Posts

Showing posts from September, 2024

'दि ए आय धर्मा स्टोरी' २५ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित.

Image
आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर भाष्य करणारा 'दि एआय धर्मा स्टोरी' २५ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतीच ही तारीख सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली असून चित्रपटाचे नवीन पोस्टरही प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. यात पुष्कर जोगबरोबर स्मिता गोंदकर आणि दीप्ती लेले दिसत आहेत. पोस्टर पाहून चित्रपटाबद्दलची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित असलेल्या या पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर सुरेखा जोग यांनी केले असून बियु प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाच्या तेजल पिंपळे निर्मात्या आहेत. पुष्कर जोगने मराठी सिनेसृष्टीला नेहमीच वेगळे, नवीनपूर्ण चित्रपट दिले आहेत. त्यामुळे या चित्रपटाही प्रेक्षकांना काहीतरी नवीन अनुभवायला मिळेल, हे नक्की !   चित्रपटाबद्दल दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतात , "२५ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा एक वेगळा विषय असून एका वडिलांची आणि मुलीची ही गोष्ट आहे. एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून वैयक्तिक सूड उगवण्याचा प्रयत्न करत एका निष्ठावंत बापाच्या मुलीचे अपहरण केले जाते. आपल्या मुलीला पुन्हा जिवंत पाहाण्यासा

"धर्मवीर २" चा बॉक्सऑफिसवर धमाका.

Image
     गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला "धर्मवीर २" हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून पहिल्या दिवशी या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत तब्बल १ कोटी ९२ लाखांचा गल्ला कमावला असून २०२४ या वर्षात पहिल्या दिवशी सगळ्यात जास्त कमाई करणारा मराठी सिनेमा ठरला आहे. १५००  पेक्षा ही अधिक शोजने या  चित्रपटाची सुरुवात करण्यात आली आहे. चित्रपटाचा  टीजर, ट्रेलरला मिळालेला तुफान प्रतिसाद श्रवणीय संगीत यामुळे तर चित्रपटाची चांगलीच हवा निर्माण झाली होती. रसिकांच्या मानत चित्रपटात नक्की काय दाखवणार याची उत्सुकता होती आणि त्याचेच प्रतिबिंब आपल्याला बॉक्स ऑफिसवर दिसून येत आहे. महिला वर्गाचा वाढता प्रतिसाद मिळत असून कुटुंबासोबत चित्रपट पाहण्यासाठी जात असल्याचे चित्र दिसते आहे. केवळ मुंबई, ठाणे नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये कलेक्शन मध्ये नक्कीच वाढ होईल यात शंका नाही.      धर्मवीर २ या चित्रपटाची अजुन एक विशेष बाब म्हणजे, शिंदे साहेबांची अगदी हूबे हुब भूमिका अभिनेता क्षितीश दाते याने साकारली असून  सिनेमाच्या शेवटच्या उ

'पाणी'च्या शीर्षकगीताला लाभला शंकर महादेवन यांचा आवाज 'नगं थांबू रं' हे प्रेरणादायी गाणे प्रदर्शित.

Image
राजश्री एंटरटेन्मेंट आणि पर्पल पेबल पिक्चर्स प्रस्तुत कोठारे व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड निर्मित 'पाणी' च्या टिझरने चित्रपटाची उत्सुकता ताणली असतानाच आता या चित्रपटातील मनाला उभारी देणारे 'नगं थांबू रं' हे शीर्षकगीत प्रदर्शित झाले आहे. आदिनाथ कोठारे याने शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला गुलराज सिंग यांनी साजेसे संगीत दिले असून हे प्रेरणादायी गाणे शंकर महादेवन यांनी आपल्या दमदार आवाजात गायले आहे. मराठवाड्यातील हनुमंत केंद्रे या 'जलदूता'ची कहाणी सांगणाऱ्या या चित्रपटाचे शीर्षकगीत अतिशय स्फूर्तिदायी आहे. या गाण्यातून हनुमंत केंद्रे यांचा पाण्यासाठीचा लढा, संघर्ष आणि त्यांना मिळालेले यश निदर्शनास येत आहे.  नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या गाण्याचे बोल प्रत्येकाच्या मनाला भिडणारे असून नवीन उमेद देणारेही आहे. गावकऱ्यांच्या सहकार्याने पाणीटंचाई सारखी भीषण समस्या सोडवून गावकऱ्यांना आशेचा किरण दाखवणारे हे गाणे आहे. अतिशय भावपूर्ण बोल असलेले हे गाणे संगीतप्रेमींना नक्कीच आवडेल.  या गाण्याबद्दल शंकर महादेवन म्हणतात, "ज्यावेळी या गाण्याबद्दल मला विचारणा करण्यात आल

'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपटाची ऑस्करवारी.

Image
सुधीर फडके म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी. संगीत क्षेत्रातील हे एक अजरामर नाव आहे.  बाबूजींचा संगीतमय प्रवास उलगडणारा 'स्वरगंधर्व सुधीर फडके' काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला. महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात या चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. प्रेक्षकांसह श्रीधर फडके, आशा भोसले, माधुरी दीक्षित अशा अनेक दिग्गजांनी या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले. विशेष म्हणजे अमेरिकेतही या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तिथेही या चित्रपटाचे शोज हाऊसफुल्ल झाले. प्रेक्षकांचे एवढे प्रेम मिळवल्यानंतर आता हा चित्रपट ऑस्करवारीसाठी सज्ज झाला आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया यांच्याकडून २९ चित्रपट स्पर्धेसाठी विचारात घेतली गेले. त्यात योगेश देशपांडे दिग्दर्शित 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या बहुचर्चित चित्रपटाचा समावेश आहे. त्यामुळे आता मराठी सिनेसृष्टीत पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला जाण्याची शक्यता आहे.       याबाबत दिग्दर्शक योगेश देशपांडे म्हणतात, "ऑस्करसाठी भारताकडून पाठवल्या जाणाऱ्या या वर्षातील सर्वोत्तम २९ चित्रपटांच्या यादीत “स्वरगंधर्व सु

आंतरराष्ट्रीय ‘शिवसृष्टी रील महाकरंडक’ स्पर्धेचे आयोजन.

Image
छत्रपती शिवरायांच्या  पराक्रमाचा आणि विचारांचा  खूप मोठा वारसा आपल्याला  लाभला आहे. महाराजांचे अजोड कार्य गड-किल्ल्यांच्या रूपाने आपण पहात असतो पण शिवकालीन कथा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अनुभवता येणारं एकमेव ठिकाण म्हणजे पुण्याजवळील  शिवसृष्टी. विस्तृत परिसरात  वसलेलं पुण्यातील शिवसृष्टी, आशियातील एकमेव ऐतिहासिक थीम पार्क असून ही जागा प्रत्येकासाठी मंत्रमुग्ध करणारा अनुभव देणारी आहे, विशेषतः क्रिएटर्ससाठी. (Creators) ज्यांना प्राचीन इतिहासाशी नाते जोडण्यासाठी आणि त्यांच्या कलेच्या अभिव्यक्तीसाठी एक अनोखे व्यासपीठ मिळते. .    महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्यावतीने शिवसृष्टी रील महाकरंडक स्पर्धेचे २० ऑक्टोबर २०२४ रोजी आयोजन  करण्यात आले असून, या आंतरराष्ट्रीय स्पर्धेची नोंदणी प्रक्रिया २६ सप्टेंबर २०२४ पासून सुरू झाली आहे. क्रिएटर्सना (Creators) त्यांच्या कलेचे प्रदर्शन करण्याची उत्तम संधी मिळणार आहे, जिथे ते शिवसृष्टीतील अनोखा वारसा आणि संस्कृती रील्सच्या माध्यमातून जगासमोर सादर करू शकतील.  या स्पर्धेचे नेतृत्व प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक श्री. दिग्पाल लांजेकर करीत अस

‘ह्या गोष्टीला नावच नाही' दिग्दर्शक संदीप सावंत यांचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला.

Image
कथाविषयाची उत्तम जाण, माध्यमांवरील योग्य पकड यामुळे दिग्दर्शक संदीप सावंत यांची प्रत्येक दिग्दर्शकीय कलाकृती वेगळी ठरली आहे. स्वत:ला पडलेले प्रश्न, आजबाजूच्या समस्या दिग्दर्शक संदीप सावंत यांनी आपल्या सिनेमांतून आजवर अत्यंत प्रभावीपणे मांडल्या आहेत. ‘श्वास, ‘नदी वाहते’ यासारख्या चित्रपटांमधून चित्रभाषेची प्रगल्भ समज दिग्दर्शक संदीप सावंत यांनी या आधीच दाखवून दिली आहे. मराठी चित्रपट फक्त मनोरंजनातच न अडकता, जगण्यासाठीची प्रेरणा देण्याचे कामही तेवढय़ाच ताकदीने आजवर करत आला आहे. एक-दोन नव्हे तर अशा अनेक चित्रपटांची समृद्ध मालिकाच मराठी सिनेसृष्टीने गुंफली आहे. याच मालिकेत दिग्दर्शक संदीप सावंत ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ या नव्या चित्रपटाच्या माध्यमातून एक सुंदर पुष्प ओवण्याचा प्रयत्न केला आहे. येत्या ८ नोव्हेंबरला पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत ‘ह्या गोष्टीला नावच  नाही’ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.      डॉ.सतीशकुमार आदगोंडा पाटील यांच्या 'मृत्यूस्पर्श' या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. प्रतिकूल परिस्थितीत जगण्याचं बाळकडू कोणालाच मिळालेलं नसतं, पण कठीण परिस्थितीत मा

'नाद' चित्रपटाचा हार्ड टिझर प्रदर्शित...२५ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार 'नाद'

Image
    घोषणा झाल्यापासून 'नाद - द हार्ड लव्ह'  हा मराठी चित्रपट सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. दिमाखदार संगीत प्रकाशन सोहळ्यानंतर या चित्रपटाचा लक्षवेधी टिझर रसिकांच्या भेटीला आला आहे. 'नाद'चा टिझर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आला आहे. खऱ्या अर्थाने चित्रपटाची झलक दाखवणारा टिझर 'नाद'मध्ये प्रेक्षकांना एक संगीतमय प्रेमकथा पाहायला मिळणार असल्याचे संकेत देतो. चित्रपटाच्या शीर्षकासोबत असलेल्या 'द हार्ड लव्ह' या टॅगलाईनप्रमाणेच टिझरही हार्ड झाला आहे. 'नाद' हा चित्रपट २५ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकरच्या बॅनरखाली निर्माते संजय पगारे आणि रुपेश दिनकर यांनी 'नाद - द हार्ड लव्ह' चित्रपटाची निर्मिती केली आहे. रुपाली दिपक पवार आणि वैशाली नितीन पवार या चित्रपटाचे निर्मिती व्यवस्थापक आहेत. 'नाद'चं दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केलं आहे. टिझरची सुरुवातच मूळात 'नाद'ची व्याख्या सांगणारी आहे. गावाकडच्या लाल मातीतून नागमोडी वाट काढत जाण

सुबोध भावे, सई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर पंधरा वर्षांनी येणार एकत्र.....‘बोल बोल राणी’ ७ फेब्रुवारीला होणार प्रदर्शित.

Image
सुबोध  भावे, सई ताम्हणकर आणि चिन्मय मांडलेकर अशी तगडी स्टारकास्ट लवकरच प्रेक्षकांना पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे. न्यूझिलंडच्या न्यूझिलंड मोशन पिक्चर्सने भारतातील फिफ्टी टू फ्रायडे (अमित भानुशाली), कथा वाचन (अपूर्वा मोतीवाले सहाय) यांच्यासोबत हातमिळवणी केली असून लवकरच ते 'बोल बोल राणी' हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा चित्रपट येत्या नवीन वर्षात म्हणजेच ७ फेब्रुवारी २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सुबोध भावे, सई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर हे सुमारे पंधरा वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. सिड विंचुरकर दिग्दर्शित या चित्रपटाचे अपूर्वा मोतीवाले सहाय, सिड विंचुरकर आणि अमित भानुशाली निर्माते आहेत.          मराठी चित्रपटसृष्टीने अतिशय दर्जेदार, आशयपूर्ण चित्रपट देऊन मराठी चित्रपटांना जागतिक दर्जा प्राप्त करून दिला आहे. त्यामुळेच परदेशातूनही अनेक प्रॉडक्शन्स हाऊस मराठी चित्रपटांची निर्मिती करण्यास उत्सुक आहेत. म्हणूनच न्यूझिलंड मोशन पिक्चर्सचे सिड विंचुरकर मर

माननीय राज ठाकरे, आमिर खान, राजकुमार हिरानी, आशुतोष गोवारीकर यांच्या उपस्थितीत पार पडला 'येक नंबर'चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा.

Image
ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत, त्या झी स्टुडिओज आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित 'येक नंबर' या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच सोहळा नुकताच दिमाखात पार पडला. या सोहळ्याला माननीय राज ठाकरे, बॉलिवूड अभिनेता आमिर खान, दिग्दर्शक राजकुमार हिरानी, आशुतोष गोवारीकर, अविनाश गोवारीकर, साजिद नाडियाडवाला, साजिद खान, अभिजात जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाची अनेकांना उत्सुकता लागलेली असतानाच आता ही उत्सुकता आणखी वाढवण्यासाठी चित्रपटाचा जबरदस्त प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अंगावर शहारा आणणाऱ्या या ट्रेलरने प्रेक्षकांच्या मनात असंख्य प्रश्न उपस्थित केले आहेत. राजेश मापुस्कर दिग्दर्शित या चित्रपटात धैर्य घोलप, सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.      खरंतर या चित्रपटाच्या पोस्टरपासूनच हा चित्रपट म्हणजे माननीय राज ठाकरे यांचा बायोपिक असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर ट्रेलर पाहून या चर्चेला पूर्णविराम लागला असून आपली प्रेमकहाणी पूर्ण करण्यासाठी गावात माननीय राज ठाकरे यांना घेऊन

'लाईक आणि सबस्क्राईब'मधील तरुणाईला भुरळ घालणारे गाणे प्रदर्शित.

Image
अभिषेक मेरूकर दिग्दर्शित 'लाईक आणि सबस्क्राईब'च्या रहस्यमयी टिझरने प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण केली असून सोशल मीडियावर कमेंटचा वर्षाव पाहायला मिळत आहे. टिझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता या चित्रपटातील तरुणाईला आवडेल असे भन्नाट गाणे सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. 'अपलोड करून टाक' असे या गाण्याचे बोल आहेत. अनेक जण कॅमेराच्या साहाय्याने जीवनातील प्रत्येक आनंददायी क्षण टिपण्याचा प्रयत्न करतात आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहोचवतात. तरुणाईच्या आयुष्यात अपलोड करणे, ही दिनचर्या झाली आहे असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे नुकतेच प्रदर्शित झालेले 'लाईक आणि सबस्क्राईब'मधील हे गाणे तरुणाईला विशेष रिलेट होणारे आहे. क्षितिज पटवर्धन यांचे बोल असणाऱ्या या गाण्याला अमितराज यांचे संगीत लाभले आहे. तर कस्तुरी वावरे यांनी यांच्या मधुर आवाजात हे गाणे गायले आहे. 'अपलोड करून टाक' गाण्यात जुई भागवत आयुषयातील प्रत्येक क्षणाचा व्लॅाग बनवून तो सोशल मीडियावर अपलोड करताना दिसत आहे. या गाण्यातील प्रत्येक ओळ आजच्या तरुणाईच्या आयुष्याशी जोडलेली आहे. त्

आ.धिरज विलासराव देशमुख व दीपिशीखा धिरज देशमुख यांनी वाचन चळवळ निर्माण करून दिली सर्वाना प्रेरणा.

Image
वाचन संस्कृती जोपासली जावी व त्या माध्यमातून व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'रीड लातूर' उपक्रमाच्या माध्यमातून खूप चांगला सकारात्मक बदल समाजामध्ये दिसून येत असून ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेतील अवांतर वाचनाची पुस्तके नियमितपणे वाचत असल्याने त्यांचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता रीड लातूर उपक्रमाची मागणी लातूर जिल्ह्यातील विविध शाळांमधून होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा उपक्रम अधिक मोठ्या प्रमाणात रुजला जावा यासाठी जे काही सहकार्य आवश्यक असेल ते निश्चितपणे आपण करू अशी ग्वाही देऊन, आ.धिरज विलासराव देशमुख व दीपशिखा धिरज देशमुख यांनी पुस्तक वाचना विषयी जी चळवळ सुरू केली आहे ती सर्वांना प्रेरणा देणारी असल्याचे गौरवउदगार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनमोल सागर यांनी काढले.  वाचनसंस्कृतीस चालना देत असताना रीड लातूर उपक्रमात सहभागी होवून वाचन चळवळीला आकार देत असलेल्या शिक्षक व शाळांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार श्री धिरज विलासर

अभिनेता भाऊ कदम आणि सिद्धार्थ कांबळे ‘समाजरत्न पुरस्कार २०२४’ ने सन्मानित.

Image
‘समाजाचे आपण देणे लागतो’ या भूमिकेतून जगणाऱ्या रत्नांचा ‘समाजरत्न पुरस्कार २०२४’ देऊन सन्मान करण्यासाठी अद्वैत थिएटर या नाट्यसंस्थेचे निर्माते राहुल भंडारे ह्यांनी ‘समाजरत्न पुरस्कार २०२४’ या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे.  अद्वैत थिएटर संस्था १८ वर्षे रंगभूमीवर सक्रीय कार्यरत असून आजवर दर्जेदार २६ नाटकांची निर्मिती त्यांनी केली आहे. अद्वैत थिएटर संस्थेकडून समाजातील प्रतिष्ठित आणि विविध क्षेत्रात प्रगती करत असताना सोबत सामाजिक बांधिलकी जपत नावलौकिक मिळवलेल्या व्यक्तींचा सत्कार व सन्मान करण्याचे आयोजले आहे. हा सन्मान अद्वैत थिएटर तर्फे करण्यात येणार आहे.     या सन्मानाचे सत्कारमूर्ती आहेत, मा.श्री सिद्धार्थ टी. कांबळे (उपाध्यक्ष-मुंबई जिल्हा बँक-जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कांग्रेस,व समाजसेवक) सामाजिक, राजकीय आणि सहकार विभागात विशेष कामगिरी केली आहे. कलाक्षेत्रात आपला ठसा उमटवणारे आणि रसिकांचे निखळ मनोरंजन करणारे अभिनेता भाऊ कदम या दोन रत्नांना ‘समाजरत्न पुरस्कार २०२४’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.      हा सत्कार समारंभ बुधवार २५ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३ ते ६ या वे

लावण्यवती, मदनमंजिरी, मनमोहक अदांनी घायाळ करायला सज्ज.

Image
बहारदार नृत्य, मनाला भुरळ घालणारी अदाकारी आणि चैतन्य निर्माण करणाऱ्या घुंगरांच्या आवाजाने मनोरंजन करायला मदनमंजिरी सज्ज  झाली आहे.  सध्या सगळीकडे फुलवंतीची  चर्चा  सुरु आहे. या चित्रपटातील  मदनमंजिरी हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून उतरलेली ‘फुलवंती’ कादंबरी चित्रपटरूपात ११ऑक्टोबरला आपल्यासमोर येणार आहे. अशी मी - मदनमंजिरी सुबक ठेंगणी लखलखते सुंदरी,अशी मी - मदनमंजिरी चटक चांदणी चमचमते अंबरी     अशी अतिशय ठसकेबाज शब्दरचना गीतकार डॉ. प्रसाद बिवरे यांची असून वैशाली माडे यांच्या आवाजाने या  गाण्याला चारचाँद लागले आहेत. संगीत अविनाश-विश्वजीत यांचे तर नृत्यदिग्दर्शन उमेश जाधव यांचे आहे.      या गाण्यातला जोश प्रत्येकाला मंत्रमुग्ध करणारा आहे. या गाण्याचे बोल खूप सुंदर आहेत. संगीतही तितक्याच ताकदीचे आहे. त्यामुळे हे गाणे गाताना  खूप मजा आल्याचं  वैशाली सांगते. प्रेक्षकांना हे गाणं नक्कीच ठेका धरायला लावेल. प्राजक्ताच्या नृत्यानं या  गाण्याला अजून रंग चढला आहे.     पॅनोरमा स्टुडिओज सादर करत आहेत... ‘फुलवंती’ मंगेश पवार अँड कंप

यंदा ठाण्यात होतोय मराठी सेलिब्रिटी डांडिया: कलाकार डांडिया खेळणार, सर्वांसाठी मोफत प्रवेश!

Image
CastingVibe - Digital Casting Platform यांच्या आयोजनात आणि  श्री सिद्धिविनायक प्रतिष्ठान ठाणे नवरात्र मंडळ. यांच्या सहकार्याने ठाण्यातील भगवती शाळा, भगवती मैदान, विष्णूनगर, नौपाडा, तीन हात नाका, ठाणे (प) येथे ३ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर २०२४, दरम्यान संध्याकाळी ७ ते १० या वेळेत ‘मराठी सेलिब्रिटी डांडिया’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष कार्यक्रमात मराठी टीव्ही मालिकांमधील आणि चित्रपटसृष्टीतील अनेक प्रसिद्ध कलाकार सहभागी होणार आहेत. त्यांनीही या उत्सवात सहभागी होऊन डांडियाचा आनंद लुटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हे प्रेक्षकांसाठी एक अनोखा क्षण ठरणार आहे, कारण त्यांना त्यांच्या आवडत्या कलाकारांना प्रत्यक्ष पाहण्याची आणि त्यांच्यासोबत सण साजरा करण्याची संधी मिळणार आहे.      या महोत्सवात सहभागी होणारे कलाकार सध्या मराठी मनोरंजनसृष्टीत कार्यरत असलेले आणि पूर्वीपासून लोकप्रिय असलेले आहेत. हा महोत्सव कलाकारांसाठी अतिशय रोमांचक तर प्रेक्षकांसाठी खास अनुभव ठरणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, हा कार्यक्रम पूर्णपणे मोफत. आहे, कोणतेही तिकीट नाही, आणि चाहत्यांनाही डांडिया खेळण्याच

बहुचर्चित "नवरा माझा नवसाचा २"ला बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद, वीकेंडला ७.८४ कोटीची कमाई.....

Image
दमदार स्टारकास्ट, पुरेपूर मनोरंजन करणाऱ्या नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाला प्रेक्षकांनी दमदार प्रतिसाद दिला आहे. "नवरा माझा नवसाचा 2" चित्रपटाला पहिल्या दिवशी मिळालेला प्रतिसाद हा मराठी चित्रपटांच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या ओपनिंग्जपैकी आहे. १००० पेक्षा अधिक शोज ने सुरुवात केलेल्या या चित्रपटाला ६००पेक्षाही अधिक  शोज हाऊसफुल्ल होते. वीकेंडला ७.८४ कोटींची  कमाई या चित्रपटाने केली आहे.  सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या 'नवरा माझा नवसाचा 2' या चित्रपटाची निर्मिती,  कथा - पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले असून संवादलेखन संतोष पवार यांचं आहे. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे यांच्यासह मोठी स्टारकास्ट आहे.  नवस फेडण्यासाठी जातानाचा रेल्वे प्रवास, त्यात होणाऱ्या गमतीजमती हा चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. सोनू निगम, जॉनी लिवर, श्रिया पिळगांवकर हे पाहु ण्या कलाकराच्या भूमिकेत असून प्रेक्षकांना हे सरप्राइज पसंतीस पडले आहे.  बऱ्याच दिवसांपासून रसिक प्रेक्षकांमध्

महाराष्ट्राचा महानायक परत येतोय; अशोक सराफ यांचं छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक.

Image
हिंदी-मराठी कलाविश्वातील हरहुन्नरी अभिनेते म्हणून अशोक सराफ यांना ओळखलं जातं. अशोक मामांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलंय. मध्यंतरी काही दिवस ते छोट्या पडद्यापासून दूर होते. पण आता पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवायला ते सज्ज आहेत. "येतोय 'महाराष्ट्राचा महानायक' लवकरच", असं म्हणत 'कलर्स मराठी'ने मालिकेची पहिली झलक आऊट केली होती. त्यामुळे या मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण झालं होतं. आता मालिकेचा पहिला प्रोमो आऊट करत प्रेक्षकांना एक खास सरप्राईज देण्यात आलं आहे. 'कलर्स मराठी'च्या 'अशोक मा.मा.' या मालिकेच्या माध्यमातून  अशोक मामा छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करत आहेत. टेलिव्हिजनचा पडदा व्यापून टाकायला महाराष्ट्राचा महानायक परत येतोय. नुकताच 'अशोक मा.मा.' या मालिकेचा उत्कंठा वाढवणारा प्रोमो आऊट झाला आहे. प्रोमो पाहताक्षणी काहीतर गूढ, थरारक असल्याचं जाणवतंय. प्रत्येक गोष्टीची खबरदारी घेणारे, अत्यंत शिस्तप्रिय, काटेकोरपणे वागणारे अशोक मामा दिसत आहेत. तसेच 'शिस्त म्हणजे शिस्त' हा त्यांच्या

नाम फाउंडेशन संस्थेचा ९ वा वर्धापन दिन संपन्न.

Image
चळवळीला जर सत्त्वगुणांची जोड मिळाली, तर तिचे रूप पालटते. सध्याच्या काळात चळवळ उभी करणे तितके कठीण नाही. त्यासाठी अनुयायी मिळतात,पण ती चळवळ कार्यान्वित झाल्यावर सर्व सूत्रे  योग्य व्यक्तीच्या हातात असणे महत्त्वाचे असते. राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी पुढे सरसावलेले संवेदनशील अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी एक एक पाऊल पुढे टाकत सुरु केलेल्या ‘नाम’ फाउंडेशन संस्थेने आपल्या अनेक विधायक कामातून यशस्वी ९ वर्ष पूर्ण केली. १० व्या वर्षात पदार्पण करीत असताना या सर्व कामांचा आढावा घेत संस्थेचा १० वा वर्धापन दिन नुकताच संपन्न झाला. या वर्धापन दिनाला महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वर्धापन दिनाची सुरुवात डॉ. गणेश चंदनशिवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या ‘गण’ आणि ‘गोंधळा’ ने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले त्यानंतर उदय सामंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. नाम संस्थेचे विश्वस्त आणि सीएसआर (CSR) च्या माध्यमातून मदत करणाऱ्या प्रतिनिधींचा यावेळी कृतज्ञता पुरस्क

संस्थापक 'अमृता फडणवीस' आणि 'आयुष्मान खुराना' यांच्यासोबत दिव्याज फाऊंडेशनचा ‘सी शोर शाइन’ उपक्रम यशस्वी

Image
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि मुंबई पोलिस यांच्या सहकार्याने, दिव्याज फाऊंडेशनचा वार्षिक ‘सी शोर शाइन’ समुद्रकिनारा स्वच्छता उपक्रम आज यशस्वीपणे पार पडला. शहरातील लोकप्रिय समुद्रकिनारा म्हणजेच वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावरील आयोजित या कार्यक्रमाचा उद्देश पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे महत्त्व वाढवणे आणि पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभागाला प्रोत्साहन देणे हा आहे. या मोहिमेला मुंबईतील तरुणांनी अत्यंत उत्साहाने प्रतिसाद दिला. या तरुणांनी समुद्रकिनारे स्वच्छ करण्यात आणि याबाबत जनजागृती करण्यात सक्रिय सहभाग घेतला. या उपक्रमातून मुंबईचे नैसर्गिक सौंदर्य टिकवणे आणि पर्यावरणाची काळजी घेणे याचे महत्व पटवून देण्यात आले. अमृता फडणवीस यांनी लोकसहभागाच्या मुद्द्यावर भर देत सांगितले की, “जेव्हा समाज पर्यावरण संवर्धनासाठी एकत्र येतो तेव्हा काय साध्य करू शकतो याचा पुरावा म्हणजे आजचे हे यश आहे. आमचे समुद्र किनारे एक मौल्यवान संसाधन आहेत आणि ते भावी पिढ्यांसाठी संरक्षित करणे ही आमची सामूहिक जबाबदारी आहे.”     बीएमसी आयुक्त भूषण गगराणी, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा

कलाकारांच्या अदाकारीने बहरणार ‘फुलवंती’.

Image
मराठी चित्रपट त्याच्या आशयासोबतच त्याच्या उच्चनिर्मितीमूल्यांसाठी सुद्धा लोकप्रिय आहे. अभिनयसंपन्न कलाकारांची मोठी फौज आज मराठीत कार्यरत आहे. अनेक चित्रपटातून आपल्याला त्यांच्या अभिनय सामर्थ्याची चुणूक पहायला मिळतेय. ‘फुलवंती’ या आगामी मराठी चित्रपटात अनेक बड्या कलाकारांना एकत्र पाहण्याची संधी मिळणार आहे.  ‘फुलवंती’ च्या रूपात अभिनेत्री प्राजक्ता माळीचा लूक समोर आल्यानंतर या चित्रपटातील इतर कलाकारही समोर आले आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी यांच्यासोबत प्रसाद ओक, ऋषिकेश जोशी, स्नेहल तरडे, वैभव मांगले यांच्यासह मराठीतले अनेक कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून उतरलेली ‘फुलवंती’ कादंबरी चित्रपटरूपात ११ऑक्टोबरला आपल्यासमोर येणार आहे.  ‘फुलवंती’ चित्रपटासाठी अनेक कलाकारांचं एकत्र येणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. विनोदी भूमिकांसोबतच धीरगंभीर भूमिकाही ताकदीने साकारत सर्व माध्यमांवर हुकूमत गाजवण्याचं कौशल्य असणारे अभिनेते प्रसाद ओक यात 'बाखरे सावकार नाईक' या भूमिके

लज्जतदार नात्यांची चटकदार गोष्ट ...‘पाणीपुरी’ लवकरच चित्रपटगृहात...

Image
झणझणीत, तिखट, कुरकुरीत, आंबट-गोड पदार्थ म्हटलं की, पाणीपुरीच आपल्या नजरेसमोर येते. पाणीपुरी म्हटलं की, प्रत्येकाच्या तोंडाला लगेच पाणी सुटतं आणि मनालाही ते खाण्याचा मोह होतो. नात्यांच्या अशाच वेगवेगळ्या चवींची चटकदार पाणीपुरी लवकरच चित्रपटगृहात आपल्याला चाखायला मिळणार आहे. एस. के प्रॉडक्शन निर्मित आणि रमेश चौधरी यांचे लेखन-दिग्दर्शन असलेला ‘पाणीपुरी’ हा मराठी चित्रपट येत्या १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. संजीवकुमार अग्रवाल या चित्रपटाचे निर्माते आहेत तर सहनिर्माते चंद्रकांत ठक्कर, अनिकेत अग्रवाल आहेत.   प्रत्येक नात्याची स्वतःची एक गोष्ट असते.. कधी खूप आनंद, प्रेम, विश्वास देणारी तर कधी सोबत दुःख घेऊन येणारी..अशाच लज्जतदार नात्यांची चटकदार गोष्ट घेऊन ‘पाणीपुरी’ हा चित्रपट आपलं मनोरंजन करणार आहे. मकरंद देशपांडे, सायली संजीव, ऋषिकेश जोशी, विशाखा सुभेदार, भारत गणेशपुरे, प्राजक्ता हनमघर, कैलास वाघमारे, शिवाली परब, प्रतिक्षा जाधव, सचिन बांगर, अनुष्का पिंपुटकर, अभय गिते आदि कलाकार मंडळी आपल्या मनोरंजनातून  ‘पाणीपुरी’ची चव आपल्याला  चाखायला देणार आहेत.       चित्रपटाच

पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित मराठीतला सगळ्यात मोठा अ‍ॅक्शनपट "रानटी".

Image
जंगलात राहणारे सगळेच प्राणी जंगली असतात, पण सगळेच ‘रानटी’ नसतात. काही विशिष्ट प्राण्याचा तो उपजत गुणधर्म असतो. त्याला जगण्यासाठी शिकार करावी लागते, हल्ले करावे लागतात. पण, ह्या हल्ल्याना जेव्हा शांत प्राणी प्रतिकार करतो तेव्हा तो हल्लेखोरापेक्षा अधिक जास्त ‘रानटी’ असतो. या कथेचा नायक असाच ‘रानटी’ बनला. म्हणून... "काही ‘रानटी’ असतात,  काही बनतात! प्रदर्शित झालेल्या ह्या पोस्टरवरनं ‘रानटी’ चित्रपट दिसतोय तेवढाच हिंस्त्र आणि त्याहून अधिक अ‍ॅक्शनने  भरलेला आहे. मराठी सिनेमांत आजपर्यंत कधीही न पाहण्यात आलेल्या दिग्दर्शनाची शैली, थरारक अ‍ॅक्शन दृश्य, जबरदस्त पटकथेचा जॉनर आणि अचूक संकलन हे ‘रानटी’ चित्रपटात पहायला मिळणार आहे. प्रेक्षकांसाठी हे ‘सरप्राईज’ असणार आहे. शरद केळकर हा हिंदी-मराठी चित्रसृष्टीतील आघाडीचा नट हॉलिवूड चित्रपटातील नायकापेक्षा कमी नाही हे ह्या पोस्टरमधूनही कळतंय आणि त्याचा ‘रानटीपणा’ नेमका किती आहे हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर कळेलच. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना शरद सांगतात की,'अधर्मी वृत्तींचा नाश करणार्‍या विष्णूची भूमिका मी यात केली आहे. अशा प्रकाराच

'गुलाबी' उलगडणार स्त्रियांच्या भावविश्वाचा रंग....२२ नोव्हेंबरला येणार भेटीला.

Image
नुकतीच सोशल मीडियावर या चित्रपटाची अनोख्या पद्धतीने तारीख जाहीर केली असून व्हॅायलेट फ्लेम मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘गुलाबी’ चित्रपट येत्या २२ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभ्यंग कुवळेकर दिग्दर्शित या चित्रपटाचे सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर, स्वप्नील भामरे निर्माते आहेत. 'गुलाबी' चित्रपटात श्रुती मराठे, मृणाल कुलकर्णी, अश्विनी भावे, सुहास जोशी, शैलेश दातार, अभ्यंग कुवळेकर आणि निखिल आर्या अशी दमदार स्टारकास्ट पाहायला मिळेल. या चित्रपटाला साई पियुष यांचे संगीत लाभले आहे.  नुकत्याच प्रदर्शित झालेल्या  व्हिडीओमध्ये श्रुती मराठे, अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी एकमेकींना फोन करून भेटण्याची तारीख ठरवत आहेत. शेवटी भेटण्याची तारीख २२ नोव्हेंबर ठरली असून या तारखेला प्रेक्षकांनाही 'गुलाबी' चित्रपटगृहात पाहाता येईल.  विचार, वागणूक, स्वप्ने आणि नाती असा गुलाबी प्रवास या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरवरुन आणि नावावरुन हा सिनेमा तीन मैत्रिणींची कथा सांगणारा दिसत असला तरी पण तिघींची पार्श्वभूमी मात्र वेगळी आहे. त्य

बॉडीबिल्डर सुहास खामकर धमाकेदार 'राजवीर'मध्ये झळकणार.

विख्यात बॉडीबिल्डर सुहास खामकर आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. आगामी "राजवीर" या चित्रपटात सुहास प्रमुख भूमिकेत दिसणार असून,हिंदी भाषेत असलेल्या या चित्रपटाचा धमाकेदार टीजर लाँच करण्यात आला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक मिळाला आहे.