'टकाटक २'चं मोशन पोस्टर रिलीज
मराठी बॅाक्स ऑफिसवर तूफान गर्दी खेचणाऱ्या 'टकाटक' या मराठी चित्रपटाचा सिक्वेल असलेल्या 'टकाटक २'ची रसिक खूप आतुरतेनं वाट पहात आहेत. १८ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'टकाटक २'चं मोशन पोस्टर आता रिलीज करण्यात आलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांसोबत शेअर करण्यात आलेल्या 'टकाटक २'च्या मोशन पोस्टरमध्ये कलाकारांची धमाल पहायला मिळत आहे. लेखक-दिग्दर्शक मिलिंद कवडे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेलं अनोखं मोशन पोस्टर रसिकांसोबतच संपूर्ण मनोरंजन विश्वाचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरत आहे. रिलीज झाल्यानंतर अल्पावधीतच 'टकाटक २'च्या मोशन पोस्टरनं लक्षवेधी लाईक्स मिळवले असून, प्रेक्षकांची पसंती मिळवत बाजी मारल्याचं चित्र पहायला मिळत आहे. 'टकाटक २'च्या माध्यमातून रसिकांना पुन्हा एकदा एक फ्रेश कथानक अनुभवायला मिळणार आहे. 'टकाटक'च्या यशानंतर 'टकाटक २' जणू इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज झाला आहे. 'टकाटक २'मध्येही प्रथमेश परब मुख्य भूमिकेत असल्यानं गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक आणि मराठी रसिका...