Posts

Showing posts from April, 2024

'रमा राघव'मध्ये लोकप्रिय अभिनेता अद्वैत दादरकरचा दमदार प्रवेश.

Image
  कलर्स मराठीवरील ‘रमा राघव’ मालिका सध्या उत्कंठावर्धक टप्प्यावर असून मालिकेत येणारे एक नवे वळण प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. रमा राघवच्या पत्रिकेत असलेला विरह टळावा यासाठी पुरोहितांनी मनावर दगड ठेऊन रमा राघवला वनवासाला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.   मात्र हा वनवास रमा राघवच्या आयुष्यात नवे वादळ आणणारा ठरणार असून विक्रम या पात्राचा त्यांच्या आयुष्यात प्रवेश होत आहे. राघव जगण्यामरण्याच्या सीमारेषेवर असताना हॉस्पिटलपासून एक व्यक्ति रमाला सातत्याने सुचकपणे भेटत आहे, ही व्यक्ति रमा राघव वनवासाला निघताना, समोर येणार असून या विक्रमचा भूतकाळ आणि रमाराघवचे वर्तमान याची उत्कंठावर्धक गोष्ट मालिकेत उलगडणार आहे.   लोकप्रिय अभिनेता अद्वैत दादरकर याने ही भूमिका साकारली असून भेदक डोळे, करारी नजर आणि दमदार लुक यामुळे त्याचा मालिकेतला येत्या सोमवारी 6 मे रोजी होणारा प्रवेश विशेष लक्षणीय ठरणार आहे.   रमा राघवच्या नात्यांच्या अग्निपरीक्षेचा प्रवास नव्या वेळेत सोमवार ते शुक्रवार रात्री 9:30 वाजता कलर्स मराठीवर उलगडत आहे.   पहा “रमा राघव”, सोम - शुक्र, रात्री 9:30 वा. फक्त कलर्स मराठीवर

महाराष्ट्र दिनी ‘संयुक्त महाराष्ट्र’ चित्रपटाची घोषणा.

Image
स्वतंत्र भारतात मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारण्यात आला. ही चळवळ भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळातील महाराष्ट्राच्या आतापर्यंत झालेल्या सर्व चळवळीतील एक प्रमुख चळवळ होती. आजवर झालेल्या अनेक चळवळी या इंग्रजांविरोधातील होत्या. मात्र ही चळवळ वेगळी होती. यामुळे देशाचे राजकारण कोलमडले आणि १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. आज याच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत कल्याणी पिक्चर्स आणि अभिता फिल्म्स प्रस्तुत ‘संयुक्त महाराष्ट्र’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘पॅावर वर्सेस प्राईड’ अशी टॅगलाईन आहे .तर सुनील शेळके ‘संयुक्त महाराष्ट्रा’चे निर्माते आहेत. २०२५ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात कोण कलाकार झळकणार हे येत्या काळात कळलेच.  चित्रपटाबद्दल निर्माते सुनील शेळके म्हणतात, ‘’ ही चळवळ आजवरची सयुँक्त महाराष्ट्राची सर्वात मोठी चळवळ होती. राजकीय, साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक अशा सगळ्याच बाजुने ही चळवळ होती. चित्रपटात हेच दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे.’’

‘स्वरगंधर्व सुधीर फडके’मध्ये ‘हे’ कलाकार साकारणार या व्यक्तिरेखा.

Image
गायक, गीतकार, संगीतकार, स्वातंत्र्यसैनिक सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपट येत्या महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील सुधीर फडके म्हणजेच बाबुजींची भूमिका सुनील बर्वे साकारत असून त्यांच्या पत्नीची म्हणजेच ललिताबाईंची भूमिका मृण्मयी देशपांडे हिने साकारली आहे. तर ग. दि. माडगुळकर यांची भूमिका सागर तळाशीकर करत आहेत. या महत्वपूर्ण भूमिका समोर आल्यानंतर आता या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखेवरील पडदा उठला असून या नामवंत व्यक्तिरेखा कोण साकारणार आहेत, हे समोर आले आहे.  आदिश वैद्य (तरूण सुधीर फडके), अपूर्वा मोडक (आशा भोसले), सुखदा खांडकेकर (माणिक वर्मा), मिलिंद फाटक ( राजा परांजपे), धीरज जोशी (स्वातंत्र्यवीर सावरकर), विहान शेडगे (छोटा राम), विभावरी देशपांडे (सरस्वतीबाई, सुधीर फडकेंची आई), नितीन दंडुके (पाध्ये बुवा), परितोष प्रधान (डॅा. अशोक रानडे), साहेबमामा फतेहलाल (अविनाश नारकर), डॅा हेडगेवार (शरद पोंक्षे), न. ना. देशपांडे ( उदय सबनीस), मोहम्मद रफी (निखिल राऊत), निखिल राजे शिर्के ( श्रीधर फडके) हे कलाकार या व्यक्तिरे

"अप्सरा" चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर सोशल मीडियावर लॉन्च

Image
प्रेम, राजकारण, अॅक्शन आणि सुरेल संगीताची मेजवानी "अप्सरा" या चित्रपटातून प्रेक्षकांना मिळणार आहे. चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर सोशल मीडियावर  लाँच करण्यात आला असून, अप्सरा हा चित्रपट येत्या १० मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.  सुनील भालेराव यांच्या ‘श्रमण फिल्म्स’ या निर्मिती संस्थेतर्फे “अप्सरा” चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून, त्यांची ही पहिलीच निर्मिती आहे. चित्रपटसृष्टीत अनेक वर्षं कार्यरत असलेल्या चंद्रकांत पवार यांनी या चित्रपटाची  कथा, पटकथा आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटातील तीनही  गाण्यांचं लेखन आणि संगीत दिग्दर्शन मंगेश यांनी केले असून या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले आहे. गायक अभय जोधपूरकर गायिका आनंदी जोशी, ओंकार स्वरुप, भैय्या मोरे, मेघा मुसळे यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गीते स्वरबद्ध करण्यात आली असून ही गीते  प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरली आहेत. अभिनेता सुयश झुंजुरके, अभिनेत्री मयूरी आव्हाड, अक्षता पाडगावकर, अभिनेत्री मेघा घाडगे, शशांक शेंडे, विठ्ठल काळे, मयूर पवार, खान्देशरत्न सचिन कु

प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सन मराठीची ‘मुलगी पसंत आहे’ मालिकेची टीम म्हणतेय शो मस्ट गो ऑन.....

Image
‘कितीही अडथळे आले तरी शो मस्ट गो ऑन’, हे असं चॅलेंजिंग स्टेटमेंट बरीच मेहनती, जिद्दी मंडळी करत असतात कारण त्यांचं त्यांच्या कामाप्रती एक कर्तव्य असण्याची, जबाबदारी असण्याची भावना त्यांच्या मनात असते. या वाक्याला सुंदर असं उदाहरण म्हणजे ‘सन मराठी’ वरील ‘मुलगी पसंत आहे’ ही मालिका आणि या मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारणारे मेहनती कलाकार हर्षदा खानविलकर, संग्राम समेळ आणि कल्याणी टीभे. ‘सन मराठी’ वरील ‘मुलगी पसंत आहे’ या मालिकेत एपिसोड्सचे इंटरेस्टिंग ट्रॅक्स चालू आहेत आणि त्यामुळे प्रेक्षक या मालिकेच्या प्रत्येक एपिसोडशी खिळून राहिले आहेत. एकीकडे बॅक टू बॅक शूट्स, नवीन एपिसोड्सची तयारी चालू आहे तर दुसरीकडे कलाकारांची तब्येत बिघडली आहे. आराध्याची भूमिका साकारणारी कल्याणी टीभेला टायफॉईड झालेला, श्रेयस उर्फ संग्रामला शूटिंगच्या दरम्यान पायाला दुखापत झाली असल्या कारणामुळे त्याची आता सर्जरी करण्यात येणार आहे आणि यशोधरा या खमक्या भूमिकेत दिसणा-या हर्षदा यांची तब्येत देखील बिघडली होती, सर्दी-ताप-खोकला असल्यामुळे त्यांच्यामध्ये बोलण्याची देखील ताकद नव्हती. एवढी गंभीर परिस्थिती असताना

'घरत गणपती' २६ जुलैला मराठी रुपेरी पडद्यावर.

Image
‘कुटुंब’हा आपल्या प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय.  कुटुंबातील,नात्यागोत्यातील प्रत्येकाशी आपलं प्रेमाचं, स्नेहाचं एक वेगळं नातं असतं. मराठी चित्रपटांतूनही कौटुंबिक विषय अतिशय उत्तमतेने हाताळलेले आपण पाहतो. आंबे, सुपारी, केळी, फणसाच्या बागा, काजू, कोकमाची झाडं असा निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या कोकणाच्या पार्श्वभूमीवर घडणारी घरत कुटुंबाची मजेशीर गोष्ट आपल्याला आगामी 'घरत गणपती'  या चित्रपटातून पहायला  मिळणार आहे. मनोरंजन क्षेत्रात तडाखेबंद कलाकृतींनी आपलं वेगळं  स्थान निर्माण करणारे पॅनोरमा स्टुडिओज सविनय सादर करत आहेत नॅविअन्स स्टुडिओ यांच्या सहकार्याने मराठी चित्रपट ‘घरत गणपती’. हा भव्य चित्रपट २६ जुलैला आपल्या भेटीला, आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येत आहे. नातेसंबंधातील प्रेम, गोडवा आपल्या सणांच्या माध्यमांतून अधिक  दृढ  होत असतो. मायेने आणि  आपलेपणाने माणसं जोडणाऱ्या घरत कुटुंबातील ‘श्री गणराया’च्या आगमनाच्या वेळी घडणारी गमतीशीर गोष्ट चित्रपटात पहायला मिळणार आहे. अतिशय सुंदर कथाविषय, त्याला अभिनयसंपन्न कलाकारांची जोड यातून एक उत्तम कलाकृती दिग्दर्शक नवज्योत नरेंद्र बां

'कर्मवीरायण' शिक्षणासाठी धडपडणाऱ्या एका ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाचा जीवनपट.......कर्मवीरांच्या भूमिकेत 'किशोर कदम'

Image
महाराष्ट्राच्या खेडोपाडी शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गरीब, गरजू, कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र आता मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेते किशोर कदम यांनी कर्मवीरांची भूमिका साकारली असून, अनेक महोत्सवांमध्ये गौरवलेला हा चित्रपट आता १७ मे पासून महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. कर्मवीर अण्णांच्या जीवनातील काही निवडक प्रसंग आणि घटना यांचा समावेश या चित्रपटात करण्यात आला आहे. ट्रान्सएफएक्स स्टुडिओज प्रा. लि. यांनी निर्मिती केलेल्या "कर्मवीरायण" चित्रपटाची प्रस्तुती 7 वंडर्स चे पुष्कर मनोहर करत आहेत. धनंजय भावलेकर यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. अनिल सपकाळ आणि धनंजय भावलेकर यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. किशोर कदम, सुहास शिरसाट, उपेंद्र लिमये, देविका दफ्तरदार, उषा नाईक अशा दिग्गज कलाकारांचा सशक्त अभिनय पाहायला मिळणार आहे. योगेश कोळी यांनी छायाचित्रण,संतोष गोठोस्कर यांनी संकलक म्हणून काम पाहिले आहे. लहान वयातच महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रभ

विशेष मुलांसाठी, पालकांसाठी 'मायलेक'चे स्पेशल स्क्रिनिंग.

Image
ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स, सोनाली सराओगी प्रस्तुत, सोनाली आनंद निर्मित, प्रियांका तन्वर दिग्दर्शित 'मायलेक' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय. आई आणि मुलीच्या नात्यावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत, शुभांगी लाटकर, संजय मोने, बिजय आनंद यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची कथा, अभिनय सगळ्यांचेच कौतुक होत आहे. गाणीही सध्या ट्रेण्डिंगमध्ये असून त्यावर 'मायलेकीं'चे रिल्सही झळकत आहेत. चित्रपट पाहाताना अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणवत आहेत. आई आणि मुलींना जवळ आणणारा हा 'मायलेक' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय, असे दिसतेय. दरम्यान, सोनाली खरे आणि 'सोसायटी फॉर दि एज्युकेशन ऑफ दि चॅलेन्जेड' या संस्थेने या विशेष मुलांसाठी 'मायलेक'च्या स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन केले होते. यावेळी अनेक पाल्य- पालकांनी, संस्थेतील शिक्षकांनी हा चित्रपट एन्जॉय केला.   कल्पिता खरे, बिजय आनंद या चित्रपटाचे सहनिर्माते असून नितीन प्रकाश वैद्य 'मायलेक'चे असोसिएट प्रोड्यूसर आहेत.  याब

आदिशक्तीची ताकद अनुभवा ‘सन मराठी’च्या ‘आदिशक्ती’ या नव्या मालिकेतून.

Image
“सज्जनांसाठी देवी आणि दुर्जनांसाठी काळ, सहज नाही लागणार ह्या आदिशक्तीचा ठाव”, असं म्हणत ‘सन मराठी’ने नुकताच ‘आदिशक्ती' मालिकेचा नवा प्रोमो रिलीज केला आहे, ज्यामध्ये अभिनेता सुयश टिळक महत्त्वाच्या भूमिकेत दिसतोय. कोण कोणाच्या विरोधात उभं राहिल, कोण कोणाचा शत्रु बनेल हे कधीच कोणी सांगू शकत नाही आणि वडीलांची शत्रु स्वत: त्यांची मुलगी असेल तर काय... भितीने थरकाप उडेल अशी घटना चिमुकल्या जीवाशी घडणार असेल तर आईचं काळीज घाबरणारच... पण आई लेकीच्या संरक्षणासाठी आदिशक्तीकडे प्रार्थना करणार आणि तिच्या पाठीशी उभी राहणार दैवी शक्ती, हे या प्रोमोमधून दाखवण्यात आले आहे. रोमांचक, थरारक, कथेशी खिळवून ठेवणारी कथा घेऊन ‘सन मराठी’ वाहिनी नव्या पध्दतीने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी पुन्हा सज्ज झाली आहे. दैवी शक्ती नेहमी चांगल्या कर्माच्या, माणसांच्या पाठीशी उभी असते हे या मालिकेतून अधोरेखित करण्यात आले आहे. तसेच सुयश टिळक, पल्लवी पाटील, सावी केळकर, अंबरिश देशपांडे, सुश्रुत आदी कलाकारांचा अभिनय अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळतेय. एकंदरीत ही नवी मालिका देखील प्रेक्षकांच्या घराघरांत आणि म

‘आज्जीबाई जोरात’ नाटकाद्वारे पुष्कर गाठणार वेगळी ‘उंची’.

Image
अभिनेता पुष्कर श्रोत्री ‘हॅप्पी गो लकी’ स्वभामुळे प्रत्येकाला जवळचे वाटतात.  चित्रपट, मालिका, नाटक अशा साऱ्या माध्यमांमध्ये लीलया वावरणाऱ्या  पुष्करच्या अभिनय कारकिर्दीत ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकाने  भन्नाट  योग जुळून आणला आहे.    अभिनेता पुष्कर श्रोत्री यांचा ३० एप्रिलला वाढदिवस असतो. यंदा आपला ५५वा  वाढदिवस  साजरा करत असताना  याच दिवशी रंगभूमीवरील आपल्या ५५ व्या नाटकाचा शुभारंभ ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकाने करणार आहे. आपल्या ३२ वर्षाच्या अभिनय कारकिर्दीत रसिकांची मनं जिंकणारे  पुष्कर या नाटकात ‘अतरंगी’ भूमिकेत दिसणार आहे. या नाटकाद्वारे पुष्कर वेगळी ‘उंची’ गाठणार आहेत. ती उंची कशी गाठणार? हे पाहण्यासाठी  ‘आज्जीबाई जोरात’ हे  नाटक पाहावं लागणार आहे.  ‘पहिल्यांदाच बालनाट्यात काम करायला मिळणं आणि वेगळा रोल जो मला वेगळ्या उंचीवर नेणार आहे. ते करण्यासाठी उत्सुक असल्याचे पुष्कर यांनी सांगितले’. माझ्यासाठी ३० एप्रिल तारीख खास आहेच पण आमच्या ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकासाठी सुद्धा तारीख खास ठरावी. नाट्यरसिकांनी उत्तम प्रतिसाद देत ‘आज्जीबाई जोरात’चे जोरात स्वागत करावे,  अशी आशा पुष्कर श

मोहन भागवत यांनी केले 'स्वरगंधर्व सुधीर फडके'चे कौतुक.

Image
ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत तो 'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपट येत्या १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुधीर फडके म्हणजेच 'बाबुजी' हे व्यक्तिमत्वच इतके महान होते, जगभरात या व्यक्तिमत्वाची ख्याती पसरली आहे. त्यांची व्यायसायिक कारकीर्द आपल्यापैकी अनेकांना माहित आहे आहे. परंतु या यशामागचा त्यांचा संघर्ष, त्यांचे वैयक्तिक आयुष्य फार कमी जणांना माहित आहे. त्यांची जीवनगाथा आपल्याला या चित्रपटाच्या निमित्ताने अनुभवता येणार आहे. बाबुजी गायक, संगीतकार होतेच, परंतु ते एक सच्चे देशभक्तही होते. नुकताच हा चित्रपट सरसंघचालक मोहन भागवत यांनी चित्रपटाच्या टीमसोबत  पाहिला आणि या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले.  चित्रपटाबद्दल सरसंघचालक मोहन भागवत म्हणतात, '' बाबुजी म्हणाले होते, कोणतेही गीत गाताना भावना त्या शब्दांसोबत आल्या पाहिजेत. केवळ सूर असून चालत नाही. तेव्हा त्याचे महत्व आम्हाला फारसे समजले नाही. परंतु हा चित्रपट पाहून बाबूजींचा संगीतामागचा भाव लक्षात आला. त्यांची देशभक्ती, त्यांनी सोसलेले कष्ट पाहाताना त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रत

'सिम्पल आहे ना?' लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर.

Image
  मुंबई म्हणजे मायानगरी... मुंबई कधीच झोपत नाही आणि हे अगदीच खरे आहे. याच जादुई दुनियेची रात्रीची सफर घडवणारा 'सिम्पल आहे ना?' ही धमाल वेबसिरीज प्लॅनेट ओटीटीवर लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच या वेबसिरीजचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून सिद्धार्थ खिरीद ,आयुषी भावे टिळक आणि सिद्धार्थ आखाडे प्रमुख भूमिकेत आहेत. जेएमएफ मुव्हीज प्रस्तुत, डॉ. राजकुमार एम कोल्हे, डॉ. प्रेरणा राजकुमार कोल्हे निर्मित या वेबसिरीजचे दिग्दर्शन जान्हवी राजकुमार कोल्हे यांनी केले असून 'सिम्पल आहे ना?' चे लेखन सिद्धार्थ आखाडे यांचे आहे. ही वेबसिरीज येत्या १ मे रोजी प्रदर्शित होईल.  ट्रेलरमध्ये दोन अनोळखी व्यक्तींची शेवटची ट्रेन मिस झाल्याचे दिसत असून इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी झालेली त्यांची रोलरकोस्टर राईड यात पाहायला मिळणार आहे. त्यांचा हा रात्रीचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाणार हे वेबसिरीज पाहिल्यावरच कळेल. दरम्यान, यात धमाल, इमोशन्स, मैत्री, प्रेम हे सगळंच पाहायला मिळणार असून ही वेबसिरीज म्हणजे मनोरंजनाचे एक कमाल पॅकेज आहे.  वेबसिरीजच्या दिग्दर्शिका जान्हवी राजकुमार कोल्हे

रहस्यमय ‘प्रीत अधुरी’ चित्रपटाचा अल्ट्रा झकासवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर.

Image
मुंबई: प्रेमकथा, इच्छा पूर्ण करणारी जादुची वस्तू, दमदार कथानकाला असलेली कसदार अभिनयाची जोड, अनोखा विषय आणि त्याची साजेशी मांडणी अशा अनेक गोष्टींचा सुंदर मिलाफ असणाऱ्या ‘प्रीत अधुरी’ चित्रपटाचा अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर २६ एप्रिल २०२४ रोजी वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. चित्रपटाचं कथानक एका अशा वस्तूच्या भोवती फिरतं, जी व्यक्तीच्या तीन इच्छा पूर्ण करू शकते! नायकच्या घरी ती वस्तू येते तेव्हा त्याच्यासाठी आकाश ठेंगणं होतं. आता नायक आणि नायिका या वस्तूचा वापर करून नेमकं काय मागतात आणि त्यातून पुढे कशा घडामोडी घडत जातात, हे चित्रपटात कळणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन जिल्हा परिषद शाळेत पेशाने शिक्षिका असणाऱ्या प्रियांका यांनी केलं असून प्रवीण यशवंत आणि प्रीया दुबे या नव्या जोडीच्या भन्नाट केमिस्ट्रीसोबत संजय खापरे, मिलिंद दास्ताने, अरुण नलावडे, शमा निनावे आणि कमलेश सावंत या दिग्गज कलाकारांनी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. “गूढ आणि रहस्यमय कथा नेहमीच प्रेक्षकांना खास आकर्षित करतात, म्हणूनच अशा विषयांवर ‘प्रीत अधुरी’ सारखे खास चित्रपट प्रदर्शित करून रसिकांचं झका

रुपेरी पडद्यावर अवतरणार मराठमोळा 'चायवाला'मोशन पोस्टर प्रदर्शित करत केली चित्रपटाची घोषणा...

Image
चहा आणि चहावाला हे भारतीय जनतेच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनले आहेत. चहाची लोकप्रियता इतकी अफाट आहे की गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच या गरमपेयानं मोहिनी घातली आहे. कोणी याला चहा म्हणतं, तर कोणी टी... सर्वसामान्यांच्या बोलीभाषेत मात्र हि 'चाय' आहे... हि चाय बनवणारा चायवाला सर्वांना रोज ताजेतवाने ठेवण्याचं काम करत असतो. हाच चायवाला आता रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. 'चायवाला' हा मराठी चित्रपट लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा मोशन पोस्टर रिलीज करून करण्यात आली आहे. 'चायवाला'च्या रूपात एक धम्माल विनोदी मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, हा सिनेमा सामाजिक संदेशही देण्याचं काम करणार आहे. हॅाट चॅाकलेट प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे सहनिर्मिते तानाजी वगरे आणि गोविंद वाघमारे आहेत. अजय-उद्भव या जोडगोळीकडे 'चायवाला'च्या दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 'करोड़ों चाहने वालों का मेला है, कौन कहता चायवाला अकेला है...' हे चित्रपटाच्या पोस्टरवरील वाक्य बरंच काही सांगणारं आहे. सोशल मीडियामुळे आज चायवाल्यांपास

निलेश साबळे यांच्या 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' शोचा प्रोमो रिलिज; प्रेक्षकांनी केला लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव.

Image
“हसताय ना ? हसायलाच पाहिजे” असे म्हणत संपूर्ण महाराष्ट्राला पोट धरून हसायला भाग पाडणारा मराठमोळा अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक डॉ. निलेश साबळे हा त्याचा नवीन शो 'हसताय ना ? हसायलाच पाहिजे' हा शो घेऊन आला आहे.  नुकताच या शोचा प्रोमो रिलिज झाला असून मागील काही  दिवसांपासून या नवीन शोचे बरेच प्रोमो, व्हिडिओ आणि चर्चा आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.  तेव्हा पासूनच या शोची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. अशातच आता या शोचा आणखी एक प्रोमो समोर आला असून या प्रोमोमध्ये शोच्या पहिल्या एपिसोडची झलक पाहायला मिळत आहे. या नवीन प्रोमोत ओंकार भोजने व भाऊ कदम यांच्या विनोदावर ‘बाईपण भारी देवा' या चित्रपटाची संपूर्ण टीम पोट धरून हसताना दिसत आहे. या सोबत अभिनेते भरत जाधव व अलका कुबल या देखील ओंकार व भाऊ यांच्या विनोदावर हसत आहेत. या स्किटमध्ये हे दोघे ही स्त्रियांचे पात्र साकारत आपल्याला दिसतील. त्या दोघांच्या विनोदांनी प्रेक्षकांना पोट धरून खळखळून हसायला भाग पाडल्याचे दिसते.  त्यामुळे ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’च्या या नवीन प्रोमोला प्रेक्षकांनी प्रचंड लाईक्स व कमेंट्सचा

प्रदर्शनापूर्वीच परदेशात 'स्वरगंधर्व सुधीर फडके'चे शोज विक्रमी वेळेत 'हाऊसफुल्ल'

Image
सुधीर फडके संगीत क्षेत्रातील एक मोठे नाव. मराठी सुगम संगीतावरील त्यांचे प्रभुत्व आजही वादातीत आहे. परंतु त्यांचा इथवर पोहोचण्याचा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. त्यांच्या हा जीवनप्रवास लवकरच प्रेक्षकांना पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती. त्यात ट्रेलर पाहून ही उत्सुकता अधिकच शिगेला पोहोचली. येत्या महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी 'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून विशेष म्हणजे प्रदर्शनापूर्वीच भारताबाहेर २४ तासांत या चित्रपटाचे दोन शोज 'हाऊसफुल्ल' झाले आहेत. त्यामुळे 'बाबुजीं'वरील प्रेक्षकांचे प्रेम यातून दिसत आहे.  प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल दिग्दर्शक योगेश देशपांडे म्हणतात, '' भारताबाहेरून असा प्रतिसाद मिळावा, ही आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे.  यावरून 'बाबुजी' हे व्यक्तिमत्व केवळ महाराष्ट्रापुरताच किंवा देशापुरताच मर्यादित नसून ते परदेशातही तितकेच सर्वश्रुत आहे. मला खात्री आहे, महाराष्ट्रातही 'स्वरगंधर्व सुधीर फडके'ला असाच उत्

२१ जून २०२४ला "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील" चित्रपट होणार महाराष्ट्रभर प्रदर्शित.

Image
मनोज जरांगे पाटील हे नाव आपण बऱ्याच दिवसांपासून ऐकतोय , मराठा आरक्षणासाठी त्यांनी आपलं घरदार पणाला लावलं, ह्याच मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आता 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' हा चित्रपट देखील येतोय , हा चित्रपट गेले ४ ते ५ महिन्यापासून राज्यभर चर्चेत आहे. हा चित्रपट २६ एप्रिल २०२४  ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार होता , पण आता हा चित्रपट सेन्सॉर बोर्डने प्रदर्शनासाठी काही वेळेसाठी थांबवला आहे असं चित्रपटाचे लेखक , निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी सांगितले आहे. सध्या देशात चाललेली आचारसंहिता, मतदान या गोष्टीमुळे निवडणूक आयोगाने सेन्सॉर बोर्डला दिलेले नियम पाहून हा चित्रपट आचारसंहिते मध्ये प्रदर्शित करता येणार नाही असं सेन्सॉर बोर्ड ने सांगून हा चित्रपट प्रदर्शनासाठी काही दिवसांकरिता थांबवला आहे. चित्रपटाच्या टीमने अतिशय कष्ट करून सर्वांनी दिवसरात्र काम करून हा चित्रपट बनवला आहे ,  आता ऐन प्रदर्शनाच्या तोंडावर आमचा चित्रपट थांबवला ह्याच दुःख होत आहे , पण हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मराठी चित्रपटसृष्टित सुपरहिट चित्रपट होणार असं चित्रपटात मनोज जरांग

संगीतमय प्रेमकथा असलेल्या "अप्सरा" चित्रपटाचा टीजर लाँच.

Image
एक अनोखी प्रेमकथा असलेल्या अप्सरा या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला. प्रेमकथेला सुरेल संगीताची जोड देण्यात आली असून अनुभवी आणि नव्या दमाच्या कलाकारांचा दमदार अभिनय या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. येत्या १० मे ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.  सुनील भालेराव यांच्या ‘श्रमण फिल्म्स’ या निर्मिती संस्थेतर्फे “अप्सरा” चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून, त्यांची ही पहिलीच निर्मिती आहे. चित्रपटसृष्टीत अनेक वर्षं कार्यरत असलेल्या चंद्रकांत पवार यांनी या चित्रपटाची  कथा, पटकथा आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटातील तीन गाणी मंगेश कांगणे यांनी केली आहेत. या तीनही गाण्यांचं लेखन आणि संगीत दिग्दर्शन मंगेश यांनी केले आहे. गायक अभय जोधपूरकर गायिका आनंदी जोशी, ओंकार स्वरुप,  भैय्या मोरे, मेघा मुसळे यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गीते स्वरबद्ध करण्यात आली आहेत. सुयश झूंजुरके, मयूरी आव्हाड, अक्षता पाडगावकर, मेघा घाडगे, शशांक शेंडे, विट्ठल काळे  विजय निकम, मयूर पवार, राजेश भोसले, आशिष वारंग,समीक्षा भालेराव, प्रज्ञा त्रिभुवन, संघर्ष भालेराव आदी कलाकारांच्या या चित्र

अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा चित्रपट २६ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला.

Image
समाजाने जबरदस्तीने लादलेल्या परंपरेचा एका कुटुंबावर होणारा परिणाम या आशयसूत्रावर बेतलेला "परंपरा" हा चित्रपट २६  एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला असून, उत्तम अभिनय, श्रवणीय संगीत, आशयघन कथानक असलेल्या या चित्रपटाविषयी या ट्रेलरने उत्सुकता निर्माण केली आहे.  हरीश कुमार आणि अँड्र्यू रिबेलो  यांच्या स्टार गेट मूव्हीज या निर्मिती संस्थेअंतर्गत "परंपरा" या चित्रपटाची निर्मिती केली असून फैजल पोपरे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर दिग्दर्शन प्रणय निशाकांत तेलंग यांचे आहे. अभिनेते मिलिंद शिंदे आणि अभिनेत्री वीणा जामकर यांच्यासह प्रकाश धोत्रे, अरुण कदम, नम्रता पावसकर, किशोर रावराणे, जयराज नायर, रोहित चव्हाण, प्रशांत नेमण, भूषण घाडी, मास्टर मच्छिंद्र, दिवंगत अभिनेते जनार्दन परब यांचा दमदार अभिनय हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. प्रतिकूल परिस्थितीतही परंपरेच्या जपणुकीवर लक्ष केंद्रित करणारा हा चित्रपट आहे. विशेषत: महाराष्ट्रातील, जिथे सांस्कृतिक वारसा खूप महत्त्वाचा आहे. प्रेक्षकांच्या मनात खोलवर परिणाम करणारं कथान

‘गीतरामायण’च्या सांगितिक मैफलीत रंगला 'स्वरगंधर्व सुधीर फडके'चा ट्रेलर लाँच सोहळा.

Image
स्वरगंधर्व सुधीर फडके... मराठी घराघरांत आणि मनामनात पोहोचलेले एक अजरामर नाव. मराठीसह हिंदी गायक, संगीतकार म्हणून त्यांनी संगीतप्रेमींच्या मनात एक ठसा उमटवला. पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या गायकीने आणि संगीताने कानसेनांना तृप्त केले. 'गीतरामायणा'तील गोडव्याने, भावविभोर गीतांनी 'बाबुजीं'नी मराठी मनावर राज्य केले. अशा या रसिकमनाचा ठाव घेणाऱ्या 'बाबुजीं'ची जीवनगाथा सांगणारा 'स्वरगंधर्व सुधीर फडके' हा चित्रपट येत्या १ मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. रामनवमीच्या पूर्वसंध्येला या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच सोहळा राज ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी चित्रपटातील टीमसह अन्य मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात चित्रपटातील ’गीतरामायण’मधील बहारदार गाण्यांची झलकही पाहायला मिळाली. हा चित्रपट म्हणजे आजवरचा सर्वात भव्य स्वरमयी बायोपिक ठरणार असून या चित्रपटाच्या निमित्ताने बाबुजी आणि त्यांच्यासोबत गायलेल्या अनेक नामवंताच्या असंख्य गाजलेल्या गाण्यांना चित्रपटगृहात नव्याने अनुभवण्याची पर्वणी या कलाकृतीच्या माध्यमातून मिळणार आहे. या चित्रपट

प्रेम आणि नात्याचा अनुबंध उलगडणारा ‘लेक असावी तर अशी’ चित्रपटाचा लक्षवेधक ट्रेलर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शित.

Image
आपण आपल्या आयुष्यात वेगवेगळी नाती जपतो. सुख दुःखाच्या प्रसंगी याच नात्याची सोबत आपल्याला मिळत असते. नात्यांचे महत्त्व पटवून देणारा आणि लेकीची माया दाखवून देणारा 'लेक असावी तर अशी' हा मराठी चित्रपट २६ एप्रिलला आपल्या भेटीला येतोय. 'ज्योती पिक्चर्स' निर्मित आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेन्टची प्रस्तुती असलेल्या 'लेक असावी तर अशी या चित्रपटाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची धुरा विजय कोंडके यांनी सांभाळली आहे. १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'माहेरची साडी' चित्रपटाच्या अपूर्व यशानंतर निर्माता-दिग्दर्शक विजय कोंडके ३४ वर्षानंतर 'लेक असावी तर अशी'  या चित्रपटाच्या निमित्ताने नात्यातील प्रेमाचे पदर उलगडून दाखविण्यास सज्ज झाले आहेत.  या चित्रपटाचा ट्रेलर अनावरण सोहळा नुकताच कलाकार,  तंत्रज्ञ  यांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न झाला.‘लेक असावी तर अशी' चित्रपटात नयना आपटे, सविता मालपेकर, शुभांगी गोखले, यतीन कार्येकर, अभिजीत चव्हाण, प्राजक्ता हनमघर, ओंकार भोजने, कमलेश सावंत, सुरेखा कुडची या लोकप्रिय कलाकारांच्या भूमिका आहेत. सोबत गार्गी दातार हा नवा चेहरा

मराठी साहित्यातलं मानाचं पान फकिरा रुपेरी पडद्यावर.

Image
२०१५ ला प्रदर्शित झालेल्या ‘ख्वाडा’ या चित्रपटासाठी पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरण्यात दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यशस्वी झाले. 'ख्वाडा', 'बबन', 'टीडीएम' अशा वास्तववादी धाटणीच्या चित्रपटांमधून आपलं वेगळेपण दाखवून देणारे भाऊराव कऱ्हाडे नवीन कोणता चित्रपट घेऊन येणार? ही उत्सुकता प्रेक्षकांना होतीच. या उत्सुकतेवरचा पडदा नुकताच उघडला आहे. इतिहासात दडलेल्या शौर्याचं तळपतं पान ते आपल्या चित्रपटातून उलगडणार आहेत. आपल्या आगामी ‘फकिरा’ या चित्रपटाची घोषणा दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी नुकतीच केली. मराठी साहित्य विश्वात मानाचं स्थान असलेल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या ‘फकिरा’ या अप्रतिम कादंबरीवरचा चित्रपट ते घेऊन येत आहेत. विषय आणि सादरीकरणाच्या कक्षा रुंदावणाऱ्या या भव्य चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीतील मोठी कलाकार मंडळी दिसणार आहेत. नाना पाटेकर, सयाजी शिंदे, प्रसाद ओक, मृणाल  कुलकर्णी, मकरंद देशपांडे, मुक्ता बर्वे, नागेश भोसले, संदीप पाठक, कमलेश सावंत, किरण माने असे दिग्गज चेहरे चित्रपटात दिसणार आहेत. रुद्रा ग्रुप आणि चित्राक्ष निर

'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' चित्रपटात पहायला मिळणार छत्रपती शिवाजी महाराजांवर नवी आरती.'आदर्श शिंदे' यांचा दमदार आवाजात.

Image
छत्रपती शिवाजी महाराजांची स्तुती गाणारी अनेक गाणी आजवर आली. त्यात आता जय देव शिवराया या गाण्याची भर पडणार आहे. आदर्श शिंदे यांचा दमदार आवाज लाभलेलं हे गाणं संघर्षयोद्धा चित्रपटात पहायला मिळणार असून, २६ एप्रिल २०२४ रोजी संघर्षयोद्धा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. शिवाजी दोलताडे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी निभावलेली असून सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे. सहनिर्माते रामदास मेदगे, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे , नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत. तर डॉ.सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत. मराठा आरक्षणासा

आणखी एक मालिका… 'सुख कळले'कलर्स मराठीवर. येत्या २२ एप्रिलपासून सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वा.

Image
महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स मराठी आता नव्या रूपात, नव्या जल्लोषात नवं वर्ष साजरं करायला सिद्ध झालीय.. सज्ज झालीय. या नव्या बदलाची सुरूवात नुकतीच ‘इंद्रायणी’ मालिकेद्वारे दणदणीत केल्यानंतर कलर्स मराठी “सुख कळले “ ही नवी मालिका आपल्या मायबाप रसिकांच्या भेटीला आणतेय.  या निमित्ताने आयोजिलेल्या कार्यक्रमाला भरत जाधव, सरिता जाधव, आदेश बांदेकर यांचीही उपस्थिती होती. यावेळी त्यांच्यासोबत मजेदार खेळही खेळण्यात आले.  आपल्या सुखी संसाराची स्वप्नं पूर्ण करायला वेगवेगळ्या कसोट्यांमधून तावून सुलाखून जाणाऱ्या जोडप्याची ही कथा. परिस्थितीच्या वेगवेगळ्या वादळातून जाताना एकमेकांचा विश्वास , प्रेम आणि परस्परांची साथ जपत मार्ग काढणाऱ्या माधव- मिथिलाची गोष्ट म्हणजे ‘ सुख कळले!’  सुख नेहमी हक्क, अधिकार मिळवण्यातच असतं, असं नाही तर ते त्यागातही असू शकतं… स्वतःला जिंकताना बघण्यात सुख असतंच पण कधीकधी दुसऱ्याला जिंकवण्यात नि जिंकलेलं पाहण्यातही सुख असू शकतं. माधव- मिथिलाचं सुख कशात आहे, हे सांगणारी , त्यांच्या निखळ , निःस्वार्थी प्रेमाची ही कथा म्हणजेच ‘सुख कळले!’ २२ एप्रिलपासून कलर्स मराठीवर द

"अलबत्या गलबत्या" आता थ्रीडीमध्ये रुपेरी पडद्यावर.

Image
नाटककार रत्नाकर मतकरी यांचं "अलबत्या गलबत्या" हे गाजलेलं बालनाट्य आता थ्रीडीमध्ये रुपेरी पडद्यावर येणार आहे. लेखक दिग्दर्शक वरूण नार्वेकर या नाटकावरून चित्रपट करण्याचं शिवधनुष्य पेलत असून, अभिनेते वैभव मांगले  मध्यवर्ती भूमिका साकारणार आहेत. पुढीलवर्षी १ मे २०२५ ला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं.  "अलबत्या गलबत्या" चित्रपटाची निर्मिती एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटचे संजय छाब्रिया, उदाहरणार्थ निर्मितचे सुधीर कोलते आणि न्यूक्लिअर अॅरोचे ओंकार सुषमा माने करत आहेत. भालजी पेंढारकर चित्र हे सहयोगी निर्माते आहेत. रत्नाकर मतकरी यांनी कथा, कादंबरी, नाटक असे विविध साहित्यप्रकार हाताळले. त्यांची अनेक  नाटकं मराठी प्रायोगिक, व्यावसायिक रंगभूमीवर गाजली. त्याशिवाय त्यांनी बालरंगभूमीवरही अनेक यशस्वी प्रयोग केले होते. "अलबत्या गलबत्या" हे नाटकही त्यापैकीच एक... या बालनाट्यानं इतिहास घ़डवला.  आता "अलबत्या गलबत्या" नाटकाला रुपेरी पडद्यावर आणण्याचं शिवधनुष्य तरुण लेखक दिग्दर्शक वरूण नार्वेकर पेलत आहे. वरूणनं

साऊथच्या ‘जेलर’ चित्रपटाचा अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर..

Image
  मुंबई : गुन्हेगाराला सुधारण्याची संधी मिळाली तर गुन्हेगाराच्या आयुष्यात काय बदल घडून येऊ शकतो, या विषयावर आधारीत ‘जेलर’ चित्रपटाचा ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर १९ एप्रिल २०२४ रोजी वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे.   जेलर शांताराम याने सरकारला एक प्रस्ताव सादर केला आहे. ज्यात तो पाच गुन्हेगारांची निवड करेल. त्यांना एका ओसाड ठिकाणी घेऊन जाईल आणि त्या ओसाड जमिनीला हिरव्यागार शेतीत रूपांतर करून गुन्हेगारांना एका नव्या आयुष्याची सुरुवात करून देईल. सरकार हा प्रस्ताव मंजूर करते, परंतु जर गुन्हेगारांनी कोणताही गुन्हा केला तर शांतारामला आपली नोकरी सोडून तुरुंगात जावं लागेल अशी अट घालते. जेलर शांतरामचा गुन्हेगारांना सुधारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का, हे चित्रपटात पहायला मिळणार आहे.   “मराठी रसिक प्रेक्षक आजवरच्या प्रत्येक चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देत आहेत, याचा अर्थ त्यांना अल्ट्रा झकासचे चित्रपट खूप आवडत आहेत. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी जेलर सारखा आणखी एक जबरदस्त दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित करताना अत्यंत आनंद होत आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड

राम-सीतेची लोकप्रिय जोडी 'वीर मुरारबाजी' मध्ये एकत्र झळकणार .......अरुण गोविल आणि दीपिका चिखलीया रुपेरी पडद्यावर.

Image
जवळपास ३०-३५ वर्षांपूर्वी दूरदर्शनवर प्रसारित झालेली 'रामायण' ही मालिका प्रचंड गाजली. विशेषतः राम आणि सीतेच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः आपल्या हृदयात स्थान दिले. या मालिकेत प्रभू श्री रामचंद्रांची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल तर सीता मातेच्या भूमिकेत अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी त्याकाळी प्रत्येक घराघरांत-मनामनांत ‘राम-सीता’ म्हणूनच विशेष जागा पटकावली. या राम-सीतेच्या जोडीची अफाट लोकप्रियता आजतागायत कायम असून त्यांच्या अभिनयाची जादू पुन्हा एकदा आपल्याला अनुभवता येणार आहे. ‘वीर मुरारबाजी...पुरंदरची युद्धगाथा’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटातून ही जोडी आत्ता मोठा पडदा गाजवायला सज्ज झाली आहे. निर्माते अजय आरेकर यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे. भाऊसाहेब आरेकर यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे तर दिग्दर्शन अजय-अनिरुद्ध यांनी केले आहे. पुरंदरच्या लढाईत ‘न भूतो न भविष्यती’ असा पराक्रम गाजवणाऱ्या शूरवीर मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा भव्यदिव्य स्वरूपात रुपेरी पडद्यावर मांडणारा ‘वीर मुरारबाजी...पुरंदरची युद्धगाथा’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे.आजच्या पिढीला आ

आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित 'धर्मा- दि एआय स्टोरी' लवकरच...

Image
एका वेगळ्या विषयावर भाष्य करणारा 'धर्मा- दि एआय स्टोरी' लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित हा पहिलाच मराठी चित्रपट असणार असून  नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. बियु प्रॉडक्शन निर्मित  'धर्मा- दि एआय स्टोरी'चे  पुष्कर सुरेखा जोग दिग्दर्शक आहेत. पुष्कर जोग यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच हटके विषय दिले आहे. त्यांचा प्रत्येक चित्रपट हा नाविन्यपूर्ण असतो, त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी भन्नाट पाहायला मिळेल.  या चित्रपटाच्या तेजल पिंपळे निर्मात्या आहेत. तर पुष्कर सुरेखा जोग, दीप्ती लेले आणि स्मिता गोंदकर यात प्रमुख भूमिकेत दिसतील. आतापर्यंत आपण एआय टेक्नॉलॉजी आपण फक्त सोशल मीडिया आणि इतर वेगवेगळ्या गेमिंग प्लॅटफॉर्मवर पाहिली होती. आता हाच विषय थेट आपल्याला मराठी चित्रपटात पाहायला मिळणार असल्याने 'धर्मा- दि एआय स्टोरी' विषयीची उत्सुकता आता वाढलेली दिसत आहे.     चित्रपटाबद्दल दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतात," मराठी मनोरंजन विश्वात हा प्रयोग पहिल्यादांच होत आहे. या चित्रपटाचा विष

'रीलस्टार'मध्ये प्रमुख भूमिकेत झळकणार भूषण मंजुळे' रीलस्टार'च्या चित्रीकरणाचे दुसरे सत्र सुरू...

Image
मराठी सिनेसृष्टीत नेहमीच विविधांगी विषयावर चित्रपट बनत असतात. यापैकी काही चित्रपट फुल टू मनोरंजन करणारे विनोदी, तर काही मनोरंजनासोबतच प्रबोधन करणारेही असतात. समाजातील वास्तव चित्र दाखवताना प्रेक्षकांचं सहकुटुंब परीपूर्ण मनोरंजनही करणाऱ्या 'रीलस्टार' या आगामी मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाचे दुसरे शेड्यूल सध्या सुरू असून या चित्रपटात एक असा चेहरा मुख्य भूमिकेत झळकणार आहे, ज्याने आजवर काही गाजलेल्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. सुप्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते नागराज मंजुळे यांचा भाऊ भूषण मंजुळे 'रीलस्टार'मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 'रीलस्टार'ची निर्मिती जे ५ एन्टरटेन्मेंट आणि इनिशिएटिव्ह फिल्म या बॅनर्सखाली करण्यात येत आहे. मराठीसह हिंदीतही रिलीज झालेल्या मल्टिस्टारर 'अन्य' या बहुचर्चित चित्रपटाचे दिग्दर्शक सिम्मी जोसेफ आणि रॅाबिन वर्गिस 'रीलस्टार'चं दिग्दर्शन करीत आहेत. 'रीलस्टार'च्या माध्यमातून एक वेगळा विषय हाताळण्याचं शिवधनुष्य उचलण्यात आलं आहे. अशा महत्त्वपूर्ण चित्रपटात नायकाची भूमिका साकारण्याच

"अप्सरा" चित्रपटातुन गीतकार मंगेश कांगणे यांच संगीतकार म्हणून पदार्पण.

Image
सूर निरागस हो, माझा आनंद हरपला अशा उत्तमोत्तम गाण्यांचे गीतकार मंगेश कांगणे आता संगीतकार झाले आहेत. आगामी "अप्सरा" या चित्रपटातील गाणी मंगेश कांगणे यांनी संगीतबद्ध केली असून या निमित्ताने गीतकाराने संगीतकार होण्याचा दुर्मीळ योग साधला गेला आहे. लेखक, दिग्दर्शक  प्रवीण तरडे आणि अभिनेता, निर्माता मंगेश देसाईं यांच्या शुभहस्ते चित्रपटाचे म्युझिक लॉन्च करण्यात आले. याप्रसंगी चित्रपटाची संपूर्ण टीम आवर्जून उपस्थित होती. येत्या १० मे ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.    सुनील भालेराव यांच्या ‘श्रमण फिल्म्स’ या निर्मिती संस्थेतर्फे “अप्सरा” चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून, त्यांची ही पहिलीच निर्मिती आहे. चित्रपटसृष्टीत अनेक वर्षं कार्यरत असलेल्या चंद्रकांत पवार यांनी या चित्रपटाची  कथा, पटकथा आणि दिग्दर्शन केलं आहे. मंगेश कांगणे गेली अनेक वर्षं मराठी चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या लेखणीनं अनेक हिट गाणी मराठी चित्रपटांना दिली आहेत. त्या शिवाय अनेक म्युझिक अल्बमसाठीही त्यांनी गाणी लिहिली आहेत. भावगर्भ, सहजपणे तोंडी रुळणारी शब

या म्हाताऱ्याला अडवून दाखवाच !.........'. जुनं फर्निचर'चा ट्रेलर लाँच सोहळा दिमाखात संपन्न .

Image
        काय अपेक्षा आहेत आमच्या अशा त्यांच्याकडून... दिवसातून एकदा आमच्या खांद्यावरून हात फिरवून विचार ना.. आई कशी आहेस? बाबा कसे आहात? मन सुन्न करणारे हे वाक्य नकळत डोळ्यांच्या कडा पाणावणारे आहे. आपल्याकडे अनेकदा वयस्कर व्यक्तींना आऊटडेटेड, अडगळीतले सामान असे म्हटले जाते. परंतु याच सामानाची किंमत आणि ताकद काय आहे, हे सांगणारा चित्रपट येत्या २६ एप्रिल रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित 'जुनं फर्निचर' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच दिमाखात पार पडला. या सोहळ्याला अधिक रंगात आणण्यासाठी वैभव जोशी यांच्या 'सोबतीचा करार' या संगीत मैफलचेही आयोजन यावेळी करण्यात आले. यात स्वप्नील बांदोडकर, केतकी माटेगावकर, पवनदीप राजन यांचाही सहभाग होता. यावेळी महेश मांजरेकर यांनी 'काय चुकले सांग ना?' या मनाला स्पर्शून जाणाऱ्या गाण्याच्या काही ओळी गायल्या.  'जुनं फर्निचर... या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा !" ट्रेलरवरूनच हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे, हे कळतेच. मुलांप्रती असलेल्या कर्तव्यांमध्ये आपण कम

'सांस्कृतिक कलादर्पण'चा बाळ धुरी व उषा नाईक यांना सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार

Image
       चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठानच्या सांस्कृतिक कलादर्पणच्या वतीने दरवर्षी चित्रपट, रंगभूमी या कलाक्षेत्रातील मान्यवरांचा विविध पुरस्कारांने गौरव करण्यात येतो. २०२४ च्या याच संस्थेच्या 'सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कारा'साठी अभिनेता बाळ धुरी व उषा नाईक यांना एका भव्य मनोरंजन सोहळ्यात गौरविण्यात येणार आहे. या सोहळ्याचे आयोजन मे महिन्यात होणार आहे. बाळ धुरी व उषा नाईक हे तब्बल पाच दशके मराठी मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या अष्टपैलू कर्तृत्वाचा विशेष ठसा उमटवला असून त्याचे विशेष कौतुक करण्यासाठी व त्यांच्या चौफेर कामाची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.असे अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे आणि सचिव सुनील खेडेकर यांनी कळवले आहे.

भूषण प्रधान आणि शिवानी सुर्वेंच्या 'ऊन सावली' चित्रपटाचा अल्ट्रा झकास ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर

Image
मुंबई(सांस्कृतिक - मनोरंजन प्रतिनिधी) : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'ऊन सावली' या चित्रपटाला प्रेक्षकांचं महाराष्ट्रभर भरभरून प्रेम मिळालं. कांद्या पोह्याच्या कार्यक्रमातून पार पडलेल्या लग्नात प्रेमाचा गंध कसा दरवळत जातो; सांगणाऱ्या या चित्रपटाचा १२  एप्रिल २०२४  रोजी 'अल्ट्रा झकास' मराठी ओटीटीवर वर्ल्ड  डिजिटल प्रीमियर होणार आहे. प्रणय आणि अन्वी त्यांच्या पालकांच्या आग्रहास्तव लग्नासाठी एकमेकांना भेटायला तयार होतात. प्रणयला पहिल्या भेटीतच अन्वी आवडली आहे, मात्र अन्वीची लग्न करण्याची इच्छा नाही. असं असतानाही त्यांचं लग्न होतं खरं, मात्र लग्नानंतर काय गोंधळ सुरू होतो ते चित्रपटात पहायला मिळणार आहे. भूषण प्रधान आणि शिवानी सुर्वे यांच्यासह तिचा खऱ्या आयुष्यातील पती अजिंक्य ननावरे हे चित्रपटाचे प्रमुख कलाकार आहेत. याचबरोबर राज शरणागत, अंकित भोईर, विकास हांडे, श्वेता कामत आणि प्रिया तुळजापूरकर यांच्या चित्रपटात धमाकेदार भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन दिवाकर नाईक यांनी केले आहे. “एक आशावादी आणि एक निरर्थक विचार सरणीचे दोन पात्र या चित्रपटात प्रेक्षकांना दिसणार

'जुनं फर्निचर' मनाला भिडणारे 'काय चुकले सांग ना ?’ गाणे प्रदर्शित महेश मांजरेकर यांचा लाभला आवाज

Image
''सत्य - सई फिल्म्स आणि स्कायलिंक एंटरटेनमेंट प्रस्तुत, यतिन जाधव निर्मित 'जुनं फर्निचर' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात असतानाच आता 'जुनं फर्निचर' मधील खूप सुंदर, भावपूर्ण गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'काय चुकले सांग ना ?' असे या गाण्याचे बोल असून यांनी वैभव जोशी हे गाणे शब्दबद्ध केले असून डीएच हार्मोनी एसआरएम एलियन यांनी संगीत संयोजन केले आहे. या गाण्याची खासियत म्हणजे या गाण्याला खुद्द महेश मांजरेकर यांचा आवाज लाभला आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन महेश वामन मांजरेकर यांनी केले असून यात महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकरी, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब, शरद पोंक्षे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दमदार कलाकारांची फळी असलेला हा चित्रपट येत्या २६ एप्रिल रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे.  गाण्याबद्दल दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर म्हणतात, '' या गाण्याच्या प्रत्येक शब्दांत अर्थ दडलेला असून मनाचा ठाव घेणारे हे ग

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 'नाद - द हार्ड लव्ह'चा फर्स्ट लूक प्रदर्शित...

Image
गुढीपाडव्याच्या मूहूर्तावर नवोन्मेषाची गुढी उभारून हिंदू नववर्षाचं स्वागत करण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. आजही त्या परंपरेचं मोठ्या उत्साहानं, जल्लोषात आणि आत्मीयतेनं पालन केलं जातं. या दिवशी मराठी सिनेसृष्टीतही बऱ्याच नावीन्यपूर्ण गोष्टी घडत असतात. 'नाद - द हार्ड लव्ह' या आगामी महत्त्वाकांक्षी मराठी चित्रपटाचा फर्स्ट लूक गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवसाचं औचित्य साधत रिलीज करण्यात आलं आहे.  शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकर यांची निर्मिती असलेल्या 'नाद - द हार्ड लव्ह' चित्रपटाचे निर्माते संजय पगारे आणि रुपेश दिनकर आहेत. आजवर 'मिथुन', 'रांजण', 'बलोच' अशा विविध विषयांवरील आव्हानात्मक चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या प्रकाश जनार्दन पवार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 'देवमाणूस' या गाजलेल्या छोट्या पडद्यावरील मराठी मालिकेत शीर्षक रोल साकारून महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये पोहोचलेला अभिनेता किरण गायकवाड या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत रिलीज करण्यात आलेल्या फर्स्ट

प्राचीन रुढीची परंपरा आणि नव्याची गुढी बांधायला... .....येतो आहे मुखवट्यांचा 'बोहाडा.'

Image
वेगवेगळे मुखवटे धारण करत.. माणसाचा खरा चेहरा त्याला दाखवणारा सगळ्यात मोठा देव म्हणजे निसर्ग.. आणि ह्या निसर्गाचा गौरव, भारतीय  पुराणातील भव्य दिव्य मुखवट्यांना पूजून  करायचा उत्सव म्हणजे "बोहाडा"         २०२५ या वर्षात भेटीला येणाऱ्या   बोहाड्या ची घोषणा नुकतीच करण्यात आली असून दाक्षिणात्य निर्माता मणीगंडन मंजुनाथन 'बोहाडा'ची निर्मिती करणार आहेत.        राहुल सतिश पाटील, कृतिका तुळसकर देवरूखकर सहनिर्मिती, विशाल सखाराम देवरुखकर दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन अंबर विनोद हडप यांनी केले आहे. सध्या तरी या चित्रपटात कोण कलाकार झळकणार, याबाबत गोपनीयता आहे.             या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक विशाल देवरुखकर म्हणतात, '' निसर्गाची आपल्यावर जी कृपा आहे, त्याचे आभार मानण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. खंत या गोष्टीची आहे की, आतापर्यंत हा उत्सव लोकांना माहित नव्हता. हा परंपरागत उत्सव आहे, त्यामुळे या रूढी, परंपरा या चित्रपटातून मांडण्याचा मी प्रयत्न केलाय. या चित्रपटाच्या माध्यमातून हा उत्सव लोकांपर्यंत पोहोचेल, अशी आशा आहे. चित्रपटाचे वेगळेपण म्हणजे निसर्ग

प्रथमेश परब म्हणतोय 'होय महाराजा'...गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आगामी विनोदी चित्रपटाची घोषणा...

Image
मराठी चित्रपट आज जगभरातील प्रेक्षकांवर मोहिनी घालण्याचं काम करत आहेत. देश-विदेशांतील चित्रपट महोत्सवांसोबतच पुरस्कार सोहळ्यांमध्येही मराठी चित्रपटांची सरशी होत असून, आशयघन मराठी सिनेमे तिकिटबारीवरही गर्दी खेचत आहेत. अशाच प्रकारची काहीशी कामगिरी करणारा तसेच एका पेक्षा एक अफलातून विनोदवीरांची मांदियाळी असलेल्या चित्रपटाची गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर घोषणा करण्यात आली आहे. 'होय महाराजा' असं शीर्षक असलेला हा चित्रपट रसिकांचे संपूर्ण पैसे वसूल मनोरंजन करणार आहे. या चित्रपटाच्या रूपात एक कौटुंबिक मनोरंजन करणारा धम्माल विनोदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एलएमएस फिल्म्स प्रा. लि. या बॅनरखाली दिग्दर्शक शैलेश एल. एस. शेट्टी यांनी 'होय महाराजा' चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. महाराष्ट्राचा लाडका अभिनेता प्रथमेश परब 'होय महाराजा' म्हणत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. करियरच्या सुरुवातीपासून प्रथमेशनं साकारलेल्या विविधांगी व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यश मिळवलं आहे. त्यामुळे या चित्रपटात प्रथमेश कोणत्या भूमिकेत दिसणार याबाबत कुतूहल आ

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर संगीतमय चित्रपट “संगीत मानापमान" चे पहिले पोस्टर आऊट.

Image
येत्या दिवाळीत सजणार, मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार, सुरेल गीतांचा आवाज...! जिओ स्टुडिओज आणि सुबोध भावे यांचा बहुप्रतिक्षित संगीतमय चित्रपट "संगीत मानापमान" चे पहिले पोस्टर आज गुढीपाडव्याचे औचित्य साधून प्रदर्शित करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी हा चित्रपट यंदाच्या दिवाळीत म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी करताच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. आणि आज या पोस्टरमध्ये सुबोध भावेंचा चित्रपटातील एक वेगळा लूक आणि पेहराव पाहता या चित्रपटाची भव्यता झळकून येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका सुबोध भावे करणार असून, ‘कट्यार काळजात घुसली‘ तसंच ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर‘ या चित्रपटाची संपूर्ण टीम ह्या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येत आहे. आणि त्याचबरोबर मुख्य म्हणजे प्रसिध्द संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांचे संगीत या चित्रपटासाठी असणार आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित आणि अभिनित, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या अजरामर कलाकृतीवरून प्रेरित, “संगीत मानापम

नवोन्मेषाचा आनंद घेऊन रंगला 'चिरायू’.

Image
       'चैत्र शुद्ध प्रतिपदा' म्हणजेच ‘गुढीपाडवा’ उत्साहाने आणि उमेदीने साजरे करण्याची आपली परंपरा आहे. मराठी मनोरंजनसृष्टीही त्याला अपवाद नाही.  नवनवे संकल्प आणि कार्य-प्रकल्पांसोबत मनोरजंनाची गुढी उभारत मराठी नववर्षाचं स्वागत ‘चिरायू’तर्फे दरवर्षी नववर्षाच्या पूर्वसंध्येला दणक्यात साजरं केलं जातं. यंदाही गुढीपाडव्याच्या दोन दिवस आधी ‘शेलार मामा फाऊंडेशन’ आणि ‘प्लॅनेट मराठी’च्या वतीने  नववर्षाचं स्वागत जल्लोषात करण्यात आलं. 'चिरायू २०२४' साठी अवघं मराठी कलाविश्व एकवटलं होतं.  ‘शेलार मामा फाऊंडेशन’ आणि ‘प्लॅनेट मराठी’च्या वतीने आयोजित ‘चिरायू २०२४’ चे वैशिष्ट्य म्हणजे नवोन्मेषाच्या आनंदासोबतच पडद्यामागे राबणाऱ्या कलाकर्मींची दखल ‘चिरायू’ च्या मंचावर आवर्जून घेतली गेली. कलेच्या क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या सतीश लिंगाप्पा खवतोडे (कपडेपट), देविदास दरवेशी  (नेपथ्य), डॉ. खुशाले (रुग्णसेवा),  रेखा सावंत (केशभूषा) यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. यंदाच्या या  सोहळ्यात रील स्टार्स रोहित मावळे  (फूड व्लागर),  आरजे प्रणित (स्टंड अप कामेडी), रोहन पाटकर (वाईल्ड