Posts

Showing posts from August, 2023

‘बापल्योक’ ची टीम बाप्पाच्या दर्शनाला.

Image
मायेचा हात डोक्यावर ठेवणारा, कुटुंबाला आधार देणारा ‘बाप’ सोबत असला तरी ज्याच्या आशिर्वादाची आपल्याला सदैव गरज असते, तो म्हणजे आपला लाडका गणपती 'बाप्पा'. लवकरच गणपती 'बाप्पा'चं आगमन होणार आहे पण त्याआधी १ सप्टेंबरला रसिक दरबारात दाखल होणाऱ्या ‘बापल्योक’ चित्रपटाला गणपती बाप्पाचा कृपाआशिर्वाद मिळावा म्हणून चित्रपटाची संपूर्ण टीम पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी दाखल झाली होती. अभिनेते शशांक शेंडे, विठ्ठल काळे, अभिनेत्री पायल जाधव, नीता शेंडे याप्रसंगी उपस्थित होते. 'बापल्योक’ या चित्रपटाचे नागराज मंजुळे प्रस्तुतकर्ते आहेत. ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’चे विजय शिंदे आणि बहुरूपी प्रोडक्शन्स’च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शन मकरंद माने यांचे आहे.  कितीही केलं तरी बापाचं प्रेम हे नेहमी दुर्लक्षितच राहतं. त्याच्या असण्याने घराला घरपण असतं. आपल्या कडक शब्दांनी मुलांना ओरडणारा बाप त्यांच्यासाठीच दिवसभर खस्ता खात असतो. बापाची ‘माया’ आपल्या कवितेतून व्यक्त करताना 'बापल्योक’ चित्रपटातील अभिनेते शश

'सुभेदार' पहिल्याच वीकेंडला ५ कोटींहून अधिकची विक्रमी कमाई..

Image
हिंदवी स्वराज्यातील सुवर्णपान उलगडत सुभेदार तान्हाजी मालुसरेंचा कोंढाण्यावरील पराक्रम सादर करणाऱ्या 'सुभेदार' चित्रपटाने सिनेरसिकांच्या मनावर गारूड केलं आहे. लेखक-दिग्दर्शक-अभिनेते दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टकातील 'सुभेदार' रूपी पाचवे चित्रपुष्प २५ ऑगस्टला रसिक दरबारी सादर केले आणि ३५० चित्रपटगृहांतील १००० हून अधिक शोजमधून प्रेक्षकांनीही विक्रमी प्रतिसाद दिल्याने शेकडो चित्रपटगृहांवर हाऊसफुल्लचे बोर्ड झळकल्याचे पहायला मिळातायेत. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशातही 'सुभेदार' चित्रपटाची जोरदार घोडदौड सुरु आहे. पहिल्याच वीकेंडला चित्रपटाने ५ करोडहून अधिकची विक्रमी कमाई केली आहे. या जबरदस्त यशानंतर पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यातही 'सुभेदार' चित्रपटाची बॅाक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच राहील, असा अंदाज वर्तवला जातोय.     चित्रपटातील गाण्यांना रसिकांचा जोरदार प्रतिसाद लाभत आहे. 'आले मराठे' या गाण्यावर सिनेमागृहांमध्येच रसिक बेधुंद होऊन भगवे झेंडे घेऊन नाचत आहेत. मुखानं 'जय भवानी, जय शिवाजी'चा जयघोष करत प्रेक्षकांचे

'बापल्योक' १ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला....

Image
     बाप म्हणजे धाक..  बाप म्हणजे कडक शिस्त..  बाप म्हणजे संपूर्ण कुटुंबाचा रक्षणकर्ता! पण.. आहे तर तो ही माणूसच ना.. लहानपणापासून आपणच वडिलांबद्दल घालून दिलेली ही भीती पुढे वडील-मुलाच्या नात्यात असा काही अवघडलेपणा निर्माण करते की त्यांच्या मनातलं आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्नच करत नाही. अशाच एका मुलाची आणि त्याच्या वडिलांची गमतीशीर गोष्ट सांगणारा चित्रपट म्हणजे 'बापल्योक'.  नातं’ या एका शब्दात व्यक्तीच्या जन्मापासून ते मरेपर्यंतच्या प्रवासाचं गुपित दडलंय. माणसाच्या आयुष्यात कित्येकदा नात्याला वळण देणाऱ्या घटना घडतात, या घटनांमधून नात्यांचा तोल सावरलाही जातो; पण खरा गोंधळ उडतो मनं सांभाळताना, त्यावेळी नातं जास्त न ताणता हुडकायचा प्रयत्न करायचा. अशाने नात्याची प्रत्येक नाजूक गाठ विश्‍वासानं आणि प्रेमानं आपोआप पक्की होईल. हेच सांगू पाहणारा दिग्दर्शक मकरंद माने यांचा ‘बापल्योक’ हा चित्रपट १ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.  ‘बापल्योक’ या चित्रपटाचे नागराज मंजुळे प्रस्तुतकर्ते आहेत. ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’चे विजय शिंदे आणि बहुरूपी प्रोडक्शन्स’च्या शशांक शेंडे आ

यासाठी पाहावा 'सुभेदार... गड आला पण...'

Image
शिवकालीन इतिहासातील अजरामर योद्धा असलेल्या सुभेदार तानाजीराव मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा 'सुभेदार... गड आला पण...' हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने लेखक-दिग्दर्शक-अभिनेता दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा रसिकांना शिवकालीन इतिहासात नेण्याचं शिवधनुष्य यशस्वीपणे पेललं आहे. चहूबाजूंनी या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत असून, प्रेक्षकही प्रचंड उत्साहात 'जय भवानी, जय शिवाजी'च्या घोषणा देत 'सुभेदार... गड आला पण...' पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. 'सुभेदार' हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यदलातील शूरवीर योद्धे सुभेदार तान्हाजीराव मालुसरे यांच्या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यांवर प्रकाशझोत टाकणारा आहे. या चित्रपटाचा विषय केवळ किल्ले कोंढाण्यापुरता मर्यादित नसून, सुभेदार मालुसरेंच्या भावनिक रूपाचं यथार्थ दर्शन घडवणारा आहे. सुभेदारांचे छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आऊसाहेब, पत्नी, मुलगा, भाऊ, मामा यांच्याशी असलेलं नातं अधोरेखित करणारा आहे. त्या संदर्भातील अत्यंत भावनिक करणारे प्रसंग

अभिनेता 'कार्तिकेय मालवीया'चे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण,

Image
हिंदी मालिका विश्वातील नावाजलेला अभिनेता कार्तिकेय मालवीया त्याच्या विविध ऐतिहासिक व्यक्तिरेखांमुळे प्रसिद्ध आहे. चंद्रगुप्त मौर्य, कर्मफलदाता शनी, राधा कृष्णा या मालिकांनंतर आता तो 'रागिनी' या मराठी म्युझिक अल्बमद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. सचिन कांबळे दिग्दर्शित 'रागिनी' या गाण्यासाठी अभिनेत्री सई कांबळे आणि अभिनेता कार्तिकेय मालवीया हे ७ वर्षांनी एकत्र काम करत आहेत. हे दोघेही ७ वर्षांपूर्वी इंडियाज बेस्ट ड्रामेबाज या रिॲलिटी शो मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते.  अभिनेता कार्तिकेय मालवीया त्याच्या पहिल्या वहिल्या म्युझिक अल्बमविषयी सांगतो, "हा माझा पहिलाच म्युझिक अल्बम आहे आणि त्यात मराठी भाषेत आहे. त्यामुळे मी खूप उत्सुक आहे. कारण मला मराठी बोलता येत नाही. पण थोडेफार शब्द कळतात. मी सेटवर शुटींग करताना मराठी गाणं गुणगुणत होतो पण कधीकधी शब्द चुकत होते. त्यामुळे सेटवर सगळे हसत होते. परंतु आम्ही सगळ्यांनी सेटवर खूप धम्माल मस्ती केली. सचिन सरांनी मला हे गाणं करण्याची संधी दिली. त्यासाठी त्यांचे मनापासून आभार!" अभिनेत्री सई कांबळे चित्रीकरणाचा क

अभिनेते जॉनी लिव्हर, अभिनेते अली असगर आणि अभिनेते कृष्णा अभिषेक यांच्या हस्ते 'अंकुश' चित्रपटाचे म्युझिक आणि टीझर लाँच....

Image
           दमदार स्टारकास्ट, अॅक्शन, रोमान्स आणि मनोरंजनाचा पुरेपूर मसाला असलेल्या ओमकार फिल्म्स क्रिएशन्सच्या राजाभाऊ आप्पाराव घुले यांची पहिलीच निर्मिती असलेल्या "अंकुश" या चित्रपटाचा टीझर आणि म्युझिक लाँच नुकतंच मोठ्या दिमाखात संपन्न झाला. अभिनेते जॉनी लिव्हर, अभिनेते अली असगर आणि अभिनेते कृष्णा अभिषेक यांच्या हस्ते चित्रपटाच म्युझिक आणि टीझर लाँच मोठ्या दिमाखात संपन्न झाला. या चित्रपटाविषयी चित्रपटसृष्टीत प्रचंड उत्सुकता असून येत्या ६ ऑक्टोबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.  ओमकार फिल्म्स क्रिएशन्सच्या माध्यमातून राजाभाऊ आप्पाराव घुले 'अंकुश' या चित्रपटाद्वारे चित्रपट निर्मितीमध्ये धडाकेबाज पदार्पण करत आहेत.सुप्रसिद्ध व्यावसयिक असलेल्या आणि आता चित्रपट निर्मितीत पदार्पण केलेल्या निर्माते राजाभाऊ यांचा हा पहिलाच चित्रपट असला तरी वेळात वेळ काढून चित्रपटाची पटकथा, संवाद, संगीत तसेच चित्रपटाचे चित्रीकरण ह्यगोष्टींमध्ये अगदी बारकाईने लक्ष देऊन, स्वतःला झोकून देऊन त्यांनी काम केले आहे. चित्रपटाची कथा नामदेव मुरकुटे यांची असून दिग्दर

१ सप्टेंबरला उलगडणार 'डायरी ऑफ विनायक पंडित'चे गुपित.

Image
'डायरी ऑफ विनायक पंडित' या वेबफिल्मचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. काही गोष्टी आपली पाठ कधीच सोडत नाहीत. संपवण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही संपत नाहीत. अशाच काही गोष्टी सोबत घेऊन निघालेल्या कलाकाराचा जीवनप्रवास 'डायरी ऑफ विनायक पंडित'मधून उलगडणार आहे. चित्रबोली क्रिएशन्स निर्मित, वन कॉम प्रॉडक्शन सहनिर्मिती आणि अक्षय विलास बर्दापूरकर सादर करत असलेल्या 'डायरी ऑफ विनायक पंडित' या वेबफिल्मचा ट्रेलर सोशल मीडियावर नुकताच प्रदर्शित झाला असून मयूर शाम करंबळीकर दिग्दर्शित या वेबफिल्ममध्ये अविनाश खेडेकर, सुहास शिरसाट, पायल जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  वेबफिल्मच्या नावावरून एका डायरीत काहीतरी रहस्य दडलेले दिसत आहे तर ट्रेलरमध्ये लळा लावणं यासारखं दुसरं कोणतच मोठ व्यसन नाहीये. माणसाला स्वतःलाही कधी कळत नाही, की आपल्याला याचा कधी लळा लागतो. अशी काही वाक्य आहेत, त्यामुळे याचा एकमेकांशी काय संबंध आहे, हे गुपित 'डायरी ऑफ विनायक पंडित' पाहिल्यावरच कळेल. मयूर शाम करंबळीकर यांची कथा, पटकथा आणि संवाद असलेल्या या वेबफिल्मचे आदित्य विकासराव दे

‘तिरसाट’ चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर ‘अल्ट्रा झकास’ ओटीटीवर.

Image
       ‘तिरसाट’ हा प्रेमाचा नवा हळवा प्रवास आहे, ज्या प्रवासात प्रेक्षकरूपी प्रत्येक प्रवासी ‘४ सप्टेंबर २०२३’ रोजी ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर भावनिक पदयात्रा करणार आहे. तिरसाटच्या निमित्ताने सुरु झालेला प्रेम मिळवण्यासाठीचा हा प्रवास दिग्दर्शक प्रदीप टोणगे आणि मंगेश शेंडगे यांनी या चित्रपटात मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला असून ‘नीरज सूर्यकांत’ आणि ‘तेजस्विनी शिर्के’ ही नवी जोडी या चित्रपटातून पदार्पण करत आहे. या चित्रपटामधील पी. शंकरन यांनी संगीतबद्ध केलेली गाणी आणि पार्श्वसंगीत या चित्रपटाचा जीव असून हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार आहे. दिनेश किरवे यांच्या ‘क्लास वन फिल्म्स’ने ‘तिरसाट’ या चित्रपटाची निर्मिती केली असून अल्ट्रा मिडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडचे ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर पहिल्यांदाच वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे.        बाळ्याचं खरं प्रेम समीने नाकारल्यानंतर, ‘समीशिवाय आपले जीवन नाही’ असे वाटल्याने बाळू आपले जीवन संपवण्याचे पाऊल उचलतो परंतु बाळूचे वडील हे कृत्य थांबवण्यासाठी धावतात आणि त्याला जीवन आणि प्रेमाचे सार समजावून सांगतात.

उपेंद्र लिमये यांच्या ‘रोप’ चित्रपटाचा दगडूशेठ गणपती मंदिरात भव्य मुहूर्त सोहळा संपन्न...

Image
      पुण्यातील पूज्य दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित एका शानदार सोहळयात एस. एस. क्रिएशन्सच्या ‘रोप’ या आगामी चित्रपटाचा शुभमुहूर्त अभिनेते उपेंद्र लिमये यांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वीरित्या पार पाडला. यावेळी उपेंद्र लिमये यांनी ‘रोप’च्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.      या सोहळयाला अभिनेते उपेंद्र लिमये, निर्माते साईनागराज आणि सौ. श्रुजना, दिग्दर्शक सूर्या, श्रुती शेट्टी, कपिल गुडसूरकर, श्री ऋषभ मोरे, बालकलाकार धृती इ. कलाकार मंडळी, तसेच कार्यकारी निर्माते कपिल जोंधळे, प्रॉडक्शन डिझायनर नेरंगलवार राज गौड, प्रोडक्शन मॅनेजर बाबासाहेब पाटील, कथालेखक बी. सुदर्शन, संवादलेखक संजय नवगिरे, संगीत दिग्दर्शक राजवीर गांगजी, कलादिग्दर्शक प्रकाश शिनगारे, धनंजय साबळे, सहदिग्दर्शक आशिष पवार, महेंद्र गाजभरे, कॉस्च्युम डिझायनर अर्चना बुक्कावार, गीतकार मंदार चोळकर, पब्लिसिटी डिझायनर जय कुंभारे, आणि चित्रपटक्षेत्रातील इतर नामवंत मंडळी उपस्थित होती.       निर्माते नागराज आणि सौ. सृजना, धृती यांनी चित्रपटाबाबत उत्साह व्यक्त करताना एक चांगली कलाकृती रसिक दरबारी सादर करण्याचा त्यांचा मानस अ

'दिल दोस्ती दिवानगी' रुपेरी पडद्यावर...

Image
मैत्री म्हणजे काय, तर कुणासाठी प्रेम, तर कुणासाठी आधार देणारी यारी तर कुणासाठी निव्वळ दुनियादारी….!! मात्र ही यारी मर्यादेपलीकडे जाते तेव्हा ‘दिल दोस्ती आणि दिवानगी’ यातील रेषा पुसट होते आणि मग त्यातून प्रेमाला आणि मैत्रीला वेगळी कलाटणी मिळते. मैत्री आणि प्रेमातील हीच ‘दिल दोस्ती दिवानगी’ चित्रपट रूपाने आपल्या समोर ६ ऑक्टोबरला येतेय. ट्रान्स इंडिया मिडिया अँड एन्टरटेनमेन्टची प्रस्तुती असलेल्या ‘दिल दोस्ती दिवानगी’ या मराठी चित्रपटाची निर्मिती राजेंद्र राजन यांची असून शिरीष राणे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.  नुकतेच या चित्रपटाचे आकर्षक पोस्टर आपल्या भेटीला आले आहे. कश्यप परुळेकर, वीणा जगताप, चिराग पाटील, स्मिता गोंदकर, अतुल कवठळकर, तीर्था मुरबाडकर, तपन आचार्य, दुर्वा साळोखे, कंवलप्रीत सिंग या नव्या दमाच्या तरुण कलाकारांची फळी यात पहायला मिळतेय. सोबत प्रदीप वेलणकर, विजय पाटकर, स्मिता जयकर, विद्याधर जोशी, सुरेखा कुडची यांसारख्या अनुभवी आणि मात्तब्बर कलाकारांची साथ त्यांना मिळाली आहे.  'दिल दोस्ती दिवानगी’ चित्रपटाचे छायांकन धनंजय कुलकर्णी तर संकलन अमोल खानविलकर या

श्रद्धा आणि आत्मविश्वासाची अनोखी कहाणी.. 'गेला उडत'; २५ ऑगस्टला होणार महाराष्ट्रभर प्रदर्शित!

Image
       आपण हवेत उडू शकतो असं जर कुणी म्हटलं तर? आपला साहजिकच त्याच्यावर विश्वास बसणार नाही! किंवा मग आपण विचारू की विमानातून की रॉकेटमधून? पण या कोणत्याही साधना शिवाय आपण हवेत उडू शकतो असं कुणी म्हटलं तर? जसे हनुमंत रामायणात सीतामाईच्या शोधासाठी उडत गेले होते तसंच? असं घडलं तर नेमकं काय होईल हेच दाखवण्यासाठी एका आगळ्या-वेगळ्या कथनकासह एक नवीन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी येतोय... 'गेला उडत'! एका मध्यमवर्गीय व्यक्तीभोवती हे कथानक गुंफलेलं आहे.  गरिबीचे चटके, कुटुंबातल्या जबाबदाऱ्या, आपल्याच कुटुंबीयांच्या वाढत्या मागण्या, त्या पूर्ण करण्यात सातत्याने येणारं अपयश यामुळे चित्रपटातल्या मुख्य पात्राचं आयुष्य ग्रस्त असतं. पण भगवान हनुमान अर्थात त्याच्या हनुमंतावर त्याची प्रचंड श्रद्धा असते. या श्रद्धेतून एक दिवस तो अचानक म्हणतो मी उडू शकतो! आधी त्याच्यावर साहजिकच विश्वास न ठेवणारी माणसं हळूहळू त्याच्यावर विश्वास ठेवायला लागतात खरे. पण त्याला उडताना मात्र कुणीच पाहिलेलं नाही. शेवटी एकतर आम्हाला हवेत उडून दाखव, नाहीतर परिणामांना तयार राहा असा इशाराच जेव्हा त्याला आ

"तूच मोरया" च्या निमित्ताने अभिनेता विशाल फाले आणि कोकणहार्टेड गर्ल अंकिता आणि एकत्र..

Image
      देवाचं अस्तित्व हे चराचरात आहे, तो कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आपल्या सोबत असतोच, बऱ्याच वेळेस संकटांची मालिका आपल्याला सतावत असते, अशा वेळेस आपले विचार नकारात्मक पारड्यात जास्त झुकतात, पण प्रत्येक वेळेस एक नैसर्गिक शक्ती आपल्या सोबत असते जी या ना त्या स्वरूपात आपल्यासोबत उभी राहते, ती शक्ती म्हणजे आपण मानलेला “तूच मोरया”       दादर अभिमान गीताच्या अभूतपूर्व यशानंतर प्रणिल आर्ट्स या निर्मिती संस्थेचा दूसरा म्युझिक व्हिडीओ  "तूच मोरया" हा नुकताच सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला. विशालचे हे ४० वे गाणं आहे तर आपल्या सर्वांची लाडकी कोकणहार्टेड गर्ल अर्थातच अंकिता वालावलकरचा हा पहिला-वहिला म्युझिक व्हिडिओ आहे. अंकिता आणि अभिनेता विशाल फाले ही नवी जोडी या गाण्याच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.            एका गावातील गरीब मराठी जोडप्याला बाप्पाचा अनोख्या पद्धतीने साक्षात्कार होतो आणि काबाडकष्ट करत असताना निराशेतून आशेचा किरण देऊन जातो. अशी या गीताची संकल्पना असल्याचे प्रणिल आर्ट्सचे निर्माते, दिग्दर्शक प्रणिल हातिसकर ह्यांनी सांगितले. प्रणिल आर्ट्स ह्य

नात्यातील लळा दर्शवणार ‘चाहूल’...

Image
एका कलाकाराची जीवनगाथा सांगणाऱ्या ‘डायरी ॲाफ विनायक पंडित’ या वेबफिल्ममधील ‘चाहूल’ हे सुरेल गाणे प्रदर्शित झाले असून नव्या नात्याचे पाऊल टाकणाऱ्या या गाण्याला अभय जोधपूरकर यांचा हृदयस्पर्शी आवाज लाभला आहे. तर निरंजन पेडगावकर यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला मयूर करंबळीकर यांचे बोल लाभले आहेत. हळुवार फुलत जाणाऱ्या नवीन नात्याचं खूप सुंदर वर्णन या गाण्यातून केलं आहे.  चित्रबोली क्रिएशन्स निर्मित, वन कॅम प्रोडक्शन सहनिर्मित या वेबफिल्मचे दिग्दर्शन मयूर शाम करंबळीकर यांनी केले असून अक्षय विलास बर्दापूरकर ‘डायरी ॲाफ विनायक पंडित’चे सादरकर्ते आहेत. तर आदित्य विकासराव देशमुख, वेदांत विवेक मुगळीकर हे निर्माते आहेत.       गाण्याबद्दल दिग्दर्शक मयूर शाम करंबळीकर म्हणतात, ‘’ हे गाणे थेट मनाला भिडणारे आहे. अतिशय अर्थपूर्ण असे हे गाणे नवीन नात्यातील बंध दर्शवत आहे. हे तरल गीत संगीत प्रेमींना नक्कीच आवडेल.’’

२५ ऑगस्टला ‘सुभेदार’ चित्रपटगृहांत.

Image
महाराष्ट्राच्या शिवकालीन इतिहासातील प्रत्येक पान मराठयांच्या अतुलनीय शौर्याने भरलेलं आहे. सुभेदार तान्हाजी मालुसरेंचा कोंढाण्यावरील पराक्रम, ही अशीच एक अद्वितीय सुवर्णगाथा २५ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या ‘सुभेदार’ या मराठी  चित्रपटातून आपल्यासमोर उलगडणार आहे. सुभेदारांची अभंग स्वामीनिष्ठा, दुर्दम्य आत्मविश्वास आणि त्याला तळपणाऱ्या तलवारीची साथ या सगळ्यांचं दर्शन आपल्याला या चित्रपटातून होणार आहे. लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी याआधीच्या ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या चित्रपटांच्या जबरदस्त यशातून त्यांची  या विषयावरची आपली कमालीची पकड सिद्ध केली आहे. ‘सुभेदार’ चित्रपटाच्या टिझर, ट्रेलर, गाण्यांमधून प्रेक्षकांची उत्सुकता याआधीच शिगेला पोहचली आहे. राज्यातील शेकडो चित्रपटगृहांसह,  देशातील महत्त्वाच्या शहरांतून तसेच ६ विविध देशांमध्ये ‘सुभेदार’ शुक्रवार २५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.     सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमा सोबतच त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याचे पदर,  कुटुंबाने दिलेली तितकीच मोलाची साथ याचे दर्शन ‘सुभेदार’  चित्रपटात होणार आहे.  मृणा

वाघाच्या शोधाचा थरारक प्रवास मांडणारा "टेरिटरी".

Image
विदर्भातील जंगलाच्या आणि वाघाच्या शोधाची थरारक कहाणी उलगडणाऱ्या 'टेरिटरी' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. सचिन श्रीराम दिग्दर्शित या चित्रपटात संदीप कुलकर्णी, किशोर कदम अशी तगडी स्टारकास्ट असून १ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला.   निर्माते श्रीराम मुल्लेमवार यांच्या डिव्हाईन टच प्रॉडक्शन्सतर्फे 'टेरिटरी' हा चित्रपट प्रस्तुत करण्यात आला आहे. लेखक-दिग्दर्शक सचिन श्रीराम यांनी फिलिपिन्समधील इंटरनॅशनल अॅकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजनमधून चित्रपटाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले आहे. बऱ्याच चित्रपटांसाठी सहायक म्हणून काम केल्यानंतर आता ते टेरिटरी या चित्रपटातून पदार्पण करत आहेत. कलकत्ता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, गंगटोक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, ग्रीन अॅकॅडमी अॅवॉर्ड्स, गोल्ड फर्न फिल्म अॅवॉर्ड्स अशा विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये चित्रपट दाखवला गेला आहे, पारितोषिकप्राप्त ठरला आहे. कृष्णा सोरेन यांनी चित्रपटाचं छायांकन, मयूर हरदास यांनी संकलन, महावीर सब्बनवार यांनी ध्वनि आरे

इंडियाज बेस्ट डान्सरमध्ये शिवम वानखेडेचे कौतुक करत आयुष्मान खुराणा म्हणाला, ‘तुझ्या परफॉर्मन्समध्ये मला गोविंदा सरांची झलक दिसली’

Image
  येत्या रविवारी सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील रिअॅलिटी शो इंडियाज बेस्ट डान्सर - 3 च्या आणखी एका धमाकेदार एपिसोडसाठी सज्ज व्हा! या ‘ड्रीम गर्ल स्पेशल’मध्ये मनोरंजन, हास्य अन् नृत्याची धमाल उडणार आहे. या वेळी शोमध्ये बहुप्रतीक्षित चित्रपट ड्रीम गर्ल - 2 चे कलाकार आयुष्मान खुराणा आणि अनन्या पांडे अवतरणार आहेत. हे क्षण स्वप्नवत महासोहळा बनवत स्पर्धक आपल्या चित्तथरारक नृत्यकौशल्याने जजेस आणि खास पाहुण्यांवर आपली छाप सोडताना दिसतील.   या एपिसोडचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, स्पर्धक शिवम वानखेडे आणि कोरिओग्राफर वैभव घुगे हे (आर...राजकुमार चित्रपटातील) लोकप्रिय गाणे ‘गंदी बात’वर नृत्याचा धुमाकूळ घालताना दिसणार आहेत. शिवमच्या सादरीकरणानंतर आयुष्मान खुराणा त्याची थेट सुविख्यात अभिनेते गोविंदाशी तुलना करणार आहेत. ते म्हणाले, "आपण कमल हसन सर आणि गोविंदा सरांच्या परफॉर्मन्समधून बॉलिवूड डान्समध्ये कॉमेडीचा मिलाप पाहिलेला आहे. तुझ्या परफॉर्मन्समध्ये जणू काही गोविंदा सरांची झलक पाहिल्याचा मला भास झाला. तुम्हा दोघांतील जुगलबंदी लाजवाब होती. तुमची कॉमेडी झक्कास होती, हा खूप मनोरंजन कर

२९ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘तीन अडकून सीताराम’

Image
तीन अडकून सीताराम… नाव ऐकून जरा वेगळंच वाटलं ना? हे असं कसं नाव? तर हा कोल्हापूरातील एक वाक्प्रचार आहे. अर्थात याचा अर्थ तुम्हाला हा चित्रपट आल्यावरच कळेल. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. आणि नितीन वैद्य प्रोडक्शन्स प्रस्तुत ‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन हृषिकेश जोशी यांनी केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि नितीन वैद्य या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटात कोण प्रमुख भूमिकेत दिसणार हे जाणून घेण्यासाठी मात्र थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. दुनिया गेली तेल लावत, अशी टॅगलाईन असणारा हा चित्रपट २९ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येईल.  नुकत्याच झळकलेल्या ‘तीन अडकून सीताराम’ चित्रपटाच्या पोस्टरमध्ये तीन अंक दर्शवणारा एक हात दिसत असून त्या हातात बेडी दिसत आहे. तर बेडीच्या दुसऱ्या बाजुला स्माईली दिसत आहे. याचा नेमका संबंध काय, याचे उत्तर चित्रपट पाहिल्यावरच मिळेल. हृषिकेश जोशी हे नेहमीच हटके विषय हाताळतात, त्यामुळे या चित्रपटातही काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार हे नक्की !        चित्रपटाबद्दल दिग्दर्शक हृषिकेश जोशी म्हणतात, ‘’संपूर

तुळजाभवानीच्या दर्शनाला ‘बापल्योक’ चित्रपटाची टीम.

Image
वडिल मुलाच्या नात्याची हळुवार गोष्ट घेऊन २५ ऑगस्टला आपल्या भेटीला येणारा नागराज मंजुळे यांची प्रस्तुती असलेला ‘बापल्योक’ हा मराठी चित्रपट सध्या त्याच्या ट्रेलर आणि गीतांमुळे चांगलाच गाजतोय. नुकतीच या चित्रपटाच्या टीमने तुळजापूरच्या तुळजाभवानी आईचे दर्शन घेऊन चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना केली. विशेष म्हणजे 'बापल्योक’ या चित्रपटाचे शूटिंग तुळजापूर परिसरातील असून चित्रपटातील बहुतांशी कलाकार तुळजापूर, सोलापूर परिसरातील आहेत. मकरंद माने या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. चित्रपटात वडिलांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते शशांक शेंडे असून त्यांच्या मुलाची भूमिका विठ्ठल काळे यांनी साकारली आहे. या दोघांसोबत अभिनेत्री पायल जाधव, नीता शेंडे चित्रपटात दिसणार आहेत. ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’चे विजय शिंदे आणि बहुरूपी प्रोडक्शन्स’च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.     मनापासून केलेली चांगली कलाकृती प्रेक्षकांपर्यत पोहचते. ‘बापल्योक’ चित्रपटाच्या ट्रेलर आणि गीताला मिळलेला प्रतिसाद हेच दाखवून देतो. हा चित्रपट अनेक नानाविध नात्यांची गुंफण असून बापलेका

76 व्या स्वातंत्र्यादिनी 'बाईपण भारी देवा' ने पार केला 76.05 करोड चा आकडा....

Image
    प्रदर्शनापासूनच बाईपण भारी देवा हा मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली सत्ता गाजवताना दिसून येत आहे. अनेक बॉलिवूड, हॉलिवूड तसेच साऊथचे सिनेमे सिनेमागृहात येऊन गेले, तसचं काही नवीन सिनेमे येण्याच्या मार्गावर असतानाही हा मराठमोळा सिनेमा तेवढ्याच ताकदीने आजही तग धरून आहे. अनेक चित्रपटांचे रेकॉर्डस् मोडत आता 76व्या स्वातंत्र्यदिनी बाईपण भारी देवाने ही 76.05 चा आकडा पार करत मराठी चित्रपटाचा विजयी झेंडा तर फडकवला आहेच, आणि याच बरोबर हा सिनेमा मराठी चित्रपटसृष्टीतील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.     मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पासून ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे ते मुंबई पोलिस या सगळ्यांनीच भरभरुन केलेले कौतुक तसेच जगभरातील मायबाप प्रेक्षकांनी चित्रपटाला दिलेल्या प्रतिसादामुळे आज बाईपण भारी देवाची यशस्वी घोडदौड अजूनही तितक्याच गतीने सुरू आहे.      आता तर निर्मात्यांनी सिनेमाच्या तिकीटावर घट करून फक्त 100 रुपये केल्यामुळे दर्शक नव्या जोमाने पुन्हा पुन्हा जावून चित्रपट बघण्याचा आनंद लुटत आहेत.     जिओ स्टुडिओज प्रस्तुत 'बाईपण भारी देवा' चित्रपटाची निर्मिती माधुर

दिवाळीला येतोय "पिल्लू बॅचलर".

Image
विनोदी भूमिकांपासून गंभीर भूमिका सहजगत्या साकारणारा अभिनेता पार्थ भालेरावचा "पिल्लू बॅचलर" हा नवा चित्रपट येत्या दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं.   निर्माते सुनील राजाराम फडतरे, वर्षा मुकेश पाटील, अभिजीत देशपांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्सतर्फे या चित्रपटाची प्रस्तुती करण्यात आली आहे. अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन तानाजी एम् घाडगे यांनी केलं आहे. पार्थ भालेरावसह सायली संजीव, अक्षया देवधर, शिवाली परब, अक्षय टंकसाळे, शशांक शेंडे, मोहन आगाशे, सविता मालपेकर, भारत गणेशपुरे, स्वप्निल राजशेखर, योगेश शिरसाट, स्नेहल शिदम, रोहित चव्हाण, रुचिता जाधव, कल्पना जगताप अशी दमदार स्टारकास्ट आपल्याला या चित्रपटातून भेटीला येणार आहे. मंगेश कागणे यांनी गीतलेखन, चिनार महेश यांनी संगीत दिग्दर्शन, सूर्या मिश्रा यांनी छायांकन तर अनंत कामथ यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे.  "पिल्लू बॅचलर" या नावावरून आणि

'माझी माती - माझा देश' अभियानांतर्गत कणकवलीतील माती नेचर रिसाॅर्टमध्ये साकार झाले जिल्ह्यातील पहिले'अनाम वीर स्फूर्तीस्थळ'.

Image
कणकवली, १५ ऑगस्ट, २०२३: "अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त; स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात" या कुसुमाग्रजांच्या कवितेतील अनाम वीरांचे देशासाठीचे बलिदान आता देशवासियांच्या विस्मरणात न जाता त्यांचे सदैव स्मरण, यथोचित सन्मान व त्यांच्यापासूनची प्रेरणा घेण्यासाठी आता अशा अनेक ज्ञात - अज्ञात वीर जवानांचे, शहीदांचे स्मरण पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात 'मेरी माटी, मेरा देश' (माझी माती - माझा देश) या अभियानांतर्गत केलेल्या 'पंचप्रण' शपथेतून सदैव केले जाणार आहे.  या ३० ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या अभियानाला व पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कणकवली येथील अल्पावधीतच राज्यातीलच नव्हे तर देशभरातील शेकडो पर्यटकांचे आकर्षण बनलेला व संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नवा मानबिंदू बनत असलेल्या 'माती नेचर रिसाॅर्ट' या निसर्गाशी व अस्सल मातीशी नातं जोडणाऱ्या पर्यटन केंद्रात देशाच्या अशा असंख्य 'अनाम' वीरांना, शहीदांना व देशाचे सीमांवर रक्षण करणाऱ्या जवानांना आज देशाच्या शहात्तराव्या स्वातंत्र्य दिनी एक अनोखे स्फू

मल्टीस्टारर "इंद्रधनुष्य"च्या चित्रीकरणाला लंडनमध्ये सुरुवात...

Image
"मनातल्या उन्हात", "ड्राय डे", "भारत माझा देश आहे" असे उत्तम आशयसंपन्न चित्रपट दिग्दर्शित केलेले पांडुरंग जाधव आता "इंद्रधनुष्य" हा नवा चित्रपट लंडनमध्ये चित्रीत करत आहेत. अभिनेता स्वप्नील जोशीसह सागर कारंडे, अभिनेत्री   प्रार्थना बेहेरे, दीप्ती देवी, अदिती सारंगधर, सुकन्या मोने, नम्रता गायकवाड, नेहा खान, श्वेता पाटील अशी दमदार स्टारकास्ट असून चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त नुकताच करण्यात आला.    आशिष अग्रवाल यांच्या एबीसी क्रिएशन्स या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून "इंद्रधनुष्य" चित्रपटाची निर्मिती करण्यात येत असून नितीन वैद्य चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन पांडुरंग जाधव, पटकथा पांडुरंग जाधव, विपुल देशमुख आणि संवादलेखन विपुल देशमुख यांचेच आहे. नागराज दिवाकर छायांकनाची, वरुण लखाते संगीत दिग्दर्शनाची तर निलेश गावंड संकलनाची जबाबदारी सांभाळणार आहेत.  चित्रपटाची कथा एक पुरुष आणि सात बायका या कथानकावर आधारित असून अतिशय धमाल आणि मनोरंजक अशी आहे. लंडनमध्ये घडणाऱ्या या कथानकावरील चित्रपटाचं चित्रीकरण

प्लॅनेट मराठी, व्हिस्टास मीडिया लवकरच घेऊन येणार 'प्लॅनेट भारत'.

Image
मनोरंजन क्षेत्रातील नामांकित अशा प्लॅनेट मराठी ग्रुपने व्हिस्टास मीडियासोबत हातमिळवणी करून 'प्लॅनेट भारत' या नवीन ओटीटीची घोषणा केली आहे. या नवीन ओटीटीवर विविध ठिकाणच्या स्थानिक भाषेतील, शैलीतील सर्वोत्तम असा कॉन्टेन्ट प्रदर्शित करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत या 'प्लॅनेट भारत'ची घोषणा करण्यात आली असून नोव्हेंबर २०२३ पासून त्याचे प्रक्षेपण सुरु होणार आहे.  भारतीय करमणुकीतील महत्वपूर्ण विकास म्हणून प्लॅनेट भारत विविध भाषांमधील हायपरलोकल कॉन्टेन्टची गरज पूर्ण करणार आहे. अर्थपूर्ण कॉन्टेन्टची निर्मिती, परवाना आणि वितरण करणे तसेच हा कॉन्टेन्ट सर्वोत्कृष्ट म्हणून नावारूपास आणणे, हा याचा मुख्य उद्देश असून मार्केटमधील सर्वात वेगळे ओटीटी अशी ओळख निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे. या इंडस्ट्रीतील पोकळी भरून काढण्याची गरज आहे. जिथे विशिष्ट प्रकारच्या कॉन्टेन्टकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, त्यांना योग्य न्याय मिळाला नाही किंवा अकारण खर्च आहे. अशा कॉन्टेन्टना प्रकाशझोतात आणण्याचा प्रयत्न प्लॅनेट भारत करणार आहे. प्लॅनेट भारत आपल्या प्रेक्षकांसाठी नवीन, द

वडिल मुलाच्या नातेसंबंधांची गोष्ट ‘बापल्योक’

Image
 बाप लेकाचं नातं दिसत नाही कारण ते अबोल असतं.चित्रपटांमधून फारसं  न दिसणारं बाप लेकाचं हे नातं आगामी ‘बापल्योक’ चित्रपटाच्यामाध्यमातून समोर येणार आहे. ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’चे विजय शिंदे आणि बहुरूपी प्रोडक्शन्स’च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी याचित्रपटाची निर्मिती केली आहे. बाप लेकाच्या नात्याचा प्रवास दाखवणारा याचित्रपटाचा मनस्पर्शी ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अल्पावधीतच या ट्रेलरने वनमिलियन व्ह्यूज टप्पा गाठला आहे. ट्रेलर आणि चित्रपटातील ' उमगाया बाप रं'  हे गीतसध्या ट्रेंडिंगला आहे.  नागराज मंजुळे या  चित्रपटाचे प्रस्तुतकर्तेअसून  रिंगण, कागर, सोयरीक या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे मकरंद माने या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. चित्रपटात वडिलांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते शशांक शेंडे असून त्यांच्या मुलाची भूमिका विठ्ठल काळे यांनी साकारली आहे. या दोघांसोबत अभिनेत्री पायल जाधव, नीता शेंडे चित्रपटात दिसणार आहेत. ‘बापल्योक’ चित्रपट २५ ऑगस्टला चित्रपटगृहांत दाखल होतोय.  आईचं काळीज समजणाऱ्या पोरांना बापाची तळमळ समजत नाही. आयुष्याच्या वाटेवर अपेक्षा, जबाबदारीचे ओ

दमदार भूमिकेतून नव्या दमाच्या दीपराजचे "अंकुश" चित्रपटातून प्रमुख अभिनेता म्हणून पदार्पण..

Image
      ओमकार फिल्म्स क्रिएशन्सच्या माध्यमातून सुप्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले "अंकुश" चित्रपटाद्वारे चित्रपट निर्मितीमध्ये धडाकेबाज पदार्पण करत आहेत.चित्रपटसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसलेला दीपराज "अंकुश" या बिगबजेट अॅक्शन-थ्रीलरपटातून पदार्पण करत आहे. पहिल्याच प्रयत्नात आव्हानात्मक भूमिकेचं दीपराजनं सोनं केलं असून, या चित्रपटाविषयी इंडस्ट्रीत जोरदार चर्चा आहे. "अंकुश" हा चित्रपट ६ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. दीपराजचं शिक्षण सुरू असून, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाचं सध्या तो शिक्षण घेत आहे. चित्रपटापूर्वी त्यानं अभिनय, नृत्य आणि किक बॉक्सिंगचे प्राथमिक धडे गिरवले आहेत. सुरुवातीपासूनच काहीतरी वेगळ करण्याची इच्छा दीपराजने मनात बाळगली होती. पदार्पणाच्या भूमिकेविषयी दीपराज म्हणाला, की चित्रपटात अतिशय वेगळी आणि आव्हानात्मक भूमिका मिळाली. पहिल्याच चित्रपटात अशी भूमिका करायला मिळणं हे माझं भाग्य आहे. त्यामुळे शिकायलाही खूप मिळालं. फार थोड्या लोकांना अशी संधी मिळते. पहिलाच चित्रपट असल्याने स्वतःला झोकून देऊ

‘सुभेदार’ चित्रपटाच्या ट्रेलरला लाखोंची पसंती...

Image
स्वराज्यासाठी तळहातावर शीर घेऊन लढणाऱ्या योद्ध्यांच्या अतुलनीयशौर्यानेशिवकालीन इतिहास झळाळून उठला आहे. अशा अनेकशूरवीर योध्यांनी आपल्या कर्तृत्वाने भारतीयांना प्रेरित केले आहे. ‘सुभेदार तान्हाजी मालुसरे’ हे नाव घेतलं की आपल्याला आठवतो तो ‘कोंढाण्याचा सिंहपराक्रम’. 'आधीलगीन कोंढाण्याचं आन मग माझ्या रायबाचं' म्हणतकोंढाण्यावर चढाई करणाऱ्या सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचे नाव इतिहासात सुवर्णअक्षरांनीलिहिले गेले आहे.  हाच सुवर्ण इतिहास १८ ऑगस्टला ‘सुभेदार’ या भव्य चित्रपटातून रुपेरी पडद्यावर उलगडलाजाणार आहे. तत्पूर्वी चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून अल्पावधीतच या ट्रेलरने  १ मिलियनचा टप्पा पार केलाय. अतिशय वेगवान पद्धतीने ट्रेलरला लाखोंची पसंती मिळाली आहे.    अखेर निसटे शिवहस्तांतुनि तीरचि तान्हाजी प्रेमे आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी..    या शब्दांतून आणि ट्रेलरमधून सुभेदार तान्हाजी मालुसरे म्हणजे निष्ठा, त्याग, समर्पण याचे मूर्तीमंत उदाहरण ही ओळख पटते. काही तासांत या ट्रेलरने कमाल केली आहे. या ट्रेलरचे हिट्स सातत्याने वाढत असून प्रेक्षकांच्या पसंतीची पावती ट

मुंबई पोलिसांकडून 'बाईपण भारी देवा' चित्रपटाचे भरभरुन कौतुक!

Image
बाईपण भारी देवा हा चित्रपट रिलीज होवून जवळ जवळ दीड महिना उलटून गेलाय तरी प्रेक्षकांचा उत्साह तसू भरही कमी झालेला नाही. कुठेतरी सिनेमाची गाणीच गाजतायात तर काहीजण कोणत्या न कोणत्या पात्रात स्वतःला अनुभवत आहे. असं वाटतंय जणू ह्या सिनेमामुळे महाराष्ट्रात एक उत्सवाचं वातावरण निर्माण झालंय.  आणि आता त्यात भर म्हणजे, धकाधकीच्या जीवनात थोडा विरंगुळा हवाच ह्या सिनेमातल्या डायलॉगचा प्रभाव म्हणा, काल संध्याकाळी मुंबई पोलीस झोन ५ ( माहीम) चे डीसीपी श्री मनोज पाटील यांनी आपल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विशेषतः ‘पुरुष’ कर्मचाऱ्यांसाठी बाईपण भारी देवाचा स्पेशल शो आयोजित केला होता. यावेळी चित्रपटातील कलाकार वंदना गुप्ते आणि सुकन्या कुलकर्णी मोने, दिग्दर्शक केदार शिंदे, सहनिर्माते अजित भुरे आणि जिओ स्टुडिओज मराठीचे कंटेंट हेड निखिल साने उपस्थीत होते. चित्रपटाच्या टीम चे अभिनंदन करत डीसीपी मनोज पाटील म्हणाले कि, "आमचे एसीपी श्री कुरंदकर यांनी पुरुषांना ही फिल्म दाखवावी अशी छान कल्पना सुचवली. आम्हा पोलीसांना सणवार, सुट्ट्या नसतातच, आम्ही जास्तीत जास्त वेळ बाहेरच असतो आणि अश

‘जागरण’ चित्रपट महोत्सवात ‘रूप नगर के चीते’

Image
जगभरातील विविध चित्रपट महोत्सवांमधून मराठी चित्रपटांनी सातत्याने आपली मोहोर उमटवली आहे.  दोन मित्रांमधील यारी दोस्तीची कथा सांगणाऱ्या एस एंटरटेन्मेंट बॅनरचा  ‘रूप नगर के चीते’   हा मराठी  चित्रपट प्रतिष्ठेच्या ‘जागरण’ चित्रपट महोत्सवात दाखवला जाणार आहे. येत्या ११ ऑगस्टला  कानपूर येथे रंगणाऱ्या या महोत्सावात  जगभरातल्या ७० चित्रपटांचा  आस्वाद घेता  येणार आहे. ज्यात ३६ भारतीय आणि ३४ विदेशी चित्रपटांचा समावेश आहे. जागरण सारख्या प्रतिष्ठेच्या चित्रपट महोत्सवात आमचा चित्रपट दाखविला जाणार आहे ही आमच्या संपूर्ण टीमसाठी आनंददायी गोष्ट असल्याचे दिग्दर्शक विहान सूर्यवंशी आणि निर्माते मनन शाह सांगतात. विशेष म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा एकूण २० चित्रपट महोत्सवांमध्ये ‘रूप नगर के  चीते’ या चित्रपटाचे  आजवर स्किनिंग झालं आहे. ‘अकादमी आणि बाफ्टा पुरस्कार पात्रता र्‍होड आयलँड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ही चित्रपटाची नुकतीच निवड झाली आहे.    लखनऊ, कानपुर, प्रयागराज, वाराणसी, गोरखपुर, बरेली, गुरुग्राम, दरभंगा, सिलिगुड़ी, देहरादून, हिसार, लुधियाना, पटना, रायपुर, रांची, इंदौर अश

संदीप कुलकर्णी आणि किशोर कदम यांची मध्यवर्ती भूमिका असलेला "टेरिटरी" चित्रपट १ सप्टेंबरला प्रदर्शित होणार....

Image
           विदर्भातील जंगलाच्या टेरिटरीची थरारक कहाणी उलगडणाऱ्या 'टेरिटरी' या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला. सचिन श्रीराम दिग्दर्शित या चित्रपटात संदीप कुलकर्णी, किशोर कदम अशी तगडी स्टारकास्ट असून १ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.        निर्माते श्रीराम मुल्लेमवार यांच्या डिव्हाईन टच प्रॉडक्शन्सतर्फे 'टेरिटरी' हा चित्रपट प्रस्तुत करण्यात आला आहे. लेखक-दिग्दर्शक सचिन श्रीराम  यांनी फिलिपिन्समधील इंटरनॅशनल अॅकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजनमधून चित्रपटाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले असून अकादमी ऑफ थिएटर आर्ट्स मध्ये ही  मास्टर्स इन थिएटर आर्ट्स केले आहे. बऱ्याच चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केल्यानंतर आता ते "टेरिटरी" या चित्रपटातून पदार्पण करत आहेत. कलकत्ता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, गंगटोक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, ग्रीन अॅकॅडमी अॅवॉर्ड्स, गोल्ड फर्न फिल्म अॅवॉर्ड्स अशा विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये चित्रपट दाखवला गेला आणि  पारितोषिकप्राप्त ठरला आहे. तसेच पुणे इंटरनशनल फिल्म फेस्टिवल, कान्स फेस्टिवल मार्केट,

'धर्मवीर २' मधून उलगडणार 'साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट...

Image
स्वर्गीय आनंद दिघे यांचा जीवनप्रवास 'धर्मवीर... मुक्काम पोस्ट ठाणे' या चित्रपटातून मांडण्यात आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्यामुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवरही तुफान यशस्वी ठरला. धर्मवीरच्या या दिमाखदार यशानंतर जेजुरी येथील खंडोबाचे दर्शन घेऊन 'धर्मवीर २'ची घोषणा निर्माते मंगेश देसाई यांनी केली.  "धर्मवीर" चित्रपटाच्या यशानंतर 'धर्मवीर २' ची चर्चा सुरू झाली होती. अखेर ही चर्चा केवळ चर्चा न राहता आता प्रत्यक्षात उतरण्यास सज्ज झाली आहे. साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेद्वारे मंगेश देसाई या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. मंगेश देसाई यांनीच धर्मवीर चित्रपटीचीही निर्मिती केली होती . "धर्मवीर" चित्रपटाच्या यशात उत्तम स्टारकास्टसह लेखन, दिग्दर्शनही महत्त्वाचं ठरलं होतं. अनेक पुरस्कारही या चित्रपटला मिळाले होते. प्रवीण तरडेच "धर्मवीर २" चे लेखन, दिग्दर्शन करणार असल्यानं हा चित्रपटही दमदार होईल यात शंका नाही.  पोस्टरवर भगव्या बॅकग्राऊंडवर 'धर्मवीर २' "साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष

मराठी ताऱ्यांसोबत 'अल्ट्रा झकास मराठी ओटीटी'चा दिलखुलास फिल्मी कट्टा!

Image
 मनोरंजन क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या “अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लि.” यांचे “अल्ट्रा झकास” मराठी ओटीटी सिनेक्षेत्रातल्या दिग्गजांसोबत चित्रपटाच्या कल्पनेपासून ते निर्मितीपर्यंतच्या सर्जनशील प्रक्रियावर दिलखुलास बोलणारा आकर्षक टॉक शो “फिल्मी कट्टा” अवघ्या महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांसाठी सादर करत आहे.  “फिल्मी कट्टा” या शोद्वारे प्रेक्षकांना चित्रपटाच्या पडद्यांमागच्या गमतीदार गोष्टींचा मनमोहक आणि उत्साही आनंद लुटता येणार आहे. “फिल्मी कट्टा” या शोमध्ये  मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठित दिग्दर्शक, निर्माते, लेखक येऊन त्यांचे वैयक्तिक अनुभव, आव्हाने आणि चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातील यशाची गुपितं उघडी करणार आहेत. चर्चांमध्ये कथाकथन तंत्र, पटकथा लेखन, दिग्दर्शन, छायांकन, अभिनय आणि चित्रपट निर्मितीच्या एकूण प्रक्रियेसह विविध विषयांचा समावेश आहे. शोचा उद्देश केवळ मनोरंजनच नाही तर इच्छुक चित्रपट निर्मात्यांच्या सर्जनशील स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी अनमोल ज्ञान आणि प्रेरणा देणे हा आहे. अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे CEO श्री. सुशी

अनिता दाते,सागर देशमुख, पुष्करराज चिरपुटकर त्रिकूटाची धमाल......

Image
आपल्या खमक्या स्वभावाने  नवऱ्याला वठणीवर आणणारी राधिका म्हणजे अभिनेत्री अनिता दाते आता किरकोळ नवरे शोधतेय. ती किरकोळ  नवरे का आणि कशासाठी  शोधतेय? हे जाणून  घ्यायचं असेल तर ११ ऑगस्टला रंगभूमीवर येणारं किरकोळ नवरे हे नवं नाटक तुम्हाला बघावं लागेल. हसून हसून दमछाक करणार डामचिक नाटक अशी  टॅगलाईन असलेल्या या  नाटकात अभिनेत्री अनिता दाते  हिच्यासोबत सागर देशमुख, पुष्करराज चिरपुटकर दिसणार  आहेत. अनामिका + युवांजनी  नाटक मंडळी निर्मित, साईसाक्षी प्रकाशित या  नाटकाचे लेखन - दिग्दर्शन  सागर देशमुख याचे आहे.       आजवर वेगवेगळया भूमिकांमधून या तिघांनी आपली कमाल दाखवली आहे. आता एकत्र येत हे तिघे काय धमाल करतात यासाठी हे नाटक पहायला हवं.     मनोरंजनातून अंजन घालणारे हे नाटक करताना आम्ही  खूप मजा करतोय. प्रेक्षकही हे नाटक तितकचं एन्जॉय करतील असा विश्वास हे तिघे व्यक्त करतात.    किरकोळ नवरे हे विनोदी नाटक नवरा बायकोच्या नात्याबद्दलचं आहेच, पण नात्यातली असुरक्षितता आणि चिरंतर प्रेमाबद्दलही बोलणारं आहे.     या नाटकाचे निर्माते अभिजीत देशपांडे, राहुल कर्णिक, दिनू पेड

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ने केली जिओ स्टुडिओजच्या 'बाईपण भारी देवा' चित्रपटाची स्तुती ! आता आईला ही दाखवणार चित्रपट.

Image
सध्या महाराष्ट्रात ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाच्या निमित्ताने उत्सवमय वातावरण झाल्याचे दिसून येत आहे.  कित्येक वर्षांनी एखाद्या चित्रपटासाठी नटून थटून, वेळातून वेळ काढून, अनेक मैलाचा प्रवास करून, वेगवेगळ्या वयोगटातील महिला चित्रपट बघायला येत असल्याचं आपण पहात आहोत.  पण आता यात पुरुषही काही मागे राहिले नाहीयेत, बरं का!  आता नवं चित्र दिसतं आहे ते म्हणजे तेवढ्याच उत्साहाने पुरुषदेखील कुटुंबासमवेत सिनेमागृहांमधे हा चित्रपट बघताना दिसून येत आहेत. चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना उलटून गेलाय तरीही बाईपण भारी देवाचं वादळ महाराष्ट्रभर ठाम धरून आहे. आणि आता ते सचिन तेंडुलकर पर्यंत पोहचलं असून, नुकताच त्यांनी हा चित्रपट आपली पत्नी अंजली तेंडुलकर आणि मित्र परिवारासह पाहिला. आणि आता त्यांनी आपल्या आईला ही फिल्म दाखवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.      सचिन आपल्या सोशल मिडिया वर चित्रपटाचे कौतुक करत म्हणाला कि, "बाईपण भारी देवा ही 6 बहिणींची हृदयस्पर्शी कथा आहे.  मला हा मराठी चित्रपट पाहून खूप आनंद झाला आणि कधी एकदा माझी आई आणि आत्या हा चित्रपट बघतायत याची मी आतुरतेने वाट पाहत आहे.

प्लॅनेट मराठी ओटीटीवर उलगडणार ‘डायरी ॲाफ विनायक पंडित’चे रहस्य.....

Image
चित्रबोली क्रिएशन्स निर्मित, वन कॅम प्रोडक्शन्स सहनिर्मित ‘डायरी ॲाफ विनायक पंडित’ ही वेबफिल्म लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. अक्षय विलास बर्दापूरकर सादर करत असलेल्या या वेबफिल्मचे दिग्दर्शन मयूर शाम करंबळीकर आणि टीमने केले आहे.  पोस्टरमध्ये एक फाशीचा दोर दिसत आहे. हेच रहस्य ‘डायरी ॲाफ विनायक पंडित’मध्ये उलगडणार आहे. सध्या तरी या चित्रपटातील कलाकार पडद्याआड असले तरी लवकरच ते समोर येतील. आदित्य विकासराव देशमुख, वेदांत विवेक मुगळीकर यांनी या वेबफिल्मच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे.  चित्रपटाबद्दल दिग्दर्शक मयूर शाम करंबळीकर म्हणतात, ‘’या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना जुन्या काळात घेऊन जाणारी आहे. विनायक पंडित या एका कलाकाराची जीवन गाथा आणि त्याच्या जवळच्या लोकांचा त्याला असलेला लळा यात पाहायला मिळणार आहे. हा प्रवास प्रेक्षकांना एका जागी खिळवून ठेवणारा आहे.’’  प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ‘’भावनिक आणि कौटुंबिक अशी ही वेबफिल्म आहे. कथेची मांडणी अतिशय सुरेख केली असून विचार करायला लावणारा

पहिल्याच प्रयोगाला झळकली ‘हाऊसफुल्ल’ची पाटी ....

Image
सुमारे एका दशकानंतर मराठी इंडस्ट्रीतील ‘क्यूट आणि परफेक्ट कपल’ म्हणजेच प्रिया बापट आणि उमेश कामत रंगभूमीवर एकत्र आले आहेत. या कपलची पडद्यामागील केमिस्ट्री जितकी त्यांच्या चाहत्यांना आवडते तितकीच रंगभूमीवर पाहायलाही आवडते. हीच सुंदर केमिस्ट्री नाट्यरसिकांना आता नाट्यगृहात पाहायला मिळणार आहे. सोनल प्रॅाडक्शन्स निर्मित, प्रिया बापट सादर करत असलेल्या ‘जर तर ची गोष्ट’ या नाटकाचा नुकताच शुभारंभ झाला असून पहिल्याच प्रयोगासाठी ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड झळकला आहे. अद्वैत दादरकर, रणजित पाटील दिग्दर्शित, इरावती कर्णिक लिखित या नाटकात प्रिया बापट, उमेश कामत यांच्यासह पल्लवी अजय, आशुतोष गोखले यांच्याही प्रमुख भूमिका आहेत तर नंदू कदम या नाटकाचे निर्माते आहेत.  शुभारंभाच्या प्रयोगाविषयी निर्माते नंदू कदम म्हणतात, ‘’ॲानलाईन, ॲाफलाईन तिकीटविक्री सुरू झाल्यापासूनच नाट्यरसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. शुभारंभाचा प्रयोग दणक्यात पार पडल्यामुळे खूप आनंद आहे. मला खात्री आहे, हे नाटक प्रेक्षकांना निश्चितच आवडेल. तिकीट न मिळाल्याने काही प्रेक्षक नाराजही झाले आहेत, मात्र त्यांच्यासाठी आम्ही लवकर

एकाच चित्रपटात मुलगा,सुन,आणि सासू.......मृणाल कुलकर्णी, विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे एकत्र.....

Image
             काही कुटुंब व्यवसायात, तर काही कलेत एकत्र रमतात.अभिनय, लेखन, दिग्दर्शन अशा तीनही माध्यमातून कलेचा वारसा समर्थपणे जपत रसिकांचे मनोरंजन करणारे, कलेत रमणारे असेच एक कुटुंब आगामी ‘सुभेदार’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, त्यांचा अभिनेता पुत्र अभिनेता विराजस कुलकर्णी आणि त्याची पत्नी अभिनेत्री शिवानी रांगोळे हे तिघंही पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.         ‘सुभेदार’ या आगामी चित्रपटात मृणाल कुलकर्णी जिजाऊ आईसाहेबांच्या, विराजस जीवाच्या भूमिकेत पहायला मिळणार असून यशोदाबाई मालुसरेच्या भूमिकेत शिवानी रांगोळे दिसणार आहे. आपल्या आजोबांकडून मिळालेला इतिहासाचा वारसा जपत मृणाल कुलकर्णी यांनी वेगवेगळ्या ऐतिहसिक भूमिकांमधून आपला ठसा उमटवला आहे.       ‘सुभेदार’ याचित्रपटात तान्हाजी मालुसरे यांना कुटुंबाने कशी मोलाची साथ दिली हे पाहायला मिळणार असून या चित्रपटाच्या निमित्ताने आमचं कुटुंबही एकत्र आल्याचा आनंद वेगळा असल्याचं मृणाल कुलकर्णी सांगतात.            सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या असीम शौर्याची गाथा उलगडणारा दिग्पाल लांजेकर लिखित-दिग

'व्हॅक्युम क्लिनर' आणि 'एका लग्नाची पुढची गोष्ट' नाटकांनी यशवंत रंगमंदिराचा दीर्घ काळानंतर उघडणार पडदा.

Image
नाट्यरसिकांमध्ये विशेष स्थान असणाऱ्या 'यशवंतराव नाट्यगृहात लवकरच तिसरी घंटा खणाणणार आहे. शनिवार ५ ऑगस्टला अशोक सराफ आणि निर्मिती सावंत यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘व्हॅक्युम क्लिनर’ आणि रविवार ६ ऑगस्टला प्रशांत दामले फाऊंडेशन आणि गौरी थिएटर्स निर्मित, ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकांच्या प्रयोगाने यशवंत रंगमंदिराचा पडदा उघडणार आहे. विशेष म्हणजे या प्रयोगातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय या दोन्ही नाटकाच्या निर्मात्यांनी घेतला आहे.    नूतनीकरण करण्यात आल्यानंतर हे नाट्यगृह १ ऑगस्ट पासून नव्या रंगरुपात प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. नाटयपरिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, कार्यकारी समिती, नियामक मंडळ तसंच विश्वस्त मंडळ ह्यांनी हे संकुल लवकरात लवकर सुरू व्हावं ह्यासाठी प्रयत्न केले होते. या नाट्यगृहाचा पडदा उघडल्याने नाट्यरसिक सुखावले आहेत.