Posts

Showing posts from December, 2023

मराठी असू तर बोलूही मराठीच'आईच्या गावात मराठीत बोल'.

Image
कोणत्याही चित्रपटाचे प्रदर्शन हीच एक अफलातून बाब असते आणि अशा मराठी चित्रपटात जर जबरदस्त असा नैसर्गिक आणि खळखळून हसवणारा विनोद असेल तर चित्रपटाचे प्रदर्शन होण्याआधीच त्याची धमाल चर्चा सुरु होते. असाच एक मराठी चित्रपट आहे 'आईच्या गावात मराठीत बोल' ‘आईच्या गावात मराठीत बोल’ चे ट्रेलर आणि संगीत अनावरण मुंबई मध्ये सर्व  कलाकार , तंत्रज्ञ आणि मिडीया यांच्या उपस्थितीत नुकतेच पार पडले. ‘आईच्या गावात मराठीत बोल’ या चित्रपटाद्वारे  ओमी वैद्यची भन्नाट मराठी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे आणि त्यावर ते तद्दन खूश आणि हसून लोटपोट होणार आहेत. याला ओमीच्या नव्या भाषेचा चमत्कार म्हणायचे की विनोदाची एक नवी भाषा म्हणायचे हे प्रेक्षकांनी ठरवायचे आहे. ट्रेलरमध्ये चित्रपटाचा नायक, समर (ओमी वैद्य), परदेशात राहणारा एक खोडकर तरुण परिस्थितीच्या दवाबामुळे  लग्नासाठी सुयोग्य मराठी वधू  शोधण्याच्या आशेने भारताच्या प्रवासाला निघतो. तथापि,  नशिबाप्रमाणे  समरच्या आयुष्याला एक गमतीदार वळण लागते कारण त्याला या प्रवासात अनेक आनंददायक तसेच विलक्षण प्रसंगांचा  सामना करावा लागतो.        हा प्रवास त्याल

नानांची नाना रुपं....'ओले आले' मध्ये ....

Image
'वेश असावा बावळा, परि अंतरी नाना कळा,' हे वचन तंतोतंत लागू पडतं ते म्हणजे विविधरंगी कलागुणसंपन्न नाना पाटेकर या कलंदर व्यक्त्मित्त्वाला! कलासक्त नानांनी आजवर असंख्य नाटकं आणि चित्रपटांमधून आपल्यातलं वेगळंपण कायम सिद्ध केलं आहे. पण.. एखादे नाठाळ... खोडसाळ... प्रेमळ बाबा बहुधा प्रथमच आपण नानांच्या स्वरूपात पाहतोय. 'ओले आले' या चित्रपटातून नानांचे आणखी काही कलारंग आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नववर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच ५ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या 'ओले आले' हा चित्रपट नाना पाटेकरांच्या फॅन्ससाठी एक सरप्राईज पॅकेज असणार आहे हे नक्की.  मुलाच्या मागे-मागे फिरणारे.. खोड्या काढणारे.. जीवापाड प्रेम करणारे.. आयुष्य खऱ्या अर्थाने जगायला शिकवणारे नाना सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताहेत. शिस्तप्रिय बाबांच्या व्यक्तिरेखेच्या अगदी उलट अशी ही नानांची भूमिका आपल्याला पोट धरून हसायला लावतेय. आजवर नानांच्या विविध भूमिका आपण पाहिल्या आहेत. त्यांची प्रत्येक भूमिका आपल्याला काही ना काही तरी देऊनच जाते. अशीच 'ओले आले' चित्रपटातली नानांची भूमिका ''

नव्या वर्षात करा एन्जॉय कारण आदर्श शिंदे म्हणतोय 'एन्जॉय एन्जॉय'.

Image
नव्या वर्षाच्या स्वागताला नाचण्याचा पुरेपूर आनंद मिळणार आहे. ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटाचं एन्जॉय एन्जॉय हे धमाल गाणं लाँच करण्यात आलं असून शुभंकर तावडे, प्रियंका जाधव या गाण्यात आहेत. ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! हा चित्रपट नव्या वर्षात १९ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे विकास हांडे, लोकेश मांगडे, सुधीर कोलते यांनी ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटाची निर्माती केली आहे, तर सुश्रुत भागवत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. शर्वाणी - सुश्रुत यांनी चित्रपटाच्या पटकथालेखनाची, तर संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे. अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांच्यासह शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, राधिका हर्षे - विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी असे उत्तमोत्तम कलाकार या चित्रपटात आहेत, तर अभिनेता पुष्कर श्रोत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये ९० पेक्षाही अधिक पुरस्कार मिळवण्याची दमदा

'तंजावर' येथे १०० व्या नाट्य संमेलनाचा प्रारंभ.

Image
  तंजावर दि. २७    नाटककार शहाजी (शाहराज) राजे भोसले हे मराठी रंगभूमीचे पहिले नाटककार असून , 'लक्ष्मी नारायण कल्याण' हे पहिले मराठी नाटक होय, असे उद् गार ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी, तंजावर येथील सरस्वती महालात संपन्न झालेल्या कार्यक्रमात काढले.   १०० व्या  मराठी नाट्य संमेलनाचा प्रारंभ शाहराज राजे भोसले यांच्या वाङमयाला वंदन करून व नटराज पूजन करण्यात आले. त्यावेळी  नाटककार प्रेमानंद गज्वी बोलत होते. पुढे गज्वी म्हणाले, शाहराजांनी २२ मराठी,२० तेलगु, १ संस्कृत,१ तमिळ व ३ हिंदी नाटके लिहिली असून ते मराठी रंगभूमी बरोबरच तामिळ आणि हिंदी रंगभूमीचेही आद्य नाटककार होते. ते काव्य भाषा शास्त्राचे अभ्यासक होते. त्यांनी बारामास आणि षडरूतुवर्णन ही काव्ये लिहिली असून ते शूर, राजकारणपटू रसिक, कलाज्ञानी आणि नृत्य कलेचे मर्मज्ञ होते. असेही गज्वी म्हणाले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला नटराजाचे पूजन करून आणि शाहराजाचे वाङमयाला पुष्पांजली वाहून करण्यात आली.        यावेळी केलेल्या भाषणात शिवाजी  राजे भोसले म्हणाले, "मी  व्यंकोजी राजघराण्यातील आठवा वारसदार आहे

छत्रपती संभाजी महाराजांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाची झलक प्रदर्शित.

Image
अलीकडेच आलेल्या 'शिवरायांचा छावा' चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढवली होती. त्यातच आणखी एका नव्या पोस्टरने आपल्या उत्सुकतेमध्ये भर घातली आहे. दणकट शरीरयष्टी.. धारदार नाक... डोळ्यांत फुललेला अंगार.. ती मनाचा ठाव घेणारी भेदक नजर आणि मागे सिंहाच्या रुद्रावताराची छबी. अगदी सूचक अशा या पोस्टरमधून 'शिवरायांचा छावा' आपल्या समोर मोठया दिमाखात अवतरला आहे. पण.. अजूनही या कलाकाराची ओळख आपल्याला पटलेली नाही. शंभूराजेंच्या तेजाळत्या व्यक्तिमत्त्वाची आठवण करून देणारा हा नवा चेहरा नेमका आहे तरी कोण..? यासाठी आपल्याला अजूनही वाट पहावी लागणार आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगणाऱ्या या  चित्रपटातील प्रमुख पात्र निभावणाऱ्या या कलाकाराचे नाव घोषित करण्यात येणार आहे.  ए. ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट प्रस्तुत 'शिवरायांचा छावा' नववर्षात म्हणजेच *१६ फेब्रुवारी २०२४* ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मल्हार पिक्चर्स कं.चे वैभव भोर, किशोर पाटकर, मधू यांनी या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर

'Tips मराठी सादर करत आहे त्यांचा पहिला-वाहिला मराठी चित्रपट 'श्रीदेवी प्रसन्न'.

Image
    नव्या वर्षात, एक नवी लव्ह स्टोरी आणि आपल्या लाडक्या जोडीसह Tips मराठी सादर करत आहे पहिला मराठी चित्रपट 'श्रीदेवी प्रसन्न'. येतोय २फेब्रुवारी २०२४रोजी...         टिप्स फिल्म्स प्रस्तुत आणि कुमार तौरानी यांची निर्मिती असलेला "श्री देवी प्रसन्न" हा येत्या ०२ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले.'Tips मराठी सादर करत आहे त्यांचा पहिला-वाहिला मराठी चित्रपट 'श्रीदेवी प्रसन्न'.  "श्रीदेवी प्रसन्न" या चित्रपटातून मराठी मनोरंजन विश्वासह बॉलीवूडलाही भुरळ घालणारी मोस्ट ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर आणि स्मार्ट अँड डॅशिंग म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर अशी भन्नाट आणि बेमिसाल जोडी प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र आहे. आजवर अनेक हीट चित्रपट देणारे हे दोन्ही दमदार कलाकार एकत्र येऊन एक वेगळीच प्रेमकहाणी फुलवणार आहे. या निमित्ताने नव्या वर्षात, एक नवी आणि आगळीवेगळी लव्ह स्टोरी आपल्या लाडक्या जोडीसह प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.  सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्र

‘रमा राघव’च्या प्रेमाचा रोमांचक प्रवास..

Image
कलर्स मराठीवरील रमा राघव मालिकेतील रमा राघवच्या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळतेय. या लोकप्रिय जोडीने सर्वांची मन जिंकली आहेत.                     नुकतेच या मालिकेत रमा राघवने सूर्याच्या व आठवणींच्या साक्षीने अनोखे लग्न केले. या दोघांच्या नात्याला राघवच्या घरच्यांनी स्वीकारलं पण त्याच्या आबांना म्हणजेच गजानन गुरुजींना रमा आणि राघवच लग्न मान्य नाही आहे. दुसरीकडे रमाच्या घरच्यांचा ही या दोघांच्या लग्नाला सक्त विरोध असून गिरीश परांजपेंनी माझी मुलगी मेली असे घोषित केलं. आता ह्या पुढे रमा राघवचा प्रवास कसा असेल? दोघे ही आपापल्या घरच्या वडीलधाऱ्यांची मन जिंकू शकतील का? … याबरोबरीने एकीकडे प्रेक्षक याची ही वाट पाहत आहेत कि रमा राघवचं वैदिक पद्धतीने लग्न कधी होईल? आणि दोघांच्या घरचे त्यांचं नातं मान्य करून रमा राघवचे वैदिक पद्धतीने लग्न लावून देतील का? एकूण उत्कंठावर्धक टप्प्यावर रमा राघवचा प्रवास सुरू आहे.

'चमत्कार' सांगणार आयुष्याचा भावार्थ 'पंचक'मधील भावनिक गाणे संगीतप्रेमींच्या भेटीला .

Image
श्रीराम नेने व माधुरी दीक्षित नेने निर्मित 'पंचक' चित्रपटातील जगण्याचे सार उमगवणारे एक सुरेख गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. 'ज्याला त्याला उमगते, ज्याची त्याची भाषा, बाकी इथे जगण्याचा रोजचा तमाशा...' असे बोल असलेले हे गाणे आयुष्याचा भावार्थ सांगत आहे. गुरु ठाकूर यांचे हृदयस्पर्शी शब्द लाभलेल्या या भावनिक गाण्याला मंगेश धाकडे यांनी संगीत दिले आहेत तर अभिजीत कोसंबी याचा जादुई आवाज या गाण्याला लाभला आहे. या गाण्याच्या शब्दांमध्ये अनेक भावना आहेत.  गीतकार गुरु ठाकूर म्हणतात, '' अनेक घडामोडी घरात घडत आहेत आणि त्या सगळ्यांना अनुसरून या गाण्याचे बोल रचायचे होते. प्रत्येक व्यक्तिरेखेच्या आयुष्यात  वेगवेगळ्या पातळीवर द्वंद्व सुरु आहेत. त्यामुळे या शब्दांमध्ये आर्तता खूप महत्वाची होती. अभिजीत कोसंबीने आपल्या आवाजाने हे गाणे एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे. संगीतही त्याचा दर्जाचे आहे.''  गाण्याबद्दल दिग्दर्शक राहुल आवटे म्हणतात, " गुरु ठाकूर यांनी अत्यंत सुंदर शब्दात जीवनातील सफर मांडली आहे. ज्याला मंगेश धाकडे यांनी उत्तम संगीताची साथ लाभली आहे. खूप

'सूर लागू दे' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला.

Image
दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांचा 'सूर लागू दे' हा शेवटचा चित्रपट असल्याने कलाकारांपासून प्रेक्षकांपर्यंत सर्वांनाच या चित्रपटाबाबत कुतूहल आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला असून सोशल मीडियावर अल्पावधीत 'सूर लागू दे'च्या ट्रेलरला तूफान प्रतिसाद मिळू लागला आहे. १२ जानेवारी २०२४ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. ऑडबॅाल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली निर्माते अभिषेक 'किंग' कुमार आणि नितीन उपाध्याय यांनी 'सूर लागू दे' या चित्रपटाची निर्मिती केली असून अश्विन पांचाळ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. प्रवीण विजया एकनाथ बिर्जे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. पिकल एंटरटेन्मेंट स्टुडिओज हा चित्रपट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वितरीत करणार आहे. या चित्रपटाचं लेखन आशिष देव यांनी केलं आहे. 'सूर लागू दे'चा ट्रेलर पाहताक्षणीच लक्ष वेधून घेणारा आहे. चित्रपटात काय पाहायला मिळेल याची झलक ट्रेलरमध्ये दिसते. विक्रम गोखले आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी मुळ्ये या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र आले आहेत. त्य

एंटरटेनमेंटची डिलिव्हरी करायला येतोय 'डिलिव्हरी बॉय'

Image
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक गिफ्ट रॅप केलेल्या एका बॉक्समधून एक गोंडस बाळ बाहेर आल्याचे दिसत होते. त्यावेळी अनेकांना प्रश्न पडला होता की डिलिव्हरी बॉय आणि या बॉक्सचा नेमका संबंध काय? तर प्रेक्षकांची ही उत्सुकता थोड्या फार प्रमाणात कमी होणार आहे. कारण आता 'डिलिव्हरी बॉय'चे एक जबरदस्त पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून ते सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. पोस्टरमध्ये एका आलिशान खुर्चीवर प्रथमेश परब विराजमान झालेला दिसत असून त्याच्या मागे अंकिता लांडे पाटील डॉक्टरच्या ऍप्रनमध्ये दिसत आहे. तर प्रथमेशजवळ पृथ्वीक प्रताप आहे. या पोस्टरमध्ये विशेष लक्षवेधी ठरत आहेत त्या आठ गरोदर बायका... त्यामुळे आता नेमके काय आहे हे प्रकरण, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना ९ फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.  सिनेपोलिस आणि दीपा नायक प्रस्तुत, लुसिया एंटरटेनमेंट प्रोडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे मोहसीन खान दिग्दर्शक आहेत. डेव्हिड नादर निर्माते असून फेलिक्स नादर, विकास श्रीवास्तव, विकास सिंग, राझ धाकड आणि ऋषिकेश पांडे सहनिर्माते आहेत. राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी या चित्रपटाचे लेख

आंतरराष्ट्रीय प्रवास करून 'मोऱ्या' येत्या १२ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत रसिकांच्या भेटीला.

Image
मुंबई : लंडन येथील 'सोहोवाला कोर्ट हाऊस हॉटेल सिनेमा' या लंडनच्या आयकॉनिक सिनेमा हॉलमध्ये पहिल्यांदा 'प्रीमियर शो' करण्याचा मान "मोऱ्या" या मराठी चित्रपटाने मिळवून, युरोपमधील प्रेक्षकांची हाऊसफुल्ल पसंती मिळविली आहे. ‘कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात' "मोऱ्या"चा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. तेव्हा पासूनच या चित्रपटाविषयी कुतूहल वाढू लागले होते. 'एलएचआयएफएफ बार्सिलोना, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, 'खजुराहो आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव', 'झारखंड आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव-२०२२', 'पेनझान्स आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव', 'अयोध्या फिल्म फेस्टिव्हल', 'लेक सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल', 'बॉलिवूड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल' इत्यादी राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय महोत्सवांत "मोऱ्या"ने ‘उत्कृष्ट चित्रपटा’चा बहुमान मिळविला आहे. आता नव्या वर्षात येत्या १२ जानेवारी २०२४ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. कान्ससह विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आमच्या पहिली निर्मिती

काळजाचा ठाव घेणार 'काटा किर्र'‘लावण्यवती’अल्बमचे अखेरचे गाणे भेटीला .

Image
एकविरा म्युझिक प्रस्तुत 'लावण्यवती' या अल्बममधील ' गणराया' , 'करा ऊस मोठा', 'लावा फोन चार्जिंगला' या तीनही गाण्यांना संगीतप्रेमींना प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या अल्बममधील 'काटा किर्र' हे अखेरचे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘लावणी नाही… कापणी’ या टॅगलाईननुसार या गाण्यातूनही आपल्या लोककलेचे दर्शन घडणार आहे. अवधूत गुप्ते यांनी शब्दबद्ध  केलेल्या आणि संगीत दिलेल्या 'काटा किर्र' या गाण्याला मुग्धा कऱ्हाडेच्या  ठसकेबाज आवाज लाभला आहे. तर अभिनेत्री पूर्वा शिंदेच्या बहारदार नृत्याला ऋषी देशपांडेची साथ लाभली आहे. त्यामुळे यात अधिकच रंगत आली आहे. ‘काटा किर्र’चे नृत्य दिग्दर्शन 'सुंदरीकार' आशिष पाटील यांचे असून चैतन्य पुराणिक यांनी याचे छायाचित्रीकरण केले आहे. नुकतीच या गाण्याचा प्रोमो भेटीला आला असून २६ डिसेंबरला हे लाजवाब गीत आपल्याला पाहायला मिळणार आहे.  'लावण्यवती' अल्बमबद्दल अवधूत गुप्ते म्हणतात,   "आपल्या महाराष्ट्राची लोककला जपली पाहिजे, यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो आणि म्हणून तुमच्यासाठी 

डॉ. श्रीराम लागू आणि निळू फुले यांचा सुपरहिट चित्रपट ‘भिंगरी’ ‘अल्ट्रा झकास’ ओटीटीवर.

Image
मुंबई: मराठी सिनेसृष्टीच्या चंदेरी दुनियेत आपलं नाव दिमाखात गाजवून प्रेक्षकांचं मन भारावून टाकणारे अभिनेते डॉ. श्रीराम लागू आणि निळू फुले यांचा मराठी चित्रपटाच्या  सुवर्णकाळातील ‘भिंगरी’ चित्रपट २८ डिसेंबर २०२३ रोजी ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर येत आहे.         चित्रपटात रमेश देव, सुषमा शिरोमणी, विजू खोटे आणि विक्रम गोखले हे सुप्रसिद्ध अभिनेते असून उषा मंगेशकर यांच्या आवाजातील गाणी अनुभवून प्रेक्षक जुन्या आठवणींमध्ये गुंग होणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन मराठी सिनेसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक दत्ता केशव यांनी केले असून कथा अभिनेत्री सुषमा शिरोमणी यांनी स्वतः लिहिली आहे. दौलतराव पाटील आणि सदा जिवाभावाचे मित्र असून सदाच्या पत्नीसोबत दौलतने संबंध ठेवल्याचे सदाला कळते. तेव्हा संतप्त झालेला सदा दौलतचा बदला घेण्याच्या नादात काय काय करतो हे चित्रटातून कळणार आहे. “प्रेक्षकांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आमच्या संग्रहातील सुवर्ण चित्रपटांना अल्ट्रा झकासच्या माध्यमातून सादर करत असल्याचा आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.ई.ओ. श

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या मराठी नाट्य संमेलनाचा प्रारंभ 'तंजावर' येथे होणार.

Image
पुणे - पिंपरी चिंचवड येथे दि. ५-६-७ जानेवारी २०२४ या काळात संपन्न होणाऱ्या १०० व्या नाट्य संमेलनाचा प्रारंभ, मराठी रंगभूमीचे पहिले नाटककार शाहराज राजे भोसले (१६७०-१७१२) यांच्या नाट्य वाङमयाला वंदन करून होणार आहे. तंजावर (तामिळनाडू) येथील सरस्वती महालात हे नाट्य वाङमय सुरक्षित असून, नाटककार शाहराज राजे भोसले यांनी एकूण २२ मराठी नाटके लिहिली असून, 'लक्ष्मी नारायण कल्याण' (१६९०) हे पहिले मराठी नाटक मानले जाते. या नाटकात 'लक्ष्मी नारायण' यांच्या लग्नाची गोष्ट चित्रीत केलेली आहे.          दि. २७ डिसेंबर २०२३ रोजी, सायं. ६.०० वा.  नाटककार शाहराज राजे भोसले यांच्या नाट्य वाङमयाला वंदन करून व नटराज पूजन करून शंभराव्या नाट्य संमेलनाचा प्रारंभ केला जाणार आहे.  शंभराव्या नाट्य संमेलनाचे नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ.जब्बार पटेल हे असून हा नाट्य ग्रंथ वंदन सोहळा ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी जिल्हाधिकारी दीपक जेकब, तमीळ विद्यापीठ तंजावर कुलगुरू प्रो. थिरूवल्लूवम, छत्रपती शिवाजीं महाराजांचे आठवे वारसदार शहाजी राजे

गौतमी पाटीलचा "इश्काचा मौका"

Image
ठसकेबाज गाण्यांवर प्रेक्षकांना ठेका धरायला लावणाऱ्या गौतमी पाटीलने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. मात्र आता गौतमी पाटील 'इश्काचा मौका आणि झाला नजरेचा धोका... आता कसं व्हायचं पावन, चीझ मी लई कडक' म्हणत आहे. सप्तसूर म्युझिकच्या नव्याकोऱ्या गाण्यात गौतमी पाटील झळकली असून या गाण्याचा म्युझिक व्हिडिओ सप्तसूर म्युझिकच्या यूट्यूब चॅनलवर लाँच करण्यात आला आहे.  सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष यांनी चीझ लई कडक या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. विकी वाघ यांनी गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन केलेलं हे गाणं वैशाली सामंत यांनी गायलं आहे. तर या गाण्यात गौतमी पाटीलसह कुणाल पाटील, कुणाल मासले, मनोज कुंभार, आदम शेख यांनी भूमिका केली आहे. अतिशय धमाल शब्द, ठेका धरायला लावणारी उडती चाल असल्याने हे गाणं नक्कीच प्रेक्षकांची दाद मिळवणार यात काहीच शंका नाही. चीझ लई कडक या गाण्यात एक गोष्ट सांगण्यात आली आहे. गुंडांच्या अड्ड्यावर होणाऱ्या या गाण्यात गौतमी पाटील नेमक काय करते हे जाणून घेण्यासाठी हा म्युझिक व्हिडिओ पूर्ण पाहणं गरजेचं आहे. मात्र चीझ लई क

लेक वाचवायची हाक देणारं हे नवं कोर गाणं आलं भेटीला ! पहा ‘Y’ सिनेमा फ़क्त झी टॉकीज वर.

Image
  ‘मुलीच्या जन्माचे स्वागत करा,  त्यांचा जगण्याचा अधिकार हिरावून घेऊ नका, त्यांना शिक्षण द्या, सक्षम बनवा’ याची जनजागृती करण्यासाठी देशभर मोहीम राबवली जात आहे. हाच विचार पडद्यावर मांडणाऱ्या ‘वाय’ या सिनेमाने प्रेक्षकांना अंतर्मुख केलं होतं. याच निमित्ताने एक खास गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं  आहे. या गाण्यात “मुलीला जन्म द्या” हा सुंदर संदेश अगदी प्रभावीपणे देण्यात आला आहे. ‘वाय’ हा सिनेमा स्त्रीभ्रूण हत्या या विषयावर बेतला आहे. झी टॉकीज वाहिनीच्या प्रेक्षकांना हा सिनेमा रविवारी २४ डिसेंबरला दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता पाहता येणार आहे. या सिनेमाच्या खास प्रमोशनसाठी हे नवं गाणं तयार करण्यात आलं आहे.   “मुलगी झाली हो” असं सांगताना अनेक पालकांच्या चेहऱ्यावर आनंद नव्हे तर दुःख असते. पहिली मुलगी असेल तर दुसऱ्यावेळी छुप्या पद्धतीने गर्भलिंग निदान केलं जातं आणि मुलीचा गर्भ असल्याचं कळलं की गर्भातच तिचा जीव घेतला जातो. जर दुसरी मुलगी जन्माला आली तर तो तान्हा जीव अनाथाश्रमाच्या पायरीशी ठेवला जातो किंवा रेल्वे रुळावर टाकला जातो. समाजात ही मानसिकता इतकी खोलवर रुजली आहे की ‘मुलगी व

नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांचा अनोखा कानमंत्र.

Image
सध्या चला फिरूया.. हसूया.. जगूया.. म्हणत, नाना पाटेकर एका धम्माल सहलीला निघालेत. हा प्रवास सिद्धार्थ आणि सायलीसोबत चालू आहेच पण यात मकरंद अनासपुरे सुद्धा त्यांच्या साथीला आहेत. दिग्गज कलाकारांची मैत्री आपल्याला चित्रपटाच्या प्रवासात पहिल्यांदाच एकत्र पाहता येणार आहे. बऱ्याच वर्षानंतर ही कलंदर जोडी 'ओले आले' या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आली आहे. आपल्या अभिनयाचे आणि विनोदाचे चौकार आणि षट्कार मारायला नाना आणि मकरंद अनासपुरे सज्ज असून कोकोनट मोशन पिक्चर्स प्रस्तुत 'ओले आले' हा चित्रपट नववर्षात म्हणजे ५ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  'ओले आले' चित्रपटात 'व्यस्त रहा.. पण मस्त रहा..' असं म्हणणारे नाना सिद्धार्थला जगण्याचे सूत्र सांगताना दिसताहेत. खरं तर हा मूलमंत्र ते स्वतःच्या दैनंदिन व्यवहारातून, कधी प्रेमाने तर कधी हट्टाने मुलाला शिकवू पाहताहेत. बाबा आणि मुलाच्या या मजेशीर जुगलबंदीमध्ये मकरंद अनासपुरे देखील सामील झालेले दिसणार आहेत. आपलं आयुष्य आनंदी, समाधानी असावं असं म्हणणारे मकरंद अनासपुरे या कुटुंबाचा महत्त्वाचा घट

२६ जानेवारीला होणार ‘नवरदेव B Sc. Agri.’ रिलीज.

Image
'शेतकरी राजा आणि या राजाला न मिळणारी नवरी' या गंभीर प्रश्नावर प्रभावी भाष्य करणारा 'नवरदेव (Bsc Agri.)' हा चित्रपट २६ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होतोय. आज (ता. २३) राष्ट्रीय कृषीदिनाच्या निमित्ताने या चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात आला.  आपला अन्नदाता म्हणजेच शेतकरी, तंत्रज्ञानाने कितीही विकसित झाला, कितीही प्रगत शेती केली, तरीही आज त्याला लग्नासाठी मुलगी मिळणं अवघड झालंय. दिग्दर्शक राम खाटमोडे यांनी अगदी योग्य पद्धतीने या विषयावर भाष्य करत हा विषय किती महत्त्वाचा आहे हे दाखवून दिले आहे. शेतकरी लग्नाळू तरूणांची कथा सांगणाऱ्या ‘नवरदेव BSc. Agri.’ या चित्रपटाचं टिजर रिलीज झालं आणि प्रेक्षक त्याला उत्तम प्रतिसाद देत आहेत. तर काही दिवसांपूर्वी रिलीज झालेलं या चित्रपटातील 'भेटणार कधी नवरदेवा नवरी' हे गाणंही प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं. शेतीचं उत्तम शिक्षण घेतलेल्या महत्त्वाकांक्षी तरूणालाही लग्नासाठी कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं याची कथा या चित्रपटातून आपल्याला बघायला मिळणार आहे. क्षितीश दाते, प्रविण तरडे, प्रियदर्शिनी इंदलकर, मकरंद अनासपुरे, गा

जेष्ठ नाट्य - चित्रपट समीक्षक कमलाकर नाडकर्णी स्मृतिगत '३७ व्या रविकिरण बालनाट्य स्पर्धेत' पार्ले टिळक मराठी माध्यम, विद्यालयाची 'पधारो म्हारे देस' अव्वल!

Image
                जेष्ठ नाट्य - चित्रपट समीक्षक कमलाकर नाडकर्णी स्मृतिगत 'रविकिरण मंडळाची ३७ व्या बालनाट्य स्पर्धा नुकतीच मुंबईतील यशवंत नाट्यमंदिर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट बालनाट्याचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, संगीत, प्रकाश योजना तसेच अभिनय (मुलींमध्ये) तृतीय व अभिनय (मुलांमध्ये) उत्तेजनार्थ पारितोषिके पटकावून हे बालनाट्य अव्वल ठरले. यासोबत द्वितीय क्रमांक सेक्रेड हार्ट, हायस्कुलच्या 'को म की का' या बालनाट्यास तर तृतीय पुरस्कार आर्टिस्ट प्लॅनेट, काळाचौकी शाळेच्या 'जा रे जा, सारे जा' पटकाविले. तसेच पहिले उत्तेजनार्थचे बक्षीस विलेपार्ले महिला संघ - मराठी माध्यम शाळेच्या 'छोटा अंबानी' या बालनाट्याला तर दुसरे उत्तेजनार्थ गुरुकुल द डे स्कूलच्या 'अ-फेअर'ला देण्यात आले. या चुरशीच्या स्पर्धेत १७ बालनाट्यांचा समावेश होता, त्यातून हा अंतिम निकाल देण्यात आला आहे.  लालबाग, परळ या कामगार विभागातील डिलाईल रोड 'रविकिरण मंडळ हे 'दक्षिण मुंबईचं सांस्कृतिक केंद्र' म्हणून ओळखले जाते. ते

'सत्यशोधक' चित्रपटाचे ट्रेलर लॉन्च.

Image
  समस्त स्त्री वर्गाला शिक्षणाची वाट दाखवणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची संघर्षमय गाथा ५ जानेवारीला ‘सत्यशोधक’ चित्रपटाच्या स्वरूपात मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. पण कल्पना करा, की सावित्रीमाई आणि ज्योतिराव खरोखर आपल्या समोर अवतरले तर? वेगळ्याच भावना असतील ना... हो.. असंच काहीसं घडलंय, ‘सत्यशोधक’च्या ट्रेलर लॉन्च दरम्यान... ‘सत्यशोधक’चा ट्रेलर लॉन्च सोहळा अगदी थाटामाटात पार पडला, यावेळी ज्योतिरावांच्या भूमिकेतील अभिनेते संदीप कुलकर्णी आणि सावित्रीमाईंच्या भूमिकेतील अभिनेत्री राजश्री देशपांडे यांनी त्यांच्या चित्रपटातील लूकमध्ये एंट्री घेतली. यामुळे उपस्थितांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले आणि साक्षात हे प्रेमळ जोडपं आपल्या समोर उभं राहिलं आहे असा भास उपस्थितांना झाला. ‘सत्यशोधक’ चित्रपटाच्या यापूर्वी आलेल्या टिझर आणि लूक रिव्हीलमुळे आधीच या चित्रपटाची जोरदार चर्चा झाली होती. आता रिलीज झालेल्या ट्रेलरमुळे  म. फुले आणि सावित्रीमाईंच्या माहीत नसलेल्या पैलूंची उलगड या ट्रेलरमध्ये होते, यामुळे चित्रपट नक्की कसा असेल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून

केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर, एकमेकांच्या साथीने समाजात बदल घडवू पाहणाऱ्या तरुणाईची गोष्ट...'८ दोन ७५'

Image
अनेक महोत्सवांमध्ये गौरवलेला '८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी' हा चित्रपट १९ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुश्रुत भागवत दिग्दर्शित या चित्रपटाची मोठी चर्चा असून, चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे विकास हांडे, लोकेश मांगडे, सुधीर कोलते यांनी "८ दोन ७५" : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटाची निर्मिती केली आहे,  शर्वाणी - सुश्रुत यांनी चित्रपटाच्या पटकथालेखनाची, तर संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे. अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, ,राधिका हर्षे - विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी असे उत्तमोत्तम कलाकार या चित्रपटात आहेत, तर अभिनेता पुष्कर श्रोत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. वैभव जोशी यांच्या गीतांना अवधून गुप्ते संगीतबद्ध केलं आहे.  फ्रान्स , सर्बिया, सिंगापूर युनायटेड स्टेट्स, भूतान, यूगोस्लाव्हिया, इटली येथील आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल्ससह भारतात, पो

'कोकण चित्रपट महोत्सव २०२३' दिमाखात संपन्न.

Image
कोकणातील कलावंतांचे कलागुण सर्वदूर पोहोचवण्याच्या हेतूने तसेच कोकणातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी अहोरात्र प्रयत्नशील असणाऱ्या सिंधुरत्न कलावंत मंचच्यावतीने आयोजित करण्यात आलेला 'कोकण चित्रपट महोत्सव २०२३' नुकताच दिमाखात संपन्न झाला. मालवणमधील मामासाहेब वरेरकर नाट्यगृहामध्ये पुरस्कार सोहळ्याच्या रूपात या महोत्सवाची सांगता करण्यात आली. शनिवार १६ डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी मराठी तारे-तारकादळच मालवणमध्ये अवतरले. मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीच्या परफॅार्मन्सने सजलेल्या या सोहळ्यात 'सरला एक कोटी' या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या, अभिनेता ओमकार भोजनेने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या आणि प्रियदर्शनी इंदलकरने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले. सिंधुरत्न कलावंत मंचाचे अध्यक्ष विजय पाटकर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत गणपतीच्या आरतीने पुरस्कार सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर विजय पाटकर यांनी मनोगत व्यक्त करत कोकण चित्रपट महोत्सवाची संकल्पना विषद केली. कोकण चित्रपट महोत्सव उत्तरोउत्तर मोठ

भीतीची बाराखडी दिसणार ‘पंचक’च्या टायटल साँगमध्ये.

Image
डॅा. श्रीराम नेने आणि माधुरी दिक्षित नेने निर्मित ‘पंचक’ हा चित्रपट येत्या नवीन वर्षात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे उत्कंटावर्धक ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाले. सिनेरसिकांची या ट्रेलरला पसंती मिळत असतानाच आता या चित्रपटाचे टायटल साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. एकम… द्वितीय… तृतीय… अशी आगळीवेगळी सुरूवात असणारे हे गंमतीशीर गाणे सुहास सावंत यांनी गायले असून गुरू ठाकूर यांचे शब्द लाभलेल्या या गाण्याला मंगेश धाकडे यांचे संगीत लाभले आहे. हे गाणे ऐकायला जितके श्रवणीय आहे, तितकेच ते पाहायलाही कमाल आणि मजेदार आहे. जयंत जठार आणि राहुल आवटे दिग्दर्शित या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते आहेत. आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दिप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत . गाण्याबद्दल दिग्दर्शक राहुल आवटे म्हणतात, ‘’हे गाणे पडद्यावर

सूर्यासम तेजस्वी अजेय योद्धा..'शिवरायांचा छावा' अवतरणार.

Image
छत्रपती संभाजी महाराज म्हणजे असामान्य पराक्रमांचे अधिपतीच. इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांत कोरलं गेलेलं स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं  अवघं आयुष्य एक धगधगतं अग्निकुंड म्हणावं लागेल. मोठ्या पडद्यावर संभाजी महाराजांचा जीवनपट उलगडण्याचं शिवधनुष्य दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी उचललं आणि तेव्हापासून एकच चर्चा रंगली ती म्हणजे 'शिवरायांचा छावा' साकारणार कोण..? या तेजस्वी, धाडसी, शस्त्रशास्त्र पारंगत शंभूराजांची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारायची चालून आलेली सुवर्णसंधी कोणत्या कलाकाराला मिळणार हे लवकरच आपल्या समोर येणार आहे. तत्पूर्वी 'शिवरायांचा छावा' चित्रपटाच्या लक्षवेधी पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे.           ए. ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट प्रस्तुत 'शिवरायांचा छावा' नववर्षात म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मल्हार पिक्चर्स कं.चे वैभव भोर, किशोर पाटकर, मधू यांनी या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सह-निर्मिती भावेश रजनीकांत पंचमतीया यांनी केली आहे. संभाजी महाराजांच्या धगधगत्य

पोट धरून हसायला लावणार 'आईच्या गावात मराठीत बोल' चित्रपट... धमाकेदार टिजरने वेधलं लक्ष.

Image
थ्री इडियट्स फेम ओमी वैद्य मोठ्या दणक्यात मराठी चित्रपट क्षेत्रात पदार्पण करत आहे. टीएटीजी फिल्म्स एलएलपीची प्रस्तुती असलेला "आईच्या गावात मराठीत बोल" ह्या चित्रपटाची प्रदर्शनाआधीच जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या चित्रपटाचा टिजर नुकताच प्रदर्शित झाला आहे. टिजर पाहणाऱ्या सगळ्यांची नुसती हसून पुरेवाट होत आहे. सगळ्या कलाकारांचं विनोदाचं टायमिंग इतकं उत्तम जुळून आलंय की चित्रपटाच्या 19 जानेवारी,2024 या रिलीज डेटची सगळे वाट पाहत आहेत. ओमी वैद्यच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळाच्या गणेश उत्सवातील नाटकाने झाली होती. अभिनयावरील प्रेमापोटीच ओमीने अमेरिका ते भारत हा मोठा प्रवास केला. ओमीने 'चतुर' या आपल्या भूमिकेच्या माध्यमातून हिंदी भाषिकांमध्ये आपला असा चाहता वर्ग याआधीच निर्माण केला आहे. आणि आता मराठी प्रेक्षकांचे मन जिंकण्याचे मोठं चॅलेंज त्याने स्वीकारलं आहे. पहिल्याच मराठी सिनेमात तो दिग्दर्शक आणि अभिनेता अशा दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे. आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची बाजू चोख सांभाळत ओमीने मराठीतील दिग्गज कल

भद्रकाली प्राॅडक्शन्सची ५९ वी धमाकेदार नाट्यकृती 'माझ्या बायकोचा नवरा'.

Image
प्रसाद कांबळी यांच्या भद्रकाली प्राॅडक्शन्सची ५९ वी धमाकेदार नाट्यकृती 'माझ्या बायकोचा नवरा' ही आता लवकरच रंगभूमीवर येण्यास सज्ज झाली असून या नाटकाचा शुभरंभाचा प्रयोग येत्या रविवारी म्हणजेच २४ डिसेंबरला आचार्य अत्रे रंगमंदिर,कल्याण येथे होणार आहे.  या धमाल विनोदी नाटकाची निर्मिति श्रीमती कविता मच्छिन्द्र कांबळी, दिनू पेडणेकर, अभिजित देशपांडे, राहुल कर्णिक यांनी केली आहे.या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन सागर देशमुख यांनी केले असून सागर देशमुख, अनिता दाते, पुष्कराज चिरपुटकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.  "माझ्या बायकोचा नवरा" हे विनोदी नाटक नवरा बायकोच्या नात्याबद्दलचं आहेच पण, नात्यातली असुरक्षितता आणि चिरंतर प्रेमाबद्दलही बोलणारं आहे. 

१०० व्या नाट्यसंमेलनानिमित्त महाराष्ट्रभर 'नाट्यकलेचा जागर' कार्यक्रम. एकांकिका स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा, एकपात्री स्पर्धा, नाट्य अभिवाचन स्पर्धा, नाट्यछटा स्पर्धा, नाट्यसंगीत पद गायन स्पर्धा होणार.

Image
रंगभूमीची मध्यवर्ती संघटना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई आयोजित, नाट्य संस्कृती लाभलेल्या महाराष्ट्र राज्यात मानाचे शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन जानेवारी २०२४ ते मे २०२४ याकालावधीत महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने मोठ्या स्वरूपात आणि धुमधडाक्यात साजरे होणार आहे. या संमेलनाचा महत्वाचा भाग महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील कलावंत, नाट्यकर्मींसाठी 'नाट्यकलेचा जागर' हा स्पर्धात्मक महोत्सव दिनांक १५ जानेवारी २०२४ पासून सुरू होणार असून या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील सर्व कलावंतांनी भाग घ्यावा असे आवाहन नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी केले आहे. 'नाट्यकलेचा जागर' हा स्पर्धात्मक महोत्सव महाराष्ट्रातील विविध २२ केंद्रांवर रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, बीड, नांदेड, लातूर, औरंगाबाद, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वाशिम, ठाणे, नवीमुंबई , मुंबई येथे होणार आहे. यात एकांकिका स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा, एकपात्री स्पर्धा, नाट्य अभिवाचन स्पर्धा, नाट्यछटा स्पर्धा, नाट्यसंगीत पद गायन स्पर्धा होणा

'बाईपण भारी देवा' चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग, निर्माता, जिओ ,कलाकारांनी मानले मायबाप प्रेक्षकांचे आभार..

Image
 केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' चित्रपट सरत्या वर्षातला बॉक्सऑफिसवर आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेला मराठी चित्रपट ठरला आहे. 'बाईपण भारी देवा' प्रदर्शित होऊन आता अनेक महिने लोटले तरीदेखील प्रेक्षकांमध्ये या कलाकृती विषयीचा उत्साह तसूभरही कमी झालेला दिसत नाही. अजूनही पुन्हा पुन्हा चित्रपटाचा आनंद घेण्यासाठी अनेकजण उत्सुक दिसत आहेत. खरंतर प्रदर्शनाआधीच प्रेक्षकांमध्ये 'बाईपण भारी देवा' विषयी कमालीची उत्सुकता पहायला मिळाली होती, बॉक्सऑफिसवर हा चित्रपट कमाल करेल अशी चर्चाही रंगली होती. आणि अगदी तसंच सगळं घडत गेलं. हे फक्त आणि फक्त शक्य झालं ते मायबाप प्रेक्षकांमुळेच!   आणि म्हणूनच चित्रपटाचे यश साजरं करत निर्माती माधुरी भोसले यांच्यातर्फे १६ डिसेंबर रोजी मुंबईत या सिनेमाचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. चित्रपटाचे निर्माते, कलाकार आणि संपूर्ण क्रू यावेळेस उपस्थीत होते. विशेष म्हणजे मुंबईचे डब्बेवाले आपल्या धकाधकीच्या जीवनात थोडासा विरंगुळा म्हणून चित्रपट पाहण्यास आवर्जून उपस्थित होते. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आताही हा विशेष शो

९ फेब्रुवारीला भेटायला येणार 'डिलिव्हरी बॅाय’.

Image
 'डिलिव्हरी बॉय' हे नाव ऐकले की, डोळ्यांसमोर येतो तो घरी येऊन सामान देणारी ‘डिलिव्हरी बॉय’. मात्र सध्या अनेकांचे लक्ष वेधले आहे, ते सोशल मीडियावर झळकलेल्या ‘डिलिव्हरी बॅाय’ने. एका बॅाक्समध्ये छोटे बाळ दिसत आहे. आता हे बॅाक्समधील बाळ आणि डिलिव्हरी बॅायचा नेमका संबंध काय, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान हा चित्रपट ९ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लुसिया एंटरटेनमेंट प्रोडक्शन हाऊस निर्मित, सिनेपोलिस सिनेमा प्रस्तुत, मोहसीन खान दिग्दर्शित या चित्रपटाचे दीपा नायक प्रस्तुतकर्ता आहेत तर डेव्हिड नादर निर्माते आहेत. राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे.  चित्रपटाचे दिग्दर्शक मोहसीन खान म्हणतात, " 'डिलिव्हरी बॉय' हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांचे मनोरंजन करेल. हसत हसत सामाजिक संदेश देणारा हा सिनेमा आहे. या चित्रपटाचे नाव ‘डिलिव्हरी बॅाय’ का आहे, याचे उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे.’’

‘अल्ट्रा झकास’च्या ‘कॅफे कॉमेडी’ स्टँड अप शोला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद.

Image
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वसलेल्या विविध मराठी बोलीतील विविध गोष्टी आपल्या विनोदी ढंगाने सादर करणाऱ्या उत्कृष्ट कलाकारांची फौज ‘कॅफे कॉमेडी’ या ‘अल्ट्रा झकास’च्या स्टँड अप शोमध्ये दाखल झाली आहे. ‘कॅफे कॉमेडी’ हा ओटीटी माध्यमावर येणारा पहिला स्टँड अप शो महाराष्ट्रातल्या घराघरात पोहचून रसिक प्रेक्षकांचं मन दिवसेंदिवस जिंकून घेत आहे. ‘कॅफे कॉमेडी’ स्टँड अप शो आशिष पाथरे यांनी निर्मित केले असून अमोल जाधव हे दिग्दर्शन करत आहेत. शोमध्ये संदीप गायकवाड, मंदार मांडवकर, आकांक्षा अशोक, किमया मयेकर, रोहन कोतेकर, केतन साळवी, सचिन सकपाळ आणि रामदास टेकाळे हे कलाकार आपल्या विनोदी कौशल्याने प्रेक्षकांचं जोरदार मनोरंजन करत आहेत. या कलाकारांसोबतच आणखी तगडे कलाकार शोमध्ये आपले कौशल्य दाखवण्यासाठी येणार आहेत. तसेच मराठमोळी अभिनेत्री काजल केशव आपल्या खास सूत्रसंचालनाने या शोची खास आकर्षण बनली आहे.      “कॅफे कॉमेडी’ हा शो प्रेक्षकांचं खास मनोरंजन करतो आहेच पण त्याचबरोबर शोच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात दडलेल्या नव्या कलाकारांना मिळत असलेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून आनंद होत आ

मराठी चित्रपटांना जागतिक गौरव मिळवून देणारा उमेश कुलकर्णी दिग्दर्शित 'वळू' अल्ट्रा झकासवर पहाण्याची संधी.

Image
          महाराष्ट्रातला एक अविस्मरणीय कथा आणि कथेतील मजेदार पात्र असणारा चित्रपट ‘वळू’ आता २२ डिसेंबर २०२३ पासून ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर पहायला मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते ‘उमेश कुलकर्णी’ यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून 'रोटरडॅम', आशियाई, वॉर्सा, कार्लोवी वेरी, रेकजाविक -आइसलँड, ला रोशेल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सह पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २००८ मध्ये ‘वळू’ चित्रपटास सर्वोत्तम दिग्दर्शन आणि सर्वोत्तम छायांकन असे पुरस्कार मिळाले आहेत. कुसवडे गावात वर्षानुवर्षे चालत आलेल्या प्रथेनुसार गावकऱ्यांनी देवाला वाहिलेला ‘डुरक्या’ नावाचा वळू गावात धुमाकूळ घालतो. तेव्हा डुरक्याला पकडण्यासाठी गावातले सरपंच( डॉ. मोहन आगाशे) फॉरेस्ट ऑफिसर स्वानंद गड्डमवारांना (अतुल कुलकर्णी) बोलावतात. डुरक्याला पकडण्याच्या या धुमाकुळात गावात काय काय धमाल घडते हे चित्रपटात पहायला मिळणार आहे. या चित्रपटातील प्रमुख कलाकार अतुल कुलकर्णी, मोहन आगाशे, भारती आचरेकर, गिरीश कुलकर्णी, वीणा जामकर, दिलीप प्रभावळकर, निर्मिती सावंत, नंदू माधव, रेणुका दफ्तरदार, मंगेश सातपुत

रील्स बनवणाऱ्या तळागाळातील कलाकारांचा 'रीलस्टार''चा मुहूर्त ..

Image
        पूर्वीच्या जमान्यात रीळांवर सिनेमा दाखवला जायचा, पण काळानुरुप सिनेमा बदलला असून, आज तो अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचत आहे. आज सिनेमांमधून रीळ गायब झाली असली तरी तुमच्या आमच्या सर्वांच्याच जीवनात 'रील्स'च्या माध्यमातून ती आजही कायम आहे. छोट्या-मोठ्या रिल्स बनवून त्या द्वारे काही ना काही संदेश देत मनोरंजन करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. शहरातील गल्ल्यांपासून खेड्यांतील वाड्या-वस्त्यांमध्ये रील्सचं फॅड पसरलं आहे. रील्स बनवणाऱ्या तळागाळातील कलाकारांचा प्रवास 'रील स्टार' या आगामी चित्रपटाद्वारे रसिकांसमोर येणार आहे. 'रील स्टार' या मराठी चित्रपटाचा नुकताच मुहूर्त करण्यात आला.  जे ५ एन्टरटेन्मेंट आणि इनिशिएटिव्ह फिल्म या बॅनर्सखाली निर्माते जोस अब्राहम यांनी 'रीलस्टार' या आगामी चित्रपटाची निर्मिती करण्याचे शिवधनुष्य उचललं आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला आहे. मराठीसह हिंदीतही रिलीज झालेल्या 'अन्य' या बहुचर्चित चित्रपटाचे दिग्दर्शक सिम्मी जोसेफ आणि रॅाबिन वर्गिस 'रीलस्टार'चं दिग्द

बॉलिवूडलाही पडली 'पंचक'ची भुरळ काजोल, करण जोहर, शिल्पा शेट्टी, रितेश देशमुख यांच्यासह अनेक कलाकारांनी दिल्या शुभेच्छा .

Image
डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित यांची निर्मिती असलेला 'पंचक' चित्रपट येत्या नवीन वर्षात म्हणजेच ५ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सिनेप्रेमी 'पंचक'च्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात आहेत. प्रेक्षकांच्या ट्रेलर पसंतीस उतरत असतानाच या चित्रपटाची भुरळ बॉलिवूडच्या कलाकारांनाही पडली आहे. सध्या बॉलिवूड सेलिब्रिटी सोशल मीडियावरून डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. यात काजोल,शिल्पा शेट्टी, रितेश देशमुख, करण जोहर, संजय कपूर अशा अनेक नामवंतांनी आपल्या सोशल मीडियावरून ट्रेलरचे भरभरून कौतुक केले आहे.   जयंत जठार आणि राहुल आवटे दिग्दर्शित या चित्रपटात आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दिप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर अशी त

सायली आणि सिद्धार्थच्या मनातले 'फुलपाखरू'...

Image
'सांग ना मनाला माझ्या कसं सावरू' म्हणणारी चुलबुली सायली संजीव आणि मराठी चित्रपटसृष्टीतला चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकर यांची गोड जोडी सध्या सर्वत्र चर्चेत आहे. निसर्गाच्या कुशीत मनमुराद आनंद लुटत, एका सुंदर प्रवासात सायली आणि सिद्धार्थ प्रेमात पडताना दिसत आहेत. काय बरं नेमकं चाललं असेल? कोकोनट मोशन पिक्चर्स प्रस्तुत 'ओले आले' या आगामी चित्रपटात सायली आणि सिद्धार्थ ही युथफुल जोडी आपल्याला मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. दोन विरुद्ध स्वभावधर्माच्या तरीही एकमेकांच्या प्रेमात असणाऱ्या या जोडीचा धम्माल प्रवास आपल्याला ५ जानेवारी २०२४ पासून चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे. 'एक अशा प्रवासाची गोष्ट, ज्याने शिकवले जीवन जगण्याचे सूत्र!' अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटातून सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर आपल्या भेटीला येणार आहेत. संपूर्ण परिवारासाठी निखळ मनोरंजन हा या चित्रपटाचा गाभा असून नानांसोबत मकरंद अनासपुरे, सायली संजीव आणि सिद्धार्थ चांदेकर या कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळेल.  विशेष म्हणजे बॉलीवूडमधील प्रसिद्ध संगीतकार जोडी सचिन-जिगर यांच

स्त्रीशक्तीचा जागर करणारा ‘सोंग्या’ चित्रपटगृहात.

Image
'मुलगी शिकली प्रगती झाली' अशा पाट्या जागोजागी आपण पाहतो. हे आशादायी चित्रं कितपत खरंय हा मात्र संशोधनाचा विषय आहे. वरकरणी जरी स्त्रिया आज बंधमुक्त असल्या तरी कधी समाज-संस्कृती तर कधी घराण्याची मानमर्यादा-इभ्रत अशा बेगडी प्रतिष्ठांना सर्रास बळी पडताना दिसतात. त्यात शहरी-निमशहरी सगळ्याचजणी भरडल्या जातात. अशाच एका विषयाकडे मनोरंजनाच्या माध्यमातून अगदी हलक्या-फुलक्या पद्धतीने लक्ष वेधण्याचा निरामि फिल्म्सने प्रयत्न केला आहे. मिलिंद इनामदार दिग्दर्शित 'सोंग्या' हा चित्रपट १५ डिसेंबरपासून चित्रपटगृहात दाखल होत आहे.  दिपक यादव यांनी लिहिलेली ही संवेदनशील कथा शुभ्रा आणि यशराज या दोन प्रेमी युगुलांवर आधारित आहे. या दोघांच्या अनुषंगाने खुलत जाणारी ही  प्रेमकथा जुनाट रूढी-परंपरांच्या विळख्यात अडकते. समाजाला शरण न जाणारी शुभ्रा आपल्यावरील अन्याय सहन तर करत नाहीच पण ती अशा रूढींविरोधात आवाज उठवते. आपल्या पारंपरिक भारुडांच्या माध्यमातून जनजागृती करणारी प्रातिनिधिक स्वरूपातील शुभ्रा हे पात्र असंख्य मुलींचे बळी जाण्यापासून वाचवू शकते अशी निर्माते-दिग्दर्शक मिलिंद इनामदार या

खोतांच्या घराला लागलेले पंचक सुटणार ? पहिली झलक..... प्रदर्शित.

Image
डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने प्रस्तुत 'पंचक' या चित्रपटाचा उत्सुकता वाढवणारा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहाताना दिसत आहेत. नुकताच 'पंचक'चा शानदार ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने  या मराठमोळ्या जोडीने हा खास मराठी चित्रपट आपल्या मराठी प्रेक्षकांसाठी आणला आहे. जयंत जठार, राहुल आवटे दिग्दर्शित या चित्रपटात आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दीप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर अशी तगडी स्टारकास्ट आहे. राहुल आवटे यांचे लेखन असलेल्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते आहेत.  घरात पंचक लागल्याने आता कोणाचा नंबर लागणार, याची भीती घरातील सर्वांनाच भेडसावत असतानाच प्रत्येक जण आपापल्यापरीने यावर उपायही शोधत आहे. या सगळ्यात कोणाची  सर्कस सुरू आहे तर कोणाचा ऑपेरा सुरु आहे. आता खोतां