'रॉटरडॅम'मध्ये गौरवलेल्या 'फॉलोअर' चित्रपटाचा टीजर लाँच.
रॉटरडॅम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गौरवलेल्या "फॉलोअर" या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला आहे. सीमाभागातील तरुणाच्या वैचारिक संघर्षाची कहाणी या चित्रपटातून उलगडणार असून, मराठी, कन्नडा आणि हिंदी या भाषांचे अनोखे मिश्रण या चित्रपटात आहे. 'फॉलोअर'ची निर्मिती ऑरेंजपिक्सेल स्टुडिओज आणि व्हिस्का फिल्म्स यांनी हमारा मीडिया लॅब्स आणि कॉजॅलिटी फिल्म्स प्रोडक्शन यांच्या सहकार्याने केली आहे. विनय मिश्रा, प्रीती अली, प्रतीक मोइत्रो, अनुभव केआर, पल्लवी रोहतगी, मौलिक शर्मा, चारुलता मैत्र, हर्षद नलावडे हे या चित्रपटाचे निर्माते असून राघवन भारद्वाज, चरण सुवर्णा आणि अभिषेक गौतम हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन हर्षद नलावडे यांचे असून निभावली असून रघु बसरीमारद, डोना मुन्शी आणि हर्षद नलावडे यांच्यासह प्रतिभावान कलाकारांचा समावेश आहे. साकेत ग्यानी यांनी छायाचित्रण, मौलिक शर्मा संकलक, सम्यक सिंग यांनी लिहिलेल्या गीतांना सम्यक सिंग आणि अभिज्ञान अरोरा यांचे संगीत लाभले असून ही गाणी सम्यक सिंग यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आली आहेत. ...