'फकिरीयत' चित्रपटाचा टिझर प्रदर्शित..चित्रपट १९ सप्टेंबर २०२५ रोजी होणार प्रदर्शित.
साधूसंतांनी नेहमीच सर्वसामान्यांना मार्ग दाखवत सुखी जीवनाचा मंत्र सांगितला आहे. असेच एक युगपुरुष, एक महापुरुष हजारो वर्षांपासून या सृष्टीच्या कल्याणाचे कार्य करीत आहेत. हजारो वर्षांपासून हिमालयाच्या पावन धरतीवर संचार करीत आहेत, असे श्री महावतार बाबाजी यांनी दिलेला योग मानवांसाठी एक दैवी भेट ठरला आहे. हा योग म्हणजेच क्रियायोग... बाबाजींनी सांगितलेल्या क्रिया योगाचा अवलंब करून अतिशय कमी काळात मानव आपली उत्क्रांती करू शकतो, अध्यात्मिक मार्गाने पुढे जाऊ शकतो, आयुष्याचं कल्याण करू शकतो. योगाचे प्रणेते श्री महावतार बाबाजी, या रहस्यमय हिमालयीन योग्याची भेट 'फकिरीयत' या आगामी हिंदी चित्रपटात होणार आहे. १९ सप्टेंबर रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होइल. या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. 'फकिरीयत' चित्रपटाची निर्मिती भद्रबाहू डिव्हाइन क्रिएशन्स एलएलपीच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. आजवर बऱ्याच मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक संतोष मांजरेकर यांनी 'फकिरीयत' चे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची कथा ‘चिरुट जलती है’ आणि ‘अध्य...