Posts

Showing posts from September, 2023

विजय पाटकर आणि सुरेखा कुडची यांचा रोमॅण्टीक अंदाज.

Image
हिंदी-मराठी चित्रपटांमधून आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर आणि वेगवेगळ्या भूमिकांतून सर्वांची मन जिंकणाऱ्या अभिनेत्री सुरेखा कुडची या दोन मात्तब्बर कलाकारांचा रोमॅण्टीक अंदाज आगामी ‘दिल दोस्ती दिवानगी’ या चित्रपटात पहायला मिळणार आहे. या दोघांची एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. चित्रपटात त्यांचा रोमॅण्टीक ट्रॅक असून या दोघांचं प्रेम कसं खुलतं? याची धमाल बघणं प्रेक्षकांसाठी रंजक असणार आहे. ट्रान्सइंडिया मिडिया अँड एन्टरटेनमेन्टची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन शिरीष राणे यांचे तर निर्मिती राजेंद्र राजन यांची आहे. १३ ऑक्टोबरला ‘दिल दोस्ती दिवानगी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.    विजय पाटकर यांनी प्रोफेसर पाटकर तर सुरेखा कुडची यांनी प्रोफेसर मेरी ही व्यक्तिरेखा साकारली आहे. ‘दिल दोस्ती दिवानगी’ या चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम केलं असलं तरी एकमेकांसोबत उत्तम टयुनिंग असल्यामुळे आमच्या या भूमिका आम्ही खूप एन्जॉय केल्याचं हे दोघे सांगतात. मैत्री आणि प्रेम या प्

येत्या दिवाळीत तुम्हा सगळ्यांना भेटायला येत आहे खोडकर श्याम आणि त्याला मायेने शिस्त लावणारी 'श्यामची आई,'.

Image
राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय सुनील डहाके दिग्दर्शित 'श्यामची आई' या चित्रपटाच्या नव्या पोस्टरचं नुकतंच अनावरण करण्यात आलं. बहुचर्चित 'श्यामची आई' या चित्रपटाची निर्मिती अमृता अरुण राव यांची आहे . तर सुपरहिट 'पावनखिंड' चित्रपटाचे निर्माते भाऊसाहेब अजय -अनिरुद्ध आरेकर , आकाश पेंढारकर आणि विक्रम धाकतोडे हे प्रस्तुतकर्ता आहेत. यंदा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर 'श्यामची आई' हा चित्रपट आपल्या भेटीस येत आहे. अमृता फिल्म्स निर्मित आणि आलमंड्स क्रिएशन प्रस्तुत 'श्यामची आई' या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच जोरदार चर्चा सुरु आहे. साने गुरुजी यांच्या कादंबरीवर आधारित 'श्यामची आई' या चित्रपटाची संहिता प्रसिद्ध लेखक -दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांची आहे. 'श्यामची आई' या चित्रपटात ओम भूतकर यांनी साने गुरुजींची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे तर सोबत गौरी देशपांडे, बाल कलाकार शर्व गाडगीळ,संदीप पाठक, सारंग साठ्ये,मयूर मोरे,उर्मिला जगताप,भूषण विकास,सुनिल अभ्यंकर , अक्षया गुराव अशी मोठी स्टारकास्ट पहायला मिळणार आहे.

‘वैद्यराज’ पोहोचले देश विदेशात.

Image
चिन्मय प्रॅाडक्शन या निर्मितीसंस्थेने निर्माण केलेल्या ‘वैद्यराज’ या लघुपटाने देश-विदेशातील विविध चित्रपट महोत्सवांमध्ये लक्षणीय यश संपादन केले आहे. भारतातील जागरण चित्रपट महोत्सव व गोवा लघुपट महोत्सव आणि विदेशातील बुकारेस्ट चित्रपट महोत्सव, लॅांग स्टोरी शॅार्टस्-रोमानिया, बेस्ट शॅार्ट फिल्म अवॅार्डस्-लॅास एंजेलिस, सायकेडेलीक चित्रपट महोत्सव-न्युयॅार्क, फिल्म ईन फोकस- रोमानिया ह्या महोत्सवांमधे ‘वैद्यराज’ हा लघुपट समाविष्ट करण्यात आला आहे. तसेच सर्वोत्तम अभिनेता म्हणून ज्येष्ठ कलावंत सतीश पुळेकर यांना नामांकनही मिळाले आहे. ह्या लघुपटात सतीश पुळेकर, प्रज्ञा पेंडसे, केदार जोशी, स्वरदा करंदीकर, शिल्पा गाडगीळ, दिव्या चौधरी आदी कलाकारांनी भूमिका केल्या आहेत. ‘वैद्यराज’ या लघुपटाची निर्मिती डॅा. दिनेश वैद्य यांनी केली आहे. ‘वैद्यराज’ या लघुपटासाठी संवाद, पटकथेची जबाबदारी नंदू परदेशी यांनी सांभाळली आहे. या लघुपटाचे दिग्दर्शन निलेश देशपांडे यांनी केले आहे. छायाचित्रण मोहर माटे तर संकलन प्रविण जहागिरदार यांचे आहे. संगीत कमलेश भडकमकर तर कला हेमंत काकीर्डे,  निर्मितीप्रमुख संभाजी जायभ

१५ डिसेंबरला हार्दिक जोशींचा "क्लब 52".

Image
दमदार स्टारकास्ट असलेल्या "क्लब 52" या चित्रपटाचे टीजर पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आले.नाथ प्रॉडक्शन्सची प्रस्तुती आणि निर्मिति असलेल्या वैशाली ठाकुर निर्मित "क्लब 52" हा चित्रपट १५ डिसेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.                 अमित कोळी दिग्दर्शित या चित्रपटाची कथा बजरंग बादशाह यांची असून राकेश शिर्के यांनी पटकथा आणि संवादलेखन केले आहे. कौशल गोस्वामी यांनी छायांकन, करण आणि दर्शन यांनी संगीत, अजय वाघमारे, बजरंग बादशाह, सुजाता पवार यांनी गीतलेखन, आदित्य बेडेकर यांनी पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे. चित्रपटात अभिनेता हार्दिक जोशी, भरत ठाकूर, भाऊ कदम, शशांक शेंडे, यशश्री दसरी, टीना सोनी, राधा सागर, नितीन रुपनवार, उमेश बोलके, संदीप गायकवाड अशी तगडी स्टारकास्ट आहे. महेश गायकवाड यांचे सहकार्य आणि मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे         एक डाव नियतीचा अशी टॅगलाईन असलेल्या "क्लब 52" या चित्रपटाचं नाव मॉडर्न आणि आकर्षक आहे. मात्र नावावरून चित्रपटाच्या कथेचा काहीच अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे आता चित्रपटाविषयी

‘मोऱ्या’ उर्फ सीताराम जेधेला युरोप भेटीचे निमंत्रण!

Image
युरोपियन देशांतील लोकांना भारतातील नैसर्गिक संपत्ती, मसाल्यातील व्यंजनांसोबत येथील संस्कृती परंपरेने मोहिनी घातली आणि त्या चिजांच्या अमाप लुटीसोबत १९० वर्षांचे पारतंत्र्यरुपी जीवन हिंदुस्तानींवर लादत राज्य केले. आता याच युरोपियांना पुन्हा एका कारणासाठी हिंदुस्तानातील महाराष्ट्राची भुरळ पडली आहे..!.. मात्र ती भारतावर राज्य करण्याची नाही तर आपल्या एका तरुणाला भेटण्याची!...  त्या उमद्या मराठमोळ्या तरुणाचे नाव ‘मोऱ्या’ उर्फ ‘सीताराम जेधे’ असे असून तो मराठवाडा - खानदेश - पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाच्या मध्यावर जोडणाऱ्या 'पिंपळनेर'चा रहिवाशी असल्याचे समजते. खास युरोपीय देशांनी आमंत्रण धाडल्याने मोऱ्या आणि त्याचा परिवार भलताच खुश झाला आहे. येत्या १ नोव्हेंबर २०२३ रोजी ‘मोऱ्या’ योरोपीन देशांचा दौरा करणार असल्याचे समजते आहे. त्याच्यासोबत जेधे परिवारातील कोण कोण सदस्य जाणार हे स्पष्ट झाले नसले तरी त्याच्यासोबतच कुटुंबीयांचीहि ‘व्हिजा’साठी लगबग सुरु आहे. हा 'मोऱ्या' नेमका कोण आहे?, तो काय करतो?, तो कुठे?, कुठे?, कश्यासाठी? कोणाकडे? जातोय याबद्दल विशेष गुप्तता जेधे परिवा

सयाजी शिंदे यांच्या 'आधारवड' चित्रपटाचं वर्ल्ड डिजिटल प्रीमियर 'अल्ट्रा झकास' मराठी ओटीटीवर.

Image
जीवनाला कलाटणी देणाऱ्या ‘आधारवड’ चित्रपटाचा २ ऑक्टोबर २०२३ रोजी ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. सुरेश शंकर झाडे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून चित्रपटात सयाजी शिंदे, शक्ती कपूर, राखी सावंत,  रोहित हंचाटे आणि अतुल परचुरे हे नामवंत कलाकार दिसणार आहेत.  चित्रपटाची कथा श्रवण आणि त्याच्या प्रतिभावंत आयुष्याभोवती फिरते. श्रवणच्या आयुष्यात घडलेली एक भावनाविवश करणारी घटना त्याच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी देऊन जाते. श्रवणचा जीवनप्रवास प्रत्येकासाठी एक प्रेरणा असून विचार करायला लावणारा आहे.  “आजच्या तरुणांना आपल्या पालकांचे महत्त्व सांगण्यासाठी आणि आपल्या पालकांप्रती आदर कमी होऊन त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी ‘आधारवड’ हा चित्रपट आजच्या तरुण वर्गाने आवर्जून पाहायला हवं.” असे अल्ट्रा मिडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.इ.ओ. श्री सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले. अधिक माहितीसाठी www.ultrajhakaas.com ला भेट द्या. जीवनाला कलाटणी देणाऱ्या वास्तवदर्शी भावनाविवश कथा सांगणाऱ्या ‘आधारवड’ चित्रपटासोबतच झकास मनोरंजन, सदाबहार एकापेक्षा एक कौटुंबिक क

'शॉर्ट अँड स्वीट' चित्रपटाचा स्वीट टीझर लाँच...

Image
नुकताच 'शॉर्ट अँड स्वीट' या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले होते. पोस्टरनंतर आता चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. शुभम प्रोडक्शन प्रस्तुत, गणेश दिनकर कदम दिग्दर्शित 'शॉर्ट अँड स्वीट' या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, हर्षद अतकरी, श्रीधर वाटसर, रसिका सुनील या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या टीझरवरून कळते की, इतक्या वर्षांनी घरी परतलेला संजू त्याच्या बाबांना भेटण्यासाठी उत्सुक असतानाच, त्यांना भेटल्यावर तो नाराज का झाला, कोण आहेत संजूचे बाबा, नेमके काय कारण असेल ज्यामुळे संजूच्या आईने त्याच्यापासून ही गोष्ट लपवली, हे पाहाण्यासाठी सर्व प्रेक्षक उत्सुक आहेत. येत्या ३ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  दिग्दर्शक गणेश दिनकर कदम म्हणतात, " 'शॉर्ट अँड स्वीट' हा एक कौटुंबिक चित्रपट असून नावाप्रमाणेच स्वीट अशी ही कथा आहे. चित्रपटाच्या टीझरवरून एकंदर चित्रपटाच्या कथेबद्दल अंदाज आलाच असेल. ताकदीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, मराठी तसेच हिंदी सिनेसृष्

बाप्पाचे दर्शन घेत 'जगून घे जरा' चित्रपटाची घोषणा...

Image
'जगून घे जरा' चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली. स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन शिरीष लाटकर यांचे आहे. या चित्रपटात राकेश बापट व सिद्धी म्हांबरे हे कलाकार पाहायला मिळतील. सिद्धी म्हांबरेच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीला एक नवीन चेहरा मिळाला आहे. चित्रपटातील गाण्यांना निलेश मोहरीर व अमित राज यांचे संगीत लाभले आहे. नुकतेच गणेशोत्सवानिमित्त लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी 'जगून घे जरा' चित्रपटाच्या टीमने हजेरी लावली. यावेळी बाप्पाचा आशीर्वाद घेत चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे म्हणतात, " आज गणेशोत्सवानिमित्त 'जगून घे जरा' या चित्रपटाची घोषणा आम्ही केली आहे. या चित्रपटात राकेश आणि सिद्धी यांची फ्रेश जोडी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची कथा रोमँटिक, प्रेरणादायी व मनाला स्पर्श करणारी आहे. 'जगून घे जरा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल."  प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “ महाराष्ट्रातील प्रसिद्ध गणपती लालबागच्या राजाचा आशीर्वाद घ्यायला सगळे जमतात. आज ला

'आत्मपॅम्फ्लेट'मध्ये परेश मोकाशी करणार कथन,मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच असा प्रयोग.

Image
बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धात्मक विभागात  'आत्मपॅम्फ्लेट'चा वर्ल्ड प्रीमिअर झाला तर आशिया पॅसिफिक स्क्रिन अवॉर्ड्स आस्ट्रेलियामध्ये सत्तर देशांतील चित्रपटांमधून सर्वोत्कृष्ट युथ फिल्मचा पुरस्कार मिळवणाऱ्या या चित्रपटाने अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावली आहे. अतरंगी, तिरकस विनोदी प्रेमकथा असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन आशिष बेंडे यांनी केले असून परेश मोकाशी यांनी 'आत्मपॅम्फ्लेट'चे लेखन केले आहे. या चित्रपटाची खासियत म्हणजे हा संपूर्ण चित्रपट परेश मोकाशी कथन करत आहेत. मराठीत अशा प्रकारचा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे. मुळात झी स्टुडिओज आणि परेश मोकाशी हे आता एक समीकरण झाले आहे. हे दोघे एकत्र येऊन प्रेक्षकांसाठी कायमच सर्वोत्कृष्ट कलाकृती सादर करतात. यापूर्वीही झी स्टुडिओज आणि परेश मोकाशी यांनी 'एलिझाबेथ एकादशी, चि. व चि. सौ. का. वाळवी असे जबरदस्त चित्रपट दिले. सिनेसृष्टीला नेहमीच वेगळ्या धाटणीचे, विचारांचे चित्रपट देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अतिशय सरळ, साधा विषय अतिशय रंजक पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडण्याचे कसब परेश मोकाशी यांच्याक

"अंकुश" चित्रपट ६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला.

Image
बीडचे सुपुत्र असलेले सुप्रसिद्ध व्यावसायिक आणि चित्रपट निर्माते श्री. राजाभाऊ घुले यांचा आगामी बिगबजेट, अॅक्शनचा दमदार तडका असलेला अंकुश हा चित्रपट येत्या ६ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सांस्कृतिक मंत्री सुधीरजी मुनगंटीवार आणि राज्याचे माजी मंत्री तसेच परतुर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते नुकताच मुंबई येथे लाँच करण्यात आला.राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कथानकाला प्रेमकथेची जोड असलेल्या "अंकुश" या चित्रपटाचा दमदार ट्रेलर सोशल मीडियावर चांगलाच हिट ठरत आहे.  ओमकार फिल्म्स क्रिएशन्सच्या माध्यमातून राजाभाऊ घुले 'अंकुश' या चित्रपटाद्वारे चित्रपट निर्मितीमध्ये धडाकेबाज पदार्पण करत आहेत. चित्रपटाची कथा नामदेव मुरकुटे यांची असून दिग्दर्शन निशांत नाथाराम धापसे यांचे आहे . मराठीतील दिग्गज संगीतकार अमितराज आणि चिनार- महेश या सिनेमाचे संगीतकार आहेत, हिंदी मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अमर मोहिले यांनी या चित्रपटाचे पार्श्वसंगीत केले आहे. मंगेश कांगणे,क्षितिज पटवर्धन, समृ

... म्हणून प्राजक्ता माळीने आलोक राजवाडेला पैसे दिले.

Image
हृषिकेश जोशी लिखित, दिग्दर्शित 'तीन अडकून सीताराम' या चित्रपटाच्या चित्रीकरणानिमित्ताने प्राजक्ता माळी लंडनला गेली होती. लंडनला चित्रीकरणासाठी जाण्यासाठी प्राजक्ता खूपच उत्सुक होती आणि यासाठी दोन कारणे होती. एक म्हणजे लंडनमध्ये चित्रीकरण होते यासाठी आणि दुसरे म्हणजे तिला सौंदर्यप्रसाधनांची आणि इतर बऱ्याच वस्तूंची खरेदी करायची होती. यासाठी ती भरपूर पैसेही घेऊन गेली होती. मात्र तिची निराशा झाली. ज्या उद्देशाने ती एवढे पैसे घेऊन गेली त्याचा फारसा उपयोगच झाला नाही. तिला चित्रीकरणातून वेळच मिळाला नाही त्यामुळे तिला मनासारखी खरेदीही करता आली नाही. नेमके त्याच वेळी आलोक राजवाडेचे कार्ड बंद पडल्याने आणि प्राजक्ताकडे भरपूर पैसे उरल्याने तिने ते पैसे आलोकला दिले.  याबद्दल प्राजक्ता माळी म्हणते, '' मला लंडनमध्ये खूप खरेदी करायची होती. परंतु माझे चित्रीकरणाचे शेड्युल असे होते, की मला खरेदीसाठी वेळच मिळायचा नाही. माझा शॉट अर्धा तासासाठी असला तरी माझा पूर्ण दिवस जायचा. अखेर जायच्या आधी मला केवळ अर्धा दिवस शॉपिंगसाठी मिळाला. त्यात मी माझ्या भाच्यांसाठी आणि जमेल त्या वस्तू

सिद्धार्थ प्रभाकर ढगे दिग्दर्शित चित्रपट "सासूबाई जोरात"२९ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला.

Image
सासू-सुनेचं नातं विळ्याभोपळ्यासारखं असतं. पण सासू आणि जावयाच्या धमाल नात्याचं चित्रण सासूबाई जोरात या चित्रपटात करण्यात आलं आहे. सिद्धार्थ प्रभाकर ढगे यांनी लेखन-दिग्दर्शन केलेला आणि दमदार स्टारकास्ट असलेला हा चित्रपट २९ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.  प्रभू शांती फिल्म प्रॉडक्शननं "सासूबाई जोरात" हा चित्रपट प्रस्तुत केला आहे. सिद्धार्थ प्रभाकर ढगे यांनी या चित्रपटाच्या लेखन, दिग्दर्शन, गीतलेखन आणि निर्मितीची धुरा सांभाळली आहे. तर तेजस काळोखे यांनी संगीत, कुमार डोंगरे यांनी छायांकन केलं आहे. चित्रपटात सयाजी शिंदे, संदीप पाठक, विजय पाटकर, मोहन जोशी, सुनील गोडबोले, उषा नाईक, आशा बिराजदार, विधी कुडिया, सिमरन क्षीरसागर, मिलिंद ढगे, सुयश लातूरे आदींच्या प्रमुख भूमिका आहेत.  "सासुबाई जोरात" ही गोष्ट आहे आधुनिक सासू आणि तिच्या आधुनिक जावयाची. या सासूला तिच्या नवऱ्याचीही चिंता नाही. त्याशिवाय ती जावयाशीही अत्यंत कठोरपणे वागते. या सासू आणि जावई यांच्यात काय होतं याची धमाल गोष्ट सासूबाई जोरात या चित्रपटात मांडण्यात आली आहे. त्यामुळे सासू-सुनेच्या अनेक प्र

'सत्यशोधक' चित्रपटाचा शरद पवार यांच्या विशेष उपस्थितीत चित्रपटाचा टिझर रिलीज

Image
आज समाजातील महिला वेगवेगळ्या उच्च पदांवर बेधडकपणे काम करतात. याचं सर्व श्रेय क्रांतीज्योती ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई यांनाच जातं. त्यांच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ या चित्रपटाचे टिझर लॉन्च आज (ता. २४) खा. शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या चित्रपटात ज्योतिरावांच्या प्रमुख भूमिकेत संदीप कुलकर्णी दिसतील. संभाजी ब्रिगेड-भारत मुक्ती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ‘सत्यशोधक संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने संमेलनात ‘सत्यशोधक’ या चित्रपटाचे टिझर लॉन्च करण्यात आले. या संमलेनाचे उद्घाटक खा. शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते हा टिझर लॉन्च करण्यात आला. ‘विद्येविना मती गेली, मतिविना निती गेली...’ अशा कठोर शब्दांत शिक्षणाचे महत्त्व सांगणाऱ्या ज्योतिरावांच्या आयुष्यातील संघर्ष आता मोठ्या पडद्यावर साकारणार आहे. येत्या दिवाळीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल. अभिनेते संदीप कुलकर्णींसह राजश्री देशपांडे, गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, रविंद्र मंकणी ही कलाकार मंडळी चित्रपटात झळकतील. या टिझर लॉन्च सो

मराठी चित्रपटात झळकणार विनय आनंद.

Image
बालपणापासून मराठमोळ्या वातावरणात वाढलेला, मराठीवर नितांत प्रेम करणारा, मराठीशी नाळ जोडलेला अभिनेता विनय आनंद मराठीसोबतचे ऋणानुबंध आणखी दृढ करण्यासाठी मराठी सिनेसृष्टीत एंट्री करत आहे. आजवर बऱ्याच हिंदी आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये दिसलेला विनय आनंद लवकरच ऑनलाईन या मराठी चित्रपटात दिसणार आहे. विनयने आज मनोरंजन विश्वात अभिनेता म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात यश मिळवलं असलं तरी त्याची दुसरी ओळख म्हणजे तो सुप्रसिद्ध अभिनेता गोविंदाचा भाचा आहे. १९९९पासून अभिनयात सक्रिय असणाऱ्या विनयने मराठमोळ्या महेश कोठारे दिग्दर्शित 'लो मै आ गया' या हिंदी चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर एंट्री केली आहे. त्यानंतर 'सौतेला', 'माई के कर्ज', 'सेन्सॅार', 'दिल ने फिर याद किया', 'आमदनी अठन्नी खर्चा रुपैया', 'अंगार - द फायर', 'मुलाकात', 'जहां जाईएगा हमें पाईएगा', 'कूल नहीं हॅाट है हम' या चित्रपटांमध्ये विविधांगी व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. खूप मोठा चाहतावर्ग लाभलेल्या विनयने बऱ्याच चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या अ

गणेशोत्सवाचे औचित्य साधून जिओ स्टुडिओज घेऊन येत आहेत सुबोध भावे दिग्दर्शित भव्यदिव्य संगीतमय चित्रपट “मानापमान".

Image
सुपरहिट संगीतमय चित्रपट 'कट्यार काळजात घुसली' नंतर पुन्हा एकदा अभिनेता - दिग्दर्शक सुबोध भावे, चित्रपट "मानापमान" द्वारे भव्यदिव्य संगीतमय नजराणा सादर करण्यास सज्ज झाले आहेत. आज FTII पुणे येथे या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला.   राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त 'मी वसंतराव',  'गोदावरी' आणि 'बाईपण भारी देवा'चे बॉक्स ऑफिसवरील प्रचंड यश साजरे केल्यानंतर जिओ स्टुडिओज् आता कृष्णाजी खाडिलकर लिखित "संगीत मानापमान" या प्रसिद्ध नाटकावरून प्रेरित एक नवीन संगीतमय कलाकृती घेऊन येत आहेत.  कट्यार काळजात घुसली आणि डॉ. काशिनाथ घाणेकर चित्रपटाची संपूर्ण टीम ह्या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र येत आहे. आणि त्यासोबतच प्रसिध्द संगीतकार शंकर- एहसान-लॉय यांचे संगीत या चित्रपटासाठी असणार आहे.  'मानापमान' चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याच्या वेळी आपलं मनोगत एका व्हिडिओ द्वारे शेअर करतं सुबोध भावे म्हणाले की, माझ्या अत्यंत आवडत्या जागी जिथे मला प्रचंड ऊर्जा मिळते, जिथे येऊन आयुष्यात चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते ती जागा म्ह

१४व्या शिकागो दक्षिण आशियाई महोत्सवात क्लोजिंग नाईटसाठी स्टोरीटेलर चित्रपटाची निवड.

Image
 विविध भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपला झेंडा रोवल्यानंतर, अनंत महादेवन दिग्दर्शित, जिओ स्टुडिओजचा 'द स्टोरीटेलर' हा चित्रपट आता 22 सप्टेंबर रोजी 14 व्या शिकागो दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवात क्लोजिंग नाईटसाठी निवडला गेला आहे.  या चित्रपटात परेश रावल, आदिल हुसैन, तनिष्ठा चॅटर्जी, जयेश मोरे आणि रेवती यांच्यासह अनेक नावाजलेले कलाकार आहेत.  हा सिनेमा दिग्गज चित्रपट निर्माते सत्यजित रे यांच्या 'गोल्पो बोलिये तारिणी खुरो' या लघुकथेवर आधारित आहे.      अनंत महादेवन यांनी शिकागो दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवात निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत असे म्हणाले की , “द स्टोरीटेलर हा दिग्गज कथाकार सत्यजित रे यांना योग्य श्रद्धांजली म्हणून उदयास आला आहे.  चित्रपट महोत्सव हे केवळ आपल्या कामाचे प्रदर्शन करण्यासाठी नसतात;  ते कथा आणि सिनेमातील जादूचा  उत्सव साजरा करण्यासाठी असतात.  आमच्या चित्रपटाची प्रतिष्ठित शिकागो दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवात क्लोजिंग नाईट फिल्म म्हणून निवड झाली आहे, याचा मला खूप अभिमान वाटतो आणि आमच्या सर्वांसाठी हा सर्वात आनंदाचा क्

‘तीन अडकून सीताराम’मधील ‘दुनिया गेली तेल लावत’ हे एनर्जेटिक गाणे प्रदर्शित

Image
‘दुनिया गेली तेल लावत’ हे तीन बिनधास्त मित्रांचे बिनधास्त गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. चित्रपटाच्या अफलातून ट्रेलरनंतर आता 'दुनिया गेली तेल लावत' हे एनर्जेटिक गाणे सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. परदेशात व्हेकेशनला गेलेल्या या तीन मित्रांची काय काय धमाल चालू आहे, हे या गाण्यातून दिसतेय. दुनियाची पर्वा न करता बेफीकर असलेले हे मित्र व्हेकेशनचा पुरेपूर आनंद लुटताना दिसत आहेत.  हे गाणे जयदीप वैद्य, गोपाळ ठाकरे, हृषिकेश रानडे आणि आरती केळकर या युवा गायकांनी गायले आहे. तर ॲग्नेल रोमन यांनी हे गाणे संगीतबद्ध केले असून वैभव जोशी या गाण्याचे गीतकार आहेत. वैभव तत्ववादी, अलोक राजवाडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता माळी यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन फुलवा खामकर यांनी केले आहे. दिग्दर्शक ऋषिकेश जोशी म्हणतात, “ ‘दुनिया गेली तेल लावत’ या गाण्याचे संगीतकार, गीतकार, गायक, कलाकार सर्वांनीच या गाण्याच्या शूटिंग दरम्यान खूप धमाल केली आहे. मला एक किस्सा येथे आवर्जून सांगावासा वाटतो. या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान लंडनच्या राणीचे निधन झाले होते आणि आम्हाला आम

‘बॅाईज ४’मध्ये झळकणार दमदार कलाकारांची फळी.

Image
बॅाईज, बॅाईज २, बॅाईज ३ बॅाक्स ॲाफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता या बॅाईजची ही धमाल चौपट पटीने वाढणार आहे. कारण ‘बॅाईज ४’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातील कलाकारांनी आपल्या सहकलाकारांचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत असतानाच अखेर सर्वांचे असे एक पोस्टर नुकतेच झळकले आहे. त्यामुळे आता ‘बॅाईज ४’मध्ये या मोठ्या गॅंगची धमाल पाहायला मिळेल. सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड यांच्यासोबत बॅाईजमध्ये झळकलेली ऋतिका श्रोत्री ‘बॅाईज ४’मध्येही दिसणार असून यात अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे ही नवी गॅंगही सहभागी झाली आहे. या व्यतिरिक्त या चित्रपटात गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. त्यामुळे जबरदस्त कलाकारांची ही फळी तुफान मस्ती करताना दिसणार आहे.  ‘बॅाईज’ हा मराठी सिमेसृष्टीतील पहिला चित्रपट आहे, ज्याचे चार भाग आले आहेत आणि यातील प्रत्येक भागात काहीतरी सरप्राईज होते. आता ‘बॅाईज ४’ मध्येही कलाकारांची जबरदस्त फळी दिसत आहे. आता यात कोणाच्या काय व्यक्तिरेखा आहेत आणि कोण काय काय धमाल

विजय केंकरे दिग्दर्शित 'आपण यांना पाहिलंत का?' नवंकोरं नाटक लवकरच रंगभूमीवर...

Image
ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांनी मराठी व्यावसायिक रंगभूमीवर दिग्दर्शनाची शंभरी पार केली आहे आणि आता 'आपण यांना पाहिलंत का?' हे नवं खुसखुशीत नाटक ते लवकरच रंगभूमीवर घेऊन येत आहे.  या नाटकाची निर्मिती आदिती देवेंद्र राव, वैशाली धनेश पोतदार यांनी केली आहे. सुशील स्वामी यांनी या नाटकाचं लेखन केलं आहे. वैवाहिक आयुष्याची बरीच वर्षे सोबत काढल्यावर नवरा बायको नकळतपणे एकमेकांना ग्राह्य धरू लागतात. ते सुखी तर असतात, पण त्यांच्या संसारात पोकळी नेहमी जाणवत राहत असते, ती पोकळी कोणी एक व्यक्ती भरून काढतं, ती व्यक्ती त्या जोडप्यांच्या संसारात कधी कधी दिसते, तर कधी नाही दिसत, पण त्यां व्यक्तीच्या असण्याने जो संसार कंटाळवाणा झालाले आहे तो अचनाकपणे ताजातवाना होतो. त्याच्या येण्याने जी काही गंमत संसारात होऊ शकते ती सर्व गंमत 'आपण यांना पाहिलंत का?' या नाटकामध्ये प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. विजय केंकरे यांनी पती-पत्नीच्या नात्याचा वेध घेणारी अनेक नाटकं दिग्दर्शित केली आहेत. कसदार दिग्दर्शनातून नेमक्या पद्धतीनं आजच्या काळावर ते नाटकातून भाष्य करतात. त्यातच

‘फक्त मराठी सिने सन्मान सोहळा २०२३’ दिमाखात संपन्न.

Image
कलावंतांचा गौरव करणारा यंदाचा ‘फक्त मराठी सिने सन्मान सोहळा २०२३’ नुकताच दिमाखात संपन्न झाला. मराठी चित्रपटांना प्रोत्साहित करण्याच्या हेतूने ‘फक्त मराठी सिने सन्मान सोहळा ’या आगळ्यावेगळ्या सोहळयाची संकल्पना फक्त मराठी वाहिनीच्या हेड पल्लवी मळेकर यांनी यशस्वी करून दाखविली. यंदा या सोहळ्याचे दुसरे वर्ष होते. यंदाच्या या रंगतदार सोहळ्याचे खुमासदार सूत्रसंचालन अमेय वाघ आणि ओंकार भोजने यांनी केले. या दोघांच्या भन्नाट निवेदनाने कार्यक्रमाची रंगत चांगलीच वाढवली.  अभिनेता शुभंकर तावडे याच्या सुरेख गणेश वंदनेने सोहळ्याला सुरवात झाली. शिव ठाकरे,  मानसी नाईक, वैदही परशुरामी कलाकारांच्या धमाकेदार सादरीकरणाने उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन केले. हा नेत्रदीपक सोहळा लवकरच ‘फक्त मराठी’ वाहिनीवर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.  ‘वेड’ चित्रपटातील ‘सुख कळले’ हे गीत आणि ‘महाराष्ट्र शाही’र चित्रपट सर्वोत्कृष्ट संगीतासाठी गौरविण्यात आला. या दोन्ही चित्रपटांसाठी अजय आणि अतुल यांना सन्मानित करण्यात आले. सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून श्रेया घोषाल(‘वेड’) आनंदी जोशी (तमाशा LIVE) आणि सर्वोत्कृष्ट गायक म्हण

'एकदा येऊन तर बघा'........

Image
सध्या सोशल मीडियावर 'दिखा दूंगा' हा ट्रेंड चांगलाच गाजतोय. याच धर्तीवर मराठीत 'एकदा येऊन तर बघा' हा नवा ट्रेंड नोव्हेंबर मध्ये येणार असल्याची चर्चा सुरु आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेलच हा नवा ट्रेंड कोण आणतंय? 'एकदा येऊन तर बघा' असं म्हणत, लेखक-दिग्दर्शक प्रसाद खांडेकर मातब्बर विनोदवीरांना घेऊन २४ नोव्हेंबरला खास चित्रपटरुपी भेट प्रेक्षकांना देणार आहेत. विनोदी अभिनेता प्रसाद खांडेकर 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शकीय पदार्पण करीत आहे. चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती, दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपक पेंटर यांची असून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ. झारा खादर यांची आहे. 'एकदा येऊन तर बघा' चित्रपटाची कथा अजून गुलदस्त्यात असली तरी, विनोदाची वेगवेगळी शैली असणाऱ्या भन्नाट विनोदी कलाकार मंडळींच्या एकत्र येण्याने हास्याचे जबरदस्त स्फोट घडतील हे नक्की. गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, विशाखा सुभेदार,  राजेंद्र शिसातकर, नम्रत

सुपरस्टार थलपती विजयचा ‘थूपाकी’ मराठीत अल्ट्रा झकासवर ...

Image
       आपल्या विशेष अभिनय कौशल्यासाठी ओळखला जाणारा तमिळ चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता ‘सुपरस्टार थलपती विजय’ याचा जबरदस्त अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘थूपाकी’ २५ सप्टेंबर पासून, महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांना ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर आता मराठीत पाहायला मिळणार आहे. चित्रपटाची कथा एका सैनिकाभोवती फिरते जो आपली ड्यूटि संपवून घरी सुट्टीसाठी परतला आहे. सुट्टीच्या काळात त्याच्या पोलिस मित्रासोबत फिरत असताना, एक दहशतवादी टोळी जी मुंबई शहराला उद्ध्वस्त करू पाहत आहे, त्याची त्याला चाहूल लागते. पुढे जे काही होतं ते दिग्दर्शक मुरगुडूस यांनी विलक्षण मांडलं असून विजयने सैनिकाची उल्लेखनीय भूमिका साकारली आहे. “आम्ही सातत्याने प्रेक्षकांच्या मनोरंजनाची गरज आणि त्यांची बदलती आवड जपण्याच्या प्रयत्नात असतो. म्हणूनच ‘अल्ट्रा  झकास’ ओटीटीच्या  माध्यमातून 'थूपाकी' सारखा सुपरहिट  चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी मराठीमध्ये रूपांतर करून आम्ही  घेऊन येत आहोत. चित्रपटाला भरभरून प्रेम मिळेल याची खात्री वाटते." असे अल्ट्रा  मिडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडचे सीईओ श्री.

"रंगीले फंटर" शाळकरी जीवनातली धमाल गोष्ट.

Image
शाळेच्या अल्लड वयातली धमाल गोष्ट  'रंगीले फंटर' या आगामी चित्रपटातून उलगडणार आहे. उत्तम स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन निशांत नाथाराम धापसे यांनी केलं असून, हा चित्रपट ३ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले.    ए. के. इंटरनॅशनल मुव्हीजच्या प्रशांत अडसूळ, शशिकांत अडसूळ यांनी 'रंगीले फंटर' चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती केली आहे. अक्षय गोरे यांनी कथा, पटकथा, संवाद लेखन,  नितीन रायकवार, कौस्तुभ पणत यांनी गीतलेखन, राजा अली यांनी संगीत दिग्दर्शन, राजदत्त रेवणकर यांनी छाया दिग्दर्शन, फुलवा खामकर यांनी नृत्य दिग्दर्शन आणि सिद्धेश मोरे यांनी संकलन केलं आहे. कलादिग्दर्शक म्हणून प्रकाश सिनगारे यांनी काम पाहिले आहे. कार्यकारी निर्माता म्हणून बाबासाहेब पाटील यानी काम पाहिले आहे. चित्रपटातील कलाकरांची नावे अद्याप गुलदसत्यात ठेवण्यात आली असून पोस्टर मध्ये दिसणारी ती चार मुल कोण असणार ? याबाबत आता कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.       'रंगीले फंटर' या चित्रपटाच्या पोस्टरवर दोस्तीत कुस्ती ना

अरुण नलावडेच्या हस्ते कवितासंग्रहाचे प्रकाशन.

Image
'दिवे लागणीच्या वेळी' या ग्रंथाली प्रकाशित आणि श्री जगदीश आचरेकर लिखित काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा दिनांक १४ सप्टेंबर २०२३ रोजी, एमआयजी क्लब, बांद्रा येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मराठीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते श्री अरुण नलावडे, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष श्री विजय पाटील आणि ग्रंथालीचे विश्वस्त श्री सुदेश हिंगलासपूरकर हे उपस्थित होते. .    आपल्या कारकुनी आयुष्यात घडलेल्या पेच प्रसंगांचा अनुभव या कवितेच्या माध्यमातून  जगदीश आचरेकर यांनी मांडल्या आहेत. २०१८ पर्यंत कविता आणि लेखन यांच्याशी काहीही संबंध नसलेले जगदीश आचरेकर यांनी आपली पहिली कविता २०१८ मध्ये लिहिली. स्वतःच्या मित्र मंडळी आणि घरच्यांनी केलेली टीका टिपण्णीने त्यांनी आपलं कविता लेखन जोपासलं. या जोपासलेल्या कविताचा संग्रह म्हणजे 'दिवे लागणीच्या वेळी' या कविता संग्रहाच्या प्रकाशनाच्या सोहळ्यात प्रेक्षकांना संबोधित करताना विजय पाटील यांनी, घरी आईमुळे झालेल्या मराठी भाषेच्या संस्काराचा आवर्जून उल्लेख केला, तर अरुण नलावडे यांनी कविता संग्रहाचे प्रकाशन माझ्या ह

‘त्या’ रात्री पार्टीनंतर नेमकं काय घडलं? रहस्य लवकरच उलगडणार...

Image
     काही दिवसांपूर्वी 'तीन अडकून सीताराम' चित्रपटाचा जबरदस्त टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला होता. टिझरला  प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असतानाच आता ‘तीन अडकून सीताराम’चा भन्नाट ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलर पाहून लक्षात येते की तीन कूल, बिनधास्त मित्र मजा करायला विदेशात जातात आणि तिथे त्यांच्याबरोबर एक अनपेक्षित घटना घडते. त्या रात्री पार्टीनंतर नेमकं काय घडले आणि हे तीन मित्र कसे अडकले? त्यांची ही मजा, सजा कशी बनली, हे २९ सप्टेंबरला प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहायला मिळेल. या सगळ्या घटनेमुळे या तिघांची मैत्री टिकते की नाही? या  जाळ्यात अडकलेले हे तीन सीताराम कसे बाहेर पडतील, हे पाहाण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या चित्रपटात वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, आलोक राजवाडे, प्राजक्ता माळी, गौरी देशपांडे सांच्यासह आनंद इंगळे, विजय निकम, समीर पाटील आणि हृषिकेश जोशी हे कसलेले कलाकार सुद्धा पाहायला मिळतील. चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक हृषिकेश जोशी म्हणतात, "चित्रपटाचा ट्रेलर पाहून अंदाज आला असेलच की मजा करायला गेलेल्या या तीन मित्रांची कशी तारांब

अक्षय मुडावदकर एका नव्या भूमिकेत.

Image
ज्येष्ठ अभिनेते, लेखक दिलीप प्रभावळकर यांचं गाजलेलं चुकभूल द्यावी घ्यावी हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येत आहे. अभिनेता अक्षय मुडावदकर व अभिनेत्री अक्षया नाईक ही नवी जोड़ी या नाटकच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आली आहे. अभिनेत्री अक्षया नाईकचा या नाटकातील लुक काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर लॉन्च केला होता त्याला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आता या नाटकातील अभिनेता अक्षय मुडावदकरचा लुक आणि नाटकाचे नाव जाहिर केल्यामुळे या नाटकाची उत्सुकता कमालीची वाढली आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात हे नाटक रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  नाटकाची निर्मिती भूमिका थिएटर्स आणि वाईड अँगल एन्टरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आली आहे. केतकी प्रवीण कमळे यांनी निर्मिती केलेल्या "चुकभूल द्यावी घ्यावी" नाटकाचं दिग्दर्शन महेश डोकंफोडे यांनी केलं आहे. संदेश बेंद्रे यांनी नेपथ्य, अशोक पत्की यांनी संगीत, शीतल तळपदे यांनी प्रकाशयोजना, अक्षय मुडावदकर आणि अभिषेक करंगुटकर यांनी गीतलेखन,नेहा मुडावदकर यांनी वेशभूषा, संदीप नगरकर यांनी रंगभूषेची जबाबदारी निभावली आहे. तर अक्षय मुडा

धम्माल विनोदी ‘बायको देता का बायको’ चित्रपटाचा ‘अल्ट्रा झकास’वर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर.

Image
       ऐन तरुणाईत लग्नासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांना आज बायको मिळणं कठीण झालं आहे. पण असं का व्हावं? हा गंभीर मुद्दा आपल्या विनोदी ढंगात १८ सप्टेंबरला घेऊन येत आहे ‘बायको देता का बायको’ चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर. जेव्हा योग्य वय येत तेव्हा प्रत्येकजण लग्न करण्याचा विचार करतो कारण लग्न हा आयुष्यातला  एक महत्त्वाचा भाग आहे. 'बायको देता का बायको' हा चित्रपट असाच एक चित्रपट आहे जिथे पुरूषांना योग्य नोकरी नसल्यामुळे बायको शोधण्यासाठी संघर्ष करावा लागतो. सुरेश साहेबराव ठाणगे दिग्दर्शित ‘बायको देता का बायको’ या धम्माल विनोदी चित्रपटात इरसाल विनोदी अभिनेते सुनील गोडबोले, सिद्धेश्वर झाडबुके, अभिलाषा पाटील, किशोर ढमाले, श्वेता  कुलकर्णी, आरती तांबे, प्रतीक पडवळ इत्यादींच्या भूमिका आहेत. “एकिकडे मुली उच्च शिक्षण घेत मोठ्या संख्येने मुले शिक्षणाकडे दुर्लक्ष करून वाईट वळणावर जात आहेत. या वाईट वळणाने त्यांच्या आयुष्यालाही वाईट कलाटणी मिळते आणि तेव्हा पश्चाताप करण्याशिवाय त्यांच्याकडे काही उरत नाही. म्हणून मुलांना मुली मिळणं कठीण झालं आहे. हा गंभीर मुद्दा सर्वांपर्यंत पोहचावा म्

यंदाचा गणेशोत्सव होणार अधिकच भक्तिमय अमृता खानविलकरचा पहिलंवहिलं गाणं 'गणराज गजानन' भाविकांच्या भेटीला .

Image
आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने आणि नृत्य अदाकारीने सर्वांना घायाळ घालणाऱ्या अमृता खानविलकरने गणेशोत्सवानिमित्ताने आपल्या चाहत्यांसाठी एक भेट आणली आहे. अमृतकला स्टुडिओज व अमृता खानविलकर निर्मित एक नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याच्या निमित्ताने अमृता खानविलकर निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. अमृताने निर्मिती केलेल्या या पहिल्यावहिल्या गाण्याचे नाव 'गणराज गजानन' असे असून गणेशाला वंदन करणाऱ्या या आल्हाददायी गाण्याला राहुल देशपांडे यांचा सुमधुर आवाज आणि संगीत लाभले आहे तर या गायला समीर सावंत यांनी शब्दबद्ध केले आहे.  अमृता खानविलकरच्या बहारदार नृत्याने या गाण्यात अधिकच रंगत आणलीये. आशिष पाटील यांचे  नृत्यदिग्दर्शन, संजय मेमाणे यांचे छायाचित्रण लाभलेल्या या गाण्याचे आयोजन सारंग कुलकर्णी यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी अमृता खानविलकरने 'गणराज गजानन' या अल्बमबद्दल सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनंतर सर्वांनाच या गाण्याविषयी उत्सुकता लागली होती. अखेर हे मन प्रफुल्लित करणारे गाणे प्रदर्शित झाले आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव आता अधिकच भक्तिमय ह

वेध गणपती बाप्पाचे, 'मोरया'च्या उत्सवाचे!

Image
थरावर थर चढवून दहीहंडीचा उत्सव जोषात साजरा झाल्यावर आता वेध लागले आहेत गणपती बाप्पाच्या आगमनाचे. गणपती बाप्पाचं उत्साहात स्वागत करण्यासाठी सप्तसूर म्युझिकने मोरया या नव्याकोऱ्या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. मराठी बिगबॉस फेम सोनाली पाटील आणि इन्स्टाग्रामवरील लोकप्रिय कंटेट क्रिएटर धनंजय पोवार या म्युझिक व्हिडिओमध्ये झळकले आहेत. सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष आणि बीना राजाध्यक्ष यांनी मोरया या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. स्टिवन पोल्स यांनी दिग्दर्शित केलेल्या या म्युझिक व्हिडिओचं गीतलेखन, संगीत आणि गायन विकी वाघ यांनी केलं आहे.  सोनाली पाटील, धनजंय पोवार यांच्यासह पार्थ केंद्रे, अमन कांबळे, समरवेर शाह, राजवीर पावसकर यांचाही या म्युझिक व्हिडिओमध्ये सहभाग आहे. दमदार शब्द, ताल धरायला लावणारे संगीत, देखणे छायाचित्रण ही या म्युझिक व्हिडिओची वैशिष्ट्यं आहेत.  सप्तसूर म्युझिकनं नेहमीच वैविध्यपूर्ण म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. या म्युझिक व्हिडिओना मराठी संगीतप्रेमींनी भरभरून प्रतिसादही दिला आहे. त्यात आता मोरया या म्युझिक व्हिडिओची भर पडलीय

अशोक मामा दादांचे मानतात आभार !

Image
     झी टॉकीज वाहिनीवर सध्या दादा कोंडके यांच्या गाजलेल्या चित्रपटांचा सीझन सुरू आहे. दादा कोंडके यांची ९१ वी जयंती मंगळवार ८ ऑगस्टला झाली. या निमित्ताने झी टॉकीज वाहिनीवर ६ ऑगस्टपासून दर रविवारी दादांचे ज्युबिली स्टार चित्रपट दाखवण्यात आले आणि प्रेक्षकांनी सुद्धा त्याचा मनमुराद आनंद लुटला. येत्या रविवारी १० सप्टेंबर ला ज्यूबली स्टार सीजन ची सांगता 'आली अंगावर' ह्या चित्रपटाने होणार असून दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता हा चित्रपट झी टॉकीज वर पहायला मिळणार आहे. यामुळे प्रेक्षकांनी ही मनसोक्त हसण्याची शेवटची संधी सोडू नये.   अभिनयात एकवेळ प्रेक्षकांना रडवणं सोपं असतं पण खळखळून हसवणं अवघड असतं असं म्हणतात ते काही खोटं नाही. अनेकदा असं होतं बघा, पडद्यावर किंवा रंगमंचावर एक सीन सुरू असतो. त्यातील प्रसंग विनोदी असतो, संवादही खुमासदार असतात, पण काही केल्या हसूच येत नाही. तिथे काहीतरी कमी असतं. मात्र ही कमी भरून काढत विनोदाचे अचूक टायमिंग साधणाऱ्या अभिनेत्यांचे वर्णन दादा कोंडके या नावाशिवाय पूर्णच होणार नाही. एक काळ होता की दादा कोंडके यांनी हिंदी सिनेमा निर्मात्यांनाह

किशोरवयीन प्रेमाची गंमतीशीर प्रेमकथा सांगणार 'आत्मपॅम्फ्लेट', ६ ॲाक्टोबरला होणार प्रदर्शित ...

Image
 ७३ वा बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झालेल्या 'आत्मपॅम्फ्लेट' या चित्रपटाचे टिझर नुकतेच प्रदर्शित झाले असून हे भन्नाट टिझर आहे. ‘वाळवी’च्या भव्य यशानंतर परेश मोकाशी पुन्हा एकदा एक नवीन लेखन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आशिष अविनाश बेंडे दिग्दर्शित या चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे नाव वेगळे आहे त्यामुळे 'आत्मपॅम्फ्लेट' म्हणजे काय याचे उत्तर प्रेक्षकांना ६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात मिळेल. गुलशन कुमार, टी सिरीज फिल्म्स, कलर यल्लो प्रोडक्शन्स आणि झी स्टुडिओज प्रस्तुत, मयसभा करमणूक मंडळी निर्मित 'आत्मपॅम्फ्लेट'चे भूषण कुमार, क्रिशन कुमार, आनंद एल. राय, कनुप्रिया ए. अय्यर, मधुगंधा कुलकर्णी आणि झी स्टुडिओज निर्माते आहेत. त्यामुळे या चित्रपटाशी अनेक नामवंत नावे जोडली गेली आहेत. दिग्दर्शक आशिष अविनाश बेंडे म्हणतात, '' चित्रपटाचे नाव असे का आहे, ते टिझरमध्ये स्पष्ट कळत आहे. खूप साधी, सरळ आणि मनाला भावणारी अशी ही कथा आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण कोरोनाच्या काळात झाले होते

मिलिंद गुणाजींच्या मुलाचे दिग्दर्शनात पदार्पण...

Image
श्री गजानन प्रॉडक्शन निर्मित 'रावण कॉलिंग' या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा नुकताच पार पडला. यावेळी अमित राज ठाकरे यांनी मुहूर्ताचा पहिला क्लॅप दिला. संदीप दंडवते, संदीप बंकेश्वर आणि अभिषेक गुणाजी यांची पटकथा असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक गुणाजी आणि संदीप बंकेश्वर यांनी केले आहे. तर या चित्रपटाची सहायक पटकथा आणि संवाद सचिन दरेकर यांचे आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने नामवंत अभिनेते मिलिंद गुणाजी यांचा मुलगा अभिषेक गुणाजी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. ‘रावण कॅालिंग’मध्ये सचित पाटील, पूजा सावंत, वंदना गुप्ते, गौरव घाटणेकर, रवी काळे, बिपीन नाडकर्णी राजू शिसाटकर आणि सोनाली कुलकर्णी, मिलिंद गुणाजी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सध्या तरी हा चित्रपट कशावर आधारित आहे, याबाबत गोपनीयता असली तरी लवकरच या गोष्टी उलगडतील.  चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अभिषेक गुणाजी म्हणतात, '' यापूर्वी मी दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.  मात्र स्वतंत्र दिग्दर्शनाच्या कारकिर्दीतील हा माझा पहिला चित्रपट आहे, त्यामुळे उत्सुकता तर आहेच

'लंडन मिसळ' चित्रपटातून भरत जाधव यांचे दणक्यात कमबॅक.

Image
ए बी इंटरनॅशनल,म्हाळसा एंटरटेनमेंट आणि लंडन मिसळ लिमिटेड प्रस्तुत तसंच जालिंदर कुंभार दिग्दर्शित 'लंडन मिसळ' हा चित्रपट येत्या २७ ऑक्टोबरला प्रदर्शनासाठी सज्ज आहे. भारतात तसंच लंडनमध्ये शूट झालेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून बऱ्याच वर्षांनी भरत जाधव एका मोठ्या अन् महत्त्वपूर्ण भूमिकेत पुन्हा पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत. आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांना सरप्राईज देणाऱ्या भरत जाधव यांनी पहिल्यांदाच चित्रपटासाठी रॅप गायन केलं आहे. श्री. रवींद्रनाथ टागोर यांच्या एका नाटकावरून 'लंडन मिसळ' हा चित्रपट प्रेरित आहे, हे याचं आणखी एक वैशिष्ट्य.        'लंडन मिसळ' या चित्रपटाचे निर्माते अमित बसनेट, सुरेश गोविंदराय पै आणि आरोन बसनेट आहेत तर सह-निर्माते सानिस खाकुरेल आहेत. दिग्दर्शक जालिंदर कुंभार यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे, तर पटकथा-संवाद ओमकार मंगेश दत्त याचे आहेत. वैशाली सामंत,रोहित राऊत,वैष्णवी श्रीराम यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे तर 'बाईपण भारी देवा' चित्रपटाच्या संगीताच्या माध्यमातून रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या स

'आपण येणार तर धमाका होणार...' म्हणत 'बॉईज ४' येणार....

Image
मराठी चित्रपटांच्या इतिहासातील सुपरहिट ब्लॉकबस्टर 'बॉईज'च्या सिरीजने सर्वांचे भरभरून मनोरंजन केले आहे. 'बॉईज ३'च्या भरघोस यशानंतर आता 'बॉईज ४' धमाका करायला येत आहेत. नुकतेच 'बॉईज ४'चे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून 'आपण येणार तर धमाका होणार' असं म्हणत 'बॉईज ४' येत्या २० ऑक्टोबर सर्वांच्या भेटीला येत आहेत. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत 'बॉईज ४' चे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया हे निर्माते आहेत तर ऋषिकेश कोळी यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे. वैशिष्टय म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील हा एकमेव चित्रपट आहे, ज्याचे चार भाग आले आहेत.        यापूर्वी  'बॉईज'च्या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालता होता. आता यंदाच्या वर्षी धैर्या, ढुंग्या आणि कबीर काय धमाका करणार आहेत, हे पाहाण्याची सर्वांनाच आता उत्सुकता लागली आहे.       'बॉईज ४' बद्दल दिग्दर्शक विशाल देवरुखकर म्हणतात, &q

‘दिल दोस्ती दिवानगी’ आपल्या भेटीला.

Image
तारुण्यातल्या भावविश्वाचा हळवा कप्पा प्रत्येकाने आपल्या मनाशी जपलेला असतो. यासोबत मैत्री, प्रेम, विश्वास या सगळ्यांचा नव्याने अर्थ उमगायला लागलेला असतो. या सळसळत्या तारुण्यातल्या काही मित्रांची गोष्ट आपल्याला ‘दिल दोस्ती दिवानगी’ हा आगामी चित्रपट सांगणार आहे. येत्या ६ ऑक्टोबरला हा चित्रपट आपल्या भेटीला येतोय. ट्रान्स इंडिया मिडिया अँड एन्टरटेनमेन्टची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न झाला. ‘दिल दोस्ती दिवानगी’ चित्रपटाची निर्मिती राजेंद्र राजन यांची असून शिरीष राणे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. ‘दिल दोस्ती दिवानगी’ ही ट्रान्स इंडिया मिडिया अँड एन्टरटेनमेन्टची पहिली मराठी चित्रपट निर्मिती आहे. आमची आमची ही कलाकृती प्रेक्षकांची नक्की मने जिंकेल असा विश्वास निर्माते राजेंद्र राजन यांनी याप्रसंगी व्यक्त केला.   या प्रेमकथेच्या प्रवासात प्रेक्षक नक्कीच गुंतून जातील असं सांगताना ही 'दिल दोस्ती दिवानगी’   प्रेक्षकांसाठी वेगळा अनुभव ठरेल असा विश्वास दिग्दर्शक शिरीष राणे यांनी व्यक्त केला. कॉलेज लाइफमध्ये धम्म

१३ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'डाक',अश्विनी काळसेकर प्रमुख भूमिकेत...

Image
'डाक' या भयपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं असून १३ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आजवर मराठीसह हिंदीतही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवण्यात यशस्वी झालेली मराठमोळी अभिनेत्री अश्विनी काळसेकर या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.  महेश नेने प्रोडक्शनच्या बॅनरखाली रतिश तावडे आणि महेश नेने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून देवांग गांधी यांचे 'डाक' चित्रपटाला विशेष सहकार्य लाभलं आहे. निर्मितीसोबतच या चित्रपटाचं दिग्दर्शनही महेश नेने यांनीच केलं आहे. पिकल एंटरटेन्मेंटचे समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांनी वितरणाच्या माध्यमातून हा चित्रपट सर्वदूर पोहोचवण्याची मोलाची कामगिरी स्वीकारली आहे. या चित्रपटात प्रवाहापेक्षा खूप वेगळा विषय हाताळण्यात आला आहे. आजच्या प्रगत काळातही समाजाच्या एका कोनाड्यात रूढी-परंपरांना चिकटून बसलेली विचारसरणी पाहायला मिळते. त्याचं दर्शन वेळोवेळी आपल्याला घडतही असतं. अशाच एका प्रथेवर प्रकाशझोत टाकणारा हा चित्रपट विविध विषयांना स्पर्श करणारा आहे. आपल्या देशात अनेक प्रथा होत्या. काय

‘तीन अडकून सीताराम’चा अनलिमिटेड धिंगाणा.... चित्रपटाचा टिझर प्रदर्शित ....

Image
इतके दिवस ज्या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती त्या ‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटाचे जबरदस्त टिझर सोशल मीडियावर अखेर झळकले आहे. टिझर बघून या चित्रपटाविषयीची उत्कंठा आता आणखीनच शिगेला पोहोचली आहे. टिझर अतिशय धमाल असून यात काहीतरी गुंतागुंत दिसत आहे. आता हा सुरू असलेला गोंधळच नेमका काय आहे, कशामुळे आहे, याचेच उत्तर आपल्याला २९ सष्टेंबरला चित्रपटगृहात मिळणार आहे. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. आणि नितीन वैद्य प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन हृषिकेश जोशी यांनी केले आहे. तर लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि नितीन प्रकाश वैद्य या चित्रपटाचे निर्माते आहेत.  टिझरमध्ये वैभव तत्ववादी आणि संकर्षण कऱ्हाडे राजकीय कुटुंबातील असून आलोक त्यांचा मित्र आहे. हॅाटेलमध्ये हे त्रिकुट गोंधळ घालताना दिसत आहेत. ‘दुनिया गेली तेल लावत’ असा काहीसा ॲटिट्यूड असणाऱ्या त्यांच्या आयुष्यात काहीतरी वादळ आल्याचे दिसत असून हे वादळ कसे निवळणार हे पाहाणे औस्तुक्याचे ठरणार आहे. टिझर पाहता कलाकारांची ही दमदार फळी आपल्या भन्नाट अभिनयाने चित्रपटात अधिकच रंगत आणणार आहेत. टिझ

गोडवा वाढवणारी ‘जिलबी’ भेटीला.

Image
‘जिलबी’ ... नाव उच्चारलं तरी तोंडाला पाणी सुटतं. चवदार लुसलुशीत जिलबी आपल्या संगळ्यांनाच आवडते. अशीच एक लज्जतदार ‘जिलबी’ आपला मनाचा गोडवा वाढविण्यासाठी आपल्या भेटीला येणार आहे, पण… मराठी चित्रपटरूपाने. अभिनेता प्रसाद ओक, स्वप्निल जोशी, शिवानी सुर्वे, पर्ण पेठे, गणेश यादव, प्रणव रावराणे, अश्विनी चावरे, प्रियांका भट्टाचार्य या कलाकारांनी ही ‘जिलबी’ प्रेक्षकांसाठी आणली आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर यांची निर्मिती असलेल्या ‘जिलबी’ चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कांबळे यांचे आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला असून चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.  रसिक प्रेक्षकांचा आनंद द्विगुणीत करायला आणि मनाचा गोडवा वाढवायला चांगला विषय प्रेक्षकांसाठी घेऊन येत असल्याचे निर्माते आनंद पंडित यांनी सांगितले. वेगवेगळ्या आशय विषयाचे अभिरुचीसंपन्न चित्रपट मराठीत येताहेत. आम्ही आणलेली ही ‘जिलबी’ तिचा गोडवा प्रेक्षकांच्या मनात नक्कीच उतरेल असा विश्वास दिग्दर्शक नितीन कांबळे यांनी व्यक्त केला.  ‘जिलबी’ चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद मच्छिंद्र बुगडे यांचे आहेत. छायांकन गणेश उतेकर यांचे आहे. कलादिग्

‘फक्त मराठी सिने सन्मान १५सप्टेंबरला रंगणार ‘फक्त मराठी सिने सन्मान’२०२३

Image
आपल्या कलाकृतीला कौतुकाची थाप मिळावी असं सगळ्याच कलाकारांना वाटतं. चांगल्या गुणवत्तेची दखल घेत ‘फक्त मराठी सिने सन्मान’ या पुरस्कारसोहळ्याने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली आणि त्याला आज व्यापक व भव्यस्वरूप प्राप्त झालंय. मराठी चित्रपटात सातत्याने चांगल्या चित्रपटांची निर्मिती होत आहे, याची दखल घेत यंदाही ‘फक्त मराठी सिने सन्मान२०२३ या पुरस्कार सोहळ्यासाठी उत्तमोत्तम चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.  हा सन्मान  कलाकारांपुरता मर्यादित नसून मराठी मनोरंजनसृष्टीसाठी  महत्त्वाचं योगदान देणाऱ्या कलाकार आणि पडद्यामागे असलेल्या तंत्रज्ञाचा  हा सन्मान सोहळा आहे. या पुरस्कार सोहळ्यातील नामांकनांपासून पुरस्कार वितरणापर्यंत सर्वचगोष्टी नाविन्याने नटलेल्या असतात.  नुकतीच पारितोषिकांसाठीची नामांकने जाहीर करण्यात आली आहेत. गेल्यावर्षापासूनआयोजित होत असलेल्या या सोहळ्याचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे.  येत्या १५ सप्टेंबरला यंदाचा ‘फक्तमराठी सिने सन्मान २०२३’ सोहळा रंगणार आहे.  कलेच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत आपलं नाणं खणखणीत वाजवणाऱ्या व मराठी चित्रपटसृष्टी बहरावी यासाठी सातत्य