पोस्ट्स

मार्च, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

'सर्जा' चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित...

इमेज
अनोख्या टायटलसोबतच फर्स्ट लुकमुळे लाइमलाईटमध्ये आलेल्या 'सर्जा' या आगामी मराठी चित्रपटातील गाणी काही दिवसांपूर्वीच संगीतप्रेमींच्या भेटीला आली आहेत. यातील 'जीव तुझा झाला माझा...', 'धड धड...' आणि 'संगतीनं तुझ्या...' ही गाणी रसिकांच्या चांगलीच पसंतीस उतरल्यानं 'सर्जा'बाबतची उत्सुकता वाढली आहे. आता या चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाची झलक दाखवणाऱ्या 'सर्जा'च्या ट्रेलरचं सर्वत्र कौतुक होत असून, रिलीज झाल्यानंतर अत्यंत कमी वेळात 'सर्जा'च्या ट्रेलरवर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला आहे. राजवर्धन फिल्म्स क्रिएशनची प्रस्तुती असलेल्या 'सर्जा'ची निर्मिती अमित जयपाल पाटील यांनी केली असून, रमेश रंगराव लाड आणि अभयसिंह माणिकराव हांडे पाटील या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. संगीतप्रधान 'सर्जा' चित्रपटाचं दिग्दर्शन धनंजय मनोहर खंडाळे यांनी केलं आहे. सुमधूर पार्श्वसंगीत, श्रवणीय गीत-संगीत, अर्थपूर्ण संवाद, नयनरम्य लोकेशन्स, सहजसुंदर अभिनय आणि सुरेख दिग्दर्शनाची झलक 'सर्जा'च्या ट्रेलरम...

‘आयटीबी बर्लिन’ महोत्सवात महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन....

इमेज
दरवर्षीप्रमाणे यंदाही जर्मनीत ‘आयटीबी बर्लिन २०२३’ तर्फे भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील पर्यटन उद्योगाला जागतिक पातळीवर चालना देण्यासाठी प्रतिष्ठित ‘आयटीबी बर्लिन’ व्यापार मेळाव्यात राज्याच्या पर्यटन विभागाने सहभाग घेतला होता. यावर्षी ‘आयटीबी बर्लिन’ व्यापार मेळाव्यामध्ये जवळपास १६१ देश तसेच १०,००० पेक्षा जास्त प्रदर्शकांनी सहभाग नोंदवला. त्याठिकाणी वैभवशाली संस्कृती, समृद्ध इतिहास, निळे समुद्रकिनारे असलेल्या महाराष्ट्राची वैशिष्ट्ये सर्वांसमोर मांडण्यात आली. यावर्षी आयटीबी बर्लिन ‘एमटीडीसी’ चा ‘महाराष्ट्र पर्यटन स्टॉल’ संपूर्ण आयटीबीचा केंद्रबिंदू राहिला. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अनुभव घेता यावा यासाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते. यात महाराष्ट्रातील पारंपारिक नृत्यप्रकार, लावणी या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले. अभिनेत्री लावणीसम्राज्ञी करिश्मा वाबळे हिने आपल्या धमाल लावणी सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे आयोजन स्टारक्राफ्ट एंटरटेनमेंट प्रा.लि. चे संचालक श्री संतोष मिजगर यांनी केले होते...

स्टोरीटेल मराठीचे "एप्रिल पुल"!

इमेज
लोकप्रिय मराठी विनोदी लेखक ,  शिक्षक ,  वक्ते ,  पटकथालेखक ,  नाटककार ,  नकलाकार ,  कवी ,  संगीतकार ,  गायक ,  पेटीवादक ,  अभिनेते म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व आपले भाई उर्फ पु.ल. देशपांडे. जगभरातील त्यांच्या असंख्य साहित्यप्रेमींसाठी  ' स्टोरिटेल मराठी '  एक आनंदाची बातमी घेऊन आले आहे. एप्रिल महिना हा स्टोरिटेल मराठीवर "एप्रिल पु ल " असणार आहे. पुलंच्या पुस्तकांची  ' ऑडिओ बुक्स '  संपूर्ण एप्रिल महिनाभर विश्वभरातील रसिकांना ऐकता येणार असल्याने खऱ्या अर्थाने रसिकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. दर आठवड्याला पुलंचे एक लोकप्रिय पुस्तक नामवंतांच्या सुस्पष्ट आवाजात  ' ऑडिओ बुक्स '  फॉरमॅटमध्ये  ' स्टोरिटेल मराठीवर '  ऐकता येईल. हा महिना एप्रिल फुल! करण्याचा नाही!! तर स्टोरीटेलवर  ' एप्रिल पु ल '  ऐकण्याचा आहे! या महिन्यात स्टोरीटेलवर दर चार दिवसांनी पुलंचे नवे ऑडिओबुक प्रकशित होणार आहे. १ एप्रिल रोजी  ' गुण गाईन आवडी '  मधील काही लेख प्रकाशित होतील तर ४ एप्रिलला  ' मैत्...

"उर्मी"चित्रपटाचा ट्रेलर लाँच...

इमेज
मनोरंजक कथा, खुसखुशीत संवाद आणि उत्तम स्टारकास्ट असलेल्या ऊर्मी या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. "उर्मी" हा चित्रपट १४ एप्रिलपासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. समृद्धी क्रिएशननं 'उर्मी' चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. डॉ. प्रवीण चौधरी चित्रपटाचे निर्माता, चैताली प्रवीण चौधरी सहनिर्माती आहेत. राजेश जाधव यांनी चित्रपटाचं पटकथा, संवादलेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. विजय गटलेवार आणि उत्पल चोधरी यांनी संगीत, अनंत कामत यांनी संकलन, कौशल गोस्वामी यांनी छायाचित्रणाची जबाबदारी निभावलीय. चित्रपटात अभिनेत्री रसिका सुनील, सायली संजीव अभिनेता चिन्मय उदगीरकर, नितीश चव्हाण, माधव अभ्यंकर, सायली पराडकर,तृप्ती देवरे , संतोष शिंदे  अशी उत्तम स्टारकास्ट असून ऋतुजा जुन्नरकर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे.  "उर्मी" या चित्रपटात नाती, प्रामाणिकपणा, विश्वास, प्रेम, मैत्री हे बिंदू जोडत एक उत्तम कथा साकारली आहे. पती-पत्नी यांच्या नात्यात आलेल्या तिसऱ्या व्यक्तीमुळे काय घडते ? असं चित्रपटाचं कथासूत्र आहे. नायकाचं वैवाहिक आयुष्य सुरळीत सुरू असताना आधीची प्रेयसी नायकाच्...

अवधूत गुप्ते यांचं रॅप शैलीतलं गाणं....

इमेज
हाय व्होल्टेज ड्रामा असलेल्या 'सर्किट' या चित्रपटातलं वाजवायची सणकन हे गाणं लाँच करण्यात आलं आहे. रॅप शैलीचं हे गाणं सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांनी गायलं असून मंगेश कांगणे यांनी हे गाणे लिहिले आहे. "सर्किट" हा चित्रपट ७ एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.  भांडारकर एंटरटेन्मेंट आणि पराग मेहता प्रस्तुत सर्किट या चित्रपटाची निर्मिती मधुर भांडारकर, फिनिक्स प्रॉडक्शनच्या पराग मेहता, अमित डोगरा आणि देवी सातेरी प्रॉडक्शनच्या प्रभाकर परब यांनी केली आहे. स्वरूप स्टुडिओचे सचिन नारकर, विकास पवार तर फिनिक्स प्रॉडक्शनचे अल्पेश गेहलोत, कीर्ति पेंढारकर, आकाश त्रिवेदी, मनोज जैन, मोहित लालवाणी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. आकाश पेंढारकर यांनी या चित्रपटातून आपले दिग्दर्शकीय पदार्पण केलं आहे.  तर अभिजीत कवठाळकर यांचं श्रवणीय संगीत या चित्रपटाला लाभलं आहे. संजय जमखंडी यांनी रुपांतरित कथा आणि संवाद लेखन, शब्बीर नाईक यांनी छायांकन, तर अतुल साळवे यांनी कार्यकारी निर्माता म्हणून जबाबदारी निभावलीय. चित्रपटात वैभव तत्त्ववादी, हृता दुर्गुळे, रमेश परदेशी, मिलिंद शिंदे अशी तग...

रंगभूमीवरील योगदानाबद्दल प्रसिद्ध गायिका-अभिनेत्री फैयाज शेख यांना 'रंगकर्मी सन्मान' तर सांस्कृतिक - सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी 'चतुरंग संस्थे'चे संस्थापक विद्याधर निमकर यांना 'ध्यास सन्मान' .

इमेज
अॅड फिझ ही संस्था गेली १५ वर्षे 'चैत्रचाहूल' हा मनोरंजनाचा कार्यक्रम करते. त्याचबरोबर सांस्कृतिक - सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचे कार्य केलेल्या व्यक्तीला 'ध्यास सन्मान' देऊन आणि रंगभूमीवरील मोलाच्या योगदानाबद्दल 'रंगकर्मी सन्मान' प्रदान करून समाजभानही जपते या वर्षी हे सन्मान चतुरंग संस्थेचे संस्थापक विद्याधर निमकर आणि प्रसिद्ध गायिका-अभिनेत्री फैयाज शेख यांना ख्यातनाम दिग्दर्शक राजदत्त आणि न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारल्यावर प्रसिद्ध गायिका-अभिनेत्री फैयाज शेख म्हणाल्या, "चैत्रचाहूलच्या परिवाराने मला हा 'रंगकर्मी सन्मान' पुरस्कार दिला, हे पाहून खूप बरं वाटलं. आपण जे काही केलं आहे त्याची लोकांना जाणीव आहे, हे पाहून आनंद होतो. 'चैत्र चाहूल'ला पंधरा वर्ष पूर्ण झाली आहेत, या पुरस्काराच्या निमित्तानं मी प्रथमच या व्यासपीठावर आली आहे. मला यानिमित्तानं आपल्यासमोर रसिकांच्या आवडीचे गाणे सादर करण्याचा योग आला आहे. मी आपल्यासर्वांना या यानिमित्त शुभेच्छा आणि धन्यवाद देऊ इच्छिते." तर ध...

हृदयस्पर्शी प्रेमाच्या 'सरी'चे टीझर प्रदर्शित....

इमेज
त्याच्या, तिच्या आणि त्याच्या प्रेमाची एक अकल्पित गोष्ट असलेला 'सरी' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून, या टीझरमध्ये प्रेमाचे त्रिकुट दिसत आहे. दियाच्या( रितिका श्रोत्री)आलेल्या दोन मुलांसोबत तिची मैत्री होते, ती दोघांच्याही प्रेमात पडते, पण शेवटी असे काय होते, ज्यामुळे दिया स्वतःला दुखावून घेते? तिच्या आयुष्यात ते दोघे कसे येतात? त्या दोघांपैकी ती कोणाच्या प्रेमाचा स्वीकार करणार आणि या प्रेमकथेचा शेवट काय होणार ? हे प्रेक्षकांना येत्या ५ मे रोजी समजणार आहे. कॅनरस प्रॅाडक्शन प्रस्तुत, डॉ. सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्मित या चित्रपटाचे लेखन, संकलन दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक अशोका के. एस. यांनी केले असून 'सरी' या चित्रपटाच्या निमित्ताने ते प्रथमच मराठीत पदार्पण करत आहेत. रिलायन्स एंटरटेनमेंटने या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी सांभाळली आहे. तर या चित्रपटात  रितिका श्रोत्री,अजिंक्य राऊत, पृथ्वी अंबर यांच्या प्रमुख भूमिका असून मृणाल कुलकर्णी, संजय खापरे, पंकज विष्णू आणि केतकी कुलकर्णी सहभूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे संगीत सुप्रसिद्ध संग...

दिगंबर नाईक यांना बाईने केले हैराण........

इमेज
आपल्या विनोदी टायमिंगने  रसिकांना खळखळून हसायला लावणारे अभिनेते दिगंबर नाईक सध्या एका बाईमुळे त्रस्त झाले आहेत. या बाईने त्यांना हैराण करून सोडलं आहे.*बाई वाड्यातून जा* असं ते म्हणतायेत. ही बाई  नेमकी कोण? ती वाड्यात का आली आहे? ती बाई वाड्यात राहणार ? की दिगंबर नाईक तिला घालवण्यात यशस्वी होणार का ? हे पाहायचं असेल तर अभिनेते दिगंबर नाईक आणि बिगबॉस फेम सोनाली पाटील यांचे आगमी  *‘बाई वाड्यातून जा’* हे धमाल विनोदी नाटक पाहावं लागेल. येत्या बुधवारी २९ मार्चला अत्रे  रंगमंदिर कल्याण येथे या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे. दिशा आणि कलारंजन प्रस्तुत या नाटकाचे निर्माते उदय साटम, प्रिया पाटील, आबा ढोले यांचे आहे.  नाटकाचे लेखन दिग्दर्शन संकेत तांडेल यांचे आहे. या नाटकाची कथा एका जुन्या वाड्या भोवती फिरते. हा वाडा विकायचा असतो. तो विकताना एका बाईमुळे कसा गोंधळ उडतो? याची धमाल कथा *‘बाई वाड्यातून जा’* या नाटकातून पाहायला मिळणार आहे. अभिनेते दिगंबर नाईक आणि  बिगबॉस फेम सोनाली पाटील या दोघांसमवेत या नाटकात भूषण घाडी, दीपा माळकर, भावेश टिटवळकर, अश्वजी...

रंगभूमी आपली आहे, त्यामुळे पॅनल 'आपलं पॅनल'

इमेज
गेली पाच वर्षे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही नाट्य विषयक हालचालींपेक्षा वादामुळेच अधिक चर्चेत राहिली. म्हणजे नाट्य विषयक घडामोडी झाल्या नाहीत असे आहे कां? तर तसे नाही.. रंगभूमीच्या विकासासाठी अनेक कामं या पाच वर्षात झाली. पण इतकां स्वच्छ आणि निर्भेळ कारभार काहींना सहन न झाल्याने वैयक्तिक आकासापोटी जाणीवपूर्वक काहींना हाताशी धरून दिशाभूल करण्यात आली.  अनेकांनी आम्ही नाट्य परिषद सोडून पळून जाऊ असा जाहीर दावा केला होता. पण आम्ही कुठेही गेलो नाही किंवा पदावरून मागे झालो नाही. कारण केलेल्या सर्व कामांची आम्ही जबाबदारी घेतली आणि सामोरेही गेलो. कारण, सरते शेवटी 'कर नाही त्याला डर कशाला'. आम्ही तुमचे आपले आहोत.. तुम्ही आम्हाला आपलं मानलं म्हणून हे करणं शक्य झालं.  म्हणूनच रंगभूमीचा सर्वांगिक विकास करण्यासाठी, कलाकर - रंगमंच कामगार – निर्माते - लेखक – दिग्दर्शक – हौशी - प्रायोगिक आणि रसिकमायबाप यांच्यातील आपला दुवा होण्यासाठी आम्ही आपल्या माणसांचं *‘आपलं पॅनल’* घेऊन पुन्हा एकदा नाट्य परिषदेच्या निवडणुकीत उभे ठाकलो आहोत.   *‘आपलं पॅनल’ विषयी..* नाटक ज्यांचा प्रा...

'स्वामी माझी आई' म्युझिक व्हिडीओ प्रकाशित.

इमेज
भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या  आणि 'भिऊ नकोस..मी तुझ्या पाठीशी आहे’, असे अभिवचन भक्तांना देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन नुकताच  संपन्न झाला. स्वामींचा आभास सदैव सोबत असतो, परंतु सहवास नेहमी असेल की नाही सांगता येत नाही म्हणून तर आई आणि आईची माया, आईची साथसोबत त्यांनी प्रत्येकासोबत जोडली. स्वामींच्या  प्रकट दिनाचे औचित्य साधून 'स्वामीरुपी 'आई' ची  महती सांगणाऱ्या  'स्वामी माझी आई' या  मराठी म्युझिक व्हिडीओची निर्मिती  ‘आनंदी वास्तू’ने केली आहे.  आई केवळ पोटातून जन्म देणारी किंवा रक्ताचे नाते नसून आई ही ईश्वराचा अंश असते. आपला सांभाळ करणारी, मायेने खाऊ घालणारी, आयुष्याला योग्य वळण देणारी,  संस्कार घडवणारी व्यक्ती म्हणजेच आई… 'स्वामी माझी आई'   या मराठी म्युझिक व्हिडीओच्या माध्यमातून अशाच ‘स्वामीरुपी आई’ ह्या भावनेचं दर्शन घडणार आहे.   'स्वामी माझी आई'  या  म्युझिक व्हिडीओची निर्मिती ‘आनंदी वास्तू’  यांनी केली  असून   ओंकार हनुमंत माने यांचे लेखन -दिग्दर्शन आहे. सौ अश्वि...

नागराज मंजुळे, सयाजी शिंदे चंद्रपूर पोलीसांच्या भेटीला.

इमेज
झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत, आटपाट निर्मित, हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित 'घर बंदूक बिरयानी' हा चित्रपट येत्या ७ एप्रिल रोजी प्रदर्शित होत असून, या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर, सायली पाटील अशी संपूर्ण टीम महाराष्ट्र दौरा करीत आहे. 'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटाची संपूर्ण टीम चंद्रपूरमध्ये दाखल झाली असून, नागराज पोपटराव मंजुळे आणि सयाजी शिंदे यांनी नक्षलवाद्यांशी स्वतः दोन हात केलेल्या चंद्रपूरमधील C १६ बटालियनच्या पोलिसांशी संवाद साधून त्यांच्या सोबत वेळ घालवला. 'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटाचा ट्रेलर पाहताना या बटालियनने खूप मजा केली असून, टाळ्या आणि शिट्यांच्या गजरात रांगडा पोलीस ऑफिसर नागराज पोपटराव मंजुळे आणि सदाबहार सयाजी शिंदे यांचे स्वागत केले. या चित्रपटात नागराज पोपटराव मंजुळे यांनी अस्सल मातीतला, तडफदार पोलीस ऑफिसर अशी जबरदस्त भूमिका साकारली आहे.

'अशीच आहे चित्ता जोशी' नाटकावर बंदी घालण्याची मागणी!

इमेज
मैथ्थिली जावकर आणि 'संस्कार भारती' (कोकण प्रांत) यांच्या सहयोगाने, 'ओम साईनाथ प्रॉडक्शन्स'  निर्मित, 'स्मित हरी' प्रकाशित २ अंकी सामाजिक धार्मिक विचारांच्या 'अशीच आहे चित्ता जोशी' या नाटकाचा पनवेल येथील प्रयोग पाहून मुंबईतील काही कष्टकरी महिलांच्या संघटनांनी तीव्र आक्षेप नोंदवत शिवाजी मंदार नाट्यगृहातील प्रयोगादरम्यान निषेध मोर्चा काढून आपला आक्षेप नोंदविला आहे. या नाटकाचे येत्या शनिवार दिनांक २५ मार्च २०२३ रोजी रात्रौ ८:३० वाजता, प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली (प.), मुंबई आणि  बुधवार दिनांक २९ मार्च २०२३ रोजी दुपारी ४:०० वाजता, दीनानाथ नाट्यमंदिर, पार्ले येथे होणारे प्रयोग तात्काळ थांबवावेत आणि आम्हा सावित्रीच्या कष्टकरी लेकींची बदनामी केल्याबद्दल माफी मागावी नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन छेडू असा निर्वाणीचा संदेश निर्माती - अभिनेत्री मैथ्थिली जावकर यांच्यापर्यंत पोहचविला आहे. मैथ्थिली जावकर यांच्या तोंडी असलेल्या काही आक्षेपार्ह आणि तेढ निर्माण करणाऱ्या संवादांवर या महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त करून कष्टकरी सावित्रीच्या लेकींचा अपमान यापुढे सहन केला जाणार नाही,...

'जैतर'. . .खान्देशात घडलेल्या सत्यघटनेवर आधारित एक संगीतमय प्रेमकहाणी.....

इमेज
  जैतर. . . चित्रपटाचे शीर्षक वाचून त्या शब्दाचा नेमका अर्थ काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जसे ‘मित्र’ ह्या शब्दाला ग्रामीण बोलीभाषेत ‘मैतर’ असेही संबोधले जाते, अगदी त्याच्या विरुद्धार्थी ‘जैतर’ हा शब्द आहे. म्हणजेच हितचिंतक नसलेला तो ‘जैतर’. अर्थात, हा शब्द उत्तर महाराष्ट्रात खान्देश प्रांतातातील बोलीभाषेत प्रचलित आहे. ‘जैतर’ ही एका विद्यार्थीदशेतील प्रेमीयुगुलाची, मालेगावात घडलेल्या एका सत्यघटनेवर आधारित गोष्ट आहे. जाती, वर्ण, आर्थिकस्तर आदी गोष्टींवरून समाजात भेदाभेद होतो. त्याचे पडसाद अनेकदा प्रेमप्रकरणात किंवा लग्नादरम्यान उमटतात आणि प्रेमीयुगुलाला संघर्षाला तोंड द्यावे लागते. ग्रामीण भागात ह्या संघर्षाचे गंभीर परिणाम अनेक अंगाने मुलीला भोगावे लागतात. प्रामुख्याने तिच्या शिक्षणावर आणि एकूणच स्वातंत्र्यावर बंदी येते. चित्रपटाचे कथालेखक आणि निर्माते मोहन घोंगडे हे मूळ शेतीव्यावसायिक आहेत. मालेगावात प्रेमप्रकरणावरून घडलेल्या ‘त्या’ सत्यघटनेत त्यांना याहून गंभीर समस्या दिसली आणि त्यांचे संवेदनशील मन व्यथीत झाले. त्या समस्येला वाचा फोडण्यासाठी त्यांनी जैतर ही कथा लिहीली आणि त्य...

'फुलराणी'चा दिमाखदार प्रिमियर.

इमेज
ट्रेलर पासून उत्सुकता निर्माण करणाऱ्या ‘फुलराणी’ या चित्रपटाचा शानदार  प्रीमियर सोहळा नुकताच मान्यवरांच्या  उपस्थितीत संपन्न  झाला. चित्रपटातील कलाकारांसोबतच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी या प्रिमियर सोहळ्याला हजेरी लावली. यात अभिजीत पानसे,  प्रसाद ओक,  मंजिरी ओक,  जयवंत वाडकर,  रसिक सुनिल, ओंकार राऊत, रोहिणी निनावे, सोनाली खरे, गौरी नलावडे, अरुण कदम, आयेशा मधुकर, दिव्या सुभाष, आशय कुलकर्णी, सिद्धार्थ मेनन आदि मान्यवर कलाकार उपस्थित होते.    उत्तम चित्रपट अशा शब्दात उपस्थितीत मान्यवरांनी चित्रपटाचे कौतुक केले आहे. कलाकारांच्या अप्रतिम अभिनयासोबतच दर्जेदार निर्मितीमूल्यांचा वापर यामुळे ‘फुलराणी’ रसिकांची मने जिंकत असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली. प्रत्येक फुलाचा सुवास वेगळाआणि रुबाब त्याहून वेगळा. सुगंधाची उधळण करणाऱ्या फुलांप्रमाणे कोमेजल्यावरही आपला सुवास तसाच ठेवणाऱ्या फुलांची खासियत जरा जास्त खास असते. आपल्यातला हाच रुबाब घेऊन आपल्यातील ‘फुलराणी’ शोधायला बाहेर पडलेल्या शेवंता तांडेल ची कलरफुल स्ट...

'सरी' चित्रपटात दिसणार प्रेमाचा त्रिकोण......

इमेज
प्रेम म्हणजे दोन जीवांचे मिलन. जणू स्वर्गात बांधल्या गेलेल्या रेशीमगाठीच. पण क्षणात त्यांच्या आयुष्यात तिसरा आला तर? अशी अकल्पित प्रेमकथा असलेला 'सरी' हा चित्रपट येत्या ५ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटामधील प्रमुख भूमिकेत असलेल्या कलाकारांचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून मालिकेतून घराघरात पोहोचलेला अजिंक्य राऊत, विविध चित्रपटांतून तरूणांच्या हृदयचा ठाव घेणारी रितिका श्रोत्री आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता पृथ्वी अंबर यांच्या प्रेमाचा त्रिकोण या पोस्टरमध्ये दिसत आहे. आता यांचे प्रेम त्यांना आयुष्याच्या कोणत्या वळणावर नेणार हे पाहणे रंजक ठरणार आहे. 'लाईफ इज फुल्ल ऑफ सरप्राइज अँड मिऱ्याकल्स.' अशी या प्रेमकथेची टॅगलाईन आहे. कॅनरस प्रोडक्शन प्रस्तुत, डॉ. सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्मित या चित्रपटाचे लेखन, संकलन दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक अशोका के. एस. यांनी केले असून, सरी या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच ते मराठीत पदार्पण करत आहेत, तर रिलायन्स एंटरटेनमेंटने या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी स...

हाय व्होल्टेज ड्रामा असलेल्या "सर्किट" चित्रपटाचा ट्रेलर लाँच......

इमेज
हाय व्होल्टेज ड्रामा आणि रोमान्स असलेल्या सर्किट या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला. चित्रपटाच्या टीजरमधून निर्माण झालेली उत्सुकता आता ट्रेलरमधून शिगेला पोहोचली असून, "सर्किट" हा चित्रपट ७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. भांडारकर एंटरटेन्मेंट आणि पराग मेहता प्रस्तुत "सर्किट" या चित्रपटाची निर्मिती मधुर भांडारकर, फिनिक्स प्रॉडक्शनच्या पराग मेहता, अमित डोगरा आणि देवी सातेरी प्रॉडक्शनच्या प्रभाकर परब यांनी केली आहे. स्वरूप स्टुडिओचे सचिन नारकर, विकास पवार तर फिनिक्स प्रॉडक्शनचे अल्पेश गेहलोत, कीर्ति पेंढारकर, आकाश त्रिवेदी, मनोज जैन, मोहित लालवाणी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. आकाश पेंढारकर यांनी या चित्रपटातून आपले दिग्दर्शकीय पदार्पण केलं आहे. आनंद पेंढारकर, जितेंद्र जोशी यांनी गीतलेखन, तर अभिजीत कवठाळकर यांचं श्रवणीय संगीत या चित्रपटाला लाभलं आहे. संजय जमखंडी यांनी रुपांतरित कथा आणि संवाद लेखन, शब्बीर नाईक यांनी छायांकन, तर अतुल साळवे यांनी कार्यकारी निर्माता म्हणून जबाबदारी निभावलीय. आतापर्यंत टीझरमध्ये वैभव तत्त्ववादी, हृता दुर्गुळे...

‘चिरायू’ २०२३ जल्लोषात साजरा.....

इमेज
मराठी नववर्षदिनाच्या स्वागतासाठी, त्याच्या पूर्वसंध्येला साजरा होणारा मराठी कलाविश्वाचा 'चिरायू' या ही वर्षी हर्षोल्हासात साजरा झाला. अवघं मराठी कलाविश्व यानिमित्ताने एकवटलं होतं. शेलार मामा फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘चिरायू’चे वैशिष्ट्य म्हणजे नवोन्मेषाच्या आनंदासोबतच पडद्यामागे राबणाऱ्या कलाकर्मींची दखल ‘चिरायू’च्या मंचावर घेतली जाते. उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात हा सोहळा दिमाखात रंगला. पारंपारिक गोष्टींचा साज लेवून आरोग्याची व अक्षरांच्या गुढीची संकल्पना यंदाच्या 'चिरायू' ची खासियत. मराठी कविता तसेच संदेश याच्या माध्यामातून सृजनात्मक अनुभवासोबत तृतीयपंथीयां च्या हस्ते विशेष गुढीची निर्मिती आणि गुढी उभारत नव्या विचारांचा पायंडा 'चिरायू' ने यंदा पाडला. यंदा विनोद राठोड,पुंडलिक सानप, विलास हुमणे या प्रकाश योजनाकारांना सन्मानित  करण्यात आले. तसेच समाजसेवेसाठी अर्चना नेवरेकर मंगेश चिवटे (शिवसेना वैद्यकीय  कक्ष) यांचा सत्कार करण्यात आला. अक्षय बर्दापूरकर, करण नाईक विलास कोठारी,अर्जुन मुद्दा साजन पाटील आदि मान्यवरांचे सहकार्य यासा...

मराठी रुपेरी पडद्यावर ‘आणीबाणी’

इमेज
'आणीबाणी' म्हटलं कि, ती सर्वसामान्य जनतेची चिंता वाढवणारी असते. त्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारी असते. पण आता मात्र चिंता वाढवायला नाही तर कमी करायला ‘मनोरंजनाची आणीबाणी’ लागू होणार आहे. लेखक अरविंद जगताप आणि दिग्दर्शक दिनेश जगताप यांनी विनोदाची ही ‘आणीबाणी’ प्रेक्षकांसाठी आणली आहे. उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, सयाजी शिंदे, संजय खापरे, वीणा जामकर, उषा नाईक, प्राजक्ता हनमघर, सीमा कुलकर्णी, रोहित कोकाटे, सुनील अभ्यंकर, पद्मनाभ बिंड, किशोर नांदलस्कर अशा मराठीतील अनेक दिग्गजांचा या ‘आणीबाणी’त सहभाग आहे. 'दिनिशा फिल्म्स' निर्मित ‘आणीबाणी’ हा मराठी चित्रपट येत्या जूनमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.   राजकीय परिस्थितीवर आपल्या मिश्किल लिखाणाने प्रहार करत लेखक अरविद जगताप यांनी वेगवेगळे मुद्दे चित्रपटातून आजवर मांडले आहेत. आता आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर नवरा बायकोच्या नात्याची हलकीफुलकी गोष्ट ते घेऊन आले आहेत. ही ‘आणीबाणी’ कोणासाठी अडचण ठरणार? आणि अडचणीत सापडलेले या आणीबाणीतून कसे बाहेर पडणार ? याची मनोरंजक कथा यात मांडण्यात आली आहे.  दिग्ग्ज कलाकारांची मोट ...

'चौक''१२ मे'ला होणार प्रदर्शित.....

इमेज
हिंदू नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त पुण्यातील सिटी प्राईड कोथरूड थिएटरच्या बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटाची बॉक्स ऑफिस गुढी उभारण्यात आली. याप्रसंगी मराठी चित्रपटासंबंधित सर्व मान्यवर आणि कलाकार उपस्थित होते. यावेळी दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड यांचा आगामी मराठी चित्रपट ‘चौक’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली. १२ मे २०२३ रोजी चौक प्रदर्शित होईल. ‘चौक’च्या निमित्ताने देवेंद्र गायकवाड दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. महाराष्ट्रातल्या चौका-चौकाची गोष्ट ते आपल्यासमोर घेऊन येत आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले होते, ज्याने सोशल मीडियावर धुमाकूळ केला. आता या चित्रपटाची तारीख घोषित झाल्याने प्रेक्षकांची उत्सुकता अधिक उंचावली आहे.  'मराठी चित्रपटाची बॉक्स ऑफिस गुढी' या सोहळ्याला रमेश परदेशी, स्नेहल तरडे, सुनिल अभ्यंकर, संस्कृती बालगुडे, किरण गायकवाड, चौक चित्रपटाचे निर्माते दिलीप लालासाहेब पाटील तसेच शुभंकर एकबोटे, अक्षय टंकसाळे, नितीन सुपेकर, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, सुनील महाजन, सिटीप्राईड ग्रुपचे अध्यक्ष अरविंद चाफळकर, भाजप च...

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आदिती पोहनकर अभिनीत 'पाहिले मी तुला'चे पोस्टर प्रदर्शित...

इमेज
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अदिती पोहनकर आणि भूषण पाटील अभिनीत 'पाहिले मी तुला'च्या निर्मात्यांनी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केलं आहे. हा चित्रपट ४ ऑगस्ट २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. प्रतिभावान अभिनेत्री अदिती पोहनकर 'पाहिले मी तुला' या आगामी मराठी चित्रपटात झळकणार आहे. कौटुंबिक नाट्य असलेल्या या चित्रपटात आयुष आणि अलिशा यांच्या भूमिकेतील भूषण आणि अदिती यांची प्रेमकहाणी पहायला मिळणार आहे. त्यांचं प्रेम फुलणार की त्यात अडचणी येणार हे जाणून घेण्यासाठी आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल. कॅप्टन आॅफ द शिप म्हणजेच या चित्रपटाचे दिग्दर्शक असलेले मनोज कोटियान 'पाहिले मी तुला'बाबत म्हणाले की, आपापल्या दैनंदिन जीवनात व्यग्र असलेल्या लोकांना प्रेमाच्या माध्यमातून रिफ्रेश करणारा हा चित्रपट आहे. या कथेद्वारे अशा लोकांना काही क्षणांसाठी का होईना आनंदी करायचं आहे. मुख्य भूमिकेतील अदिती पोहनकर म्हणाली की, मी या चित्रपटाबाबत खूपच उत्सुक आहे. नाटयमय वळणांची हि खूप गोड, इन्टेन्स लव्ह स्टोरी आहे. जेव्हा मला या स्टोरीचं नॅरेशन देण्यात आलं तेव्हा मी इतक...

झी युवा सन्मानच्या मंचावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ठरले नेतृत्वाचे शिलेदार !

इमेज
लहानपणापासून एखाद्या क्षेत्राचे बाळकडू मिळावे आणि त्या संधीचे सोने करावे असे टर्निंग पॉइंट कमी जणांच्या आयुष्यात येतात. त्यात जर ते क्षेत्र राजकीय नेतृत्वाचे असेल तर कृतीशील यश मिळवण्यासाठी कस लागतो. अस्थिरोगतज्ज्ञ म्हणून पदवी हातात असताना खासदार डॉ .श्रीकांत शिंदे यांचा ठाण्यातील एक युवक ते लोकसभेतील युवा खासदार हा प्रवास प्रेरणादायी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असलेले वडील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पावलावर पाऊल टाकत श्रीकांत शिंदे यांनी देशाच्या राजकारणात उमटवलेला ठसा लक्ष वेधून घेणारा आहे. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वावर झी युवा वाहिनीने युवा सन्मान पुरस्काराचे नाव कोरले आहे.   झी युवा सन्मान  पुरस्कारांचे मानकरी कोण होणार याकडे गेल्या काही दिवसांपासून लक्ष लागले होते. समाजातील विविध  क्षेत्रांमध्ये झोकून काम करत असलेल्या १२ क्षेत्रातील तरूणाईची निवड झी युवा वाहिनीने या पुरस्कारांसाठी केली आहे. गुढी पाडव्याच्या शुभमुहूतावर २२ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजता झी युवा वाहिनीवर झी युवा सन्मान पुरस्कार सोहळा पाहता येणार आहे. या मंचावर समाजातील ...

'सर्जा' चित्रपटातील 'धड धड...' गाणं संगीतप्रेमींच्या भेटीला....

इमेज
मराठी रसिकांच्या भेटीला लवकरच एक नवी कोरी म्युझिकल लव्हस्टोरी येणार आहे. 'सर्जा' शीर्षक असलेल्या या चित्रपटातील 'जीव तुझा झाला माझा...' हे काही दिवसांपूर्वी संगीतप्रेमींच्या भेटीला आलेलं गाणं चांगलंच गाजत आहे. सोशल मीडियावर या गाण्यावर लाईक्सचा वर्षाव होत असताना 'सर्जा'मधील 'धड धड...' हे डान्स नंबर रिलीज करण्यात आलं आहे. अबालवृद्धांना ताल धरायला लावणाऱ्या या गाण्यावरही रसिक बेहद्द खुश होणार असून, लगीनसराईसोबतच सर्व सणांना तसेच समारंभांना हे गाणं मोठ्या आवाजात वाजणार आहे. राजवर्धन फिल्म्स क्रिएशनची प्रस्तुती असलेल्या 'सर्जा'ची निर्मिती अमित जयपाल पाटील यांनी केली असून, रमेश रंगराव लाड या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. संगीतप्रधान 'सर्जा' चित्रपटाचं दिग्दर्शन धनंजय मनोहर खंडाळे यांनी केलं आहे. या चित्रपटातील 'धड धड...' हे दमदार गाणं नुकतंच लाँच करण्यात आलं आहे. दिग्दर्शक धनंजय खंडाळे यांनीच लिहिलेलं हे गाणं संगीतकार हर्षित अभिराज यांनी स्वत: आदर्श शिंदेच्या साथीनं गायलं आहे. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला क्षणार्धात ठेका धरा...

'नागराज मंजुळे' बनले मराठीतील ॲक्शन हिरो...

इमेज
नुकताच हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित ‘घर बंदूक बिरयानी’चा ट्रेलर झळकला. लाखोंनी या ट्रेलरला व्ह्यूज मिळाले असून प्रेक्षक ‘घर बंदूक बिरयानी’च्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात आहेत. सगळेच कलाकार खास भूमिकेत असून यात विशेष लक्ष वेधून घेत आहेत, ते नागराज मंजुळे यांचे ॲक्शन सिन्स. त्यांचा हा नवा अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून याबाबतच्या सकारात्मक प्रतिक्रिया अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत, आटपाट निर्मित हा चित्रपट येत्या ७ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर, सायली पाटील, दिप्ती देवी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  नागराज मंजुळे यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच चांगले आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिले आहे. केवळ भारतातच नाही तर परदेशातही त्यांच्या चित्रपटांचे कौतुक झाले आहे. एक दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे किती प्रतिभावान आहेत, हे आपल्याला माहितच आहे. यापूर्वी आपण त्यांचा अभिनयही पाहिला आहे. मात्र ‘घर बंदूक बिरयानी’मध्ये ते पडद्यामागे काम करण्याबरोबरच प...

'प्राजक्ता माळी' ठरली झी युवाची 'तेजस्वी चेहरा,' गुडीपाडवाच्या शुभ मुहूर्तावर पहा झी युवा सन्मान !

इमेज
तरूणाईच्या मनातील संकल्पना, त्यांचा दृष्टीकोन, त्यांची जीवनशैली, करिअरची व्याखया, सौंदर्याविषयीचं मतं इतकच नव्हे तर समाजात घडणाऱ्या गोष्टींवरील स्पष्ट भाष्य हे सगळच ठाम असतं. आज प्रत्येक ठिकाणी तरूणाई त्यांचं बेस्ट देत आहे. अशा तरूणाईचा सन्मान करण्यासाठी तसेच तरूणाईचं हे काम लोकापर्यंत पोहोचवण्यासाठी  झी युवा वाहिनीने एक पाउल पुढे टाकले आहे. छोट्या पडदयावरील प्रत्येक वाहिनी पुरस्कार सोहळे आयोजित करत असते. कलाकारांना त्यांच्या कामाची पावती देत असते. प्रेक्षकांकडून कलाकारांच्या पाठीवर थाप मारली जात असते. मग समाजातील रिअल हिरो असलेल्या तरूणाईच्या शीरपेचातही सन्मानाचा तुरा रोवण्यासाठी नावातच युवा असलेल्या झी युवा या वाहिनीने झी युवा सन्मान पुरस्कार जाहीर केले. या पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर अभिनेत्री प्राजक्ता माळी एक अनोखा पुरस्कार स्वीकारताना प्रेक्षकांना पाहता येणार आहे. झी युवा तेजस्वी चेहरा हा पुरस्कार प्राजक्ता माळी हिने पटकावला असून सध्या प्राजक्तावर कौतुकाची बरसात होत आहे. झी युवा सन्मान  पुरस्कारांचे मानकरी कोण होणार याची उत्सुकता लागली होती. समाजातील विविध १२...

नाटयसृष्टीच्या सक्षमीकरणासाठी 'रंगकर्मी नाटक समूह’ पुन्हा सज्ज.....

इमेज
नाट्यपरिषद ही आपल्या मराठी नाट्य सृष्टीची शिखरसंस्था. प्रेक्षक आणि रंगकर्मी ह्यांच्यामधील दुवा म्हणजे परिषद. अशा ह्या परिषदेची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने  'रंगकर्मी नाटक समूह' हे नाटयसृष्टीतील दिग्ग्ज मान्यवरांचे पॅनल निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. या पॅनलच्या वतीने नुकत्याच एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. 'साद प्रेमाची आस परिवर्तनाची' या सूत्राने नाटक, रंगकर्मी, प्रेक्षक यांच्यातील सेतू म्हणून काम करण्यासाठी तसेच  नाट्यसृष्टीचा चेहरा-मोहरा  बदलण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत आपल्या अनेक योजना  व नव्या संकल्पनांची माहिती त्यांनी यावेळी  दिली.   या पत्रकार परिषदेला  प्रशांत दामले, विजय केंकरे, अजित भुरे, विजय गोखले, वैजयंती आपटे, सुशांत शेलार, दिलीप जाधव आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.   ज्येष्ठ नाटयकर्मी अजित भुरे यांनी प्रास्ताविक करत 'रंगकर्मी नाटक समूह’ पॅनलचे उद्दिष्ट व निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांची ओळख यावेळी करून दिली. हौश...

'द माईंडफूल हार्ट टॉक शो' साठी संगीतकार अशॊक पत्की यांनी संगीतबद्ध केले थीम सॉंग.

इमेज
काही माणसं चौकटीत राहून काम करतात. तर काही चौकटीबाहेरचा विचार करतात. चौकटीबाहेरचा विचार करणारी त्यांच्या कार्यकर्तृत्वातून नवे विचार, कल्पना रुजवत असतात. या नव्या कल्पना, विचार जाणून घेत इतरांना प्रेरणा मिळावी या हेतूने राजकारण, समाजकारण, मनोरंजन  अशा  विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलतं करणारा 'द माईंडफूल हार्ट टॉक शो'  युट्यूब चॅनेलवर चांगलाच लोकप्रिय झाला. २०२१ मध्ये सुरु झालेल्या या शोमधून अनेक मान्यवरांच्या दिलखुलास मुलाखती घेतल्या गेल्या. 'आरती सूर्यवंशी' या युट्यूब चॅनेलद्वारे प्रदर्शित केल्या जाणाऱ्या या 'टॉक शो' च्या पहिल्या पर्वाला २५ हजारहून अधिक दर्शक लाभले. या प्रतिसादानानंतर आता ‘शो' चे दुसरे पर्व भेटीला येणार आहे. एका छोटेखानी कार्यक्रमात  'द माईंडफूल हार्ट टॉक शो' च्या  दुसऱ्या पर्वाची घोषणा करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की उपस्थित होते. अशोक पत्की  यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.विशेष म्हणजे या  टॉक शो' चे  थीम सॉंग स्वतः अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केले आहे. वेगळया जाणीवेने सुरु...

हरीहरन आणि साधना जेजुरीकरांची 'दूरीयां...' गझल मधुन रसिकांच्या भेटीला.....

इमेज
मखमली आवाजाचे धनी असलेले गायक अशी ओळख असणारे हरिहरन यांनी जगभरात आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. काळानुरूप संगीतामध्ये होणारे बदल आत्मसात करून आजही ते संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. हरिहरन यांनी गायिका साधना जेजुरीकर यांच्या साथीनं गायलेली एक सुमधूर गझल नुकतीच रसिक दरबारी सादर करण्यात आलं आहे. प्रकाशनानंतर अल्पावधीतीच या गझलला संगीतप्रेमींची पसंती मिळत असून संगीत क्षेत्रातील विविध मान्यवर या गाण्यावर प्रतिक्रिया देत कौतुकाचा वर्षाव सुरू केला आहे. साधना जेजुरीकर यांची निर्मिती असलेली 'दूरीयां...' हि गझल नुकतीच समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांच्या पिकल म्युझिकच्या बॅनरखाली अंधेरीतील रेड बल्ब स्टुडिओमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. हरीहरन यांच्या साथीने साधना जेजुरीकर यांनी आपल्या सुमधूर गायकीच्या आधारे गझलमधील शब्दरचनांना अचूक न्याय दिला आहे. 'दूरीयां...'बाबत हरीहरन म्हणाले की, आजवर मी बऱ्याच गझल्स गायल्या आहेत, पण 'दूरीयां...' गाताना एका वेगळ्या प्रकारचं आत्मीक समाधान लाभलं. या गीतातील शब्दरचना आणि त्याला अनुरूप अशी संगीतरचना ...

स्व. सुषमा स्वराज पुरस्कार 'नूतन गुळगुळे फाऊंडेशन्स'च्या सौ. नूतन विनायक गुळगुळे यांना प्रदान...

इमेज
सामाजिक क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भगिनींना स्व. सुषमा स्वराज यांच्या नावे पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. दिव्यांगांच्या सेवेत स्वतःला झोकून देत राष्ट्रीय पातळीवर अविरत कार्यरत असलेल्या सौ. नूतन विनायक गुळगुळे यांचा त्यांच्या या भरीव कार्यानिमित्त नुकताच ‘स्व. सुषमा स्वराज पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाने भाजपा महिला मोर्चा वसई-विरार शहर जिल्हा यांच्यावतीने नुकताच नालासोपारा येथे वसई विरार शहर जिल्हा अध्यक्षा सौ प्रज्ञाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ‘स्व. सुषमा स्वराज पुरस्कार’ स्वीकारताना सौ. नूतन विनायक गुळगुळे म्हणाल्या, "अभ्यासू आणि अमोघ वक्तृत्वाने देशवासियांच्या मनावर गारूड निर्माण करणाऱ्या कणखर नेत्या, भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला परराष्ट्र मंत्री आणि उत्कृष्ट संसदपटू स्व. सुषमा स्वराज यांच्या नावे मिळालेला पुरस्कार मला प्रेरणादाई असून, सुषमाजींनी अंगीकारलेली मूल्ये आणि आदर्श यांची जाणीव करून देत राहील, आणि स्वान...

'घर बंदूक बिरयानी'चा ट्रेलर प्रदर्शित ....

इमेज
सध्या जोरदार चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत, आटपाट निर्मित 'घर बंदूक बिरयानी'. मुळात नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओजने मराठी सिनेसृष्टीला नेहमीच हटके चित्रपट दिले आहेत. एका सर्वसाधारण विषयाला अनन्यसाधारण बनवणे, ही यांची खासियत आहे. हीच खासियत जपत आता लवकरच हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित  'घर बंदूक बिरयानी' प्रदर्शित होणार आहे. यापूर्वीच या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावले. टीझरने या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवली आणि ही उत्सुकता शिगेला पोहोचवण्यासाठी आता या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर सोशल मीडियावर झळकला आहे. यात नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि सायली पाटील याच्या प्रमुख भूमिका आहेत.  आशेच्या भांगेची नशा भारी अशी टॅगलाईन असणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पोलीस, डाकू यांच्यात चकमक होताना दिसत आहे. यात एका तरुणाचाही सहभाग दिसत आहे. आता यांच्यात नक्की कशावरून ही चकमक सुरु आहे आणि घर, बंदूक आणि बिरयानीचा याच्याशी नेमका काय संबंध, याचे उत्तर प्रेक्षकांना ७ एप्रिल रोजी मिळणार आहे. या चित्रपटाच...

'चौक' येतोय प्रेक्षकांच्या भेटीस... लवकरच!

इमेज
चौक... चौक म्हणलं की आठवतो तो चौकातल्या मंडळींचा गलका, येणाऱ्या-जाणाऱ्यांची वर्दळ, चौकातल्या काका, मामा, दादांचे किस्से, वाद आणि असं बरंच काही... अशाच एका चौकाची गोष्ट आपल्यासमोर घेऊन येत आहेत अभिनेते आणि दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड उर्फ दया. आज या चित्रपटाची पहिली झलक पोस्टरच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आली. ‘चौक’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज रिलीज झाले. या पोस्टरमध्ये, चौकात सूचना, सुविचार लिहिण्यासाठी असलेला फळा दिसतोय. दोस्ती ग्रुप, पुणे यांच्या या फळ्यावर मोठ्या अक्षरात ‘चौक’ दिसतंय. अनुराधा प्रॉडक्शन आणि निर्माते दिलीप लालासाहेब पाटील (तात्या) प्रस्तुत ‘चौक’ चित्रपटात महाराष्ट्रातील चौकाचौकात घडणारी गोष्ट आहे, असा अंदाज बांधला जातोय. अद्याप या चित्रपटाच्या तारखेची घोषणा झालेली नसून हा चित्रपट नक्की कधी रिलीज होतोय, याची उत्सुकता आहे. तसेच या चित्रपटात कोण कलाकार असतील, चौक म्हणजे नक्की कशासंदर्भात कथा असेल, याचेही तर्क बांधले जात आहेत. ‘चौक’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांचे असून या चित्रपटाच्या निमित्ताने ते दिग्दर्शनात पदार्पण करत आह...