Posts

Showing posts from June, 2024

अशोक सराफ दिसणार प्रख्यात डॉक्टरच्या भूमिकेत....... राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे औचित्य साधत 'लाईफलाईन' मधील व्यक्तिरेखेच्या पोस्टरचे अनावरण.

Image
     जुने रीतिरिवाज आणि आधुनिक विज्ञान यांच्यातील संघर्षावर आधारित 'लाईफलाईन' हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच प्रदर्शित झालेले चित्रपटाचे पोस्टर बघून अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर या दिग्गजांमधील संघर्षमय जुगलबंदी पाहाण्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. या चित्रपटात महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्राप्त महानायक अशोक सराफ एका प्रख्यात डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे औचित्य साधत मुंबईत साजऱ्या करण्यात आलेल्या ‘डॉक्टर्स डे सेलिब्रेशन’ या कार्यक्रमात अशोक सराफ यांच्या ‘लाईफलाईन’ चित्रपटातील व्यक्तिरेखेच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. यावेळी देशातील अनेक नामवंत डॉक्टर्स उपस्थित होते. अशोक सराफ यांनी यावेळी डॉक्टरांशी संवाद साधला. या कार्यक्रमात अशोक सराफ आणि डॉक्टर अशी 'फॅन मुमेंट'ही पाहायला मिळाली. यावेळी डॉक्टरांच्या परिश्रमाचे त्यांनी कौतुक केले, प्रत्येकाच्या आयुष्यात त्यांचे काय महत्व आहे, हे सुद्धा त्यांनी यावेळी विशद केले. तसेच 'लाईफलाईन' चित्रपट पाहाण्याचे आवाहनही अशोक सराफ यांनी केले. 

'बिग बॅास'मध्ये कल्ला करायला येतोय, महाराष्ट्राचा लाडका सुपर स्टार रितेश देशमुख.

Image
'बिग बॉस' म्हणजे महाराष्ट्रातच नाही तर जगभरात बोलबाला असलेला मनोरंजनाचा बादशाह… छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम !!! 'कलर्स मराठी' आणि JioCinema च्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनची घोषणा करण्यात आली… आणि गेली दोन वर्षे रसिक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, त्या 'बिग बॅास' मराठीची प्रतीक्षा आता संपली आहे. नव्या पर्वाचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या पर्वाची घोषणा होताच सोशल मीडियावर लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियांचा वर्षाव सुरू झाला. कारण या सीझनचा होस्ट आहे, हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा … महाराष्ट्राचा लाडका सुपर स्टार रितेश देशमुख!! रितेशने आजवर आपल्या अभिनयाने चित्रपट रसिकांना 'वेड' लावलं आहे. पण आता टेलिव्हिजनचा पडदा व्यापून टाकायला , 'बिग बॉस’ मराठीचा हा नवा सिझन गाजवायला , वाजवायला तो सज्ज झाला आहे. रितेशच्या येण्याने 'बिग बॉस'च्या घरात जबरदस्त कल्ला होणार आहे. एकंदरीतच आपल्या मराठमोळ्या रितेश भाऊमुळे 'बिग बॉस' आणखी ग्रँड होणार आहे, हे नक्की!    

निकिताचा मराठमोळा अंदाज...जरतारी काठ नऊवारी थाट...

Image
          मोगर गजरा. साज केसात,नजरेचा नखरा नथीचा तोरा डोळ्यांच्या डोहाला काजळ,किनारा,.अशी शब्दकळा जिच्या बाबतीत म्हटली गेलीय ती अभिनेत्री निकिता दत्ता मराठमोळ्या अंदाजात खूपच खुलून दिसतेय. आणि तिचा मराठमोळा अंदाज सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्यासाठी निमित्त आहे तिचा आगामी मराठी चित्रपट.. 'घरत गणपती'. जरतारी काठाची जांभळया रंगाची पैठणी, केसांचा सैलसर अंबाडा त्यावर मोगऱ्याचा गजरा, कपाळी चंद्रकोर, नाकात नथ, गळ्यात पारंपरिक दागिने असा साजशृंगार करून निकिताने आपला मराठमोळा ठसका ऐटीत दाखविला आहे.  .   'घरत गणपती' हा माझा पहिलाच मराठी चित्रपट. पण या निमित्ताने मराठी चित्रपटाशी, कलाकारांशी आणि इथल्या मराठमोळ्या संस्कृतीशी ओळख झाली. इथले सण समारंभ, रितीरिवाज, पोशाख पेहराव या सगळ्यांनीच मला अक्षरशः भुरळ घातली, असं निकिता सांगते.         पॅनोरमा स्टुडिओज सविनय सादर करीत आहेत नॅविअन्स स्टुडिओ यांच्या सहकार्याने मराठी चित्रपट ‘घरत गणपती’. २६ जुलैला हा चित्रपट आपल्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांचे असून कुमार मंगत पाठक, अभिषेक प

झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स निर्मित "धर्मवीर - २" ९ ऑस्टपासून संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार.

Image
येत्या ऑगस्ट महिन्यात बॉक्स ऑफिसवर जोरदार धमाका होणार आहे. कारण अनके दिवसांपासून चित्रपटसृष्टीत आणि प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केलेला "धर्मवीर -२" हा चित्रपट ९ ऑगस्ट रोजी, क्रांती दिनाचे औचित्य साधून प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, एकाच दिवशी मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये संपूर्ण जगभरात हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर मा.मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, सुप्रसिद्ध अभिनेते बॉबी देओल, सुप्रसिद्ध दिग्दर्शक सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, महेश मांजरेकर आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ   यांच्या उपस्थित मोठ्या दिमाखात संपन्न झाले. "धर्मवीर - २" या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई,उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे. कथा,पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अशी चौफेर भूमिका प्रवीण विठ्ठल तरडे यांनीच निभावली असून महेश लिमये यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले आहे. नोव्हेंबर महिन्यात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करण्यात आले होते. 'धर्मवीर... मुक्काम पोस्ट ठाणे'

'विषय हार्ड' चा ट्रेलर रिलीज...१२ वर्षांचं प्रेम आणि वाचवायला फक्त ५ तास....

Image
मराठी चित्रपटसृष्टीत नवीन आयाम घेऊन येणारा 'विषय हार्ड 'हा चित्रपट ५ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्याचा टीझर आणि गाणी यापूर्वीच प्रदर्शित झालेली आहेत आणि त्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनोख्या प्रेम कथेला फुलवणारा हा चित्रपट प्रेक्षकांना एका बाजूला खळखळून हसवणारा आणि दुसऱ्या बाजूला विचार करायला लावणाराही आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलरमधील दृश्ये आणि संवाद चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढवणारे आहेत. ही नेहमीची प्रेमकथा नाही कारण त्यातील नायक- नायिकेसमोर एक वेगळीच परिस्थिती निर्माण होते. त्यांचं १२ वर्षांचं प्रेम आहे आणि वाचवायला फक्त ५ तास आहेत आणि परिस्थितीमधील विचित्र संकटांना तोंड देताना जो गोंधळ उडतो, त्यातून हास्यकल्लोळ निर्माण होतो, त्याचबरोबर काही वेळा गंभीर परिस्थितीही निर्माण होते. हे सर्व प्रसंग अतिशय कलात्मक पद्धतीने एकमेकांत गुंफण्यात आले आहेत. या चित्रपटामधून प्रेक्षकांना मानवी जीवनाच्या वेगवेगळ्या रंगांची सफर घडणार आहे. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांतील परिस्थितीचे चित्रण त्यामध्ये आहे, त्याशिवाय क

‘तिकळी’ या रहस्यमय ‘सन मराठी’च्या मालिकेत किरण माने साकारणार खलनायकाची भूमिका.

Image
पहिल्या झलकपासून ते आतापर्यंत हळू-हळू एक पैलू, पात्रं उलगडणारी ‘सन मराठी’ची ‘तिकळी’ या मालिकेतील रहस्य काय, नेमका कशाचा उलगडा या मालिकेतून होणार आहे याकडे प्रेक्षकांचं लक्ष आहे. १ जुलैपासून ‘तिकळी’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. या मालिकेच्या प्रोमोंमधून  अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर, पूजा ठोंबरे, अभिनेता पार्थ घाटगे या मालिकेत विशेष भूमिका साकारणार आहेत हे प्रेक्षकांना कळलं आहे. पण संपूर्णच गोष्ट रहस्याने भरलेली असताना एक पण नकारात्मक पात्रं नसणार हे कदापि शक्य नाही. मालिका सुरु झाल्यावर हळू-हळू जसं रहस्य उलगडत जाईल तसंच मालिका प्रदर्शित होईपर्यंत या मालिकेत अजून कोण कलाकार आहेत याचा ही उलगडा ‘सन मराठी’ करत राहील. सध्या ज्या व्यक्तीचा सगळीकडे आवाज आहे आणि ‘तिकळी’ मालिकेच्या विषयासारखाच त्या व्यक्तीचा विषय देखील गंभीर आहे असा कलाकार या मालिकेत खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ही व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून अभिनेते किरण माने हे आहेत. किरण माने ‘तिकळी’मध्ये ‘बाबाराव’ हे पात्रं साकारणार आहेत. बाबाराव हा गावचा खोत ज्याचा गावावर वचक आहे. बाबारावचा शब्द हा शेवटचा शब्द असा रुबाब

'गूगल आई'चा रहस्यमय टिझर प्रदर्शित .

Image
तंत्रज्ञानावर आधारित 'गूगल आई' हा चित्रपट येत्या २६ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नावावरूनच या चित्रपटाविषयी अनेकांना उत्सुकता लागून राहिली होती. त्यातच आता ही उत्सुकता शिगेला पोहोचवणारा एक जबरदस्त टिझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. डॉलर्स मीडिया ॲण्ड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि गेहिनी रेड्डी प्रस्तुत 'गूगल आई'ची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन गोविंद वराह यांनी केले असून डॉलर्स दिवाकर रेड्डी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. अतिशय रोमांचक असा हा टिझर रहस्यांनी भरलेला आहे.  टीझरमध्ये एक लहानगी आणि तिचे आईवडील असे सुखी कुटुंब दिसत आहे.  मात्र या हसत्या खेळत्या कुटुंबात काहीतरी घडते आणि संपूर्ण कुटुंबच हादरून जाते. आता नेमके काय घडले आहे आणि यातून 'गूगल आई' या कुटुंबाला कसे बाहेर काढते, हे चित्रपट पाहिल्यावरच कळणार आहे. दरम्यान हा एक कौटुंबिक आणि रहस्यमय चित्रपट असून यात प्राजक्ता गायकवाड, अश्विनी कुलकर्णी, प्रणव रावराणे, सई रेवडीकर, माधव अभ्यंकर हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत   चित्रपटाबद्दल दिग्दर्शक गोविंद वराह म्हणतात, " एका लहान

रसिकाचा डॅशिंग लूक.

Image
छोट्या आणि मोठ्या पडद्यावर वैविध्यपूर्ण भूमिका करत अभिनेत्री रसिका सुनीलने आपला मोठा चाहता वर्ग तयार केला आहे. आगामी ‘डंका…हरीनामाचा’ या चित्रपटातही ती डॅशिंग भूमिका साकारणार आहे. नुकतंच तिचं पोस्टर प्रदर्शित झाले असून त्यात ती बेधडक आणि डॅशिंग लूक मध्ये दिसत आहे.  झाशा या व्यक्तिरेखेत ती या चित्रपटात दिसणार आहे. व्हीलनच्या ताफ्यात राहून आपल्या भावासोबत झालेल्या अन्यायाचा बदला ती कशाप्रकारे घेते? हे या चित्रपटात पहायला मिळणार आहे.  रुद्र एंटरटेनमेंट स्टुडिओज् आणि गणराज स्टुडिओज् प्रस्तुत ‘डंका…हरीनामाचा’ हा मराठी चित्रपट १९ जुलैला चित्रपटगृहात दाखल होतोय. रविंद्र फड निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन श्रेयश जाधव यांनी केले आहे.      या भूमिकेबद्दल बोलताना रसिकाने सांगितलं कि, ‘ही अतिशय भन्नाट व्यक्तिरेखा आहे. ग्रे शेड असलेली भूमिका साकारताना मेकअप, बॉडी लँग्वेज, एक्स्प्रेशन्स या सगळ्यांकडे खास लक्ष द्यावं लागतं’. भूमिका कोणत्याही प्रकारची असली, तरी ती चांगली व्हावी यासाठी कलाकारांना कष्ट घ्यावे लागतात. एकाच इमेजमध्ये अडकून पडायचं नसल्याने ही वेगळी भूमिका स्वीकारल्याच

झी एंटरटेनमेंटने बवेश जानवलेकर यांची झी स्टुडिओ मराठीचे प्रमुख म्हणून नियुक्ती: त्यांच्या नेतृत्वाखाली मराठी चित्रपटांना मिळणार नवी उंची.

Image
  झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस लिमिटेड (ZEEL) ने बवेश जानवलेकर यांची झी स्टुडिओ मराठीचे बिझनेस हेड म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे बवेश जानवलेकर झी टॉकीज, झी युवा, झी चित्रमंदिर आणि आता झी स्टुडिओ मराठीच्या संपूर्ण मराठी चित्रपट विभागाची जबाबदारी सांभाळतील.  बवेश जानवलेकर यांना मीडिया, एंटरटेनमेंट आणि FMCG क्षेत्रांमध्ये 26 वर्षांचा अनुभव आहे. झी मराठी आणि झी टॉकीजचे मार्केटिंग हेड म्हणून सामील झाल्यानंतर, त्यांना झी टॉकीजच्या बिझनेस हेड पदावर बढती मिळाली. झी टॉकीज, झी युवा आणि झी चित्रमंदिर यांच्या यशस्वीतेत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, ज्यामध्ये शेवटचे दोन चॅनेल्स त्यांच्या मार्गदर्शनाखाली लाँच करण्यात आले. त्यांच्या अभिनव दृष्टिकोनामुळे आणि प्रेक्षकांच्या गाढ्या समजामुळे झी टॉकीजने उच्च-गुणवत्तेच्या प्रोग्रामिंगसह नंबर १ मराठी चित्रपट चॅनेल म्हणून स्वतःला स्थिर केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली, झी टॉकीजने प्रादेशिक टेलीविजन क्षेत्रात एक प्रमुख खेळाडू म्हणून आपली स्थिती मजबूत केली आहे.     बवेश यांच्या नव्या भूमिकेत, ते झी टॉकीज, झी युवा, आणि झी चित्र

'भूपती'......... इतिहासातलं सुवर्णपान रुपेरी पडद्यावर.

Image
असं म्हणतात कि, 'उद्या'साठी तुम्हाला 'काल' माहिती असणं फार गरजेचं आहे. इतिहास जाणून घ्यायची उत्सुकता  सगळ्यांनाच असते. पुस्तकातून, ऐकिव आख्यायिका, कागदपत्र इ. मग तो जगाचा, देशाचा, प्रदेशाचा किंवा एखाद्या राजघराण्याचा इतिहास का असेना..! रंजकता असेल तर मनापासून ऐकलेल्या त्या ऐतिहसिक गोष्टी कायम आपल्या स्मरणात राहतात. तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण भूतकाळात जाऊन संशोधन करतोय म्हणूनच शेकडो, हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास आजकाल आपल्याला समजतोय. खरंतर खूप मागे जाऊन हे संशोधन होणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच एक महत्त्वाचा प्रयत्न दिनिशा फिल्म्स प्रा.लि.यांच्या आगामी 'भूपती' या मराठी चित्रपटातून होणार आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा झाली असून त्याचे आकर्षक पोस्टर आणि मोशन पोस्टर आपल्या भेटीला आले आहे. या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन दिनेश जगताप करीत असून निर्मिती यशराज जगताप यांची आहे. छायांकन मंगेश गाडेकर करणार आहेत. ‘हजारॊ वर्षांपासूनच या घनदाट जंगलातलं त्यांचं राज्य देवभूमी... जेव्हा जेव्हा शत्रूंनी चाल केली तेव्हा तेव्हा त्यांना यमसदनी धाडलंय… तोच पुन्हा येतोय..! असा

संदीप पाठक म्हणतोय 'जगात भारी पंढरीची वारी'.....महाराष्ट्राची वैभवसंपन्न परंपरा म्हणजे 'वारी'...

Image
आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. असंख्य वारकरी तन्मयतेने, निरपेक्षपणे त्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी दरवर्षी जातात. हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो. जीवन समृद्ध करणारी वारी म्हणजे महाराष्ट्र संस्कृतीचे भूषण आहे. ही पंढरीची वारी तीनशे ते चारशे वर्ष अविरत सुरू आहे आणि ती पुढेही राहील पण वारी म्हणजे काय? त्याचं महत्त्व काय? उदिष्ट्य काय? याविषयी क्वचितच माहिती असते. हाच इतिहास, वारीची दिव्य परंपरा गाण्याच्या माध्यमातून सोप्या आणि सध्या शब्दात उलगडत अभिनेता संदीप पाठक यांनी 'जगात भारी पंढरीची वारी' हे चैतन्यमय गाणं पांडुरंगाच्या भक्तांसाठी आणले आहे. वारीचा आनंदानुभव देणारं हे गाणं गीतकार गुरू ठाकूर यांनी शब्दबद्ध केलं आहे. मनीष राजगिरे यांचा आर्त स्वर या गाण्याला लाभला असून विजय गवंडे यांनी गाण्याला संगीत दिले आहे.   अभिनेता संदीप पाठक गेली काही वर्ष या वारी सोहळ्यात सहभागी होतायेत. याबद्दल बोलताना संदीप पाठक सांगतात कि, 'हा आनंद जगात कुठेच नाही आणि तो मिळणारही नाही, त्यामुळेच मी या वारीत सहभागी होत असल्याचे संदीप सांगतात

सन मराठी वाहिनीवरील तिकळी या थरारक मालिकेत 'वेद' ची एन्ट्री.

Image
 सन मराठी प्रत्येकवेळी आपल्या प्रेक्षकांसाठी हटके कॉन्टेन्ट घेऊन येतच असते त्यात 'तिकळी' ही भयावह कथा आपल्याला येत्या 1 जुलै पासून भेटायला येत आहे. 'तिकळी' या मालिकेत आतापर्यंत आपल्याला कळलेच आहे की तिकळीच्या प्रमुख भूमिकेत अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर दिसणार असून, तिच्या जोडीला पूजा ठोंबरे देखील या मालिकेत रहस्यमय भूमिकेत असणार आहे. सन मराठीने रिव्हील केलेल्या मालिकेच्या पहिल्या प्रोमोमध्ये आपण पाहिलेच की तिकळी या मालिकेत पूजा ठोंबरे व वैष्णवी कल्याणकर मुख्य पात्र साकारणार आहे. परंतु आता इथे एक ट्विस्ट आलाय तो म्हणजे असा की , तिकळीच्या जोडीदाराचा चेहरा आता रीव्हील झाला आहे. टेलिव्हिजनचा प्रसिद्ध चेहरा अनेक मालिकांमध्ये आपण त्याला पाहिलेच असेल,तो अभिनेता म्हणजेच सर्वांचा लाडका 'पार्थ घाटगे' या अभिनेत्याने आतापर्यंत अनेक वर्षे मालिकांमध्ये काम केले आहे त्यामुळे पुन्हा एकदा पार्थला रुपेरी पडद्यावर पाहता येणार असून प्रेक्षकांना नक्कीच आनंद होणार आहे.अभिनेता पार्थ घाटगे 'वेद' चे मुख्य पात्र साकारणार आहे.  तिकळीच्या आयुष्यातील तिला समजून घेणारा मु

शरद पोंक्षे - स्नेह पोंक्षे लवकरच घेऊन येणार 'बंजारा' .

Image
काही दिवसांपूर्वीच शरद पोंक्षे आणि त्यांचा सुपुत्र स्नेह पोंक्षे यांनी आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती. वडील मुलाची ही जोडी प्रेक्षकांसाठी काय जबरदस्त घेऊन येणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होतेच. मात्र यावरील पडदा आता उठला असून  'बंजारा' असे या चित्रपटाचे नाव आहे. आयुष्याच्या प्रवासावर भाष्य करणारा हा चित्रपट असल्याचे, प्रथम झलक पाहून कळतेय. चित्रपटाचे नाव जरी जाहीर झाले असले तरी या चित्रपटात कोणकोण कलाकार झळकणार, हे जाणून घेण्यासाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, मोरया प्रॉडक्शन्स आणि वि. एस. प्रॉडक्शन्स सादर करीत असलेल्या या चित्रपटाचे  शरद पोंक्षे आणि रोहिणी विजयसिंह राजे पटवर्धन निर्माते आहेत. या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण हे सिक्कीममध्ये झाले आहे.  मराठी कलाक्षेत्रातील एक नामवंत नाव म्हणजे शरद पोंक्षे. नाटक, मालिका, चित्रपट या कलेच्या विविध माध्यमांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर शरद पोंक्षे 'बंजारा'चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत. वैशिष्टय म्हणजे या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन त्यांचा

'लाईफ लाईन' ....अशोक सराफ - माधव अभ्यंकर यांच्यात रंगणार पराकोटीचा संघर्ष.

Image
विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या २ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आधुनिक विज्ञान आणि जुन्या रितीरिवाजांमधील संघर्ष यावर आधारित या चित्रपटाचे नवीन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. पोस्टरमध्ये महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्राप्त महानायक अशोक सराफ आणि आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने घराघरांत पोहोचलेले लोकप्रिय अभिनेते माधव अभ्यंकर दिसत असून अशोक सराफ यांच्या गळ्यातील स्टेथोस्कोप आणि माधव अभ्यंकर यांच्या गळ्यातील तुळशीमाळ यावरून या दोघांमधील मतभेदाचा अंदाज प्रेक्षकांना येऊ शकतो. मात्र हा मतभेद कोणत्या कारणावरून आहे, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच मिळणार आहे.  क्रिसेंडो एंटरटेनमेंट प्रस्तुत, या चित्रपटात हेमांगी कवी, भरत दाभोळकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. साहिल शिरवईकर दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते आहेत लालजी जोशी, कविता शिरवईकर, अमी भुता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, संचिता शिरवईकर, संध्या कु

घरत कुटुंबाच्या बाप्पाची पहिली झलक भेटीला....

Image
    उत्सवप्रिय कोकणात दणक्यात साजरा होणारा सण म्हणजे गणेशोत्सव. कोकणातील गणेशोत्सव कुटुंबाला बांधणारा, नाती जवळ आणणारा, उत्साहाचे, आनंदाचे वातावरण निर्माण करणारा आहे. पाहुणे, मुलांची धम्माल, जुन्या-नव्या पिढीसोबत गप्पा, नाच-गाण्यांच्या कार्यक्रमांची जागरण असा हा ऊर्जावर्धक सण आहे. याच ऊर्जावर्धक  सणाची गोष्ट घेऊन घरत कुटुंबाचा गणपती आणि घरत कुटुंब आपल्या भेटीला आलंय.  पॅनोरमा स्टुडिओज सविनय सादर करत आहेत नॅविअन्स स्टुडिओ यांच्या सहकार्याने ‘घरत गणपती’ हा भव्य मराठी चित्रपट २६ जुलैला आपल्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे  दिग्दर्शन  नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर  यांचे असून कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरी यांनी ‘घरत गणपती’ चित्रपटाची  निर्मिती केली आहे. या घरत कुटुंबाच्या सदस्यांनी नुकतीच श्री सिद्धिविनायक मंदिराला भेट देत यंदा आपल्या घरत कुटुंबाच्या ‘घरत गणपती’ चित्रपटाचा डंका सर्वत्र जोरदार वाजू देत यासाठी मनोभावे प्रार्थना केली. या घरत कुटूंबाची ओळख  नुकतीच  एका हृद्य स्नेहभेटीच्या सोहळ्यात सर्वांना करून  देण्यात

महाराष्ट्राच्या लोकगीतांनी रंगतोय 'अंतरपाट'चा लग्नसोहळा महासप्ताह.

Image
कलर्स मराठी वाहिनीवरील'अंतरपाट' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. या मालिकेत सध्या गौतमी आणि क्षितिजचा पारंपरिक लग्नसोहळा पार पडतो आहे. या लग्नसोहळ्याचं विशेष आकर्षण ठरतंय, ते म्हणजे महाराष्ट्राचं परंपरागत लोकसंगीत. मराठी टेलिव्हिजन विश्वात पहिल्यांदाच 'अंतरपाट' मालिकेत पारंपरिक लग्नसोहळ्यादरम्यान महाराष्ट्राच्या लोकसंगीताचं अनोखं दर्शन घडवण्यात आलं आहे. गौतमी-क्षितिजचा लग्नसोहळा हा वैविध्यपूर्ण गोष्टींनी सजला आहे. बेगडी दिखाव्याच्या काळात आपला लग्नसोहळा अत्यंत परंपरापूर्ण व्हावा ही गौतमीची इच्छा होती. आपल्या आयुष्यातला हा सगळ्यात महत्त्वपूर्ण दिवस अनोख्या पद्धतीने सजवण्यासाठी गौतमी आग्रही होती आणि तिच्या इच्छेनुसार अत्यंत मऱ्हाठमोळ्या पद्धतीने गौतमी- क्षितिजचा हा विवाहसोहळा पार पडतोय. मराठी मातीतलं संगीत आणि लोकपरंपरेच्या साथीनं हा लग्नसोहळा सजला आहे.  आजकाल लग्नसोहळ्यात चकचकीत रोषणाईने सजवलेले हॉल, ट्रेंडिंगच्या नावाखाली केले जाणारे विविध प्रकार पाहायला मिळतात. पण या सगळ्या झगमगाटात महाराष्ट्राची परंपरा आणि सांस्कृतिक वैभव बाजूलाच पडते

'तू भेटशी नव्याने' मालिकेत सुबोध आणि शिवानीचा हटके लूक.....नव्वदीचा नॉस्टेल्जीया.

Image
९० चं दशक म्हणजे मंतरलेला काळ होता. नव्वदीचे दशक फॅशन,सौंदर्य, टेलिव्हिजनसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण संक्रमणाचा कालखंड होता. अनेक क्षेत्रांत आमूलाग्र बदल होत होते. आजही त्या आठवणी अनेकांसाठी ताज्या आहेत. नव्वदीच्या दशकातील हा काळ आता सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेतून आपल्याला अनुभवायला मिळणार आहे.  नव्वदीचे दशक फॅशन आणि सौंदर्य ट्रेंडचा एक महत्त्वपूर्ण कालखंड ठरला. या काळातील बरेच ट्रेंड सामान्य लोकांमध्ये लोकप्रिय झाले. बॉलिवूड सेलिब्रिटींनी सेट केलेल्या ट्रेंडला या काळात चांगली लोकप्रियता मिळाली. सोनी मराठी वाहिनीने या ट्रेंड चा अभ्यास करत त्याकाळातील फॅशन ट्रेंड ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेतून पुन्हा आणण्याचा प्रयत्न केला आहे.  सुबोध भावे हा अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक. त्यांनी साकारलेल्या भूमिकांचं नेहमीच कौतुक झाल्याचे पहायला मिळाले आहे. एखादी व्यक्तिरेखा अविस्मरणीय कशी करायची? हे या अभिनेत्याने वेळोवेळी दाखवून दिले आहे. आता ते पुन्हा नव्या लुकमुळे चर्चेत आहेत ‘तू भेटशी नव्याने’ या शीर्षकाप्रमाणेच एका नव्या रूपात आपल्याला सुबोध भावे आणि शिवानी सोनार ही ज

'बोलायचं राहून गेलं' या मराठी चित्रपटाची घोषणा.

Image
आजवर प्रेमकथांवर आधारलेल्या बऱ्याच चित्रपटांनी रसिकांचं मनोरंजन करण्यात यश मिळवलं आहे. रसिकांची आवड ओळखून लेखक-दिग्दर्शकांनीही गुलाबी प्रेमाचे वेगवेगळे पैलू रुपेरी पडद्यावर सादर केले आहेत. तरीही प्रेमाची गोडी तसूभरही कमी झालेली नाही. प्रेमाच्या अप्रकाशित पैलूंवर आधारलेल्या एका नवीन चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. 'बोलायचं राहून गेलं' या चित्रपटात प्रेक्षकांना एक अजब-गजब प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे. जिजा फिल्म्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे निर्माते अभिषेक उत्कर्ष कोळी आणि सुरेश मगनलाल प्रजापती आहेत. निर्मितीसोबतच कथा, पटकथा लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारीही अभिषेक उत्कर्ष कोळी यांनी सांभाळली आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला. याप्रसंगी निर्माते, दिग्दर्शक, कलाकारांसोबत तंत्रज्ञही उपस्थित होते. या चित्रपटात अभिषेक कोळी एक अनोखी लव्ह स्टोरी सादर करणार असल्याचं 'बोलायचं राहून गेलं' या शीर्षकावरून सहज लक्षात येतं. इतर प्रेमकथांपेक्षा हा चित्रपट वेगळ्या वाटेने जाणारा असल्याचे संकेत शीर्षकावरून मिळतात. शीर्षकाला अनुसरून अभिषेक यांनी या च

सन मराठी वाहिनीवरील 'कॉन्स्टेबल मंजू' मालिकेत मंजू करणार ऑन ड्युटी वटपौर्णिमेचा व्रत पूर्ण.

Image
सन मराठी चॅनल हे नेहमी युनिक आणि हटके मालिका आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येतच असतात, या वाहिनीवरील प्रत्येक मालिकेचे हटके विषय आहेत. सन मराठीवरील अर्थपूर्ण मालिकांना एक विशेष महत्व आहे. त्यात सन मराठीवरील सर्वांची लाडकी कॉन्स्टेबल मंजू या मालिकेतील नायक-नायिकांचा खास प्रवास एका अनोख्या अंदाजात वटपौर्णिमेच्या भागात पाहायला मिळणार आहे. या वटपौर्णिमेला कॉन्स्टेबल मंजू मालिकेतील प्रमुख पात्रांचा विशेष व रोमांचक प्रवास  घराघरात पोहोचणार आहे. वटपौर्णिमा हा सण आपल्या जीवनात नवी ऊर्जा आणि प्रेमाचे नवीन रंग घेऊन येतो. ह्या व्रतामध्ये पती-पत्नीच्या अतूट नात्याचे आणि एकमेकांच्या सुख-दुःखात नेहमी साथ देण्याचे वचन असते. अशा या पवित्र वटपौर्णिमेच्या दिवशी, सत्या आणि मंजूच्या प्रेमाची नवीन परिभाषा आपल्याला पाहायला मिळणार आहे.  सत्या आणि मंजूचं नुकतच लग्न झालंय त्यात सत्या आणि मंजूला हे लग्न मान्य नाहीये परंतु ऑन ड्युटीवर असलेल्या मंजूला वटपौर्णिमेचा शुभ दिवस खरंतर खूप चॅलेंजिंग असणार आहे.  पोलिस बंदोबस्तासाठी उभी असणारी मंजू हिला तात्या साहेब हे त्यांच्या राजकारणी फायद्यासाठी वटपौर्णिमेच्य

कलर्स मराठीवर एकत्र आल्या 'सावित्री', केली वटपौर्णिमा साजरी .

Image
वटपौर्णिमा हा हिंदू संस्कृतीतील एक महत्वाचा सण मानला जातो. या दिवशी महिलांनी वटवृक्षाची पूजा केल्यास  नवऱ्याची आयु वाढते, असे मानले जाते.  कलर्स मराठी नेहमीच आपल्या प्रेक्षकांना उत्तम गुणवत्ता असलेल्या मालिका भेट देत असून नेहमीच रसिकांचे मनोरंजन करत आली आहे.  ही वाहिनी नेहमीच रसिकांसाठी काहीतरी हटके घेऊन येत असते. हीच परंपरा आपल्या लाडक्या कलर्स मराठीने देखील जोपासली असून नुकताच कलर्स मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर वटपौर्णिमाचा खास व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे. हा व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्राम, यूट्यूब आणि फेसबुकवर पाहू शकता. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, 'इंद्रायणी' या मालिकेमधून शकुंतला वडाच्या झाडाला कुंकू लावतेय, तर झाडामागून 'अंतरपाट' मालिकेतील गौतमी हातात धागा घेऊन क्षितिजसोबत सुरु होणाऱ्या नव्या संसाराचे सुख मागत आहे.  दुसरीकडे  'अबीर गुलाल' मालिकेतील श्रीची आई वडाच्या झाडामागून येताना दिसत असून 'रमा -राघव' मालिकेतून रमा कुटुंब जोडताना मिळणारी राघवची अतूट साथ सात जन्म राहू देत असे म्हणत आहे. 'पिरतीचा वनवा उर

नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत 'बाई गं' चित्रपटाचा भन्नाट टीझर आऊट.

Image
    नवरा बायकोचं नातं म्हणजे स्वर्गात बांधलेली गाठ, ही गाठ कधीही कुठेही कशीही जुळते, पण ही गाठ किती वेळ टिकेल हे मात्र सांगणं कठीण आहे. आता आपलं हेच प्रेम टिकवायला एका नवऱ्याला चक्क ५ जन्मा आधीच्या आपल्या बायकांच्या इच्छा पूर्ण कराव्या लागणार आहेत. पण ह्या इच्छा तो पूर्ण करू शकेल का ? हे येत्या १२ जुलै ला आपल्याला 'बाई गं' ह्या चित्रपटा द्वारे समजेल. या चित्रपटाचं धमाल टिझर आज रिलीझ झालय.  टिझर मध्ये स्वप्नील जोशी ला किती कसरत करावी लागते हे दिसतंय. या चित्रपटात स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत असून त्याच्या सोबत प्रार्थना बेहेरे, सुकन्या मोने,अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान, सागर कारंडे सुद्धा आहे.      "बाई गं" या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद पांडुरंग कृष्णा जाधव आणि विपुल देशमुख ह्यांनी केलं आहे. तर संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. छायांकन नागराज एमडी दिवाकर यांनी केले आहे.      नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत 'बाई गं' हा धम्माल चित्रपट १२ जुलै ला आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्

यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलात ज्येष्ठ नाट्यरसिकांसाठी 'विशेष सुविधा'.

Image
        नाटकातून नाट्यरसिकांना वेगळी अनुभूती मिळत असते. मात्र आवड असूनही वयोमानामुळे आणि शारीरिक व्याधींमुळे ज्येष्ठ नाट्य रसिकांना प्रयोगाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागतो. अशा रसिकांसाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय नाट्यपरिषदेने पुढाकार घेतला आहे. याच प्रयत्नाचा भाग म्हणून नूतनीकरणानंतर नाट्यरसिकांसाठी २२ जूनपासून खुल्या होणाऱ्या माटुंग्याच्या यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलात अखिल भारतीय नाट्यपरिषदेतर्फे एका विशेष सुविधेची व्यवस्था ज्येष्ठ नाट्यरसिकांसाठी करण्यात आली आहे.  ज्येष्ठ नाट्यरसिकांच्या सोयीसाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेने जिन्यावर सरकत्या खुर्चीची सोय केली आहे. या सुविधेमुळे नाटक बघण्यासाठी इच्छुक ज्येष्ठ नाट्यरसिकांना खूप फायदा होणार आहे. ज्या रसिकांना जिने चढणं शक्य नाही असा रसिकांना या सरकत्या खुर्चीच्या मदतीने पहिल्या माळ्यावर सहजरित्या पोहचता येणार आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल हे महाराष्ट्रातील पहिले नाट्यगृह जिथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे.        रसिकांच्या आवडीचे आणि हक्काचे नाट्यगृह असणारे यशवंतराव च

'अंतरपाट' मधील गौतमी -क्षितिजच्या लग्नाचा अद्वितीय महासप्ताह.

Image
कलर्स मराठी वाहिनीवरील नुकतीच प्रदर्शित झालेली नवी मालिका 'अंतरपाट' ही चांगलीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून रसिकवर्ग नव्या मालिकेला भरभरून प्रेम देत आहेत. तुम्ही मालिकेत पाहू शकता की , रश्मी अनपट आणि अशोक धगे म्हणजेच आपले गौतमी आणि क्षितिजचे लवकरच लग्न पार पडणार असून प्रेक्षकांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली आहे.     गौतमी आणि क्षितिज यांच्या लग्नाचा हा अद्वितीय महासप्ताह कलर्स मराठीवर आपल्याला दिसणार असून त्याची सुरुवात देखील झाली आहे. काही दिवसांआधी श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये गौतमी आणि तिच्या परिवाराने बाप्पाच्या चरणी पत्रिका अर्पण केली. त्यानंतर त्या दोघांचे केळवण अगदी छान पारंपरिक पद्धतीने थाटामाटात पार पडले. या सगळ्यानंतर महत्वाचा क्षण म्हणजे लग्न. लग्न म्हणजे एक संस्कार... आपल्या संस्कृतीचा आरसा म्हणता येईल. असा महत्वाचा विधी ज्यामध्ये विविध पद्धतीच्या विधी आणि त्यातून झळकणारे वेगळेपण आपल्याला दिसत असते. पण आजकालच्या चकचकीत रोषणाईने सजवलेले हॉल, ट्रेंडिंगच्या नावाखाली केले जाणारे विविध प्रकार, या सगळ्या गर्दीमध्ये महाराष्ट्राची परंपरा आण

दिमाखदार सोहळ्यात गीताई प्रॉडक्शन्सची घोषणा आणि हिंदी चित्रपट "द रॅबिट हाऊस"च्या पोस्टरचे अनावरण.

Image
पुणे येथे दिमाखदार सोहळ्यात निर्माते कृष्णा पांढरे व सौ. सुनीता पांढरे यांच्या "गीताई प्रॉडक्शन्स" या निर्मिती संस्थेची घोषणा करण्यात आली. तसेच याच सोहळ्यात गीताई प्रॉडक्शन्सची पहिली कलाकृती "द रॅबिट हाऊस" या हिंदी चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी निर्माते कृष्णा पांढरे, निर्मात्या सुनीता पांढरे, लेखक व दिग्दर्शक वैभव कुलकर्णी, कलाकार अमित रियान, करिश्मा, पद्मनाभ, गगन प्रदीप, सुरेश कुंभार, पूर्वा, योगेश कुलकर्णी, डी.ओ.पी. प्रतीक पाठक, रंगभूषाकार सुरेश कुंभार, वेशभूषाकार प्रणोती पाठक, सहछायालेखक अभि हजारे, पब्लिसिटी डिझाईनर सौरभ जनवाडे, साऊंड डिझायनर संकेत धोटकर, डॉन स्टुडिओजचे चिराग गुजराथी यांसोबत प्रमुख मान्यवर उपस्थित होते.   निर्माते कृष्णा पांढरे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले "मला चित्रपटाची खूप आवड असल्याने चित्रपटसृष्टीबद्दल आकर्षण होतं, परंतु व्यवसायात व्यग्र असल्याने मी या बाबतीत फारसा गांभीर्याने विचार केला नव्हता. एका व्यावसायिक भेटी दरम्यान लेखक वैभव कुलकर्णी यांनी मला या चित्रपटाची कथा ऐकवली जी माझ्या मनाल

“स्वरगंधर्व सुधीर फडके” चित्रपटाने पूर्ण केले ५० दिवस.

Image
योगेश देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित मराठीतील सर्वात मोठा म्युझिकल बायोपिक ठरलेला चित्रपट महाराष्ट्रदिनी प्रदर्शित झाला! जगभरातील प्रेक्षकांच्या भरभरून प्रतिसादात चित्रपटाने चित्रपटगृहात ५० दिवस पूर्ण केले आहेत आणि शंभरीकडे वाटचाल करेल असा विश्वास निर्माते सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे यांनी व्यक्त केला आहे! लेखक दिग्दर्शक म्हणून योगेश देशपांडे यांचा हा दुसरा चित्रपट आहे. बाबूजी सुधीर फडके यांचे आयुष्य पडद्यावर आणण्यापूर्वी तब्बल ४ वर्ष या विषयाचा अभ्यास करून, बाबूजींचे आयुष्य बारकाईने निवडण्याचं शिवधनुष्य पेलण्यात योगेश यशस्वी झाले आहेत. मूळ संगीत आणि मूळ दिग्गज गायकांचा आवाज असलेली गाणी वापरण्याची कल्पना चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच साधण्यात दिग्दर्शक कमालीचे यशस्वी झाले आहेत. जगभरातील प्रेक्षक चित्रपट पाहून भारावून जातात, गाणी ऐकून प्रचंड आनंदी होतात आणि बाबूजींचा संघर्ष पाहून नकळतपणे डोळे पाणवतात, या वा अशा असंख्य प्रतिक्रिया चित्रपटाला लाभल्या आहेत.  आजवर अनेक मराठी दिग्दर्शकांनी बायोपिक चित्रपट केलेले आपल्याला माहित आहेत, त्या रांगेत आता योगेश देशपांडे या अभ्यासू आणि कल

वरूण नार्वेकर दिग्दर्शित, जिओ स्टुडिओजच्या "एक दोन तीन चार" या चित्रपटाचा टीझर आऊट.

Image
अनपेक्षित सरप्राईज हे नेहमीच धक्का देवून जातं हे खरं मानता येईल कदाचित! होय कारण नुकताच "एक दोन तीन चार" या सिनेमाचा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  त्यात सम्या आणि सायलीच्या क्युट लवस्टोरीत एक मोठ्ठा बॉम्ब फुटलाय आणि या जोडप्याच्या आयुष्यातला हा अनोखा ट्विस्ट काय आहे ह्याची छोटीशी झलक आपल्याला टीझर मधून कळते.  आता हा हॅपिनेस चा बुम्म त्यांच्या आयुष्यात काय काय वाढून ठेवणार आहे,हे आपल्याला येत्या १९जुलै लाच समजेल.  या चित्रपटात मुख्य भूमिकेत वैदेही परशुरामी, निपुण धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, सतीश आळेकर, शैला घाणेकर इ. कलाकर आहेत इतकच नव्हे तर ‘फोकस इंडियन‘ या नावाने प्रसिद्ध असलेला सोशल मिडीया इन्फ्लुन्सर ‘करण सोनावणे‘ सुद्धा दिसणार आहे  जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे निर्मित तसेच रणजित गुगळे, केयूर गोडसे, निपुण धर्माधिकारी आणि नीरज बिनीवाले निर्मीत बहावा एन्टरटेन्मेंट आणि १६ बाय ६४ यांच्या साहाय्याने "एक दोन तीन चार" हा  वरूण नार्वेकर दिग्दर्शित मराठी सिनेमा १९ जुलै ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Teaser link- htt

विठूरायाच्या शोधात 'अनिकेत'.

Image
आषाढी एकादशी म्हणजे अवघ्या महाराष्ट्रासाठी एक आनंद सोहळाच...  पंढरीच्या वारीत वारकरी पांडुरंगाचे नाव घेत मोठ्या श्रद्धेने चालतात, त्या प्रवासातच त्यांना पांडुरंग भेटत असावा. अभिनेता अनिकेत विश्वासराव हा मात्र या विठूरायाचा शोध घेतोय. हा शोध तो कशासाठी घेतोय?  हे जाणून घ्यायचं असेल तर रुद्र एंटरटेनमेंट स्टुडिओज् आणि गणराज स्टुडिओज् प्रस्तुत ‘डंका…हरीनामाचा’ हा  चित्रपट  तुम्हाला पहावा लागेल. हा मराठी चित्रपट १९ जुलैला चित्रपटगृहात दाखल  होतोय. रविंद्र फड निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन श्रेयश जाधव यांनी केले आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच समोर आला असून, ‘चला आपण आणू आपल्या विठुरायाला’... असं अनिकेत  बोलताना दिसतोय. विठ्ठलाच्या शोधात असतांना अनिकेतच्या हाती काय येतं? आणि हा शोध नेमका कुठे संपतो ? याची उत्सुकता प्रदर्शित झालेल्या टीझर वरून निर्माण झाली आहे.  अनिकेत विश्वासराव सोबत सयाजी शिंदे,  प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षया गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार,किरण भालेराव, कबीर दुहान सिंग, महेश जाधव  या कलाकारांची झलक सुद्धा या  टीझर मध्ये

प्रेम म्हणजे उन्हात पडणारं अप्रतिम चांदणं, आणि तुम्हाला पुन्हा एकदा प्रेमात पाडायला सादर आहे ‘बाई गं’ चित्रपटाचं नवीन गाणं 'चांद थांबला‘...

Image
रिमझिमत्या प्रेमाने, दुनियेला मोहिनी घालणारं ‘बाई गं’ चित्रपटाचं नवीन गाणं 'चांद थांबला‘ रिलीझ झालय. मराठी मनोरंजन विश्वातील एक रोमँटिक हिरो अशी ओळख असलेला अभिनेता स्वप्नील जोशी या गाण्यात आपल्या जुन्या ऑनस्क्रीन जोडीदारासोबत म्हणजेच प्रार्थना बेहेरे सोबत रोमान्स करताना दिसतोय. साल २०१५ मध्ये आलेला चित्रपट मितवा नंतर आता हि जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कमाल करायला तयार आहे .एका मोठ्या गॅप नंतर स्वप्नील आणि प्रार्थना एकत्र काम करतायत त्यामुळे आपल्या आवडत्या जोडी ला बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.  मागील काही दिवसात प्रार्थना ने आपल्या सोशल मीडियावर ह्या गाण्याची एक झलक फॅन्स ला दाखवली होती. या गाण्यात अभिनेता स्वप्नील जोशी प्रार्थना सोबत थिरकताना दिसत आहे. कलाकार आणि संगीत सोबतच या गाण्याचं चित्रीकरण सुद्धा तितकच सुंदर आहे.  नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत 'बाई गं' चित्रपटाचा हे दुसरं गाणं आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहेरे सह सागर कारंडे, सुकन्या मोने, अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड

अभिनेत्री, लेखिका मधुरा वेलणकर-साटमला यंदाचा "मनोरमा साहित्य सेवा पुरस्कार".

Image
चार राज्य पुरस्कारांची आणि इतर अनेक पुरस्कारांची मानकरी ठरलेली एक चतुरस्र अभिनेत्री म्हणून आपल्याला परिचित असलेल्या आणि नाट्य-चित्रपट-अभिनय शिबिरं-कार्यशाळा अशा नानाविध माध्यमांतून गेल्या दोन दशकांहून अधिक काळ अभिनयाच्या क्षेत्रात घोडदौड करणाऱ्या, ३०हुन अधिक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची मोहोर उमटवणाऱ्या अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम हिने अगदी सहजच लेखन क्षेत्रातही पाऊल टाकलं आणि तिचे पहिलवहिले लेखिका म्हणून असलेले ‘मधुरव' पुस्तकही अल्पावधीतच लोकप्रिय ठरल.  "मधुरव"  ह्या  रसिक आंतरभारती प्रकाशित पुस्तकासाठी यंदाचा "मनोरमा साहित्य सेवा पुरस्कार" सोलापूर येथे सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या हस्ते नुकताच अभिनेत्री, लेखिका मधुरा वेलणकर साटमला प्रदान करण्यात आला. राज्यस्तरीय पुरस्कार-मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक, आणि रोख एकवीस हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. उमेद पुरस्कार कला गौरव पुरस्कार, कर्तृत्त्व आभा पुरस्कार, राणी सईबाई पुरस्कार, रोटरी लाईन्स, क्लब यंग गेस्ट अचीवर अवॉर्ड,  व्ही.शांताराम पुरस्कार अशा अभिनयासाठी मिळालेल्या अनेक विविध पुरस्कारांन

‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चे पुरस्कार श्रीमती रोहिणी हट्टंगडी व मा.श्री. अशोक सराफ यांना 'जीवनगौरव पुरस्कार' तहहयात विश्वस्त मा.श्री. शरद पवार यांच्या हस्ते प्रदान.

Image
                   नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ १४ जून २०२४ रोजी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी रंगकर्मींना त्यांच्या रंगभूमीवरील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मा.श्री. अशोक सराफ आणि मा.श्रीमती रोहिणी हट्टंगडी यांना तहहयात विश्वस्त मा.श्री. शरद पवार व इतर मान्यवर यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.  तसेच या सोहळ्याचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण नाटय संकुलाच्या नूतनीकरणानंतर यशवंत नाट्य मंदिर रसिकार्पण सोहळा देखील संपन्न झाला. ह्या सोहळ्याला अ.भा.मराठी नाटय परिषदेचे तहहयात विश्वस्त मा.श्री. शरद पवार साहेब, नाटयसंमेलनाध्यक्ष मा.डॉ. जब्बार पटेल, अ.भा.मराठी नाटय परिषदेचे तहहयात विश्वस्त मा.श्री. शशी प्रभू, उद्योगमंत्री तथा अ.भा.मराठी नाटय परिषदेचे विश्वस्त मा.ना.श्री. उदय सामंत, अ.भा.मराठी नाटय परिषदेचे विश्वस्त मा.श्री.मोहन जोशी, अ.भा.मराठी नाटय परिषदेचे विश्वस्त मा.श्री.अशोक हांडे, पोलीस आयुक्त मा.श्री. विवेक फणसळकर, यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. तसेच ह्या सोहळ्यात प्रायोगिक ८ पार

दादा कोंडके यांच्या चाहत्यांसाठी खुशखबर…१६ आणि २३ जूनला पोट धरून हसाल.

Image
मराठी सिनेमा इंडस्ट्रीचे कॉमेडी किंग दादा कोंडके यांचा सिनेमा म्हणजे कधीही पाहा आणि पोट धरून हसा. प्रेक्षकांना निखळ हसवत काही ना काही संदेश देण्याची दादा कोंडके यांची शैली अफलातून होती. म्हणूनच ३० वर्षांनंतरही दादांचा सिनेमा पाहताना तो ताजातवाना वाटतो. झी टॉकीज वाहिनीने दादा कोंडके यांच्या गाजलेल्या सिनेमांची मेजवानी प्रेक्षकांना देण्यासाठी पुढाकार घेतल्याने दादांच्या चाहत्यांना हसरा रविवार साजरा करता येणार आहे. येत्या रविवारी, १६ जून रोजी, दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता दादा कोंडके यांचा "अंधेरी रात में दिया तेरे हाथ में" हा सिनेमा झी टॉकीज वाहिनीवर हिंदी ऑडिओसह झळकणार आहे. त्याचबरोबर, पुढील रविवारी, २३ जून रोजी, "आगे कि सोच " हा आणखी एक धमाल सिनेमा झी टॉकीजवर दाखवला जाणार आहे. हे हिंदी धमाल सिनेमे दादांच्या हिंदी प्रेक्षकांना ही ओढण्यात त्याकाळी यशस्वी   होते. झी टॉकीज वाहिनीने उत्तमोत्तम सिनेमे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारी वाहिनी म्हणून ओळख मिळवली आहे. मराठी पडद्यावर गाजलेले सिनेमे प्रेक्षकांना घरबसल्या पाहण्याची पर्वणी झी टॉकीज वाहिनीमुळे मिळते. त्यात

'अष्टपदी' चित्रपटाच्या चित्रीकरणाला कोल्हापूरमध्ये सुरूवात...खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत पार पडला मुहूर्त...

Image
'अष्टपदी' या आगामी मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. अक्षय्य तृतीयेच्या शुभ दिवशी 'अष्टपदी' चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला होता. तेव्हापासून अनोख्या शीर्षकामुळे या चित्रपटाबाबत कुतूहल वाढलं आहे. चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार आणि यात कोणकोणते कलाकार झळकणार याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. आजवर गुलदस्त्यात असलेल्या गोष्टी हळूहळू बाहेर येऊ लागल्या आहेत. निर्माते उत्कर्ष जैन आणि महेंद्र पाटील यांनी महश्री प्रॉडक्शन आणि युवराज सिने क्रिएशनच्या बॅनरखाली 'अष्टपदी' चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. उत्कर्ष जैन या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. श्रीगणेश गीताच्या रेकॅार्डिंगने 'अष्टपदी'चा मुहूर्त झाल्यानंतर सध्या या चित्रपटाची संपूर्ण टिम कोल्हापूर मुक्कामी आहे. कोल्हापूरमध्ये चित्रीकरण सुरू करण्यापूर्वी खासदार छत्रपती शाहू महाराज, ज्येष्ठ कलादिग्दर्शक संतोष फुटाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुहूर्त पार पडला. याप्रसंगी खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी मुहूर्त क्लॅप दिला तसेच चित्रपटाच्या टीमला पुढील  वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्य

तुफान ॲक्शन, दमदार कथानक असलेला, ‌. 'रांगडा'५ जुलैला प्रदर्शित होणाऱ.

Image
साऊथच्या चित्रपटांमध्ये तुफान अॅक्शन सिक्वेन्स, दमदार कथानक असलेले चित्रपट असतात. हाच अनुभव प्रेक्षकांना महाराष्ट्राच्या मातीतली गोष्ट सांगणाऱ्या "रांगडा" या चित्रपटातून मिळणार आहे. "रांगडा" चित्रपटाचा धमाकेदार टीजर लाँच करण्यात आला असून, हा चित्रपट ५ जुलैला राज्यात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.  शेतकरी पुत्र प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून योगेश बालवडकर, किरण फाटे,राहुल गव्हाणे, मच्छिन्द्र लंके, अब्बास मुजावर, आयुब हवालदार यांनी "रांगडा" या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाच्या निर्मितीसह कथा आणि दिग्दर्शन अशी कामगिरी आयुब हवालदार यांनी केली असून बाबाजी सातपुते आणि युवराज पठारे यांनी सहनिर्मिती केली आहे. संवादलेखक म्हणून  दीपक ठुबे यांनी काम पाहिले आहे. अजित मांदळे, नौशाद इनामदार यांनी संकलन तर  अन्सार खान यांनी छायाचित्रण केले आहे. अरुण वाळूंज, प्रमोद  अंबाडकर यांनी लिहिलेल्या गीतांना रोहित नागभिडे यांचे सुमधुर संगीत लाभले आहे. भूषण शिवतारे, मयुरी नव्हाते, अमोल लंके, भीमराज धनापुणे,अतिक मुजावर, संदीप (बापु)रासकर,राजेंद्र गुंजा

अजिंक्य आणि अश्विनी यांची 'जोडी पुन्हा जमली'.

Image
आजवर रुपेरी पडद्यावर नायक नायिकेच्या अनेक लोकप्रिय जोड्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. रसिकांच्या मनावर आपला वेगळा ठसा उमटवणारी अशीच एक लोकप्रिय जोडी म्हणजे अजिंक्य देव आणि अश्विनी भावे. लवकरच पुन्हा एकदा ही जोडी ‘घरत गणपती’ या मराठी  चित्रपटाच्या निमित्ताने रसिक दरबारी हजेरी लावणार आहे. प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या सुरेख टीझर नंतर हा चित्रपट रसिकांसाठी वेगळी ट्रीट असणार हे नक्की. पॅनोरमा स्टुडिओज आणि नॅविअन्स स्टुडिओ यांच्या संयुक्त  विद्यमाने ‘घरत गणपती’ हा भव्य चित्रपट २६ जुलैला आपल्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांचे असून कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरी यांनी ‘घरत गणपती’  चित्रपटाची  निर्मिती  केली आहे. शरद घरत आणि अहिल्या घरत या व्यक्तिरेखा ते साकारणार आहेत. या चित्रपटात  अजिंक्य देव  आपल्याला कुटुंबवत्सल पती, प्रेमळ वडिल अशा भूमिकेत दिसणार असून कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभी राहणाऱ्या करारी आईची व्यक्तिरेखा अश्विनी भावे साकारणार आहेत. याआधी ‘शाब्बास सून

वेगळ्या वाटेवरचा दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील.

Image
  मराठी चित्रपटांचा कॅनव्हास निश्चित मोठा झाला आहे. अलीकडच्या मराठी चित्रपटांकडे नजर टाकली तर त्यामागे अनेक तरुण चेहरे आहेत. मराठीत जे तरुण दिग्दर्शक येत आहेत ते नव्या तंत्रात, नव्या शैलीत कलाकृती सादर करत आपली क्षमता दाखवून देतायेत. वेगवेगळ्या शॉर्ट फिल्म्स, वेबसिरीज तसेच खिचिक, डॉक्टर डॉक्टर, ढिशक्यांव यासारख्या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे युवा दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांनी असाच वेगळा प्रयत्न करीत रसिकांसाठी ‘अल्याड पल्याड’ हा रहस्यमय थरारपट आणला आहे. १४ जूनला हा चित्रपट राज्यभर प्रदर्शित होत आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काहीतरी वेगळं करण्याच्या उद्देशाने प्रीतम एस के पाटील चमचमत्या चंदेरी, स्वप्नील दुनियेत पाऊल ठेवलं. या क्षेत्रातल्या प्रवासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी अनेक गोष्टी शिकून घेतल्या. त्यांच्यातली क्षमता आणि काहीतरी नवीन करून दाखवण्याचा ध्यास यामुळे त्यांना नवं क्षितिजं खुणावत होतं, यातूनच दिग्दर्शनाची वाट त्यांना गवसली.   ‘अल्याड पल्याड’ या चित्रपटाबाबत बोलताना दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील सांगतात कि, मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की मराठी

पुण्यात रंगणार ‘ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सव’.

Image
 मराठी संगीत रंगभूमी ही मराठी मनाच्या मर्मबंधातील ठेव… मराठी जनमानसात संगीत नाटकाचे प्रेम खऱ्या अर्थी रुजवण्यात अनेकांनी मोलाचे प्रयत्न केले. आवाजावरची हुकमत, रंगतदार आलापी, शास्त्र आणि भाव यांचा सहजसुंदर मेळ साधत स्व. गायिका ज्योत्स्ना भोळे यांनी मराठी संगीत रंगभूमी समृद्ध केली आणि आपल्या प्रतिभेचा, कर्तृत्वाचा ठसा उमटवला. अभिनयासोबतच संगीतातील योगदानासाठीही ओळखल्या जाणाऱ्या ज्योत्स्ना भोळे यांनी अवघ्या १३ व्या वर्षी शास्त्रीय गायिका म्हणून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. आपल्या स्वर्गीय सुरावटींनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या ज्योत्स्ना भोळे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी दरवर्षी सृजन फाउंडेशन आणि नांदेड सिटी, पुणे यांच्या वतीने 'ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सव' आयोजित करण्यात येतो. यंदाही २० व २१ जून अशा दोन दिवसीय ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या महोत्सवाचे १४ वं वर्ष आहे.         टिळक स्मारक मंदिर, पुणे येथे सायं.४ ते ८ या वेळेत हा स्वरमहोत्सव रंगणार आहे. गुरुवार २० जूनला सुरवातीला महोत्सवाच्या प्रास्ताविके नंतर शिल्पा पुणतांबे

'विषय हार्ड'चा हार्ड टीझर प्रदर्शित ....ग्रामीण - शहरी भागातील गोष्ट.....

Image
विषय हार्ड चित्रपटातील “'येडं हे मन माझं...' हे सुमधूर प्रेमगीत इंटरनेट व टीव्हीवर  तीन लाखांहून  अधिक लोकांनी बघितले आहे. या प्रेमगीतामागोमाग 'विषय हार्ड' या आगामी मराठी चित्रपटाचा टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या चित्रपटाची चर्चा चालू आहे. चित्रपटक्षेत्राला नेहमीच नव्या कल्पनांची गरज असते, अशीच एक नवी कल्पना घेऊन हा  चित्रपट ५ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.   'दादा, लय मजा येणार हाय... , अरे नुसती मजाच येणार नाय तर,  विषयच हार्ड होणार हाय…' . टीझरमधील हा डायलॉग 'विषय हार्ड'मध्ये घडणाऱ्या विनोदाची कल्पना देतो. डॉली आणि संद्याची प्रेमकहाणी यात आहे, पण ही प्रेमकहाणी पूर्ण होताना जो गोंधळ उडतो, तो विनोदी शैलीमध्ये मांडण्यात आला आहे. पर्ण पेठे आणि सुमित या जोडीने ही गुलाबी प्रेमकथा अतिशय उत्तम प्रकारे साकारलेली आहे, त्याशिवाय प्रेमकथेतील गोंधळ सहकलाकारांनी ज्या पद्धतीने मांडला आहे, त्याने हा चित्रपट प्रेक्षकांना अखेरच्या क्षणापर्यंत खिळवून ठेवण्यासाठी यशस्वी ठरणार आहेच, पण मोशन पोस्टर, प्रेमगीत आणि