क्रिकेटपटू केदार जाधव यांच्या पत्नी स्नेहल जाधव यांना ‘देऊळ बंद २’ पाहून अश्रू अनावर.
वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित आणि प्रवीण विठ्ठल तरडे लिखित-दिग्दर्शित ‘देऊळ बंद २ : आता परीक्षा देवाची’ हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असून विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्याचे भरभरून कौतुक होत आहे. या मालिकेत आता भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव यांच्या पत्नी आणि माजी क्रिकेटपटू स्नेहल जाधव यांनी चित्रपटाबद्दल भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.
नुकताच स्नेहल जाधव आणि केदार जाधव यांनी ‘देऊळ बंद २ : आता परीक्षा देवाची’ हा चित्रपट पाहिला. चित्रपटातील शेतकऱ्यांच्या जीवनातील संघर्ष, त्यांच्या कुटुंबांच्या वेदना, आशा-निराशेचा प्रवास आणि समाजासमोरील वास्तववादी प्रश्न यांची प्रभावी मांडणी पाहून स्नेहल जाधव अक्षरशः भारावून गेल्या. चित्रपटातील अनेक प्रसंग पाहताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले. चित्रपट पाहिल्यानंतर केदार आणि स्नेहल जाधव यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन करत अभिनेत्री स्नेहल तरडे यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक केले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्नेहल जाधव या स्वतः एक यशस्वी क्रिकेटपटू आहेत. २०११ मध्ये त्यांचा विवाह भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव यांच्यासोबत झाला. क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या दाम्पत्याने ‘देऊळ बंद २’च्या आशयपूर्ण मांडणीचे विशेष कौतुक केले.
वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित ‘देऊळ बंद २ : आता परीक्षा देवाची’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण विठ्ठल तरडे यांनी केले असून निर्मिती कैलास वाणी, जयश्री कैलास वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी सूर्यवंशी यांनी केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा