नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत 'बाई गं' चित्रपटाचा भन्नाट टीझर आऊट.


    नवरा बायकोचं नातं म्हणजे स्वर्गात बांधलेली गाठ, ही गाठ कधीही कुठेही कशीही जुळते, पण ही गाठ किती वेळ टिकेल हे मात्र सांगणं कठीण आहे. आता आपलं हेच प्रेम टिकवायला एका नवऱ्याला चक्क ५ जन्मा आधीच्या आपल्या बायकांच्या इच्छा पूर्ण कराव्या लागणार आहेत. पण ह्या इच्छा तो पूर्ण करू शकेल का ? हे येत्या १२ जुलै ला आपल्याला 'बाई गं' ह्या चित्रपटा द्वारे समजेल. या चित्रपटाचं धमाल टिझर आज रिलीझ झालय. 

टिझर मध्ये स्वप्नील जोशी ला किती कसरत करावी लागते हे दिसतंय. या चित्रपटात स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत असून त्याच्या सोबत प्रार्थना बेहेरे, सुकन्या मोने,अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान, सागर कारंडे सुद्धा आहे. 
    "बाई गं" या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद पांडुरंग कृष्णा जाधव आणि विपुल देशमुख ह्यांनी केलं आहे. तर संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. छायांकन नागराज एमडी दिवाकर यांनी केले आहे.
     नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत 'बाई गं' हा धम्माल चित्रपट १२ जुलै ला आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वैत मसूरकर दिग्दर्शित 'छबी' चित्रपट २५ एप्रिलला.....अभिनेता समीर धर्माधिकारी, अभिनेते मकरंद देशपांडे यांची मध्यवर्ती भूमिका

"अंकुश" चित्रपटातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले यांचे सिनेनिर्मितीत पदार्पण.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...