Posts

Showing posts from July, 2022

' प्लॅनेट मराठी'वर ' मी पुन्हा येईन' प्रदर्शित.,...

Image
राजकारणातील साधारण परिस्थितीवर मार्मिक पद्घतीने भाष्य करणारी ‘मी पुन्हा येईन' वेबसीरिज 'प्लॅनेट मराठी’वर प्रदर्शित झाली असून अरविंद जगताप लिखित, दिग्दर्शित या वेबसीरिजमध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, सिद्धार्थ जाधव, रुचिता जाधव, भारत गणेशपुरे असे दमदार कलाकार आहेत.   सध्या ‘मी पुन्हा येईन’चे तीन एपिसोड्स प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. यात सत्तेसाठी पक्ष वरिष्ठांना विनवण्या, सत्तानाट्य, मंत्रीपदासाठी राजकारण्यांची फसवणूक, आमदारांची पळवापळवी हे सर्व विनोदी शैलीत दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.       दिग्दर्शक अरविंद जगताप म्हणतात, "सध्याच्या राजकारणाशी याचा काहीही संबंध नसून निव्वळ मनोरंजनाच्या हेतूने याची निर्मिती करण्यात आली आहे. राजकारणामागील गोष्टी या निमित्ताने प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील."                                                                प्लॅनेट मराठीचे प्रमुख संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, " विनोदीशैलीत निर्मित केलेली ही वेबसीरिज श्रोत्यांना खिळवून ठेवणारी आहे. राजकारणात कधीही काहीही घडू शकते, हे वेबसीरिज राहिल्यावर कळेलच.&qu

देशभक्तीची भावना जागृत करणार 'राष्ट्र'

Image
प्रत्येक चित्रपट कोणत्या ना कोणत्या कारणामुळं चर्चेत राहतो आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतो, पण काही चित्रपट मात्र एक ना अनेक कारणांमुळे आकर्षणाचं केंद्र ठरतात. 'राष्ट्र - एक रणभूमी' हा असाच एक आगामी मराठी चित्रपट आहे, ज्यानं आपल्या वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांच्या बळावर सर्वांचंच लक्ष वेधून घेण्यात यश मिळवलं आहे. महामारीमुळं लांबणीवर गेलेला महत्त्वपूर्ण विषयावर आधारित असलेला हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. मनामनांत राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित करणारं टायटल असणारा 'राष्ट्र' हा चित्रपट २६ ऑगस्टच्या मुहूर्तावर म्हणजेच यंदा स्वातंत्र्यदिनाच्या नंतरच्या आठवड्यात रसिक दरबारी सादर होणार आहे. निर्माते बंटी सिंग यांनी इंदर इंटरनॅशनल या बॅनरखाली 'राष्ट्र' चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि संकलन इंदरपाल सिंग यांनी केलं आहे. वर्तमान काळातील राजकीय पटलावर सादर होणाऱ्या या चित्रपटात देशभक्तीची भावना जागृत करणारं कथानक पहायला मिळणार असल्याची 'राष्ट्र' या टायटलवरूनच सहज कल्पना येते. महाराष्ट्राच्या माती

‘रूप नगर के चीते' मध्ये चारचौघींच्या ग्लॅमरचा तडका.....

Image
मैत्रीचं नातं अधोरेखित करत दोस्तीची नवी व्याख्या सांगणारा 'रूप नगर के चीते' हा मराठी चित्रपट रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. मुहूर्तापासून पोस्टर रिलीजपर्यंत कायम चर्चेत राहिलेला हा चित्रपट मैत्रीचे नवे पैलू उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे. या चित्रपटातील मित्रांच्या जोडगोळीला चारचौघींच्या ग्लॅमरचा तडका देण्यात आला आहे. या चारचौघी कोण? याबाबत जाणून घेण्यास रसिकही आतुरले आहेत. एस एंटरटेन्मेंट बॅनरखाली निर्माते मनन शाह यांनी 'रूप नगर के चीते' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. विहान सूर्यवंशी यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट १६ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. दोन मित्रांच्या मैत्रीची अनोखी कथा सांगणाऱ्या 'रूप नगर के चीते' मध्ये करण परब आणि कुणाल शुक्ल हे दोन नवोदित कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या दोघांच्या मैत्रीला मुग्धा चाफेकर,  हेमल इंगळे, आयुषी भावे आणि सना प्रभू यांच्या ग्लॅमरचा तडका लाभला आहे. या चौघींनीही मनोरंजन विश्वासोबतच सौंदर्यस्पर्धांमध्येही आपला ठसा उमटवला आहे. मुंबईकर असलेल्या मुग्धाने टेलिव्ही

'फक्त मराठी सिने सन्मान' २०२२ मध्ये 'धर्मवीर' चित्रपटाची बाजी.

Image
ठाणे शहर आणि जिल्ह्यात शिवसेना हा पक्ष रुजवणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनपट "धर्मवीर" मुक्काम पोस्ट ठाणे...या चित्रपटाच्या माध्यमातून रसिकप्रेक्षकांसमोर मांडण्यात आला होता.१३ मे ला सर्वत्र प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम लाभल्यानंतर आता या चित्रपटावर पुरस्कारांचाही वर्षाव होऊ लागला आहे.  "फक्त मराठी सिने सन्मान २०२२" च्या पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाने तब्बल ७ पुरस्कार पटकावले आहेत. ज्यामध्ये सर्वात्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट लेखन प्रविण विठ्ठल तरडे, सर्वोत्कृष्ट अभिनेता प्रसाद ओक,  सर्वोत्कृष्ट गीतलेखन मंगेश कांगणे, सर्वोत्कृष्ट गायक आदर्श शिंदे, सर्वोत्कृष्ट रंगभूषा विद्याधर भट्टे यांना मिळाले आहेत  अभिनेता मंगेश देसाई यांच्या साहील मोशन पिक्चर्सनं आणि झी स्टुडिओजने "धर्मवीर" या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रवीण तरडे यांनी लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.स्वरूप स्टुडिओजने लाईन प्रोड्युसर म्हणून काम पाहिलेल्या  या चित्रपटात प्रसाद ओक, श्रुती मराठे, गश्मीर महाजनी, क्षितिश दाते, रमेश परद

'टाइमपास ३’ टीमने धरला रिक्षाचालकांसोबत ठेका

Image
सध्या 'टाइमपास३' चा सर्वत्र बोलबाला आहे. चित्रपटातील गाणी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहेत. त्यापैकीच एक ट्रेंडिंग गाणे म्हणजे 'वाघाची डरकाळी'. नुकताच ठाण्यातील रिक्षा स्टँडवर हृता दुर्गुळे, प्रथमेश परब, मनमीत पेम यांनी या गाण्यावर ठेका धरला. या वेळी त्यांना रिक्षाचालकांनीही साथ दिली. विशेष म्हणजे यात काही महिला रिक्षाचालकही होत्या. या प्रसंगी दिग्दर्शक रवी जाधवही उपस्थित होते.  क्षितीज पटवर्धन यांनी शब्दबध्द केलेल्या या गाण्याला अमितराज यांनी संगीत दिले आहे. तर हे गाण्याला वैशाली सामंतचा ठसकेबाज आवाज लाभला आहे. झी स्टुडिओज आणि अथांग कम्युनिकेशन्स निर्मित, रवी जाधव दिग्दर्शित 'टाइमपास ३’ येत्या २९ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

पारितोषिक विजेत्या चित्रपटांचा हुकमी संकलक

Image
  ‘लेखकाच्या   आणि ‘संकलकाच्या टेबलवर’  चित्रपट ख ऱ्या अर्थाने घडतो  असं म्हणतात.   चित्रपट चांगला होण्यात  महत्त्वाचा वाटा संकलकाचाही असतो.  संकलन म्हणजे केवळ तांत्रिक प्रक्रिया  असा अनेकांचा समज असतो. मात्र संकलकाकडे सर्जनशीलता असणे गरजेचे असते. याच सर्जनशीलतेच्या जोरावर संकलक निलेश गावंड यांनी चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवला आहे. राष्ट्रीय तसेच   आंतरराष्ट्रीय पुरस्कारांमध्ये त्यांनी संकलित केलेल्या अनेक चित्रपटांनी बाजी मारली आहे.   त्यांनी संकलित केलेल्या चित्रपटांच्या यशाचा हा प्रवास  नक्कीच कौतुकास्पद आहे. ‘श्वास’   चित्रपटाच्या वेळी ‘सह-संकलक’ म्हणून सुरु झालेला हा प्रवास नुकत्याच जाहीर झालेल्या ‘फनरल’ चित्रपटाच्या राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत सातत्याने सुरु आहे. श्वास, बाबांची शाळा ,  धग, भोंगा, फनरल या चित्रपटांना मिळालेल्या राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारांच्या यशामध्ये निलेश गावंड यांच्या संकलनाचाही मोलाचा वाटा आहे. आपण संकलित केलेल्या चित्रपटांना सातत्याने मिळणारी यशाची पावती आपल्यासाठीही मोलाची असल्याचे ते सांगतात. नवीन काम  अधिक जोमाने  करण्यासाठी या पुरस्कारा

‘समायरा’ उलगडणार एका असाधारण प्रवासाची गोष्ट....

Image
ऋषी श्रीकृष्ण देशपांडे दिग्दर्शित 'समायरा' या चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली असून येत्या २६ ऑगस्ट रोजी ‘समायरा’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पोस्टरमध्ये केतकी नारायण अव्हेंजर चालवताना दिसत असून तिच्या चेहऱ्यावर एक ध्येय साध्य करण्याचा आत्मविश्वास दिसत आहे. तिच्या ध्येयापर्यंतचा हा असाधारण प्रवास आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.  ‘समायरा’चे दिग्दर्शक ऋषी देशपांडे म्हणतात, " प्रत्येक जण आयुष्य जगण्यासाठी एक प्रवास करत असतो. तसाच एक असाधारण प्रवास ‘समायरा’चाही असणार आहे. तिचा हा प्रवास तिचे ध्येय साध्य करणार का, हे लवकरच प्रेक्षकांना कळणार आहे. सध्या मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नवनवीन विषय हाताळले जात आहेत. ही कथाही खूप वेगळी आहे. ‘समायरा’चा हा प्रवास प्रेक्षकांना नक्कीच सकारात्मकता देईल."       ग्लोबल सेवा एलएलपी प्रस्तुत, अद्योत फिल्म्सच्या सहयोगाने, या चित्रपटाची निर्मिती डॉ. जगन्नाथ सुरपूरे, रतन सुरपूरे, शशिकांत पनत, योगेश आळंदकर आणि ऋषी श्रीकृष्ण देशपांडे यांनी केली असून या चित्रपटाची पटकथा आणि संवाद सुमित विलास तांबे यांचे

'टकाटक २'चं धम्माल टायटल साँग प्रदर्शित......

Image
मागील काही दिवसांपासून मराठीपासून हिंदी सिनेसृष्टीपर्यंत सगळीकडेच 'टकाटक २' या आगामी मराठी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. 'टकाटक'ला मिळालेल्या तूफानी यशानंतर निर्माते आणि दिग्दर्शकांनी या चित्रपटाचा पुढचा टप्पा सिक्वेलच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा निर्णय घेतल्यापासूनच प्रेक्षक 'टकाटक २'ची आतुरतेनं वाट पहात आहेत. 'टकाटक'प्रमाणेच 'टकाटक २'देखील म्युझिकल कॅामेडी प्रकारात मोडणारा सिनेमा आहे. समाजात घडणाऱ्या घटनांवर विनोदी अंगाने भाष्य करताना मनोरंजक मूल्यांची सुरेख जोड देत सुमधूर संगीतरचना सादर करण्याचा फॅार्म्युला या चित्रपटाही वापरण्यात आला आहे. नुकतंच 'टकाटक २'चं चार्टबस्टर टायटल ट्रॅक रिलीज करण्यात आलं आहे.    लेखक-दिग्दर्शक मिलिंद कवडे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'टकाटक २'च्या टायटलप्रमाणेच याचं शीर्षकगीतही अगदी टकाटक बनलं आहे. 'घे टकाटक दे टकाटक...' असे या टायटल ट्रॅकचे बोल आहेत. गीतकार जय अत्रेनं 'घे टकाटक दे टकाटक...' हे गीत लिहिलं असून, गायक हर्षवर्धन वावरे आणि मुग्धा क

‘किंग जेडी’ने केली ‘गणराज स्टुडिओ’ची स्थापना .

Image
मराठीतील पहिला रॅपर, निर्माता, दिग्दर्शक श्रेयश जाधव उर्फ ‘किंग जेडी’ याने अल्पावधितच सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. मराठी प्रेक्षकांना जबरदस्त रॅप साँग, बाबू बँड बाजा सारखा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट, मी पण सचिन, बघतोस काय मुजरा कर, बस स्टॅाप असे अनेक यशस्वी चित्रपट दिल्यानंतर आता श्रेयशचा प्रवास आणखी एक पाऊल पुढे गेला आहे. श्रेयशने ‘गणराज स्टुडिओ’ची स्थापना केली असून या अंतर्गत एडिटिंग, डबिंग, व्हीएफएक्स साउंड मिक्स अगदी फ़ाइनल आउट्पुट्सपर्यंत सर्व पोस्ट प्रॅाडक्शन सेवा उपलब्ध होणार आहे.        नुकताच या स्टुडिओचा लोकार्पण सोहळा चित्रपट दिग्दर्शक अनिस बाझमी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी अभिनेता स्वप्नील जोशीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.  गणराज स्टुडिओच्या स्थापनेबाबत श्रेयश जाधव म्हणतो, ‘’गणराजचा प्रवास आता एक पाऊल आणखी पुढे गेला आहे. ‘गणराज स्टुडिओ’मुळे आता एकाच छताखाली चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत. बेसलाइट २, डोल्बीअटमोस, ९.१ मिक्सिंग इत्यादी अत्याधुनिक सुविधासह इतक्या वर्षांच्या अनुभवातून दर्जेदार कलाकृती

'बनी' देश-विदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये.......

Image
निर्माते शंकर धुरी यांच्या  ‘ आकृती क्रिएशन्स ’  निर्मित  आणि निलेश उपाध्ये लिखित – दिग्दर्शित  ' बनी '  या चित्रपटाचा फर्स्टलूक  ' ७५व्या  ' कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान  ' इंडिया पॅव्हेलियन ' मध्ये करण्यात आला. आणि त्यानंतर विविध आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये  ' बनी ' च्या प्रवेशिका सादर करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली. काही दिवसांपूर्वी ढाका येथील प्रसिद्ध  ' सिनेमेकिंग आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात '  निवड झाल्यानंतर स्पेन येथील जगप्रसिद्ध  ' माद्रिद '  आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठी या चित्रपटाची निवड झाली. त्यापाठोपाठ अमेरिकेतील  ' फोर्थ स्मिथ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव '  आणि नुकतेच जाहीर झालेल्या  ‘के आसिफ’, ‘ अयोध्या ’, ‘गंधार इंडिपेंडेंट’  चित्रपट महोत्सवासाठी  ' बनी ' ची निवड झाली असून आपल्या पहिल्याच चित्रपट निर्मितीला मिळालेले  भरघोस  यश सर्व तंत्रज्ञ कलावंतांच्या अथक परिश्रमाचे द्योतक आहे ,  असे निर्माते शंकर धुरी यांनी म्हटले आहे. विवेक नावाच्या व्यक्तीने १० वर्षाच्या

‘मी वसंतराव’साठी गायक राहुल देशपांडे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित ......

Image
यंदाच्या ६८ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली असून सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून राहुल देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे. निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘मी वसंतराव’ या चित्रपटासाठी राहुल देशपांडे यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. तसंच सर्वोत्कृष्ट ध्वनी आरेखन पुरस्कारदेखील अनमोल भावे यांना ‘मी वसंतराव’ या चित्रपटासाठी मिळाला आहे.  या पुरस्काराबाबत राहुल देशपांडे म्हणतात, ‘हा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ज्यावेळी माझे नाव या पुरस्कारासाठी जाहीर झाले त्यावेळी माझ्यासह माझ्या घरच्यांच्याही डोळ्यांत पाणी आले. हा पुरस्कार मी माझ्या आजोबांना म्हणजेच पंडित वसंतराव देशपांडे यांना समर्पित करत आहे. कारण संगीताचा वारसा मला त्यांच्याकडून लाभला. त्यामुळे हा त्यांचाही सन्मान आहे. या पुरस्कारावर नाव माझे असले तरीही मेहनत चित्रपटाच्या संपूर्ण टीमची आहे. इतक्या वर्षांची मेहनत फळाला आली.’’ दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी या यशाबद्दल म्हणतात, ‘’हा क्षण खूप मौल्यवान आहे. ‘मी वसंतराव’ची गाणी हा या चित्रपटाचा आत्मा आहे आणि या गाण्यांना राहुल देशपांडे यांनी पूर्णपणे न्

"रंजना' मधून उलगडणार अभिनेत्री 'रंजना देशमुख' हिचा जीवनप्रवास...... ३ मार्च २०२३ला प्रेक्षकांच्या भेटीला.

Image
मराठी सिनेसृष्टीतील बऱ्याच अभिनेत्रींनी आपल्या संवेदनशील अभिनयानं रसिकांच्या मनावर आपला वेगळा ठसा उमटवण्यात यश मिळवलं आहे. आपल्या चौफेर अदाकारीनं ब्लॅक अँड व्हाईटचा जमानाही रंगीन बनवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये रंजना देशमुख यांचं नाव आघाडीवर आहे. देखणा चेहरा, अभिनयातील विविधता, सुरेख संवादशैली आणि मनमोहक नृत्याच्या बळावर रंजना यांनी एक काळ गाजवत प्रेक्षकांवर जणू आपल्या सौंदर्याची मोहिनीच केली होती. त्या काळातील आघाडीच्या दिग्दर्शकांच्या चित्रपटात काम करताना अभिनेत्यांसोबत जोड्या जुळवत त्यांनी बरेच सिनेमे गाजवले. अशा चतुरस्र अभिनेत्री असणाऱ्या रंजना यांचा जीवनप्रवास चित्रपट रूपात मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. रंजना यांच्या जीवनावर आधारलेल्या 'रंजना - अनफोल्ड' या मराठी चित्रपटाची नुकतीच घोषणा त्यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून करण्यात आली आहे. डॅा. श्रीकांत भासी, चेअरमन - कार्निव्हल ग्रुप हे या चित्रपटाची प्रस्तुती करणार असून कार्निव्हल मोशन पिक्चर्स आणि वैशाली सरवणकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. 'रंजना - अनफोल्ड' या चित्रपटाद्वारे रंजना देशमुख यांचा प्रवास

मराठी चित्रपट 'गोष्ट एका पैठणीची', आणि ‘जून'ला राष्ट्रीय पुरस्कार.

Image
चित्रपट क्षेत्रातील विविध विभागातील मान्यवरांना दरवर्षी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाच्या ६८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून या वर्षीचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार शंतनु गणेश रोडे दिग्दर्शित 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाला प्रदान करण्यात आला असून सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा स्पेशल ज्युरी मेंशन अवॉर्ड 'जून' चित्रपटासाठी सिध्दार्थ मेनन याला मिळाला आहे.  'गोष्ट एका पैठणीची' आणि 'जून' या दोन्ही चित्रपटांची निर्मिती 'प्लॅनेट मराठी'ची असून गोष्ट 'एका पैठणीची' मध्ये सायली संजीव आणि सुव्रत जोशी प्रमुख भूमिकेत आहे. तर या चित्रपटाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर, अभयानंद सिंग, चिंतामणी दगडे यांनी, प्लॅनेट मराठी, गोल्डन रेशो फिल्म्स आणि लेकसाईड प्रोड्कशन या बॅनर अंतर्गत केली आहे.  सायली संजीव म्हणते, "चित्रपटातील कामाचे चीज झाले आहे. चित्रपटासाठी मी विशेष मेहनत घेतली आहे. माझ्यासाठी चित्रपट खूप स्पेशल आहे. मी हा पुरस्कार माझ्या वडिलांना समर्पित करते." तर चित्रपटाचे दिग्दर्शक शंतन

६८व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये "गोष्ट एका पैठणीची" बाजी.

Image
सर्व स्त्रियांना हवीहवीशी वाटणारी साडी म्हणजे पैठणी... पदरावरचे मोर, आकर्षक रंगसंगती आणि देखणे काठ ही पैठणीची वैशिष्ट्य... आता हीच पैठणी आगळ्यावेगळ्या रुपात प्रेक्षकांपुढे येण्या आधीच यंदाच्या मनाच्या समजल्या जाणाऱ्या ६८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट विभागात ''गोष्ट एका पैठणीची'' या चित्रपटाने पटकावला आहे . प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स सोबतच लेकसाइड प्रोडक्शनने  या चित्रपटाची निर्मिती केली  आहे. अक्षय विलास बर्दापूरकर, अभयानंद सिंग आणि चिंतामणी दगडे हे चित्रपटाचे निर्माते आहेत. शंतनू गणेश रोडे यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, शशांक केतकर, मिलिंद गुणाजी, मृणाल कुलकर्णी आदी कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.  आशा निराशेने सजलेला स्वप्नांचा पाठलाग फार सुंदर असतो जणू  एखाद्या पैठणी सारखा.. रंगीत, तलम, मुलायम.. नायिकेच्या मनातल्या अशाच गोजिऱ्या स्वप्नांचा प्रवास 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आता लवकरच येणार आहे.    

एकच धमाका होणाररिक्षाच्या हॉर्नमधून 'वाघाची डरकाळी' येणार !

Image
टाइमपास ३ च्या टिझर आणि ट्रेलरमधून एका गाण्याच्या केवळ एकाच ओळीने प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण केली होती. ती ओळ होती ‘याच्या रिक्षाच्या हॉर्नमधनं आली वाघाची डरकाळी’ ! ही एवढी एकच ओळ ऐकून हे गाणं धमाल असणार आहे हे रसिकांनी ओळखलं होतं. त्यामुळेच ते या गाण्याची उत्सुकतेने वाट बघत होते. त्यांची ही प्रतीक्षा आता संपली आहे कारण हे पूर्ण गाणं त्यांच्या भेटीला आलं आहे. वैशाली सामंतच्या ठसकेबाज आवाजाचा तडका लागलेलं आणि कृतिका गायकवाडच्या दिलखेचक अदांनी सजलेलं हे गाणं धमाका उडवून देण्यास सज्ज झालं आहे.   टाइमपासच्या यापूर्वीच्या दोन्ही भागातील गाणी विशेष लोकप्रिय झाली होती. रोमॅंटिक गाण्यांबरोबरच पहिल्या भागातील ‘ही पोली साजूक तुपातली’ आणि दुसऱ्या भागातील ‘ऍम्ब्युलन्स सॉंग’ने सर्वत्र एकच धम्माल उडवून दिली होती. तशीच धम्माल उडवून द्यायला आणि दंगा घालायला टाइमपास ३ मधील ‘वाघाची डरकाळी’ आलं आहे. क्षितीज पटवर्धनचे शब्द असलेल्या या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे अमितराजने तर आवाज आहे वैशाली सामंतचा. चित्रपटातील इतर गाण्यांप्रमाणेच याही गाण्याचं जोशपूर्ण ढंगातलं नृत्य दिग्दर्शन के

‘रूप नगर के चीते’ चित्रपटाची पहिली झलक भेटीला.

Image
प्रत्येक नात्याचा एक राखीव कोपरा असतो. यात एक ख़ास कोपरा मैत्रीचाही असतो. आपल्या सुख दु:खात सदैव आपल्या सोबत असणारी व्यक्ती म्हणजे मित्र... आयुष्याच्या चढउतारात मन हलकं करायला मैत्रीचं नातं हवं असतं. म्हणून आपल्याभोवती मैत्रीचा दरवळ असेपर्यंतच,  आपल्या मनातल्या मैत्रीच्या या कोपऱ्याचं स्थान किती महत्त्वाचं आहे हे त्यांना व्यक्त करून सांगणं गरजेचं असतं. हाच आशय 'रूप नगर के चीते' या आगामी मराठी चित्रपटातून अधोरेखित करण्यात आला आहे. एस एंटरटेन्मेंट बॅनरखाली निर्माते मनन शाह यांनी 'रूप नगर के चीते' या भव्य मराठी चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शन विहान सूर्यवंशी यांनी केले आहे. दोन मित्रांच्या अनोख्या मैत्रीची कथा असलेल्या 'रूप नगर के चीते' या चित्रपटाचं आकर्षक पोस्टर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून १६ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. एकमेकांच्या खांद्यावर आत्मविश्वासाने हात टाकून, आपल्याच मस्तीत चाललेले दोन तरुण मित्र या पोस्टरमध्ये दिसत आहेत. चित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटाची चर्चा होती त्यामुळे या चित्रपटात कोण असणार? याचे तर्क-

कल्याणमधील सायकलस्वारांसोबत 'अनन्या'ने चालवली सायकल.

Image
प्रताप फड दिग्दर्शित 'अनन्या' आता प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. 'अनन्या'ची सकारात्मक कहाणी प्रत्येक कानाकोपऱ्या पोहोचावी, याकरता या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरु आहे. या चित्रपटात हृता दुर्गुळेच्या म्हणजेच 'अनन्या'च्या आयुष्यात सर्वात जवळची गोष्ट म्हणजे तिची जिवाभावाची सायकल. या दोघांचे एक अनोखे नाते आहे. खरंतर प्रत्येक सायकलस्वाराचे त्याच्या सायकलसोबत एक वेगळेच नाते असते. नुकतीच हृतानेही कल्याणमध्ये काही सायकलस्वारांसोबत सायकल चालवली.  या अनुभवाबद्दल हृता दुर्गुळे म्हणते," एका सायकलस्वराच्या आयुष्यात सायकलचे वेगळेच महत्व असते. 'अनन्या'च्या आयुष्यातही सायकलही तिच्या अगदी जवळच्या मैत्रिणीसारखी आहे. त्यामुळे मला सायकल चालवताना पुन्हा एकदा 'अनन्या' जगता आली. एक वेगळाच अनुभव आला. आपल्या सर्वांच्या आयुष्यात अशी एक वस्तू असते जी आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग होते. 'अनन्या' आणि सायकलच असलेले नाते खूप वेगळे आहे. तुम्हाला 'अनन्या' पाहिल्यावर ते समजेलच. मुळात सायकलस्वार त्याचे ध्येय गाठण्यासाठी आपली सं

'दे धक्का २' सिनेमाचे ट्रेलर आणि संगीत लाँच !

Image
काही चित्रपट केवळ बॉक्स ऑफिसवर आपली छाप सोडत नाहीत तर चाहत्यांच्या मनावरही छाप पाडण्यात यशस्वी होतात असाच एक चित्रपट ‘दे धक्का’. या चित्रपटाला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळाले आणि आता या चित्रपटाचा सिक्वेल "दे धक्का २ " ५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडिया वर रिलीज झाला आणि त्याला रसिक प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला, अल्पावधीत २ मिलियन हुन अधिक व्युज टिझर ला मिळाले .  सुपरहिट 'दे धक्का ' २००८ साली प्रदर्शित झाला होता. अतुल काळे आणि सुदेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शिन केले होते. मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, संजय खापरे आणि सक्षम कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट महाराष्ट्रातील एका खेडेगावातील एका वेड्या कुटुंबाच्या ऑटो-रिक्षामधील प्रवासाविषयी होता.       आता दे धक्का २ मध्ये ऑटो-रिक्षाची जागा कार ने घेतली आहे आणि चित्रपटाचे कथानक  लंडनमध्ये घडते. या चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेत मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, सक्षम कुलकर्णी , संजय खापरे तसेच सह

‘मी पुन्हा येईन’मध्ये दिसणार राजकारणाची अस्पष्ट बाजू............

Image
  प्रेक्षकांना विचार करायला लावणाऱ्या ‘मी पुन्हा येईन’ या राजकीय व्यंगचित्र असणाऱ्या वेबसीरिजचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. २९ जुलैपासून प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या या वेबसीरिजमध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, सिद्धार्थ जाधव, रूचिता जाधव, भारत गणेशपुरे अशी तगडी स्टारकास्ट आहे.  ट्रेलरमधील जबरदस्त संवाद, विनोदी किस्से प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरणारे आहेत. राजकारणातील अस्पष्ट बाजूचे व्यंगात्मक चित्रण पहिल्यांदाच मराठी सीरीजमध्ये दाखवण्याचा प्रयत्न ‘मी पुन्हा येईन’मधून करण्यात आला आहे. प्रत्येक क्षणी डोळ्यांत अंजन टाकणारी, विचार करण्यास भाग पाडणारी ही वेबसीरिज प्रेक्षकांचे मनोरंजनही करणारी आहे. राजकारणातील नाटकाभोवती फिरणाऱ्या या  कथानकात कलाकारांनी आपल्या विनोदी शैलीने, विनोदाची अचूक वेळ साधत अधिकच रंगत आणली आहे. प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ‘’ आम्ही नेहमीच आमच्या ओटीटीवर उत्तमोत्तम आणि नवीन आशय देण्याच्या प्रयत्न केला आहोत. ‘मी पुन्हा येईन’ ही मराठी वेबविश्वासाठी एक वेगळी संकल्पना आहे आणि मला या गोष्टींचा विशेष आ

'अभंगवारी'त रंगणार शास्त्रीय गाण्यांची मैफल.

Image
२०१८- २०१९ मध्ये मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता पुन्हा एकदा 'अभंगवारी'ची संगीत मैफल रंगणार आहे. २३ जुलै रोजी सायंकाळी साडे सहा वाजता मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात राहुल देशपांडे आपल्या सुरेल गायकीने अवघे सभागृह मंत्रमुग्ध करणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्वरी जमेनीस करणार असून  संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज या कार्यक्रमाला उपस्थित राहून या 'अभंगवारी'ची शोभा वाढवणार आहेत.    नुकतीच भक्तीमय वातावरणात सर्वत्र आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. हेच भक्तिमय वातावरण पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानतर्फे खास या शास्त्रीय संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अभंग, भक्तिगीते यांचा संगीत नजराणा श्रोत्यांना अनुभवायला मिळणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बुकमायशोवर तिकीटे उपलब्ध आहेत.

'फक्त मराठी सिने सन्मान' नामांकनामध्ये ‘सोयरीक’ची सरशी.

Image
कलाकृतीला पुरस्काररूपी कौतुकाची थाप मिळणे ही प्रत्येकासाठी अभिमानाची गोष्ट असते. या कौतुकानेच अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळत असते. मराठी चित्रपटसृष्टीतील उत्तम कलाकृतींचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘फक्त मराठी सिने सन्मान'  सोहळयामध्ये ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’ आणि ‘बहुरूपी प्रोडक्शन्स’ यांची निर्मिती असलेल्या ‘सोयरीक’ चित्रपटाने सर्वाधिक नामांकने मिळवली आहेत. ‘फक्त मराठी सिने सन्मान'  पुरस्कार सोहळयाच्या नामांकनांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असून येत्या २७ जुलैला हा सोहळा रंगणार आहे. या सोहळ्यात मकरंद माने दिग्दर्शित ‘सोयरीक’ या चित्रपटाला एक दोन नव्हे तर तब्बल ११ विभागात नामांकने मिळाली आहेत. ‘सोयरीक’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह मकरंद माने (सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक), मानसी भवाळकर (सर्वोत्कृष्ट अभिनेत्री),  छाया कदम (सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री ), शशांक शेंडे (सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता), मकरंद माने (सर्वोत्कृष्ट कथा ), मकरंद माने (सर्वोत्कृष्ट पटकथा), मकरंद माने (सर्वोत्कृष्ट संवाद),  विजय गावंडे (सर्वोत्कृष्ट संगीतकार), अमिता घुगरी

निर्माता,दिग्दर्शक,महेश टिळेकर देणार निराधार ज्येष्ठ महीलेच्या डोक्यावर छप्पर

Image
पुण्यातील अप्पर इंदिरा नगर मधील ओटा वसाहतीत राहणाऱ्या ६५ वर्षांच्या रंभा पवार यांच्यावर नियतीने बालपणापासूनच आघात केले. येणाऱ्या परिस्थितीला तोंड देत जगण्यासाठी असलेल्या संघर्षामुळे आता उतार वयात त्या हतबल झालेल्या आहेत. वयाच्या बाराव्या वर्षी एका अपघातात रंभा बाईंचा एक डोळा कायमचा निकामी झाला. घरच्या गरिबीमुळे काबाडकष्ट करत आई वडिलांनी त्यांचे लग्न लावून दिले.लग्नानंतर वर्षभरात पतीने त्यांना वाऱ्यावर सोडून देत दुसरे लग्न केले. एकट्या पडलेल्या रंभा पवार माहेरी  आश्रयाला आल्या.आई वडिलांचा आणि भावाचा आधार मिळाला तरी दारोदार जाऊन जुने कपडे गोळा करून त्या बदली छोटी भांडी देण्याचा व्यवसाय करू लागल्या.एके दिवशी डोक्यावर ओझं घेऊन ट्रेन मध्ये चढत असताना पाय घसरून त्या खाली पडल्या सुदैवानं जीव वाचला पण शरीराला गंभीर इजा झाल्यामुळे ३  वर्ष त्या चालू शकल्या नाहीत. त्यावेळी भावानं त्यांना खूप जपलं.  काही दिवसांनी आई वडिलांचे निधन झाले आणि काही वर्षातच पाठोपाठ एकुलता एक हक्काचा आधार असणारा भाऊ पण जग  सोडून गेला. आई वडिलांचं घर असलेल्या एका छोट्या खोलीत राहून  पोटापाण्यासाठी बाहेर  साफसफ

रिलायन्स एंटरटेनमेंट आणि पर्पल बुल एंटरटेनमेंटच्या 'टकाटक २'चा धमाकेदार टिझर रसिकांच्या भेटीला!

Image
काही चित्रपट केवळ बॅाक्स ऑफिसवर छाप सोडण्यासोबतच रसिकांच्या मनावरही आपला ठसा उमटवण्यात यशस्वी होतात. अशांपैकीच एक आहे 'टकाटक'... पहिल्या चित्रपटाला रसिकांचा तूफान प्रतिसाद लाभल्यानं 'टकाटक २'च्या रूपात या चित्रपटाचा पुढील भाग १८ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मोशन पोस्टरनंतर आता 'टकाटक २'चा टिझरही लाँच करण्यात आला आहे. 'टकाटक २'चं लेखन-दिग्दर्शन मिलिंद कवडे यांनी केलं आहे. अॅडल्ट कॅामेडीच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत एक महत्त्वपूर्ण संदेश पोहोचवण्याचा नवा ट्रेंड त्यांनी 'टकाटक'च्या माध्यमातून सुरू केला आहे. 'टकाटक २'मध्ये याचा पुढील टप्पा पहायला मिळणार आहे. आपला हात जगन्नाथ करत इथवर पोहोचलेला ठोक्या आता त्याची हातगाडी पुढे ढकलण्याच्या विचारात असल्याचं 'टकाटक २'च्या टिझरमध्ये पहायला मिळतं. 'अव्हर ठोक्या इज बॅक' असं म्हणत 'टकाटक २'मध्ये ठोक्या आपला पुढचा अध्याय लिहिताना दिसणार असल्याचे संकेत टिझर देतो. मागच्या वेळेप्रमाणे या वेळीही त्याच्या जोडीला त्याचे फ्रेंडस प्रणाली भालेराव, अजिंक्य राऊ

हार्दिक जोशी, अक्षया देवधर चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र ' फाईल नंबर - ४९८अ'

Image
"तुझ्यात जीव रंगला" या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेले राणादा आणि पाठक बाई अर्थात हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर ही जोडी आता पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र दिसणार आहे.  'फाईल नंबर - ४९८ अ" या चित्रपटात हे दोघं महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत. आरती श्रीधर तावरे यांची निर्मिती असलेल्या आणि मनीष हर्षा मुव्हीज प्रस्तुत मल्हार गणेश दिग्दर्शित "फाईल नंबर ४९८ अ" या चित्रपटाची कथा श्रीधर तावरे यांनी लिहिली आहे. तर श्रीधर तावरे आणि आशिष निनगुरकर यांनी पटकथा लिहिली आहे. संवाद आणि गीतलेखन  आशिष निनगुरकर यांचं आहे. स्वप्नील- प्रफुल्ल यांनी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे. कायद्यातील  ४९८ अ या कलमाअंतर्गत एक तरुण कसा अडकतो याची गोष्ट या चित्रपटात मांडण्यात आली आहे. अलीकडेच या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं होतं. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर या जोडीवर महाराष्ट्रानं भरभरून प्रेम केलं आहे. या मालिकेनंतर आता त्यांचा नवा प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे ही जोडी पुन्हा कधी एकत्र दिसणार याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागलं होतं. ह

मराठमोळी निर्माती प्रियंका मोरेची बंगाली फिल्म 'घासजोमी'आंतरराष्ट्रीय महोत्सवात.

Image
प्रियंका मोरे या मराठमोळ्या निर्मातीची 'घासजोमी' फीचर फिल्म यंदाच्या १९व्या स्टुटगार्ड आंतरराष्ट्रीय महोत्सवात येत्या २३ जुलैला दाखवली जाणार आहे. विशेष म्हणजे ही फीचर फिल्म बंगाली भाषेत आहे.  प्रियंकाने मास मीडियामध्ये आपले शिक्षण पूर्ण करून न्यूयॉर्क फिल्म ॲकॅडमीतून चित्रपटाचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर तिने कान महोत्सवात पुरस्कारप्राप्त जाहिरातीसाठी लाईन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. तसेच तिने निर्मिती केलेल्या अनेक शॉर्टफिल्म्सना आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये गौरवण्यात आलं. त्याशिवाय "होली राइट्स" या डॉक्युमेंट्रीला राष्ट्रीय तसेच अनेक आंतरराष्ट्रीय  पुरस्कार मिळाले. सुमंत्रा रॉय दिग्दर्शित "घासजोमी" या फिल्ममध्ये अचानकपणे भेटलेल्या दोन महिलांची गोष्ट अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. इंडियन फिल्म फेस्टिव्हल, स्टुटगार्डमध्ये या फिल्मला वर्ल्ड प्रीमियरचा मान मिळाला आहे.  तिच्या या पहिल्याच बंगाली फिल्मच्या निर्मितीविषयी विचारले असता प्रियंका म्हणाली, ' फिल्म मेकींग ही एक कला आहे तिला कुठल्याही भाषेचे बंधन नसत. खरं म्हणजे, या फि

'मी पुन्हा येईन'मध्ये दिसणार सत्तेचा 'घोडेबाजार'

Image
सध्याच्या राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर वेबविश्वातही एक मोठी घडामोड घडणार आहे. 'प्लॅनेट मराठी' ओटीटीवर 'मी पुन्हा येईन' या वेबसीरिजच्या माध्यमातून सत्तेचा घोडेबाजार पाहायला मिळणार आहे. नुकतेच या वेबसीरिजचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी चाललेली चुरस यात पाहायला मिळत आहे. अरविंद जगताप लिखित, दिग्दर्शित या वेबसीरिजमध्ये  सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, भारत गणेशपुरे, सिद्धार्थ जाधव, प्रभाकर मोरे, अमित तडवळकर, रमेश वाणी, संजय कुलकर्णी, राजेश दुर्गे, राजेंद्र गुप्ता, रुचिता जाधव, सीमा कुलकर्णी आणि दिप्ती क्षीरसागर यांच्या प्रमुख भूमिका असून 'मी पुन्हा येईन'ची निर्मिती प्लॅनेट मराठी, गौतम कोळी आणि जेम क्रिएशन्सने केली आहे.        मोशन पोस्टरमध्ये सयाजी शिंदे आणि उपेंद्र लिमये यांच्यात खुर्चीसाठीची चढाओढ दिसत आहे. या चढाओढीत आता ते हातमिळवणी करणार की, दोघांपैकी कोणाची सत्ता स्थापन होणार? हे 'मी पुन्हा येईन' आल्यावरच कळेल. दरम्यान या वेबसीरिजमध्ये राजकारणातील कट- कारस्थाने, नेत्यांची फोडाफोडी आणि मुख्य म्हणजे सध्या चर्

'थ्रीडी'मध्ये अवतरणार 'संत ज्ञानेश्वर' महाराजां'ची महागाथा.

Image
महाराष्ट्राला थोर संतांची भूमी म्हटलं जातं. खऱ्या अर्थानं महान संतांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रानं संतपरंपरेचा वारसा जपला आहे. वारकरी संप्रदायातील थोर संतांच्या आध्यात्मिक वचनांनी परदेशीय नागरिकांच्या मनावरही गारुड केलं आहे. एकीकडे लाखो वारकरी वारीच्या माध्यमातून संतांच्या शिकवणूकीची जपणूक करत आहेत, तर दुसरीकडे याच महान संतांच्या साहित्याचा, त्यांच्या विचारांचा अभ्यास करण्यासाठी अनेक परदेशी नागरिक भारतात येऊन वास्तव्य करत आहेत. 'ज्ञानदेवे रचिला पाया। उभारीले देवालया।।' या अभंगानुसार संत ज्ञानेश्वर माऊलींनी संतरूपी इमारतीचा पाया रचला. आईप्रमाणे सर्वांवर मायेची पाखर घालणारे संत ज्ञानेश्वर आज माऊली म्हणून संपूर्ण जगात ओळखले जातात. या माऊलींची गाथा आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या साथीनं लवकरच थ्रीडी रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. निर्माते अजय ठाकूर यांनी नुकतीच व्ही. पतके फिल्म्सच्या बॅनरखाली आपल्या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. या निमित्तानं माऊलींचा जीवनप्रवास थ्रीडीच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. आजवर नेहमीच विविधांगी विषयांवर चित्रपट बनवणाऱ्या दि

चाहत्याकडून हृताला 'ही' अनोखी भेट.........

Image
रंगभूमी, मालिका अशा विविध माध्यमांमधून प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अप्रतिम अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे. 'अनन्या' चित्रपटाच्या माध्यमातून हृता रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर हृताने अल्पावधीतच आपला फॅन फॉलोअर्स वाढवला. हृताचे असंख्य चाहते असून तिची एक झलक पाहण्यासाठी, तिला भेटण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. बरेच चाहते तिच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही संवाद साधतात आणि हृताही आपल्या चाहत्यांना अगदी आनंदाने प्रतिसाद देते. हृताच्या अशाच एका चाहत्याने तिला एक अनोखी भेट दिली आहे. या चाहत्याने हृताला 'अनन्या' नावाची एक सुंदर अंगठी भेट देऊन तिला चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.    हृताला मिळालेल्या या सुंदर भेटीबद्दल हृता  म्हणते, "चाहत्यांचे असे प्रेम बघून खरेच खूप भारावून जायला होते. आपल्यावर, आपल्या कामावर कोणी इतके प्रेम करते, ही भावनाच खूप आनंद देणारी आहे आणि याच प्रेमामुळे आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्याची ऊर्जा मिळते. 'अनन्या'मधून मी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. त्यामुळे हा

वातावरणातला 'गारवा' वाढवणारं टाईमपास ३ चं 'कोल्ड ड्रिंक' सॉंग प्रेक्षकांच्या भेटीला.......

Image
झी स्टुडिओजच्या टाइमपास ३ या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांचा सध्या समाजमाध्यमांवर एकच बोलबाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने केवळ तरुणाईचं नाही तर सर्वच वयोगटातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. शिवाय साई तुझं लेकरू आणि लव्हेबल या गाण्यांनाही प्रेक्षकांनी आपल्या पसंतीची पावती दिली आहे. यामुळे टाइमपास ३ बद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. ही उत्सुकता अधिक वाढविण्यासाठी आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. ‘कोल्ड ड्रिंक वाटतेस’ हे नवीन गाणं प्रेक्षकांना आपल्या तालावर ठेका धरायला लावण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रथमेश परब आणि हृता दुर्गुळे यांच्यावर चित्रित झालेलं हे धम्माल गाणं गायलं आहे अमितराज आणि हिंदीमध्ये आपल्या आवाजाची जादू पसरवणाऱ्या शाल्मली खोलगडे यांनी. याचं संगीत अमितराज यांचं असून गाण्याचे शब्द क्षितीज पटवर्धनचे आहेत. टाइमपास चित्रपटाच्या यापूर्वीच्या दोन्ही भागाच्या यशामध्ये त्यांच्या संगीताचा महत्त्वाचा वाटा होता. दोन्ही भागातील गाणी रसिकांमध्ये आजही लोकप्रिय आहेत. हीच परंपरा टाइमपास ३ नेही कायम ठेवली आहे. साई तुझं लेकरू या गाण्याने सोशल मीडियावर ए

दिव्येंदु शर्माचा 'मेरे देश की धरती'ॲमेझॅान प्राइमवर.

Image
सध्या ऑनलाइन प्लॅटफोर्मवर वेगवेगळ्या मनोरंजक चित्रपटांचा नजराणा प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे. चित्रपटांच्या या रंजक प्रवासात प्रेक्षकांची आणि समीक्षकांच्या पसंतीची पोचपावती मिळवणारा दिव्येंदु शर्माचा ‘मेरे देश की धरती’ हा चित्रपट आता प्रेक्षकांना घरबसल्या ॲमेझॅान प्राइम व्हिडिओवर’ पहाता येणार आहे. वेगळा विषय मांडणारा हा चित्रपट थिएटरमध्ये पाहण्याची तुमची संधी हुकली असेल तर आता या चित्रपटाचा आस्वाद ‘ॲमेझॉन प्राइम’ वर घेता येईल. नुकताच हा चित्रपट ॲमेझॅान प्राइम व्हिडिओवर’ आला आहे. ‘ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ’च्या निमित्ताने हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आल्याने प्रेक्षकांकडून आनंद व्यक्त होत आहे. वेगळा विचार करून एकजुटीने केलेली कोणतीही गोष्ट नेहमीच लक्षवेधी आणि यशस्वी ठरते, मग ते देशाचे राजकारण असो वा कल्पकतेचा अविष्कार. एकदा का मनात आणलं तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. नव्या कल्पनांचा शोध घेऊन दोन तरुण इंजिनिअर्स एका गावाचा कसा कायापलट करतात हे दाखवून देणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फराझ हैदर यांनी केलं आहे. मिर्झापूर फेम दिव्येंदु शर्मा, अनुप्रिया गोएंका आणि अ

निर्माते, दिग्दर्शक महेश टिळेकर यांची दिग्गज मल्याळम कलाकारांशी भेट,.........

Image
सिनेमाचा विषय आणि सहज अभिनय करणारे कलाकार यामुळे मल्याळम सिनेमा जगभर पाहिला जातो.मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि दिग्गज कलाकारांच्या बरोबर काम केलेले निर्माता दिग्दर्शक महेश टिळेकर यांचे साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील कलाकारांशी मैत्री आहे. नुकतेच त्यांनी केरळ मध्ये मल्याळम सिनेमांमध्ये अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या काही कलाकारांच्या घेतलेल्या भेटीचे फोटो फेसबुक वर पोस्ट केले आहेत. छोट्या दुकानात टेलरिंग काम करून पुढे मल्याळम सिनेमांसाठी कॉस्च्युम डिझायनर म्हणून काम करत अभिनयाला सुरुवात केलेले लोकप्रिय जेष्ठ कलाकार इंद्रन तसेच छोट्या मोठ्या कार्यक्रमातून मिमिक्री ,निवेदन करून मग मल्याळम सिनेमांतून कधी विनोदी तर कधी गंभीर भूमिकांमधून प्रसिद्ध असलेले अभिनेते सूरज,ज्यांना एक नॅशनल अवॉर्ड आणि २० केरळ सरकारचे उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाले आहेत त्यांची भेट महेश टिळेकर यांनी घेऊन चित्रपटसृष्टी बाबत चर्चा केली. जय भीम या बहुचर्चित चित्रपटातून लक्षवेधी भूमिका साकारणारी मल्याळम अभिनेत्री लिजोमोल जोस हिच्याशी पण महेश टिळेकर यांनी संवाद साधला. महेश टिळेकर यांच्या लवकर

दगडू पालवीची गोष्ट झकास ! पुन्हा एकदा होणार फुल्ल टाइमपास !

Image
'टाइमपास' म्हटलं की डोळ्यासमोर येते ती दगडू आणि प्राजूची जोडी आणि त्यांची आगळी वेगळी लव्हस्टोरी. पहिल्या भागात प्रेक्षकांच्या मनाला हुरहूर लावून अधुरी राहिलेली प्रेमकथा दुसऱ्या भागात प्रेक्षकांना आनंद देत पूर्ण झाली. पहिल्या भागात बालपणात एकमेकांपासून दुरावलेले दगडू आणि प्राजू दुसऱ्या भागात तरुणपणात एकमेकांना भेटले आणि एकही झाले. याच बालपण आणि तरुणपणाच्या मधल्या टप्प्यात दगडूचं नेमकं काय झालं ? प्राजू त्याच्यापासून दूर गेल्यानंतर त्याच्या आयुष्यात काय काय बदल झाले? हे सांगणारी गोष्ट आता टाइमपास ३ मधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशनची निर्मिती असलेल्या आणि रवी जाधव यांच्या दिग्दर्शनाने सजलेल्या या चित्रपटाच्या टिझरने आणि गाण्यांनी प्रेक्षकांमध्ये यापूर्वीच उत्सुकता निर्माण केली आहे. चित्रपटाबद्दलची हीच उत्सुकता आणि उत्कंठा आता ट्रेलरमधून अधिकच वाढणार आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर एका शानदार सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला. यावेळी दिग्दर्शक रवी जाधव, झी स्टुडिओजचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी, निर्मात्या मेघना जाधव यांसह चित्रपटाची संपूर्ण