'फकिरीयत'मधील 'चलो चले...' संतोष जुवेकरचे गाणे प्रदर्शित.
'फकिरीयत' हा आगामी हिंदी चित्रपट संगीतप्रेमींसाठी आध्यात्मिक गीत-संगीताची अनोखी मेजवानी घेऊन आला आहे. या चित्रपटातील गाणी मनामनांत भक्तीभावाची ज्योत प्रज्ज्वलित करणारी ठरणार असल्याची झलक नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'फकिरीयत'मधील एका नवीन गाण्यात पाहायला मिळते. 'फकिरीयत' हा चित्रपट आध्यात्म, गुरूभक्ती, क्रियायोग आणि श्रद्धा यांची प्रचिती देत जीवनाला नवी दिशा देणारा ठरणार आहे. या चित्रपटातील 'चलो चले हम बाबाजी के देस...' हे गाणे संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे. भद्रबाहू डिव्हाइन क्रिएशन्स एलएलपीच्या बॅनरखाली 'फकिरीयत' चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. दिग्दर्शक संतोष मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेला 'फकिरीतय' हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे. ‘चिरुट जलती है’ आणि ‘अध्यात्म एक विद्रोह, एक क्रांती’ या अनुजा जानवलेकर यांनी लिहिलेल्या पुस्तकांवर या चित्रपटाची कथा आधारलेली आहे. 'फकिरीयत'ची पटकथा अनिल पवार यांनी लिहीली असून, अनुजा जानवलेकर यांच्यासोबत पवार यांनी संवादही लिहिले आहेत. गुरूमाई माँ रुद्रात्मिका यांच्या आध्यात्मिक...