पोस्ट्स

मा.श्रीमती नीना कुळकर्णी व मा.श्री. सुरेश साखवळकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान.

इमेज
    नाट्यसंस्कृती परंपरेचं आपलं मूळ न सोडता कालानुरूप त्यात सृजनात्मक आणि कल्पक असे नाविन्यपूर्ण बदल करत आपली नाट्यसंस्कृती जपण्याचं काम अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने सर्व नाट्य कलावंतांच्या सहकार्याने  केले आहे. त्याचाच एक भाग  म्हणून नटराजाच्या सेवेसाठी आपलं अमूल्य योगदान देणाऱ्या कलावंतांचा हा सन्मान अभिमानाचा आहे, असं प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री मा.ना.श्री.आशिष शेलार यांनी केले. कै.गोविंद बल्लाळ देवल स्मृतीदिनाप्रीत्यर्थ आयोजित पुरस्कार सोहळयात ते बोलत  होते. प्रतिवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ  रंगकर्मींना त्यांच्या रंगभूमीवरील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. हा सोहळा सांस्कृतिक चळवळीच्या वाटचालीत मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त करताना शासनाच्या मदतीने सांस्कृतिकतेचा परीघ अधिक व्यापक करण्याचं आश्वासनही मा.ना.श्री.आशिष शेलार यांनी यावेळी दिले.      यावेळी अ.भा.मराठी नाटय परिषदेचे उपाध्यक्ष (उपक्रम) श्री. भाऊसाहेब भोईर, प्रमुख कार्यवाह श्र...

'लाडकी बहीण' चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्तसांस्कृतिक मंत्री श्री. आशिष शेलार यांनी दिला क्लॅप.

इमेज
   महाराष्ट्र राज्यातील विद्यमान सरकारच्या बऱ्याच योजनांचा लाभ जनतेला मिळत आहे. यापैकी काही योजना त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेमुळे प्रकाशझोतात राहिल्या आहेत. 'लाडकी बहिण' योजना त्यापैकीच एक आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चेत राहिलेली हि योजना आता मोठ्या पडद्यावर अवतरणार आहे. 'लाडकी बहीण' असे शीर्षक असलेल्या मराठी चित्रपटाचा नुकताच मुहूर्त करण्यात आला आहे.     निर्मात्या शितल गणेश शिंदे, बाबासाहेब पाटील व अनिल वणवे हे ओम साई सिने फिल्मच्या बॅनरखाली व शुभम फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत ‘लाडकी बहीण' या मराठी चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. गणेश शिंदे यांच्या कुशल दिग्दर्शनाखाली हा चित्रपट तयार होणार आहे. 'लाडकी बहीण'ची पटकथा-संवादलेखन शितल शिंदे यांनी केले आहे. महाराष्ट्रातील कोट्यावधी माता-भगिनींच्या मदतीला धावून आलेल्या महाराष्ट्र सरकारच्या 'लाडकी बहीण' योजनेवर आधारित असलेल्या या सिनेमाचा नुकताच मुहूर्त करण्यात आला. सातारा येथे सांस्कृतिक मंत्री श्री. आशिष शेलार यांनी 'लाडकी बहीण' सिनेमाच्या मुहूर्ताचा क्लॅप दिला. यावेळी कराड दक्षिणच...

'ऑल इज वेल' चित्रपटात सयाजी शिंदे यांचा मराठी बाणा......

इमेज
   मराठी भाषा वळवावी तशी वळते, असं म्हणतात. मराठी भाषेचा गोडवा हा जितका शब्दांत असतो तितकाच तो माणसाच्या स्वभावातही असतो. आपल्या भाषेचा आणि स्वभावाचा हाच गोडवा घेऊन प्राकृत मराठी भाषेत सयाजी शिंदे भाईगिरी करणार आहेत. वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्सच्या ‘ऑल इज वेल’ याआगामी मराठी चित्रपटात ‘आप्पा’ या भाईच्या भूमिकेत सयाजी शिंदे दिसणार आहेत. हा भाई शुद्ध मराठीत बोलत अनेकांची विकेट काढताना दिसणार आहे. त्यांच्या या मराठी बोलण्याने काय धमाल उडते याची सगळी गंमत चित्रपटात रंगत आणणार आहे. येत्या २७ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘ऑल इज वेल’ चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश जाधव तर लेखन प्रियदर्शन जाधव यांनी केले आहे. या चित्रपटाचे निर्माते अमोद मुचंडीकर, वाणी हालप्पनवर आहेत. सहनिर्माते मल्लेश सोमनाथ मरुचे, विनायक पट्टणशेट्टी आहेत.     आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना सयाजी शिंदे सांगतात, ‘आप्पा ही भाईगिरी करणाऱ्या डॉनची व्यक्तिरेखा असली तरी त्यात काहीतरी वेगळेपणा आणि रंगत आणावी या उद्देशाने आमच्या लेखक-दिग्दर्शकांनी शुद्ध मराठी भाषेची गंमत त्या व्यक्तिरेखेसाठी वापरली आहे....

“चंदू चॅम्पियन” चित्रपटाला ला एक वर्ष पूर्ण.

इमेज
    कबीर खान यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या प्रेरणादायी बायोपिक चंदू चॅम्पियनला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. १४ जून २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आजही प्रेक्षकांच्या, समीक्षकांच्या आणि संपूर्ण चित्रपटसृष्टीच्या मनात आपली जागा राखून ठेवली आहे.    भारताचे पहिले पॅरालिंपिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांच्या असामान्य जीवनावर आधारित या चित्रपटात कार्तिक आर्यन यांनी मुख्य भूमिका साकारली होती. त्यांच्या अभिनयाने, भावनिक सादरीकरणाने आणि शारीरिक रूपांतराने सर्वांची मनं जिंकली.    दिग्दर्शक कबीर खान म्हणतात, “चंदू चॅम्पियनला मिळालेल्या यशामागे सर्वात मोठा वाटा कार्तिकच्या समर्पणाचा आहे – त्याची मेहनत, त्याचे इमोशन्स आणि अभिनयातील बारकावे – हे सगळं अप्रतिम होतं. मला खरंच वाटतं की या भूमिकेसाठी तो राष्ट्रीय पुरस्काराचा पूर्णपणे हकदार आहे. ही भूमिका केवळ त्याच्या करिअरसाठी नाही, तर देशासाठी महत्त्वाची होती. त्याने एका विस्मरणात गेलेल्या खऱ्या नायकाची कथा संपूर्ण आदराने आणि प्रामाणिकपणाने लोकांपर्यंत पोहोचवली.”   चंदू चॅम्पियन चित्...

‘वामा-लढाई सन्मानाची’ चित्रपटातील ‘रेशमी धागे विरून गेले’ भावनिक गाणे प्रदर्शित.

इमेज
   स्त्री सशक्तीकरण व महिला आत्मसन्मान यावर भाष्य करणारा ‘वामा- लढाई सन्मानाची’ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला असून चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आता या चित्रपटातील ‘रेशमी धागे विरून गेले’ हे भावनिक गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला मंजिरा गांगुली यांचा आवाज लाभला असून मंदार चोळकर यांनी हे गाणे शब्दबद्ध केले आहे. तर रिजू रॉय यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. यात सरलाच्या आयुष्यातील तुटलेल्या आशा, हरवलेले प्रेम, नवऱ्याच्या अहंकारामुळे होणारा अपमान अशा भावनांचा प्रवास पाहायला मिळतो.      गाण्याबद्दल दिग्दर्शक अशोक आर कोंडके म्हणतात, “ ‘रेशमी धागे विरून गेले’ हे गाणे सरलाच्या मनातील घालमेल उलगडते. एक स्त्री जेव्हा तिच्या जवळच्या माणसांकडूनही उपेक्षा आणि दुःख अनुभवते, तेव्हा तिच्या अश्रूंमधून ज्या भावना व्यक्त होतात,  हेच या गाण्यात दाखवण्यात आले आहे.”    निर्माते सुब्रमण्यम के. म्हणतात, “ ‘वामा – लढाई सन्मानाची’ हा चित्रपट समाजात स्त्रीच्या अस्तित्वासाठी सुरू असलेल्या संघर्षाचा आरसा आहे. ‘रेशमी धागे विरून गेले’ य...

'ऊत' चित्रपटातून नवी जोडी रुपेरी पडद्यावर....

इमेज
    तारुण्याच्या पंखांत आकाशाला गवसणी घालण्याचं बळ असतं. व्यवस्थेविरुद्ध बंड करणारी तरुणाईच असते. व्यवस्थेविरुद्ध केलेल्या संघर्षाची कहाणी सांगणारा वेरा फिल्म्स निर्मित आणि राम मलिक लिखित-दिग्दर्शित 'ऊत' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात एक संघर्ष कथा पहायला मिळणार असून  या सोबतच 'ऊत' मध्ये एक प्रेमकथाही आहे. या प्रेमकथेचा नायक अभिनेता राज मिसाळ असून, अभिनेत्री आर्या सावे ही नायिका आहे. या चित्रपटाच्या  निमित्ताने ही नवी जोडी  मराठी रुपेरी पडद्यावर दाखल झाली आहे. या चित्रपटाचा शानदार पोस्टर अनावरण सोहळा नुकताच अभिनेते प्रसिद्ध मकरंद देशपांडे यांच्या हस्ते  संपन्न झाला. यावेळी मंचावर चित्रपटातील सर्व कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते.       यावेळी चित्रपटाला  शुभेच्छा देताना अभिनेता मकरंद देशोपांडे  म्हणाले की,  ‘चित्रपट करणं हे कसब आहे. अनेकांची मेहनत यात असते. आज चित्रपटाला प्रेक्षक  नसताना  चित्रपट बनवण्याचं धाडस करणं कॊतुकास्पद आहे.  या चित्रपटासाठी  मला ...

लेखकांच्या विविध मागण्यांसाठी मानाचि लेखक संघटनेचे निवेदन.

इमेज
   ९ जून २०२५ रोजी मालिका नाटक चित्रपट लेखक संघटनेचे पदाधिकारी, पुरुषोत्तम बेर्डे, राजीव जोशी, आशिष पाथरे, डॉ अलका नाईक आणि विवेक आपटे लेखकांच्या समस्यांसाठी, माननीय सांस्कृतिक मंत्री ॲड. श्री. आशिष शेलार यांना भेटले.     संघटनेचे अध्यक्ष विवेक आपटे यांनी लेखकांच्या समस्या मंत्रीमहोदयांना सांगितल्यावर, लेखकांवर अनेक प्रकारे अन्याय होतो, हे त्यांनी मान्य केले. चर्चा करून आपण समस्या सोडवू या, असेही म्हटले.    त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची मी मीटिंग लावतो, असे सांगून संघटनेने दिलेल्या निवेदनावर तसा शेराही मारला, असे अध्यक्ष श्री विवेक आपटे यांनी नमूद केले.    मानाचि लेखक संघटना मराठी भाषेतील मालिका नाटक व चित्रपटांच्या हौशी व व्यावसायिक लेखकांची संघटना असून, २०१६ पासून रजिस्टर कंपनी म्हणून सर्व माध्यमात लेखन करणाऱ्या कवी, गीतकार, व लेखकांच्या उत्कर्ष व सन्मानासाठी कार्यशील आहे. परस्पर संवादातून लेखकांच्या समस्यांचे निराकरण करून, त्यांना यथोचित मान व धनही मिळावे यासाठी मानाचि संघटना सदैव जागृत व कार्यरत आहे. यासंदर्भात आम्ही खालील मुद्दे आ...