्चर्य आणि चमत्कार या अशा दोन गोष्टी ज्याचा अनुभव आयुष्यात प्रत्येकाला कधीनाकधी तरी येतोच. म्हणूनच तर म्हणतात ना, 'लाईफ इज फुल ऑफ सरप्राईजेस अँड मिरॅकल्स'. याच सरप्राईजेस अँड मिरॅकल्सने भरलेल्या 'सरी' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अशोका के. एस. दिग्दर्शित या चित्रपटात अजिंक्य राऊत, रितिका श्रोत्री, पृथ्वी अंबर आणि मृणाल कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कॅनरस प्रॉडक्शन प्रस्तुत, डॉ. सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्मित हा चित्रपट येत्या ५ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.  आतापर्यंत झळकलेल्या टिझर, गाण्यांवरून यात प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळणार याची कल्पना आतापर्यंत आली असेलच. ट्रेलरमध्ये सुरुवातीलाच दिया (रितिका) ‘मला माझं पूर्ण जीवन तुझ्यासोबत घालवायचंय... आय लव्ह यू...’ म्हणताना दिसत आहे. आता हे वाक्य नक्की कोणासाठी आहे, रोहित (अजिंक्य) की आदी (पृथ्वी) साठी? रोहितवर मनापासून प्रेम करणाऱ्या दियाच्या आयुष्यात आदीही दिसत आहे. मात्र या तिघांच्याही प्रेमात अनेक चढउतार दिसत आहेत. आता तिघांच्या आयुष्यात आलेले हे सरप्राइजेस आणि मिरॅकल्स नेमके काय आहेत

सुधीर मिश्रा दिग्दर्शित आणि अनुभव सिन्हा निर्मित " अफवा " 5 मे 2023 रोजी रिलीज होणार.....

Image
नवाजुद्दीन सिद्दीकी आणि भूमी पेडणेकर या पॉवर परफॉर्मर्सच्या अपारंपरिक जोडीमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेणारा चित्रपट, अवफाने त्याचा ट्रेलर सोडला आहे आणि हा चित्रपट 5 मे 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते सुधीर दिग्दर्शित हा चित्रपट एक विलक्षण थ्रिलर आहे. मिश्रा आणि अनुभव सिन्हा यांनी दिग्दर्शित केले आणि एखाद्या अफवेमध्ये एखाद्याचे आयुष्य उलथापालथ करण्याची ताकद कशी असते याबद्दल बोलतो. सिरीयस मेन नंतर नवाजुद्दीनसोबत सुधीरची ही दुसरी आउटिंग आहे आणि ती आणखी एक शक्तिशाली आणि आकर्षक कथा आहे असे दिसते. या चित्रपटात सुमीत व्यास, टीजे भानू आणि शारिब हाश्मी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.       निर्माते अनुभव सिन्हा पुढे म्हणाले, "या महत्त्वाच्या चित्रपटासाठी सुधीरसोबत काम करणे हा एक समृद्ध अनुभव आहे. मला विश्वास आहे की 'अफवाह' हा एक अतिशय महत्त्वाचा चित्रपट आहे जो उच्च आशयाचे चित्रपट बनवण्याचे आमचे उद्दिष्ट पूर्ण करतो."      दिग्दर्शक सुधीर मिश्रा म्हणाले, "तुमचा पाठलाग करत असलेला राक्षस ही एक रक्तरंजित अफवा असेल तर? मुळात तुम्ही गोंधळलेले आहा

कँडी आय हिरोचे स्टिरिओटाईप च्या पलिकडे जाणारा अभिनेता नमाशी....

Image
नमाशी चक्रवर्ती बॅड बॉय सह-कलाकार अमरीनसह त्याच्या संस्मरणीय बॉलीवूड पदार्पणाची तयारी केली आहे. प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून, अभिनेता सिक्स पॅक अॅब्स असलेल्या क्लासिक बॉलीवूड नायकाचा स्टिरिओटाइप मोडत आहे आणि तो चॉकलेट बॉय आहे. बॅड बॉयच्या जाहिरातींसाठी असंख्य व्हिडिओ ऑनलाइन फ्लोटिंग केले आहेत आणि यातून हे सिद्ध झाले आहे की नमाशी एक प्रेक्षक अभिनेता आहे आणि त्याचे पदार्पण सामान्य पदार्पणापेक्षा वेगळे आहे. त्याचे वडील मिथुन चक्रवर्ती यांच्याशी त्याचे विलक्षण साम्य आता वाढले आहे आणि बॅड बॉयपासून सुरू झालेल्या इंडस्ट्रीमध्ये तो अविस्मरणीय आणि मोठा बनवण्यासाठी अभिनेता त्याच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आहे. ऑनलाइन रिलीज झालेल्या ट्रेलर आणि गाण्यांवरून, हे सांगणे नक्कीच आहे की नमाशी हा बॉलीवूडमधील त्याच्या प्रवासात मार्ग स्वीकारणारा पहिला नायक आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नमाशी चक्रवर्ती आणि अमरीन यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटात जॉनी लीव्हर, सास्वता चॅटर्जी, राजपाल यादव, राजेश शर्मा आणि दर्शन जरीवाला यांच्याही भूमिका आहेत. इनबॉक्स पिक्चर्स, बॅनरखाली अंजु

बोधत्री मल्टिमिडीयाचे आंतरराष्ट्रीय शोचे भारतीय रूपांतराने दर्शकांना केले आकर्षित.

Image
बोधत्री मल्टीमीडियाने स्थानिक बाजारपेठेसाठी विदेशी स्वरूपांचे यशस्वीपणे रूपांतर करून भारतीय मनोरंजन क्षेत्रात एक अग्रदूत म्हणून ओळख निर्माण केली आहे. प्रादेशिक संवेदनशीलतेसह आंतरराष्ट्रीय मनोरंजन थीमच्या त्यांच्या कल्पक संयोगामुळे त्यांना बरीच ओळख आणि लोकप्रियता मिळाली आहे. "क्लास" नावाच्या स्पॅनिश नाटक मालिकेचे भारतीय रूपांतर हे त्यांच्या सर्वात लोकप्रिय रुपांतरांपैकी एक आहे. हायस्कूलच्या मुलांच्या जीवनाचे वास्तववादी आणि संबंधित चित्रण आणि त्यांना येणाऱ्या अडचणी, बोधित्रीचे "क्लास" चे रुपांतर भारतीय दर्शकांना खूप आवडले. शोच्या मनमोहक कथानकाला आणि पात्रांना खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला, ज्यामुळे तो एक प्रचंड यशस्वी झाला आणि भारतीय OTT सामग्री क्षेत्रात अग्रणी म्हणून बोधित्रीचे स्थान मजबूत केले. बोधित्री मल्टीमीडियाचे संचालक मौतिक टोलिया सांगतात, "आम्ही भारतीय प्रेक्षकांसाठी आंतरराष्ट्रीय फॉरमॅट्सला अनुकूल बनवण्याच्या आमच्या क्षमतेबद्दल खूप समाधान मानतो. आमचा संघ मूळ फॉरमॅटचा आत्मा जपून ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करतो. भारतीय प्रेक्षकांना आकर्षित करते.

रेट्रो मूड ऑन करणारे 'फकाट'मधील तुझी माझी जोडी' प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला.

Image
श्रेयश जाधव दिग्दर्शित 'फकाट' चित्रपटातील सगळे कलाकार समोर आल्यानंतर या चित्रपटातील एक जबरदस्त गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'तुझी माझी जोडी' असे गाण्याचे बोल असणाऱ्या हर्षवर्धन वावरे आणि कस्तुरी वावरे यांनी गायले असून शांताराम नांदगावकर आणि हर्ष, करण, आदित्य या 'ट्रिनिटी ब्रदर्स' यांनी या गाण्याला शब्दबद्ध केले आहे. तर या गाण्याला 'ट्रिनिटी ब्रदर्स'चेच संगीत लाभले आहे. हेमंत ढोमे आणि अनुजा साठे यांच्यावर चित्रित करण्यात आलेले हे गाणे ऐंशीच्या दशकात नेणारे आहे. उडत्या चालीचे हे गाणे ऐंशीच्या काळातील सुपरहिट गाणे असून ते रिक्रिएट करण्यात आले आहे. हे रेट्रो लूकमधील गाणे पाहाताना आणि ऐकताना संगीतप्रेमींना त्याच काळात गेल्याचा अनुभव येईल.         या गाण्याबद्दल ट्रिनिटी ब्रदर्स म्हणतात,  "अनेक जुनी गाणी पुनर्रचित करून, ती नव्याने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे सध्या फॅड आहे. आम्हीही या गाण्यातून असाच प्रयत्न केला आहे. परंतु यात आम्ही या गाण्याला नवीन स्वरूपात न आणता अगदी जसेच्या तसे समोर आणले आहे, अगदी कलाकारांचे नृत्य, पेहरावही तसेच आह

योद्धाच्या प्रेमाची तरल भावना व्यक्त करणारे बलोच'मधील 'आस खुळी' प्रेमगीत प्रदर्शित.

Image
 मराठ्यांची शौर्यगाथा सांगणारा 'बलोच' या चित्रपटाविषयी अनेकांच्या मनात उत्सुकता आहे. अंगावर शहारा आणणाऱ्या टिझरनंतर या चित्रपटातील पहिले प्रेमगीत संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे. 'आस खुळी' असे या गाण्याचे बोल असून या श्रवणीय गाण्याला श्रेया घोषाल हिने स्वरबद्ध केले आहे. तर मनातील भावना अभिव्यक्त करणाऱ्या या सुमधुर गाण्याला गुरु ठाकूर यांचे शब्द लाभले असून नरेंद्र भिडे यांनी संगीत दिले आहे.  यापूर्वी प्रदर्शित झालेल्या 'बलोच'च्या पोस्टर, टीझरमध्ये प्रवीण तरडे एका लढवय्याच्या रूपात दिसत आहेत. तर या गाण्यात त्यांची एक वेगळीच बाजू पाहायला मिळत आहे. तर स्मिता गोंदकरही या गाण्यातून पहिल्यांदाच अशा अंदाजात दिसत आहे. प्रवीण तरडे आणि स्मिता गोंदकर यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या प्रेमगीतात नजरेतून प्रेमाच्या तरल भावना व्यक्त होत असून मिश्र भावनांचं सुरेख गुंफण दिसत आहे. नवरा -बायकोमधील विलक्षण प्रेम मनाला भावणारे आहे. एकाच वेळी आपल्या योद्धा नवऱ्याला खंबीर पाठिंबा देत असतानाच स्वारीवर जाण्यासाठी सज्ज झालेल्या आपल्या नवऱ्याला निरोप देताना अस्वथ झालेली पत्नीह

पॉवरहाऊस परफॉर्मर राजकुमार रावसाठी पुरस्कारांचा वर्षाव !

Image
राजकुमार राव यांच्यासाठी सन्मानाचा वर्षाव होत आहे. हा अभिनेता त्याच्या अभूतपूर्व कामामुळे पुन्हा चर्चेत आला आहे ज्यामुळे त्याला प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. "  व्हर्सेटाइल टॅलेंट ऑफ द इयरचा " किताब त्याने पटकावला. राजकुमारने अलीकडेच एका प्रतिष्ठित अवॉर्ड शोमध्ये बॉलीवूड हंगामा अवॉर्ड्समध्ये 'मोस्ट स्टायलिश यूथ आयकॉन' आणि त्यानंतर 'सर्वोत्कृष्ट अभिनेता- ज्युरी' हा किताब पटकावला. भूमी पेडणेकर सह-अभिनेता अनुभव सिन्हा यांच्या भिडमधील त्याच्या दमदार आणि प्रभावी अभिनयामुळे राजकुमार चर्चेत आहे. राव यांनी अलीकडेच जिओ स्टुडिओ इव्हेंटमध्ये त्यांच्या बहुप्रतिक्षित Stree 2 ची रिलीजची तारीख देखील त्यांच्या टीमने मोठ्या दिमाखात जाहीर केली. 2023 साठी, राव यांच्याकडे मिस्टर आणि मिसेस माही, गन्स आणि गुलाब आणि श्रीकांत बोल्ला यांचा बायोपिक देखील आहे; ज्याचा टीझर नुकताच रिलीज झाला. सर्वच प्रकल्पांमध्ये रावची वेगळी भूमिका पाहायला मिळणार असून सर्वत्र राजकुमार ची चर्चा आहे.

मोहन जोशी आणि सविता मालपेकर गाजवणार रंगमंच...

Image
मराठी मनावर गारूड केलेलं 'गाढवाचं लग्न' हे वगनाट्य अभिनेते मोहन जोशी आणि अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या अफलातून अदाकारीनं गाजलं. आपल्या अभिनयातून हुकूमत दाखवत प्रेक्षकांचे दिलखुलास मनोरंजन करणाऱ्या या दोन ताकदीच्या कलाकारांची जोडी पुन्हा एकदा रसिकांचं मनोरंजन करायला एकत्र आली आहे. आगामी सुमी आणि आम्ही  या  नाटकातून   ही  जोडी पुन्हा रंगमंचावर एकत्र आली आहे. चित्रपट, मालिका, नाटक या तिन्ही माध्यमातून आपल्या समर्थ अभिनयाचा ठसा या दोघांनी उमटवला आहे. विशेष म्हणजे बऱ्याच वर्षांनी हे दोन मात्तबर कलाकार रंगभूमीवर दिसणार आहेत. राजस प्रोडक्शन्स आणि मायबोली चित्र निर्मित सुमी आणि आम्ही हे नाटक २२ एप्रिलला रंगभूमीवर येणार आहे. नाटकाचे निर्माते राजस संजय गोडसे, शैलेश राजे आहेत. राजन मोहाडीकर यांनी हे नाटक लिहिले असून पुरुषोत्तम बेर्डे यांनी दिग्दर्शित केले आहे.  आपल्या भूमिकेविषयी सांगताना मोहन जोशी सांगतात की  आनंद धडफळे ही व्यक्तीरेखा मी साकारतोय. सविता आणि पुरुषोत्त्तम यांच्यासोबत काम  करायला मिळतंय,  विशेष म्हणजे राजन मोहाडीकर या माझ्या मित्राने हे नाटक लिहिल्याने एक उत्त