Posts

Showing posts from October, 2022

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रंगला 'गोदावरी'चा दिमाखदार ट्रेलर लाँच सोहळा.

Image
राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावल्यानंतर निखिल महाजन दिग्दर्शित 'गोदावरी' चित्रपट आता आपल्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला आहे. या दिमाखदार सोहळ्याला चित्रपटातील कलाकारांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.  येत्या ११ नोव्हेंबरला 'गोदावरी' हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या पूर्वी ही या बहुचर्चित चित्रपटातील ‘कोजागिरी’ आणि ‘खळ खळ गोदा’ या श्रवणीय गाण्यांनी संगीत प्रेमींना भुरळ घातली होती. त्यात आता ट्रेलरने प्रेक्षकांची उत्कंठा अधिकच वाढवली आहे. ट्रेलरमध्ये जितेंद्र जोशी म्हणजेच निशिकांतचे नाशिकमध्ये राहणारे कुटुंब दिसत आहे. या हसत्याखेळत्या कुटुंबातील चढउतार तसेच परंपरा, रूढी आणि भावना यांचे सुंदर मिश्रण दाखवण्यात आले आहे. 'गोदावरी' नदी ही या चित्रपटाची मुख्य दुवा आहे. गोदावरी नदी जिने सुख आणि दुःख दोन्ही अनुभवले आहे, तिचे आणि निशिकांतचे एक अनोखे नाते यात दिसतेय. नदीच तर आहे, असे मानण

'क्षिती जोग' साकारणार जिगरवाली बाई ‘सनी’चं निमित्त......

Image
बिनधास्त, आत्मविश्वासू, स्पष्टवक्ती अशी वैदेही ‘सनी’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वैदेहीची भूमिका क्षिती जोग साकारणार असून यात तीला जीगरवाली बाई असं म्हणण्यात आलं आहे.  कॅफे मालक असलेली वैदेही सनीसोबत कधी कठोर वागताना दिसत आहे, तर कधी त्याची काळजीही घेताना दिसत आहे. सनी आणि वैदेहीमध्ये कामासोबतच भावनिक नातं निर्माण झाल्याचेही दिसतेय. त्यांच्या नात्यातील नेमकी गंमत ‘सनी’ पाहिल्यावरच उलगडेल. दरम्यान या दोघांमधील केमिस्ट्री पडद्यावर उत्तम दिसत आहे. क्षिती जोग आणि ललित प्रभाकरने नाटक आणि मालिकेमध्ये एकत्र काम केले आहे. ‘सनी’च्या निमित्ताने क्षिती आणि ललित आता चित्रपटातही एकत्र दिसणार आहेत.       यापूर्वी क्षिती जोग आपल्याला ‘झिम्मा’ चित्रपटात दिसली मिता जहांगिरदार ही व्यक्तिरेखा साकारणारी क्षिती यात थोडी गोंधळलेली, घाबरट अशी दिसली. मितावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. आता या भूमिकेच्या अगदी विरूद्ध अशी ‘सनी’मधील तिची भूमिका आहे आणि ही भूमिकाही तिच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल.  क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन  प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मि

पहिल्या प्रेमाची आठवण करून देणारा 'प्रेम म्हणजे काय असतं?,चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Image
पहिल्या प्रेमाची आठवण करून देणाऱ्या 'प्रेम म्हणजे काय असतं?' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. प्रेम म्हणजे काय हे सांगत प्रेमाची हळुवार भावना उलगडणारा हा चित्रपट ४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तख्त प्रॉडक्शन यांनी "प्रेम म्हणजे काय असतं?" या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर प्रसाद दत्तात्रय इंगवले यांनी चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती अशी तिहेरी जबाबदारी निभावली आहे. ऋतुजा टंकसाळे, पायल कदम, सूरज माने अशा नव्या दम्याच्या कलाकारांचा चित्रपटात समावेश आहे. प्रेम या संकल्पनेवर आजवर अनेक चित्रपट झाले. मात्र याच संकल्पनेचा आणखी एक वेगळा पैलू 'प्रेम म्हणजे काय असतं?' या चित्रपटातून मांडला जाणार आहे. पहिलं प्रेम ही संकल्पना अत्यंत वेगळ्या पद्धतीने या चित्रपटात मांडण्यात आली आहे. तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट, मनाला भावणारं कथानक, श्रवणीय संगीत, फ्रेश कलाकार असा मिलाफ प्रेम म्हणजे काय असतं? या चित्रपटात झाला आहे. त्यामुळे प्रत्येकाला त्याच्या आयुष्यातल्या पहिल्या प्रेमाची आठवण या चित्रपटामुळे नक्कीच होईल, हळूवार, संवेदनशील प्रेमाच

'वऱ्हाडी वाजंत्री'ची भन्नाट टायटल्स.....

Image
चित्रपट ही एक मनोरंजनाची अद्भुत कला तर ती पाहणं हा विलक्षण अनुभव. आजपर्यंत विविध जातकुळीच्या चित्रपटातून प्रबोधनापासून मनोरंजनापर्यंत आणि इतिहासापासून वर्तमानापर्यंत अनेकविध आशय विषयाने प्रतिभावंतांच्या प्रतिभा उजळल्या आहेत. आपल्या चित्रपटाला रसिकांच्या हृदयात स्थान मिळावे यासाठी ते नानाविविध प्रयत्न करताना दिसतात. असंच काहीतरी वेगळं अफलातून मनोरंजन करण्यासाठी अभिनेते दिग्दर्शक विजय पाटकर सज्ज झाले आहेत. त्यांच्या ११ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या वऱ्हाडी वाजंत्री या धम्माल विनोदी चित्रपटासोबत.  अनेक चित्रपटांची टायटल्स रसिक प्रेक्षकांच्या आकर्षणाचा विषय ठरलेली आहेत. विषयाला अनुसरून आपल्या चित्रपटाची टायटल्स करण्यासाठी निर्माते दिग्दर्शक जंगजंग पछाडत असतात. विशेष टॅलेंटचा वापरून करून आकर्षक टायटल्स निर्मितीवर भर दिला जातो. अश्याच काहीश्या भन्नाट कल्पनांमध्ये आपल्या चित्रपटाचं नाव रसिकांच्या मनःपटलावर कोरण्यासाठी अभिनेते दिग्दर्शक विजय पाटकर सध्या गुंतले आहेत. त्यांच्या ‘वऱ्हाडी वाजंत्री’ या चित्रपटाचे टायटल्स तयार करण्याचे काम जोमात सुरु आहे. प्रख्यात पब्लिसिटी

'बेबी ऑन बोर्ड'चा प्रवास सुरु श्रुती-सिद्धार्थची ही धमाल जर्नी आजपासून 'प्लॅनेट मराठी' ओटीटीवर

Image
'बेबी ऑन बोर्ड'च्या ट्रेलरनंतर प्रेक्षकांची या सीरिजविषयीची उत्सुकता अधिकच वाढली. प्रेक्षकांच्या या उत्सुकतेला पूर्णविराम देत, 'बेबी ऑन बोर्ड' चे २ एपिसोड्स प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाले आहेत. 'बेबी ऑन बोर्ड'च्या पहिल्या दोन एपिसोड्समध्ये प्रतीक्षा मुणगेकर म्हणजेच श्रुती व अभिजीत आमकार म्हणजेच सिद्धार्थचा त्यांच्या नव्या घरात गृहप्रवेश पाहायला मिळत आहे. गृहप्रवेश करतानाचा या जोडप्याचा आनंद, उत्सुकता यात दिसतोय. श्रुतीचे बाळंतपण सिद्धार्थने करायचे ठरवल्यावर आता एक बाबा आणि नवरा म्हणून त्याची जबाबदारी तो कशी पार पाडतो, या दरम्यान या दोघांमध्ये होणारी नोकझोक यात अधिकच रंगत आणत आहे. श्रुतीचे डोहाळे पुरवण्यापासून तिच्या प्रेग्नंन्सी डाएटपासून खाण्या - पिण्याच्या वेळेची काळजी सिद्धार्थ घेतोय. स्वतः चमचमीत, चाविष्ट पदार्थांचा त्याग करणारा, श्रुतीला मॉर्निंग वॉकला घेऊन जाणारा एक उत्तम नवरा आणि 'डॅड टू बी' सिद्धार्थ सर्वांनाच आवडेल. पहिल्या दोन एपिसोड्सने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केल्यानंतर आता उत्सुकता लागून राहिली आहे ती पुढील एपिसोड्सची. 

‘मन कस्तुरी रे’मधील तेजस्वी व अभिनय यांच्या प्रेमाला 'रंग लागला'

Image
'मन कस्तुरी रे'चा जबरदस्त ट्रेलर पाहून प्रेक्षकांची चित्रपट पाहाण्याची उत्सुकता वाढली असतानाच आता या चित्रपटातील  'रंग लागला' हे रोमँटिक साँग प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात तेजस्वी आणि अभिनयमध्ये नव्यानं हळुवार फुलत जाणारं प्रेमाचं नातं दिसत आहे. कॉलेजमधील बहरत जाणारं प्रेम, धमाल यात दिसत आहे. शोर यांनी या गाण्याला संगीत, शब्दबद्ध केले असून आनंदी जोशी आणि अभय जोधपूरकर यांच्या सुमधुर आवाजाची जादू या गाण्यातून अनुभवता येत आहे.   हल्ली व्हायरल झालेल्या ‘नाद’ या रॅाक साँगनंतरचे हे रोमँटिक गाणे तरुण तरुणींना एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणार आहे. जिथे या प्रेमीयुगुलांना कस्तुरीचा शोध लागेल. दिग्दर्शक संकेत माने म्हणतात, " तेजस्वी आणि अभिनय या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. 'मन कस्तुरी रे' च्या सगळ्याच गाण्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'रंग लागला' हे गाणंही प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.” गाण्याचे संगीत दिग्दर्शक शोर म्हणतात, " या चित्रपटातील गाण्यांना तरुणांकडून कमालीचा प्रतिसाद मिळतोय. यापूर्वी प्रद

ओटीटी विश्वात 'अमोल टीव्ही'ची धमाकेदार एन्ट्री संजय पारेकर आणि सचिन पारेकरांच्या अमोल प्रोडक्शनचं नवं पाऊल.

Image
मागील काही वर्षांपासून भारतीय मनोरंजन विश्वाचा अविभाज्य घटक बनलेल्या ओटीटीला कोरोनाकाळात नवसंजीवनी लाभल्यानं आज या विश्वाची पाळंमुळं रसिकांच्या मनात खोलवर रुजली गेली आहेत. थिएटरमधील सिनेमांच्या जोडीला ओटीटीवरील चित्रपटही प्रेक्षकांचं फुल टू मनोरंजन करत आहेत. यासोबतच वेब सिरीजनंही रसिकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. रसिकांच्या सेवेत नवनवीन ओटीटी प्लॅटफॅार्म्स येत असल्यानं डिजिटल विश्वात तगडी स्पर्धा निर्माण झाली आहे. याच तगड्या स्पर्धेत प्रेक्षकांची आवड-निवड जोपासत लक्ष वेधून घेणारं कंटेंट सादर करण्याच्या उद्देशानं एक नवं ओटीटी रसिक दरबारी रुजू होत आहे. अमोल टीव्ही असं या नव्या ओटीटीचं नाव आहे. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर पुण्यात सिटिप्राइड कोथरुडमध्ये एका दिमाखदार सोहळ्यात लोगो लाँच करत अमोल टिव्हीची घोषणा करण्यात आली. मागील बऱ्याच वर्षांच्या कालावधीमध्ये सिनेनिर्मिती, नाट्यनिर्मिती, सिरीयलनिर्मिती ते वितरण असा देदीप्यमान प्रवास करताना राष्ट्रीय पुऱस्कारांनाही गवसणी घालणाऱ्या निर्माते संजय पारेकर आणि सचिन पारेकर यांनी अमोल टिव्हीची मुहूर्तमेढ रोवली आहे. या सो

माजी आमदार 'प्रकाश देवळे' पुन्हा एकदा चित्रपट दिग्दर्शनाकडे.....

Image
माजी आमदार प्रकाश देवळे पुन्हा एकदा चित्रपट दिग्दर्शनाकडे वळले आहेत. त्यांच्या आगामी 'अनटोल्ड स्टोरी: मिशन इंडिया' या हिंदी चित्रपटातून आता एका रणरागिणीची गोष्ट रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे.  प्रकाश देवळे, सपना लालचंदानी यांच्या डेस्टिनी प्रॉडक्शन निर्मित 'अनटोल्ड स्टोरी: मिशन इंडिया' या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच शिरगाव येथील प्रति शिर्डी साई मंदिर येथे संपन्न झाला. प्रकाश देवळे यांनी या पूर्वी "मायेची सावली" हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. आता एक अनोखी कथा  'अनटोल्ड स्टोरी: मिशन इंडिया' या चित्रटातून ते मांडणार आहेत. चित्रपटाची कथा प्रकाश देवळे यांचीच आहे. तर प्रकाश देवळे, सपना लालचंदानी, आबा गायकवाड यांनी पटकथा, संवादलेखन केलं आहे. प्रकाश देवळे दिग्दर्शनाची जबाबदारी निभावत आहेत. स्वरूप स्टुडिओजचे सचिन नारकर आणि विकास पवार या चित्रपटासाठी लाईन प्रोड्युसर म्हणून काम पाहणार आहेत. येत्या डिसेंबर महिन्यात काश्मीर येथे या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार असून कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.  स्वत:च्या कुं

‘समुपदेशक’ झालाय अभिनेता 'पुष्कर श्रोत्री'....

Image
अभिनेता पुष्कर श्रोत्री त्याच्या 'हॅप्पी गो लकी' स्वभामुळे प्रत्येकाला जवळचा वाटतो. मालिका, चित्रपट, नाटक, वेबसीरीज या साऱ्या माध्यमांमध्ये लीलया वावरणारा हा अभिनेता आता ‘समुपदेशक’ म्हणून काम करणार आहे. गैरसमजामुळे विस्कटलेल्या नात्यांमध्ये सुसंवाद घडवून आणण्याच्या कामासाठी पुष्करने पुढाकार घेतला आहे. समुपदेशक म्हणून त्याची नवी इनिंग यशस्वी होते का? हे पाहण्यासाठी तुम्हाला आगामी ‘३६ गुण’ हा मराठी चित्रपट पहावा लागेल. या चित्रपटात तो समुपदेशकाच्या भूमिकेत दिसणार आहे. पुष्करचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना यात पहायला मिळेल. समित कक्कड दिग्दर्शित '३६ गुण' चित्रपट ४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना पुष्कर सांगतो की, ‘समुपदेशक’ सुसंवादासाठी प्रयत्न करतोच पण त्याच्या या प्रयत्नाला समोरच्याचा प्रतिसादही तितकाच महत्त्वाचा असतो. कोणत्याही नात्यामध्ये मनं जुळायला हवीत. ती जुळली की, नात्याचा समतोल साधला जातो, हे अधोरेखित करणारा हा चित्रपट आहे. लग्न झालेल्या व न झालेल्या प्रत्येकाने हा चित्रपट पहायला हवा. या चित्रपटात संतोष जुवे

२०२२ मधील उत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत 'मेरे देश की धरती'.

Image
सध्या मनोरंजनसृष्टीमध्ये दाक्षिणात्य चित्रपटांचा बोलबाला दिसून येत असला तरी काही दर्जेदार बॉलीवूड चित्रपटही आपली छाप पाडण्यात यशस्वी ठरले आहेत. २०२२ मध्ये अनेक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले पण त्यातील मोजक्याच चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. एका फिल्मी पोर्टलने जाहीर केलेल्या यशस्वी चित्रपटांच्या यादीत कार्निवल मोशन पिक्चर्स’च्या 'मेरे देश की धरती' या हिंदी चित्रपटाचा समावेश आहे. अॅमेझॅान प्राइम व्हिडिओ’ वर ही ‘मेरे देश की धरती’चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. 'मेरे देश की धरती’.... देश बदल रहा है हा वेगळया धाटणीचा चित्रपट त्यातील कथा आशयामुळे विशेष गाजला. वेगळा विचार करून एकजुटीने केलेली कोणतीही गोष्ट नेहमीच यशस्वी ठरते, मग ते देशाचे राजकारण असो वा कल्पकतेचा अविष्कार. एकदा का मनात आणलं तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. नव्या कल्पनांचा शोध घेऊन दोन तरुण इंजिनिअर्स एका गावाचा कसा कायापलट करतात हे दाखवून देणारा हा चित्रपट आहे. कार्निवल मोशन पिक्चर्सच्या सीईओ आणि संचालिका वैशाली सरवणकर 'मेरे देश की धरती' या चित्रपटाच्या यशाबद्दल आ

महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम 'शिवाली परब'चा बोल्ड अंदाज "

Image
सिंधुदूर्गातली गावपळणीची अनोखी प्रथा आणि त्या दरम्यानची थरारक प्रेमकथा मांडणाऱ्या प्रेमप्रथा धूमशान या चित्रपटात अभिनेत्री शिवाली परबचा बोल्ड अंदाज पाहायला मिळणार आहे. चित्रपटातलं "काय उमगेना" हे नवं गाणं लाँच करण्यात आलं असून, ४ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार होणार आहे. या गाण्यात शिवालीनं लीपलॉकिंग सीन्समधून आपला बोल्डनेस दाखवला आहे. ऑक्सिजन फिल्म्स, डायनॅमिक पिक्चर्स, आरव्हीके फिल्म्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सत्या अय्यर हे चित्रपटाचे निर्माते, तर स्वरा अभिजित वारंग, रचना विज, मोहित, नमन तलवार सहनिर्माते आहेत. अभिजित वारंग यांच्या 'पिकासो' या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर एकच अभिनेता असलेला 'देजावू' हा अत्यंत प्रयोगशील चित्रपट त्यांनी केला. आता ते 'प्रेमप्रथा धुमशान' हा नवा चित्रपट घेऊन येत आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परबसह विनायक चव्हाण, अभय खडपकर, अभय नेवगी, मिलिंद गुरव, विश्वजित पालव, विद्याधर कार्लेकर, निकिता सावंत, कल्पना बांदेकर असे दमदार कलाकार या चित्रपटात आहेत. च

'घर बंदूक बिर्याणी' चा आगळावेगळा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला....

Image
झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे हे एक समीकरणच आहे. या दोघांनी एकत्र येऊन सिनेसृष्टीला ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’ असे ‘सुपरहिट’ चित्रपट दिले आहेत. नेहमीच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी वेगवेगळ्या आशयाचे चित्रपट घेऊन येणारे झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे पुन्हा एकदा एक जबरदस्त चित्रपट घेऊन सज्ज झाले आहेत. ‘घर बंदूक बिर्याणी’ असे या चित्रपटाचे नाव असून नुकताच या चित्रपटाचा भन्नाट टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित ‘घर बंदूक बिर्याणी’ या चित्रपटात सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणारा हा चित्रपट एकाच वेळी मराठी, हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे. झी स्टुडिओज, नागराज पोपटराव मंजुळे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.     चित्रपटाचा टीझर बघून काहीतरी भन्नाट आहे, हे कळतेय. पोलीस आणि नक्षलवाद्यांची झुंज यात दिसत असून हा पाठलाग कशासाठी आहे, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. या चित्रपटाबद्दल नागराज मंजुळे म्हणतात, " झी स्टुडिओजच्या साथीने पुन्हा एक आगळावे

चिन्मय मांडलेकर ‘सनी’मध्ये दिसणार अत्यंत वेगळ्या आणि फ्रेश भूमिकेत!

Image
लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सनी’ या चित्रपटातील एक एक व्यक्तिरेखा आता गुलदस्त्याबाहेर येऊ लागल्या आहेत. विश्वजित मोहिते पाटील या कार्यसम्राट आमदाराची व्यक्तिरेखा समोर आली असून चिन्मय मांडलेकर यांनी ही भूमिका साकारली आहे.  व्यक्तिरेखेची झलक पाहता विश्वजित अतिशय करारी, शिस्तप्रिय दिसत आहेत. घरात असलेला त्यांचा दबदबाही यातून अधोरेखित होत असून सनी आणि त्यांच्या नात्यात कटुता असल्याचे भासतेय. आता विश्वजित आणि सनीमध्ये नेमका कशावरून हा दुरावा आलाय, हे चित्रपट पाहिल्यावरच समजेल. चिन्मय यांचा फ्रेश आणि वेगळा लुक लक्ष वेधुन घेतोय, त्यामुळे उत्सुकता अजुन वाढली आहे. सुपरहिट चित्रपट झिम्माच्या टिमची ‘सनी’ ही पुढील भेट आहे.  क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित 'सनी' हा सिनेमा १८ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. इरावती कर्णिक लिखित या चित्रपटात ‘सनी’ची भूमिका ललित प्रभाकरने साकारली आहे. अक्षय विलास बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस व उर्फी काझमी हे सिनेमाचे निर्माते असून संतोष ख

अभिनेता आणि आता दिग्दर्शनाची भूमिका साकारणारे रितेश देशमुख यांनी त्याच्या आगामी चित्रपट ' वेड ' च्या पोस्टर चे अनावरण केले.

Image
२० वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे  आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः अभिनेता रितेश देशमुख करणार आहेत तसेच विशेष बाब म्हणजे  या चित्रपटा द्वारे अभिनेत्री जेनेलिया देशमुख या मराठी चित्रपटात पदार्पण करत आहेत . या पूर्वी जेनेलिया यांनी हिंदी ,तेलगू ,तमिळ ,कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल ५ भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे तसेच अभिनेत्री  जिया शंकर  या चित्रपटात भूमिका साकारत आहेत . आघाडीचे संगीतकार अजय अतुल यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहे . आज या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा मुंबई फिल्म कंपनी ने सोशल मीडियावर केली.

'सूर्या' चित्रपटातून मराठीला मिळणार नवा ॲक्शन हिरो.

Image
आज एकीकडे बॅाक्स ऑफिसवर दक्षिणात्य सिनेमांचा बोलबाला आहे, तर दुसरीकडे देश-विदेशांतील चित्रपट महोत्सवांमध्ये मराठीचा डंका वाजतोय. प्रेक्षकांनी हिंदी सिनेमांकडे पाठ फिरवली असली तरी दक्षिणात्य सिनेमांप्रमाणेच काही मराठी चित्रपटांनीही बॅाक्स ऑफिसवर धमाल केली आहे. आशयघन कथानकासाठी ओळखल्या जाणाऱ्या मराठी सिनेसृष्टीमध्ये आता नजर खिळवून ठेवणारे अॅक्शनपटही बनू लागले आहेत. अंगावर रोमांच आणणारे स्टंटस आता मराठी चित्रपटातही पहायला मिळणार आहेत. नावीन्याचा ध्यास घेऊन वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मराठी सिनेसृष्टीतही धडाकेबाज अॅक्शनपट येणार आहे. मराठमोळा 'सूर्या' अखेरच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यासाठी सज्ज झाला आहे. 'सूर्या' या आगामी मराठी चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच रिव्हील करण्यात आला आहे. राजेंद्र ठाकरे आणि आकाश गोयल प्रस्तुत एस. पी. मोशन पिक्चर्सचा 'सूर्या' हा अॅक्शनपॅक्ड चित्रपट २०२३ या नव्या वर्षातील पहिल्या आठवड्यात ६ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. हसनैन हैद्राबादवाला यांनी दिग्दर्शित केलेल्या '

इफ्फी महोत्सवात ‘शेर शिवराज’ चित्रपटाची बाजी.

Image
गोव्यात होऊ घातलेल्या ५३ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) २०२२ साठी चित्रपटांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली आहे. भारताच्या अधिकृत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) 'इंडियन पॅनोरमा' या विभागात फिचर फिल्म विभागात दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शेर शिवराज’ या मराठी चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. एकूण ३५४ भारतीय चित्रपटांपैकी निवडक अशा २५ फिचर फिल्म्स निवडण्यात आल्या आहेत. त्यात ‘शेर शिवराज’ चित्रपटाने बाजी मारली आहे. २० ते २८ नोव्हेंबर या काळात गोव्यात ‘इफ्फी’चे आयोजन होत आहे. या निवडीबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना या चित्रपटाचे निर्माते–अभिनेते चिन्मय मांडलेकर सांगतात की, ही निवड आमच्यासाठी खूप आश्वासक आहे. त्यातही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तो आहे याचा आनंद नक्कीच आहे. पण यापलीकडे हा केवळ चित्रपटाला मिळालेला बहुमान नाही तर छत्रपती शिवाजी महाराज यांची महती जगाला दाखवून देण्यासाठी ‘शिवराज अष्टक’ याचा जो यज्ञ दिग्पालने सुरु केला आहे त्याचा हा बहुमान आहे. ‘शिवराज अष्टक’ याच्या मध्यावर येऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर दिग्पालच्या चित्रपटाची घेतली गेलेली

घरापासून दूर असलेल्या प्रत्येकासाठी 'रात ही' दिवाळीच्या निमित्ताने 'सनी'तील गाणे प्रदर्शित

Image
असं म्हणतात, लांब गेल्यावरच जवळच आठवतं ! आणि हे अगदी बरोबर आहे. घरापासून दूर गेल्यावरच आपल्याला घराची, घरच्यांची किंमत कळते. घरापासून दूर असलेल्या प्रत्येकाच्या मनातील तळमळ असलेले 'सनी' चित्रपटातील 'रात ही' हे गाणं दिवाळीच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. कामानिमित्ताने, शिक्षणानिमित्ताने आपल्या कुटुंबापासून, मित्रमैत्रिणींपासून लांब असणाऱ्या प्रत्येकासाठी हे गाणं आहे. क्षितिज पटवर्धन यांचे भावस्पर्शी बोल असणाऱ्या या गाण्याला सौमील - सिद्धार्थ यांनी संगीतबद्ध केले आहे. तर या गाण्याला निखिल डिसुझा याचा आवाज लाभला आहे. इरावती कर्णिक लिखित 'सनी' या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले आहे.  घरापासून लांब गेलेल्या ललित प्रभाकराला म्हणजेच 'सनी'ला क्षणोक्षणी घरच्यांची, त्याच्या मित्रांची आठवण येत आहे. ज्या गोष्टी घरी असताना त्याला क्षुल्लक वाटत होत्या, त्याचे महत्व त्याला घरापासून लांब गेल्यावर उलगडत आहे. 'होमसिक' बनलेल्या 'सनी'चा एक भावनिक प्रवास यात दिसत आहे.  या गाण्याबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, '

२८ ऑक्टोबर पासून 'बेबी ऑन बोर्ड’ प्रेक्षकांच्या भेटीला.....

Image
 हल्ली प्रेग्नेंट ही फक्त होणारी आईच नसून होणारे बाबाही असतात. म्हणूनच तर म्हणतात ना ‘वी आर प्रेग्नेंट’. या नऊ महिन्यांचा आनंददायी प्रवास ते एकत्र करतात. मग तो व्यायाम असो, डाएट असो, डॅाक्टरची व्हिजीट असो किंवा मग डोहाळे जेवण असो. असाच गोड अनुभव पाहायला मिळणार आहे सागर केसरकर लिखित, दिग्दर्शित ‘बेबी अॅान बोर्ड’मध्ये. नुकताच या सीरिजचा ट्रेलर सोशल मीडियावर झळकला असून यात प्रतिक्षा मुणगेकर आणि अभिजीत आमकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  प्लॅनेट मराठी ओरिजनल्स, फिल्मी आऊल स्टुडिओज प्रस्तुत 'बेबी ऑन बोर्ड' या सीरिजमध्ये सिद्धार्थ आणि श्रुती यांच्या नात्याला फुटणारी नवी पालवी त्यांच्या आयुष्यात विविध बदल घडवताना दिसत असून प्रेग्नेंसीमध्ये श्रृतीला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, म्हणून सिद्धार्थची धडपड, काळजी यात दिसत आहे. तिचे डाएट सांभाळण्यापासून ते डॅाक्टरकडे चेकअपला जाताना दीड लिटर पाणी पिऊन जायचे, इतक्या छोट्या छोट्या गोष्टींकडे त्याचे लक्ष आहे आणि हे सगळे सांभाळताना या दोघांमध्ये होणारी लुटूपुटूची भांडणे सीरिजमध्ये अधिकच धमाल आणत आहेत. ही एक कौटुंबिक सीरिज असून ती प

उत्सवाच्या प्रवाहात घेऊन जाणारे 'गोदावरी' चित्रपटाचे गाणे "खळ खळ गोदा"

Image
'गोदावरी' चित्रपटातील 'खळ खळ गोदा' हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. नदी जशी सगळं काही पोटात सामावून वर्षानुवर्षे वाहतच राहते, तसच काहीस आयुष्याच होताना दिसतंय. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे परंपरागत चालत आलेला वारसा आणि त्यात गुंतणारे भावविश्व यांचं उत्तम वर्णन ह्या गाण्यातून होताना दिसते.  मन प्रसन्न करणारे 'खळ खळ गोदा' हे गाणे श्रोत्यांच्या हृदयाला स्पर्श करून आयुष्याच्या नागमोडी प्रवाहात वाहताना दिसून येत आहे. गाण्याचे बोल नदीला संबोधून असले तरीही मनुष्याच्या व्यक्तिगत जीवनातील घडामोडीचा उत्तम आरसा आहे. ऐन दिवाळीत घरबसल्या रसिकप्रेक्षकांना गोदावरीचे दर्शन घडवून, मनात नवचैतन्य निर्माण करणारे हे गाणे उत्सवासाठी परिपूर्ण आहे.  जगभरातील नामांकित राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात खळखळून वाहणाऱ्या गोदावरी या चित्रपटातील "खळ खळ गोदा" या गाण्याचे बोल जितेंद्र जोशी यांचे असून,  संगीत दिग्दर्शनाची धुरा एव्ही प्रफुल्लाचंद्रा यांनी सांभाळली आहे.   राहुल देशपांडे यांना या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गायक म्हणून पुरस्कारही मिळाला आहे. गाण्याबद्द

‘व्हिसल ब्लोईंग सूट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित......

Image
मानवी प्रजात नष्ट होण्याच्या मार्गावर तर नाहीय ना ?  जगाच्या अंताचा काउंटडाउन सुरू झालाय का ??  सृष्टीत अतिशय वेगाने अनाकलनीय बदल घडत आहेत. याचे पडसाद जगभर उमटत आहेत. या बदलांच्या मुळांपर्यंत जाऊन त्यांचे विश्लेषण करून उपाय सुचवण्याचा धाडसी प्रयत्न ‘व्हिसल ब्लोईंग सूट’ या चित्रपटात केला गेला आहे. जागतिक घडामोडींचा वेध प्रथमच, एका भारतीय चित्रपटात तोही आपल्या मराठी चित्रपटात घेतला जात आहे. भूत, वर्तमान आणि भविष्याचा समग्र धांदोळा घेत प्रभावी उपाय सुचवणारा मराठीतील हा पहिला विज्ञानपट असून  ‘व्हिसल ब्लोईंग सूट’  चित्रपट जागतिक चित्रपट महोत्सवात दमदार हजेरी लावण्यासाठी आता सज्ज झाला आहे.लेखक दिग्दर्शक ज्ञानेश्वर मर्गज यांच्या ‘आई श्री भगवतीदेवी प्रॉडक्शन’ या होम प्रोडक्शनची ही भव्य निर्मिती आहे. या चित्रपटाद्वारे त्यांनी धाडसी विषयाला हात घातला असून चित्रपट माध्यमात विलक्षण प्रयोग घडवून आणला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. हिंदी मालिका 'नोंकझोक' मधून बालकलाकार म्हणून काम करुन पुढे नाटक, मालिकांमध्ये अभिनयाचा ठसा उमटविणारी अभिनेत्री विशाखा कशा

... अखेर स्वप्न पूर्ण झाले - अशोक शिंदे

Image
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांनी, लढायांनी महाराष्ट्रालाच नव्हे तर अवघ्या जगभरातील लोकांना प्रेरित केले. यापैकीच एक महत्वाची घटना म्हणजे पावनखिंडीतील लढाई. या लढाईमुळे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत असलेल्या धैर्यवान अशा बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्यासह असणाऱ्या मावळ्यांची प्रचिती शत्रूला आली. या सगळ्यात बाजीप्रभूंना साथ लाभली ती एका अतिशय महत्वाच्या व्यक्तीची ती  म्हणजे फुलाजीप्रभू देशपांडे यांची. फुलाजी देशपांडे म्हणजे बाजीप्रभू देशपांडे यांचे थोरले बंधू. पावनखिंडीच्या लढाईत ते धारातीर्थी पडले. बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू यांच्या अनोख्या नात्याबद्दल अनेक जण अनभिज्ञ आहेत. हेच नाते आपल्याला झी स्टुडिओजच्या 'हर हर महादेव' या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात फुलाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका अशोक शिंदे यांनी साकारली आहे. तीन दशकांहून अधिक काळ सिनेसृष्टीवर विविध भूमिका साकारून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अशोक शिंदे यांचा हा १५१वा चित्रपट आहे. आजवर त्यांनी अनेक नायक आणि खलनायकाच्या भूमिका केल्या आहेत. परंतु ऐतिहासिक भूमिका साकारण्याची ही त्य

शमा निनावे यांचा 'शमा...साठी’ काव्यसंग्रह रसिकांच्या भेटीला.

Image
कलेच्या प्रांतात मुशाफिरी करत आपल्या अभिनयाचा यशस्वी ठसा उमटविणाऱ्या अभिनेत्री शमा निनावे आता काव्यसंग्रहाच्या माध्यमातून एक संवेदनशील कवयित्री म्हणून आपल्या भेटीला आल्या आहेत. नुकताच त्यांचा 'शमा...साठी’ हा मनमोहक काव्यसंग्रह रसिकांच्या भेटीला आला आहे. मनाच्या पटलावर उमटलेल्या विविध भावभावनांचे तरंग या काव्यसंग्रहातून शमा यांनी मांडले आहेत. शमा यांच्या आजवरच्या निवडक कवितांचे संकलन असलेले ‘शमा...साठी’ हे पुस्तक त्यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त प्रकाशित करून, त्यांचे पती शशांक निनावे यांनी त्यांना सरप्राईज दिलेय. या पुस्तकाचे प्रकाशन 'भिलार' या  महाबळेश्वर येथील ‘पुस्तकांच्या गावात’ तेथील कार्यकारी मंडळाच्या उपस्थितीत नुकतेच करण्यात आले. या कवितांच्या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे या सर्व कविता शमा निनावे यांचे पती विख्यात वास्तूविशारद श्री. शशांक निनावे यांनी स्व-हस्ताक्षरात लिहून, त्यावर अप्रतिम चित्रांकन केले आहे. त्यामुळे हे कवितांचे पुस्तक सर्वसाधारण न राहता वैशिष्ट्यपूर्ण झालेले आहे. प्रत्येकाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक आहे. या कविता साधारण

राजसाहेब ठाकरे यांच्याकडून ‘हरिओम’च्या कौतुकासह कलाकारांना दिले आशीर्वाद व शुभेच्छा.

Image
 दादर मुंबई येथे मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी मराठी चित्रपट ‘हरिओम’च्या चित्रपटातील कलाकारांनी राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली. राज साहेब ठाकरे ‘हरिओम’ चित्रपटाचे कौतुक करत म्हणाले, ‘’हरिओम चित्रपटासारखा ऐतिहासिक चित्रपट व निर्माते तयार होणे गरजेचे आहे. राजसाहेब ठाकरे यांच्या वतीने चित्रपटाच्या संपूर्ण टीमला आशीर्वाद व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. राजसाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद व शुभेच्छा मिळाल्यानंतर अभिनेता व निर्माता हरिओम घाडगे यांनी ‘हरिओम’ माझा प्रथम मराठी चित्रपट आहे व ‘हरिओम’ चित्रपट नवीन पिढीला प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी शिवतीर्थ येथे  मुख्य अभिनेता व निर्माता हरिओम घाडगे, दिग्दर्शक आशिष नेवालकर, मनोज येरूनकर व हरिओम चित्रपटातील कलाकार  तसेच मराठी चित्रपट निर्माते फैजल भाई पोपेरे हजर होते.

सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारा 'आली दिवाळी' म्युझिक व्हिडिओ.....

Image
  दिवाळी म्हणजे रोषणाई, अभ्यंगस्नान, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज, फटाक्यांची आतषबाजी आणि स्वादिष्ट फराळाची मेजवानी. दिवाळी म्हणजे संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाची लयलूट. दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी 'सप्तसुर म्युझिक'ने 'आली दिवाळी' हे गाणं लाँच केलं आहे.  साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष यांच्या सप्तसूर म्युझिकने आली दिवाळी गाण्याची निर्मिती केली आहे. शशांक कोंडविलकर यांनी गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन केलं आहे. युक्ता पाटील आणि सत्यम पाटील यांनी गाणं गायलं आहे. म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन नीरव म्हात्रे यांचं आहे. अस्मिता सुर्वे, भरत जाधव, प्राजक्ता ढेरे, प्रणय केणी, दिव्या पाटील, पंकज ठाकूर, रश्मिता तारे, सौरभ गर्गे, बीना राजाध्यक्ष, परिणिती ठाकूर, दिव्यांश म्हात्रे, सिया पाटील, हर्षवी ठाकूर, रुपांश पाटील म्युझिक व्हिडिओमध्ये झळकले आहेत.  दिवाळीच्या काळात घरोघरी असलेलं आनंद आणि उत्साहाचं वातावरण या म्युझिक व्हिडिओतून टिपण्यात आलं आहे. अतिशय उत्तम शब्द, श्रवणीय संगीत हे या गाण्याचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपलंसं वाटणारं हे गाणं दिवाळी

गावपळणीची अनोखी प्रथा आणि थरारक प्रेमकथा "प्रेम प्रथा धुमशान"

Image
सिंधुदूर्गातली गावपळणीची अनोखी प्रथा आणि त्या दरम्यानची थरारक प्रेमकथा आता मोठ्या पडद्यावर येत आहे. राष्ट्रीय पुरस्काप्राप्त अभिजीत मोहन  वारंग दिग्दर्शित "प्रेम प्रथा धुमशान" या चित्रपटातून गावपळणीची प्रथा पहिल्यांदाच दिसणार असून,  ४  नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार होणार आहे.  ऑक्सिजन फिल्म्स, डायनॅमिक पिक्चर्स, आरव्हीके फिल्म्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सत्या अय्यर हे चित्रपटाचे निर्माते, तर स्वरा अभिजीत वारंग, रचना विज, मोहित, नमन तलवार सहनिर्माते आहेत. अभिजीत मोहन वारंग यांच्या 'पिकासो' या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर एकच अभिनेता असलेला 'देजावू' हा अत्यंत प्रयोगशील चित्रपट त्यांनी केला. आता ते 'प्रेम प्रथा धुमशान' हा नवा चित्रपट घेऊन येत आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परबसह विनायक चव्हाण, अभय खडपकर, अभय नेवगी, मिलिंद गुरव, विश्वजित पालव, विद्याधर कार्लेकर, निकिता सावंत, कल्पना बांदेकर असे दमदार कलाकार या चित्रपटात आहेत. चेतन शिंदे यांनी छायांकन, आनंद लुंकड यांना संगीत दिग्द

इफ्फीसाठी निवडलेल्या 'पल्याड' चित्रपटाचा आजवर १४ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवात वाजला डंका.

Image
काही चित्रपट प्रदर्शनापूर्वीच मोठमोठी शिखरं सर करत इतिहास रचतात. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारांचे मानकरी ठरल्यानंतर रसिकांच्या सेवेत रुजू होतात. प्रदर्शनाच्या वाटेवर असणाऱ्या 'पल्याड' या आगामी मराठी चित्रपटानंही अशाच प्रकारे इतिहास रचत प्रेक्षकांच्या भेटीला येण्यापूर्वीची आपली नेत्रदीपक वाटचाल सुरू ठेवली आहे. जागतिक पातळीवरील आघाडीच्या फोर्ब्स मासिकानंही दखल घ्यावी इतका मोठा बहुमान पटकावत 'पल्याड'नं मराठी सिनेसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. नुकतीच 'पल्याड' चित्रपटाची गोव्यात होणाऱ्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियासाठी (इफ्फी) निवड करण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. याच सकारात्मक आणि जल्लोषमय वातावरणात 'पल्याड'चा दिमाखदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ट्रेलरचं प्रचंड कौतुक होत असून, प्रेक्षकांच्या मनात कुतूहल जागवणारा 'पल्याड'च्या ट्रेलरची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. ४ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या 'पल्याड'ची निर्

अनोख्या पद्धतीत 'वऱ्हाडी वाजंत्री'चे मुंबईतील सिटीलाईट चित्रपटगृहात संगीत आणि पहिली झलक प्रदर्शित....

Image
खरं तर दिवाळी झाल्यावर तुळशीच्या लग्नापासून संपूर्ण महाराष्ट्रभर विवाह सोहळ्यांची धूम सुरू होते, पण यंदा दिवाळीपूर्वीच 'वऱ्हाडी वाजंत्री'चा गाजावाजा होऊ लागला आहे. अभिनेते-दिग्दर्शक विजय पाटकर यांनी दिग्दर्शित केलेल्या 'वऱ्हाडी वाजंत्री' या आगामी मराठी चित्रपटाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. उत्सुकता वाढवणाऱ्या या चित्रपटातील गाणीही संगीतप्रेमींच्या मनाचा ठाव घेणारी आहेत. महाराष्ट्राचा लाडका अभिनेता मकरंद अनासपुरेसंगे चित्रपटातील इतर कलाकारांनी धरलेल्या 'वऱ्हाडी वाजंत्री'च्या ठेक्यावर महाराष्ट्रातील तमाम सिनेप्रेमींचे पाय थिरकणार आहेत. या चित्रपटाच्या म्युझिक लाँचसाठी अनोखी शक्कल लढवत संगीतकार अविनाश - विश्वजित, शशांक पोवार आणि लोकशाहीरी कला जोपासणारे, बाजीराव मस्तानी, तानाजी द अनसंग वारीअर अश्या अनेक चित्रपटांत पार्श्वगायन करणारे आणि मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख आणि वऱ्हाडी वाजंत्री हे टायटल सॉंग गायलेले हरहुन्नरी कलावंत डॉ. गणेश चंदनशिवे यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. 'वऱ्हाडी वाजंत्री' हे शीर्षक गीत वाद्य सुरावटीद्वारे प्रत्यक्ष

,'पुनीत बालन' सेलिब्रिटी लीग मधे मराठी कलाकारांवर लागली लाखांची बोली.....

Image
पुनीत बालन सेलिब्रिटी लीग (PBCL) या कलाकारांच्या क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या सीजनचा लीलाव १०० हून अधिक सेलिब्रिटिंच्या उपस्थितीत, मुंबई येथे ताज हॉटेलमध्ये संपन्न झाला. (PBCL) पिबिसीएलच्या अंतिम विजेत्यांना जो चषक दिला जाणार आहे, त्याचे अनावरण राज्याच्या गृहविभागाचे सहसचिव श्री. कैलास गायकवाड, सौ. जान्हवी धारीवाल बालन आणि महेश मांजरेकर, शरद केळकर, सिद्धार्थ जाधव, प्रवीण तरडे, सुबोध भावे आणि पुनीत बालन यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद सातव यांनी केले. प्रास्ताविक पीबीसीएलचे प्रवर्तक पुनीत बालन यांनी केले आणि राहुल क्षीरसागर यांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हा लिलाव पार पाडला. ११ ते १५ जानेवारी २०२३ या कालावधीत ही स्पर्धा पुण्यात होणार आहे. या स्पर्धेत ६ संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक संघामध्ये १६ नामवंत कलाकारांचा सहभाग असेल. यामध्ये तोरणा लायन्स या संघाचं नेतृत्व पुनीत बालन, रायगड पँथर्स या संघाचे नेतृत्व प्रवीण तरडे, शिवनेरी रॉयल्स या संघाचे नेतृत्व सुबोध भावे, सिंहगड स्ट्रायकर्स या संघाचे नेतृत्व सिद्धार्थ जाधव, प्रतापगड टायगर्स या संघाचे नेतृत्व

'बेबी ऑन बोर्ड' प्लॅनेट मराठीवर नवीन सिरिज.....

Image
प्लॅनेट मराठी ओरिजनल्स, फिल्मी आऊल स्टुडिओज प्रस्तुत 'बेबी ऑन बोर्ड' या सिरीजचे पहिले पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. विवाहित जोडप्याच्या आयुष्यात लग्नानंतर येणारा आणखी एक अविस्मरणीय क्षण म्हणजे त्यांना होणारे पहिले बाळ. आनंद, भीती, उत्सुकता अशा अनेक भावना यावेळी एकत्र मनात येत असतात. मग सुरु होतो तो नऊ महिन्यांचा नवा प्रवास. याच सुंदर प्रवासाची कहाणी आपल्याला या सिरीजमध्ये पाहायला मिळणार आहे. 'बेबी ऑन बोर्ड'  लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीच्या माध्यमाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.    प्रतिक्षा मुणगेकर, अभिजीत आमकर यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या या सिरीजचे लेखन व दिग्दर्शन सागर केसरकर यांचे असून साईनाथ राजाध्यक्ष व बिना राजाध्यक्ष या सीरिजचे निर्माते आहेत. तर अंकित शिंदे व दिव्या घाग हे कार्यकारी निर्माते आहेत. 'बेबी ऑन बोर्ड' या शीर्षकावरून आणि पोस्टरवरूनच यात काय धमाल आणि मनोरंजनात्मक किस्से असतील, याचा अंदाज येतोय. 'बेबी ऑन बोर्ड'च्या माध्यमातून प्लॅनेट मराठी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नाविन्यपूर्ण सिरीज घेऊन आले आहे.  प्

तमाशा मधील लावणी नाचणाऱ्या मुलीच्या प्रेमाची व्यथा मांडणारा 'लल्लाट'.

Image
   मागील काही दिवसात रोहित राव नरसिंगे लिखित आणि दिग्दर्शित यांचा स्टोरी ऑफ लागीर चित्रपट मराठी टेलिव्हिजन वर प्रदर्शित झाला.या चित्रपटास महाराष्ट्रातील प्रेक्षक वर्गाने भरभरून प्रेम दिले.या नंतर लगेच रोहित राव नरसिंगे यांनी त्यांचा दुसरा चित्रपट ' लल्लाट ' या चित्रपटाची घोषणा केली आहे त्यामुळे प्रेक्षक वर्गाला सध्या लल्लाट हा कुतूहलाचा विषय ठरला आहे.महाराष्ट्रामधील सर्व प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढलेली दिसत आहे.हा चित्रपट मॅक फिल्मस प्रोडक्शन आणि एम आर जोकर एन्टरटेन्मेंट या चित्रपट निर्मिती संस्थे अंतर्गत होणार आहे अशी माहिती सध्या सोशल मीडिया वर मिळत आहे.या चित्रपटाचे निर्माते महादेव अशोक चाकणकर असून लल्लाट हा चित्रपट हा त्यांचा पहिला निर्मिती करत असलेला चित्रपट आहे.       रोहित राव नरसिंगे यांच्या संकल्पने मधील स्टोरी ऑफ लागीर या चित्रपटास प्रेक्षक वर्ग आणि रसिक वर्गाने भरभरून प्रेम दिले.त्यामुळे आगामी चित्रपट लल्लाट यात नेमक काय बघायला मिळणार ? याबाबत सगळ्यांचा कुतुहुल आहे. नुकतीच लल्लाट या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.      "लल्लाट" असे  या चित्रप

'मन कस्तुरी रे' चित्रपटाचा पहिली झलक प्रदर्शित....

Image
एका रॅाक कॅान्सर्टद्वारे ‘नाद’ गाण्याचे  जोरदार लाँचिंग झाले. सोशल मीडियावर या गाण्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकताच ‘मन कस्तुरी रे’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला. या वेळी अभिनय बेर्डे आणि तेजस्वी प्रकाश यांनी स्कुटीवरून धमाकेदार एन्ट्री केली. या सोहळ्याला अभिनय आणि तेजस्वीसह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.  सर्वसामान्य घरातून आलेल्या प्रत्येक मुलाची काही स्वप्ने असतात. स्वतःचे घर, एक चांगली नोकरी, आईच् चेहऱ्यावरील हास्य. असंच स्वप्न घेऊन जगणाऱ्या सिद्धांतचं त्याच्या आईवर जीवापाड प्रेम आहे. कॅालेजमध्ये शिक्षण घेत, घरखर्चासाठी नोकरी करून सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या सिद्धांतच्या आयुष्यात श्रुती येते आणि त्याचे पूर्ण आयुष्यच बदलते. श्रुती आणि सिद्धांत एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात. मग असे काय होते की, ज्यामुळे त्या दोघांच्या प्रेमाला नजर लागते. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये भरपूर सस्पेन्स आणि ट्विस्ट पाहायला मिळत असून एकमेकांसाठीचा द्वेष, सूड भावनाही यात दिसत आहे.  त्यांचे प्रेम एवढ्या टोकाला का पोहो

मनोरंजन क्षेत्रात ‌अग्रेसर असणा-या त्या तिघींनी धरली "निर्मिती" ची वाट.....

Image
२२ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ६ वाजता दीनानाथ नाट्यगृह, पार्ले येथे सादर होणाऱ्या "स्वरांगण" दिवाळी पहाट ह्या एक सुरेल दीपोत्सवाच्या माध्यमातून जयंती वाघधरे, पूजा भंडारे आणि अश्विनी कांबळे या तीन मुलींनी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. *गेली कित्येक वर्ष पत्रकारिता, anchoring ,मार्केटिंगचा तगडा अनुभव असलेली "जयंती वाघधरे "... तर थिएटर, आर.जे, संगीत, आणि नृत्य कलेचा चिकित्सक अभ्यास असलेली "पूजा भंडारे "... व पत्रकारिता,पी.आर, मार्केटिंग चा अनुभव घेऊन निर्मिती संस्थेत निर्मिती आणि व्यवस्थापनाचा अनुभव घेऊन "अश्विनी कांबळे " ...* या तीन मैत्रिणींनी नव निर्मितीचे स्वप्न रंगवण्यात सुरुवात केली. मुली ह्या कोणत्याच क्षेत्रात मागे पडू शकत नाही हा विश्वास बाळगत त्यांनी "झेन एंटरटेनमेंट" ची स्थापना केली.  मनोरंजन क्षेत्रात बरीच लोक कलाकार, लेखक, दिग्दर्शक म्हणून कामाची सुरुवात करत स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतात. मालिका चित्रपट नाटक यांमार्फत बरेच कलाकार लेखक, दिग्दर्शक जन्माला येतात. या सगळ्यांवर प्रकाश ज्योत टाकणारी महत्वाची भू

'बॉईज ३'ने साजरी केली सक्सेस पार्टी,सोबतच केली ‘बॅाईज ४’ची घोषणा .

Image
विशाल देवरुखकर दिग्दर्शित 'बॉईज', 'बॉईज २' ला जसा प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, तसेच प्रेम प्रेक्षकांनी 'बॉईज ३'लाही दिले. 'बॉईज ३' मधील ढुंग्या, धैर्या आणि कबीरची धमाल यात  तिप्पट पटीने वाढली. यात त्यांना साथ दिली ती कीर्तीने. बॉक्स ऑफिसवर करोडोंचा गल्ला जमावणाऱ्या 'बॉईज ३'ने अक्षरशः धुमाकूळ घातला. सर्वत्र 'हाऊसफुल'चा बोर्ड मिरवणाऱ्या या चित्रपटाचे मॉर्निंग शोजही फुल्ल होते. काही ठिकाणी तर या चित्रपटाचे शोजही वाढवण्यात आले. इतके यश मिळवल्यानंतर या चित्रपटाच्या टीमने नुकतीच सक्सेस पार्टी साजरी केली. या वेळी चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत सिनेसृष्टीतील काही कलाकार मंडळी, मित्रपरिवार, मीडियाचा या पार्टीत सहभाग होता.  चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल दिग्दर्शक विशाल देवरुखकर म्हणतात, '' याचे श्रेय 'बॉईज ३'च्या संपूर्ण टीमला जाते. कारण पडद्यावर दिसणाऱ्या आणि पडद्यामागे धावपळ करणाऱ्या प्रत्येकाची ही मेहनत आहे. या यशात प्रेक्षकांचाही सहभाग मोठा आहे. कारण त्यांच्या प्रेमामुळेच आम्ही हा पल्ला गाठू शकलो. 'बॉईज&