महाराष्ट्र सदन,दिल्लीत रंगणार "मधुरव बोरु ते ब्लॉग"चा २५वा प्रयोग.
"राजभवन", "गेट वे ऑफ इंडिया" अशा ऐतिहासिक वास्तूमध्ये सादर केला गेलेला एकमेव मराठी नाट्य प्रयोग "मधुरव बोरु ते ब्लॉग" आता थेट दिल्ली येथे सादर होणार असून त्याचे निमित्त ही ख़ास आहे . "मधुरव बोरु ते ब्लॉग" चा २५ वा (रौप्य महोत्सवी) प्रयोग दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे येत्या ३ ऑगस्टला सायंकाळी ६:३० वाजता होणार असून दिल्ली मराठी प्रतिष्ठान यांच्यातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मराठी भाषेच्या जन्माची संगीतमय कहाणी! मराठी भाषेचा जन्म कसा झाला,मराठी भाषेचा रंजक इतिहास आणि त्यातली वेगवेगळी स्थित्यंतरे मधुरा वेलणकर आणि तिचे सहकलाकार नाट्य, नृत्य, संगीत या मनोरंजनाच्या माध्यमातून या कार्यक्रमातून सादर करतात. ज्या मराठीतून आणि ज्या मराठीसाठी आपण भांडलो,लढलो,एकत्र आलो त्या "मराठी" भाषेवरचा हा एकमेव नाट्यप्रयोग!मराठी भाषेतला किंवा मराठी नाट्य क्षेत्रातला हा एक अभिनव प्रयोग इतक्या मर्यादित दृष्टीने या कार्यक्रमाकडे न पाहता, मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळावा यासाठी मराठीची माहिती, मराठीची महती कळावी आणि मराठी वरचं प्रे