Posts

Showing posts from January, 2024

स्पृहा जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांचा ‘लॉस्ट अँड फाऊंड’ चित्रपट आता अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर.

Image
आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना एकमेकांशी बोलायला वेळ मिळत नाही. ऋतुराज धलगाडे दिग्दर्शित ‘लॉस्ट अँड फाऊंड’ चित्रपटाने आयुष्यात एकटेपणा जाणवणाऱ्या लोकांना त्यांच्या जीवनातील आनंदाचे क्षण शोधण्यासाठी प्रेरित करण्याचा सुंदर संदेश दिला आहे. ‘लॉस्ट अँड फाऊंड’ चित्रपट १ फेब्रुवारी २०२४ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावण्याचे दु:ख लोक उराशी बाळगून असतात, कुटुंबापासून दूर राहणाऱ्या लोकांना एकटेपणा जाणवतो. अशा लोकांच्या आयुष्यातील संवादाचा दुरावा भरून काढण्यासाठी मानस, नैना, मारुती आणि श्रीरंग काका हे चार लोक ‘ॲंटी लोनलीनेस प्रोग्राम’ सुरू करतात, लोकांच्या जीवनातील एकटेपणाची पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करतात. पण प्रोग्राम यशस्वी ठरेल की नाही हे चित्रपटात पहायला मिळणार आहे. “एकटेपणा हा केवळ शब्द नसून ती एक भावना आहे, जी ठराविक काळाने कोणालाही जाणवू शकते. परंतु त्याचा परिणाम न होता आनंदी राहण्याचा प्रयत्न करणे ही गरज आहे. हा विलक्षण संदेश देणारा चित्रपट तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा आहे” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटे

‘लोकशाही’ चित्रपटाचा शानदार ट्रेलर आणि म्युझिक लॉंच सोहळा दणक्यात पार पडला.

Image
लोकशाही चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. हीच उत्सुकता पुढे ताणत ३० जानेवारी २०२४ रोजी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लॉंच सोहळा दणक्यात पार पडला आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या जबरदस्त ट्रेलर आणि चित्रपटातील गाण्यांने रसिकांचं मन जिंकून घेतलं असून सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे.  घराणेशाहीत जगणाऱ्या प्रस्थापितांचा कोणत्याही थराला जाऊन सत्ता मिळवण्याचा हव्यास ट्रेलरमधून दिसत आहे. या सत्तासंघर्षात कोणाचातरी जीव जाणार आहे, पण कोणाचा जीव कोण घेणार या रहस्याचं कोडं चित्रपटात उलगडणार आहे. मनाला प्रश्नांच्या घेऱ्यात अडकवणारं कथानक, गंभीर आणि खोल संवाद, दर्जेदार कलाकारांची जुगलबंदी, मंत्रमुग्ध करणारी गाणी आणि अंगावर शहारे आणणारं पार्श्वसंगीत या समीकरणामुळे लोकशाही चित्रपटाची चर्चा महाराष्ट्रात सर्वत्र होताना दिसत आहे.   चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा चित्रपटाचे निर्माते सुशीलकुमार अग्रवाल, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, तेजश्री प्रधान, अमितरियान आणि सर्व कलाकार व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत दणक्यात पार पडला. मोहन आगाशे

भाव माझ्या मनातला ! म्यूझिक मंत्रच्या मंचावर ख्यातनाम सिने दिग्दर्शक श्री राजदत्त यांचा ९२वा वाढदिवस सोहळा संपन्न...

Image
       मराठी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम दिग्दर्शक  राजदत्त  यांच्या ९२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून म्यूझिक मंत्रने गप्पा गोष्टी आणि राजदत्त यांच्या चित्रपटातील गाणी सादर करून व त्यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवासाचा आढावा घेत, एका आगळया वेगळया पद्धतीने त्यांचा जन्मदिवस राजदत्त यांच्या नातेवाईक व मित्र परिवारा सोबत साजरा केला.         या कार्यक्रमात म्यूझिक मंत्रच्या संचालिका डॉ. स्मिता डोंगरे यांनी राजदत्त यांची मुलाखत घेताना  राजदत्त यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग प्रेक्षकांना सांगीतले. एवढ्या थोर व्यक्तिची साथ आणि आशिर्वाद म्यूझिक मंत्र या आमच्या संस्थेला लाभला, आम्ही धन्य झालो, अशी प्रतिक्रिया म्यूझिक मंत्रचे संचालक डॉ. स्मिता डोंगरे आणि रमेश पूजारी यांनी व्यक्त केली. पारंपरिक पद्धतीने औक्षण करून वाढदिवस साजरा करण्यात आला, या प्रसंगी राजदत्त यांची कन्या प्रसिद्ध चित्रपट संकलक भक्ति मायाळू यांनी म्यूझिक मंत्राच्या  संपूर्ण टीमचे आभार मानले.  म्यूझिक मंत्राच्या संचाने मला खूप भावनिक केले. तुमच्या प्रेमाने मी विरघळून गेलो हा कार्यक्रम मी कधीही विसरू शकणार नाही अशी प्रतिक्रिया

ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांना २०२३ चा 'महाराष्ट्र भूषण' जाहिर.

Image
ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.  मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले.  "अशोक सराफ यांनी  केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून  घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले" असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करतांना म्हटले आहे

'तुझ्याविना' व्यक्त करणार मनातील प्रेमभावना .

Image
अवधूत गुप्ते यांनी सोशल मीडियावर ‘विश्वामित्र’ या अल्बममधील दुसऱ्या गाण्याचा टिझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘तुझ्याविना’ असे ह्या गाण्याचे बोल असून, तुटलेल्या हृदयाची कहाणी सांगणाऱ्या ह्या गाण्यातून प्रेमाची आणखी एक कथा पाहायला मिळणार आहे. ही प्रेमकथा आपल्याला येत्या २ फेब्रुवारीला समजणार आहे. अवधूत गुप्ते यांचे संगीत, बोल असलेल्या या गाण्याला आवाजही त्यांचाच लाभला आहे. एकविरा म्युझिक  प्रस्तुत ‘विश्वामित्र’ या अल्बमची निर्मिती गिरीजा गुप्ते यांनी केली आहे. या गाण्याबद्दल अवधूत गुप्ते म्हणतात, "आयुष्यात प्रत्येकाला कधीना कधी प्रेम होते. कोणाचे प्रेम शेवटपर्यंत टिकते तर कोणाची साथ अर्ध्या वाटेतच सुटते. या माझ्या मित्रमैत्रिणींच्या तुटलेल्या हृदयातील भावना मी या गाण्यातून मांडल्या आहेत. या गाण्यातील कथा, भावना मनात खोलवर भिडणाऱ्या आहेत. जसे प्रेम संगीतप्रेमींनी ‘विश्वामित्रा’च्या पहिल्या गाण्याला दिले, प्रेक्षकांची तीच पसंती या गाण्यालाही मिळेल.’’

हसू आणि आसूने भरलेल्या 'कन्नी'चा प्री टिझर भेटीला

Image
मैत्री, प्रेम आणि स्वप्न यांना जोडून ठेवणारी ‘कन्नी’ येत्या ८ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, या चित्रपटाचे प्री टिझर सोशल मीडियावर झळकले आहे. प्रत्येकाला आपल्या मैत्रीची आठवण करून देणाऱ्या या प्री टिझरमध्ये हसू आणि आसूही दिसत आहेत. यात हृता दुर्गुळे, शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यांच्यात घनिष्ट मैत्री दिसत असून त्यात अजिंक्य राऊतही दिसत आहे. आता अजिंक्य यांच्या आयुष्यात नेमका का आला असेल आणि यातून या चौघांची मैत्री काय वळण घेणार, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल.  मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन समीर जोशी यांचे असून अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी 'कन्नी'चे निर्माते आहेत. दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात, '' पतंग आणि मांजाला जोडून ठेवण्याचे काम ज्याप्रमाणे 'कन्नी' करते तसेच आपल्या आयुष्यातही  मैत्री, प्रेम आणि स्वप्नं यांना जोडून ठेवणारी एक 'कन्न

'झी युवा' नेहमीच नव्या टॅलेंटच्या शोधात !

Image
  झी युवा ही वाहिनी प्रेक्षकांना मनोरंजनाची पर्वणी देण्याबरोबरच या क्षेत्रातील नव्या टॅलेंटलाही तितकाच वाव देण्यासाठी पुढाकार घेत असते. चित्रपट असो किंवा रंगभूमी, या माध्यमातील नव्या दमाच्या कलाकारांसाठी झी युवा वाहिनीचे दालन नेहमीच खुले असते. विशेष म्ह्णजे कलाक्षेत्रातील युवा टॅलेंटला झी युवा वाहिनीने नेहमीच व्यासपीठ दिले आहे. याची प्रचिती नुकतीच नाट्यप्रेमी व रसिकांना आली ती अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धेच्या मंचावर. ११ वर्षाची सातत्यपूर्ण परंपरा असलेल्या अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धेसाठी झी युवा वाहिनीने पॉवर्ड बाय या माध्यमातून आपला सहभाग दिला. *अहमदनगर महाकरंडक पॉवर्ड बाय झी युवा* अंतिम फेरीत राज्यातून आलेल्या २५ एकांकिका सादर झाल्यात. त्यामुळे स्पर्धकांत निकालाची उत्सुकता होती. रविवारी बक्षीस वितरण झाले. झी वाहिनीचे चिफ चॅनेल ऑफिसर , मराठी मूवी क्लस्टर( Zee Talkies, Zee Yuva and Chitramandir ) त्यांच्या रोजच्या कामाच्या व्यापातुन वेळ काढून स्वत: अहमदनगर मध्ये उपस्थित होते . एवढेच नवे तर त्यांनी सर्व एकांकिका प्रेक्षकांमध्ये बसून पाहिल्या आणि त्याचा आनंदही घेतला.. त्याच बर

प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय बळीराजाचा ‘नवरदेव Bsc Agri.’...

Image
शेतीवर प्रेम करणाऱ्या आणि अन्नदात्याचा मनापासून सन्मान करणाऱ्या प्रत्येकासाठी असा ‘नवरदेव Bsc Agri.’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला, आणि काही कालावधीतच या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. शेतकरी असलेले आणि शेतीचा काहीही संबंध नसलेले असे दोन्ही प्रकारचे प्रेक्षक हा चित्रपट आनंदाने बघायला जात आहेत, आणि चित्रपट पसंतीस पडल्याने भरभरून प्रतिसादही देत आहेत. शहरी तसेच ग्रामीण भागातील चित्रपटगृहात प्रेक्षक गर्दी करत आहेत. शेती करत असलेल्या Bsc Agri मुलाला लग्न जमविण्यासाठी काय उठाठेव करावी लागते, याची साधी, सरळ, सोपी गोष्ट या चित्रपटातून सांगण्यात आली आहे. लेखक-दिग्दर्शक राम खाटमोडे आणि सहलेखक विनोद वणवे यांनी शेतकऱ्याच्या भावना अगदी योग्य पद्धतीने मोठ्या पडद्यावर मांडल्या आहेत. अभिनेता क्षितीश दाते आणि अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर यांच्या ग्रामीण भूमिकांचं कौतुक होतंय, तर मकरंद अनासपुरे यांनी साकारलेला वडिलांच्या भूमिकेतील सच्चा शेतकरी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतोय. क्षितीश, प्रियदर्शिनी यांच्यासोबतच प्रविण तरडेंचा तडका, मकरंद अनासपुरेंचा हशा, गार्गी फुलेंची

'डिलिव्हरी बॉय'च्या ट्रेलर लाँचला साजरे झाले 'डोहाळे जेवण'.

Image
सरोगसी हा शब्द आता आपल्याला बऱ्यापैकी परिचित झाला आहे. हा शब्द जरी आपण आत्मसात केला असला तरी याची प्रक्रिया अनेकांच्या पचनी पडत नाही. याचे वैज्ञानिक आणि भावनिक महत्व आजही अनेक जण मान्यच करत नाहीत. याच संकल्पनेवर आधारित 'डिलिव्हरी बॉय' हा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी चित्रपटातील आठ गर्भवतींच्या 'डोहाळे जेवणाचा'चा खास कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. अतिशय पारंपरिक आणि राजेशाही थाटात या डोहाळे जेवणाचा सोहळा संपन्न झाला. मोहसीन खान दिग्दर्शित या चित्रपटात प्रथमेश परब, पृथ्वीक प्रताप आणि अंकिता लांडे पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सोहळ्याला चित्रपटातील कलाकारांसह बॅालिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनिस बाझमी, मुश्ताक खान आदी मान्यवर उपस्थित होते. सिनेपोलिस आणि दीपा नायक प्रस्तुत, लुसिया एंटरटेनमेंट प्रोडक्शन निर्मित ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाचे डेव्हिड नादर निर्माते आहेत तर फेलिक्स नादर, विकास श्रीवास्तव, विकास सिंग, राझ धाकड आणि ऋषिकेश पांडे सहनिर्माते आ

श्री शिवाजी मंदिर येथे रंगणार ‘मित्राची गोष्ट’ आणि ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ नाटकांचे प्रयोग.

Image
नव्या कलाकारांना घडवत त्यांना उत्तम व्यासपीठ मिळावे या उद्देशाने 'सृजन' ने  एक मिशन सुरू केलं. ‘सृजन द क्रियेशन’ ही फक्त कार्यशाळा नसून एक संस्था आहे.आणि एक सृजनशील संवेदनशील माणसांचे एक जागतिक कुटुंब आहे. ‘आपली स्पर्धा स्वतःशीच करावी’ हा मंत्र प्रत्येकाच्या मनावर  बिंबवत  आजवर  वेगवेगळया  उपक्रमांच्या माध्यमातून सृजन द क्रियेशनच्या कलाकारांनी अनेक स्पर्धांमध्ये जवळपास ३० च्या वर एकांकिका, अनेक दिर्घ अंक, ४० एक शॉर्टफिल्म केल्या आणि पुरस्कार पण मिळवले. त्यातल्याच विजय तेंडुलकर लिखित ‘मित्राची गोष्ट’ आणि अभिराम भडकमकर लिखित ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ या दोन नाटकांचे  प्रयोग श्री  शिवाजी मंदिर येथे रंगणार आहेत.   प्रत्येक नवोदित कलाकाराचं श्री शिवाजी मंदिर येथे प्रयोग करायचं स्वप्न असतं. सृजन द क्रियेशनच्या कार्यशाळेतील कलाकारांचं हे स्वप्न पूर्ण होणार आहे. येत्या सोमवारी  ५ फेब्रुवारीला दुपारी ३.३० वाजता ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ ह्या नाटकाचा आणि  मंगळवारी ६ फेब्रुवारीला रात्री ८ वाजता ‘मित्राची गोष्ट’ ह्या नाटकाचा प्रयोग श्री शिवाजी मंदिर दादर येथे होणार आहे. अर्थात हा सगळ

‘लग्नकल्लोळ’चे धमाकेदार टिझर प्रदर्शित .

Image
मयुरी देशमुख, सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘लग्नकल्लोळ’ या चित्रपटाचा जबरदस्त टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. टिझर पाहून प्रेक्षक या धमाकेदार चित्रपटाची आतुरतेने वाट पाहाणार, हे नक्की! टिझरमध्ये सिद्धार्थ सोबत मयुरी लग्नमंडपात दिसत आहे तर दुसऱ्या क्षणी भूषण मयुरीला लग्नाची मागणी घालताना दिसत आहे. यावरून मयुरी नक्की कोणासोबत लग्न करणार आणि हा काय ‘लग्नकल्लोळ’ सुरू आहे, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच मिळणार आहे. चित्रपटात या प्रमुख कलाकारांसोबत अनेक दमदार कलाकार आहेत. हा लग्नाचा धमाका १ मार्चला उडणार आहे.  मयुर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे, आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे निर्माते आहेत. तर मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे दिग्दर्शित 'लग्न कल्लोळ' या चित्रपटाचे लेखन जितेंद्रकुमार परमार यांनी केले आहे.  चित्रपटाबद्दल दिग्दर्शक, मोहम्मद बर्मावाला म्हणतात, " चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. लग्न म्हटले की घरात  कल्लोळ हा आलाच. पर

रजित कपूर साकारणार औरंगजेब.

Image
‘ब्योमकेश बक्षी' या मालिकेमुळे घराघरात पोहचलेले अभिनेते रजित कपूर औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहेत. राकेश सुबेसिंह दुलगज निर्मित आणि दिग्दर्शित 'छत्रपती संभाजी' या मराठी चित्रपटात ते क्रूरकर्मा औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट येत्या २ फेब्रुवारी २०२४ रोजी आपल्या भेटीला येणार आहे.परफेक्ट प्लस एंटरटेनमेंट’ आणि ‘एजे मीडिया कॉर्प’ प्रस्तुत 'छत्रपती संभाजी' हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू आणि इंग्रजी मध्ये एकाच वेळी प्रदर्शित होत आहे.  औरंगजेब क्रूर शासक होता, सोबत तो धोरणी आणि  कपटी  होता. त्यामुळे औरंगजेबसाठी कसलेला कलाकार हवा होता, रजित कपूर या भूमिकेला न्याय देऊ  शकतील  यामुळे  त्यांना  ही संधी  दिल्याचं दिग्दर्शक राकेश सुबेसिंह  दुलगज सांगतात.  आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना रजित कपूर ते सांगतात की, मी आतापर्यंत खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका केल्या. ‘छत्रपती संभाजी’ च्या निमित्ताने मला प्रथमच नकारात्मक ऐतिहासिक भूमिका करण्याची संधी मिळाली.  या चित्रपटाचा मी महत्त्वपूर्ण भाग आहे याचा मला आनंद आहे.   रजित कपूर यांच्यासह प्रमोद पवार, शशा

'झिलमिल' गाण्यातून घडणार 'मुसाफिरा'ची सफर.

Image
 'मुसाफिरा' आणि 'मन बेभान' या उत्स्फूर्तदायी गाण्यांनंतर आता 'मुसाफिरा' चित्रपटातील तिसरे गाणे नुकतेच सोशल मीडियावर झळकले आहे.  'झिलमिल' असे या गाण्याचे बोल असून हे बहारदार गाणे सलीम मर्चंट यांनी गायले आहे. तर या गाण्याचे बोल अदिती द्रविड हिचे असून साई -पियुष यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. स्कॉटिश हायलँड्सच्या निसर्गरम्य वातावरणात हे गाणे चित्रित करण्यात आले असून डोळ्यांचे पारणे फिटणारे हे गाणे आहे. पुष्कर जोग, पूजा सावंत, पुष्कराज चिरपुटकर, स्मृती सिन्हा, दिशा परदेशी यांची घनिष्ट मैत्री या गाण्यातून समोर येत आहे. सफरीवर निघालेले हे 'मुसाफिरा' जीवनाचा पुरेपूर आनंद लुटताना दिसत असून हे या गाण्यातून मैत्रीतील प्रेमही झळकत आहे. हे गाणे जितके सुरेल आहे, तितकेच चित्रीकरणस्थळही आकर्षक आहे.  गाण्याबद्दल पुष्कर जोग म्हणतात ," 'झिलमिल' हे गाणे खरंच खूप भारी आहे. स्कॉटिश हायलँड्सच्या एका सुंदर ठिकाणी आम्ही याचे चित्रीकरण केले आहे. कोणीही प्रेमात पडेल असे हे स्थळ आहे. हे गाणे ऐकताना आणि पाहताना आपण स्वतःही तिथेच असल्याचा भास होईल

'कन्नी'च्या नवीन पोस्टरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता .

Image
समीर जोशी दिग्दर्शित 'कन्नी' या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. मागच्या वेळी बिग बेनला मिठी मारलेले पोस्टर झळकले होते. या पोस्टरने उत्कंठा वाढवलेली असतानाच आता या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. सायकलवर बसलेली हृता दुर्गुळे, शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यात दिसत आहेत. मात्र यात अजिंक्य राऊत मिसिंग असल्यामुळे हे पोस्टर बघून पुन्हा एकदा प्रेक्षकांची उत्सुकता निश्चितच वाढली असणार. पोस्टरमधील चौघांचेही आनंदी चेहरे त्यांच्यातील घट्ट मैत्री दर्शवत आहेत. मैत्री, प्रेम आणि स्वप्नांकडे झेप घेणारी ही 'कन्नी' ८ मार्चलाला प्रेक्षकांशी बांधली जाणार आहे. मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन समीर जोशी यांचे असून अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी 'कन्नी'चे निर्माते आहेत.  चित्रपटाविषयी दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात, '' ज्याप्रमाणे 'कन्नी' जशी पतंगाला ब

'बापल्योक’ ॲमेझॅान प्राईम व्हिडिओवर...

Image
आपल्या प्रत्येक कलाकृतीतून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि मकरंद माने हे दोन मातब्बर दिग्दर्शक.   ‘बापल्योक’ चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक मकरंद माने यांच्या साथीला लेखक-दिग्दर्शक नागराज मंजुळे प्रस्तुकर्ते म्हणून उभे राहिले आणि ‘बापल्योक’ सारखा सुंदर चित्रपट प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहचला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी त्याचं भरभरून कौतुक केलं ‘बापल्योक’ सारखी मनस्वी दमदार कलाकृती रसिकांपर्यंत  पोहोचावी यासाठी त्यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचे चीज होताना दिसतेय. ‘बापल्योक’ चित्रपटाने आजवर अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यांमध्ये लक्षवेधी कामगिरी केली आहे. नावाजलेल्या  पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये 'संत तुकाराम' सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट हा मानाचा बहुमान मिळवणारा तसेच महाराष्ट्राचा फेवरेट कोण?, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आंध्रप्रदेश तिरुपती, आपला बायोस्कोप, सिंधुरत्न पुरस्कार अशा पुरस्कार सोहळ्यांमध्ये गौरविलेला ‘बापल्योक’ चित्रपट आता ‘अॅमेझॅान प्राईम व्हिडिओ’ वर आला आहे. 

‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण.

Image
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सध्या त्यांच्या ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. नुकतंच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. यानिमित्ताने चित्रपटाच्या टीमने रॅपअपचे फोटो शेअर केले आहेत. चित्रपटात ‘मुक्ताई’ची, संत ज्ञानेश्वरांची भूमिका कोण साकारणार? याविषयी उत्सुकता असून चित्रपटात काही नवे चेहरे दिसण्याची शक्यता आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी चित्रीकरण पूर्ण झाल्याची माहिती देताना सांगितले की, ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाच्या चित्रीकरणाचा अनुभव खूपच दैवी होता आणि विलक्षण आंतरिक शांती प्रदान करणारा होता. आमच्या संपूर्ण टीम ने या चित्रीकरणाच्या दरम्यान अतीव मानसिक समाधान मिळाल्याचे वेळोवेळी सांगितले आहे. ‘शिवराज अष्टका’तील चित्रपटांना मिळत असलेल्या अभूतपूर्व यशानंतर महाराष्ट्राच्या संत परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा अध्याय ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यासाठी लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सज्ज झाले असून ए.ए.फिल्म्स प्रस्तुत ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपट जून २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  संत ज्

'डिलिव्हरी बॉय' साजरे करणार डोहाळे जेवण 'तू आई होणार' गाणे प्रदर्शित .

Image
मोहसीन खान दिग्दर्शित 'डिलिव्हरी बॉय' येत्या ९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटातील 'तू आई होणार' हे नवेकोरे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. प्रथमेश परब, पृथ्वीक प्रताप, अंकिता लांडे पाटील आणि आठ गर्भवती महिलांवर चित्रित करण्यात आलेले हे गाणे अतिशय कलरफुल आहे. खूपच  सुंदर बोल असणारे हे गाणे डोहाळे जेवणाचे असून हे सुरेल गाणे आर्या आंबेकरने गायले आहे. तर या गाण्याला प्रशांत मदपुवार यांचे अर्थपूर्ण बोल आणि चिनार - महेश यांचे संगीत लाभले आहे. अंकिताही 'तू आई होणार' या गाण्यातून एका वेगळ्याच लूकमध्ये समोर आली आहे. तिचा हा सोज्वळ लूक तिच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल. हे गाणे जितके श्रवणीय आहे तितकेच त्याचे सादरीकरणही उत्कृष्ट आहे.  डोहाळे जेवण हा प्रत्येक गर्भवतीसाठी स्वतःचे लाड पुरवून घेण्याचा दिवस असतो. या आठ गरोदर बायकांचा कौतुक सोहळा आणि सेलिब्रेशन करणारे हे गाणे आहे. आईपणाची हळवी भावना या गाण्यातून व्यक्त होत आहे.  गाण्याबद्दल दिग्दर्शक मोहसीन खान म्हणतात, " डोहाळेजेवण हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असतो. या

अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर २२ मार्चला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Image
महाराष्ट्राच्या गौरवशाली शिवइतिहासाची महागाथा सांगणाऱ्या ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख एका भव्य सोहळ्यात जाहीर करण्यात आली आहे. हा सोहळा मुंबईतील वडाळा येथे राम मंदिरात संपन्न झाला. अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधत या बहुप्रतीक्षित ऐतिहासिक चित्रपटाच्या नवीन पोस्टरचे अनावरणही करण्यात आले. हा भव्य सिनेमा २२ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी सोनाली कुलकर्णी, आशय कुलकर्णी, तसेच चित्रपटाचे निर्माते अक्षय बर्दापूरकर व दिग्दर्शक राहुल जाधव उपस्थित होते. या मंगल समयी कलाकारांच्या हस्ते धार्मिक विधीने श्रीराम पूजा आणि हवनही करण्यात आले.  निर्माते अक्षय बर्दापूरकर म्हणतात, " चित्रपटाचे पोस्टर अनावरण हे केवळ चित्रपटाचीच ओळख करून देणार नाही तर या महत्वाच्या दिवसाचे अध्यात्मिक महत्वही आत्मसात करणार आहे. 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी'चा प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. हा चित्रपट 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' यांच्या शौर्याला मानवंदना आहे. हा गौरवशाली

मयुरी देशमुख, सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधानचा ‘लग्नकल्लोळ’. लवकरच...

Image
काही दिवसांपूर्वीच 'लग्न कल्लोळ' चित्रपटाचे एक जबरदस्त मोशन पोस्टर आपल्या भेटीला आले होते. पोस्टरमध्ये भूषण प्रधान, मयुरी देशमुख आणि सिद्धार्थ जाधव पाठमोरे दिसत होते. आता त्यांच्या लूकवरील पडदा उठला असून त्यांचे चेहरे समोर आले आहेत. सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधान दोघेही मुंडावळ्या बांधून वरमाला घेऊन सज्ज आहेत. मात्र दोघांपैकी कोण मयुरीच्या गळ्यात ही वरमाला घालणार, हे अद्याप गुपित आहे. हे गुपित १ मार्चला उलगडणार आहे.  मयुर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे निर्माते आहेत. तर मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे दिग्दर्शित 'लग्न कल्लोळ' या चित्रपटाचे लेखन जितेंद्रकुमार परमार यांनी केले आहे.  चित्रपटाबद्दल दिग्दर्शक, निर्माते डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे म्हणतात, " चित्रपटात या तिघांच्या भूमिका आहेत, हे यापूर्वीच जाहीर झाले आहे. आता त्यांचे लूक प्रेक्षकांसमोर आले आहेत. या चित्रपटात प्रेक्षकांना धमाल पाहायला मिळणार आहे. हे कलाकारच इतके कमाल आहेत की, हे कल्लोळ करणा

मकरंद, तेजस्विनीचा ‘छापा काटा’ आता ओटीटीवर.

Image
मुंबई: अभिनेते मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी ते मराठीतले अनेक तगडे स्टार असणारा अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत ‘छापा काटा’ चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात जोरदार धमाका उडवला होता. आता हा चित्रपट घरबसल्या अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर पहाण्यासाठी उपलब्ध झाला आहे. मकरंदचा सिनेमा म्हणजे 100% मनोरंजनाची खात्री, ज्यांची चित्रपटगृहात ही संधी हुकली होती, त्यांच्यासाठी पुन्हा घरबसल्या ही मजा घेता येणार आहे. चित्रपटाची निर्मिती श्री. सुशीलकुमार अग्रवाल यांनी केली असून पटकथा आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केली आहे. अभय जोधपुरकर, आर्या आंबेकर, सुनिधि चौहान आणि आदर्श शिंदे यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजातील गीतांने प्रेम, भावना आणि उत्साहाचा जबरदस्त संगम जुळून आला आहे. चित्रपटातील या सुमधुर गीतांना सुप्रसिद्ध संगीतकार मुकेश काशीकर आणि गौरव चाटी यांनी आपल्या संगीत कौशल्याने संगीतबद्ध असून गाण्यांना रसिक प्रेक्षकांचा संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. लोकांना वेड्यात काढून पॉलिसी विकणारा करामती नाम्या बहिणीच्या लग्न

दमदार स्टारकास्ट असलेला 'हजारवेळा शोले पाहिलेला माणूस' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला......

Image
हिंदी चित्रपटाच्या इतिहासात "शोले' हा चित्रपट फार महत्त्वपूर्ण आहे. या चित्रपटानं लोकप्रियतेचे मापदंड बदलले, अनेक कलाकारांचं करिअर घडवलं. शोले हा चित्रपट आजही प्रचंड लोकप्रिय आहे. म्हणूनच "शोले" या चित्रपटाच्या महानतेला "हजारवेळा शोले पाहिलेला माणूस" या मराठी चित्रपटातून सलाम केला जाणार आहे. या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. नुकतेच मुंबई फेस्टिवल येथे या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग करण्यात आले होते.    राजेश डेम्पो, भक्ती डेम्पो, सगूण वाघ, श्रीदेवी शेट्टी वाघ यांनी "हजारवेळा शोले पाहिलेला माणूस" या चित्रपटाची निर्मिती केली आहे. शोले मीडिया अँड एंटरटेन्मेंट, कुबेरन्स टेक व्हेंचर्स चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर जीत वाघ असोसिएट प्रोड्यूसर आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन हृषिकेश गुप्ते यांनी केलं आहे. अभिनेते दिलीप प्रभावळकर, अभिनेता सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता दातार, मिलिंद शिंदे, किशोर कदम बालकलाकार श्रीरंग महाजन अशी दमदार स्टारकास्ट असून अभिनेते आनंद इंगळे,समीर धर्माधिकार

‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ खळबळ निर्माण करणारं नाटय....

Image
सोशल मिडीयाच्या फेसबुक, इन्स्टाग्राम सारख्या माध्यमातून ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ पाठवून नवनवीन मित्रांच्या ओळखी करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. कधी कधी आलेली एखादी अनोळखी 'फ्रेन्ड रिक्वेस्ट' तुमचं आमचं आयुष्यही बदलू शकते. तुमचा विश्वास बसत नाही का ? मग रंगभूमीवर येणारे ‘सवाईगंधर्व’, ‘जमदग्नीवत्स’ आणि 'व्यास क्रिएशन्स' या तीन संस्थांची निर्मिती असणारे ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ हे नाटक तुम्हाला पहावे लागेल. या नाटकाचे लेखन प्रसाद दाणी यांचे असून दिग्दर्शन कुमार सोहोनी यांचे आहे. अभिनेते अजय पुरकर, आकाश भडसावळे तसेच शैलेश देशपांडे, वैशाली गायकवाड हे या नाटकाचे निर्माते आहेत. चौघांचं आयुष्य एका 'फ्रेन्ड रिक्वेस्ट' ने कसं बदलत जातं हे दाखवतानाच नात्यांचे वेगवेगळे कंगोरे आणि बंध यांचा उलगडा करणारं 'फ्रेन्ड रिक्वेस्ट' हे सस्पेन्स, इमोशनल, कॉमिक अशा विविध मिश्रणाचं नाटक आहे. प्रसिद्ध अभिनेते आशिष पवार, मालिका अभिनेत्री प्रियांका तेंडोलकर, अभिनेते अतुल महाजन आणि बाजीप्रभू, सुभेदार या भूमिका रंगवणारे अभिनेते अजय पुरकर हे या नाटकात मध्यवर्ती भूमिकेत आहेत. या नाटका

टिप्स फिल्म्स आणि कुमार तौरानी ह्यांच्या "श्रीदेवी प्रसन्न" ह्या पहिल्या वाहिल्या मराठी चित्रपटाचं गाणं “दिल में बजी गिटार” प्रदर्शित.

Image
 टिप्स फ़िल्म मराठी हे मनोरंजनाच्या दुनियेतील एक मोठे नाव! "श्रीदेवी प्रसन्न" या सिनेमातून त्यांनी आता मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला आहे. सिनेमावेड्या फॅमिलीज ही ह्या सिनेमाची एक थीम आहे आणि म्हणूनच काही हिंदी गाणी हटके पद्धतीने ह्या चित्रपटाचा भाग बनली आहेत. 'देखा जो तुझे यार', हे टिप्स चंच गाणं वेगळ्या ढंगात पेश केलं गेलं आहे आणि त्याचा लाँच इव्हेंट तितक्याच शानदार पद्धतीने पार पडला आहे.      "श्रीदेवी प्रसन्न" मधून सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांची फ्रेश जोडी येत्या प्रेक्षकांसमोर येणार आहे. टीझर आणि ट्रेलर ला मिळालेल्या रिस्पॉन्सने बोल्ड ब्युटीफुल सई व चॉकलेट बॉय सिद्धार्थ ह्यांच्या फिल्म साठी लोक किती उत्सूक आहेत ते सिद्ध केलं आहेच. येत्या २ फेब्रुवारीला हा चित्रपट सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.      "श्रीदेवी प्रसन्न, या फ्रेश चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल विमल मोढवे आणि लेखन अदिती मोघे यांनी केले आहे.  सहकुटुंब सहपरिवार एन्जॉय करता येईल अशी लोकांपर्यंत आणावी हाच ह्या चित्रपटामागचा थॉट आहे

अहमदनगर महा करंडक एकांकिका स्पर्धेला झी युवा वाहिनीची साथ.... पहा कुठे रंगणार स्पर्धा.

Image
झी युवा वाहिनी प्रेक्षकांसाठी नेहमीच मनोरंजनाचा  खजिना उलगडत असते. नवनवीन संकल्पना मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात झी युवा वाहिनीचा मोठा वाटा आहे. विशेषतः युवा प्रेक्षकांची अभिरुची लक्षात घेऊन त्यांना आवडणाऱ्या कथा ,कार्यक्रम यांची निर्मिती करण्यात झी युवा वाहिनीचा हातखंडा आहे. मालिका चित्रपट नाटक यानंतर आता हौशी रंगकर्मीच्या अभिनय कौशल्याने सजलेल्या *अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धा २०२४* या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या एकांकिका स्पर्धेला *झी युवा* या वाहिनीची साथ मिळाली आहे. अहमदनगर महा करंडक एकांकिका Powered by झी युवा , स्पर्धेच्या प्राथमिक फेरया महाराष्ट्रातील ६ मुख्य शहरात झाल्या आणि त्याला मुलांचा तुडुंब प्रतिसाद मिळाला . सध्या अंतिम फेरी १८ ते २०  जानेवारीला अहमदनगर येथील माऊली सभागृहात रंगत आहे. झी युवा ही वाहिनी प्रायोजक म्हणून अहमदनगर महा करंडक स्पर्धेत आपली भूमिका बजावत आहे. झी युवा ही वाहिनी युवकांच्या मनातील मनोरंजनाला नेहमीच स्थान देत आली आहे . त्याचबरोबर मनोरंजन विश्वातील युवा कलाकारांना व्यासपीठ देणाऱ्या अहमदनगर महा करंडक एकांकिका Powered by झी यु

प्रेम आणि मैत्रीतील सुंदर सफर घडवणाऱ्या ‘मुसाफिरा’चा ट्रेलर प्रदर्शित.

Image
 स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेला भारतातील पहिला चित्रपट हा मान मिळवणाऱ्या पुष्कर जोग दिग्दर्शित ‘मुसाफिरा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला  आला आहे.  रियुनियनच्या निमित्ताने भेटलेले हे पाचही मित्र एका अनोख्या दुनियेची सफर करताना दिसत आहेत. आयुष्यात आलेले, येणारे  चढउतार या सगळ्यांना सामोरे जाऊन कुठेतरी स्वतःसाठी जगताना ते दिसत आहेत. मैत्री म्हटल की, त्यात प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, भांडण या सगळ्या गोष्टी येतात. या सफरीचा मनमुराद आनंद लुटताना हे पाचही मित्र धमाल करणार आहेत. हा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाणार, हे पाहण्यासाठी आपल्याला २ फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स, ऐश मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने, नितीन वैद्य प्रोडक्शन आणि गुझबम्प्स एंटरटेन्मेंट प्रस्तुत ‘मुसाफिरा’ या चित्रपटात पुष्कर जोग, पूजा सावंत,  पुष्कराज चिरपुटकर, स्मृती सिन्हा, दिशा परदेशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतात, ‘’मुसाफिराच्या माध्यमातून मला प्रेक्षकांसाठी काहीतरी दर्जेदार करायचे होते. लॉकडाऊनच्या काळात सुचलेली माझी ह

"संघर्षयोद्धा" चित्रपटाचे चित्रीकरण जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू.

Image
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध 'संघर्षयोद्धा' मनोज जरांगे पाटील या चित्रपटातून घेतला जाणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू झालं असून याप्रसंगी स्वतः मनोज जरांगे पाटील, निर्माते, दिग्दर्शक आणि टीम आवर्जून उपस्थित होती. येत्या २६ एप्रिल २०२४ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.  सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेतर्फे "संघर्षयोद्धा" - मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारत असलेले रोहन पाटील, अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख हे देखील उपस्थित होते. गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाची कथा आणि निर्मिती केली आहे, सुधीर निकम यांनी पटकथा आणि संवाद केले आहे, तर शिवाजी दोलताडे दिग्दर्शनाची जबाबदारी निभावत आहेत. चित्रपटात अभिनेत्री सुरभी हांडे, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, जयवंत वा

अनोख्या नात्यावर परखड भाष्य करणारा ‘गाफील’, खा. नवनीत राणांच्या हस्ते ट्रेलर रिलीज.

Image
आदित्य या तरूणाच्या आयुष्यात होणाऱ्या गंभीर घटनांवर भाष्य करणाऱ्या ‘गाफील’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. यापूर्वी आलेल्या टीझरमुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावलेल्या असतानाच आता या ट्रेलरची एंट्री झाली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वेगवेगळ्या आशय-विषयाला धरून चित्रपट येत आहेत, ‘गाफील’ हा चित्रपटही त्यापैकीच एक असल्याचे ट्रेलरवरून जाणवत आहे. चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला अमरावती जिल्ह्याच्या खासदार सौ. नवनीत रवी राणा उपस्थित होत्या, त्यांच्या हस्ते ट्रेलर लॉन्च करण्यात आला. आजूबाजूच्या लोकांमध्ये संशयास्पद वर्तणूक असलेला आदित्य, सतत मुलींसोबत राहायची सवय, मुलींना फसविण्याचा स्वभाव आणि मुलींचा फायदा घेण्यासाठी असुसलेला आदित्य... त्याच्या आयुष्याभोवती फिरणारा ‘गाफील’ हा चित्रपट. पण कालांतराने असं काही घडतं ज्यामुळे त्याचं आयुष्य संपूर्णतः बदलून जातं. नक्की काय घडतं हे ट्रेलरमध्येच पाहा. नवोदित कलाकार आदित्य राज आणि अभिनेत्री वैष्णवी बरडे या दोघांच्या नात्यावर भाष्य करणारा हा चित्रपट असेल. मात्र, त्यांचं नक्की नातं काय हा प्रश्न औत्सुक्याचा ठरतो.  अमरावतीच

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का मिळावा याचं अचूक उत्तर देणारा आणि मराठी भाषेची श्रीमंती दर्शविणारा एक अनोखा कार्यक्रम!

Image
                      नाटक नृत्य संगीत याच्या माध्यमातून  दोन हजार वर्षांचा प्रवास मनोरंजनाच्या माध्यमातून उलगडत जाणारी ही कलाकृती यंदाच्या काला घोडा फेस्टिवल च्या शुभारंभाच्या दिवशी म्हणजेच २०  जानेवारी २०२४  रोजी संध्याकाळी सात वाजता वाय बी चव्हाण सेंटर नरिमन पॉईंट इथे सादर होणार आहे.  "मराठी असे आमुची मायबोली आम्ही मराठीतच बोलणार" असं म्हणणाऱ्यांपासून "मराठी आहोत हे सांगायला लाज वाटते" असं सांगणाऱ्या नव्या पिढीपर्यंत प्रत्येकाने पाहायलाच हवा असा हा कार्यक्रम. ‘राजभवन‘, ‘गेटवे ऑफ इंडिया‘,‘महाराष्ट्र सदन‘, ‘रॉयल ऑपेरा हाऊस‘ अशा ऐतिहासिक वास्तूमध्ये प्रयोग झाल्यानंतर आता पुन्हा एकदा काला घोडा फेस्टिवल मध्ये याचा प्रयोग होणे ही गौरवाची गोष्ट आहे. डॉक्टर समीरा गुजर लिखित मधुरा वेलणकर साटम दिग्दर्शित "मधुरव बोरू ते ब्लॉग" या कार्यक्रमाचे संगीत श्रीनाथ म्हात्रे नृत्यदिग्दर्शन सोनिया परचुरे प्रकाशयोजना शितल तळपदे आणि  नेपथ्य प्रदीप पाटील यांचे असून मधुरा वेलणकर साटम आकांक्षा गाडे आणि आशिष गाडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र

२० व्या 'थर्ड आय आशियाई चित्रपट' महोत्सवाचा समारोप सोहळा नव्या ऊर्जेने भारलेल्या वातावरणात संपन्न.

Image
गेला आठवडाभर रंगलेल्या २० व्या  थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचा सांगता सोहळा सिटीलाईट चित्रपटगृहात नुकताच संपन्न झाला. यंदाच्या आशियाई चित्रपट महोत्सवात वैविध्यपूर्ण चित्रपटांची मेजवानी देत रसिकांना आशियाई चित्रपट संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. सुमारे ४५ चित्रपटांचा आस्वाद रसिकांना यात घेता आला. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करताना महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम यांनी महोत्सवासाठी सहकार्य लाभलेल्या सर्वांचे आभार मानले आणि मिळालेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला. अनेकांच्या प्रयत्नांनी, सहकार्याने हा महोत्सव यशस्वी झाला असून महोत्सवाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल फेस्टिव्हल डिरेक्टर संतोष पाठारे यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी महोत्सवाचे कार्यकारिणी सदस्य श्रीकांत बोजेवार, चैतन्य शांताराम, संतोष पाठारे, संदीप मांजरेकर, प्रसिद्ध दिग्दर्शक सुनील सुकथनकर, ज्ञानेश झोटिंग आदि मान्यवर मंडळी उपस्थित होती.      सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना मा.विकास खारगे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने नेहमीच विव

‘डिलिव्हरी बॉय’ चित्रपटाच्या नवीन पोस्टरने वेधले प्रेक्षकांचे लक्ष...

Image
 मोहसीन खान दिग्दर्शित ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाचे एक नवीन गंमतीशीर पोस्टर आपल्या भेटीला आले आहे. पोस्टरमध्ये प्रथमेश परबच्या हातातील गिफ्टबॉक्समध्ये एक गोंडस बाळ दिसत आहे. त्याच्या बाजूला पृथ्विक प्रताप आणि डॅाक्टरच्या वेषात अंकिता लांडे पाटीलही दिसत आहे. त्यामुळे आता प्रथमेश या बाळांची डिलिव्हरी करणार का, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांना ९ फेब्रुवारीला मिळणार आहे.  सिनेपोलिस आणि दीपा नायक प्रस्तुत, लुसिया एंटरटेनमेंट प्रोडक्शन निर्मित ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाचे डेव्हिड नादर निर्माते आहेत तर फेलिक्स नादर, विकास श्रीवास्तव, विकास सिंग, राझ धाकड आणि ऋषिकेश पांडे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचे लेखन राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी केले आहे. दिग्दर्शक मोहसीन खान म्हणतात,  " या चित्रपटातून एक वेगळा विषय मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. सरोगसीसारख्या नाजूक विषयावर भाष्य करणाऱ्या आमच्या या चित्रपटातून प्रेक्षकांना संदेश देण्याचा एक प्रयत्न आहे. मात्र हे करताना या विषयाचे गांभीर्य  जपत आम्ही त्याला विनोदाची साथ दिली आहे.’’

ओमी वैद्यच्या `आईच्या गावात मराठीत बोल` मध्ये `स्टोरीटेल`चीही `भूमिका`

Image
जगातील प्रगत देशांमध्ये ऑडिओबुक्स ही संकल्पना लोकप्रिय ठरली. तशी ती आता आपल्याकडेही चांगलीच रुजते आहे. त्याचीच साक्ष देणारी घडमोड आता मराठी चित्रपटाच्या माध्यमातून पुढे आली आहे. ती म्हणजे, प्रसिद्ध अभिनेता ओमी वैद्य घेऊन येत असलेल्या आईच्या गावात मराठीत बोल या चित्रपटामध्ये `स्टोरीटेल`लाही `भूमिका` मिळाली आहे. या चित्रपटाचा नायक मराठी गोष्ट ऐकण्यासाठी `स्टोरीटेल` वापरतो, असे दाखवण्यात आले आहे. चित्रपटातून ऑडिओबुक्स दर्शनाचा अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग ठरावा.   याबाबत बोलताना, ओमी वैद्यने सांगितले, की मी या चित्रपटाचा नायक म्हणून भूमिका साकारत असताना `स्टोरीटेल`वर ` जस्ट फ्रेंडस्` ही गोष्ट ऐकताना दाखविण्यात आले आहे. मला ही कल्पना खूप आवडली. कारण, यातील नायक समर हा अमेरिकेतून आलेला आहे आणि त्याची मराठी खूप कच्ची आहे. ती सुधारण्यासाठी तो मराठीत गोष्टी ऐकतो, असा त्यातून संदेश देण्यात आला आहे. वास्तविक, मी स्वतः पुस्तके वाचणारा तसेच ऐकणारा आहे. मला पु. ल. देशपांडे यांचे साहित्य खूप आवडते. `स्टोरीटेल` वर पुलंच्या लेखनाचा आस्वाद घेता येतो, ही अतिशय आनंदाची बाब आहे.  `आईच्या गावा

'पश्चिम रंग पूर्व रूप' (मराठी ब्रॉडवे शो) आता प्लॅनेट मराठी ओटीटीवर.

Image
आपल्या मराठी रंगभूमीने प्राचीन काळापासूनच पौराणिक, संगीत, लोकनाट्य अशा विविध रंगछटा फुलवत आपला वारसा जोपासला. हाच वारसा पुढे नेण्यासाठी प्लॅनेट मराठी या पहिल्यावहिल्या मराठी ओटीटीनेही हातभार लावला आहे. नुकतेच प्लॅनेट मराठीवर 'पश्चिम रंग पूर्व रूप' (मराठी ब्रॉडवे शो) हे नाटक प्रदर्शित झाले आहे. बेसमेंट थिएटर शिकागो निर्मित या नृत्य नाट्य संगीतिकेची संकल्पना विद्या जोशी यांची असून याचे दिग्दर्शन श्रीधर जोशी यांनी केले आहे तर लेखन चिन्मय केळकर यांचे आहे. विजय केंकरे यांचे मार्गदर्शन लाभलेल्या या नाटकाचे संयोजक व व्यवस्थापक रवि जोशी आहेत. प्रियांका पारेख यांनी मुख्य नृत्य दिग्दर्शिका हि जबाबदारी लीलया सांभाळली. स्नेहा चाफळकर, मंदार पित्रे, संजय सवकूर, नितीन जोशी, सौरभ नेकलीकर, नितीन जोशी, मधुरा साने, कल्पना नेकलीकर, धनंजय  काळे, संजय सवकूर, सुनील मुंडले, केतन राईलकर, जयदीप बुझरूक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही कलाकृती प्रेक्षकांना प्लॅनेट मराठी ओटीटीवर पाहाता येणार आहे.  याबद्दल प्लॅनेट मराठी ओटीटीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, '' मराठी नाटकांवरचे

'विश्वमित्र' अल्बममधील टायटल सॉंगचा ट्रेलर प्रदर्शित.

Image
'विश्वमित्र' या अल्बमबद्दल काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर अवधूत गुप्ते यांनी पोस्ट शेअर केली होती. तर आता या अल्बममधील पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. पहिल्या `विश्वमित्र’ या गाण्याचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून या गाण्यातून नितेश चव्हाण आणि सुवर्णा काळे यांच्या प्रेमाची गोष्ट पाहायला मिळणार आहे. गाणे जरी रांगड्या मातीतील असले तरी या गाण्यातून दोघांची हळुवार सुरू होणारी प्रेमकहाणी दिसत आहे. त्यांची ही प्रेमाची गोष्ट येत्या १९ जानेवरीला  आपल्या भेटीला येणार आहे.  एकविरा म्युझिक  प्रस्तुत ‘विश्वमित्र’ या अल्बमची निर्मिती गिरीजा गुप्ते यांनी केली आहे. `विश्वमित्र`हे गाणं अवधूत गुप्ते यांनी गायले असून या गाण्याला संगीत आणि बोलही त्यांचेच लाभले आहेत.  या गाण्याबद्दल अवधूत गुप्ते म्हणतात, "आमच्या अल्बममधील टायटल सॉंग लवकरच प्रदर्शित होणार आहे. या गाण्यातील राकड, रांगडे शब्द लोकांना भावणारे  आणि आपलेसे करणारे आहे. गावाकडे सर्रास वापरले जाणारे हे बोलीभाषेतील शब्द गाण्यात एक गावरान तडका आणत आहेत. या गाण्यातून एक कथा उलगडत आहे.’’

१ मार्चला होणार 'लग्न कल्लोळ',...... चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित .

Image
 मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे दिग्दर्शित 'लग्न कल्लोळ' या चित्रपटाचे नवीन मोशन पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. या जबरदस्त पोस्टरमध्ये भूषण प्रधान, मयुरी देशमुख आणि सिद्धार्थ जाधव लग्नाच्या पेहरावात दिसत आहेत. तिघांच्याही हातात हार असून आता ही वरमाला कोणाच्या गळ्यात पडणार, हे जाणून घेणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तत्पूर्वी या नवीन पोस्टरसोबत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर झाली असून हा 'लग्न कल्लोळ' १ मार्चला होणार आहे. मयुर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे लेखन जितेंद्रकुमार परमार यांनी केले आहे.  'लग्न कल्लोळ' या चित्रपटाच्या नावावरून आणि मोशन पोस्टरवरून हा चित्रपट 'लग्न' या विषयावर भाष्य करणारा चित्रपट आहे, हे दिसतेय. मात्र आता यात 'कल्लोळ' काय पहायाला मिळणार, याचे उत्तर मात्र चित्रपटच देऊ शकेल. दरम्यान या चित्रपटाचे पोस्टर अतिशय कलरफुल आणि प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारे आहे.   चित्रपटाबद्दल द

जगातील सर्वश्रेष्ठ गुप्तहेराची यशोगाथा सांगणार 'बहिर्जी'.

Image
सौराज्याच्या मातीतच दडलेला अंगार हाय... बहिर्जी म्हंजे शिवबाची तळपती तलवार हाय... अशी टॅगलाईन असणाऱ्या 'बहिर्जी' या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल जनार्दन जाधव यांनी केले आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक योजनेमध्ये माती आड लपलेल्या अंगारसारखे धगधगते काम करणारे बहिर्जी नाईक इतिहासात फारसे दिसलेही नाही. त्यांचीच यशोगाथा ''बहिर्जी' या चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे. 'बहिर्जी'च्या मोशन पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता ताणली असून चित्रपटात कलाकार कोण असतील आणि हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस कधी येईल, याविषयी सुद्धा प्रेक्षकांमध्ये कमालीचे कुतूहल आहे. या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक राहुल जनार्दन जाधव म्हणतात, '' छत्रपती शिवरायांचा इतिहास म्हणजे आज आपल्यासाठी हिमानगाचे टोक आहे. बऱ्याच घटना काळाच्या उदरात अज्ञात आहेत. अशा काळात महाराजांची प्रत्येक योजना यशस्वी होण्यासाठी त्या योजनेचा पाया बनून राहिलेले बहिर्जी नाईक हे जगातील सर्वश्रेष्ठ गुप्तहेर ठरतात. त्यांच्या योजनाच इतक्

पुरुषोत्तम बेर्डे यांचा गावरान तडका... 'मुक्काम पोस्ट आडगाव'.

Image
पुरुषोत्तम बेर्डे हे नाव उच्चारलं की वैविध्यपूर्ण, नाविन्यपूर्ण काहीतरी असणार याची खात्री असते. रसिक प्रेक्षकांची नाडी नेमकी ओळखणाऱ्या पुरुषोत्तम बेर्डे यांची प्रत्येक कलाकृती आकर्षक आणि बहारदार असते. लवकरच ते रंगमंचावर एक जबरदस्त गावरान तडका घेऊन येत आहेत. त्यांच्या 'मुक्काम पोस्ट आडगाव' या नव्या नाटकाचा शुभारंभ २४ जानेवारीला दुपारी ४.०० वा. यशवंत नाट्यगृहात होणार आहे. अष्टविनायक प्रकाशित, स्नेहा प्रदीप प्रोडक्शन्स आणि अकॅडमी ऑफ सिनेमा अँड थिएटर निर्मित पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित या नाटकाद्वारे पुन्हा एकदा मराठी व्यावसायिक रंगभूमीवर नवीन अभिनेते, अभिनेत्री, गायक, नर्तक आणि  वादक पदार्पण करणार आहेत. 'रिव्ह्यू' या नाट्यप्रकारांत मोडणाऱ्या फॉर्ममध्ये निर्माता, संगीतकार, नेपथ्यकार, प्रकाशयोजनाकार, वेशभूषाकार व दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी हे नाटक २५ कलावंत तंत्रज्ञाच्या ताफ्यात उभे केले असून मराठवाड्यातील मूळ आडगाव मधून येऊन औरंगाबाद, पुणे, मुंबई नंतर संपूर्ण जग फिरलेले प्रदीप आडगावकर यांच्या आत्मनिवेदनातून अत्यंत नाविन्यपूर्ण असा नाट्याविष्कार निर्माता

'कन्नी'ने साजरी केली मकर संक्रांत, उत्सुकता वाढवणारे पोस्टर प्रदर्शित .

Image
मैत्री, प्रेम आणि स्वप्नांना जोडणारी 'कन्नी' येत्या ८ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तत्पूर्वी मकर संक्रांतीचे औचित्य साधत या चित्रपटाचे नवीन पोस्टर झळकले असून या चित्रपटातील कलाकारांनी यानिमित्ताने एकत्र येत, मकर संक्रांतही साजरी केली. हृता दुर्गुळे, शुभंकर तावडे, अजिंक्य राऊत, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यांनी पत्रकारांसोबत पतंग उडवण्याचा आनंद लुटला. मजा, मस्ती, धमाल, कल्लोळाने वातावरण चैतन्यमय झाले होते.  कलाकारांमध्ये कोण कोणाची पतंग कापणार, यात चुरसही लागली होती. यावेळी कलाकारांनी उपस्थितांना तिळगुळ देत, मकरसंक्रांतीच्या शुभेच्छाही दिल्या.  नवीन झळकलेल्या पोस्टरमध्ये हृता हार घातलेल्या बिग बेनला मिठी मारताना दिसत असून बाकी कलाकारांच्या चेहऱ्यावरील हावभाव काहीतरी सांगू पाहात आहेत. आता नेमके काय प्रकरण आहे, हे आपल्याला चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळणार असले तरी या पोस्टरने मात्र सिनेरसिकांची उत्सुकता निश्चितच वाढवली आहे. मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, क्रोम फिल्म

घराणेशाहीतला सत्तासंघर्ष टिपणाऱ्या 'लोकशाही' चित्रपटाचे पोस्टर लाँच.

Image
वारसा आपल्या भारत भूमीला थेट प्राचीन महाभारतापासून लाभलेला आहे.  घराणेशाहीतला हा सत्तासंघर्ष नेमका मिळालेला लाभ की शास्वत शाप हा प्रश्न उपस्थित करणारा सुशीलकुमार अग्रवाल निर्मित 'लोकशाही' या चित्रपटाच्या पोस्टरवरून प्रकर्षाने जाणवत आहे. चार दशकांहून अधिक भारताच्या सिनेसृष्टीत आपला झेंडा मानाने उंचावून फडकवत आलेली 'अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेड', 'लोकशाही' चित्रपट प्रस्तुत करत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'लोकशाही'च्या दृकश्राव्य गतिशिल शीर्षक पोस्टरमधून प्रेक्षकांच्या मनामनात उत्सुकता निर्माण जागी झाली होती. १५ जानेवारी २०२४ रोजी मकर संक्रांतीचे औचित्य साधून प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या मुख्य पोस्टरने आता प्रेक्षकांच्या मनात उत्सुकतेबरोबरच विलक्षण प्रश्नांची ठिणगी पेटवली आहे. पोस्टरमध्ये सुप्रसिद्ध अभिनेते मोहन आगाशे विचारमग्न गंभीर अशा अवस्थेत असून समीर धर्माधिकारी, तेजश्री प्रधान, भार्गवी चिरमुले आणि मराठी सिनेसृष्टीत नावाजलेला अमराठी अभिनेता अंकित मोहन हात जोडून लाखोंच्या संख्येत असणाऱ्या जनतेसमोर काहीतरी आव्हान करत अ

महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण पुरस्कारांमध्ये यंदा एक नवा पुरस्कार… पहा, समीक्षकांची कोणाला मिळणार पसंती.

Image
झी टॉकीजच्या प्रेक्षकांना दरवर्षी नवीन वर्षात उत्सुकता लागून राहिलेली असते ती म्हणजे *‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’* या पुरस्कार सोहळ्याची. लवकरच या पुरस्कारांची घोषणा होणार आहे. झी टॉकीज या वाहिनीवर हा पुरस्कार सोहळा पाहता येणार आहे. या पुरस्काराचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रेक्षकांनी ज्या चित्रपट व कलाकारांना पसंतीचा कौल दिलेला असतो त्यांनाच *‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’* या पुरस्काराने गौरवण्यात येते. प्रत्येक कलाकाराला मायबाप रसिकांकडून प्रेम हवं असतं. रसिक प्रेक्षकांकडून मिळणारी दाद त्यांना हवी असते. त्यामुळे वर्षभरात प्रदर्शित झालेल्या सिनेमांमधील कलाकार, दिग्दर्शक, गायक यांच्यासह विविध विभागांसाठी नामांकने जाहीर केली जातात. प्रेक्षकांनी दिलेल्या पसंतीचा कौलच यंदाचा *‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’* त्या नावावर शिक्कामोर्तब करत असतो. नव्या वर्षातील या पुरस्कारावर कोण नाव कोरणार याची चर्चा आता सुरू झाली आहे. प्रेक्षकांची पसंती कलाकारांना जेवढी महत्वाची असते तितकाचा सन्मान त्यांना समीक्षकांनी केलेल्या मूल्यमापनातून मिळत असतो. त्यामुळे यंदा *‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’* या पुरस्कारांमध्ये

दलिप ताहिल साकारणार ‘मुकर्रब खान’.

Image
अभिनेता दलिप ताहिल हे नाव  घेतलं की, त्यांनी साकारलेल्या असंख्य वैविध्यपूर्ण भूमिका डोळयासमोर येतात. हिंदी चित्रपटांचा पडदा गाजविल्यानंतर आता मराठी चित्रपटातही ते एका खलनायकी भूमिकेतून आपल्या समोर येणार आहेत. २६ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘छत्रपती संभाजी’ या  चित्रपटात ते मुघल सरदार ‘मुकर्रब खान’ ही व्यक्तिरेखा साकारत आहेत.   छत्रपती संभाजी महाराजांना पकडून मुघल सल्तनतीपुढे हजर करेल अशी प्रतिज्ञा करणारा मुघल सरदार मुकर्रब खान हा औरंगजेबाचा नातेवाईक. शेख निजाम अर्थात मुकर्रब खानाने संभाजी राजांना कपटाने पकडून औरंगजेबाच्या स्वाधीन केले. त्याबद्दल त्याला मुघल दरबारात मोठा मान मिळाला. ‘छत्रपती संभाजी’ चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी ऐतिहासिक भूमिका मला करायला मिळाली. या चित्रपटातील क्रूर मुकर्रब खानची भूमिका करणं माझ्यासाठी चॅलेंजिंग व वेगळा अनुभव असल्याचं दलिपजी सांगतात.   राकेश सुबेसिंह  दुलगज यांनी 'छत्रपती संभाजी' चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केलं आहे. ‘परफेक्ट प्लस एंटरटेनमेंट’ आणि ‘एजे मीडिया कॉर्प’ प्रस्तुत हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू आणि इ