'रौंदळ' चित्रपटातील 'भलरी...' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला.
'ख्वाडा' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसलेला अभिनेता भाऊसाहेब शिंदे 'रौंदळ' या आगामी मराठी-हिंदी चित्रपटामुळे पुन्हा लाइमलाईटमध्ये आला आहे. 'बबन' या गाजलेल्या चित्रपटानंतर 'रौंदळ'मध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांना भाऊसाहेबचा एक नवा अवतार पहायला मिळणार आहे. फर्स्ट लुक, टिझर आणि 'मन बहरलं...' या गाण्यानंतर सर्वत्र सध्या 'रौंदळ'ची चर्चा सुरू आहे. त्यात भर टाकण्यासाठी या चित्रपटातील आणखी एक नवं कोरं गाणं दणक्यात आलंय. सुगीच्या हंगामात पीक काढणीच्या वेळी समूहाने गायला जाणारा गीतप्रकार म्हणजेच "भलरी ", हे अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे. भलरीला आपल्या साहित्यात 'श्रमगीत' म्हणूनही विशेष दर्जा आहे . हा लोप पावत चाललेला गीतप्रकार 'रौंदळ' सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात आला आहे. ३ मार्च २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या 'रौंदळ'ची निर्मिती भूमिका फिल्म्स अॅण्ड एंटरटेनमेंट या संस्थेअंतर्गत बाळासाहेब शिंदे, डॉ. पुरुषोत्तम भापकर, प्रमोद चौधरी, भाऊ शिंदे