Posts

Showing posts from June, 2022

वैशालीची ‘लगीनघाई’

Image
आपल्या सुमधुर स्वरांनी असंख्य सुपरहीट गाणी देणारी आघाडीची गायिका वैशाली सामंतची सध्या  लगीनघाई सुरु आहे. तुम्हाला ही प्रश्न पडला असेलच ना!! ही लगीनघाई नेमकी कोणाची आहे? तर   वैशालीची ही   लगीनघाई ‘ कन्याकुमारी’ च्या लग्नासाठी आहे.   व्हिडिओ पॅलेस प्रस्तुत  ‘ कन्याकुमारी’  या सोलो अल्बमसाठी वैशाली हिने आपला स्वरसाज दिला आहे. लवकरच हा अल्बम प्रकाशित केला जाणार आहे. अभिनेत्री दिशा परदेशी आणि अभिनेता अक्षय वाघमारे यांच्यावर हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. ‘ कन्याकुमा री ’ च्या लग्नातील धमाल-मस्ती सोबतच  नववधूच्या मनातील हुरहुर ,   जोडीदाराची  ओढ  तसेच  लग्नाचा माहोल ,  पाहुण्यांची लगबग या गाण्यातून  छानपणे  व्यक्त करण्यात आ ली  आहे.   मंदार चोळकर  व मिताली जोशी यांनी  लिहिलेल्या या गीताला वैशाली सामंत हिने आपल्या  मधुर स्वरांनी चारचाँद लावले असून चिनार-महेश यांनी ते संगीतबद्ध केलं आहे. नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर हिचे नृत्यदिग्दर्शन या गाण्याला लाभले असून अमोल गोळेच्या छायांकनाने हे गाणं सजलं आहे. ‘ कन्याकुमारी ’  गाण्याबद्दल बोलताना   वैशाली सांगते की, ‘मी याआधीह

श्री छत्रपती उदयनराजे भोसले यांनाही 'भिरकीट'ची भुरळ

Image
हसताहसता मनाला स्पर्शून जाणारा चित्रपट म्हणजे 'भिरकीट'. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात सिनेसृष्टीतील सगळे विनोदवीर आहेत. त्यामुळे हा एक धमाल चित्रपट बनला आहे. मनोरंजनासोबतच एक खूपच महत्वाचा संदेश देणाऱ्या अनुप जगदाळे दिग्दर्शित 'भिरकीट'ला समीक्षकांसह प्रेक्षकांनीही पसंती दर्शवली असून आता यात आणखी एक मोठे नाव सामील झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज श्री छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्या काही निकटवर्तीयांसह 'भिरकीट' हा चित्रपट नुकताच साताऱ्यात पाहिला आणि हा चित्रपट पाहण्यासाठी छत्रपती उदयनराजे भोसले भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ट महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पंकज चव्हाण तसेच सुनील काटकर, नितीन चौघुले व दिग्दर्शक अनुप जगदाळे इतर निकटवर्तीय उपस्थित होते. व उदयनराजे यांनी या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. केवळ कौतुक नाही तर प्रत्येक प्रेक्षकाने हा चित्रपट पाहावा आणि याकरता साताऱ्यातील चित्रपटगृहात या चित्रपटाचे खेळ काही दिवस अजून ठेवावेत, असे आवाहनही यावेळी केले आहे.  2आज चित्रपटाबद्दल श्री छत्रपती उदयनराजे भोसले म्हणत

जगण्याची नवी दिशा देणाऱ्या 'अनन्या'चा ट्रेलर प्रदर्शित

Image
एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, ड्रीमव्हीवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव निर्मित 'अनन्या' येत्या २२ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे!', असे म्हणणाऱ्या 'अनन्या'च्या जिद्दीचा प्रवास यात पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून एका क्षणी मन सुन्न करणारा हा ट्रेलर क्षणार्धात मनाला जगण्याची नवी उमेद देणाराही आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रताप फड यांनी केले असून 'अनन्या'ची व्यक्तिरेखा हृता दुर्गुळे साकारत आहे. तर ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया 'अनन्या'चे निर्माते आहेत.  ट्रेलरमध्ये आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी धडपडणारी, आयुष्य दिलखुलास जगणारी 'अनन्या' दिसत आहे. एका अपघातात तिचे दोन्ही हात जातात. मात्र 'अनन्या' पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभी राहताना यात दिसत आहे. नावाप्रमाणेच इतरांपेक्षा वेगळ्या असणाऱ्या 'अनन्या'चा एक प्रेरणादायी प्रवास यात दिसत असून 'शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे!' हा खूप मो

‘CIFF2022’ ढाका’ मध्ये जितेंद्र पुंडलिक बर्डे लिखित-दिग्दर्शीत 'टॉर्टुगा मोशन पिक्चर्स' निर्मित 'मोऱ्या'ची निवड!

Image
शहराचा रोज घाण होणारा चेहरा जीवावर उदार होऊन ,  कोणत्याही मुलभूत सोई - सुविधांविना आपलं आरोग्य पणाला लावून नरकयातना भोगत गल्ल्या - गटारांची साफसफाई करणाऱ्या सिताराम जेधे उर्फ मोऱ्याची हृदयस्पर्शी कथा '  आगामी "मोऱ्या" या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. लेखक ,  दिग्दर्शक आणि प्रमुख अभिनेता अशी त्रिसूत्री सांभाळण्यात यशस्वी ठरलेल्या जितेंद्र पुंडलिक बर्डे यांची ही पहिलीच कलाकृती  ' ढाका  फेस्टिवल’ आयोजित    ' सिनेमेकिंग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ’ - (CIFF)  मध्ये  निवडली गेली आहे. या चित्रपटाच्या टीझरचे प्रदर्शन जगप्रसिद्ध  ' कान्स महोत्सवात '  करण्यात आले होते ,  तेव्हाच चित्रपटाचा टिझर पाहून अनेक चित्रपट रसिक - समीक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. आपल्या पहिल्या कलाकृतीला  ' सिनेमेकिंग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ’ - (CIFF)  मध्ये निवडल्याने हा माझा आणि माझ्या सर्व कलावंतांचा गौरव आहे असे लेखक    -  दिग्दर्शक जितेंद्र पुंडलिक बर्डे म्हणाले. "मोऱ्या" चित्रपटाचा विषय आणि सादरीकरणासाठी केलेले सखोल संशोधन ,  या निवडीने सार्थकी लागल

'शाहू छत्रपती' चित्रपटाच्या शीर्षकाचे दिमाखदार अनावरण

Image
महाराष्ट्र ही संताची ,  क्रांतिवीरांची ,  सामाजिक उत्थानासाठी झटणा-ऱ्या सुधारकांची ,   मानवतेसाठी  लढणाऱ्या विचारवंताची भूमी राहिलेली आहे.   ज्यांनी महाराष्ट्राचे समाजमन घडविण्याचा कसोशीने प्रयत्न केला त्यातीलच एक महत्त्वाचे नाव म्हणजे ,  कोल्हापूर संस्थानाचे राजे राजर्षी शाहू महाराज .   अशा या रयतेच्या राजाचा  ' शाहू छत्रपती '  हा भव्यपट २०२३ मध्ये मराठी रुपेरी पडदयावर येणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाच्या शीर्षक अनावरणाची घोषणा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला कोल्हापूरच्या न्यू पॅलेस मध्ये महाराजांच्या वंशातील श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या उपस्थितीत मोठया दिमाखात करण्यात आली.   या सोहळयाला सदर चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते व महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, शाहूंचे चरित्र लिहिणारे प्रसिद्ध इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार ,  चित्रपटाचे दिग्दर्शक वरुण सुखराज ,  निर्माते डॅा. विनय काटे आणि स्नेहा देसाई, आदि मान्यवर उपस्थित होते. निर्माते डॅा. विनय काटे यांनी प्रास्ताविक करत उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. चित्रपटाच्या निर्म

डॉ. अमोल कोल्हे घेऊन येतायेत 'शिवप्रताप गरुडझेप'

Image
रक्ताचा एकही थेंब न सांडता आपल्या बुद्धिचातुर्याच्या बळावर औरंगजेबाच्या बलाढ्य मुघल सत्तेचा पोलादी पहारा भेदून केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग जिवंत करणारा डॉ. अमोल कोल्हे यांचा  ' शिवप्रताप गरुडझेप '   हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवणारा  ' टिझर '  नुकताच  प्रदर्शित झाला  आहे . ‘राजा  शिवछत्रपती ’  आणि  ‘ स्वराज्यरक्षक संभाजी ’  या मालिकांनी जगभरात अफाट लोकप्रियता मिळवली. या मालिकेतील भूमिकांमुळे छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज म्हटलं की ,  डॉ. कोल्हे यांचंच नाव प्रेक्षकांच्या मनात ठसलं आहे. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक कर्तृत्वाची महती सांगणारा  ' शिवप्रताप '  मालिकेतील  ' गरुडझेप '   चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा  ' टिझर '  प्रदर्शित झाला असून या भव्यदिव्य चित्रपटाची झलक व धारदार संवादाची प्रचिती दिसून येते. या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांची अटक ,  औरंगजेबाच्या दरबारातील बाणेदार प्रसंगाबरोबरच

'श्यामची आई'च्या गीतांना अशोक पत्कींच्या संगीताचा साज

Image
मागील बऱ्याच दिवसांपासून 'श्यामची आई' या आगामी चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असून, प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबाबत कुतूहल आहे. 'श्यामची आई'चा उल्लेख होताच सर्वप्रथम आठवतात ते साने गुरूजी... त्यासोबतच मनात रुंजी घालू लागतात साने गुरुजींच्या लेखणीतून अवतरलेली अजरामर गाणी... ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यानंतर आजच्या रंगीबेरंगी युगात पुन्हा एकदा त्याच काळात नेणारा 'श्यामची आई' हा चित्रपट तयार होत असल्यानं यातील गीत-संगीताची जबाबदारी कोणाकडे सोपवण्यात येणार याबाबत सर्वांच्या मनात उत्सुकता होती. आता यावरून पडदा उठला असून, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की या चित्रपटातील गीतांना स्वरसाज चढवणार आहेत. अमृता फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मात्या अमृता अरुण राव 'श्यामची आई'ची निर्मिती करत आहेत. आजवर बऱ्याच महत्त्वकांक्षी चित्रपटांचं दिग्दर्शन करणारा दिग्दर्शक सुजय डहाके 'श्यामची आई'चं दिग्दर्शन करत आहे. कोकणात 'श्यामची आई'चं पहिलं शेड्यूल यशस्वीपणे पार पडल्यानंतर पन्हाळ्यामध्येही दुसरं आणि महत्त्वपूर्ण शेड्यूल पूर्ण करण्यात आलं आहे. यानंत

'बॉईज ३' पुन्हा एकदा राडा......

Image
काहीही वर्षांपूर्वी धैर्य, ढुंग्या आणि कबीर या 'बॉईज'नी अवघ्या महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता. हा धुमाकूळ कमी म्हणून पुन्हा 'बॉईज २' मधून ते डबल धमाका घेऊन आपल्या भेटीला आले आणि अजूनही प्रेक्षकांचे मन भरत नसल्याने परत तसाच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त राडा घालायला 'हे' तीन अतरंगी पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. नुकतेच 'बॉईज ३' चे टिझर सोशल मीडियावर झळकले असून १६ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात हा धमाका उडणार आहे.     'बॉईज' आणि 'बॉईज २' ने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः दंगा घातला होता. 'बॉईज ३'ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची घोषणा झाल्यापासूनच हा चित्रपट कधी एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली होती. अखेर या चित्रपटाचे टिझर प्रदर्शित झाले असून यात हे तिघेही दाक्षिणात्य पेहेरावात दिसत असून यात तिघांचा एक वेगळाच स्वॅग आपल्याला अनुभवयाला मिळणार आहे. त्यांच्या आयुष्यात पुन्हा एक नवीन मुलगी आल्याचे दिसतेय. आता तिच्या येण्याने हे काय रंग उधळणार, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल.   अ सुप्रीम मोशन पि

सिद्धार्थ जाधव बनला गायक‘तमाशा लाईव्ह’मधील ‘मेल्याहून मेल्यागत’ गाणे प्रदर्शित

Image
अक्षय बर्दापूरकर निर्मित, संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’ हा चित्रपट म्हणजे एक सांगितिक नजराणा आहे, हे यापूर्वी आपल्याला कळलेच आहे. आता यातील एक-एक पुष्प आपल्या समोर येत असून प्रेमगीत आणि रॅप साँगनंतर आता ‘मेल्याहून मेल्यागात’ हे सिद्धार्थ जाधववर चित्रीत गाणे आपल्या भेटीला आले आहे. या गाण्याला क्षितीज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केले असून या गाण्याला पंकज पडघन यांनी संगीत दिले आहे. या गाण्याची खासियत म्हणजे हे गाणे स्वतः सिद्धार्थ जाधवने गायले आहे. वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणारा सिद्धार्थ या गाण्याच्या माध्यमातून काहीतरी सांगू पाहात आहे. एखादे सत्य शोधण्यासाठीची त्याची धडपड या गाण्यातून दिसत आहे. या गाण्याबद्दल संगीतकार पंकज पडघन म्हणतात, “हा एक सांगितिक चित्रपट असल्याने या गाण्यांच्या माध्यमातूनच कथा पुढे जाणारी आहे. त्यामुळे या कथानकाला साजेसे आणि दमदार संगीत असणे आवश्यक होते. यापूर्वीही सांगितले आहे की प्रत्येक गाण्यात आम्ही काही प्रयोग केले आहेत. या गाण्याच्या निमित्ताने सिद्धार्थ प्रथमच गाणे गायला असून त्यासाठी त्याने विशेष मेहनत घेतली आहे. इतर गाण्याप्रमाणे हे गाणेही प्रेक्षकांच्या प

'वाय'साठी प्रेक्षकांचा मुक्ता बर्वेला पाठिंबा

Image
'वाय'साठी प्रेक्षकांचा मुक्ता बर्वेला पाठिंबा  काळजाचा ठोका चुकवणारा 'वाय' हा चित्रपट आता सर्वत्र प्रदर्शित झाला असून या चित्रपटाचा प्रीमियर अनेक मान्यवारांच्या उपस्थितीत पार पडले. काही दिवसांपूर्वी हातात मशाल धरलेले मुक्त बर्वे हिचे एक थरारक पोस्टर झळकले होते. याचा नेमका अर्थ काय, यावर अनेक चर्चाही झाल्या. याचे उत्तर आता प्रेक्षकांना मिळाले असून या विषयाचे समर्थन करत पुण्यातील एका शोदरम्यान काही महिला प्रेक्षकांनी या विषयाला, मुक्ताला तिच्या या लढ्यात आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे 'वाय'चा विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचला असल्याचा हा संकेत आहे.     मुक्ता बर्वे या चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिक्रियांबाबत म्हणते, " समाजात घडणाऱ्या एका ज्वलंत विषयवार भाष्य करणारा हा चित्रपट आहे आणि अशा घटना आपल्या आजूबाजूला सर्हास घडत असतात, मात्र आपण त्यापासून अनभिज्ञ असतो किंवा मग आपण त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करतो. त्यामुळे या घटना समाजापर्यंत पोहोचाव्यात म्हणून हा विषय आम्ही प्रेक्षकांपर्यंत आणला आहे. प्रेक्षकांकडून, सिनेसृष्टीतील दिग्गजांकडून, समीक्षकांनच्य

वाय्(Y ).............सुन्न करणारा.....थरार...... समीक्षण:वैभव बागकर.

Image
             वाय्(Y )...............सुन्न करणारा.....थरार......                                                                        समीक्षण:वैभव बागकर.       एखादा  चित्रपट येतो तो सत्यघटनेवर आधारित,कदाचित  त्याचा  विषय कालानुरूप थोडा जुना वाटतो,पण ती घटना तो विषय काहि संपत नाही,कारण अशा घटना घडायचं काही थांबत नाही.असा अतिशय गंभीर समस्या बनलेला, विचार केला तरी मन सुन्न होत,हा विषय थेट वैद्यकीय क्षेत्रातील गुन्हेगारी कडे वळणारा एक सामाजिक स्वरुपात गुन्हा असलेला पण एकिकडे तो समाजातील काही घटकांना तो गुन्हा वाटत नाही तर ती गरज वाटते, आणि  अशाप्रकारे समाजात असे गुन्हे घडतच  राहतात,तो गुन्हा आहे गर्भजल निदान आणि स्त्री भ्रूणहत्या.......‘गर्भजल व गर्भलिंगनिदान तंत्र (नियमन व गैरवापर प्रतिबंध) कायदा, १९९४’ या कायद्यात २००३मध्ये सुधारणा करून त्याचे नवे नाव ‘गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्र (गर्भलिंग निदान प्रतिबंध) कायदा’, असे करण्यात आले आहे. गर्भलिंगनिदान व गर्भनिवड करण्यास या कायद्याद्वारे मनाई करण्यात आली आहे. गर्भाचे निदान करून तो गर्भ मुलीचा असल्यास गर्भपाताद्वारे तो काढून

‘तमाशा लाईव्ह’ मधील ‘वाघ आला’ समोर

Image
सांगितिक नजाराणा घेऊन ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपट येत्या १५ जुलैपासून प्रदर्शित होत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या गाण्यांनाही जबरदस्त प्रतिसाद मिळत आहेत. चित्रपटातील एक जल्लोषमय गाणे झळकले आहे. त्या गाण्याचे बोल ‘वाघ आला’ असे असून या रॅप साँगमधून सचित पाटीलची ‘अश्विन’ ही भूमिका समोर येत आहे. त्याचा डॅशिंग लूक यात दिसत असून सचितने यात एका वृत्तनिवेदकाची भूमिका साकारली आहे. सचितची ही ओळख आपल्याला सिद्धार्थ जाधव करून देत आहे. या गाण्याला महाराष्ट्राचा बुलंद आवाज लाभला आहे. आदर्श शिंदे यांनी हे गाणे गायले असून क्षितीज पटवर्धन यांनी या गाण्याला शब्दबद्ध केले आहे. तर संगीतकार अमितराज आहेत. 'वाघ आला'चे नृत्यदिग्दर्शन उमेश जाधव यांचे आहे.  गाण्याविषयी गीतकार क्षितीज पटवर्धन म्हणतात, “चित्रपटात प्रेक्षकांना गाण्यांची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. चित्रपटात वेगवेगळ्या धाटणीची गाणी आहेत, त्यातील हे एक गाणं आहे. नवीन प्रयोग करायला नेहमीच मराठी चित्रपटसृष्टी सज्ज असते. गाण्यातून केलेला एक नवा प्रयोग. ही आमची कलाकृती प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करेल.” तर संगीत

कास्टिंग वाईब - प्रादेशिक कलाकारांना मनोरंजन क्षेत्रात पदार्पण देणारे नवीन व्यासपीठ !

Image
गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशातील चित्रपट उद्योग आणि त्याच्याशी निगडित इतर टीव्ही आणि ओटीटी माध्यमांची झपाटय़ाने वाढ होत आहे. भारत हा आजच्या घडीला जगात सर्वाधिक चित्रपट निर्मिती करणारा देश आहे. त्यामुळे या क्षेत्रांशी निगडित अभिनय, दिग्दर्शन, पटकथा लेखन, सिनेमॅटोग्राफी, संकलन, ध्वनी, संगीत, नृत्य दिग्दर्शन, ग्राफिक्स इ. वेगवेगळ्या विभागांमध्ये करिअर करण्याच्या उत्तम संधी आज उपलब्ध आहेत. संधी जरी असल्या तरीही  प्रादेशिक विभागातील अनेक विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे अनेकवेळा त्यात अपयश येते . प्रादेशिक कलाकारांना अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठीसुद्धा  भरपूर मेहनत करावी लागते. मुख्यतः आपले गाव सोडून महत्वाच्या शहरांमध्ये मध्ये येऊन राहावे लागते.काम शोधण्याची मेहनत आणखी वेगळी .त्यातच  गेल्या २ वर्षात कोविड च्या प्रादुर्भावांमुळे प्रादेशिक कलाकारांचा हा प्रवास आणखीच खडतर झाला आहे. त्यामुळे अंगात अभिनय कौशल्य आणि  प्रचंड मेहनत करण्याची तयारी असली तरीही मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करणे हे स्वप्नवत होऊ लागले आहे .अशाच प्रादेशिक कलाकारांना मनोरंजन  क्षेत्रात पदा

क्रांती रेडकरच्या 'रेनबो'च्या चित्रीकरणाचा लंडनमध्ये श्रीगणेशा....

Image
काही महिन्यांपूर्वी  'प्लॅनेट मराठी' आणि ‘हाय आयक्यू’ यांच्या सहयोगाने 'मँगोरेंज प्रॉडक्शन’ निर्मित 'रेनबो' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. नुकतेच या चित्रपटाचे लंडनमध्ये चित्रीकरण सुरु झाले असून लवकरच हा चित्रपट रंगांची उधळण घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या चित्रपटात शरद केळकर, सोनाली कुलकर्णी, उर्मिला कोठारे आणि ऋषी सक्सेना यांच्या प्रमुख भूमिका आहते. 'रेनबो' म्हणजे अनेक रंगांचे प्रतीक आणि त्यामुळेच या चित्रपटात देखील आपल्याला विविध रंग पाहायला मिळणार आहेत. आजच्या काळात नात्यांमध्ये येणाऱ्या विविध रंगांचा प्रवास यात पाहायला मिळणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या कलाकारांचा मिळून हा  'रेनबो' तयार होत असल्याने हे सर्व रंग एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत. दिग्दर्शिका क्रांती रेडकर म्हणते, " 'रेनबो' हे नावच कलरफुल आहे. या नावातच सारे रंग भरलेले आहेत. नात्यातील हाच सप्तरंगी प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटाच्यानिमित्ताने अक्षय बर्दापूरकर यांच्या 'प

'ही इज बॅक'......'दगडी चाळ -२' १८ ऑगस्टला होणार प्रदर्शित!

Image
प्रदर्शित! डोक्यावर गांधी टोपी, पांढरा शुभ्र शर्ट-पायजमा, झुपकेदार मिशा, नजरेत आगीच्या ज्वाला, काटक शरीरयष्टी, या शहराच्या इतिहासातील किंबहुना गँगवॉरच्या इतिहासातील एक महत्वाचे नाव, बाकीचे सगळे डॉन देशाबाहेर पळून गेले, मात्र तो मुंबईतच राहून आपल्या मराठी लोकांच्या पाठीशी उभा राहिलेला, चाळीच्या लोकांवर होणाऱ्या अन्यायाला पोलिसांच्या आधी न्याय देणारा दगडी चाळीचा रॉबिन हूड, म्हणजेच अरुण गुलाब गवळी उर्फ ‘डॅडी’. बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणाऱ्या 'दगडी चाळ'मधील 'चुकीला माफी नाही', असे म्हणणाऱ्या अरुण गुलाब गवळी यांचा दबदबा सर्वांनीच अनुभवला. नुकतीच सोशल मीडियाद्वारे या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करण्यात आली असून मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित 'दगडी चाळ २' हा चित्रपट येत्या १८ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तुफान कोसळणारा पाऊस आणि अनेक लोकांच्या घोळक्यातून समोर येणारे अरुण गुलाब गवळी म्हणजेच मकरंद देशपांडे यांची दमदार एन्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणार आहे, हे नक्की.     संगीता अ

‘रानबाजार’ची सक्सेस पार्टी दणक्यात साजरी......

Image
वेबविश्वाला हादरून लावणाऱ्या अभिजित पानसे लिखित, दिग्दर्शित ‘रानबाजार’ने अल्पावधितच ओटीटी प्लॅटफॉर्म गाजवला. कदाचित असं काही घडलं होतं, असा मनात विचार आणणाऱ्या या वेबसीरिजची क्षणोक्षणी रंजक वळणावर नेणारी दमदार कथा आणि तगड्या स्टारकास्टने अक्षरशः खळबळ माजवली. प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी, रावण फ्युचर प्रॅाडक्शन, अभिजित पानसे, अनिता पालांडे निर्मित ‘रानबाजार’ला अल्पावधितच असंख्य व्ह्यूज मिळाले. सबस्क्राइबर्सच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली. टिझर बघून मनात अनेक प्रश्न निर्माण झालेल्या अनेकांनी वेबसीरिज पाहून, त्याचे भरभरून कौतुक केले. अशा या भव्य, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वेबसीरिजने आपल्या या यशाचे नुकतेच धुमधडाक्यात सेलिब्रेशन केले. हा योगायोग जुळून आला ‘रानबाजार’चे निर्माता आणि प्लॅनेट मराठी ओटीटीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. या वेळी ‘रानबाजर’च्या संपूर्ण टीमसह सिनेसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. या वेळी दोन्ही क्षण दणक्यात साजरे करण्यात आले.

संगीतकार 'अविनाश-विश्वजीत' यांच्या कारकिर्दीची तपपूर्ती

Image
संगीत क्षेत्राच्या नभांगणात आज बरेच संगीतकाररूपी तारे चमकत आहेत. नावीन्याचा ध्यास घेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या बऱ्याच संगीतकारांनी मनोरंजन विश्वात नाव कमावलं आहे. या यादीत सध्या आघाडीवर असलेली संगीतकार जोडी म्हणजे अविनाश-विश्वजीत.. २०१० मध्ये सिनेसृष्टीतील आपली कारकिर्द सुरू करणाऱ्या या जोडीनं अविरतपणे १२ वर्षे काम करून संगीतप्रेमींच्या मनावर आपल्या संगीताचा अमीट ठसा उमटवण्यात यश मिळवलं आहे. यशाच्या शिखरावर पोहोचल्यावरही कायम जमिनीवर राहून संगीताची सेवा करण्याचं ब्रीद जपत अविनाश-विश्वजीत यांनी एकापेक्षा एक सुपरहिट गाणी मनोरंजन विश्वाला दिली आहेत. 'कधी तू रिमझिम झरणारी...', 'ओल्या सांज वेळी...', ‘ह्रदयात वाजे समथिंग...’ ही गाजलेली रोमँटिक गाणी आठवली की आपोआपच संगीतकार अविनाश-विश्वजीत यांची आठवण होते. रोमँटिक गाणी म्हणजे अविनाश-विश्वजीत हे समीकरण जणू तयार झालं, मात्र नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'धर्मवीर - मुक्काम पोस्ट ठाणे' आणि 'सरसेनापती हंबीरराव' या दोन्ही  चित्रपटांच्या गाण्यांतून लोकसंगीताचा रांगडा बाज दाखवत वेगळी झलक रसिकांना दाखवून द

१९ ऑगस्टला प्रदर्शित होणार 'टकाटक २'

Image
'टकाटक'ला मिळालेल्या यशाच्या बळावर प्रेक्षकांचं दुप्पट मनोरंजन करण्याच्या उद्देशानं बनवण्यात आलेला सिक्वेल म्हणजेच 'टकाटक २' या चित्रपटाबाबत सर्वांच्याच मनात कुतूहल आहे. 'टकाटक २' प्रेक्षकांच्या भेटीला येणार तरी कधी? या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे. १९ ऑगस्ट २०२२ रोजी 'टकाटक २' संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे. पहिल्या भागाचं कथानक आणि त्या माध्यमातून दिलेला संदेश तरुणाईपासून सर्वच वयोगटातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्यानंतर आता 'टकाटक २'मध्ये काय पहायला मिळणार याची उत्सुकता आहे. 'टकाटक २'मध्ये प्रथमेश परब पुन्हा एकदा मिलिंद कवडे यांच्या चित्रपटाचा नायक बनला आहे. त्याच्यासोबत अक्षय केळकर, अजिंक्य राऊत, भूमिका कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे, सुशांत दिवेकर, स्वप्नील राजेशिर्के, किरण माने, पंकज विष्णू, किरण बेरड, आरजे महेश काळे, स्मिता डोंगरे आणि इतर कलाकारांच्याही भूमिका आहेत. 'टकाटक'प्रमाणेच 'टकाटक २'देखील मनोरंजनातून काहीतरी संदेश देणारा असेल. या चित्रपटाचं बरचसं चित्रीकरण गोव्यात झालं असल्यानं गोव्यातील ध

‘तमाशा लाईव्ह’चा प्रेक्षकांना संगीत नजराणा.

Image
संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’चा सांगीतिक नजराणा येत्या १५ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या चित्रपटाचे संगीत नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. या सोहळ्यात सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव यांच्या नृत्यसादरीकरणाने कार्यक्रमाला चारचाँद लावले. यावेळी चित्रपटातील कलाकारांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.    हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वी ‘चित्रपटाची नांदी’ हे पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. त्या गाण्याला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता इतरही गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. बातमीची वारी, फड लागलाय, वाघ आला, लाथ घालणार, रंग लागला, कडकलक्ष्मी, गरमा गरम घ्या, झुंज लागली, वासुदेव, जाऊ कशी माघारी, जखम जहरी, गंमत गड्या अशा अनेक गाण्यांची सांगीतिक मैफल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अमितराज व पंकज पडघन यांचे संगीत लाभलेल्या या गाण्यांचे बोल क्षितीज पटवर्धन यांचे आहेत. हे श्रवणीय संगीत चित्रपटाच्या कथेला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाणारे आहे. प्रत्येक पात्राची ओळख ही गाण्याच्या माध्यमातून होत असून अशा प्रकारचा प्रयोग मराठी चित्रपटात पहिल्यांदाच

गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘डियर मॉली’ १ जुलैला होणार प्रदर्शित

Image
गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘डियर मॉली’ १ जुलैला होणार प्रदर्शित सध्या मराठी चित्रपटांच्या यादीत अनेक दमदार चित्रपटांचा समावेश होत असतानाच आता प्रसिद्ध दिग्दर्शक गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘डिअर मॅाली’चाही यात समावेश होत आहे. ज्यांनी अनेक नावाजलेले चित्रपट सिनेमासृष्टीला दिले आहेत. येत्या १ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणारा हा चित्रपट मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित होणार आहे. नुकतेच ‘डिअर मॅाली’चे पोस्टर समोर आले असून यात गुरबानी गिल, अलोक राजवाडे, मृण्मयी गोडबोले, अश्विनी गिरी, लिया बॅायसेन, क्रिस्टर होल्मग्रेन मुख्य भूमिकेत आहेत. पोस्टरमध्ये गुर्बानी गिलच्या हातात पत्र दिसत असून यात असा काय मजकूर आहे, ज्याने तिचा चेहरा इतका गंभीर झाला आहे ? याचा उलगडा जरी झालेला नसला तरी हा एक कौटुंबिक सिनेमा असल्याचे दिसतेय. ‘गुवाहटी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ‘डिअर मॅाली’ला ‘बेस्ट फिचर फिल्म’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. सिनेसृष्टीला वेगळ्या धाटणीचे चित्रपट देणारे दिग्दर्शक गजेंद्र आहिरे म्हणतात, “अनेक दिवसांपासून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता लागली होती. अख

झी टॉकीजवर उलगडणार ‘धर्मवीर’ची यशोगाथा

Image
‘ठाण्याचा वाघ’ म्हणून ख्याती असलेले धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारलेला 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' हा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत ‘माईलस्टोन’ ठरतोय. प्रेक्षकांनी या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला. चित्रपटाला मिळालेल्या या प्रचंड प्रतिसादाची यशोगाथा रविवार १९ जूनला दुपारी १२.०० वा. व सायं. ६.०० वा. झी टॉकीजवर उलगडली जाणार आहे. चित्रपटाला मिळालेले तुफान यश साजरं करीत या अभूतपूर्व यशाला सलाम करण्याकरिता 'धर्मवीर’ चित्रपटाची यशोगाथा तयार करण्यात आली आहे. या यशोगाथेमध्ये चित्रपटाच्या टीमने चित्रपटाचा आतापर्यंतचा प्रवास व अनुभव कथन केले आहेत.राज्याचे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री मा. एकनाथ शिंदे या यशोगाथेमध्ये कलाकार, तंत्रज्ञ यांचे अनुभव, पडद्यामागचे किस्से यांचा समावेश आहे. 'धर्मवीर' चित्रपटासाठी केलेली अपार मेहनत व हा चित्रपट कारकिर्दीला कसा नवं वळण देणारा ठरला हे यशोगाथेतून सांगताना, मराठी चित्रपटांच्या यशाचा मापदंड म्हणून या चित्रपटाकडे पाहिले जाईल असं अभिनेता प्रसाद ओक आवर्जून नमूद करतात. आभाळाएवढं कर्तृत्व आणि व्

आकाशाला गवसणी घालणाऱ्या 'अनन्या’चा टीझर प्रदर्शित........

Image
प्रताप फड दिग्दर्शित 'अनन्या' हा चित्रपट येत्या २२ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून हा यात अनन्याचा प्रवास दिसत आहे. यात हृता दुर्गुळे ‘अनन्या’ची व्यक्तिरेखा साकारत आहे.          एम. कॅाममध्ये गोल्ड मेडल पटकावलेली अनन्याचा स्वतःची काही स्वप्नं आहेत, आयुष्यात काही ध्येय आहेत. तिला आकाशात उंच भरारी घ्यायची आहे. आयुष्याकडे सकारात्कतेने बघणाऱ्या अनन्याचा तिच्या नावाप्रमाणेच अनन्यसाधारण असा प्रवास यात दिसत आहे.        दिग्दर्शक प्रताप फड म्हणतात, "यापूर्वी ‘अनन्या’ रंगभूमीच्या माध्यमातून सर्वांच्या भेटीला आली. प्रेक्षकांनी तिचे भरभरून कौतुक केले. मात्र चित्रपट करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे नाटक पाहणारा एक वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. वयोगट आहे. तर तरूणाई चित्रपटगृहाकडे विशेष आकर्षित होते. ‘अनन्या’ हा असा विषय आहे. जो कधीही जुना होणार नाही आणि प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांनी पाहावा, असा हा चित्रपट आहे. चित्रपट करण्यामागचे आणखी एक कारण म्हणजे नाटक करताना काही मर्यादा येतात. चित्रपट करताना बरीच मुभा असते.

अश्विनी बागलचे नवीन प्रोजेक्ट्स करणार प्रेक्षकांचं मनोरंजन

Image
आजघडीला मराठी सिनेसृष्टीत बरेच नवनवीन कलाकार आपले नशीब आजमावत आहेत. यापैकी लक्ष वेधून घेणारा चेहरा म्हणजे अश्विनी बागल. देखण्या चेहऱ्याला सशक्त अभिनयाची जोड देत अश्विनीनं आजवर व्हिडीओ अल्बमसोबतच चित्रपटांद्वारेही रसिकांचं लक्ष वेधून घेण्यात यश मिळवलं आहे. लवकरच अश्विनीचे आणखी काही नवीन प्रोजेक्टस रसिकांचं मनोरंजन करणार आहेत. यासोबतच स्वनिर्मितीमध्येही काही प्रोजेक्ट्स तयार करण्याची अश्विनीची योजना आहे. 'उसासून आलंय मन' या म्युझिक अल्बमसोबतच झी मराठी वाहिनीवरील 'टोटल हुबलक' या मालिकेत अभिनय केलेली अश्विनी, अनुप जगदाळे दिग्दर्शित 'भिरकीट' या आगामी चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात तिनं एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारली असून, यातील आपली भूमिका नक्कीच प्रेक्षकांसोबतच समीक्षकांच्या पसंतीस उतरेल अशी तिला आशा आहे. पहिल्या सिनेमादरम्यान आई सोडून गेली तरीही मागे न हटता 'शो मस्ट गो ऑन'चा मंत्र जपत अश्विनीनं मोठ्या जिद्दीनं आणि चिकाटीनं आपला पहिला चित्रपट पूर्ण केला. अश्विनीला मोठ्या स्क्रीनवर पहाणं हे तिच्या आईचं स्वप्न होतं, जे ति

विविध पुरस्कार महोत्सवांमध्ये 'संदीप पाठक' यांचा बोलबाला

Image
विनोदीच नव्हे तर गंभीर धाटणीच्या भूमिकाही चपखलपणे साकरीत चतुरस्त्र अभिनेते संदीप पाठक यांनी मराठी सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या वेगवेगळया धाटणीच्या भूमिकांनी प्रेक्षकांना कायमच आनंद दिला आहे. सध्या विविध पुरस्कार महोत्सवांमध्ये संदीप पाठक हे नाव चांगलच गाजतंय. जागतिक किर्तीच्या  ' काऊच फिल्म फेस्टिव्हल स्प्रिंग २०२२ ' (Couch Film Festival Spring  2022 )मध्ये ‘राख’ चित्रपटासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवल्यानंतर त्यांची   पुरस्कारांची घोडदैाड सुरूच आहे.   त्यानंतर नुकत्याच संपन्न झालेल्या ‘अंबरनाथ चित्रपट महोत्सव २०२२’ मध्येही याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार त्यांना मिळाला. तसेच ‘सांस्कृतिक कलादर्पण २०२२’ या महोत्सवातही त्यांनी पुरस्कार पटकवत यशाची अनोखी हॅट्रिक साधली आहे. या तीन लोकप्रिय महोत्सवांमध्ये ‘राख’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवत संदीप यांनी यंदा सर्वत्र आपला डंका वाजवला आहे.  याबद्दल बोलताना संदीप पाठक सांगतात की, यंदाचं वर्ष माझ्यासाठी ख़ास आहे. कौतुका

मन हेलावणाऱ्या ‘वाय’ चा थरारक........ ट्रेलर .....

Image
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सध्या प्रचंड चर्चेत असलेला आणि मुक्ता बर्वे ची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट म्हणजेच 'वाय’! कन्ट्रोल -एन प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन अजित सूर्यकांत वाडीकर यांनी केले आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर झळकला असून यात हायपर लिंक थरार अनुभवायला मिळत आहे. ही संकल्पना मराठीत पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. येत्या २४ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या 'वाय' या शब्दामागे खूप मोठा अर्थ दडलेला आहे. ही आपल्या सर्वांच्या अस्तित्वाची, अस्तित्वासाठीच्या संघर्षाची कहाणी आहे, जी सत्य घटनांवर आधारित आहे.   'वाय'चा पहिला लुक समोर आल्यापासूनच चित्रपटाबद्दल अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उपस्थित झाले होते. त्याच प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आता 'वाय'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यात मुक्ता बर्वे ही एका शासकीय अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत असून ती कार्यरत असलेल्या क्षेत्रात काही धक्कादायक गोष्टी घडत आहेत. या घटना दर महिन्याच्या अखेरच्या शुक्रवारी का घडत आहेत? या घटनांमागे काही दृश्य आणि अदृश्य हात आहेत; ज्यातील काही मदतीसाठी आहेत त

‘हसता हा सवता’अभिराम भडकमकर लिखित नवीन नाटक रंगभूमीवर..........

Image
नवनवीन कलात्मक अनुभूती निर्माण व्हाव्यात व नव्या जाणिवा असलेला प्रेक्षक घडावा या हेतूने  आशय–विषयाची नवता घेऊन नवी नाटकं रंगभूमीवर येऊ घातली आहेत. मनोरंजनासोबत विचार करायला प्रवृत्त करणारा असचं एक वेगळ नाटक रंगभूमीवर येऊ घातलं आहे. अभिराम भडकमकर लिखित आणि कुमार सोहोनी दिग्दर्शित *‘हसता हा सवता’* या नव्या विनोदी नाटकाचा शुभारंभ *१७ जूनला दु. ४ वा. दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले* येथे होणार आहे. मोरया थिएटर्स निर्मित आणि वेदान्त एण्टरटेन्मेंट प्रकाशित या नाटकात प्रियदर्शन जाधव मध्यवर्ती भूमिकेत असून त्याच्यासोबत अमोल बावडेकर, अश्विनी जोशी, श्रद्धा पोखरणकर, प्रसाद दाणी हे कलाकार दिसणार आहेत. या नाटकाची निर्मिती भाऊसाहेब भोईर यांनी केली असून सुत्रधार भैरवनाथ शेरखाने आहेत. या नाटकाची संकल्पना महात्मा फुले यांच्या एका वाक्यावर आधारलेली आहे. एकमेकांवर ‘मालकी हक्क’ गाजवण्यापेक्षा प्रेम करू असा विचार यात मांडण्यात आला आहे. कौटुंबिक आशय फँटसी पद्धतीने मांडत लेखक अभिराम भडकमकरआणि दिग्दर्शक कुमार सोहोनी ही जोडगोळी ‘हसता हा सवता’ या नाटकातून प्रेक्षकानां काहीतरी वेगळं देणार हे नक्की. या न

'फनरल'.......मरणाचा 'ही' आनंदोत्सव व्हावा........ समीक्षण: वैभव बागकर.

Image
जन्म आणि मृत्यू, म्हणजे जन्मलेला  माणूस  हा मरणार आहे हे  माहीत  असूनही आपण मृत्यू  बद्दल  बोलणं टाळतो,त्याला दूर सरण्याचा प्रयत्न  करतो .त्याला अशुभ मानतो, सतत स्वतःची  आप्तेष्टांची काळजी घेतो, काळजी करतो.अपघात,आजार, यापासुन सतत  दूर राहून,काळजी करून,घेऊन मृत्यू  पासून  सतत  दूर  पळण्याचा प्रयत्न  करतो,पण......ते अंतिम सत्य आपल्याला  गाठतच,ते सर्वानाच गाठत.पण हेसर्व  माहित  असूनही दूर पळण्याची  असोशी  काही गेल्या जात नाही,पण ..या अंतिम सत्याला आनंदाने  सामोरी  जाऊन,त्याचा आनंदोत्सव  का होऊ नये,असा विचार घेऊन घेऊन  आलेला मराठी  चित्रपट आहे. 'फनरल'.......एक आनंददायी ... मृत्यु नंतरचा  प्रवास ....                                                                                 ही गोष्ट  आहे हिरा नावाच्या  तरुणाची ,त्याच्या तीन  मित्रांची, मीनल नावाच्या मैत्रिणीची , त्याच्या आजोबांची  आणि इतर माणसांची .....हया त्यातील काही व्यक्तिरेखा आहेत,तसाच एक मार्टिन  नावाचा कावळा पण आहे,तो प्रतीकात्मक  म्हणून असलेला,हिरा आईवडील  नसल्याने आजोबान सोबत मोठा झालाय,आईवडिलांच्या मायेविन

'वाय' या 'मल्टि-स्टारर' थरारपटाचे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला..........

Image
      अजित सूर्यकांत वाडीकर लिखित व दिग्दर्शित ‘वाय’ हा सिनेमा येत्या २४ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असून, मराठीत पहिल्यांदाच असा हायपरलिंक थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. पहिल्या पोस्टरपासूनच खरंतर या चित्रपटाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. अनेक चित्रपटगृहांमध्ये दिसणाऱ्या स्टँडीज मुळेही 'वाय' या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे. सुरुवातीला फक्त मुक्ता बर्वेचाच चेहरा समोर आल्यानंतर पडद्याआड असलेले चित्रपटातील इतर कलाकारही आता समोर आले आहेत.      काही दिवसांपूर्वी 'वाय' या चित्रपटाचे एक टिझर झळकले होते. त्यात चित्रपटातील सर्व अभिनेत्रींचे दर्शन घडले होते. एकाच वेळी वेगवेगळ्या व्यक्तिरेखांच्या आयुष्यात घडणाऱ्या घडमोडींची एक धावती झलक यात दिसली होती. यात मुक्ता बर्वे व्यतिरिक्त प्राजक्ता माळी, रसिका चव्हाण प्रमुख भूमिकेत असल्याचे दिसून आले होते. या टिझरला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता चित्रपटाचा दुसरा टिझर प्रदर्शित झाला आहे. 'वाय ' चित्रपटाच्या या दुसऱ्या टिझर मधून चित्रपटातील अभिनेत

'रूप नगर के चीते' येत आहेत........

Image
कोणत्याही शब्दांच्या चौकटीत न मावणारं नातं म्हणजे ‘मैत्री’. रक्ताच्या नात्याच्या बंधापेक्षा मैत्रीच्या नात्याचे बंध अधिक घट्ट असतात.           मैत्री ... ती तशी कोणाबरोबरही होते, अनेकदा आपल्याही नकळत. त्याला वय, भाषा, धर्म, वर्ण कशाचीही मर्यादा नसते. अशाच एका मैत्रीची अनोखी गोष्ट एका मराठी चित्रपटातून लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. नाव आहे ... 'रूप नगर के चीते'! दचकू नका..! नाव जरी हिंदी असलं तरी चित्रपट मात्र मराठी आहे. येत्या १६ सप्टेंबरला 'रूप नगर के चीते' आपल्या भेटीला येतील, त्यापूर्वी या चित्रपटाचं एक धमाकेदार पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. चिखलात माखलेले, कशाचीही पर्वा न करता, आपल्याच मस्तीत असलेले दोन जिगरी दोस्त आपल्याला त्यात दिसताहेत. ते कोण आहेत? त्याची ओळख लवकरच होणार आहे.               एस एंटरटेन्मेंट बॅनरखाली बॉलीवूड मधील संगीतकार मनन शाह यांनी 'रूप नगर के चीते' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली असून अतिशय भव्य दिव्य पद्धतीने दिग्दर्शक विहान सूर्यवंशी यांनी हा चित्रपट साकारला आहे                                                           

'सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळा.

Image
  मराठी कला क्षेत्रात आपले अमूल्य योगदान देणाऱ्या पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकारांना चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 'सांस्कृतिक कलादर्पण गौरवरजनी पुरस्कारा'ने गौरवण्यात येते. नुकताच हा दिमाखदार पुरस्कार सोहळा मुंबईत पार पडला. या वेळी कला क्षेत्रात विविध विभागात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांना यावेळी सन्मानित करण्यात आले. यंदाचा 'सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार' जेष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी आणि अभिनेते डॉ. विलास उजवणे यांना प्रदान करण्यात आला तर प्रभाकर सावंत (गोट्या सावंत)  यांना 'कर्मयोगी पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले.  या सोहळ्याला विजय कदम, मकरंद देशपांडे, विजय गोखले, प्रिया बेर्डे, विजय पाटकर, अंकुश चौधरी, भार्गवी चिरमुले, मंगेश कदम, राजेश देशपांडे, संदीप पाठक, प्रसाद खांडेकर, आदर्श शिंदे, सौरभ गोखले, रुपाली भोसले, विशाखा सुभेदार, पंढरीनाथ कांबळे ,सचिन गोस्वामी, सचिन मोटे, अनंत महादेवन, मंगेश बोरगावकर, विजय पाटकर यांच्यासह सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.       महाराष्ट्राची संस्कृती जपणाऱ्या या शानदार सोहळ्याची सुरुवात गणेशवंदनाने झाली. सोहळ्

*'रानबाजार'च्या शेवटच्या भागांनी माजणार खळबळ*

Image
जेव्हापासून अभिजित पानसे दिग्दर्शित 'रानबाजार'ची घोषणा झालीये, तेव्हापासूनच या वेबसीरिजची सर्वत्र चर्चा होतेय. त्यात तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी यांचा लूक समोर आल्यानंतर तर या चर्चांना अधिकच उधाण आले. पॉलिटिकल थ्रिलर असणाऱ्या या भव्य वेबसीरिजची 'असंच काहीसं घडलं होतं... कदाचित ?!' ही टॅगलाईनच बरेच काही सांगून जाणारी आहे. त्यामुळे 'रानबाजार'च्या प्रदर्शनाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. 'रानबाजार' 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर झळकल्यानंतर त्याला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. वेबविश्वात वादळ आणणाऱ्या या वेबसीरीजचे प्रत्येक आठवड्याला दोन -तीन भाग प्रदर्शित झाल्यानंतर आता शेवटचे आणि अत्यंत खळबळजनक असे दोन भाग १० जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आतापर्यंत प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे या दोन भागांमध्ये दडलेली आहेत.        आजवर वेबविश्वात कधीही न पाहिलेली आंतरराष्ट्रीय दर्जाची ही वेबसीरिज आहे. आजवरची भारतातील ही सर्वोत्तम सीरिज असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. 'रानबाजार'च्या प्रत्येक भागाचा शेवट