पोस्ट्स

मैत्रीची तरल भावना व्यक्त करणार 'मुसाफिरा' टायटल सॉन्ग.

इमेज
आनंद पंडित मोशन पिक्चर्स, ऐश मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने, नितीन वैद्य प्रोडक्शन्स आणि गुझबम्प्स एंटरटेन्मेंट प्रस्तुत 'मुसाफिरा' या चित्रपटाच्या भव्य पोस्टरचे अनावरण आणि प्रदर्शनाची तारीख काही दिवसांपूर्वीच एका दिमाखदार सोहळ्यात घोषित करण्यात आली. या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता वाढलेली असतानाच आता या चित्रपटातील 'मुसाफिरा' हे टायटल सॉन्ग संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे. एका शानदार सोहळ्यात हे गाणे प्रदर्शित करण्यात आले. या वेळी दिग्दर्शक पुष्कर जोग, निर्माते आनंद पंडित, नितीन वैद्य, वितरक नानूभाई जयसिंघानी, पुष्कराज चिरपुटकर, पूजा सावंत, स्मृती सिन्हा, दिशा परदेशी आदी उपस्थित होते. या सोहळ्यात चित्रपटातील कलाकारांनी या गाण्यावर परफॉर्मन्सही सादर केला. हे गाणे बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक विशाल दादलानी यांनी गायले आहे. या एनर्जीने भरलेल्या टायटल सॉन्गला रोहन - रोहन  यांचे संगीत लाभले असून हे गाणे मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केले आहे. तरुणाईला आवडेल असे हे गाणे आहे. मैत्रीचे नाते हे नेहमीच खास असते. एकत्र फिरणे, हसणे, खेळणे, रडणे अशा अनेक गोष्टी मैत्रीत केलेल्य...

मकरंद अनासपुरेंचा ‘छापा काटा’ १५ डिसेंबरला होणार संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित!

इमेज
मुंबई: अभिनेते मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांची जोडी असणारा ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ प्रस्तुत ‘छापा काटा’ चित्रपटाचा पहिल्यांदा दणक्यात पोस्टर लॉंच झाला आणि प्रेक्षकांची उत्सुकता एकदम शिगेला पोहचून कमालीचा उत्साह पहायला मिळाला होता. चित्रपटाच्या विलक्षण पोस्टरनंतर प्रत्येकाचं चित्त वेधून घेणारा ‘छापा काटा’ चित्रपटाचा ट्रेलर लॉंच झाला आणि ट्रेलरने संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार धमाका उडवला. चित्रपटात प्रेम, भावना, उत्साह आणि मनमुराद गीतांचा जबरदस्त संगम जुळून आला आहे. अभय जोधपुरकर, आर्या आंबेकर यांच्या आवाजातलं ‘कुणी समजवा माझ्या मनाला’ गाणं रसिकांना प्रेमाच्या मोहक गंधात धुंद करत आहे. गाण्याचे बोल मेघना गोरे यांनी लिहिले असून सुप्रसिद्ध संगीतकार मुकेश काशीकर यांनी बेधुंद संगीत दिले आहे. सुनिधि चौहान यांच्या आवाजतलं ‘मन हे गुंतले’ हृदय पिळवटून टाकणारं गाणं शिवम बारपांडे यांनी शब्दबद्ध केले असून मराठी हिंदी सिनेसृष्टीतले सुप्रसिद्ध संगीतकार गौरव चाटी यांनी संगीत दिले आहे.  दोन्ही गाण्यांना आतापर्यंत दहा लाखांहून अधिक प्रेक्षकांचा भरभरून प्...

कोकणहार्टेडगर्ल अंकिता वालावलकरचा "कसे विसरु".

इमेज
                 मराठीत नवनवीन धाडसी प्रयोग व्हायला लागलेत, असाच एक धाडसी प्रयोग रिव्हर्स मोशनमध्ये उलगडण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे प्रणिल आर्ट्स निर्मित “कसे विसरू” हे गाणं. अनेक वर्षांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं, नातं बहरु लागतं आणि मग नको असलेलं एक नवं वळण काय असू शकतं? हे व्यक्त करणारी आजवर कधीही न पाहिलेली “सरळ चालणाऱ्या नाजूक नात्याची ही उलटी गोष्ट…” म्हणजेच "कसे विसरु" ? "दादर अभिमान गीता"च्या अभूतपूर्व यशानंतर प्रणिल आर्ट्स या निर्मिती संस्थेचा हा तिसरा व्हिडिओ असून या अनोख्या प्रयोगाला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. गाण्याची पटकथा, दिग्दर्शन, मांडणी ही प्रणिल हातिसकरने केली आहे. तसेच प्रख्यात गायक केवल वाळंज ह्यांच्या सुमधुर आवाजात हे गाणं स्वरबद्ध केले आहे. या गाण्यातून आपल्या सर्वांची लाडकी कोकणहार्टेडगर्ल अर्थात अंकिता वालावलकर व सध्याचा मराठी मालिकांमधील आघाडीचा अभिनेता विवेक सांगळे अशी नवीन जोडी आपल्या भेटीला आली असून ही दोघांची जोडी फार सुरेख दिसत असून त्यांचा अभिनय सुद्धा साजेसा झालेल...

'सोंग्या' मधून अजिंक्य लक्षवेधी भूमिकेत.

इमेज
नाटक-मालिकेतील लाडका चेहरा अभिनेता अजिंक्य ननावरे आता आपल्या डॅशिंग अंदाजात मोठा पडदासुद्धा गाजवायला सज्ज झाला आहे. 'सोंग्या' या चित्रपटात अजिंक्य प्रमुख भूमिकेत दिसणार असून यशराज ही त्याची भूमिका चित्रपटाला कलाटणी देणारी आहे. निरामि फिल्म्स प्रस्तुत 'सोंग्या' चित्रपट येत्या १५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाची निर्मिती मिलिंद इनामदार, निशांत काकिर्डे, राहुल पाटील यांनी केली असून दिग्दर्शन मिलिंद इनामदार यांचे आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर अजिंक्यने आजवर अनेक नाटक-मालिका तसेच चित्रपटातही काम केले आहे पण 'सोंग्या' मधून अजिंक्य प्रथमच मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसणार आहे. समाजातील अनिष्ठ रूढी-परंपरांवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात अजिंक्यने साकारलेला यशराज हा उच्चशिक्षित असून देखील कुटुंबाची मानमर्यादा आणि समाज यांच्या जाळ्यात कसा अडकत जातो याचं उत्तम दर्शन घडवतो. वडिलांच्या प्रतिष्ठेपुढे नमतं घेणारा यशराज साकारताना, ''आजही अशा कुप्रथा अस्तित्वात आहेत आणि त्यात असंख्य निरपराधांचा बळी जातोय हे समजल्यावर खरंतर मला धक्काच बसला ...

प्रितम-अंजलीची बांधली जाणार लग्नगाठ.

इमेज
कलर्स मराठीवरील ‘काव्यांजली- सखी सावली’ ह्या मालिकेमध्ये सध्या अंजली प्रितमच्या लग्नाची तयारी सुरु आहे. मालिकेच्या सुरुवातीपासून आपण अंजली प्रितमची घट्ट मैत्री बघत आलो आहोत. अखेर अंजलीला तिच्या स्वप्नातला राजकुमार, प्रितमच्या स्वरूपात मिळणार आहे. एकेकाळी मैत्रीचे प्रतीक असलेले प्रितम आणि अंजली आता एकमेकांचे जीवनसाथी बनणार आहेत. प्रितांजलीच्या मेहंदी, हळदीचा कार्यक्रम आणि लग्नासाठी घरातले तर उत्सुक आहेतच त्याचबरोबर रमा-राघव, राज-कावेरी, आणि अर्जुन-सावी सुद्धा प्रितांजलीच्या मेहेंदी हळदी कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. लवकरच अंजली आणि प्रितमचा पारंपरिक लग्न सोहळा पार पडणार आहे. हा लग्नसोहळा सर्वांसाठीच आनंदाचा असणार आहे. तरीही एकीकडे सुनंदा आणि आशु हे लग्न न व्हावं म्हणून प्रत्येक प्रयत्न करणार आहेत. तर दुसरीकडे विश्वजीत आणि श्रेष्ठाचं सत्य कळल्यावर काव्याला मोठा धक्का बसला आहे. तरीही तिच्या बहिणीच्या लग्नासाठी ती सगळं दुःख बाजूला करून आनंदाने, उत्साहाने या लग्न सोहळ्यात सामील होणार आहे, कारण आजवर तिने अंजलीसाठी पाहिलेलं एकमेव स्वप्नं आता पूर्ण होणार आहे. पण ह्या स्वप्नाला को...

मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांनी मांडला आहे आईच्या नावाने गोंधळ!

इमेज
मुंबई: अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडच्या ‘छापा काटा’ चित्रपटातील अभय जोधपुरकर, आर्या आंबेकर यांच्या आवाजातल्या ‘कुणी समजवा माझ्या मनाला’ आणि सुनिधि चौहान यांच्या आवाजतल्या ‘मन हे गुंतले’ या दोन्ही गाण्यांना दहा लाखांहून अधिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. तसेच आदर्श शिंदेच्या आवाजतलं ‘छापा काटा’ गाणं महाराष्ट्रभर धुमाकूळ घालत असताना चित्रपटातील आणखी एक नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. महाराष्ट्रात लग्न समारंभाचा कार्यभाग म्हणून जवळपास सर्व समाजात कुलस्वामिनीला प्रसन्न करण्यासाठी गोंधळ घालण्याची जुनी परंपरा आहे. ही परंपरा मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांनी ‘छापा काटा’ चित्रपटात लग्नाच्या शुभ प्रसंगी देवदेवतांच्या आगमनासाठी जागरण गोंधळ मांडत जपली आहे. मल्हारी मार्तंड आणि रूपसुंदरी म्हाळसा ते कारल्याच्या एकवीरा आईचा उदो उदो करणारं ‘आई तुझ्या नावानं गोंधळ मांडला’ गोंधळगीत ११ डिसेंबर २०२३ रोजी सर्व प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून अवघा महाराष्ट्र उत्साहाने झिंगणार असल्याचं दिसत आहे. शशांक कोंडविलकर यांनी गीताला शब्दबद्ध केले असून गणेश सुर्वे ...

'कोकण चित्रपट महोत्सव २०२३,' रंगणार.

इमेज
कला, संस्कृती आणि परंपरेचे माहेरघर म्हणजे कोकण. कलेची आणि कलाकारांची खाण म्हणजे कोकण. असंख्य कलाकार ह्या मातीत घडले आणि घडत आहेत. कोकणातल्या कलाकारांनी एकत्र येत कोकणाचा सांस्कृतिक वारसा जपला जावा तसेच चित्रपटाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळावी या उद्देश्याने 'सिंधुरत्न कलावंत मंच’ स्थापन करत 'कोकण चित्रपट महोत्सवा'ची सुरुवात केली. पहिल्या कोकण चित्रपट महोत्सवाच्या यशस्वी आयोजनानंतर यंदाच्या महोत्सवासाठी सिंधुरत्न कलावंत मंच सज्ज झाला आहे. यंदा या कोकण चित्रपट महोत्सवाचे दुसरे वर्ष असून सोमवार ११ डिसेंबर ते शनिवार १६ डिसेंबर दरम्यान हा महोत्सव रंगणार आहे.    ११ डिसेंबरला रत्नागिरीमध्ये या महोस्तवाचा उदघाट्न सोहळा संपन्न होणार असून त्यानंतर चित्रपटांचे प्रदर्शन आयोजण्यात आले आहे. पुढील तीन दिवस १२, १३ व १४ डिसेंबरला मराठी चित्रपट दाखवण्यात येणार असून १५ डिसेंबरला सिंधुदुर्गात सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या सेमिनारमध्ये कोकणातील मान्यवर कलाकार, वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत. १६ डिसेंबरला बक्षिस समारंभ आणि महोत्सवाचा सांगता सोहळा संपन्न होईल.    सि...