Posts

Showing posts from September, 2022

‘गोष्ट एका पैठणीची’ला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान'अक्षय बर्दापूरकर', 'शंतनु रोडे' पुरस्काराने सन्मानित.

Image
       सिनेसृष्टीत अमूल्य योगदान देणाऱ्या पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकाराला दरवर्षी मानाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाचा  ६८ वा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा नुकताच दिल्ली येथे संपन्न झाला असून या वेळी ‘सर्वोत्कृष्ट चित्रपटा’चा पुरस्कार ‘गोष्ट एका पैठणीची’ला मिळाला आहे.  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार दिग्दर्शक शंतनू रोडे आणि प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली असून येत्या २ डिसेंबर रोजी ‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. स्वप्नाचा नक्षीदार प्रवास घडवणाऱ्या या चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, मिलिंद गुणाजीं, शशांक केतकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.     राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ‘’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमसाठी ही आनंदाची बाब आहे आणि हा पुरस्कार केवळ माझ्या एकट्याचा नसून संपूर्ण टीमचा आहे. खूप सुंदर आणि मनाला स्पर्शून जाणा

सोनाली कुलकर्णीचा जाळ अन् धूर संगटच… झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड मध्ये ..,

Image
    मराठी विनोदी सिनेमातील बादशहा म्हणून ओळखले जाणारे दादा कोंडके यांच्या गाजलेल्या सिनेमांनी आणि त्यातील ठसकेबाज गाण्यांनी एक काळ गाजवला. विशेष म्हणजे आजही दादा कोंडके यांच्या गाण्यांवर थिरकण्याचा मोह आवरत नाही. त्यात " केळेवाली मी सांगा तुम्हाला शोभल का ? " हे गाणं तर दादांच्या सिनेमातील मास्टरपीस. दादा कोंडके आणि उषा चव्हाण या जोडीने अनेक गाण्यांमध्ये धमाल केलीय त्यापैकीच हे गाणं. दादांच्या सिनेमातील तीच केळेवाली बनणार आहे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. सोनाली , दादा कोंडके यांच्या सुपर हिट चित्रपटातील सुपर हिट गाण्यांवर झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड या सोहळ्यात नृत्य सादर करणार आहे . विनोदाची खाण असलेला हा सोहळा ९ ऑक्टोबरला झी टॉकीज या वाहिनीवर दुपारी १२ आणि सायंकाळी ७ वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे. मराठी सिनेमातील अप्सरा फेम सोनाली कुलकर्णी म्हटलं की काहीतरी हटके बघायला मिळणार याची आता तिच्या चाहत्यांना सवयच झाली आहे. छंद लागला म्हणत सोशल मीडियावर तुफान हिट झालेल्या सोनालीच्या डान्सचा, अभिनयाचा, भूमिकेचा प्रत्येक अपडेट जाणून घेण्याचा जणू तिच्या चाहत्यांना छंदच लागल

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'गोष्ट एका पैठणीची' २ डिसेंबरला होणार प्रदर्शित.

Image
६८व्या राष्ट्रीय पुरस्कारात शंतनू रोडे दिग्दर्शित 'गोष्ट एका पैठणीची'ने 'सर्वोत्कृष्ट चित्रपटा'चा पुरस्कार पटकावला असून  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या खास दिनाचे औचित्य साधून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या २ डिसेंबर रोजी ‘गोष्ट एका पैठणीची चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येईल. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, गोल्डन रेशो फिल्म्स आणि लेकसाईड प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, मिलिंद गुणाजी, शशांक केतकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल दिग्दर्शक शंतनू रोडे म्हणतात, '' आज या चित्रपटासाठी आम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनासाची तारीख जाहीर करण्यासाठी आजच्यापेक्षा दुसरा कोणता चांगला दिवस असूच शकत नाही. हा चित्रपट माझ्या खूप जवळचा आहे. एका छोट्याशा गावात घडणारी ही गोड कथा आहे. चित्रपट बनवला तेव्हा हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मजल मारेल, याची जराही कल्पना नव्हती. प्रत्येक जण

‘शिवप्रताप–गरुडझेप’ चित्रपटाचे पाच शहरांत दिमाखदार प्रिमियर.

Image
‘शिवप्रताप–गरुडझेप’ हा डॉ.अमोल कोल्हे यांचा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. विजयादशमीच्या  मुहुर्तावर ५ ऑक्टोबरला ‘शिवप्रताप–गरुडझेप’ प्रदर्शित होत आहे. इतिहासाच्या पानांमध्ये अभिमानाने कोरलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक आग्रा सुटकेचा थरार दाखवणाऱ्या या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे प्रदर्शनाआधी या चित्रपटाचे ५ शहरांत विशेष शो आयोजित करण्यात आले आहेत. या चित्रपटाच्या भव्यतेप्रमाणेच प्रिमियरची भव्य तयारी करण्यात आलेली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, बेळगाव या पाच महत्त्वाच्या शहरात हे प्रिमियर संपन्न होणार आहेत. शनिवार १ ऑक्टोबरला नाशिकच्या सिटी सेंटरला सायं ७.०० वा., रविवार २ ऑक्टोबरला सिटीप्राइड कोथरुड, पुणे सायं ७.०० वा., सोमवार ३ ऑक्टोबरला कोल्हापूर आयनॉक्स सायं ७.०० वा., मंगळवार ४ ऑक्टोबरला बेळगाव आयनॉक्स सायं ७.०० वा. तर दसऱ्याला ५ ऑक्टोबरला मुंबईत अंधेरी इन्फिनिटी रात्रौ ८.०० वा. हे दिमाखदार प्रिमियर रंगणार आहे. चित्रपटातील कलाकारांच्या टीमसोबत विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती या खास शो साठी राहणार आहे. ‘आग्र्य

शिकागो साऊथ एशियन फिल्म फेस्टिवलमध्येझी स्टुडियोजच्या 'वाळवी' चित्रपटाने मारली बाजी .

Image
आपल्या प्रेक्षकांना अनेक दर्जेदार कलाकृती देत त्यांचं मनोरंजन करणारी निर्मितीसंस्था म्हणजे झी स्टुडियोज. आजवर झी स्टुडियोजच्या अनेक  चित्रपटांनी केवळ बॉक्स ऑफिसच नाही तर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. तसेच अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपल्या यशाची मोहोर उमटवली आहे. या मांदियाळीत आता आणखी एका नावाची आणि पुरस्काराची भर पडली आहे. झी स्टुडियोजच्या आगामी 'वाळवी' या चित्रपटाने तेराव्या शिकागो साऊथ एशियन फिल्म फेस्टिवलमध्ये बाजी मारत सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहे. आजवर झी स्टुडियोजसोबत एलिझाबेथ एकादशी आणि चि. व चि. सौ.का. सारखे वेगळ्या धाटणीचे लोकप्रिय चित्रपट देणाऱ्या परेश मोकाशी यांनी 'वाळवी' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. वाळवी चित्रपटाला मिळालेल्या या यशाबद्दल बोलताना लेखक-दिग्दर्शक परेश मोकाशी म्हणाले की, " शिकागो साऊथ एशियन फिल्म फेस्टिवल सारख्या नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपल्या चित्रपटाचं स्क्रिनिंग होणं तेथील प्रेक्षकांनाच नाही तर परीक्षकांनाही हा चित्रपट आवडणंआणि त्यांनी त्यावर पुरस्काराची मोहोर उमटवणं

हरवत चाललेल्या मैत्रीला नवी पालवी देणारा 'सहेला रे' ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला .

Image
अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित 'सहेला रे' वेबचित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून काळाच्या विळख्याआड हरवून गेलेल्या 'ती' च्या अस्तित्वाला मैत्रीच्या हळुवार झुळकीने पुन्हा जिवंत करून, एक नवीन संजीवनी देणाऱ्या 'ती' च्या आयुष्याची कथा सांगणारा चित्रपट म्हणजे 'सहेला रे'. मृणाल कुलकर्णी, सुबोध भावे आणि सुमित राघवन यांच्या परिपक्व नात्यातील विविध छटा यात पाहायला मिळणार आहेत. दरम्यान या वेबचित्रपटातील 'रे मनाला' हे मनाला भिडणारे गाणेदेखील नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले असून या गाण्याला आदर्श शिंदे यांचा बहारदार आवाज लाभला आहे. मनातील चलबिचल व्यक्त करणाऱ्या या गाण्याचे बोल वैभव जोशी यांचे आहेत. तर सलील कुलकर्णी यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे.  आयुष्यात कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना एकमेकांना गृहीत धरता धरता नात्यातील हरवून गेलेला गोडवा पुन्हा मिळवण्यासाठीची 'ती'ची धडपड ट्रेलरमधून दिसत आहे. या धडपडीत तिला तिचे अस्तित्व गवसेल का, याचे उत्तर 'सहेला रे' पाहिल्यावरच मिळेल.        चित्रपटाबद्दल

घरापासून दूर राहिलेल्या प्रत्येकाची गोष्ट म्हणजे 'सनी' टिझर प्रेक्षकांच्या भेटीला .

Image
मागील काही दिवसांपासून बऱ्याच कलाकारांच्या सोशल मीडियावर #घरापासून_दूर चा जोरदार ट्रेंड दिसत आहे. यात हेमंत ढोमे, ललित प्रभाकर, क्षिती जोग, चिन्मय मांडलेकर अशा काही कलाकारांचा समावेश आहे. हे नेमकं काय प्रकरण आहे, याबाबत अनेक तर्कवितर्क काढले जात असतानाच आता या हॅशटॅगमागे लपलेले गुपित सर्वांच्या समोर आले आहे. झिम्मा या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचा पुढचा चित्रपट 'सनी' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे टिझर सोशल मीडियावर झळकले असून #घरापासूनदूर चे उत्तर मिळाले आहे.  टीझरमध्ये ललित प्रभाकर म्हणजेच 'सनी' शिक्षणासाठी परदेशात गेल्याचे दिसत असून तो पाठीमागे काहीतरी सोडून आल्याची त्याला सतत जाणीव होतेय. असं म्हणतात, लांब गेल्यावरच जवळच सापडतं. असाच काहीसा अनुभव सनीला येत असल्याचे यात दिसतेय. त्याच्या मनात चाललेली ही चलबिचल नेमकी कशासाठी आहे, याचे उत्तर आपल्याला १८ नोव्हेंबरला मिळणार आहे. क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित, या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून

रिक्षा चालकाची मुलगी झळकणार चित्रपटात.......

Image
साताऱ्याची ऋतुजा टंकसाळे ही नवोदित अभिनेत्री "प्रेम म्हणजे काय असतं" या चित्रपटातून पदार्पण करत आहे. नव्या दमाच्या कलाकारांनी केलेला 'प्रेम म्हणजे काय असतं' हा चित्रपट ४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तख्त प्रॉडक्शनने 'प्रेम म्हणजे काय असतं' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर प्रसाद दत्तात्रय इंगवले यांनी चित्रपटाचं लेखन,  दिग्दर्शन आणि निर्मिती अशी तिहेरी जबाबदारी निभावली आहे. प्रेम ही संकल्पना अत्यंत वेगळ्या पद्धतीने या चित्रपटात मांडण्यात आली आहे. उत्तम कथा, फ्रेश कलाकार, श्रवणीय संगीताचा मिलाफ या चित्रपटात झाला आहे. ऋतुजा टंकसाळे ही साताऱ्याची तरुणी पहिल्यांदाच चित्रपटात अभिनय करत आहे. प्रेम म्हणजे काय असतं या चित्रपटात ऋतुजानं अपर्णा ही भूमिका केली आहे.ऋतुजाचे वडील रिक्षाचालक असून चित्रपटाची, अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबातली ऋतुजा आपला पहिला चित्रपट प्रदर्शित होणार असल्यानं उत्साहात आहे. 'प्रेम म्हणजे काय असतं या चित्रपटातून मला खूप काही शिकायला मिळालं, चित्रपट हे माध्यम समजून घेता आलं.

'फोर्ब्स'ने घेतली मराठमोळ्या 'पल्याड' चित्रपटाची दखल.

Image
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठीचा झेंडा डौलानं फडकवणाऱ्या मराठी सिनेसृष्टीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. देश-विदेशातील विविध चित्रपट महोत्सवांमध्ये कौतुकास पात्र ठरत पुरस्कारांवर नाव कोरणाऱ्या 'पल्याड' या मराठी चित्रपटाची दखल आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या 'फोर्ब्स' मासिकानं घेतली आहे. 'फोर्ब्स'नं दिग्दर्शक शैलेश भीमराव दुपारे यांची संपूर्ण मुलाखत आणि चित्रपटाविषयीची माहिती त्यांच्या ऑनलाइन पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे. फोर्ब्सने घेतलेल्या मुलाखतीमध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक शैलेश भीमराव दुपारे यांचा सोबत चर्चा करून चित्रपटाच्या संपूर्ण प्रवास समजून घेतलेला आहे. त्यामुळे आज सगळीकडे 'पल्याड'च्या नावाचा डंका वाजू लागला आहे. 'पल्याड'नं चित्रपटसृष्टीसोबतच रसिकांचंही लक्ष वेधण्यात यश मिळवलं आहे. 'फोर्ब्स'सारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील अग्रगण्य मासिकात मराठमोळ्या दिग्दर्शकाची मुलाखत प्रकाशित होणं ही प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची आणि कौतुकास्पद बाब आहे. एका महत्त्वपूर्ण विषयावर प्रकाशझोत टाकणाऱ्या 'पल्याड'

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील पहिलावहिला मराठी रिॲलिटी शो, 'क्रांती रेडकर'चे निर्मिती क्षेत्रात पदार्पण

Image
निरनिराळ्या आशयावर प्रयोग करणारे 'प्लॅनेट मराठी' पुन्हा एकदा एक नवीन संकल्पना घेऊन प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहे. लवकरच 'प्लॅनेट मराठी' आणि क्रांती रेडकर यांची निर्मिती संस्था 'दॅट हॅप्पी गर्ल' एक नवीन कल्पना घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या शोच्या निमित्ताने क्रांती रेडकर निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत. वर्षपूर्तीनिमित्त मनोरंजक वेबफिल्म, वेबसिरीजच्या घोषणा होत असतानाच प्लॅनेट मराठीने आणखी एक मोठी घोषणा केली आहे, ती म्हणजे रिॲलिटी शोची. मराठी ओटीटीवर अशा प्रकारचा प्रयोग प्रथमच होत आहे. या शोची रूपरेखा नेमकी काय असणार, यासाठी मात्र थोडी वाट पाहावी लागणार आहे. 'प्लॅनेट मराठी', अ व्हिस्टास कॅपिटल कंपनी नेहमीच त्यांच्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी वैविध्यपूर्ण आशय घेऊन आले आहे, त्यामुळे हा रिॲलिटी शोही प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल.  प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, " प्रथमच मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिॲलिटी शो सादर होणार आहे. क्रांती रेडकरच्या सोबतीने हा रिॲलिटी शो आम्ही प्रेक्षकांच्या

अनुपसिंग आणि मृण्मयी या जोडीचा "बेभान"......

Image
मराठी सिनेसृष्टीत अनेक नवनवीन विषय हाताळले जात असून हिंदी सिनेसृष्टीत आपले नशीब आजमावणारे कलाकारही आता मराठी सिनेसृष्टीकडे वळत असल्याचे आपण पाहिले आहे. आता यामध्ये आणखीन एका नावाची भर पडली आहे आणि ते नाव आहे अनुपसिंग ठाकूर. आजवर अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमधून आपण त्याचे काम पाहिले असून अनेक बॉडीबिल्डिंग स्पर्धांमधून देखील त्याने आपले नाव कमविले आहे. शशिकांत पवार प्रॉडक्शन प्रस्तुत अनुप जगदाळे दिग्दर्शित "बेभान" या आगामी चित्रपटातून मिस्टर वर्ल्ड अनुपसिंग ठाकूर मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आले         मधुकर ( अण्णा ) उद्धव देशपांडे आणि शशिकांत शीला भाऊसाहेब पवार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. "झाला बोभाटा", "भिरकीट" असे उत्तम चित्रपट केल्यानंतर "बेभान" हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट दिग्दर्शक अनुप जगदाळे आपल्यासाठी घेऊन येण्यास सज्ज झाले आहेत. अनुप जगदाळे दिग्दर्शित  आगामी "रावरंभा" या ऐतिहासिक चित्रपटाची चर्चा सुद्धा मनोरंजन क्षेत्रात कमालीची आहे.        &quo

नव्या युगातील मावळ्यांची कथा सांगणार 'हरीओम'

Image
भगवे वादळ निर्माण करणाऱ्या नव्या युगातील मावळ्यांची कथा सांगणारा आशिष नेवाळकर, मनोज येरुणकर दिग्दर्शित 'हरीओम' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून आपला मराठीबाणा, छत्रपती शिवाजी महाराजांची मूल्ये जपणारा हा 'हरिओम' येत्या १४ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. श्री हरी स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती आणि कथा हरिओम घाडगे यांची आहे.      छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आराध्य दैवत मानणारे हे आधुनिक युगातील मावळे अन्यायाविरोधात, खोटेपणा, कायदा, सत्तेच्या गैरवापराविरोधात संघर्ष करताना दिसत आहेत.  शिवप्रेम, बंधुप्रेम, आक्रमकता असणाऱ्या 'हरी- ओम'मध्ये ध्येय गाठण्याची जिद्द दिसत आहे. आता त्यांच्या आयुष्यातील उद्दिष्ट्य ते गाठणार का, हे चित्रपट आल्यावरच कळेल. ट्रेलरवरून हा एक ॲक्शन चित्रपट दिसत असला तरी यात हळुवार खुलत जाणारी प्रेमकहाणीही यात पाहायला मिळणार आहे. कोकणातील निसर्गसौंदर्याचे दर्शन घडवणारा 'हरीओम' हा एक कौटुंबिक सिनेमा आहे. निरंजन पेडगावकर, प्रशांत, अमोल कोरडे, गणेश, राहुल यांनी चित्रपटातील गाण्यांना शब्दबद्ध केले

वैभव आणि पूजा पुन्हा एकत्र...

Image
कलाकारांच्या काही जोडया खूप हीट होतात. मोठ्या पडद्यावर झळकलेल्या अशा काही जोडया आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे. वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत जोडी ही त्यापैकीच एक. प्रेक्षकांची मने जिंकलेली ही जोडी परत एकत्र कधी येणार? याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये कायमच उत्सुकता असतेच. वैभव आणि पूजा या जोडीच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे.   ‘हॅण्डसम’ वैभव तत्ववादी आणि ‘ब्युटीफुल’ पूजा सावंतची लव्हेबल केमिस्ट्री परत एकदा जुळणार आहे. पण ही जोडी कशासाठी एकत्र येतेय? हे अजूनही गुलदस्त्यात आहे. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रेमामुळे या दोघांनी पुन्हा एकत्र काम करणार असल्याचे संकेत दिले आहेत. चित्रपट, अल्बम, जाहिरात यापैकी कोणत्या माध्यमातून ही जोडी एकत्र येणार याची खूप उत्सुकता शिगेला पोहचली  असली तरी बऱ्याच कालावधीनंतर ही जोडी एकत्र येणार असल्याने चाहत्यांना नक्कीच आनंद होणार आहे. लवकरच हे दोघे त्यांच्या या आगामी प्रोजेक्टची घोषणा करणार आहेत.

संतोष आणि पूर्वाचे ‘३६ गुण’ जुळणार

Image
लग्न जुळवताना ‘३६ गुण’ पाहिले जातात. दोनजणांमध्ये वाद किंवा भांडण असेल तेव्हा दोघांमध्ये ‘३६’ चा आकडा आहे असं म्हटलं जातं. तर अशा या ‘३६’ आकडयाने अभिनेता संतोष जुवेकर आणि अभिनेत्री पूर्वा पवार यांना एकत्र आणण्याची किमया साधली आहे. समित कक्कड दिग्दर्शित आगामी ‘३६ गुण’ या चित्रपटात संतोष जुवेकर व पूर्वा पवार हे दोघे कलाकार मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. तरुण पिढीच्या दृष्टीकोनातून भारतीय लग्नसंस्थेवर भाष्य करणारा हा मनोरंजक चित्रपट आहे. मुंबई आणि लंडनमधील तब्बल ९० नयनरम्य लोकेशन्सवर हा चित्रपट चित्रीत झालेला असल्याने आतापर्यंत न पाहिलेले लंडन आणि वेगळा विषय ही प्रेक्षकांसाठी ‘स्पेशल ट्रीट’ ठरणार आहे. येत्या ४ नोव्हेंबरला ‘३६ गुण’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. घरदारं बघून चहा पोह्यांचा रीतसर कार्यक्रम करून, देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आणि थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने विवाह झालेले, सुधीर आणि क्रिया त्यांचा मधुचंद्र लंडनला करायचा ठरवतात आणि तिथे पोहचल्यावर मात्र त्यांना एकमेकांमध्ये दिसणाऱ्या गुण-अवगुणांची, आपआपसातील वेगळेपणाची जाणीव यावर ‘३६ गुण’ चित्रपट भाष्य करत

'मन कस्तुरी रे'तून दरवळणार 'अभिनय-तेजस्वी'च्या प्रेमाचा सुगंध ...........

Image
       नवरात्री म्हटलं की नवचैतन्य, जोश, उल्हास. हेच सुंदर वातावरण अधिकच बहारदार आणि रंगमय करण्यासाठी मुंबई मुव्हिस स्टुडिओज घेऊन आले आहे 'मन कस्तुरी रे'चे नवे पोस्टर. नवरात्रीच्या निमित्ताने हे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून यात तेजस्वी प्रकाश आणि अभिनय बेर्डे प्रेमाच्या रंगात दंग होऊन नाचताना दिसत आहेत. संकेत माने दिग्दर्शित 'मन कस्तुरी रे' येत्या ४ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.         हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांचा मराठी सिनेमांसाठीचा रस वाढत असतानाच तेजस्वी प्रकाश हिने 'मन कस्तुरी रे' या मराठी सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. यानिमित्ताने तेजस्वीने सोशल मीडियावर नवरात्रीच्या शुभेच्छा देत आपल्या या पोस्टरबाबत खूप उत्सुक असल्याचे सांगितले. तिचा हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. मराठमोळ्या तेजस्वीची पहिल्यांदाच मराठी सिनेमातील दमदार झलक पाहायला सर्वच प्रेक्षकवर्ग आतुर असतानाच आता तेजस्वी प्रकाश आणि अभिनय बेर्डेचे नाचतानाचे एक जबरदस्त पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. पोस्टरमधील या दोघां

बहुचर्चित "आपडी थापडी" चित्रपट ५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला.

Image
आगामी बहुचर्चित "आपडी थापडी" या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. ट्रेलरमधूनच चित्रपट मनोरंजक असल्याचं कळत असल्यानं ५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा सहकुटुंब चित्रपटगृहात आनंद घेता येईल.     के सायलेंटच्या केसी पांडे यांची निर्मिती आणि प्रस्तुती असलेल्या 'आपडी थापडी' या चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद करीर यांचं आहे. सुनीला करीर आणि आनंद करीर यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे यांच्यासह नंदू माधव, संदीप पाठक, नवीन प्रभाकर, खुशी हजारे अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटात आहे. तर सुमन साहू यांनी चित्रपटाचं छायांकन आहे. 'फॅमिलीचा चित्रपट बघा फॅमिली बरोबर' अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटात पाटील कुटुंबाची एक मजेशीर गोष्ट उलगडली आहे.  अतिशय कंजुष स्वभाव असलेला सखाराम पाटील अर्थात श्रेयस तळपदे, त्याची पत्नी अर्थात मुक्ता बर्वे आणि त्यांची मुलगी असं पाटील कुटुंब या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. असा एक प्रसंग घडतो  आणि काय धमाल होते याची गोष्ट चित्रपटात आहे. ट्रेलर तर धमाकेदार आहेच पण आता उत्सुकता आहे की पिंकू नक्

'सहेला रे'... काही नात्यांना नाव नसतं......... १ऑक्टोबरपासून प्लॅनेट मराठी ओटीटीवर

Image
'प्लॅनेट मराठी' ओटीटी, अ व्हिस्टास कॅपिटल कंपनीने प्रेक्षकांना विविध विषयांवरील अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले. आता असाच एक दर्जेदार वेबचित्रपट प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित 'सहेला रे' हा चित्रपट येत्या १ ऑक्टोबर रोजी प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबचित्रपटात मृणाल कुलकर्णी, सुबोध भावे आणि सुमित राघवन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नुकतेच सोशल मीडियावर ' सहेला रे'चे  पोस्टर झळकले असून ही एक नातेसंबंधावर भाष्य करणारी कथा असल्याचे कळतेय. 'काही नात्यांना नाव नसतं', अशी टॅगलाईन असलेल्या या वेबचित्रपटात मैत्रीच्या पलीकडचे एक संवेदनशील नाते पाहायला मिळणार आहे.  प्लॅनेट मराठी ओटीटीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, '' ही एक परिपक्व नात्याची कहाणी असून नात्यातील विविध पैलू यात अलगद उलगडणार आहेत. नकळत स्वतःचाच स्वतःला नव्याने शोध लागेल. मुळात ही एक संवेदनशील आणि कौटुंबिक कथा असून ती प्रेक्षकांना नक्कीच भावेल. यातील कलाकार, कथानक, दिग्दर्शन अशा अनेक जमेच्या ब

आग्र्याच्या लालकिल्ल्यात डॉ. अमोल कोल्हेंची ‘गरुडझेप’

Image
इतिहासाच्या पानांमध्ये अभिमानाने कोरलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक आग्रा सुटकेचा थरार पुन्हा अनुभवण्याची संधी आग्र्याच्या लालकिल्ल्यात मिळाली. निमित्त होते शिवप्रताप गरुडझेप या चित्रपटाच्या प्रमोशनचे. प्रफुल्ल तावरे प्रस्तुत आणि डॉ. अमोल कोल्हे निर्मित हा चित्रपट येत्या ५ ऑक्टोबरला विजयादशमीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होतोय. तत्पूर्वी या चित्रपटाच्या प्रमोशन करिता गरुडझेपच्या टीमने माध्यम प्रतिनिधींसह आग्रा भेट केली.  या चित्रपटाच्या निमित्ताने हा थरार जिथे घडला त्या लालकिल्ल्यात अभिनेते डॉ.अमोल कोल्हे यांनी हा ऐतिहासिक अध्याय, त्याबद्दलची माहिती, शूटिंग दरम्यानचा अनुभव याबाबतची माहिती माध्यम प्रतिनिधींना यावेळी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून तो आपल्या जीवनाशी जुळवून घेता आला पाहिजे, त्यातूनच इतिहासाचे स्मरण आणि आयुष्याची लढाई लढण्याची प्रेरणा मिळू शकते. या भावनेतूनच आग्रा भेटीचा हा अनुभव देण्याची संकल्पना अभिनेते डॉ. अमोल कोल्हे आणि चित्रपटाच्या टीमने मांडली.  आग्र्याहून सुटका हा शिवचरित्रातील हा महत्त्वाचा अध्याय उलगडून दाखवणाऱ्या ‘शिव

श्रेयस तळपदेच्या "बेबीफेस"ची सोशल मीडियावर चर्चा!!

Image
  "आपडी थापडी" या चित्रपटातून मराठी चित्रपटात पुनरागमन करणाऱ्या अभिनेता श्रेयस तळपदेच्या बेबीफेसची सोशल मीडियात चर्चा आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने श्रेयसने आपला चेहरा लहान मुलासारखा करत "आपडी थापडी" हे बडबडगीत म्हटलं आहे. "आपडी थापडी" हा चित्रपट ५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.  के सायलेंटच्या केसी पांडे यांची निर्मिती आणि प्रस्तुती असलेल्या 'आपडी थापडी' या चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद करीर यांचं आहे. सुनीला करीर आणि आनंद करीर यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे यांच्यासह नंदू माधव, संदीप पाठक, नवीन प्रभाकर, खुशी हजारे अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटात आहे. तर सुमन साहू यांनी चित्रपटाचं छायांकन आहे. 'फॅमिलीचा चित्रपट बघा फॅमिली बरोबर' अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटात पाटील कुटुंबाची एक मजेशीर गोष्ट उलगडणार आहे.  याआधी अभिनेत्री मुक्ता बर्वे, संदीप पाठक, नवीन प्रभाकर आणि नंदू माधव यांच्याही बेबीफेसला उत्तम प्रतिसाद मिळाला.

'बॉईज ३' ची बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे

Image
प्रेक्षक आतुरतेने वाट बघत असलेला व बहुचर्चित असा 'बॉईज ३' हा चित्रपट एक आठवड्यापूर्वी प्रदर्शित झाला आणि पुन्हा एकदा धैर्या, ढुंग्या आणि कबीरने अवघ्या महाराष्ट्रात धमाका केला आणि यावेळी या त्रिकुटाला साथ दिली ती बिनधास्त अशा कीर्तीने. अवधूत गुप्ते प्रस्तुत, विशाल देवरुखकर दिग्दर्शित 'बॉईज ३' या चित्रपटाला महाराष्ट्रभरात कमालीचा प्रतिसाद मिळतोय. चित्रपट प्रदर्शित होऊन आता एक आठवडा झाला असून बॉक्स ऑफिसवर 'बॉईज ३'ने  ४.९६ करोडची  तुफान कमाई केली आहे. एकदंरच सध्याचे चित्र पाहता या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर असे अनेक मजबूत विकेंड मिळण्याची अपेक्षा आहे. तरुणांमध्ये 'बॉईज ३'ची भलतीच क्रेझ दिसत असून चित्रपटगृहांमध्ये याचे शोजही वाढवण्यात आले आहेत. अगदी सकाळचे शोजही 'हाऊसफुल्ल' झाले आहेत. तरुणांसोबतच कुटुंबीयही हा चित्रपट एन्जॉय करत आहेत. डायलॉगपासून गाण्यांपर्यंत सगळ्यालाच प्रेक्षकांच्या टाळ्या-शिट्ट्या ऐकायला मिळत आहेत.  चित्रपटाला मिळणाऱ्या उत्कृष्ट प्रतिसादाबद्दल प्रस्तुतकर्ते आणि संगीत दिग्दर्शक अवधूत गुप्ते म्हणतात, " सध्या आमची 'ब

'हरिओम' मधील 'सुरु झाले पर्व नवे' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Image
 काही दिवसांपूर्वीच 'हरिओम' चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आणि तेव्हापासूनच या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढू लागली. स्वराज्याच्या भगव्या स्वप्नातून जन्माला आलेल्या दोन वीर बंधू मावळ्यांची कथा म्हणजेच 'हरिओम'. नव्या पिढीला प्रेरित करणाऱ्या आणि अंधारातून तिमिराकडे नेणाऱ्या 'हरिओम' चित्रपटाची सर्वच आतुरतेने वाट पाहात आहेत. अशातच 'हरिओम'मधील एक प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'सुरु झाले पर्व नवे' असे या गाण्याचे बोल असून या गाण्याला रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांच्या सुरेल आवाजाची जोड लाभली आहे. अमोल कोरडे यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला निरंजन पेडगावकर यांनी संगीतबद्ध केले आहे. तर या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन स्वरूप मेदरा यांनी केले आहे.  या चित्रपटात  हरी आणि ओम या दोन मावळ्यांचा रांगडा अवतार तर पाहायला मिळणारच आहे याशिवाय देशप्रेमाने झपाटलेल्या या दोन बंधू मावळ्यांची हळुवार फुलत जाणारी प्रेमकथाही पाहायला मिळणार आहे. त्यांचे हे तरल प्रेम या गाण्यातून व्यक्त होत आहे. निसर्गाच्या सान्निध्यात या गाण्याचे चित्रीकरण झाले

प्रवीण तरडे म्हणतात… धर्मवीर सिनेमाने मला अक्षरश: घाम फोडला…....२५ सप्टेंबर धर्मवीर पहा झी टॉकीज वर !

Image
शिवसेना नेते धर्मवीर आनंद दीघे यांच्या जीवनावर आणि राजकीय प्रवासावर आधारीत धर्मवीर या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर तगडी कमाई केली. बॉक्स ऑफीसवर तुफान कमाई करणारा धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा सिनेमा घरबसल्या पाहण्याची पर्वणी झी टॉकीज वाहिनी घेऊन आली आहे. येत्या २५ सप्टेंबर रोजी झी टॉकीज वाहिनीवर दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. धर्मवीर सिनेमाचा टीव्ही प्रीमियर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. अभिनेता, निर्माता मंगेश देसाई याच्या मनात घोळत असलेला एक विषय प्रत्यक्षात पडद्यावर येईपर्यंतचा धर्मवीरचा प्रवासही खूप रंजक आहे. हा सिनेमा पाहून, वा, मस्त झालाय सिनेमा, सगळे कॅरेक्टर एकदम छान आहेत, प्रसंग खूप छान गुंफलेत अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या. पण दिग्दर्शक प्रवीण तरडे या सिनेमाच्या अनुभवाविषयी काय म्हणत आहेत माहित आहे का?  प्रवीण तरडे असं म्हणाले की, माझ्या आजवरच्या सगळ्या सिनेमांपैकी मला सर्वात जास्त घाम फोडणारा धर्मवीर हा सिनेमा आहे.  आता प्रवीण तरडे यांच्यासारख्या कसलेल्या अ

मोनालिसा म्हणतेय ‘तू फक्त हो म्हण’

Image
अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून नावारूपाला आलेली मोनालिसा बागल सध्या कोणाच्या तरी प्रेमात पडल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. ‘तू फक्त हो म्हण’ असं ती सांगतेय. ती नेमकी कोणाच्या प्रेमात आहे? ती कोणाला ‘हो’ म्हणायला सांगतेय हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेलच, त्यासाठी तुम्हाला मोनालिसाचा ‘तू फक्त हो म्हण’ हा आगामी मराठी चित्रपट पहावा लागेल. एन एच स्टुडिओची प्रस्तुती असलेला हा चित्रपट १४ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. 'एन एच स्टुडिओज’ ही भारतातील अग्रगण्य निर्मिती संस्था आहे. अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटांची निर्मिती तसेच वितरण या निर्मितीसंस्थेने केले आहे. संगीतमय प्रेमकथा असलेल्या ‘तू फक्त हो म्हण’ या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ.गणेशकुमार पाटील आणि भास्कर डाबेराव यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मीती किरण बळीराम चव्हाण आणि डॉ.गणेशकुमार पाटील यांची आहे. नरेंद्र हिरावत आणि श्रेयांश हिरावत हे चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना मोनालिसा सांगते, संगीतमय प्रेमकथा असल्याने मला हा चित्रपट करायचा होता. ही अशा प्रेमाची कथा आहे जी कदाचित आपल्या अव

सामान्य गृहिणीच्या संघर्षाचा प्रवास घडविणारा 'हवाहवाई' चित्रपटाचा ट्रेलर लाँच.

Image
मागील काही दिवसांपासून हटके टायटल असलेल्या 'हवाहवाई' या आगामी मराठी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. महेश टिळेकर यांनी चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि संकलन केलं आहे. "द ग्रेट इंडियन किचन" या बहुचर्चित मल्याळम सिनेमातील अभिनेत्री निमिषा सजयनचं मराठीत पदार्पण होत असून आज या चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  मराठी तारका प्रॉडक्शन्सचे महेश टिळेकर आणि नाईनटिन नाईन प्रॉडक्शन्सचे विजय शिंदे यांनी "हवाहवाई" चित्रपटाची निर्मिती केली आहे. महेश टिळेकर यांनी आतापर्यंत  वन रूम किचन, गाव तसं चांगलं सारखे अनेक उत्तमोत्तम  चित्रपट केले असल्याने "हवाहवाई" त्याच मांदियाळीतला आहे.  'हवाहवाई'च्या ट्रेलर मधून हा चित्रपट एका मध्यमवर्गीय गृहिणीची संघर्षमय कथा असल्याचे दिसते.. आयुष्यात  चैनीत राहता आलं नाही तरी चालेल  सुखाने जगता आलं पाहिजे ही भावना चित्रपटाची नायिका ज्योती हीची आहे. आयुष्यात आलेल्या एका संकटामुळे ज्योती  घरसंसार सांभाळून फूडस्टॉल सुरू करण्याचा निर्णय घेते असे ट्रेलर मध्ये दिसते. सामान्य गृहिणी असलेल्या ज्

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष आणि एव्हीके एन्टरटेन्मेंट चे सर्वेसर्वा श्री अमेय खोपकर यांचा वाढदिवस

Image
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष आणि एव्हीके एन्टरटेन्मेंट चे सर्वेसर्वा श्री अमेय खोपकर यांचा वाढदिवस  त्यांचे सहकारी ,  मनोरंजन क्षेत्रातील कलाकार , राजकारणातील काही प्रतिष्ठित मान्यवर आणि  कुटुंबियां सह जल्लोषात साजरा केला .  निनाद भट्टीन आणि तबरेज पटेल यांनी या वाढदिवसाच्या सेलिब्रेशन चे आयोजन केले होते याप्रसंगी स्वाती खोपकर , नानूभाई जयसिंघानी , रमेश परदेशी , अमोल कागणे , दिग्दर्शक लोकेश गुप्ते , प्रकाश कुंटे , अभिनेते जयवंत वाडकर , अतुल परचुरे , अभिनेत्री पूजा सावंत ,सोनाली खरे , स्मिता गोंदकर , राधा सागर , प्रीतम कागणे, कृतिका तुळसकर इत्यादी  उपस्थित होते

प्रेम आणि ताऱ्यांनी वेढलेल्या, एकाच मार्गाने प्रवास करणाऱ्या दोन शेजाऱ्यांची एक जगावेगळी प्रेम कथा 'नेबर्स' २३ सप्टेंबर पासून सिनेमागृहात...

Image
'कल्पना रोलिंग  पिक्चर्स प्रौडक्शन' निर्मित आणि  'मिठुवाला प्रौडक्शन्स' यांचे सादरीकरण असलेल्या 'नेबर्स ''  हा चित्रपट   २३ सप्टेंबर पासून  संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.     निर्माते हितेश पटेल आणि दिग्दर्शक विनय श्रीरंग घोलप यांच्या या चित्रपटात एक रहस्यमय प्रेम कथा चित्रित करण्यात आली आहे.  विज्ञान-तंत्रज्ञानाची कल्पनारम्य कथा असलेल्या या चित्रपटात चेतन चिटणीस, कृतिका गायकवाड, सिद्धार्थ बोडके, प्रसाद जवादे, शैलेश दातार, नेहा बाम , अदिती येवले आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या २३ सप्टेंबर रोजी  संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.   दिग्दर्शक विनय घोलप यांचीच पटकथा असलेल्या या चित्रपटाचे संवाद हृषीकेश कोळी आणि विनय घोलप यांनी लिहिले आहेत तर छायालेखनाची  महत्वाची जबाबदारी कॅमेरामन आशुतोष आपटे यांनी सांभाळली आहे. गीतकार मंगेश कांगणे यांच्या गीतांना संगीतकार निषाद यांनी स्वरसाज चढविला आहे तसेच पार्श्वसंगीतही त्यांनीच दिले आहे. श्री गुरु पाटील आणि महेश किल्लेकर यांनी संकलन केले असून चित्रपटाची तांत्रिक ब

'बॉईज ३'ची विकेंडला ३.०५ करोडची कमाई.....

Image
'बॉईज' हा एक ब्रँड असून या ब्रँडने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'बॉईज ३'नेही अल्पावधीतच बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. केवळ तीन दिवसांतच 'बॉईज ३' ने एक नाही, दोन नाही तर तब्बल ३.०५ करोडचा लक्षणीय गल्ला जमवला आहे. सर्व तिकीट खिडक्यांवर 'हॉऊसफ़ुल्ल'ची पाटी पाहायला मिळत असून सिनेमागृहात प्रत्येक डायलॉगवर टाळ्या आणि शिट्ट्या ऐकू येत आहेत. सिनेमागृहाच्या बाहेर पडताना प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून एकंदर सिनेमा उत्तम असल्याचे चित्र पाहायला मिळतेय. धैर्या, ढुंग्या आणि कबीर या त्रिकुटाला किर्तीने दिलेली साथ प्रेक्षकांना विशेष आवडली असून या चित्रपटाला प्रेक्षकांसह चित्रपटसृष्टी आणि समीक्षकांनीही पसंती दर्शवली आहे. सोशल मीडियावर फक्त आणि फक्त  'बॉईज ३' चा डंका वाजताना दिसत आहे. शाळेपासून सुरु झालेला बॉईजचा हा प्रवास आता महाविद्यालयापर्यंत येऊन पोहोचला आहे. त्यामुळे त्यांची धमालही आता तिप्पट झालेली आहे.  चित्रपटाला मिळणाऱ्या यशाबद्दल दिग्दर्शक विशाल सखाराम देवरुखकर म्हणतात, " 'बॉईज १' आ

साताऱ्याच्या सुरज मानेचा' पेट्रोल पंपावरील कामगार ते चित्रपट अभिनेता होण्याचा प्रवास.........

Image
सातारा जिल्ह्यातील सुरज माने 'प्रेम म्हणजे काय असतं' या चित्रपटातून पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे, पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या या तरुणानं चित्रपटात अभिनेता होण्यापर्यंतचा स्वप्नवत प्रवास साध्य केला आहे. 'प्रेम म्हणजे काय असतं' हा चित्रपट ४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तख्त प्रॉडक्शन यांनी प्रेम म्हणजे काय असतं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर प्रसाद दत्तात्रय इंगवले यांनी चित्रपटाचं लेखन,  दिग्दर्शन आणि निर्मिती अशी तिहेरी जबाबदारी निभावली आहे. प्रेम ही संकल्पना अत्यंत वेगळ्या पद्धतीने या चित्रपटात मांडण्यात आली आहे. या चित्रपटात सुरज नायकाच्या मित्राच्या भूमिकेत दिसणार आहे.  साताऱ्याच्या जवळच एका खेड्यात राहणारा सुरज घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यानं तो पेट्रोल पंपावर काम करू लागला. सुरजच्या लहानपणीतच त्याच्या वडिलांचं निधन झालं, तर आई शेतमजुरी करते. चित्रपटाची आवड आणि चित्रपटात काम करण्याविषयी सुरज म्हणाला, 'चित्रपटांची लहानपणापासूनच आवड होती. अनेक चित्रपट पाहिले, नाटकांत, वेब मालिकांमध्ये काम केले. प्रेम म्हणजे काय अस

झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड सोहळ्यात घुमणार कुर्रर्र….मातृत्वाच्या संवेदनशील विषयाला प्रसाद खांडेकरचा विनोदी तडका.

Image
  आईपण हे महान आहेच, पण हे सुख अनुभवण्यासाठी थोडा वेळ लागत असेल तर तो प्रवासही त्या आई होणाऱ्या स्त्रीसाठी सुखद असायला हवा, हलकाफुलका असायला हवा. आई होण्याच्या याच संवेदनशील भावनेला विनोदाच्या गोडव्यातून सादर करणारं नाटक गेल्या वर्षी रंगमंचावर आलं आहे ज्याचं नाव आहे कुर्रर्र. विनोदाची भट्टी असलेल्या प्रसाद खांडेकर, विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव आणि पंढरीनाथ कांबळे या चौकडीने कुर्रर्र नाटक भन्नाट बनवलं आहे. झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड सोहळ्यात कुर्रर्र आवाज , घुमल्याशिवाय राहणार नाही. झी टॉकीज कॉमेडी अॅवार्ड सोहळा ९ ऑक्टोबरला झी टॉकीज या वाहिनीवर दुपारी १२ आणि सायंकाळी ७ वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे. कुर्रर्रर्र हा शब्द माणसाच्या कानात  त्याला आयुष्यात एकदाच ऐकायला मिळतो. आई या शब्दा शिवाय  दुसऱ्या कुणीतरी बाळाच्या कानात म्हटला जाणारा हा पहिला शब्द.  बाळासाठी आणि त्याच्या आईसाठी कुर्रर्र हा शब्द घुमतो तो पाळण्यात. जन्मानंतर बाराव्या दिवशी. जिला आई व्हायची इच्छा आहे तिच्यासाठी तर हा शब्द लग्न झाल्यापासूनच मनात रूंजी घालत असतो. आजही लग्नानंतर मातृत्वाची चाहूल कधी लागतेय हा प

मराठीसह हिंदीतही प्रदर्शित होणार 'रौंदळ'

Image
आशयघन चित्रपटांसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या मराठी सिनेसृष्टीमध्ये अॅक्शन चित्रपटांची तशी वानवाच आहे. आता मात्र ही उणीव भरून काढण्यासाठी एक धडाकेबाज अॅक्शनपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून कुतूहल जागवणारा 'रौंदळ' हा अॅक्शनपट मराठीसह हिंदी प्रेक्षकांचंही मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा टिझर नुकताच लाँच करण्यात आला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'ख्वाडा' या चित्रपटानंतर 'बबन'मध्ये मुख्य भूमिकेत दिसलेल्या भाऊसाहेब शिंदेंचा रुद्रावतार 'रौंदळ' या चित्रपटात पहायला मिळणार आहे. हा चित्रपट मराठी आणि हिंदीमध्ये संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे. भूमिका फिल्म्स अ‍ॅण्ड एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली बाळासाहेब शिंदे, डॉ. पुरुषोत्तम भापकर, प्रमोद चौधरी आणि भाऊ शिंदे यांनी 'रौंदळ' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'रौंदळ' चित्रपटाच्या रावडी पोस्टरनं प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण करण्याचं काम केल्यानंतर आता याचा लक्षवेधी टिझर रिलीज करण्यात आला आहे. गजानन पडोळ यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. को

'विक्रम वेधा'मधील 'अल्कोहोलिया' गाणं संगीतप्रेमींच्या भेटीला ...भारतातील १५ शहरांमध्ये थेट प्रक्षेपित झाले .

Image
'विक्रम वेधा' या चित्रपटाने एक अनोखा विक्रम  केला आहे. प्रथमच राष्ट्रीय पातळीवरील इव्हेंटद्वारे एखाद्या चित्रपटातील गाणं रिलीज करण्यात आले आहे. आज हृतिक रोशन आणि सैफ अली खान अभिनीत 'विक्रम वेधा' या चित्रपटातील 'अल्कोहोलिया...' हे पहिलं वहिलं गाणं लाईव्ह इव्हेंट प्रसारणाद्वारे १५ शहरांमध्ये प्रक्षेपित करण्यात आले. भारतातील सर्वात लोकप्रिय डान्सर असलेला सुपरस्टार हृतिक रोशन अभिनीत 'विक्रम वेधा' या चित्रपटातील 'अल्कोहोलिया' हे गाणं अनोख्या शैलीत लाँच करण्यात आले. 'विक्रम वेधा'च्या टिमने लखनऊ, पाटणा, इंदोर, सुरत, नागपूर, जालंधर, चंदीगड, जोधपूर, नोएडा, नाशिक, वाराणसी, रांची, औरंगाबाद, मुंबई आणि दिल्ली अशा एकूण १५ शहरांमध्ये हे गाणं थेट प्रक्षेपित केलं आहे. 'अल्कोहोलिया' या गाण्याच्या लाँचप्रसंगी हृतिकनं या गाण्याच्या तालावर आपल्या चाहत्यांसोबत ठेका धरत डान्स केला. चाहत्यांनी त्यांचा आयडल असलेल्या लाडक्या स्टारसोबत डान्स फ्लोअर शेअर करण्याचा मनमुराद आनंद लुटला. 'अल्कोहोलिया...' या गाण्यात हृतिक रोशन यापूर्वी कधीही न

हिल्टन, मुंबई येथे १७, १८ सप्टेंबर रोजी "सीकेपी फूड फेस्टिवल"

Image
होम शेफ प्रांजल श्रोत्री यांच्या सहाय्याने आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील हिल्टन मुंबई येथे १७ व १८ सप्टेंबर रोजी सीकेपी फूड फेस्टिवलचे आयोजन केले आहे. चांद्रसेनिय कायस्थ प्रभू (सीकेपी) हा समाज त्यांच्या मांसाहारी खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहेत. ऋतुनुसार मिळणार्‍या भाज्या आणि मांसाहारी पदार्थ एकत्र करून चविष्ट पदार्थ बनवणे, ही त्यांची खासियत. परंतु हे फार कमी जणांना माहीत आहे की, सीकेपींचे मासांहारी पदार्थ जितके चविष्ट असतात, तितकेच त्यांचे शाकाहारी पदार्थही स्वादिष्ट असतात.  'सीकेपी' हे कायस्थ समाजात मोडतात. सीकेपींचे मूळ हे १७व्या आणि १८व्या शतकात काश्मीरमध्ये असल्याचे बोलले जाते. हा समाज त्यांच्या मुळाशी घट्ट बांधलेला असून खाद्यसंस्कृतीबाबत ते नेहमीच चोखंदळ असतात. प्रत्येक हंगामानुसार, सणासुदीनुसार त्यांच्या खाद्यपदार्थांमध्ये बदल होत असतो. या फूड फेस्टिव्हलच्या माध्यमातून प्रसिद्ध अभिनेता पुष्कर श्रोत्री यांच्या पत्नी प्रांजल श्रोत्री आपल्या पारंपरिक आणि कौटुंबिक पाककृती सादर करणार आहेत. कांद्यातील मटण आणि वडे, खिमा पॅटिस, तळलेली माशांची तुकडी, वडीचा सांबार, रुमाल

मनवा नाईक'शिवप्रताप गरुड़झेप' चित्रपटात साकारणार सोयराबाईंची भूमिका.

Image
अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती अशी चौफेर मुशाफिरी करत अभिनेत्री मनवा नाईक हिने आपली स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. निर्मात्याच्या भूमिकेत शिरल्यानंतर अभिनेत्री म्हणून ती अभावानेच दिसली. मात्र, बऱ्याच कालावधीनंतर आता ती पुन्हा एकदा  अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. ‘शिवप्रताप गरुड़झेप’ या चित्रपटात ती महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नीची सोयराबाई मोहिते यांची महत्त्वपूर्ण भूमिका ती यात साकारणार आहे. 'जगदंब क्रिएशन' प्रस्तुत  आणि डॉ. अमोल रामसिंग कोल्हे निर्मित 'शिवप्रताप गरुडझेप' चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे. ५ ऑक्टोबरला 'शिवप्रताप गरुडझेप' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बऱ्याच कालावधीनंतर तेसुद्धा ऐतिहासिक चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका करण्याचा योग जुळून आला असून या भूमिकेसाठी मी तितकीच उत्सुक होते, असं मनवा सांगते. अत्यंत रूपवान आणि लावण्यवती असणाऱ्या सोयराबाई यांची भूमिका करायला मिळणं माझ्यासाठी ही महत्तवपूर्ण होतं. माझी ही भूमिका प्रेक्षकांना