पोस्ट्स

मार्च, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

'चैत्र चाहूल'चे २०२४ चे ध्यास सन्मान, जेष्ठ रंगकर्मी अतुल पेठे आणि लोककलावंत मनोहर गोलांबरे यांना जाहीर.

इमेज
मुंबई:  'चैत्र चाहूल'तर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या 'ध्यास सन्मान' या पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. दीर्घकाळ सकस काम करणारा प्रयोगशील लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता म्हणून परिचित असलेले जेष्ठ रंगकर्मी अतुल पेठे तसेच गेली ४० वर्षाहून अधिक काळ संगीत क्षेत्रात वादक, गायक, संगीतकार, संगीत संयोजक म्हणून कार्यरत असलेले जेष्ठ लोक कलावंत मनोहर गोलांबरे यांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.  'चैत्र चाहूल'तर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या या विशेष 'ध्यास सन्माना'चे यंदाचे १७ वे वर्षे आहे. या सन्मानाचे स्वरूप शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व रोख रूपये पंचवीस हजार असे असून येत्या ९ एप्रिल रोजी गुढीपाडव्याला मराठी नववर्ष दिनी होणाऱ्या या सोहळ्यात जेष्ठ भाषा अभ्यासक राजीव नाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याचे संयोजक विनोद पवार व महेंद्र पवार यांनी सांगितले आहे. 'चैत्र चाहूल'मध्ये यंदा 'हॅलो इन्स्पेक्टर' ही 'सवाई गंधर्व' मध्ये प्रेक्षकांच्या पसंतीस पात्र ठरलेली एकांकिका सादर होणार असून शाहीर रामानंद उ...

सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधानच्या ‘लग्न कल्लोळ’चे 'अल्ट्रा झकास' मराठी ओटीटीवर जोरदार स्वागत.

इमेज
मुंबई : लवकरच लग्नसराईची धुमशान संपूर्ण महाराष्ट्रात सुरु होणार आहे. त्यापूर्वीच ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीने संपूर्ण महाराष्ट्रात जबरदस्त गाण्यांसाह सर्वत्र धुमाकूळ घातलेल्या ‘लग्न कल्लोळ’ या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर करून आपल्या ओटीटी प्रेक्षकांना सरप्राईज गिफ्ट दिले आहे. महाराष्ट्रातील चित्रपट रसिक प्रेक्षक हा सुवर्णयोग मनस्वी अनुभवत आहेत. श्रुती आणि अथर्व एकमेकांवर प्रेम करतात आणि ते लग्न करणार आहेत. श्रुतीला एक जुळी बहीण आहे, तिचे लग्न घटस्फोटाच्या उंबरठ्यावर आहे. जुळी असल्यामुळे श्रुती आणि तिच्या बहिणीची कुंडली सारखीच आहे, त्यामुळे अथर्व आणि श्रुतीचे लग्न होऊन घटस्फोट होण्याची शक्यता आहे. खरंच अशी घटना घडेल की घटनेला एक वेगळं वळण मिळेल? चित्रपटात सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान, ऐश्वर्या आहेर आणि सुप्रिया कर्णिक यांच्या प्रमुख भूमिका असून चित्रपट मोहम्मद बर्मावाला आणि मयूर तिरमखे यांनी दिग्दर्शित केला आहे. तसेच प्रिया बेर्डे, अमिता कुलकर्णी, प्रतिक्षा लोणकर आणि भारत गणेशपुरे हे लोकप्रिय कलाकारही चित्रपटात  दिसणार आहेत. “नवा विषय आणि नवा आशय असणारा ‘लग्न कल्...

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाच्या विशेष खेळाचे दिग्पाल लांजेकर यांच्याकडून आयोजन.

इमेज
ऐतिहासिक चित्रपटांतून शिवकार्य रुपेरी पडद्यावर साकारणाऱ्या लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांची छत्रपती शिवाजीमहाराजां प्रती असलेली निष्ठा सर्वश्रुत आहे. केवळ चित्रपटांतूनच नव्हे तर आपल्या कृतीतून आणि विचारांतून शिवकार्याचा प्रचार, प्रसार कायम करीत असतात. ब्रिटिशांच्या विरोधात बंड करून ज्यांनी स्वदेशीचा मंत्र दिला, त्या संघर्षाची, राष्ट्रभक्तीची स्मृती जागवणारे  स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अलौकिक कार्य व विचार भावी पिढी समोर यावे, याकरिता दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाच्या विशेष खेळाचे आयोजन पुण्यातील ‘स्वरूपवर्धिनी’ या आपल्या मातृसंस्थेसाठी नुकतेच केले. दिग्पाल लांजेकर  यांनी  मातृसंस्था स्व-रूपवर्धिनीच्या १५० वर्धकांना हा चित्रपट स्वखर्चाने दाखवला. या विशेष शो ला श्री.सात्यकी सावरकर आणि श्री.रणजित सावरकर हे सावरकरांचे वंशज आणि सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्षा श्रीमती मंजिरी मराठे, स्वरूपवर्धिनीचे उपाध्यक्ष शिरीष पटवर्धन, संस्थेच्या सहकार्यवाह व महिला विभाग प्रमुख  मंजुषाताई कुलकर्णी,  महिला विभागाच्या पालक पु...

कलाकारांची मांदियाळी असलेला 'जुनं फर्निचर' .

इमेज
सत्य - सई फिल्म्स आणि स्कायलिंक एंटरटेनमेंट प्रस्तुत 'जुनं फर्निचर' हा चित्रपट येत्या २६ एप्रिल रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टिझर लाँच सोहळा दिमाखात पार पडला. टीझरमधील महेश मांजरेकर यांच्या करारी व्यक्तिरेखेची झलक सर्वांनीच पाहिली. आता या चित्रपटातील इतर कलाकारही समोर आले आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून यात महेश मांजरेकर यांच्यासोबत मेधा मांजरेकर, उपेंद्र लिमये, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर आणि सचिन खेडेकर दिसत आहेत. पोस्टरमध्ये न्यायालय, न्यायधीश आणि काही कागदपत्रे दिसत आहेत, ज्यावर न्याय, हक्क, कायदा लिहिलेले आहे. त्यामुळे आता ही कोणती लढाई लढली जाणार आहे, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहूनच मिळणार आहे.  दरम्यान या चित्रपटात  समीर धर्माधिकरी, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब, शरद पोंक्षे यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. याव्यतिरिक्त या चित्रपटात ओंकार भोजने, शिवाजी साटम यांचीही झलक पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या चित्रपटात अनेक बड्या कलाकारांना एकत्र पाहाण्याची संधी मिळणार आहे....

'संघर्षयोद्धा' - मनोज जरांगे पाटील या चित्रपटात अजय गोगावले यांच्या आवाजात 'उधळीन जीव' हे हृदयस्पर्शी गीत.

इमेज
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपटाचा वेध "संघर्षयोद्धा - मनोज जरांगे पाटील" या चित्रपटातून घेतला जाणार आहे. घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. चित्रपटाच्या टीजर ला ही अफाट प्रतिसाद मिळाला आहे. गायक अजय गोगावले यांच्या आवाजात "उधळीन जीव..." हे हृदयस्पर्शी गाणं या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य ठरणार आहे. २६ एप्रिल रोजी "संघर्षयोद्धा" मनोज जरांगे पाटील हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. शिवाजी दोलताडे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी निभावलेली असून सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे. सहनिर्माते रामदास मेदगे, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे , नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत. तर डॉ.सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी...

तरुणाईच्या भरारीला झी युवाचं आकाश! रविवार ३१ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता झी युवा वाहिनीवर झी युवा सन्मान पुरस्कार सोहळा .

इमेज
आजची तरुणाई सतत नवीन शोध घेत आहे.ती ज्या क्षेत्रात काम करते तिथे मळलेल्या वाटेपेक्षा नवी वाट तयार करण्यासाठी धडपडत आहे. त्यातही थेट लोकांशी संबंधित असलेल्या क्षेत्रातील तरुणाईचं काम आणि त्यांच्यातील समाजभान हे कौतुकास्पद आहे. अशा तरुणाईचा चेहरा, त्यांच्या कामाची पावती समाजासमोर आणण्याची विधायक पाऊल उचललं आहे झी युवा या वाहिनीने. युवकांच्या मनातील संकल्पनांना आकार देणाऱ्या झी युवा वाहिनीकडून युवा सन्मान पुरस्काराच्या रूपाने मिळणारी शाब्बासकी नेहमीच सक्रिय तरुणाईचं बळ वाढवत आली आहे. यावर्षीही झी युवा सन्मान पुरस्काराच्या निमित्ताने समाजातील विविध १२ कार्यक्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या तरुणाईला झी युवा सन्मानचं आकाश मिळालं आहे. रविवार ३१ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता झी युवा वाहिनीवर झी युवा सन्मान पुरस्कार सोहळा प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्या सहकार्याने हा सोहळा प्रसारीत होणार आहे. यंदाच्या पुरस्कारांसाठी निवडण्यात आलेल्या तरुणांचं काम थक्क करणारं तर आहेच पण प्रचंड प्रेरणादायीही आहे. यंदाच्या झी युवा सन्मान ...

“अप्सरा” च्या निमित्ताने अभिनेत्री मेघा घाडगे आणि अभिनेते विट्ठल काळे एकत्र.

इमेज
नृत्य अभिनेत्री म्हणून आपली ओळख असलेल्या मेघा घाडगे यांनी अनेकदा सशक्त अभिनेत्री म्हणूनह स्वतःचा ठसा उमटवलाच आहे. आगामी ‘अप्सरा’ या चित्रपटात अभिनेत्री मेघा घाडगे आणि अभिनेता विट्ठल काळे झळकणार आहेत. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले. चित्रपटाच्या मोशन पोस्टरवरून चित्रपट हा रोमँटिक असावा असा प्राथमिक अंदाज बांधता येतो.     सुनील भालेराव यांच्या ‘श्रमण फिल्म्स’ या निर्मिती संस्थेतर्फे “अप्सरा” चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून, त्यांची ही पहिलीच निर्मिती आहे. चित्रपटसृष्टीत अनेक वर्षं कार्यरत असलेल्या चंद्रकांत पवार यांनी या चित्रपटाची  कथा, पटकथा आणि दिग्दर्शन केलं आहे. चंद्रकांत पवार यांनी दिग्दर्शक म्हणून यापूर्वी ‘विठ्ठला शप्पथ’ हा उत्कृष्ट चित्रपट दिला आहे. आता ‘अप्सरा’ या चित्रपटातून आणखी एक नवी गोष्ट घेऊन ते आपल्या भेटीस येत आहेत. त्यामुळे या चित्रपटाविषयी आता उत्सुकता आहे. चित्रपटातील अन्य कलाकारांची नावे अद्याप जाहीर केली नसली तरी लवकरच जाहीर होतील.   मेघा घाडगे यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भ...

'माहेरची साडी' चित्रपटाच्या यशानंतर विजय कोंडके यांचा नवा चित्रपट भेटीला,'लेक असावी तर अशी'.

इमेज
ज्येष्ठ दिग्दर्शक विजय कोंडके हे नाव घेतलं की, 'माहेरची साडी' हा चित्रपट डोळ्यांसमोर येतो. या चित्रपटाने मराठी चित्रपट उत्पन्नाचे सर्व उच्चांक मोडले. निर्मिती, वितरण आणि दिग्दर्शन अशी तिहेरी मुशाफिरी करत विजय कोंडके यांच्या  मराठी चित्रपटाने यशाचे आणि लोकप्रियतेचे नवे मापदंड निर्माण केले.  १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'माहेरची साडी' चित्रपटाच्या यशानंतर निर्माता-दिग्दर्शक विजय कोंडके यांनी ३४ वर्षानंतर पुन्हा एकदा नव्या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. विजय कोंडके यांची निर्मिती, दिग्दर्शन असलेला 'लेक असावी तर अशी' हा मराठी चित्रपट २६ एप्रिलला आपल्या भेटीला येतोय. 'ज्योती पिक्चर्स' निर्मित आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेन्टची प्रस्तुती असलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे.   सोंगाड्या, पांडू हवालदार, बोट लावीन तिथं गुदगुल्या, तुमचं आमचं जमलं, राम राम गंगाराम, आली अंगावर यांसारख्या दादा कोंडके यांच्या अनेक यशस्वी चित्रपटांच्या वितरणामध्ये विजय कोंडके यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. मराठी प्रेक्षकांची अभिरुची ओळखून त्यानुसार यशस...

रशीद निंबाळकर लिखीत, दिग्दर्शित "ऱ्हास" या मराठी लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर.

इमेज
राष्ट्रीय मानवअधिकार आयोग (NHRC), दिल्ली,भारत सरकार यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या ९व्या राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत अग्निपंख प्रॉडक्शनच्या गिरीश यशवंत गवळी निर्मित, रशीद निंबाळकर लिखीत, दिग्दर्शित "ऱ्हास" या मराठी लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतातील एकुण १३९  लघुपटातून "ऱ्हास" या एकमेव लघुपटाची महाराष्ट्रातून निवड झाली आहे.   आधुनिक भारतात आजही भटक्या समाजात काही प्रथा ह्या रुढी व परंपरेनुसार मजबुरीने पाळाव्या लागतात.आयुष्यभर फिरस्ती करून,पारंपारिक कला सादर करून पोट भरुन जीवन जगणाऱ्या काही भटक्या समाजावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या ह्या जगात  त्यांच्या शेकडो वर्षांच्या पारंपारीक कला या हळूहळू ऱ्हास पावत आहेत.याच विषयावर "ऱ्हास" हा लघुपट आपल्या मनाला भिडतो आणि विचार करायला भाग पाडतो.  याआधी रशीद निंबाळकर यांना बाराव्या दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात  'इरगाल' चित्रपटाला बेस्ट फिल्म ज्युरी अॅवॉर्डने देखील सन्मानित करण्यात आले होते. महोत्सवातील ७१८ चित्रपटांतून "इरगाल" चित्रपटाला ...

'मोऱ्या' सुपरहिट.

इमेज
मुंबई; अनेक अडचणींवर मात करीत अत्यंत चतुराईने 'मोऱ्या' हा मराठी भाषेतील चित्रपट २२ मार्च २०२४ रोजी प्रथम प्रदर्शित करण्यात आला. निर्मात्यांची विशेष लक्ष पुरवून चित्रपटाच्या कल्पक वितरणासोबत आधुनिक आणि पारंपरिक पद्धतीची सांगड घालत प्रसिद्धी व मार्केटिंग व्यवस्थापन करून मुंबई, व उपनगर, पुणे आणि धुळे या केंद्रांवर लक्ष केंद्रित करून आपला जम बसवत प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे येण्यासाठी आकर्षित केले आहे.  ऐन राजकीय शिमग्याच्या आयपीएल मोसमात 'मोऱ्या' खरोखर प्रेक्षकांसाठी आकर्षण ठरला आहे. विशेष आकर्षण निर्माण करणारे पोस्टर आणि अत्यंत नजाकतीने कापलेला चित्रपटाचा सुबक ट्रेलर, चित्रपटाचे वेगळे कथागुणधर्म, कलाकारांचा नैसर्गिक अभिनय, संगीत आणि सोशल मीडियावरील चर्चा, पोस्ट पाहून प्रेक्षकांची पाऊले आपसूकच चित्रपटगृहाच्या दिशेने वळत असल्याने विशेष आनंद होत असल्याची प्रतिक्रिया मोऱ्याची शीर्षक भूमिका करणारे अभिनेते आणि लेखक दिग्दर्शक जितेंद्र बर्डे यांनी दिली आहे.  मराठी चित्रपटांच्या ट्रेंड पेक्षा वेगळा विषय असलेल्या 'मोऱ्या'ला मिळत असलेला "द्विगुणित करणारा प्र...

शरद पोंक्षे - स्नेह पोंक्षे लवकरच घेऊन येणार नवीन चित्रपट.

इमेज
शरद पोंक्षे… मराठी कलाक्षेत्रातील एक दिग्गज नाव. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांमधून आपण त्यांचा दर्जेदार अभिनय पाहिला आहे. मात्र आता शरद पोंक्षे एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. लवकरच शरद पोंक्षे निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांचा पुत्र म्हणजेच स्नेह पोंक्षे करणार आहे. सध्यातरी या चित्रपटाचे नाव ठरलेले नसले तरी या चित्रपटाच्या निमित्ताने वडिल-मुलाची जोडी मात्र एकत्र काम करणार आहे. या चित्रपटाच्या टीमने प्रभादेवीतील सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेऊन चित्रपटाचा शुभारंभ केला.  वि. एस. प्रोडक्शन्स व मोरया प्रोडक्शन यांच्या सहयोगाने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची पूर्व तयारी सध्या ‘प्रॅाडक्शन नं १’ या नावाने होत असून रोहिणी विजयसिंह पटवर्धन या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत तर शरद पोंक्षे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचे लेखन स्नेह पोंक्षे याने केले आहे. ही जोडी नक्की कोणत्या विषयावर चित्रपट घेऊन आपल्या समोर येणार आहेत, हे फार औत्सुक्याचे ठरणार आहे.  याबद्दल निर्माते शरद पोंक्षे म्हणतात, ‘’एका नवीन भूमिकेतून ...

प्लॅनेट मराठीने साजरा केला ‘रंगोत्सव’.

इमेज
विको प्रस्तुत, प्लॅनेट मराठी ‘रंगोत्सव’ रंगांची उधळण करत नुकताच जल्लोषात साजरा करण्यात आला. रंगपंचमीच्या निमित्ताने आजोजिलेल्या या आनंदोत्सवात अभिजीत पानसे, किशोरी शहाणे, अवधूत गुप्ते, श्रृती मराठे, गौरव घाटणेकर, विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळे, विजय पाटकर, जयंत वाडकर, पुष्कर श्रोत्री, दिग्दर्शक विशाल देवरूखकर, तन्वी मुंडले, विवेक सांगळे, अविनाश दारव्हेकर, सुशांत शेलार, आदिती सारंगधर, मनवा नाईक, सुरभी हांडे, सोनाली खरे, प्रियांका तन्वर, सनाया आनंद, गौरव मोरे यांच्यासह प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर आणि अन्य मान्यवर सहभागी झाले होते.  याबद्दल प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बरदापूरकर म्हणतात, " विविध रंगांची उधळण करणारा हा सण खूप उत्साहाने भरलेला आहे आणि म्हणूनच हा सण आम्ही एकत्र साजरा करत आहोत. एरव्ही कामात व्यस्त असणारे हे कलाकार यानिमित्ताने एकत्र येऊन धमाल करतात. मजा, मस्ती आम्ही या रंगोत्सवात करतोय.’’

कै. मधुसूदन कालेलकर जन्मशताब्दी महोत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

इमेज
लेखक, नाटककार, गीतकार, नाट्यनिर्माते अशी बहुआयामी ओळख असलेल्या कै. मधुसूदन कालेलकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून मनोरंजनसृष्टीतील त्यांच्या अमूल्य योगदानाला मानवंदना देण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन तसेच मधुसूदन कालेलकर यांचे सुपुत्र अनिल कालेलकर, अलका कुबल-आठल्ये, दिग्दर्शक विजय राणे, मनोहर सरवणकर या मान्यवरांच्या पुढाकाराने १९ मार्च ते २२ मार्च या कालावधीत मुंबईत श्री शिवाजी मंदिर येथे चार दिवस रंगलेल्या जन्मशताब्दी महोत्सवाचा सांगता सोहळा संपन्न झाला. कै. मधुसूदन कालेलकर यांच्या नाटकांचा आणि त्यांनी शब्दबद्ध केलेल्या गीतांच्या सांगीतिक मैफिलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ज्येष्ठ कलाकार प्रदीप वेलणकर, विजय पाटकर, चेतन दळवी, सविता मालपेकर, अर्चना नेवरेकर आदी मान्यवरांनी या महोत्सवाला आवर्जून उपस्थिती लावली. या जन्मशताब्दी महोत्सवात मधुसूदन कालेलकर लिखित ‘दिवा जळू दे सारी रात, ‘डार्लिंग डार्लिंग, ‘नाथ हा माझा’ या प्रसिद्ध नाटकांचे सादरीकरण झाले. हाऊसफुल्ल गर्दीत प्रेक्षकांनी कालेलकरांच्या कलाकृतींना आपली प्रेमळ पोचपावती दिली. या सोह...

६ डिसेंबरला होणार 'महापरिनिर्वाण' प्रदर्शित .

इमेज
शोषित- वंचितांच्या हक्कासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनाने अवघा देश हळहळला. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वत्र हंबरठा फुटला. त्यांच्या अंत्ययात्रेला असंख्य समुदाय लोटला होता. त्यांच्या अनुयायांच्या हुंदक्यांच्या टाहोने मुंबापुरीचा आसमंत व्यापला होता आणि या सगळ्या प्रसंगांचे एकमेव साक्षीदार होते नामदेवराव व्हटकर. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अखेरचा प्रवास आपल्या कॅमेरात टिपलेल्या या नामदेवराव व्हटकर यांच्या जीवनावर आधारित 'महापरिनिर्वाण' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता अनेकांना लागली होती. मात्र आता या चित्रपटाच्या प्रदर्शनची तारीख जाहीर झाली असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजेच ६ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी घडलेल्या गुंतागुंतीच्या भावना व घटनांचा उलगडा करणाऱ्या नामदेवराव व्हटकर यांची भूमिका प्रसाद ओक यांनी साकारली असून अंजली पाटील, कमलेश सावंत, गौरव मोरे हे कलाकारही या चित्रपटात झळकणार आहेत. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका कोण साकारणार, हे ...

सन मराठीवरील 'कॉन्स्टेबल मंजू' मालिकेतील ‘सत्या आणि बलमामा’ यांची मैत्री जणू करण-अर्जुन, जय-वीरुच.

इमेज
आयुष्यात माणसांच्या वाटेला सगळ्या नात्यांचा अनुभव येतो, पण एक नातं असं आहे ज्याच्यासोबतचे क्षण सतत अनुभवावेसे वाटतात आणि ते नातं म्हणजे मैत्रीचं नातं. ज्याला नशिबाने ख-या मैत्रीची साथ लाभली आहे तो खरा श्रीमंत आणि सुखी.  मैत्री म्हंटलं की “ही दोस्ती तुटायची नाय” असं आपसूक सगळ्या वाटलंच पाहिजे. जसं की ‘करण अर्जुन’, ‘राम लखन’, ‘जय वीरु’ ही मित्राची जोडी जशी लोकप्रिय आहे तशीच आता आणखी एक जोडी प्रेक्षकांच्या मनात आणि घरात स्थान निर्माण करणार आहे आणि ती जोडी आहे ‘सत्या आणि बलमामा’ यांची. ‘सन मराठी’ वाहिनीवर १८ मार्चपासून 'कॉन्स्टेबल मंजू' ही नवी मालिका सुरु झाली आहे. या मालिकेत भित्री भागुबाई मंजू आणि बिनधास्त, बेधडक सत्या या जोडीची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहेच पण त्याचबरोबर फ्रेण्डशिप गोल सेट करणारी मित्राची जोडी सुध्दा पाहायला मिळणार आहे. सत्या आणि बलमामा हे अगदी जिगरी दोस्त, एकमेंकासाठी दुनियेशी दोन हाथ करणारे मित्र प्रत्येक सीनला काय धमाल करतात हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे.  सत्याला कोणी काही बोललं की त्यांचा थेट कार्यक्रम करण्यासाठी निघालेला बलमामा म्हणजे सर्वांचा ल...

अभिनेत्री शिवानी सुर्वे यांना झी युवा तेजस्वी चेहरा सन्मान २०२४.

इमेज
आजची तरुणाई अत्यंत गतिमान आणि कर्तृत्ववान आहे. मग ते शिक्षण, क्रीडा, कला, तंत्रज्ञान, उद्योजकता आणि सामाजिक कार्य असो किंवा आणखी काही; अशा अनेक क्षेत्रात भारतातील तरुण आपली क्षमता वेळोवेळी सिद्ध करतातच. या युवा वर्गाच्या कौशल्यामुळे महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारत देश विकासाच्या दिशेने अनेक सकारात्मक पाऊले टाकत आहे. युवा पिढीचे हे कर्तृत्व प्रेरणादायी आहे आणि समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.       तरुणांच्या उत्साहाला चालना देणारा "युवा सन्मान पुरस्कार २०२४"नावातच युवा असलेली "झी युवा" वाहिनी तरुण पिढीच्या प्रत्येक स्पंदनाला समजून घेते आणि त्यांच्यासाठी मनोरंजक तसेच प्रेरणादायी कार्यक्रम सादर करते. *'युवा सन्मान पुरस्कार २०२४'* हा अशाच एका उपक्रमाचा उत्कृष्ट नमुना आहे. या पुरस्काराद्वारे झी युवा, समाजाचे भविष्य घडवणाऱ्या कार्यकुशल तरुणांचा गौरव करते.      झी युवा सन्मान पुरस्काराचे महत्त्व तरुणांमध्ये प्रेरणा निर्माण करणे हा पुरस्कार तरुणांना समाजासाठी योगदान देण्यासाठी प्रेरित करतो.        उत्कृष्ट कामगिरीला मान्यता देणे ह...

‘असताना तू’ मधून उलगडणार ‘मायलेकी’ची मैत्री.

इमेज
 ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स, सोनाली सराओगी प्रस्तुत प्रियांका तन्वर दिग्दर्शित 'मायलेक' या चित्रपटाची सध्या जोरदार  चर्चा सुरु आहे. कारण… या चित्रपटात झळकणाऱ्या खऱ्या मायलेकी. टिझरमधून आपण त्यांची सुंदर केमिस्ट्री पाहिली. आता टिझरनंतर या चित्रपटातील पहिले जबरदस्त गाणे प्रदर्शित झाले असून यातून मायलेकींची मैत्री समोर येत आहे. 'असताना तू' असे या गाण्याचे बोल आहेत. हे सुरेख आणि हॅपनिंग गाणे पंकज पडघन यांनी गायले असून त्याला सावनी भट यांची साथ लाभली आहे. पंकज पडघन यांचेच अफलातून संगीत याला लाभले आहे. तर क्षितिज पटवर्धन यांनी हे गाणे शब्दबद्ध केले आहे.  या गाण्यातून आई आणि मुलीच्या नात्यातील बॅाण्डिंग दिसत आहे. प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीत आपण एकमेकांसोबत आहोत, असा या गाण्याचा सार आहे.  चित्रपटात सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत, बिजय आनंद, शुभांगी लाटकर, संजय मोने यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर कल्पिता खरे, बिजय आनंद या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. नितीन प्रकाश वैद्य या चित्रपटाचे असोसिएट प्रोड्यूसर आहेत. या आई आणि लेकीची सुंदर केमिस्ट्री १९ एप्रिलला चित्...

महेश मांजरेकर यांचा 'जुनं फर्निचर' लवकरच भेटीला.....२६ एप्रिलला होणार प्रदर्शित .

इमेज
 सत्य- सई फिल्म्स आणि स्कायलिंक एन्टरटेनमेंट प्रस्तुत 'जुनं फर्निचर' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून नुकताच या चित्रपटाचा टिझर लाँच सोहळा  शिवाजी पार्क येथे दणक्यात पार पडला. सलीम खान यांच्या हस्ते हे टिझर लाँच करण्यात आले. यावेळी  आशिष शेलार, सदा सरवणकर, अमेय खोपकर, महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, मेधा मांजरेकर, अनुषा दांडेकर या चित्रपटातील कलाकारांसह अनेक स्थानिक, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. यादरम्यान महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांशी संवादही साधला. यतिन जाधव निर्मित, महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित हा चित्रपट २६ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादही महेश मांजरेकर यांचेच आहेत.  महेश मांजरेकर यांचे चित्रपट नेहमीच वेगळ्या धाटणीचे असतात. त्यांचे हे वेगळेपण 'जुनं फर्निचर'मध्येही जाणवत आहे. या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा !, या टॅगलाईनवरून हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांवर भाष्य करणारा आहे, हे कळतेय. टिझरमधील त्यांचे दमदार व्यक्तिमत्व, भारदस्त आवाज या चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढवते. मुळात हा आपल्या ...

नाट्य परिषदेच्या शतक महोत्सवी नाट्य संमेलन निमित्त नाट्यजागर स्पर्धेची उपांत्य फेरी संपन्न.

इमेज
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाट्यकलेचा जागर स्पर्धा महोत्सवात एकांकिका, बालनाट्य, एकपात्री अभिनय, नाट्यछटा, नाट्यसंगीत पद गायन, नाट्य अभिवाचन यास्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक २८ जानेवारी २०२४ ते दिनांक  १० फेब्रुवारी २०२४ या कालावधीत १६ केंद्रावर संपन्न झाली. त्यातून निवडलेल्या स्पर्धक/संस्थांची उपांत्य फेरी दिनांक २ मार्च २०२४ ते दिनांक १८ मार्च २०२४ या कालावधीत मुंबई, पुणे,नाशिक, नागपूर, अहमदनगरयेथे एकांकिका (२६ संस्था), बालनाट्य (२६ संस्था) व एकपात्री (६३ स्पर्धक) येथे पार पडली. या स्पर्धेची अंतिम फेरी एप्रिल महिन्यात मुंबई येथे संपन्न होणार आहे. सदर अंतिम फेरीमध्ये एकांकिका, बालनाट्य, एकपात्री अभिनय, नाट्यछटा, नाट्यसंगीत पद गायन,नाट्य अभिवाचन या स्पर्धांचा समावेश आहे.  अंतिम फेरीसाठी निवडलेले एकपात्री नाटक. एकपात्रीचे नाव आणि केंद्र           १) स्नेह दडवई - पुणे ,२) अपर्णा जोशी - पुणे.३) पल्लवी परब- भालेकर - पुणे.४) मृदुला मोघे - पुणे        ५) ज्ञानेश्वरी कांबळे - पुणे.६) विनायक जगताप - पुणे  ...

नामवंतांकडून होतेय 'अमलताश'चे कौतुक.

इमेज
मुग्धा श्रीकांत देसाई प्रस्तुत, दर्शन प्रॉडक्शन्स, मीडिअम स्ट्रॉन्ग प्रॉडक्शन्स आणि वन फाईन डे निर्मित 'अमलताश' चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. आयुष्यातील विविध सुरांचे भावपूर्ण सादरीकरण करणारा हा चित्रपट अनेकांना भावतोय. प्रेक्षकांना अंतर्मुख करणारा हा चित्रपट असून या चित्रपटाचे कौतुक केवळ प्रेक्षक, समीक्षकच नाही तर अनेक नामवंतही करत आहे. कलेची उत्तम जाण असणारा प्रत्येक व्यक्ती का कलाकृतीचे कौतुक करत आहे. अनेकांनी सोशल मीडियावर 'अमलताश'चे भरभरून कौतुक केले आहे. दिग्दर्शक रवी जाधव, निखिल महाजन, प्रकाश कुंटे, अमेय वाघ यांच्यासह अनेकांनी या चित्रपटाचे  कौतुक केले आहे.  दिग्दर्शक रवी जाधव म्हणतात, '' हा एक असा सुंदर मराठी चित्रपट आहे, ज्याला सौम्य सिनेमॅटिक टच आहे. यातील साधेपणा प्रत्येक दृश्यात प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. प्रत्येक पात्रात आपण नकळत गुंततो. या कथानकातील विशेष आकर्षण म्हणजे सुमधुर संगीत. प्रत्येकाने आवर्जून पाहावा.असा हा चित्रपट आहे.'' तर दिग्दर्शक निखिल महाजन म्हणतात, '' एक सुंदर संगीत चित्रपट आहे जो खऱ्या अर्था...

'अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’च्या ट्रेलरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता.

इमेज
‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ च्या टिझरने प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढवलेली असतानाच आता या चित्रपटाचे जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षक आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’चा धमाकेदार ट्रेलर सोहळा नुकताच पार पडला. यावेळी चित्रपटातील कलाकारांनी आपले ‘चाळीशी’तील किस्से शेअर करण्यासोबतच ‘साला कॅरेक्टर’ या गाण्यातील हूक स्टेपही सादर केली. पत्रकार मित्रांनीही या कार्यक्रमात आपले ‘चाळीशी’तील अनुभव शेअर केले.  ‘फॅार्टी इज द न्यू थर्टी’ असे हल्ली म्हटले जाते आणि याचा अनुभव प्रेक्षकांना या चित्रपटात येणार आहे. ट्रेलरमध्ये सुबोध भावे, मुक्ता बर्वे, उमेश कामत, श्रृती मराठे, अतुल परचुरे, मधुरा वेलणकर आणि आंनद इंगळे हे ‘यंगस्टर्स’ धमाल करताना दिसत आहेत. मात्र ट्रेलर पाहाता त्यांच्या आयुष्यात काहीतरी ट्विस्ट आलेला दिसतोय. आता हा ‘चोर’ कोण असणार, याचे उत्तर आपल्याला २९ मार्चला मिळणार आहे. चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याबरोबरच अंर्तमुखही करणार आहे. ट्रेलर, तगडी स्टारकास्ट यावरून हा चित्रपट म्हणजे एक मनोरंजनाच...

सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी साकारणार मनोज जरांगे पाटील यांच्या वडिलांची भूमिका.

इमेज
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अवघा महाराष्ट्र मनोज जरांगे पाटील यांनी ढवळून काढला. मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध   "संघर्षयोद्धा" मनोज जरांगे पाटील या चित्रपटातून घेतला जाणार आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांच्या वडिलांच्या भूमिकेत सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी दिसणार आहेत. २६  एप्रिलला   'संघर्षयोद्धा' संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. शिवाजी दोलताडे यांनी या चित्रपटाच्या  दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली असून सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी या चित्रपटाचं लेखन आणि निर्मिती केली असून , सहनिर्माते रामदास मेदगे, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे , नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत. तर डॉ.सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे,  माधवी जुवेकर, व...

श्री, अमित राज ठाकरे यांना मानाचा झी युवा नेत्रुत्व सन्मान जाहिर.

इमेज
झी युवा  वाहिनी नेहमीच तरुणाई आणि युवा वर्गाच्या कामाचं कौतुक करण्यासाठी पुढाकार  घेत असतं. समाजाचं भविष्य घडवणारी तरूणाई हा समाजाच्या प्रगतीचा कणा आहे. नवं काहीतर करून दाखवणारी, नव्या संकल्पनांना मूर्त रूप देणारी तरूणाई समाजासमोर आणून त्यांच्या शिरपेचात पुरस्काराचा तुरा रोवणाऱ्या प्रतिष्ठित '*झी युवा सन्मान २०२४ '* पुरस्काराकडे अनेकांचं लक्ष लागलेलं असतं. यावर्षीच्या *झी युवा सन्मान २०२४* पुरस्काराची प्रतीक्षा संपली असून रविवार म्हणजेच ३१ मार्च २०२३ ला संध्याकाळी  ७ वाजता हा  सोहळा झी युवा वाहिनीवर प्रेक्षकांना पाहता येईल. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर  यांचे या सोहळयाला सहकार्य मिळालं आहे.    महाराष्ट्राच्या राजकारणातील नावाजलेले युवा नेतृत्व म्हणून आज श्री .अमित राज ठाकरे त्यांच्या कामांमुळे अतिशय लक्षवेधक ठरत आहेत . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेतृत्व अमित राज ठाकरे यांना झी युवा वाहिनीच्या वतीने *झी युवा नेतृत्व सन्मानाने* गौरविण्यात आले. मात्र यावेळी त्यांनी मनातली एक खंत बोलून दाखवली . त्याच बरोबर श्री अमित राज ठाकरे यांना त्यांच्या क...

२५ वर्षानंतर पुन्हा पहा आभाळमायातील मनोज जोशी आणि सुकन्या कुलकर्णी काळजाला भिडणारा अभिनय.

इमेज
मुंबई: लोकप्रियतेचा उचांक गाठणाऱ्या दामिनी या मालिकेच्या लेखिका, निर्माती आणि दिग्दर्शक अर्थात अभिनेत्री कांचन घारपुरे उर्फ कांचन अधिकारी ह्या एक नवा विलक्षण विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आपल्या सुसंस्कृत मराठमोळ्या कुटुंबात घडलेल्या सत्यघटनेवर त्यांनी 'जन्मऋण' या नव्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मनोरंजनातून प्रभोधन करीत थेट प्रेक्षकांच्या काळजात स्थान मिळविण्यासाठी 'आभाळमाया' या पहिल्या लोकप्रिय दैनंदिन मालिकेतील जोडी शरद आणि सुधा जोशी अर्थात अभिनेते मनोज जोशी आणि अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांची साथ त्यांना लाभली आहे.  आज निव्वळ भारतात ३२,००० च्या वर केसेस आहेत ज्यात स्वतःच्या मुलानेच आपल्या आई-वडिलांना त्यांच्या म्हातारपणी आपल्यापासून दूर केलेले आहे. ‘जन्मॠण’ हा नवीन चित्रपट याच विषयावर आधारित आहे. न्यायालयातर्फे अशा मुलांना शिक्षाही आहेत. जन्मदात्या आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या मुलांना ‘कलम-5’ तर्फे तुरुंगवासही भोगाव लागतो. समाजात आपल्या आई-वडिलांना प्रेमाने व आदराने आपल्या मुलांनी वागवावे केवळ याच एका सद्भावनेने या चित्रपटाची निर्मिती व दिग...

'मोऱ्या' २२ मार्च २०२४ रोजी मराठीसह तामिळ, तेलगू, कन्नड, हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार.

इमेज
मुंबई : शहराची स्वच्छता राखण्याचं काम करणाऱ्या सफाई कामगारांवर अनेकदा चर्चा होते. पण त्यांच्या व्यथा, त्यांच्या अडचणी मात्र आजही तशाच आहेत. यावर प्रकाश टाकणारा सफाई कर्मचाऱ्यांची व्यथा दाखविणारा मोऱ्या हा अत्यंत वेगळा चित्रपट मराठीसोबतच हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड या भाषांमध्ये येत्या २२ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित होत आहे. सेंसॉर बोर्डासोबत प्रदीर्घ संघर्ष करून हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याने तमाम रसिकांमध्ये मोऱ्या बद्दल विशेष कुतूहल निर्माण झाले आहे. एका सफाई कर्मचाऱ्यांची अत्यंत विलक्षण भावस्पर्शी कथा 'मोऱ्या' या चित्रपटात रेखाटण्यात आली आहे. ती साकारण्यासाठी अभिनेता जितेंद्र बर्डे यांनी खास मेहनत घेतली आहे. त्यांनी केलेला नैसर्गिक अभिनय तंतोतंत सफाई कर्मचाऱ्यांचं आयुष्य उभं करतं. विषयाच्या जातकुळीनुसार धुळे जिल्ह्यातील 'पिंपळनेर या ठिकाणी चित्रपटाचे चित्रीत करण्यात आहे. चित्रपटाच्या माध्यमातून या परिसराचे सौंदर्य पहिल्यांदाच सर्वांना मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या निर्मितीसाठी निर्माती तृप्ती कुलकर्णी, राजेश अहिवले, सहनिर्माते प्रेरणा धजेकर, पूनम नागपूरकर, म...

थरारपट ‘अल्याड पल्याड’ चित्रपटाच्या पोस्टरचे दिमाखदार अनावरण....

इमेज
मराठी चित्रपटसृष्टीत वैविध्यपूर्ण चित्रपटांची निर्मिती सातत्याने होताना दिसते आहे. आशय आणि सादरीकरणाच्या बाबतीत वेगळेपणा दाखवू पाहणारा प्रीतम एस के पाटील दिग्दर्शित ‘अल्याड पल्याड' हा  मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला. एस. एम.पी प्रोडक्शन् अंतर्गत ‘अल्याड पल्याड' चित्रपटाची निर्मिती  शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांनी केली आहे. प्रदर्शित  झालेल्या चित्रपटाच्या पोस्टरने आणि उत्कंठावर्धक टिझरने  प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.  गौरव मोरे, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, अनुष्का पिंपुटकर आदी अनुभवी कलाकारांसोबत भाग्यम जैन हा  नवा चेहरा या  चित्रपटात दिसणार आहे.   आपला महाराष्ट्र हा समृद्धतेने आणि विविधतेने नटलेला आहे. त्यात  अनेक जुन्या संस्कृती तसेच प्रथा परंपरा आहेत.  अशाच  एका  वेगळ्या परंपरेची आराधना करण्याची प्रथा असणाऱ्या एका गावाची, तिथल्या माणसांची कथा सांगणारा ‘अल्याड पल्याड’  हा थरारपट आहे.  चित्रपटाची कथा प्रीतम एस के...

छत्रपती शिवाजी मंदिर ट्रस्टच्या सहयोगाने.. मानाचि लेखक संघटना आयोजित करीत आहे,.....उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धा २०२४.

इमेज
' मानाचि लेखक संघटना ' अर्थात मालिका, नाटक, चित्रपट लेखकांनी, लेखकांची, लेखकांसाठी स्थापन केलेली संघटना, आपल्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त, छत्रपती शिवाजी मंदिर ट्रस्टच्या  सहयोगाने, ' उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धा ' आयोजित करीत आहे. या स्पर्धेची मूळ संकल्पना मानाचिचे संस्थापक सदस्य, श्री. सुहास कामत यांची आहे . ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून, या स्पर्धेत सहभागी होणारी प्रत्येक टीम स्पर्धेच्या दिवशी एक चिठ्ठी उचलेल. त्यात खाली दिलेल्या विषयांपैकी एक विषय असेल. त्या विषयाच्या तयारीसाठी त्या टीमला एक तास दिला जाईल. एक तासानंतर त्या टीमला परीक्षकांसमोर, त्या विषयाचे दहा ते पंधरा मिनिटांचे इम्प्रोव्हायझेशन, तालीम स्वरूपात सादर करावे लागेल. त्या प्राथमिक फेरीतून, अंतिम फेरीसाठी निवडलेल्या टीम्सना त्यांच्याच विषयावरील एकांकिका योग्य संहिता, आवश्यक नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा प्रकाशयोजना व पार्श्वसंगीतासह सादर करावी लागेल.  सर्वश्री अभिजीत पानसे, केदार शिंदे, सतीश राजवाडे व अभिराम भडकमकर या ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शकांनी स्पर्धेसाठी दिलेले २० विषय खालील प्रमाणे ; ०१ - Mis...

अंकुश चौधरी बनला प्रस्तुतकर्ता......'बैदा'नाटक लवकरच रंगभूमीवर दाखल

इमेज
अंकुश चौधरी... मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार. स्टाईल आयकॉन म्हणूनही अंकुशकडे पाहिले जाते. यापूर्वी विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहेच. मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर आता अंकुश एका नवीन भूमिकेतून आपल्या समोर येत आहे. संदीप पोपट दंडवते लिखित, दिग्दर्शित  'बैदा' नाटकाचा प्रस्तुतकर्ता असून येत्या १६ मार्चपासून हे नाटक रंगभूमीवर दाखल होत आहे. नाट्य मल्हार निर्मित या दोन अंकी नाटकात उन्नती कांबळे, अक्षय काळकुटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. स्वतःसाठी कुटुंबासाठीची लढा... अशी टॅगलाईन असलेले हे नाटक कौटुंबिक आहे.  आपल्या या नवीन भूमिकेबद्दल अंकुश चौधरी म्हणतात, '' बऱ्याच दिवसापासून एखादे चांगले नाटक प्रस्तुत करावे अशी इच्छा होती. याचदरम्यान संदीप दंडवते लिखित, दिग्दर्शित 'बैदा'  हे नाटक पाहाण्यात आले. उत्तम सादरीकरण, अतिशय चांगला विषय आहे. त्यामुळे हे जास्तीतजास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावे, असे मला मनापासून वाटले. म्हणून मी या नाटकाचा भाग झालो. या नाटकाच्या माध्यमातून मी प्रथमच प्रस्तुतकर्ता म्हणून प्रेक्षकांस...

विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय, ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

इमेज
अभिनेत्री स्मिता तांबेनं आजवर अनेक चित्रपटांतून आपल्या दमदार अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. आता ती आगामी "कासरा" या शेतीप्रधान चित्रपटातून महत्वाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर आणि म्युझिक लाँच मोठ्या दिमाखात संपन्न झाले. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित होती. येत्या ३ मे रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.            रवी नागपूरे यांच्या साई उत्सव फिल्म्सनं "कासरा" चित्रपटाची निर्मिती केली आहे. विकास विलास मिसाळ यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून आपले दिग्दर्शकीय पदार्पण केले असून त्यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. रवी नागपूरे यांच्याच कथेवर महेंद्र पाटील यांनी पटकथा, संवादलेखन केलं आहे तर अविनाश सातोसकर यांनी छायांकन केले आहे. प्रशांत नाकती यांनी लिहिलेल्या गीतांना प्रशांत नाकती, संकेत गुरव यांनी संगीत दिग्दर्शन केले असून ही गाणी गायक जावेद अली, आदर्श शिंदे  गायिका आर्या आंबेकर, सोनाली सोनवणे, मनीष राजगिरे, रविंद्र खोमणे आणि रि...

अल्ट्रा झकासच्या मनोरंजन विश्वात ‘रेडीमिक्स’ आणि ‘जय स्वच्छमेव जयते बोला’ चित्रपट सामाविष्ट....

इमेज
मुंबई: संपूर्ण महाराष्ट्रात ‘रेडीमिक्स’ आणि ‘जय स्वच्छमेव जयते बोला’ या चित्रपटांनी जोरदार धुमाकूळ घालून रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. दोन्ही चित्रपट आता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘रेडीमिक्स’ हा ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर उपलब्ध झाला असून ‘जय स्वच्छमेव जयते बोला’ १८ मार्च २०२४ रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.    आपल्या मोठ्या बहिणीला प्रेमात मिळालेल्या धोक्याच्या निराशेतून बाहेर काढण्यासाठी नूपुरने आखलेली योजना यशस्वी होईल का, हे रेडीमिक्स चित्रपटात तर गोगलगावातील लोकांना घाणीतून स्वच्छ आणि सुंदर गाव करण्यासाठी अनासपूरेंची योजना यशस्वी होईल का, हे जय स्वच्छमेव जयते बोला या चित्रपटात बघता येणार आहे. ‘रेडीमिक्स’ चित्रपटात वैभव तत्ववादी, प्रार्थना बेहेरे आणि नेहा जोशी यांचा जबरदस्त अभिनय पहायला मिळणार असून मकरंद अनासपूरे यांनी ‘जय स्वच्छमेव जयते  बोला’ चित्रपटात आपल्या विनोदी ढंगाने समाजासाठी एक गंभीर संदेश दिला आहे.   “समाजात मनोरंजन महत्वाचं आहे, त्याचबरोबर समाजाचं प्रबोधनही तेवढंच महत्वाचं आहे. मनोरंजातून प्रबोध...

'मधुसूदन कालेलकर जन्मशताब्दी'...... स्मरणरंजनाचा हृद्य सोहळा रंगणार....

इमेज
नामवंत नाटककार, गीतकार, लेखक, पटकथाकार, नाट्य- चित्रपट निर्माते अशा बहुआयामी भूमिकेतून मनोरंजनाचा अमूल्य ठेवा रिता करीत रसिकांना अखंड रिझवणारे कै.मधुसूदन कालेलकर यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून मनोरंजन सृष्टीतील त्यांच्या अमूल्य योगदानाला मानवंदना देण्यासाठी व आजच्या पिढीला त्यांच्या कार्याची माहिती व्हावी यासाठी कै.मधुसूदन कालेलकर जन्मशताब्दी महोत्सवाचे आयोजन १९ मार्च ते २२ मार्च या कालावधीत मुंबईत श्री शिवाजी नाट्य मंदिर, नाट्यगृह येथे होणार आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय,महाराष्ट्र शासन तसेच मधुसूदन कालेलकर यांचे सुपुत्र अनिल कालेलकर, अलका कुबल-आठल्ये, विजय राणे, मनोहर सरवणकर या मान्यवरांच्या विशेष पुढाकाराने हा महोत्सव संपन्न होणार आहे. या महोत्सवाअंतर्गत १९ मार्च ते २१मार्च अशा तीन दिवसीय विशेष नाटय महोत्सवाचे आयोजन श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह येथे करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी शब्दबद्ध केलेल्या सांगीतिक गीतांच्या मैफिलीचा विशेष सोहळा ज्येष्ठ  दिग्दर्शक-अभिनेते राजदत्त, सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ, सचिन पिळगांवकर आदि मा...

वानरलिंगी- एका आव्हानात्मक प्रस्तारारोहणाचे दस्तऐवजीकरण.

इमेज
१९८३ साली केल्या गेलेल्या एका अल्पत कठीण व जोखमीच्या बढाईसंबंधी एक माहितीपट आम्ही म्हणा प्रस्तरारोहणाच्या क्षेत्रातील जुन्या जाणत्या मंडळींनी तयार केला आहे त्याच्या प्रिमियरची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. वानरलिंगी (किंवा खडा पारशी) हा सह्याद्रीतील एक प्रसिद्ध सुळका आहे तो सुळका सर करण्याच्या मोहिमेचे हे एक उत्कंठावर्धक चित्रण आहे. या मोहिमेत जी तंत्रे वापरली गेली त्यांनी महाराष्ट्रातल्याच नव्हे तर अन्यही ठिकाणच्या प्रस्तरारोहींना, तोपर्यंत अजिंक्य समजल्या गेलेली शिखरे शक्यतेच्या टप्यात आणली. हा माहितीपट प्रा. चारुहास जोशी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोहिमेची सविस्तर माहिती देतो, ज्यासाठी लढवलेल्या कल्पना, त्या प्रत्यक्षात उत्तरवण्यासाठी घेतलेली प्रचंड मेहनत पात चित्रित करण्यात आली आहे. धातुशास्त्र, प्रकल्प व्यवस्थापन, उत्पादनाचे तंत्रज्ञान या सगळ्याचा या मोहिमेच्या यशासाठी उपयोग करून घेण्यात आला. हे विशेष. एक अशी वस्तू या मोहिमेत वापरली गेली, जी भारतात उपलब्ध नव्हती. एवढेच नव्हे तर त्याच्या परदेशातील वापराविषयीही माहिती मिळवणं कठीण गेलं, त्यामुळे त्याचा नम...

'मायलेक'ची पहिली झलक भेटीला.

इमेज
आई मुलीचे नाते हे सर्वात जवळचे, खास असते. कधी त्या घनिष्ट मैत्रिणी असतात, तर कधीकधी त्यांच्यात रुसवे फुगवेही असतात. त्यातही मजा असते. याच गोड नात्याची गोष्ट सांगणारा 'मायलेक' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाच्या टिझरची पहिली झलक प्रदर्शित झाली आहे. सोनाली खरे आणि सनाया आनंद यांच्यातील सुदृढ नाते या टीझरमध्ये दिसत आहे. यात आईला जितके मुलीचे कौतुक आहे, तितकेच कौतुक, विश्वास मुलीलाही तिच्या आईबद्दल आहे. या चित्रपट उमेश कामतही प्रमुख भूमिकेत आहे. ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स, सोनाली सराओगी प्रस्तुत, प्रियांका तन्वर दिग्दर्शित 'मायलेक' चित्रपट येत्या १९ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून सोनाली खरे या चित्रपटाची निर्माती आहे. तर कल्पिता खरे, बिजय आनंद या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. नितीन प्रकाश वैद्य या चित्रपटाचे असोसिएट प्रोड्यूसर आहेत.    दिग्दर्शिका प्रियांका तन्वर म्हणतात, '' आई आणि मुलीचे नाते अधोरेखित करणारा हा चित्रपट आहे. यात धमाल, मजामस्ती, हसू आणि आसू, दुरावा अशा एखाद्या नात्यातील सगळ्या भावना आहेत. मुळा...

छबिलदास वास्तू नाबाद १००वास्तू अभिवादन सोहळा.

इमेज
दादर मधील 'जनरल एज्युकेशन इन्स्टिटयूट' संचलित छबिलदास सारखी एखादी वस्तू जेव्हा शंभराव्या वर्षात पदार्पण करते तेव्हा ती घटना, तो क्षण, तो सोहळा सगळयांच्याच अभिमानाचा असणं स्वाभाविकच आहे. दिनांक १२ मार्च, २०२४ ला सायंकाळी ठीक सहा वाजता या अद्भुत अशा सोहळ्याला प्रारंभ झाला. असंख्य आजी माजी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, हितचिंतक संस्थेच्या अनेक शाळांचे पदाधिकारी कर्मचारी वर्ग यांनी छबिलदास सभागृह खचून भरले होते. फुलांच्या, रंगांच्या रांगोळ्या, आकर्षक सजावट, बोलके फळे, नेत्रदीपक अशी रोषणाई, सनईचे सूर असे सगळीकडे मांगल्याचे, आनंदाचे वातावरण होते. अनेक माजी विद्यार्थी, शिक्षक यांच्या गाठीभेटी झाल्यामुळे जणू काही छबिलदास ची वास्तू ही कौतुकाने प्रेमाने रोमांचित झाली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच कार्यक्रमाचे आकर्षण असलेल्या 'छबिलदास कल्चर सेन्टर' चे उदघाटन प्रमुख पाहुणे ज्येष्ठ अभिनेते मा. श्री बाळ धुरी 'छबिलदास वॉल'चे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. उल्हास कोल्हटकर व संस्थेच्या इतिहासात प्रथमच कलाशिक्षकांच्या सुजनक्षमतेला, कलेला वाव देणाऱ्या पेंट...

मराठी चित्रपट “रुद्रा”येत्या 12 एप्रिलला रुद्राचा थरार प्रेक्षकांच्या भेटीला...

इमेज
वाईटावर चांगल्याची मात ही गोष्ट सर्वांनाच पाहिला आवडते अशाच धाटणीचा व धमाल मस्ती असणाऱ्या  "रुद्रा, या मराठी चित्रपटाचा थरार प्रेक्षकांच्या भेटीला येत्या १२ एप्रिलला येत आहे.  एका क्रूरकर्मा "अण्णा पाटील, नावाच्या व्यक्तीच्या कारवायांमुळे त्रस्त झालेले गाव व पुढे सरकणारे आगळे वेगळे कथानक प्रेक्षकांना थरारक अनुभूती देणार आहे,  वाईटावर चांगल्याची मात, त्यातून वेळोवेळी कलाटणी देणारे कथानक त्यामुळे निर्माण होणारी स्थिती प्रेक्षकांना वेगळ्या दुनियेत घेऊन जाईल. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना वेगळाच थरार अनुभवायला मिळणार आहे. "माँ भवानी फिल्म" या बॅनर अंतर्गत बनलेला हा चित्रपट अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या "रुद्राच्या" आयुष्यावर आहे. भावाच्या मृत्यूनंतर दुखावल्या गेलेल्या बहिणीने घेतलेली रुद्राची मदत व दृष्ट अण्णा पाटील चा मृत्यू होत नाही तोपर्यंत "मी केस बांधणार नाही! अशी शपथ घेणारी बहीण, भक्कम असे व्यक्तिमत्व असणाऱ्या अण्णा पाटील समोर रुद्राचा निभाव लागेल का? भावाच्या मृत्यूनंतर दुखावलेली बहीण केस बांधेल? या सर्वच प्रश्नांची उत्तरं प्रेक्षका...

संगीतमय चित्रपट "संगीत मानापमान" यंदाच्या दिवाळीत १ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार प्रदर्शित!'

इमेज
आज मराठी संगीत रंगभूमी वरील एक सोन्याचे पान असलेल्या 'संगीत मानापमान' या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला ११३ वर्षे पूर्ण झाली आहेत.        कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित या नाटकाला आजतागायत रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करण्यात अनेकांचा वाटा आहे.      आजच्या या दिवशी या अजरामर कलाकृतीला आणि सर्व दिग्गजांना वंदन करून जिओ स्टुडिओज आणि सुबोध भावे यांची मोठी घोषणा - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या कलाकृतीवर प्रेरित एक संगीतमय चित्रपट "संगीत मानापमान" यंदाच्या दिवाळीत १ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार प्रदर्शित!'

मस्तीने भरलेले 'साला कॅरेक्टर' गाणे प्रदर्शित.

इमेज
नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत आणि  मृद्गंध  फिल्म्स एल. एल. पी. निर्मित 'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर’ या चित्रपटातील पहिले 'साला कॅरेक्टर' हे गाणे नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. शाल्मली खोलगडेच्या जबरदस्त आवाजात गायलेल्या या गाण्याला वैभव जोशी यांनी शब्दबद्ध केले असून अजित परब यांचे अफलातून संगीत लाभले आहे. मस्तीने भरलेल्या या गाण्यात 'चाळीशी'तील मित्रमैत्रिणींचे गेटटूगेदर दिसत आहे. सुबोध भावे, मुक्ता बर्वे, उमेश कामत, श्रृती मराठे, अतुल परचुरे, मधुरा वेलणकर आणि आंनद इंगळे यांच्यावर चित्रित करण्यात आलेले हे गाणे अतिशय धमाल आहे.  चाळीशी हा आयुष्यातला असा गंमतशीर टप्पा आहे, जिथे तुम्ही तरुणही नसता आणि प्रौढही. त्यामुळे या वयातील धमाल ही विशेष वेगळी असते. ही धमाल, मजामस्ती या गाण्यात दाखवण्यात आली आहे. विवेक बेळे लिखित या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर, संदीप देशपांडे निर्माते आहेत. हे 'चाळीशी'तील चोर येत्या २९ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.   गाण्याबद्दल दिग्दर्शक आदित...