पोस्ट्स

जून, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

'येरे येरे पैसा ३’ चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित, सोहळ्याला....राज ठाकरे आणि रोहित शेट्टी यांची विशेष उपस्थिती.

इमेज
  मराठी चित्रपटसृष्टीतील धमाल, ड्रामा आणि कॉमेडीने भरलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला. या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांची विशेष उपस्थिती होती.  या दोन दिग्गजांच्या उपस्थितीने या ट्रेलर लॉन्च सोहळयाला चारचांद लागले. यावेळी त्यांनी ट्रेलरचे कौतुक करत चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.       यापूर्वीच प्रदर्शित झालेल्या गाण्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता ट्रेलरने त्या उत्सुकतेत आणखीनच भर घातली आहे. ट्रेलरमध्ये ५ करोड रुपये आणि सोन्याच्या बिस्किटांसाठी चाललेली प्रचंड धावपळ आणि गोंधळ पाहायला मिळतोय. सगळ्यांचेच लक्ष त्या पाच करोड रुपयांवर आहे. मात्र या ५ करोड रुपयांचा खेळ कोण जिंकणार? हे प्रेक्षकांना १८ जुलैपासून चित्रपटगृहात समजणार आहे!    राज ठाकरे यांनी चित्रपटाविषयी आपले मत व्यक्त करताना सांगितले, “अमेय खोपकर या चित्रपटाचे तीन भाग घेऊन आले आहेत, ...

गायक कैलाश खेर यांचा स्वच्छतेचा नारा..

इमेज
   दमदार आवाजाने लाखो रसिकांच्या हृदयांवर राज्य करणारे प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी आजवर अनेक सुपरहिट गाण्यांसाठी आपला आवाज दिला आहे. आपल्या दमदार आवाज आणि अर्थपूर्ण गाण्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गायक कैलाश खेर यांनी आता गाण्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा नारा देत सामान्यजनांना सजग करण्याचा प्रयत्न केला आहे.     हे मानव, हे मानव  आदते अब बदल दो   कुदरत के बवंडर का  इशारा अब समझ लो    असं म्हणत त्यांनी प्रत्येकाला सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला आहे. रेडबड मोशन पिक्चर या बॅनरअंतर्गत येत्या १ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या 'अवकारीका' या मराठी चित्रपटातील प्रमोशनल गाणं गायक कैलास खेर यांनी गायलं आहे. अरविंद भोसले यांनी लिहिलेल्या या गाण्याला श्रेयस देशपांडे यांनी संगीत दिलं  आहे.    'अवकारीका' चित्रपटाच्या माध्यमातून स्वच्छतेचा हा नारा आता रुपेरी पडद्यावरही घुमणार आहे. स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस भीषण होत चालला आहे. अनेकांना मात्र त्याची जाणीवही नसते. या गाण्याच्या माध्यमातून त्यांना ती ...

‘मना’चे श्लोक’चे पोस्टर प्रदर्शित.

इमेज
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘मना’चे श्लोक’ या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून मृण्मयी देशपांडे सहा नायकांसोबत दिसणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगत होती. आता अखेर या चर्चेला पूर्णविराम देत नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.    या चित्रपटाचे पोस्टर पाहून ‘मना’चा श्लोक कोण आहे, याचा अंदाज येतोय. दोघांच्या चेहऱ्यावरील हावभाव खूप काही सांगत आहेत. आता दोघांचं नातं नक्की काय आहे? लग्न, नातं यांबद्दल त्यांचे विचार काय आहेत, का मतभेद आहेत, हे पाहायला आता प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.     चित्रपटात मृण्मयी आणि राहुलसोबत पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब हे कलाकारही झळकणार आहेत.    चित्रपटाची दिग्दर्शक मृण्मयी देशपांडे सांगते, “‘मना’चे श्लोक’ ही गोष्ट आहे मनवा आणि श्लोक या दोघांची. त्यांच्या नात्यातून, त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या असण्यातून, त्यांची आयुष्याबद्दलची मतं, वेगवेगळे विचार हे सगळ्यांना ओळखीचे वाटतील. लग्नासारख्या विषयावर प्रत्येकाचं काही ना काही मत असतं. कुणाचं ठाम,...

'जारण'ने साजरी केली सक्सेस पार्टी.....तीन आठवड्यांत सहा कोटींहून अधिक कमाई.

इमेज
   मराठी चित्रपट ‘जारण’ने रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करत केवळ समीक्षक, चित्रपटसृष्टी नव्हे, तर सर्वसामान्य प्रेक्षकांकडूनही भरभरून प्रेम मिळवले  आहे. अनेक मोठ्या हिंदी चित्रपटांच्या स्पर्धेतही ‘जारण’ने आपल्या वेगळ्या आशयामुळे चित्रपटगृहात आपली खास जागा निर्माण केली आहे. प्रदर्शित होऊन तीन आठवडे उलटले असतानाच ‘जारण’ने सुमारे ६ कोटींच्या वर कमाई केली आहे. हा प्रवास केवळ आकड्यांपुरता मर्यादित न राहता, भावनिक गुंतवणूक, आशयघन कथा आणि प्रेक्षकांकडून तोंडभरून कौतुक या सगळ्यांचा एकत्रित मिलाफ आहे. चित्रपटाला मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादामुळे ‘जारण’चे शोजही अनेक ठिकाणी वाढवण्यात आले. या यशाच्या पार्श्वभूमीवर नुकतेच एका भव्य सक्सेस पार्टीचं आयोजन करण्यात आले. यामध्ये ‘जारण’ची संपूर्ण टीम, निर्माते, कलाकार मंडळी यांच्यासह चित्रपटसृष्टीतील काही मान्यवरांनी उपस्थिती लावली.      या वेळी दिग्दर्शक हृषीकेश गुप्ते म्हणतात, ''जारण’सारखा सिनेमा बनवणे हे स्वप्न होते आणि आज जेव्हा प्रेक्षक त्या स्वप्नाशी स्वतःला जोडतात, तेव्हा एक निर्मिती फक्त प्रकल्प न ...

शिना चोहनचा हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण ‘संत तुकाराम’ मधून; अवली जीजाबाईच्या प्रेरणादायी भूमिकेत येणार प्रेक्षकांसमोर – चित्रपट १८ जुलै रोजी प्रदर्शित होणार.

इमेज
    अभिनेत्री शिना चोहन आपल्या पहिल्या हिंदी चित्रपट ‘संत तुकाराम’ मध्ये अवली जीजाबाई यांची प्रमुख भूमिका साकारत आहे. हा चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इतिहासात संत तुकाराम यांच्या पत्नी अवली यांना एक धाडसी, समजूतदार आणि वास्तववादी स्त्री म्हणून ओळखलं जातं, ज्या आपल्या पतीच्या अध्यात्मिक मार्ग आणि कुटुंबीय जबाबदाऱ्या यामधील समतोल साधण्याचा प्रयत्न करतात. शिना चोहन आपल्या भूमिकेविषयी बोलताना म्हणाली: "आम्ही आजच्या पिढीला संत तुकाराम यांची खरी कहाणी सांगून प्रेरित करू इच्छितो. हा भगवान विठ्ठल यांचा खरा संदेश आहे — की जर तुम्ही मनापासून श्रद्धा ठेवली, तर काहीही अशक्य नाही."    या भूमिकेच्या तयारीसाठी शिनाने एक मराठी भाषांतरकाराची मदत घेतली आणि १५व्या शतकातील ऐतिहासिक ग्रंथ व लेखांचा अभ्यास केला. याशिवाय, ती त्या गावातही गेली जिथे संत तुकाराम आणि अवली जीजाबाई वास्तव्यास होते, आणि तिथल्या महिलांसोबत वेळ घालवला. "त्या गावातील महिलांबरोबर घालवलेला वेळ माझ्या भूमिकेच्या आत्मज्ञानासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला," असे शिनाने सांगितले. ...

६१ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्राथमिक फेरीचे नामांकने जाहीर; तांत्रिक पुरस्कारांसह बालकलाकार पुरस्कारांची घोषणा.

इमेज
    ६१ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने तसेच तांत्रिक आणि बालकलाकार विभागातील पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. नामांकने प्राप्त झालेले कलाकार तसेच पुरस्कार प्राप्त तांत्रिक व  बालकलाकार यांचे मंत्री आशिष शेलार , सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी अभिनंदन केले आहे.   सन २०२३ या वर्षातील ६१ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या अंतिम फेरीसाठी आत्मपॅम्प्लेट, जिप्सी, नाळ २, रौंदळ, तेरवं, जग्गु आणि ज्युलिएट, भेरा, आशा, झिम्मा २, अलीबाबा आणि चाळीशीतले चोर या दहा चित्रपटांना अंतिम फेरीकरीता नामांकन प्राप्त झाले आहे. तर उत्कृष्ट बालकलाकार म्हणून कबीर खंदारे (जिप्सी) व त्रिशा ठोसर (नाळ २) यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट कला दिग्दर्शन अमेय भालेराव (श्यामची आई), उत्कृष्ट छाया लेखन प्रवीण सोनावणे, (जिप्सी), उत्कृष्ट संकलन अक्षय शिंदे (जिप्सी), उत्कृष्ट ध्वनिमुद्रण कुणाल ...

ज्ञानदा रामतीर्थकर, प्रथमेश परब यांची फ्रेश जोडी.

इमेज
मुंबई शहराची जीवनवाहिनी असलेली मुंबई लोकल आणि त्यात फुलणारी एक प्रेमकहाणी आता मुंबई लोकल या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेता प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थकर यांची जोडी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार असून,  १ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.      बिग ब्रेन प्रॉडक्शन्स  प्रस्तुत "मुंबई लोकल" या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिजित यांनी केलं आहे. बिग ब्रेन प्रॉडक्शन्सचे निलेश राठी आणि आनंदी एंटरटेनमेंटच्या प्राची अग्रवाल, सचिन अग्रवाल आणि तन्वी माहेश्वरी यांनी ‘मुंबई लोकल’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर त्र्यंबक डागा हे सहनिर्माते आहेत. चित्रपटात अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री  ज्ञानदा रामतीर्थकर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र आली असून, मनमीत पेम, पृथ्वीक प्रताप, वनिता खरात, अभिजीत चव्हाण, अनिकेत केळकर, संजय खापरे, संजय कुलकर्णी, स्मिता डोंगरे अशा उत्तम कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे छायांकन योगेश कोळी यांचे असून संकलन स्वप्निल जाधव यांनी केले आहे तर विनोद शिंदे हे असोसिएट डिरेक्टर आणि कलादिग्दर्शक ड...

‘संगीत संन्यस्त खड्ग’ नव्या स्वरुपात.

इमेज
   सावरकर दर्शन प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित 'संगीत संन्यस्त खड्ग' हे नाटक नव्या स्वरूपात रंगमंचावर येत असून त्याचा  शुभारंभाचा प्रयोग ८ जुलै रोजी सायं. ६.३० वाजता  रवींद्र नाट्य मंदिर येथे होत आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे सचिव व  या नाटकाचे निर्माते रवींद्र  माधव  साठे यांनी पत्रकार परिषदेत दिली.      स्व. सुधीर फडके यांनी स्थापन केलेली सावरकर दर्शन प्रतिष्ठान ही संस्था स्वा. सावरकरांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करत असून याचाच एक भाग म्हणून हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणत आहोत. सावरकरांचे विचार, साहित्य आजच्या पिढी पुढे आणणे हे आमचे  मुख्य उद्दिष्ट्य आहे. हे नाटक कालसुसंगत आहे म्हणूनच याचे महाराष्ट्रभर १०० प्रयोग करण्याचा आमचा मानस आहे आणि त्याकरिता तिकीटदर ३०० /२००/१०० सर्वसामान्यांना परवडतील असे ठेवण्यात आल्याचे रवींद्र  माधव साठे यांनी सांगितले. हे नाटक नव्या पिढीतील तरूण  सादर करत आहेत असेही साठे यांनी सांगितले.     नाट्यसंपदा कला मंचाचे अनंत पणशीकर हे नाटकाचे सहनिर्माते अ...

‘गाडी नंबर १७६०’मध्ये सुहास जोशींनी साकारले ॲक्शन सीन्स.....

इमेज
तन्वी फिल्म्स प्रस्तुत ‘गाडी नंबर १७६०’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, त्यातील रहस्य, ट्विस्ट्स आणि टर्न्समुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ट्रेलरमध्ये वेधक दृश्यांबरोबरच एक खास गोष्ट लक्ष वेधून घेते, ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांचे ॲक्शन सीन्स. ७७ वर्षीय सुहास जोशी या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असून विशेष म्हणजे काही ॲक्शन सीन्स त्यांनी स्वतः साकारले आहेत.      याबद्दल सुहास जोशी म्हणतात, ''वय कितीही असो, जेव्हा भूमिका मनापासून आवडते, तेव्हा तिच्यात पूर्णपणे झोकून देणं गरजेचं वाटतं. ‘गाडी नंबर १७६०’ मधील माझी भूमिका वेगळी आहे आणि त्यासाठी ॲक्शन सीन करणे हा एक नवीन आणि  उत्साही अनुभव होता. मनातली जिद्द आणि अभिनयावरील प्रेम हेच मला पुन्हा कॅमेऱ्यासमोर घेऊन येतं. टीमचा पाठिंबा आणि वातावरण इतकं सकारात्मक होतं की, ॲक्शन सीन करायला भीतीच वाटली नाही.”    दिग्दर्शक म्हणतात, ‘’ सुहास मॅडम म्हणजे एक प्रेरणा आहेत. त्यांच्या वयाचा विचार करता आम्ही बॉडी डबल वापरण्याचा पर्याय ठेवला होता. पण त्...

विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’...

इमेज
 देवशयनी आषाढी एकादशीचा शुभमुहूर्त साधत अखंड विठ्ठलमय वातावरणात रसिक भक्तांना भक्तिरसात न्हालवणारा एक आगळावेगळा संगीत सोहळा — ‘अवघे गर्जे पंढरपूर’ रंगणार आहे रविवार, ६ जुलै २०२५ रोजी दुपारी ४:०० वाजता, शिवाजी मंदिर, दादर येथे आयोजित करण्यात आला आहे.      भगवंत प्राप्ती हेच मानवी जीवनाचे साध्य असून त्याची प्राप्ती झाल्यानंतर बाकी काहीच शिल्लक राहात नाही. कर कटावरी असलेल्या त्या सावळ्या विठ्ठलाचे समचरण पाहिले की परत फिरणे नाही. त्या माय बापाच्या दर्शनाला देश परदेशाच्या सीमा ओलांडून लाखो भाविक विठ्ठल नामाचा जयघोष करत वारीत चालत येतात.भक्ती आणि वारीच्या गजरात दुमदुमणारा जयघोष’ अनुभवण्यासाठी प्रत्यक्ष वारीत जाण्याची आपली संधी हुकली असेल तर हा अनुभव गायनातून घडविण्यासाठीच 'एएसके' व 'दर्शन क्रिएशन्स' आणि 'अद्वैत थिएटर्स' यांच्या संयुक्त विद्यमाने आणि राहुल भंडारे, समीर बापर्डेकर आणि अभिजीत जोशी यांच्या संकल्पनेतून सादर होणाऱ्या ‘अवघे गर्जे पंढरपूर’ या  कार्यक्रमातून घेता येणार आहे. अथांग भक्ति सागरात टाळ-मृदंगाच्या गजरात रसिकांना हा कार्यक्रम विठ्ठलमय करणार...

‘एप्रिल मे ९९’ सलग ३० दिवस चित्रपटगृहांत...मापुस्कर ब्रदर्सच्या चित्रपटाने गाठला यशाचा टप्पा.....

इमेज
   मापुस्कर ब्रदर्सच्या ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटाने सलग ३० दिवस पूर्ण करत महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. प्रेक्षकांनी भरभरून दिलेल्या प्रेमामुळे हा चित्रपट आजही सगळीकडे यशस्वीपणे झळकत आहे. चित्रपटातील कलाकार श्रेयस थोरात, मंथन काणेकर, आर्यन मेंगजी व साजिरी जोशी यांच्या दमदार अभिनयासह, ९० च्या दशकातली निरागस मैत्री, उन्हाळ्याची मजा आणि शाळकरी आठवणी ‘एप्रिल मे ९९’ मध्ये सुरेख पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत. रोहन-रोहन यांचे संगीत, जबरदस्त गाणी आणि साध्या तरीही प्रभावी कथानकामुळे चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला भिडला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर केवळ प्रेक्षकांनीच नाही तर चित्रपटसृष्टीतील कलाकार व समीक्षकांनीही या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले.      चित्रपटाबद्दल दिग्दर्शक रोहन मापुस्कर म्हणतात, “ हे माझे पहिलेच दिग्दर्शन असून प्रेक्षकांनी हा चित्रपट मनापासून स्वीकारला, याचा खूप आनंद आहे. प्रत्येकाला उन्हाळ्याच्या सुट्टीची नोस्टालजिक सफर घडवणारा हा चित्रपट प्रेक्षकांसह चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्याही पसंतीस उतरत आहे, हे पाहून मन भरून येते. हे यश माझे एकट्य...

आज्जी निघाली शाळेला…...

इमेज
    जिगीषा आणि अष्टविनायक निर्मित क्षितीज पटवर्धन लिखित दिग्दर्शित म मराठीचा म्हणत मराठीतील पहिलं  AI महाबालनाट्य “आज्जी बाई जोरात” ह्या नाटकाने मराठी रंगभूमीवर उन्हाळ्याच्या सुट्टीत धम्माल केली. बालकांसोबतच पालकांनी सुद्धा आज्जीला आपलंसं केलं. हसत, गात, नाचत, बागडत आताच्या पिढीत मराठीची गोडी निर्माण केली. निर्मिती सावंत, अभिनय बेर्डे, मुग्धा गोडबोले, अभिजीत केळकर, जयवंत वाडकर यांसह ११ कलाकारांची मांदियाळी भरलेली दिसते. “आजच्या पिढीला मोबाईलच्या विश्वातून बाहेर काढून त्यांच्या हातात पुस्तकं पुन्हा येऊ घालत आहेत ते या नाटकामुळे” अशी अनेक मान्यवर आणि प्रेक्षकांनी प्रतिक्रिया दिली.      या नाटकामुळे ह्या वर्षीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत पुस्तकांचा खप सुद्धा वाढल्याची माहिती समोर आली. परंतु आताच्या घडामोडींना पाहता आज्जीने प्रत्येक शाळांमध्ये जाऊन ही मराठीची गोडी निर्माण करण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये मराठीच सक्तीची नाही ही घटना अत्यंत दुःखद आहे. एकीकडे मराठीला मिळणारा अभिजात भाषेचा दर्जा आणि दुसरीकडे तिला तिच्याच माहेरी बेदखल ...

संतोष मांजरेकर दिग्दर्शित 'फकिरीयत' या हिंदी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार दीपा परब.

इमेज
    आजवर अनेक मराठमोळ्या कलाकारांनी हिंदी सिनेसृष्टीत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. यात मराठी अभिनेत्री आघाडीवर आहेत. या अभिनेत्रींच्या यादीत असलेल्या दीपा परब हिने सहजसुंदर अभिनयाच्या बळावर नेहमीच रसिकांचे लक्ष वेधले आहे. आता दीपा पुन्हा एकदा हिंदी चित्रपटात झळकणार आहे. 'फकिरीयत' या आगामी हिंदी सिनेमात दीपा मुख्य भूमिकेत दिसणार असून संतोष मांजरेकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.      भद्रबाहू डिव्हाइन क्रिएशन्स एलएलपी च्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. आजवर मराठी सिनेमांचे यशस्वी दिग्दर्शन करणाऱ्या दिग्दर्शक संतोष मांजरेकर यांनी प्रथमच हिंदी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. 'फकिरीयत' हा त्यांचा स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला पहिला हिंदी सिनेमा आहे. कोणतीही व्यक्तिरेखा अगदी सहजपणे साकारण्याची कला अंगी असलेल्या दीपा परबने यापूर्वी हिंदी सिनेमात काम केले होते. एका प्रदीर्घ ब्रेकनंतर ती पुन्हा हिंदी भाषिक रसिकांसमोर येणार आहे. दरम्यानच्या काळात तिने बऱ्याच मराठी सिनेमांमध्ये विविधांगी भूमिका स...

राजकीय क्षेत्रातील ऐतिहासिक कार्यासाठी प्रो.राम शिंदे, सभापती विधान परिषद यांचा माईमीडिया च्या 'मीडिया एक्सेलन्स अवाँर्ड' विशेष सन्मानाने गौरव.

इमेज
   राजकीय क्षेत्रात संवेदनशील पणे  सामाजिक भान जपत, ऐतिहासिक वारसा जतन व संवर्धन करणारे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती, प्रो.राम शिंदे! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त चौंडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर येथे ऐतिहासिक वारसा जपणारी ‘शिल्पसृष्टी’ निर्मिती प्रस्तावित आहे. अहिल्यादेवींच्या कारकिर्दीतील न्यायनिवाडे, जलसंधारण, महेश्वर, काशीविश्वनाथ पुनरुत्थान, वृक्षसंवर्धन या सर्वांचे शिल्पात्मक दर्शन घडवणारी भव्य शिल्पसृष्टी उभारण्याचा संकल्प केला चोंडीस पर्यटन, अध्यात्म, इतिहास आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी विशेष बृहत विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया गतीमान केली. या आराखड्यात स्मारकाचे सुशोभीकरण, संग्रहालय, पर्यटकांसाठी निवास, चौंडीश्वरी मंदिर जीर्णोद्धार, रस्ते व वाहनतळ आदी सुविधा समाविष्ट आहेत. .    अहिल्याबाई होळकर यांचे कार्य धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील योगदान व्यापकतेने अधोरेखित करुन  नारीशक्तीचा आगळा वेगळा सन्मान करणारे ,प्रो.राम शिंदे यांचा मीडिया असोसिएशन ऑफ इंडियासाठी, माई मीडिया २४ च्...

सलमान खानने व्यक्त केली ‘येरे येरे पैसा ४’ मध्ये काम करण्याची इच्छा.

इमेज
   ‘येरे येरे पैसा’ आणि ‘येरे येरे पैसा २’ या यशस्वी चित्रपटांनंतर आता प्रेक्षकांच्या मनोरंजनाची ट्रिपल डोस घेऊन ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे टायटल साँग नुकतेच एक भव्य सोहळ्यात लाँच करण्यात आले. विशेष म्हणजे या सोहळ्याला बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान आणि महेश मांजरेकर याची विशेष उपस्थिती होती, ज्यामुळे कार्यक्रमाचे आकर्षण अधिकच वाढले. या वेळी सलमान खान याने गाण्याचे कौतुक करत चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.      या जबरदस्त गाण्यात वैशाली सामंत आणि आदर्श शिंदे यांच्या दमदार आवाजाने अधिकच रंगत आणली असून अमितराज यांनी संगीताला उर्जा आणि झिंग दिली आहे. या चित्रपटातील इतर गाण्यांना पंकज पडघन यांचे संगीत लाभले आहे. तर हे गाणे सचिन पाठक (यो) यांनी लिहिले आहे. 'येरे येरे पैसा ३'  या गाण्यातील सर्व कलाकारांची एनर्जी पाहून यंदाचा भाग आणखीन धमाल आणि मनोरंजनाने भरलेला असणार, याबद्दल कोणतीही शंका नाही.     या गाण्याबद्दल आणि चित्रपटाबद्दल सलमान खान म्हणतो, ‘’ हे गाणे अप्रतिम झाले...

'गाडी नंबर १७६०'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित.

इमेज
मराठी चित्रपटसृष्टीत थ्रिलर, रहस्य आणि विनोदी यांचा मिलाफ असणाऱ्या काही निवडक चित्रपटांमध्ये लवकरच आणखी एका दमदार चित्रपटाची भर पडणार आहे, ती म्हणजे ‘गाडी नंबर १७६०’ची.  तन्वी फिल्म्स प्रस्तुत आणि योगीराज संजय गायकवाड दिग्दर्शित या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, रहस्य आणि विनोदाने भरलेला हा ट्रेलर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.       ट्रेलरमध्ये दिसतेय, की प्रत्येकजण पैशांनी भरलेल्या एका काळ्या बॅगेच्या मागे लागलेला आहे. ही बॅग कुणाची आहे? तिच्यामध्ये काय दडलं आहे? आणि ‘गाडी नंबर १७६०’ चं या सगळ्याशी काय संबंध आहे? हे सगळं एक अनोखं रहस्य आहे, जे ४ जुलैला चित्रपटगृहात उलगडणार आहे. दरम्यान चित्रपटातील वातावरण हलकं-फुलकं असलं तरी, त्यामागे एक खोल आणि विचार करायला लावणारं कथानक आहे. प्रेक्षकांना खळखळून हसवतानाच, एक मोठं रहस्य शेवटपर्यंत उलगडत जाणार आहे आणि ही या चित्रपटाची खासियत ठरणार आहे.       चित्रपटाबद्दल दिग्दर्शक योगीराज संजय गायकवाड म्हणतात, “हा चित्रपट म्हणजे केवळ एक रहस्यमयी कथा नाही, तर मानवी ला...

सह्याद्री देवराई चे प्रणेते अभिनेते सयाजी शिंदे माईमीडिया च्या"मीडिया एक्सेलन्स अवाँर्ड २०२५" ने सन्मानित.

इमेज
   मराठी, हिंदी, तेलुगु, तमीळ, कन्नड, गुजराती, भोजपुरी, मल्याळी, इंग्रजी... आदी भाषांमधील चित्रपटांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या काही मोजक्याच अभिनेत्यांपैकी एक सयाजी शिंदे!     रुपेरी पडद्यावर खलनायक ताकदीनं रंगवणारे पण  प्रत्यक्ष आयुष्यात  नायक म्हणून त्यांचे काम अधिक महत्त्वाचं ! पर्यावरण संवर्धनासाठी गेल्या दशकभरात महाराष्ट्रात करणारे राज्यभरात अनेक वृक्षारोपण मोहिमा राबवल्या, स्वतः २५ हजारांहून अधिक झाडं लावली , त्यामुळे अनेक उजाड माळरानं  वृक्षवेलींनी बहरली.पर्यावरण रक्षणासाठीचे हे योगदान मोलाचे! सह्याद्री देवराई च्या रुपाने  एक सक्षम निसर्गाचं विश्व उभं करणारे..झाड़ कशी लावावी ते वाचवावी यासोबत महाराष्ट्रात कोणती झाड़ लावली तर निसर्ग संवर्धन होऊन मानवहित साधलं जाईल याचं भान व आपला अभ्यास व झपाटून काम करणारा अवलिया कलावंत सयाजी शिंदे यांना या अनमोल योगदानासाठी माईमीडिया24 आयोजित, प्लँनेट मराठी च्या सहकार्याने"मीडिया असोशिएशन ऑफ इंडिया' (माई)च्या ' मीडिया एक्सलन्स एवाँर्ड२०२५' ने सन्मानित करण्यात आले.    चित्रपटाच्या...

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा 'अल्याड पल्याड’ पुन्हा चित्रपटगृहात.

इमेज
    सध्या जुने चित्रपट पुनः प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटांना प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतोय. एक वर्षापूर्वी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत प्रेक्षकांच्या काळजाचा थरकाप उडवणारा एस.एम.पी प्रोडक्शनचा ‘अल्याड  पल्याड’ हा चित्रपट ही वर्षपूर्तीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. एक पोस्टर  शेअर करून चित्रपटाच्या टीमने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. कॅप्शनमध्ये वर्षपूर्तीनंतर पुन्हा येतोय आपल्या भेटीला ‘अल्याड पल्याड’ २७ जूनपासून असं म्हटलं आहे.         ‘अल्याड पल्याड’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा ही निर्मात्यांनी केली होती. मात्र तत्पूर्वी प्रेक्षकांच्या प्रेमळ आग्रहाखातर हा चित्रपट २७ जूनपासून पुन्हा चित्रपटगृहात दाखल होतोय. या चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांची तर दिग्दर्शन प्रीतम एसके पाटील यांनी केले आहे.     मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा,चिन्मय उदगीरकर,भाग्यम जै...

प्रशासकीय अधिकारी 'निधी चौधरी' यांच्या चित्रांचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे २२ जुनपर्यंत.

इमेज
प्रशासकीय अधिकारी म्हणून चोख सेवा बजावताना आपल्या कलागुणांची जपणूक करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी निधी चौधरी यांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरी येथे भरवण्यात आले आहे. ' व्हिस्पर्स ऑफ द वुड्स : अब्स्ट्रॅक्ट इंप्रेशन्स' या नावाने सुरू असलेले हे चित्र प्रदर्शन २२ जूनपर्यंत पाहता येणार आहे.       प्रशासकीय अधिकारी सौ. निधी चौधरी या २०१२ च्या बॅचच्या अधिकारी असून सध्या त्या राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय (NGMA), मुंबई येथे संचालक म्हणून कार्यरत आहेत. मूळच्या राजस्थानच्या, मारवाड प्रांतातून आलेल्या निधी चौधरी यांचे निसर्गाशी कलेच्या रूपात अनोखे नाते जोडले गेले आहे. ज्या मारवाडमध्ये ३६३ बिष्णोईंनी वृक्षतोड होऊ नये आणि पर्यावरणाचा समतोल राखला जावा, यासाठी बलिदान दिले, अशा ठिकाणी लहानाच्या मोठ्या झालेल्या निधी चौधरी यांनी निसर्गाचे पावित्र्य आणि पुढे कामाच्या निमित्ताने शहरात आल्यानंतर जाणवलेले निसर्गातील बदल जवळून अनुभवले आहेत. निसर्गप्रति असलेल्या या संवेदना, विशेषतः आपल्याकडच्या वृक्षराजींचे महत्त्व, त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या कथा आणि मानवतेशी अ...

‘जारण’चा नवा विक्रम १२ दिवसांत कमावले ३.५ कोटीदुसऱ्या आठवड्यात विकेण्डला जमवला १.६५ कोटींचा गल्ला.

इमेज
सध्या मराठी चित्रपटसृष्टीत ‘जारण’ चित्रपट प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवत आहे. दमदार अभिनय, हृदयाला भिडणारी कथा आणि उत्तम दिग्दर्शन यामुळे चित्रपटाने केवळ १२ दिवसांत तब्बल ३.५ कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्या आठवड्यात केवळ विकेण्डला या चित्रपटाने तब्बल १.६५ कोटींचा गल्ला जमवला आहे, जो अलीकडच्या काळातील सर्वाधिक असल्याचे मानले जात आहे.  .     वर्ड ऑफ माऊथ, दमदार अभिनय, वास्तवाशी नाते सांगणारी कथा आणि उत्तम दिग्दर्शन यांच्या जोरावर ‘जारण’ने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या सशक्त अभिनयाने या कथेला भावनिक उंची मिळाली असून, त्यांचा अभिनय पाहून प्रेक्षक भारावून गेले आहेत. सोशल मीडियावर दोघींच्या अभिनयाची आणि चित्रपटाच्या कथेची जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाच्या यशस्वी वाटचालीमुळे चित्रपटगृहात शोज वाढवले जात आहेत आणि प्रत्येक शोमध्ये प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद दिसून येत आहे. कथानकातील सत्यता, भावनांची खोली, आणि उत्तम सादरीकरण यामुळे चित्रपट सर्व वयोगटातील प्रेक्षकांची मने जिंकत आहे....

शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित "सजना" सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित.

इमेज
   प्रेमाच्या गंधाने सुरू झालेली एक सुंदर गोष्ट, जेव्हा नात्यांमध्ये गुंतते तेव्हा त्या निरागस प्रेमातूनच जन्म होतो एक आगीत भडकणारा सुड! मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन येत आहे "सजना" चित्रपटाचा हा ट्रेलर. जो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ट्रेलर हा केवळ एक साधा रिलीज नसून, तो एक खास प्रसंग ठरला आहे. या ट्रेलरचे थेट प्रक्षेपण मराठीतील विविध मनोरंजनशी संबंधित चॅनेलच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर लाईव्ह स्ट्रीम करण्यात आला. म्हणजेच सजना चित्रपटाचा ट्रेलर मराठी एंटरटेनमेंट डिजिटल मीडिया नेटवर्कवर एकत्रितपणे थेट प्रक्षेपित करण्यात आला.      ह्या ट्रेलर मध्ये सुंदर प्रेमाची सुरुवात, विचारसरणीतील अंतर, भावनिक संघर्ष, सुडाची भावना आणि प्रत्येक वळणावर धक्कादायक ट्विस्ट आपण पाहू शकतो. शशिकांत धोत्रे आर्ट निर्मित आणि प्रस्तुत "सजना' सिनेमातील ह्या ट्रेलर मध्ये नायक आणि नायिकेच्या आयुष्यात येतात अनेक संघर्ष. मैत्रीचं प्रेमात रूपांतर, प्रेमाचं तुटणं आणि त्यातून उगम पावणारा सुड हे सगळं अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आलं आहे. प्रत्येक वळणावर गोष्ट बद...

‘फूल्ल टू मनोरंजन’ करणारा ‘ऑल इज वेल’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित..

इमेज
‘तीन तिघाडा काम बिघाडा’ ही म्हण खोटी ठरवत तीन मित्रांची धमाल दाखविणारा ‘ऑल इज वेल’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येत्या२७ जूनला सज्ज होणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर कलाकार, तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत नुकताच एका दिमाखदार समारंभात  प्रकाशित झाला.  तीन मित्रांची धमाल केमिस्ट्री ट्रेलर मध्ये दिसून येतेय. त्यासोबत इतर कलाकारांचा मजेशीर अंदाजही पहायला मिळतोय.  प्रेक्षकांचं फूल्ल टू मनोरंजन करणारा हा चित्रपट नक्की बघा असं चित्रपटातील कलाकारांनी यावेळी आवर्जून सांगितलं.      याप्रसंगी बोलताना निर्माते अमोद मुचंडीकर, वाणी हालप्पनवर तसेच सहनिर्माते मल्लेश सोमनाथ मरुचे, विनायक पट्टणशेट्टी  म्हणाले की, काहीतरी वेगळं करण्याच्या उद्देशाने आम्ही एकत्र आलो. प्रेक्षकांना  एन्जॉय करता येईल अशा कथानकाच्या शोधात असताना  लेखक  प्रियदर्शन जाधव, दिग्दर्शक  योगेश जाधव आणि  कार्यकारी निर्माते संजय ठुबे  यांच्या सहकार्याने  हा धमाल विषय आम्ही आणला आहे. सहकुटुंब अनुभवायला मिळणारी हास्याची मेजवानी अस...

"निशांची" — अनुराग कश्यप दिग्दर्शित एक प्रभावी क्राइम ड्रामा, अमेझॉन एमजीएम स्टुडिओजकडून १९ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात होणार प्रदर्शित.

अमेझॉन एमजीएम स्टुडिओजने आज जाहीर केले की त्यांचा बहुप्रतिक्षित थियेट्रिकल चित्रपट 'निशांची' यंदा १९ सप्टेंबर २०२५ रोजी संपूर्ण भारतात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप दिग्दर्शित आणि जार पिक्चर्सच्या बॅनरखाली, अजय राय आणि रंजन सिंग यांच्या निर्मितीत तयार झालेला हा चित्रपट, फ्लिप फिल्म्सच्या सहकार्याने साकारण्यात आला आहे. चित्रपटातून ऐश्वर्य ठाकरे दमदार पदार्पण करत असून, त्यांच्या सोबत वेदिका पिंटो, मोनिका पंवार, मोहम्मद ज़ीशान अय्यूब आणि कुमुद मिश्रा हे महत्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.      'निशांची' ही एक सशक्त आणि उत्कट क्राइम ड्रामा कथा असून, दोन भावांच्या गुंतागुंतीच्या नातेसंबंधांची, वेगवेगळ्या आयुष्याच्या वाटांवर चालत असताना त्यांच्या निर्णयांनी त्यांच्या आयुष्यावर कसे परिणाम होतात, याचे प्रभावी चित्रण करते. हा चित्रपट केवळ मनोरंजनासाठी नाही, तर प्रेक्षकांना एक अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव देईल, अशी खात्री निर्मात्यांनी व्यक्त केली आहे.    अमेझॉन एमजीएम स्टुडिओज आणि प्राइम व्हिडिओचे इंडिया ओरिजिनल्सचे डायरेक्टर आणि...