Posts

Showing posts from August, 2022

'जम्मू आंतरराष्ट्रीय चित्रपट' महोत्सवात 'संदीप पाठक 'सन्मानित.

Image
अलीकडच्या अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतून ‘राख’ चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेते संदीप पाठक यांना गौरविण्यात आले आहे. आता जम्मू आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही संदीप पाठक यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावत आपल्या यशाची मालिका सुरुच ठेवली आहे. १५ देशांचे ५४ चित्रपट या आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी निवडण्यात आले होते. ‘आपण केलेल्या कष्टाला जेव्हा कौतुकाची थाप मिळते. तो क्षण भाग्याचा असतो. हा पुरस्कार मला मिळाला असला तरी आमच्या संपूर्ण टीमचे हे श्रेय आहे. एक वेगळी कलाकृती सादर करण्याचा आमच्या टीमचा हा प्रयत्न यशस्वी झाला असून विविध महोत्सवांमध्ये घेतली जाणारी ‘राख’ चित्रपटाची दखल आम्हाला सुखावणारी असल्याचे संदीप पाठक सांगतात. 'राख' या चित्रपटाचं दिग्दर्शन राजेश चव्हाण यांनी केलंय. लवकरच ‘राख’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘लालबागच्या राजा’च्या दरबारी ‘रूप नगर के चीते’

Image
लालबागच्या राजाच्या चरणी आगामी ‘रूप नगर के चीते’ या मराठी चित्रपटाच्या कलाकारांनी नुकतीच हजेरी लावली. आणि चित्रपटाच्या यशासाठी बाप्पाचा आशिर्वाद घेतला. हजारो गणेशभक्तांच्या उपस्थितीत आणि ‘लालबागचा राजा’च्या जयघोषात आपल्या चित्रपटाचे नवीन पोस्टर ही याप्रसंगी बाप्पाच्या चरणी अर्पण केले. १६ सप्टेंबरला ‘रूप नगर के चीते’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनच्या धामधुमीत लालबागच्या राजाच्या प्रथम दर्शनाची संधी कलाकारांनी सोडली नाही. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार करण परब, कुणाल शुक्ल, आयुषी भावे, हेमल इंगळे, सना प्रभू, निर्माते मनन शाह आणि दिग्दर्शक विहान सूर्यवंशी लालबागच्या राजाच्या दरबारी हजर होते. सध्या प्रमोशनसाठी विविध ठिकाणी या चित्रपटाची टीम भेट देत आहे. या चित्रपटाची निर्मीती एस एंटरटेन्मेंट बॅनरखाली निर्माते मनन शाह यांनी केली असून दिग्दर्शन विहान सूर्यवंशी यांचे आहे. मनाच्या आतमध्ये स्वत:शी युद्ध सुरू असताना आपण करतोय ते चूक की बरोबर? याची शहानिशा करण्यासाठी आपल्या आत डोकावणारा जवळचा मित्र गरजेचा असतो. त्याचंही म्हणणं ऐकणं महत्त्वाचं अस

"प्रेम म्हणजे काय असतं" चित्रपटाचं मोशन पोस्टर लाँच!

Image
प्रेम, आपुलकी आणि उत्कटता या गोष्टी माणसाला कल्पनाशील बनवतात. प्रेम प्रत्येक माणसाच्या मनात असते. हीच प्रेमाची संकल्पना अतिशय वेगळ्या पद्धतीने "प्रेम म्हणजे काय असतं" या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. या चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आले असून येत्या ४ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.   तख्त प्रॉडक्शन यांनी "प्रेम म्हणजे काय असतं" या चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रसाद दत्तात्रय इंगवले यांनी चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती अशी तिहेरी जबाबदारी निभावली आहे.कलाकारांची नावे गुलदस्त्यात असून ती लवकरच आता जाहीर होतील. प्रेम ही संकल्पना अत्यंत वेगळ्या पद्धतीने या चित्रपटात मांडण्यात आली आहे. प्रेम या संकल्पनेवर आजवर अनेक चित्रपट झाले. मात्र याच संकल्पनेचा आणखी एक वेगळा पैलू "प्रेम म्हणजे काय असतं" या चित्रपटातून मांडला जाणार आहे.   "प्रेम म्हणजे काय असतं" या चित्रपटातून एक हृदयस्पर्शी प्रेमकथा प्रेक्षकांना या चित्रपटातून पाहता येईल. 

पुण्यात रंगला 'बॉईज ३'चा भव्य दिव्य म्युझिकल सोहळा.

Image
'बॉईज', 'बॉईज २' आणि आता 'बॉईज ३' लवकरच  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी ब्लॉकबस्टर 'बॉईज ३'चा म्युझिकल अल्बम चांगलाच चर्चेचा विषय ठरला. विशाल सखाराम देवरुखकर दिग्दर्शित 'बॉईज ३' चित्रपटातील गाण्यांना अवधूत गुप्ते यांनी संगीत दिले आहे. 'बॉईज' व 'बॉईज २' मधील गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. 'लग्नाळू', 'गोटी सोडा' ही गाणी डान्स, पार्टी अँथम बनली असून आताच नवीन आलेल्या 'लग्नाळू २.०' ने पुन्हा एकदा सर्वांना आपल्या तालावर थिरकायला लावत आहे.  'बॉईज ३' चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पुण्यात भव्य दिव्य म्युझिकल सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. 'बॉईज ३' भव्य म्युझिकल सोहळ्यात चित्रपटातील सुपर हिट गाण्यांची मैफिल रंगली होती. हजारो लोकांनी भरलेले सभागृह, टाळ्यांचा कडकडाट, सांगितिक वाद्यांच्या ताफ्याने सजलेला रंगमंच आणि साथीला कमालीचे गायक यामुळे ही संगीतमय संध्याकाळ प्रेक्षकांसाठी आनंददायी ठरली. या क

अभिनयचा ‘एक नंबर बाप्पा’.

Image
कलेचा अधिपती गणपती, ऊर्जा आणि नवचैतन्य घेऊन येणारा गणेशोत्सव याचे प्रत्येकाच्या मनात एक खास स्थान असते. सध्या सगळ्यांनाच गणरायाच्या आगमनाचे वेध लागलेत. सगळ्यांचा लाडका अभिनेता अभिनय बेर्डे सुद्धा त्याला अपवाद नाही. मी देखील बाप्पाचा ‘नंबर वन फॅन’ असल्याचं सांगत बाप्पाच्या स्वागताच्या जल्लोषात तो सहभागी झाला आहे. ‘मन कस्तुरी रे’ या आगामी चित्रपटातील गणेश स्तुतीचं पहिलंच धमाकेदार गाणं मराठीतला ‘चॉकलेट बॉय’ अभिनेता अभिनय बेर्डेवर चित्रीत करण्यात आलं आहे. नितीन केणी यांच्या ‘मुंबई मुव्ही स्टुडिओ’ची प्रस्तुती असलेला हा चित्रपट ४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. अभिनेता अभिनय बेर्डे, हिंदी मालिकेतील लोकप्रिय चेहरा आणि ‘बिग बॉस १५’ फेम अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही फ्रेश जोडी या चित्रपटात पहायला मिळणार आहे. *आता जोरात वाजू द्या बाजा.. येतोय सगळ्यांच्या दिलाचा राजा..!* *बाप्पा माझा एक नंबर... फॅन मी त्याचा एक नंबर... !* ताल धरायला लावणाऱ्या या गाण्यावर अभिनयचा जबरदस्त परफॉर्मन्स पहायला मिळणार आहे. प्रत्येकाला थिरकायला लावेल अशा या गाण्याचे बोल आणि त्याचे संगीत या

*हुतात्मा क्रांतीवीर राजगुरू यांना सांगितीक मानवंदना*

Image
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र सरकार,पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, राजगुरुनगर यांच्या संयुक्त विद्यमाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर गेलेले महान क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांच्या स्मरणार्थ, त्यांच्या देशभक्तीच्या भावनेला मानवंदना देण्यासाठी ‘नमन हुतात्मा राजगुरू’ या गीताची निर्मिती करण्यात आली आहे. पुण्यातील पुणे जिल्हा परिषद सभागृहात राज्यपाल मा. भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते या गीताचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. गीतकार डॉ. संगीता बर्वे यांच्या लेखणीतून उतरलेल्या या गीताला प्रसिद्ध संगीतकार अविनाश विश्वजीत यांची सुंदर संगीतमय साथ लाभली असून स्वर लाभले आहेत मनीष राजगिरे आणि कार्तिकी गायकवाड यांचे. सदर गीताचे दिग्दर्शन, संकलन आणि संयोजन पूजा थिगळे यांनी केले आहे. देशासाठी वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी फासावर जाणारे हुतात्मा राजगुरू यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गीत निर्मीतीची संधी मिळाली यासाठी आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो, अशी प्रतिक्रिया संगीतकार अविनाश विश्वजीत यांनी व्यक्त केली. या गीतातून नव्या पिढीला नवीन दिशा मिळेल आणि देशभक

'राष्ट्र'मध्ये दिसणार विक्रम गोखलेंचा राजकीय बाणा

Image
काही कलाकारांच्या केवळ उपस्थितीमुळे प्रेक्षकांचा चित्रपटाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. आशयसंपन्न कथानकाला सकस अभिनयाची जोड देणारे कलाकार असलेला चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच भावतो. 'राष्ट्र' या आगामी मराठी चित्रपटात एक नव्हे, दोन नव्हे तर मातब्बर कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदीच पहायला मिळणार आहेत. दिग्गज कलाकारांच्या यादीत विक्रम गोखले यांचाही समावेश आहे. 'राष्ट्र' या चित्रपटात विक्रम गोखलेंचा राजकीय बाणा प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. मनामनांत राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित करणारा 'राष्ट्र' २६ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. निर्माते बंटी सिंग यांनी इंदर इंटरनॅशनल या बॅनरखाली 'राष्ट्र' चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि संकलन इंदरपाल सिंग यांनी केलं आहे. विक्रम गोखलेंसारख्या कसलेल्या अभिनेत्याच्या उपस्थितीमुळं 'राष्ट्र'ला एका वेगळ्याच उंचीवर नेलं आहे. गोखले यांनी आजवर साकारलेल्या सर्वच व्यक्तिरेखांचं प्रेक्षकांपासून समीक्षकांपर्यंत सर्वांनीच कौतुक केलं आहे. अभिनयाचं चालतं बोलतं विद्यापीठ असं ज्यांचं वर्णन के

आदर्श शिंदे यांचे 'श्रीगणेशा देवा श्रीगणेशा...' प्रेक्षकांच्या भेटीला

Image
लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होणार असून त्याच्या आगमनाची सर्वत्र जय्यत तयारी सुरु आहे. सर्वत्र चैतन्यदायी वातावरण आहे. त्यातच आता बाप्पाच्या स्वागतासाठी ''अल्ट्रा मीडिया ॲण्ड  एन्टरटेन्मेंट प्रा. लि.'' घेऊन आले आहे, ''श्रीगणेशा देवा श्रीगणेशा...'' हे आल्हाददायी गाणं. आदर्श शिंदे यांच्या जल्लोषमय आवाजातील या गाण्याला ओंकार घाडी यांचे शब्द लाभले असून काशी रिचर्ड यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे. गणेशोत्सवात सर्वांनाच ठेका धरायला लावणाऱ्या या गाण्याची निर्मिती सुशीलकुमार अग्रवाल यांनी केली आहे.  ढोल ताशांचा गजर ... गुलालाची उधळण.. बाप्पाचा जयघोष... असे गणेशोत्सवातील भारावून जाणारे वातावरण या गाण्यात पाहायला मिळत आहे. बाप्पाविषयीची भाविकांची आत्मीयता या भावपूर्ण गाण्यातून व्यक्त होत आहे. या गाण्याबद्दल  गायक आदर्श शिंदे म्हणतात, ''मुळात बाप्पाचे गाणं गायला मला नेहमीच आवडते. भक्तिमय गाणी गाण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. ''श्रीगणेशा देवा श्रीगणेशा...'' हे गाणेही असेच स्फूर्तिदायी गाणे आहे. हे गाणे भाविकांनाही आवडेल, अशी मी आशा

अल्ट्रा मीडिया ॲण्ड एन्टरटेन्मेंटचे आता मराठी ओटीटीमध्ये पदार्पण

Image
   मागील चार दशकांपासून चित्रपट, मालिका, संगीत निर्मिती आणि वितरण क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या अल्ट्रा मीडिया  ॲण्ड  एन्टरटेन्मेंटने प्रेक्षकांचे नेहमीच विविध माध्यमांमधून मनोरंजन केले. प्रेक्षकांचे पारंपरिक माध्यमांतून मनोरंजन केल्यानंतर आता अल्ट्रा आणखी एका नवीन वाटचालीसाठी सज्ज झाले आहे. लवकरच अल्ट्रा मीडिया  ॲण्ड  एन्टरटेन्मेंट  मराठी ओटीटी क्षेत्रात पदार्पण करत आहे. यानिमित्ताने लोकप्रिय चित्रपट, वेबसीरिज, नाटकं, गाणी असा मनोरंजनाचा खजिना प्रेक्षकांना दाखवण्याचा अल्ट्राचा मानस आहे.  अल्ट्रा मीडिया  ॲण्ड  एन्टरटेन्मेंट  प्रा. लि.चे एमडी आणि सीईओ सुशीलकुमार अग्रवाल म्हणतात, ''महाराष्ट्राला वैभवशाली संस्कृतीचा वारसा लाभला असून मुळात मला मराठी भाषेबद्दल खूप अभिमान आहे. ही संस्कृती चित्रपट, वेबसीरिज, नाटकं, गाण्यांच्या माध्यमातून जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मनोरंजन क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. अल्ट्राने नेहमीच काळानुसार बदलत जाणारे तंत्रज्ञान आत्मसात केले. ओटीटीची निर्मिती हा याचाच एक भाग आहे. या

विजयादशमीच्या मुहूर्तावर ‘शिवप्रताप - गरुडझेप' रूपेरी पडद्यावर.

Image
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती आज संपूर्ण जगभर अभ्यासली जात आहे. महाराजांनी कशाप्रकारे शून्यातून स्वराज्य निर्मिती करत रयतेच्या राज्याची स्थापना केली याचे धडे जगभरातील सैनिकांना दिले जातात. रक्ताचा एकही थेंब न सांडता शत्रूच्या तावडीतून कशा प्रकारे सहिसलामत निसटून शत्रूवर मात येऊ शकते याचे उदाहरण शिवकालीन इतिहासात पहायला मिळतं. इतिहासाच्या सुवर्णपानांमध्ये दडलेला हाच प्रेरणादायी अध्याय आता *'शिवप्रताप - गरुडझेप'* या आगामी भव्य मराठी चित्रपटात पहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आली असून, *५ ऑक्टोबर २०२२* या विजयादशमीच्या मुहूर्तावर *शिवप्रताप - गरुडझेप'* रसिकांच्या भेटीला येणार आहे.  बादशहाच्या हातावर तुरी देऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी सहिसलामत आग्र्याहून केलेली सुटका हा शिवकालीन इतिहासातील सुवर्ण अध्याय आहे. बादशहाला भेटायला जायचं आणि तिथून परत यायचं यामागं महाराजांचा राजकीय डावपेच होता, मुत्सद्दीपणा होता की त्यांची चूक होती याबाबत आजवर अनेक इतिहासतज्ज्ञांनी आपापले विचार आणि तर्कवितर्क मांडले आहेत. लह

औरंगजेबाच्या स्वप्नांना धुळीस मिळवणारी वीरांगना 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी ' या चित्रपटाचा मुहूर्त.....

Image
औरंगजेबासारख्या स्वराज्यावर टपून बसलेल्या दिल्लीपती बलाढ्य मोगल पातशहाला महाराष्ट्राच्या मातीत कायमचा संपवण्यात स्वराज्यातील स्त्रिया देखील पुरुष योध्यांपेक्षा कमी नाही, हे दाखवून देणाऱ्या आणि मराठ्यांचा देदीप्यमान संग्राम असणाऱ्या भारतीय इतिहासाला पराक्रमाच्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या वीरांगना म्हणजे महाराणी छत्रपती ताराबाई. त्यांच्याच जीवनावर आधारीत 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' या चित्रपटाचा मुहूर्त आज संपन्न झाला आहे. मुंबई मध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला मोठ्या दिमाखात सुरूवात झाली असून या चित्रपटासाठी चित्रनगरी मध्ये भव्य सेट उभारला आहे. संपूर्ण सेट, हा इतिहासातील पराक्रमांमध्ये न्हाऊन निघाला आहे. 'प्लॅनेट मराठी’चे संस्थापक अक्षय बर्दापूरकर आणि 'मंत्रा व्हिजन' निर्मित हा चित्रपट येत्या दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. उत्तम कथानकाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन विविध विषयांवरचे दर्जेदार चित्रपट जगभरातल्या प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी 'प्लॅनेट मराठी' कायम अग्रेसर असतं. हा चित्रपट जेष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या &quo

'समायरा'सोबत पुण्यातील महिलाही बाईकवर स्वार

Image
ऋषी कृष्ण देशपांडे दिग्दर्शित 'समायरा' २६ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'समायरा'च्या प्रवासाची ही कहाणी सर्वांपर्यंत पोहचावी म्हणून चित्रपटाचे जोरदार प्रोमोशन चालू आहे. याच चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी पुण्यात बाईक रॅली काढण्यात आली. केतकी नारायण तिच्या आगामी चित्रपटाच्या पोस्टर मध्ये अव्हेंजर बाईक चालवताना दिसते आहे. स्वतंत्र, सकारात्मक दृष्टिकोन असलेली  'समायरा' स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधात निघालेल्या प्रवासाची ही कथा आहे. नुकतीच केतकीने पुण्यात सर्व महिलांबरोबर बाईक चालवली. ह्या बाईक रॅलीत पुण्यातील बऱ्याच महिलांचा  सहभाग होता. याबद्दल केतकी नारायण म्हणते, " 'समायरा' ही एक सोलो ट्रिपवर असलेल्या मुलीची कथा आहे. सगळ्याच महिला आपापल्या आयुष्यात फायटर असतात. सर्व जबाबदाऱ्या त्या अगदी चोखपणे पार पडतात व आपल्यासोबत आपल्या परिवाराला ही पुढे घेऊन जातात. आजच्या या बाईक रॅलीत मी या सर्व स्ट्रॉंग महिलांबरोबर माझे 'समायरा' हे निर्भीड पात्र प्रेक्षकांच्या समोर आणले. माझ्यासोबतच पुण्यातील महिलांनीही या बाईक रॅलीचा आनंद लुटला."

जिओ स्टुडिओजने त्यांच्या आगामी '४ ब्लाइंड मेन' (4 Blind Men) या चित्रपटाची घोषणा केली.

Image
जिओ स्टुडिओज नुकत्याच तीन वेगवेगळ्या चित्रपटांची घोषणा केल्यानंतर आता आणखी एका थ्रिलर चित्रपटाची घोषणा करीत आहे. चित्रपटाचे नाव '४ ब्लाइंड मेन' (4 Blind Men) असे आहे. हा चित्रपट ४ अंध व्यक्ती आणि हत्ती यांवर आधारित प्रसिद्ध बोधकथेवर चित्रित केला आहे. या  चित्रपटात ४ वेगवेगळ्या वळणावरती असणाऱ्या या अंधव्यक्ती काही असामान्य परिस्थितीत सापडल्या असून नशीब त्यांना एकत्र घेऊन येते . एकामागोमाग  एक अशा  घडलेल्या खूनांमुळे त्यांच संपूर्ण आयुष्य कायमच बदलून जाते. प्रेक्षकांना हा थ्रिलर चित्रपट खुर्चीवर खिळवून ठेवणारा आहे.  नितीन वैद्य निर्मित आणि अभिषेक मेरुकर दिग्दर्शित या चित्रपटात अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत झळकत असून सोबतच शुभंकर तावडे, संकर्षण कऱ्हाडे, शेखर दाते व मृण्मयी देशपांडे या दिग्गज कलाकारांची फौज झळकत आहे. दिग्दर्शक अभिषेक मेरूकर चित्रपटाबद्दल सांगतात, " जेव्हा मला या चित्रपटावर काम करण्याची संधी मिळाली, त्यावेळी मला मराठी चित्रपटसृष्टीतील जबरदस्त कलाकारांची फौज हवी होती, जे कलाकार चित्रपटातील पात्रांची भूमिका योग्य प्रकारे पार पाडतील, असे कलाकार मला भेटले.

'टकाटक २'चा पहिल्या वीकेंडला २.११ कोटींचा गल्ला ...

Image
मराठी प्रेक्षकांसमोर पुन्हा एकदा 'टकाटक' मनोरंजनाचा खजिना खुला झाला आहे. मराठी तिकिटखिकडीवर प्रेक्षक 'टकाटक' मनोरंजनाची जादू अनुभवत आहेत. 'टकाटक २' या मराठी चित्रपटानं प्रेक्षकांचं मन जिंकण्यात यश मिळवलं आहे. याच बळावर 'टकाटक २'च्या खात्यावर पहिल्या वीकेंडला तब्बल २.११ कोटी रुपयांचा गल्ला जमा झाला आहे. जन्माष्टमीच्या मुहूर्तावर १८ ऑगस्ट रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज झाला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी फर्स्ट डे फर्स्ट शोपासूनच प्रेक्षक गर्दी करत आहेत. पहिल्या भागाला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभल्यानंतर 'टकाटक २'च्या रूपात पुढील भाग प्रदर्शित झाला आहे. सुरेख संकल्पना, आशयघन कथानक, अर्थपूर्ण संवादलेखन, लक्षवेधी अभिनय, विनोदामागे दडलेला संदेश, सुमधूर गीत-संगीत रचना, कलात्मक दिग्दर्शन आणि दर्जेदार निर्मितीमूल्यांच्या बळावर या चित्रपटानं रसिकांचं मन जिंकलं आहे. महाराष्ट्रातील बर्‍याच चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट गर्दी खेचत आहे. याच बळावर 'टकाटक २'नं २.११ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. पहिल्या शोपासूनच या चित्रपटानं नेत्रदी

दिव्या कुमारच्या आवाजातील "नाद नाद गणपती"...

Image
"चोरीचा मामला", "भेटली ती पुन्हा" तसेच आगामी "लव सुलभ" अशा उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर स्वरूप स्टुडिओज् आता स्वरूप म्युझिक या नव्याकोऱ्या युट्युब म्युझिक चॅनलद्वारे म्युझिक अल्बम क्षेत्रात पदार्पण करत आहेत. गणेशोत्सवाचे  औचित्य साधत "नाद नाद गणपती...." या गाण्यानं म्युझिक चॅनलचा शुभारंभ होत असून,  'जी करदा'सारखी अनेक हिट गाणी गायलेला विख्यात गायक दिव्या कुमारनं हे गाणं गायलं आहे. स्वरूप म्युझिकच्या प्रभाकर परब, सचिन नारकर, विकास पवार यांनी "नाद नाद गणपती..." या गाण्याची निर्मिती केली आहे. विष्णु सकपाळ यांनी लिहिलेलं हे गाणं वरद-राजू या संगीतकार जोडीनं संगीतबद्ध केलं आहे. गाण्याचं संगीत संयोजन आणि प्रोग्रामिंग मॉन्टू गोसावी, राजू कुलकर्णी, वरद कुलकर्णी यांनी केले असून संगीत संयोजक रूपम भागवत आहेत.  दिव्या कुमार हे चित्रपट संगीतातलं मोठं नाव आहे. हिंदी मराठी चित्रपटांसह त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही अनेक हिट गाणी गायली आहेत. तर स्वरूप स्टुडिओजनं आतापर्यंत उत्तम चित्रपट निर्मिती केली आह

विशालचा नवा अल्बम ‘तू संग मेरे’....

Image
मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता असलेल्या अभिनेता विशाल निकमच्या मनात सध्या कुणीतरी घर केलंय... त्याच्या मनातील ती व्यक्ती कोण हे लवकरच त्याच्या चाहत्यांना समजणार आहे. ‘तू संग मेरे’ असं म्हणत त्याने आपल्या प्रेमाची खुलेआम कबुली दिली आहे. व्हिडीओ पॅलेसची निर्मीती असलेल्या ‘तू संग मेरे’ या हिंदी रोमँटिक अल्बममध्ये विशाल झळकणार आहे. त्यासोबत दिसणार आहे सुंदर, गुणी अभिनेत्री दिशा परदेशी. ‘तू संग मेरे रंग भरे... कहने दे जो दिल ये कहे... हाथ ये तेरा हाथ में... मेरे साथ ये ऐसा रहे... असे बोल असलेल्या या गीतातून त्याची दिशा सोबतची ‘प्यारवाली’ केमिस्ट्री दिसणार आहे. रोहितराज कांबळे याने लिहिलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला हर्षवर्धन वावरे याने स्वरबद्ध केले आहे. काश्मीरच्या नयनरम्य लोकेशन्सवर चित्रीत झालेल्या या गाण्याचे दिग्दर्शन फुलवा खामकर हिने केले आहे. छायांकन अमोल गोळे यांचे आहे. आपल्या पहिल्या हिंदी अल्बमविषयी विशाल सांगतो,‘या हिंदी गाण्यासाठी व्हिडीओ पॅलेसने मला दिलेली ही संधी खूप महत्त्वाची आहे. अभिनेत्री दिशा परदेशी सांगते की, वेगळा अनुभव याशूट

नववर्षाची आनंददायी सुरूवात, सुपरवुमनची सुपर कथा "बाईपण भारी देवा" प्रदर्शित होणार ६ जानेवारी २०२३ ला !

Image
आता करूया नवीन वर्षाची आनंददायी सुरूवात, आई, आजी, पत्नी, बहीण, सासू, मावशी… आपल्या आयुष्यात असलेल्या या सर्व जीवाभावाच्या मैत्रिणींना समर्पित असलेला असा हा चित्रपट आहे. 'घे डबल' आणि 'गोदावरी' या दोन मराठी चित्रपटांच्या घोषणेनंतर, जिओ स्टुडिओजने त्यांच्या सलग तिसऱ्या चित्रपटची, 'बाईपण भारी देवा' च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या खुमासदार शैलीने नटलेला हा चित्रपट येत्या नव वर्षात, ६ जानेवारी २०२३ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती MVB Media च्या माधुरी भोसले यांनी केली असून बेला शिंदे आणि अजित भुरे याचे सह-निर्माते आहेत. आणि महत्वाचं आकर्षण म्हणजे या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, दीपा परब, शिल्पा नवलकर आणि सुचित्रा बांदेकर अश्या सहा उत्तम कलाकारांची धमाल आपल्याला बघायला मिळणार आहे. काही कारणास्तव एकमेकांपासून विभक्त झालेल्या आणि त्याचबरोबर कौटुंबिक, वैयक्तिक तसंच आर्थिक समस्या अश्या गोष्टींचा सामना करणाऱ्या सहा बहिणींची ही कथा आहे.  चित्रपटाच्या संकल्पनेबद्दल बोलताना,

'राष्ट्र' चित्रपटाचा लक्ष वेधून घेणारा ट्रेलर लाँच

Image
सध्या देशाच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी सोहळा मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि देशप्रेमाने प्रेरित होऊन साजरा केला जात आहे. नेत्रदीपक अशा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सोहळ्यानंतर प्रदर्शित होणारा 'राष्ट्र' हा आगामी चित्रपटही प्रेक्षकांच्या मनात राष्ट्रभक्तीची ज्योत जागवणारा आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. २६ आॅगस्ट रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. इंदर इंटरनॅशनल या बॅनरखाली निर्माते बंटी सिंग यांनी 'राष्ट्र' चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शक इंदरपाल सिंग यांनी या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि संकलन केलं आहे. 'राष्ट्र'चा ट्रेलर खऱ्या अर्थानं अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा आहे. आज आपण देश स्वातंत्र्य झाल्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आजही समाजातील जाती-पातीची दरी मिटलेली नाही. उच्च-नीच, दलित-सवर्ण यांच्या नावाखाली आजही राजकारण खेळलं जात असल्याचं चित्रण 'राष्ट्र'मध्ये करण्यात आल्याची झलक ट्रेलरमध्ये पहायला मिळते. आमच्या राज्यामध्ये पोलिसांना काहीही काम नाही, कारण गुन

'बंकिमचंद्र ' यांच्या 'आनंदमठ ' या साहित्यकृतीवर "१७७०" सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार.

Image
भारताचा गौरवशाली ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करताना, निर्माते शैलेंद्र केकुमार, सुजय कुट्टी, कृष्ण कुमार बी आणि सूरज शर्मा यांनी बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या बंगाली कादंबरीवर आधारित बहुचर्चित भव्यदिव्य अशा ‘१७७० ‘चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. एकाचवेळी हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि बंगाली अशा सहा भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.   एस एस १ एन्टरटेनमेन्ट आणि पी के एंटरटेनमेंट या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती होत असून या बहुभाषिक असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध दिग्दर्शक अश्विन गंगाराजू हे करणार आहेत. त्यांनी याआधी राजामौली यांना 'एग्गा ' आणि 'बाहुबली ' या दोन्ही चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. अश्विन गंगाराजू म्हणतात ," हा विषय माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होता ,पण दिग्गज व्ही विजयेंद्र प्रसाद यांनी रूपांतरित कथा आणि पटकथा लिहिल्याने मला निश्चित वाटते आहे की आमच्याकडे ज्या पद्धतीने हे लेखन झाले आहे ,तो एक ब्लॉकबस्टर सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे. ते पुढे म्हणाले ," ज्या कथ

आपला ‘गोदावरी’ येतोय, दिवंगत चित्रपट दिग्दर्शक निशिकांत कामत यांना खास श्रद्धांजली अर्पण.

Image
अभिनेता जितेंद्र जोशी यांनी आज सोशल मीडियावर त्यांच्या बहुचर्चित ‘गोदावरी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. गोदावरी नदीच्या काठावर चित्रित करण्यात आलेल्या या विशेष व्हिडिओमध्ये जितेंद्र जोशी यांनी त्यांचे दिवंगत मित्र, प्रख्यात दिग्दर्शक निशिकांत कामत यांना त्यांच्या दुसऱ्या पुण्यतिथीनिमित्त विशेष श्रद्धांजली वाहिली आहे. जिओ स्टुडिओ प्रस्तुत, ब्ल्यू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स निर्मित 'गोदावरी' हा चित्रपट येत्या ११ नोव्हेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जितेंद्र जोशी यांनी प्रमुख भूमिका साकारली असून यात विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, संजय मोने आणि प्रियदर्शन जाधव असे प्रतिभाशाली कलाकार यात आहेत. जितेंद्र जोशी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले, “जेव्हा निशिकांत आम्हाला सोडून गेला तेव्हा खूप एकटं पडल्यासारखं वाटत होतं. मी त्याला प्रत्येक कथेत शोधत होतो. त्याच्या नसण्यावर प्रश्नचिन्ह उभे करत होतो, त्याचं असणं माझ्या अवतीभोवती हवं होतं. आणि तेच शोधत असताना मी गोदावरीशी बोलू लागलो आणि तिथेच मला निशिकांत सापडला. आजही मल

सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा ‘फौजी’.

Image
सैनिक देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतात. त्यांच्यामुळे आपण आपलं आयुष्य सुखाने जगू शकतो. कधी कुठे हल्ला झाला किंवा दंगली झाल्या तर आपण खंत व्यक्त करतो. नंतर मात्र अगदी सहज विसरून जातो. आपले सैनिक हातात बंदूक घेऊन कायम आपल्या रक्षणासाठी सतत सीमेवर खंबीरपणे पहारा देत असतात, तेदेखील कोणताही स्वार्थ न ठेवता. अशाच एका निडर सैनिकाचा जीवन प्रवास मांडणारा मातृपितृ फिल्म्स् प्रस्तुत घनशाम येडे निर्मित ‘फौजी’ देशाचा प्राण, ‘आन बान शान’ या मराठी चित्रपटाची घोषणा स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. ‘फौजी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन घनशाम विष्णूपंत येडे यांनी केले आहे. अभिनेता सौरभ गोखले आणि अभिनेत्री सायली संजीव ही लोकप्रिय जोडी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यांच्यासोबत नागेश भोसले, सुनील गोडबोले, हंसराज जगताप, सिद्धेश्वर झाडबुके, रोहित चव्हाण, विवेक चाबुकस्वार, मिलिंद दास्ताने, जयंत सावरकर, मानसी मागिकर, सुहास गरगडे, विश्वजित बेलदार, संकेत तटकरी, घनशाम येडे हे कलाकारही चित्रपटात दिसणार आहेत. भारतीय ‘फौजी’ सीमेवर आपल्या देशाच्या संरक्षणासाठी करताना प्राण

कोण होणार राज्याचा मुख्यमंत्री ? दिवटे की मुरकुटे?

Image
प्लॅनेट मराठी निर्मित ‘मी पुन्हा येईन’ वेबसीरिजचा गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलाच बोलबाला सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर ही वेबसीरिज प्रदर्शित झाली आणि त्याला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. आता 'मी पुन्हा येईन'चे  अखेरचे दोन भाग येत्या १२ ऑगस्टला  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना मिळणार आहेत.   पळून गेलेले ४ अपक्ष आमदार परत रिसॉर्टवर कसे येतात?, अपक्ष आमदारांनी सत्तेचा पाठिंबा काढल्यावर तपास यंत्रणेचा बेमालूमपणे वापर?, पोलिसांवरील दबावतंत्र, राजकारणी नेहमी कसे सर्वश्रेष्ठ असतात? हे सांगण्याचा आमदारांचा प्रयत्न, राजकारण्यांच्या सोयीप्रमाणे अधिकाऱ्यांचा वापर कसा केला जातो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे येत्या १२ ऑगस्टला प्रेक्षकांना मिळणार आहेत. मुख्य बाब म्हणजे वेबसीरिजच्या शेवटच्या दोन भागात कोण सत्तास्थापन करणार ? नक्की दिवटे की मुरकुटे ? याचे उत्तर मिळणार आहे.  ‘प्लॅनेट मराठी’ चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता लवकरच श

'श्यामची आई'चा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला...ओम भूतकर साकारणार 'साने गुरुजीं'ची भूमिका

Image
मागील काही दिवसांपासून संपूर्ण देशभर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. या निमित्तानं स्वातंत्र्यपूर्व काळातील आठवणींसोबतच क्रांतिकारकांच्या स्मृतींना उजाळा दिला जात आहे. याच काळात समाजात वैचारिक क्रांती घडवत काही थोर मंडळींनी सुसंस्कृत समाजाच्या जडणघडणीत मोलाचं योगदान दिलं आहे. साने गुरूजींसारख्या शिक्षकी पेशा असणाऱ्या अवलियानं आपल्या प्रत्येक वर्तणुकीतून समाजाला धडे देण्याचं, शिकवण्याचं काम केलं आहे. आता हेच साने गुरुजी रुपेरी पडद्याच्या माध्यमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'श्यामची आई' या आगामी मराठी चित्रपटात हरहुन्नरी अभिनेता ओम भूतकरनं साने गुरुजींची भूमिका साकारली आहे. अमृता फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मात्या अमृता अरुण राव यांनी 'श्यामची आई' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. निर्मात्या अमृता अरुण राव यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक विषयांवरील चित्रपटांची निर्मिती केली आहे. नेहमीच काहीतरी वेगळं करण्याच्या ध्यासानं पछाडलेला, तसंच बरेच पुरस्कार पटकावणाऱ्या तरुण दिग्दर्शक सुजय डहाकेनं 'श्यामची आई'चं दिग्

अखेर तुफान व्यक्तिमत्वावर आधारित चित्रपटाचा दणकेदार ट्रेलर प्रदर्शित.

Image
मुंबईतील गॅंगवॉरमधील सर्वात मोठे नाव म्हणजे 'अरुण गुलाब गवळी' उर्फ 'डॅडी'. त्यांच्या 'दगडी चाळी'वर आधारित 'दगडी चाळ' हा चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. ज्याप्रमाणे डॅडींनी अवघ्या मुंबईवर राज्य केले तसेच या चित्रपटानेही अवघ्या महाराष्ट्रावर राज्य केले. आता पुन्हा एकदा अवघ्या महाराष्ट्रावर राज्य करायला 'दगडी चाळ २' सज्ज झाला असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टरचे अनावरण ‘रिअल डॅडीं’च्या हस्ते दगड चाळीत झाले असून ट्रेलर पाहून चित्रपट पाहाण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित 'दगडी चाळ २' या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत कणसे यांनी केले असून रत्नकांत जगताप कार्यकारी निर्माता आहेत. येत्या १९ अॅागस्ट रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.  'दगडी चाळ २'मध्ये आपल्याला सूर्या आणि डॅडी यांच्यातील एक वेगळे नाते पाहायला मिळणार आहे. एकेकाळी डॅडींचा उजवा हात असणारा सूर्या आता त्याच्या कुटुंबासोबत गॅंगवॉरच्या विळख्यातून बाहेर पडून एक साधं सोप्पं आयुष्य

मराठीसह हिंदीतही प्रदर्शित होणार 'रौंदळ'

Image
आशयघन चित्रपटांसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या मराठी सिनेसृष्टीमध्ये अॅक्शन चित्रपटांची तशी वानवाच आहे. आता मात्र ही उणीव भरून काढण्यासाठी एक धडाकेबाज अॅक्शनपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून कुतूहल जागवणारा 'रौंदळ' हा अॅक्शनपट मराठीसह हिंदी प्रेक्षकांचंही मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा टिझर नुकताच लाँच करण्यात आला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'ख्वाडा' या चित्रपटानंतर 'बबन'मध्ये मुख्य भूमिकेत दिसलेल्या भाऊसाहेब शिंदेंचा रुद्रावतार 'रौंदळ' या चित्रपटात पहायला मिळणार आहे. हा चित्रपट मराठी आणि हिंदीमध्ये संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे. भूमिका फिल्म्स अ‍ॅण्ड एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली बाळासाहेब शिंदे, डॉ. पुरुषोत्तम भापकर, प्रमोद चौधरी आणि भाऊ शिंदे यांनी 'रौंदळ' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'रौंदळ' चित्रपटाच्या रावडी पोस्टरनं प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण करण्याचं काम केल्यानंतर आता याचा लक्षवेधी टिझर रिलीज करण्यात आला आहे. गजानन पडोळ यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. को

पुन्हा एकदा लग्नाळू २.० चे प्रेक्षकांच्या मनावर राज्य !

Image
सगळीकडे धमाल,मस्तीचे वातावरण निर्माण करणाऱ्या ‘बॉईज’मधील ‘लग्नाळू’ या गाण्याचे नवीन व्हर्जन ‘बॉईज ३’ या चित्रपटात पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. नुकत्याच एका भव्य सोहळ्याच्या माध्यमातून ‘लग्नाळू २.०’  हे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याचे संगीतकार अवधूत गुप्ते असून मुग्धा कऱ्हाडे हिने आपल्या ठसकेबाज आवाजात हे गाणे गायले आहे. प्रतीक लाड, पार्थ भालेराव, आणि सुमंत शिंदे यांच्यासोबत विदुला चौगुले हिनेही या गाण्यावर जबरदस्त ठेका धरला आहे. विदुला एकटीच त्या तिघांवरही भारी पडत असल्याचे यात दिसत आहे. राहुल ठोंबरे आणि संजीव होवालदार यांनी या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे.        ‘लग्नाळू’ या गाण्यांनी आधीच मराठी पडद्यावर आपली एक छाप उमटवली होती. तरुणांमध्ये तर या गाण्याचे एक वेगळेच वेड आहे. इतक्या वर्षांनंतरही  हे गाणे प्रत्येक रंगमंच हादरवून टाकू शकतो.  त्यात त्याचे २. ० व्हर्जन म्हणजे तर प्रेक्षकांसाठी सोने पे सुहागा.  या गाण्याबद्दल संगीतकार अवधूत गुप्ते म्हणतात,  " ज्या गाण्याने आधीच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे, त्याचे पुढचे व्हर्जन बनवून प्रेक्षक

राज इरमालीचं 'दिसतंय मॅाडल भारी' हे धमाल गाणं प्रदर्शित

Image
आजचा जमाना व्हिडीओ अल्बम्सचा आहे. सिंगल्स आणि व्हिडीओ अल्बम्सच्या विश्वात रमलेल्या तरुणाईला काही युट्यूबर्सची गाणी नेहमीच खुणावत असतात. अशा युट्यूबर्सच्या नवनवीन गाण्यांची फॅालोअर्स आतुरतेनं वाट पहात असतात. या युट्यूबर्सच्या यादीत राज इरमाली हे नाव सध्या आघाडीवर आहे. मिलियन्स फॅालोअर्स असणाऱ्या राजनं आजवर रसिकांना वेगवेगळ्या मूडमधली धमाल गाणी दिली आहेत. अबालवृद्धांना आपल्या संगीताच्या तालावर ठेका धरायला लावलं आहे. वेगवेगळ्या धाटणीच्या गाण्यांना रसिकांना भावणाऱ्या संगीताचा साज चढवणं हे राजच्या क्रिएटीव्हीटीचं गुपित मानलं जातं. याच राज इरमालीचं आता नवं कोरं गाणं संगीतप्रेमींच्या भेटीला आलं आहे. निर्माते अनिल गोविंद पाटील यांची निर्मिती असलेलं 'दिसतंय मॅाडल भारी...' हे नवं गाणं राजनं नुकतंच आपल्या युट्यूब चॅनलवर लाँच केलं आहे. पवन केणे आणि आघाडीची युट्यूब एन्फ्युएन्जर कोमल खरात यांच्यावर 'दिसतंय मॅाडल भारी...' हे गाणं शूट करण्यात आलं आहे. नयनरम्य लोकेशन्सवर चित्रीत करण्यात आलेल्या, गुलाबी रंगाची उधळण करत प्रेमभावना व्यक्त करणाऱ्या या गाण्याच्या पोस्टरवर उत्कंठा

‘होऊन जाऊ दे’ गाण्याचा बोलबाला.....

Image
मैत्री दिनाच्या पार्श्वभूमीवर 'रूप नगर के चीते' या मराठी चित्रपटातील प्रदर्शित झालेल्या ‘होऊन जाऊ दे’ या गाण्याला रसिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या २४ तासात या गाण्याने २ मिलियन्स व्हूयुजचा टप्पा पार करत रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. मनाला भिडणारी शब्दरचना आणि संगीताचा सुमधुर ठेका याने सजलेल्या या गाण्याला बॉलीवूड संगीतकार मनन शाह यांनी सुरेल संगीताची किनार जोडली आहे. जय अत्रे यांनी लिहिलेलं ‘होऊन जाऊ दे’ हे धमाकेदार गाणं गायक आदर्श शिंदे आणि सौरभ साळुंखे यांच्या दमदार आवाजात स्वरबद्ध करण्यात आलं आहे. करण परब आणि कुणाल शुक्ल या युवा अभिनेत्यांवर हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. दोन मित्रांची धमाल केमिस्ट्री या गाण्यातून पहायला मिळतेय. दोन मित्रांच्या अनोख्या मैत्रीची कथा या चित्रपटातून पहाता येणार आहे. या गाण्याच्या यशाबद्दल बोलताना संगीतकार मनन शाह सांगतात की, आजच्या तरुणाईला डोळ्यासमोर ठेवून हे गाणं तयार करण्यात आलं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्रीचं एक ख़ास स्थान असतं. या गाण्यातून प्रत्येकजण आपल्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा देईल. हे गाणं प्रत्येकाला

आता सर्वत्र वाजणार ‘डंका… हरी नामाचा’

Image
टाळ वाजे, मृदूंग वाजे, वाजे हरीचा डंका… गणराज स्टुडिओज् आणि रुद्र एंटरटेनमेंट्स प्रस्तुत ‘डंका… हरी नामाचा’ या चित्रपटाची पुत्रदा एकादशीच्या निमित्ताने सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे. श्रेयश जाधव, रवी फड निर्मित हा चित्रपट श्रेयश जाधव यांनीच दिग्दर्शित केला असून येत्या २०२३ मध्ये तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे ‘डंका… हरी नामाचा’ हा चित्रपट केवळ मराठीतच नव्हे तर हिंदी, तेलगु, तामिळ आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. सध्या तरी या चित्रपटातील कलाकार गुलदस्त्यात आहेत.   दिग्दर्शक श्रेयश जाधव याने मराठी सिनेसृष्टीला ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘बस स्टॅाप’, बाबू बॅन्ड बाजा’, ‘अॅानलाईन बिनलाईन’, ‘मी पण सचिन’ असे वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिले. शिवाय आपल्या हटके मराठी रॅप साँगने तरूणाईलाही भुरळ घातली. पहिला मराठी रॅपर अशी ओळख मिळवणाऱ्या श्रेयशने सिनेसृष्टीला नेहमीच काहीतरी वैविध्यपूर्ण देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या चित्रपटातही प्रेक्षकांना नाविन्यपूर्ण काहीतरी पाहायला मिळेल. या चित्रपटाबद्दल श्रेयश जाधव म्हणतो, ‘’ डंका… हरी नामाचा हा भव्य चित्रपट एक अॅक्शनपट अ

मैत्रीची अनोखी व्याख्या सांगणार ‘समायरा’

Image
     काही दिवसांपूर्वीच ऋषी श्रीकृष्ण देशपांडे दिग्दर्शित 'समायरा' या चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली.  केतकी नारायणचा अव्हेंजर चालवतानाच्या धाडसी लुकने प्रेक्षकांच्या मनात घर केले. आता ‘समायरा’ची दुसरी बाजू प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नुकत्याच झालेल्या मैत्री दिनाच्या निमित्ताने मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले असून यात हिंदी वेबसीरिज आणि चित्रपटात अभूतपूर्व कामगिरी करणारा अभिनेता अंकुर राठी केतकी नारायणसोबत दिसत आहे. केतकीचा आत्मविश्वास , ध्येयापर्यंतचा असाधारण प्रवास आणि त्यात अंकुरची तिला लाभलेली प्रेमळ साथ हे आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे असलेले नाते मराठी पडद्यावर एक अनोखी रंगत घेऊन येणार आहे.            येत्या २६ ऑगस्ट रोजी ‘समायरा’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ग्लोबल सेवा एलएलपी प्रस्तुत, आद्योत फिल्म्सच्या सहयोगाने, या चित्रपटाची निर्मिती डॉ. जगन्नाथ सुरपूरे, रतन सुरपूरे, शशिकांत पानट, योगेश आळंदकर आणि ऋषी श्रीकृष्ण देशपांडे यांनी केली असून या चित्रपटाची पट

'सोनाली -कुणाल' घ्या लग्नाचा घाट,प्लॅनेट मराठी ओटीटी सोबत उपस्थित राहून सर्वांनी वाढवा शुभकार्याचा थाट.

Image
लग्न म्हणजे अनमोल क्षणांची तिजोरी.त्याला आपले कलाकार ही अपवाद नाहीत.या कलाकारांचा लग्नसोहळा कसा साजरा केला जातो, त्यांनी  लग्नात कोणते कपडे घातले असतील, काय दागिने घातले होते, जेवणाची पंगत कशी रचली होती, त्यांनी किती धमाल केली असेल अशा अनेक गोष्टी जाणून घेण्याची त्यांच्या चाहत्यांना कायमच उत्सुकता असते. चाहत्यांची हिच उत्सुकता लक्षात घेऊन ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर महाराष्ट्राची अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांचा भव्य विवाह सोहळा पाहता येणार आहे. नुकतेच या सोहळ्याचे निमंत्रण प्रेक्षकांना सोशल मीडियाद्वारे देण्यात आले. त्यामुळे लवकरच आता चाहत्यांना सोनालीच्या आयुष्यातील सुवर्णक्षणांचा साक्षीदार होता येणार आहे.  एखाद्या मराठी कलाकाराच्या विवाह सोहळ्याचे ओटीटीवर प्रक्षेपण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यात उपस्थितांना सोनाली आणि कुणाल यांचा लंडनमध्ये पार पडलेला संपूर्ण लग्नसोहळा, वऱ्हाडींची धुमधाम, लग्नातील विधी हे सर्व पाहाता येणार आहे.  सोनाली कुलकर्णी म्हणते, " 'प्लॅनेट मराठी ओटीटी' वर पहिल्यांदाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या लग्नसोहळ्याचे प्रक्ष

'टकाटक २'मध्ये दिसणार 'अशी ही बनवाबनवी'मधील एव्हरग्रीन 'हृदयी वसंत फुलताना' गाण्याचे नवे रूप ...

Image
मराठी सिनेमांनी इतिहास घडवत तमाम रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. यापैकी काही एव्हरग्रीन संगीतप्रधान मराठी चित्रपट कायमचे रसिकांच्या मनावर कोरले गेले. यापैकीच एक आहे 'अशी ही बनवाबनवी'. या सिनेमातील गाणी आजही पॉप्युलर आहेत. कोणत्याही वयातील रसिकांच्या मनात प्रेमाचा वसंत फुलवणारं 'हृदयी वसंत फुलताना...' हे 'अशी ही बनवाबनवी'मधील एव्हरग्रीन गाणं आता नवा साज घेऊन रसिकांच्या भेटीला येणार आहे. १८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'टकाटक २' या सिनेमात 'हृदयी वसंत फुलताना...' हे गाणं नव्या रूपात पहायला मिळणार आहे. 'टकाटक २'च्या निर्मात्यांनी नुकतीच या संदर्भातील घोषणा केली आहे. 'टकाटक'च्या रुपात मराठी तिकीटबारीवर नेत्रदीपक यश मिळवणाऱ्या चित्रपटाचा सिक्वेल 'टकाटक २'च्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन मिलिंद कवडे यांचं आहे. अंडरकरंट एक महत्त्वपूर्ण संदेश देणाऱ्या या सिनेमात 'हृदयी वसंत फुलताना...'च्या नव्या रूपाचा आनंदही लुटता येणार आहे. या गाण्यात कोणकोणते कलाकार

'बॉईज ३' मधील ‘तो’ चेहरा आला समोर विदुला चौगुलेचे चित्रपटसृष्टीत पदार्पण ....

Image
'बॉईज' आणि 'बॉईज २' या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धिंगाणा घातला होता. धैऱ्या, ढुंग्या आणि कबीर या धमाल त्रिकुटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप पाडली. आणि त्यात दोन्ही पर्वामध्ये धैऱ्या, ढुंग्या आणि कबीरच्या आयुष्यातील येणारी मुलगी हा एक वेगळाच विषय ठरला. प्रत्येक वेळी यात हॅण्डसम कबीरनेच बाजी मारली. ‘बॅाईज ३’च्या घोषणेपासूनच धैऱ्या, ढुंग्या आणि कबीर यांच्यासोबत राडा घालायला कोण अभिनेत्री असणार, याची सर्वत्र चर्चा सुरु होती. अखेर ‘ती’चा चेहरा समोर आला असून विदुला चौगुले ‘त्या’ मुलीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. विदुला ‘बॅाईज ३’च्या निमित्ताने चित्रपटात पदार्पण करत आहे. आता ही विदुला या त्रिकुटाला भारी पडणार का? हे पाहण्यासाठी १६ सप्टेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.   काही दिवसांपूर्वीच या तिघांच्या आयुष्यात आलेली ‘ती’ मुलगी सोशल मीडियावर झळकली होती. मात्र अर्धा चेहरा दिसत असल्याने ‘ती’ नक्की कोण, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अखेर या चेहऱ्यावरून पडदा उठला असून आता प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे ती, विदुला नक्की कोणाच्या आयुष्यात येण